सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
आहे नाना उपाय करण्याची चिंता आम्हास काही करावी लागत नाही ३ हा तुकाराम त्या पांडुरंगास आळवीत
भवमदीच्या एका तीरावर उभा आहे, असे पाहून पाडुरंगाने त्याला वाचविण्यासाठी नदीत उडीच टाकलेली आहे ४
८३८ शुद्ध चर्या हेचि संताचे पूजन । लागतचि धन नाही वित्त ॥ १ ॥
सगुणाचे सोई सगुण विधाती । आपणचि येती खोजवीत ॥ २ ॥
कीर्तनींचि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणे वास सन्निधता ॥ ३ ॥
तुका म्हणे वर्म सांगतो सबगें । मन लावा मार्गे स्वहिताच्या ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - चर्या-दिनक्रम आचार, खोजवीत-शोधीत, वोरस-प्रसाद
अर्थ - आपले आचारविचार व रोजचा कार्यक्रम शुद्ध ठेवणे हेच खरे म्हणने संताचे पूजन आहे आणखी
काही धन किंवा संपत्ती यासाठी लागत नाही १ या श्रीहरीच्या सगुण रूपाच्या प्राप्तीमुळे हे सगुण रूपच आपण
होऊन आपल्या भक्ताला शोधीत येत असते २ हा श्रीहरी दूर असला तरी कीर्तनाच्या वेळी याच्या कृपेचा रस
किंवा प्रसाद प्राप्त होतो व त्याची जवळीक जाणवते ३ तुकाराम महाराज म्हणतात मी हे सोपे वर्म तुम्हास
सांगत आहे की, तुम्ही आपले मन स्वतःच्या हिताकडे लावा ४
८३९ जीवींचे जाणावे या नावे आवडी । हेकड ते ओढी अमंगळ ॥ १ ॥
चित्ताच्या संकोचे काहींच न घडे । अतिशय वेडे चार तेचि ॥ २ ॥
काळाविण काहीं नाहीं रुची येत । करुनि संकेत ठेवियेला ॥ ३ ॥
तुका म्हणे कळे वचर्ने चाचणी । काय बोलवूनि वेळोवेळा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम हेकड-हेकट हट्टी
अर्थ - आपल्या मानवी जीवनाचा हेतू जाणावा यालाच प्रेम हे नाव आहे पण जे हट्टी असतात त्याची
ओढ मात्र जे अपवित्र आहे त्याकडेच असते १ चित अप्रसन्न व संकोची झाल्यास काहीच समजणार नाही की
हातून होणार नाही अतिशय वेडे असणारे चार गान हातून घडतील २ पण योग्य काळाशिवाय कोणतीही गोष्ट
एकदम समजत नाही, माप होत नाही असा जणु जुनाच संकेत आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, याची चाचणी
शब्दांनीच मधून मधून होत असते या सबंधी पुन पुन बोलण्याने काय होणार आहे ? ४
८४० कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥ १ ॥
रंगले तें अगीं दावी । विष देयवी आसडे ॥ २ ॥
धनसोसे लागे वेड । ते बडबड शमेना ॥ ३ ॥
तुका म्हणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - चवी- मर्यादा रीत, आसडे-आचके वेसनें-व्यसन
अर्थ - कामाने आसक्त झालेला मनुष्य व्यवहाराच्या सर्व मर्यादा सोडतो आणि तोंडात जे येईल ते
बरळत असतो १ जे अंगात भिनून गेलेले असते, तेच बाहेर प्रकट होते अतरगात बाणलेले विषय बाहेर आच-
क्याच्या रूपाने प्रकट होते २ अनिवार संपत्ती मिळविण्याच्या नादाने वेडच लागते माणसांस त्याची येताल बडबड
काही केल्या शमत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही दोनही व्यसने नर्कवास भोगण्याचीच आहेत ४
८४१ कृष्णार्जनें जाले सोज्ज्वळ लोचन । तेणे दिले थान' निवडूनि ॥ १ ॥
निरोपाच्या मार्पे करी लडबड । त्याचे त्याने गोड नारायणे ॥ २ ॥
भाग्यवंताघरीं करिता विश्वासे । कार्य २ त्यासरिसे होईजेतें ॥ ३ ॥
तुका म्हणे पोट भरे घरेयोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥ ४ ॥
१ धान २ काय
३९६ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा :- वान-पदार्थ, वस्तू, बरेवोजा-चांगल्या प्रकाराने.
अर्थ :- श्रीकृष्णाच्या रूपाचे कृष्णांजन माझ्या डोळ्यांत घातलेले असल्याने ते मोठे सोवळ व निमंळ
बनले आहेत. १ परमेश्वराचा निरोप सांगण्यासाठी म्हणूनच मी खटपट करीत आहे त्या नारायणाने त्याचा हा
निरोप गोड करून मला सांगितला आहे. २ जे भाग्यवत आहे, ते त्यांच्या घरी विश्वासाने चाकरी केल्यास
मनासारखे कार्य साधते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकाराने पोटही चांगले भरते व आपल्या स्वामी
आपल्याला आश्रय आपोआप मिळतो. ४
८४२ मंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥ १ ॥
पुढें नाडियेलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ २ ॥
उभारोनि बाहे । दृष्टादृष्टीं येधीताहे ॥ ३ ॥
वैकुंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥ ४ ॥
पुंडलिकाँ थारा । देउनि आणिले या चोरा ॥ ५ ॥
तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- मंद-ढोंगी, कपटी ( लटक्या अर्थाने ), नाडियेले-फसविले, पेणें-मुक्काम.
अर्थ :- प्रेमाचा पाश हातात घेऊन हा ढोंगी श्रीहरी पंढरपुरास येऊन स्थिर झाला आहे. १ याने नंतर
जगातील अनेकांना फसविले. काही मागमूस लागणार नाही अशा ठिकाणी हा लबाड घेऊन जातो. २ दोन्ही हात
उभारून केवळ दृष्टीनेच वेधून हा आपणाकडे सर्वांना आकर्षित करून घेतो. ३ पुंडलीक भक्ताने या चोरास आश्रय
देऊन या स्थानावर स्थिर केले आहे. ४ या पंढरपूरच्या लोभासाठी या श्रीहरीने वैकुंठ सोडून मुक्काम
आपल्या भक्तांसाठी केलेला आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, चला, तुम्ही आम्ही सर्व मिळून त्याला धरून
त्याचेच भजनपूजन करू. ६
८४३ भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्वासीं ॥ १ ॥
माझी माझी म्हणे एकएकां मारी । हैं तौ नाही दुरी उभयतां ॥ २ ॥
तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥ ३ ॥
तुका म्हणे एके ठायाँ आहे वर्म । हेचि होय श्रम निवारितें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दुरी-उणीव, भातें-खाऊ.
अर्थ :- कधी कधी आई आपल्या मुलाचे भांडण कौतुकाने लावते व आपण दूर उभी राहून साक्षित्वाने
पाहात असते. १ ती कधी एका मुलास माझा लाडका असे म्हणते व दुसऱ्यास मार देते. पण या दोन्ही मुलाच्या
प्रेमात काही उणीव नसते २ मला फार खाऊ मिळाला, तुला थोडाच आहे, असे भांडण विनाकारण कटकट करुन
मुले करतात व आई प्रेमाने ते सोडविते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या वृथा भांडणाचे वर्म एका आईस
मात्र माहीत असल्याने तो त्यांचे श्रम दूर करण्याचे प्रयत्न करते. ४
८४४ लटकियाची आशा । होतो पडिलों वळसा ।
होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥ १ ॥
वरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी ।
आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ २ ॥
मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्त्तली बुद्धी ।
परती तों कधीं । घडेचि ना माघारीं ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा ३९७
साचूनि मरे धन । लायी पोरासी भांडण ।
नाही नारायण । तुका म्हणे स्मरीला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लटिक्याची-खोट्याची, वळसा-भोवऱ्यात
अर्थ - धन, दौलत पुत्र, गेह, पत्नी या सर्व खोट्या पसाऱ्याच्या आशेत गुंतल्यामुळे मी जन्ममृत्यूच्या
भोवऱ्यातच सापडलो होतो सर्व दोषास मी यामुळे पात्र झालो आहे १ परंतु याचवेळी माझी दृष्टी आत्मज्ञानाने
उजळली हे बरे झाले नाही तर मग मी फार कष्टी झालो असतो अशा या खोट्याच शब्दांनी सर्व जग आक्रोश
करीत असते २ या माणसांना मरणाचेही भय, ते वृद्ध झाल्यामुळे कधी वाटतच नाही नाना प्रकारच्या इंद्रियसुखात
त्याचे मन गुंतून राहिलेले असते तेथून त्याची दृष्टी परत माघारी वळते असे कधी होतच नाही ३ अशी माणसे
पुष्कळ धन साठवितात, आणि एक दिवस मरून जातात मग त्यांच्या मुलांमध्ये मात्र भांडण लागते तुकाराम
महाराज म्हणतात, जिवंत असताना यानी कधीही नारायणाचे स्मरण केलेले नसते ४
८४५ जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहर्निशीं ॥ १ ॥
भवविर्दाळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ २ ॥
सुखाचे शेजार । करुं का नावडे घर ॥ ३ ॥
तुका म्हणे ठेवा । का हा न करीचि बरवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अहर्निशी-रात्रदिवस भवविर्दाळण-संसाराचा नाश
अर्थ - श्रीहरीचे नाव चांगले मुखाजवळ असतानाही हा ते रात्रदिवस का बरे घेत नाही ? १ या विठ्ठलाचे
नाम पुनःपुन घेतल्याने संसाराचा संसारबुद्धीचा नाश होऊन, इतर अनेक इच्छाही नष्ट होतात २ प्रभूचे हे नाम
चांगली सुखाची शय्या असून तो का आवडत नाही ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हरिनामाचा हा उत्तम ठेवा
तू जवळ का राखून ठेवीत नाहीस ? ४
८४६ बरवे देशावर जाले । काय बोले बोलावें ॥ १ ॥
लाभें लाभ दुणावला । जीव धाला दर्शनें १ ॥ २ ॥
भाग्यें जाली सतभेटी । आवडी पोटीं होती ते ॥ ३ ॥
तुका म्हणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दुणावला-दुप्पट झाला, धाला-संतुष्ट झाला
अर्थ - देशावर परमार्थाभाचा व्यवहार फार चांगला झाला त्याचे वाणीने वर्णन काय करावे ? १
मनुष्यदेहाचा लाभ झाल्यामुळे व सतदर्शनामुळे जीव संतुष्ट होऊन गेला २ मोठ्या भाग्याने माझी या संतांची
भेट झाली याच भेटीची माझ्या पोटात इच्छा होती ३ तुकाराम महाराज म्हणतात या भेटीसाठी जे जे श्रम केले
ते सर्व फळास आले ४
८४७ सांगता हे नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥ १ ॥
आवडीनें सेवन करू । जीवांचे धरू जीवाँच ॥ २ ॥
उपमा या देता लाभा । काशा शोभा सारिखी ॥ ३ ॥
तुका म्हणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संताचे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - काशा-कशासारखा, नुचलीं-उचलीत नाही
अर्थ - संताच्या सहवासाचे जे सुख झाले, त्याचे वर्णन करून सांगता येण्यासारखे नाही त्याची कीर्तीही
तोंडाने वर्णन करता येत नाही १ मोठ्या प्रीतीने त्याच्या संगतीचे सुख सेवन करू व आमच्या जीवातील जीव
१ धापणे
जपून ठेवू. २ हा जो लाभ आम्हांला झाला आहे, त्याला उपमा द्यायला जावे तर तो पद्मासारखा आहे म्हणून
सांगावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी या संतांच्या पायावर डोके ठेविले आहे, ते काही वर उचलत नाही. ४
८४८ आपुलाला लाहो करूं । फेणें भरूं हा विठ्ठल ॥ १ ॥
भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ २ ॥
पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥ ३ ॥
तुका म्हणे जाली जोडी । चरण घडी न विसंबें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- लाहो-लाभ, फेणे-माल, जिन्नस.
अर्थ :- आता आपला आपण लाभ करून घेण्यासाठी हा विठ्ठलरूपी माल भरून ठेवू. १ माझे मोठे भाग्य
म्हणूनच मी या स्थानास प्राप्त झालो आहे. आता मी माझा जीव याच्यावरून ओवाळून टाकीन. २ असा हा लाभ,
यापुढे घडेल असे नाही. फार दिवसांनी या लाभाची प्राप्ती मला झालेली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात
श्रीहरीचा हा जो लाभ मला झाला आहे, तो समजून मी याचे चरण एक क्षणही सोडणार नाही. ४
८४९ उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥ १ ॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ २ ॥
संपुट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥ ३ ॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:-वारली-दूर झाली, संपुट-देवाला ठेवण्याचे पात्र.
अर्थ:-आज माझे भाग्य किती उजळून आले आहे पाहा. या श्रीहरीच्या प्राप्तीमुळे माझी सर्व चिंता दूर
झाली. १ संतांच्या दर्शनाने हा लाभ मला झाला, हा पद्मनाभ मला भेटला. २ याला आता माझ्या हृदयपेटीचे
संपुट करून मी जपून ठेवीन, साठवून ठेवीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा जो श्रेष्ठ प्रकारचा साठा होता,
तो मला भक्तिभावामुळे सापडला आहे. ४
८५० आम्हां आपुलें नायडे संचित । खरफडे चित्त कळवळ्यानें ॥ १ ॥
न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ २ ॥
कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥ ३ ॥
तुका म्हणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संचित-साठलेले कर्म
अर्थ:- ईश्वरा, आम्हांला आमचे कर्म आवडत नाही. यासाठी रात्रंदिवस आमचे चित्त एकसारखे तळमळत
असते. १ खरोखर या परमार्थामागचे खरे मर्म न समजल्यामुळे आमचा खोळंबाच झाला असून या जगात लोकांच्या
दृष्टीने मी नाना सोंगे आणणारा बहुरूपीच बनलो आहे. २ पण या सर्व गोष्टी आता मला समजून आल्या आहेत
हे एक बरे झाले. आता माझे डोळे उघडले आहेत. आता या मार्गात एखादा मार्गदर्शक कर्णधार मिळेल तर बरे. ३
तुकाराम महाराज म्हणतात, आमची करुणा तुम्हांस येत असेल तर, नारायणा, आमच्या संरक्षणासाठी उडी घ्या ना ४
८५१ वरगासाठीं लावलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥ १ ॥
फजित तो केला लाहे । ताडण साहे गौरव ॥ २ ॥
ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥ ३ ॥
तुका फजीत करी बुच्या¹ । विसरे कुच्या खोडी तेणें ॥ ४ ॥
१ बुका.
सार्थ तुकारामगाथा ३१९
शब्दार्थ व टीपा :- वरगासाठीं-ज्वारी वगैरेसाठी, नवजाय-जाणार नाही, बुचा-निलाजरा, मूर्ख, फुच्या-
ठोका, ढेम
अर्थ - ज्वारी वगैरे धान्य न मिळाल्याने फुणी दुष्काळामध्ये झेण खाल्ले; पण त्याची त्याला एवढी चटक
लागली की, पुढे अन्न मिळायला लागल्यानंतरही त्याने ते खायचे सोडले नाही. १ अशा माणसाची मार देऊन
फजिती केली, तरी ती त्याला गौरवाचीच वाटते. २ ओढाळ जनावरास वाईटसाईट खाण्याची जो गोडी लागलेली
असते, ती खोड काही त्याची सहजासहजी जात नाही. ३ अशा या निलाजऱ्या व मूर्ख माणसाची तुकाराम चांगलीच
फजिती करीत असतो. चांगला मार बसल्यावर मग आपली खोड ते सोडतात. ४
८५२ घांव घालीं आई । आतां पाहातेसी काई ॥ १ ॥
धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटी ॥ २ ॥
करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥ ३ ॥
तुका म्हणे डोई । कधीं ठेवीन हे पायीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- हिंपुटी-नष्टी, उदास
अर्थ - विठोबा माउली, आता माझ्या रक्षणासाठी तू धाव ना. आता तू कशासाठी थांबली आहेस ?
कशाची वाट पाहतेस ? १ माझ्या पोटात आता कसलाच धीर नाही. मी तुझ्या वियोगाने फारच दुःखीकष्टी झालो
आहे. २ आई, मला अतिशय ताप आला आहे, मला शांत कर ना. ३ देवा, मी आता अधीर झालो असून तुझ्या
पायावर डोके कधी ठेवीन असे मला झाले आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४
८५३ तुम्हां ठावा होता देवा । माझे अंतरींचा हेवा ॥ १ ॥
होतो काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ २ ॥
नसतें सांभाळिले । जरि तुम्हीं आश्वासनिलें ॥ ३ ॥
तुका म्हणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- हेवा-हाव, सावाधावा-साहाय्य करण्यासाठी धाव घेणे.
अर्थ :- देवा, माझ्या मनातील हाव कसली आहे याची माहिती तुम्हांस प्रथमपासूनच आहे. १ वैकुंठनायका,
माझी सुटका या संसारपाशातून कशाने होईल हो ? २ तुम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे मला सांभाळले नसते तर मग
काय झाले असते ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू फारच कृपाळू असून मला साहाय्य करण्यासाठी धाव
घेतलीस हे फार चांगले केलेस. ४
८५४ देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥ १ ॥
पाहतां फाशा तूं सारिखा । तिहीं लोकांच्या जनका ॥ २ ॥
आरष हे वाणी । गोड करूनि घेतां कानीं ॥ ३ ॥
आवडीनें खेळें । तुका पुरवावे¹ सोहाळे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आरष-बोबडी, फाशा-गवताचा एक प्रकार
अर्थ :- पुरुषोत्तमा, तुला जी उपमा आम्ही आवडीने देऊ ती शोभून दिसेल. १ एका बाजूस गवताच्या
फाशासारखाही तू आहेस, तर दुसऱ्या बाजूस तू तीनही लोकांचा जनक आहेस. २ देवा, माझी ही बोबडी वाणी
तुम्ही चागली कानानी गोड करुन ऐकता. ३ आवडीने खेळणाऱ्या या तुकारामाचे सर्व सोहाळे देवा, तुम्ही पुरवायेत ४
८५५ दर्शनाची आस । आतां न साहे उदास ॥ १ ॥
जीव आला पायांपाशीं । येथें असे कलियरेंसीं ॥ २ ॥
१ फुपावे.
कांहींच नाठवे । ठायीं बैसलें नुठये ॥ ३ ॥
जीव असतां पाही । तुका ठकावला ठायीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आस-इच्छा, कलिवरेंसीं-शरीर तेवढे, नुठये-न उठवे, उठवत नाही, ठकावला-
फसला गेला.
अर्थ :- देवा, मला तुमच्या दर्शनाचीच तेवढी तीव्र इच्छा आहे. आता या बाबतीतील उदासीनता मला
सहन होणार नाही. १ माझा सारा जीव देवा, तुमच्या पायाशी असून येथे शरीर तेवढे शिल्लक राहिलेले आहे. २
मला आता दुसरे काहीच आठवत नसून बसल्या जागेवरून उठवतही नाही. ३ देवा, तुमच्या चरणांवर मी माझा
जीव पाहिलेला असतानासुद्धा मी असा फसवला जावा ना ? ४
८५६ भोगावरि आम्हीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥ १ ॥
विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं वळा येऊं आतां ॥ २ ॥
काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥ ३ ॥
केला तरी उरे वादचि कोरडा । वळें घ्यावी पीडा स्वप्नींची ॥ ४ ॥
अवघेचि वाण आले तुम्हां घरा । मजुरी मजुरा रोज कीर्दी¹ ॥ ५ ॥
तुका म्हणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाण-प्रकार, रोजकीर्द-रोजच्या जमाखर्चाची वही
अर्थ :- देहासंबंधी असणाऱ्या सुखदुःखादी भोगावर आम्ही पाषाण घालून ते जणू सर्व बदच केले आहेत,
आणि मरण देहाला व इंद्रियांच्या वृत्तींना असते हे जाणून मी आत्मतत्त्वाच्या जाणिवेमुळे अमर होऊन राहिलो.
अशा प्रकारे मरणालाच मी मारून टाकले आहे. १ देवा, सर्व विश्वाला जर तू भरून राहिला असशील तर मी
त्यातून निराळा कसा राहू शकेन ? मग मी वेगळा मानून उगाच कोणत्या वळाने माडून काढू ? २ सर्वत्र तूच आत
व बाहेर जर भरून राहिला असशील, तर मग मी आतून बाहेर तरी काय काढावे ? व बाहेरून आत तरी काय
ठेवावे ? ३ याविषयी वादही किती जरी केला तरी तो कोरडाच राहतो. असे असल्याने देहादींची व इंद्रियांची
दुःखे ही स्वप्नवत असल्याने ती घेण्याची किंवा खरी मानून कष्टी होण्याची यातायाात मी का करावी ? ४ देवा,
सर्व प्रकार तुमच्या घरीच आले असताना, सर्व मजुरांची मजुरी रोजच्या जमाखर्चाच्या वहीत आहे. ५ तुकाराम
महाराज म्हणतात, यात मी लाभहानी काही जाणणार नाही. या देहाचा जो कोणी धनी असेल तो या देहाचा वाडा
रक्षण करील. ६
८५७ कां हो एथें काळ आला आम्हां आड । तुम्हांपाशीं नाड करावया ॥ १ ॥
कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें फोडें उपजलें ॥ २ ॥
कां हो उपजेना द्यावी ऐसी भेटी । काय ह्रींत पोटां धरिले देवा ॥ ३ ॥
पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाही आतां ॥ ४ ॥
काय जाले देणें² निघाले दिवाळें । कीं बांधलासि बळें ऋणियांनीं ॥ ५ ॥
तुका म्हणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडूनियां ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा -नाड-अडथळा, साकडे-सकट, फोडें-अडचण.
अर्थ - देवा, तुमच्या व माझ्या भेटीत आड येणारा काळ का हो मध्येच आला ? त्याने तुमच्याजवळ येऊन
अडथळा का हो निर्माण केला ? १ मला भेट देण्याविषयीच्या विचाराचे सकट तुम्हांस का पडले आहे ? अशी कोणती
अडचण निर्माण झाली आहे की, तुम्ही भेट देण्याचा विचार रहित केला ? २ देवा, मला भेट द्यावी अशी भावना
१ कीर्ती, २ नेणे
तुमच्या अंतःकरणात का हो निर्माण होत नाही ? तुमच्या-माझ्यामधील द्वैताची, वेगळेपणाची भावना तुम्ही अजून
कायम धरली आहे काय ? ३ मला भेट देण्याचे तुम्ही टाळता, याचे कारण देवा, आमचे पाप फार बलवत्तर आहे,
का ? किंवा तूच दुबळा झालास की काय रे ? तुझ्या अंगी आता पापी लोकांचा उद्धार करण्याचे बळ पूर्वीसारखे
उरलेले नाही काय ? ४ किंवा देवा, तुला इतरांचे देणे फार झाले की काय ? तुझेही दिवाळे निघाले ? की कुणाच्या
ऋणात तुजकडून राहिला आहेस ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी गुंतवणूक करून का ठेवितो आहेस ?
तुझ्या व माझ्या संबंधाचे स्वरूप स्पष्टपणे ठरवून ना देवा ६
विवरण - वारंवार प्रार्थना करून, स्तुती करून, आर्त भावनेने करुणा भाकूनही देव आपल्यावर का कृपा
करीत नाही ? या एका प्रश्नाच्या पोटी थोर भक्तांच्या मनात जे जे विकल्प बहुतांशहतो येतात, त्यातील काही
या अभंगात आहेत तुझ्यामाझ्या मार्गात काळ आडवा आला काय ? विसाराचे भेट द्यावी अथवा न द्यावी या
सारख्या विचाराचे संकट निर्माण झाले काय ? का भेट न देण्याविषयीचे द्वैत पाटात निर्माण झाले ? आमचे पाप
फार झाले ? की दया, तुझी पापमोचनाची शक्तीच कमी झाली ? तुझ्याही शक्तीचे दिवाळे निघाले की काय ? की
कुणाच्या ऋणात जखडून गेला असल्यामुळे आमच्यासारख्याच्या वाटघास येत नाहीस ? अशासारखे अनेक संशय
भक्तांच्या मनात येतात त्याचा उच्चार तुकारामबुवांनी येथे केलेला आहे मोरोपंतांची 'संशयरत्नमाला' प्रसिद्ध
असून तिच्यातही लडिवाळ भक्ताच्या मनातील संशयाबद्दलचा आविष्कार फार चांगल्या प्रकारे झाला आह भक्ताने
वारंवार करुणा भाकावी, दीन वाणीने प्रार्थना करावी, नाना तर्क करावेत, डाकाकुसका काढाव्यात, देवाशी प्रेमाने
भांडण करावे व मग देवाने कृपा करावी, यामधील सुकुमारता व भक्तीची, जिव्हाळ्याची वृत्ती अधिक संतोषदायी
आहे देवा, मला भेट, म्हटल्याबरोबर देव भेटल्यास त्या भेटीमधील आनंद व तळमळ केल्यावर, हट्ट केल्यावर
भेटल्यानंतरचा आनंद, यात फरक असणारच लेकराने रागवावे, रुसावे, नाना शंका घ्याव्यात व आईने मग त्याची
समजूत काढावी, यात सर्व आले
८५८ काय देहू घालू करवती कमरी । टाकू या भितरी अग्नीमाजी ॥ १ ॥
काय सेवू वन शीत उष्ण ताण । साहो कीं मोहन' धरुनी बैसो ॥ २ ॥
काय लावू अगीं भस्म उधळण । हिंडू देश कोण खुंट चारी ॥ ३ ॥
काय त्यजू अन्न करुनि उपास । काय करु नास जीविताचा ॥ ४ ॥
तुका म्हणे काय करावा उपाय । ऐसा देई भाव पाडुरंगा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - कमरी-शस्त्र, मोहन-मौन, चार खुंट-चार धाम
अर्थ - देवा, मी तुमच्या भेटीसाठी करावे तरी काय हो ? काय माझ्या देहावर शस्त्र घालून त्याला
कापून टाकू ? की त्याला अग्नीमध्ये टाकून देऊन भाजून टाकू ? १ की एखाद्या रानावनात जाऊन शीत, उष्ण, तहान
याचा त्रास सहन करू ? का मौन धारण करून तेथे स्वस्थपणे बसून राहू ? २ की अंगावर भस्माची उधळण करून
वैरागी-गोसावी बनू ? चार खुंट फिरून कोणत्या देशाची वारी करू रे देवा, तुझ्यासाठी ? चार धामाची यात्रा करू
तुझ्या प्राप्तीसाठी ? ३ अन्न सोडून देऊन देवा मी उपास करू का ? की माझ्या जिविताचा नाश करून टाकू ? ४
तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला सांगा ना एखादा उपाय तुमच्या प्राप्तीचा याविषयी तुम्हीच मला आता
एखाद्या भावभक्तीचा मार्ग दाखवा ना ५
८५९ दमें कीर्ति पोट नरे मानी जग । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥ १ ॥
अंतरतो तुझे पाय मज दुरी । धरिता हे थोरी जाणिवेची ॥ २ ॥
पिंडाच्या पाळणे धावती विकार । मज दावेदार मजमाजी ॥ ३ ॥
१ मौन
तु गाथा ५१
४०२ सार्थ तुकारामगाथा
कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥ ४ ॥
तुका म्हणे मज दावी तो सोहळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- पिंडाच्या-शरीराच्या, गुमान-पर्वा, फिकीर
अर्थ :- ढोंग करून परमार्थ केल्यास, भक्तीचा डोल मिरविल्यास पोट भरते. लोकांत मानमान्यताही
मिळते. पण त्याच्यामुळे स्वतःचे मात्र कसलेही हित होत नाही. १ मी मोठा ज्ञानी व शहाणा या ज्ञानाच्या
जाणिवेने देवा, तुझे पाय मात्र अंतरतात २ आणि केवळ देहाचेच पालनपोषण केल्याने कामक्रोधादी वृत्ती वळाव-
तात, व माझ्यात असलेले माझे हे शत्रू माझे दावेदार बनतात ३ लोकांची पर्वा न करता मी माझा घात कसा
करून घेऊ ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे पाय मी पाहिले आहेत, असा सोहळा मला दाखवा ना. ५
८६० धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें वर' भलें मग ॥ १ ॥
आइका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ २ ॥
देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥ ३ ॥
तुका म्हणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - घर-चांगले
अर्थ :- ज्याचा मालक वाईट आहे, त्याच्या जिण्याला धिक्कार असो. मग त्यापेक्षा मरण कितीतरी चांगले
समजावे बरे. १ देवा, नीट ऐका; अशी ही एकंदर नीती आहे; म्हणून जे योग्य व उचित असेल त्यांचा सांभाळ
तुम्ही करावा. २ ज्याच्या शब्दाचा दरारा सर्व देशांतून आहे, त्याचा कुत्राही होणेही बरे, फार चांगले वाटते, ३
देवा, अशा प्रकारच्या कडक शब्दांचे उत्तर मी तुम्हास का देत आहे, याचा विचार तुम्ही माझे अंतःकरण जाणून
करावा ना एकदा ४
८६१ आतां गाऊं तुज ओविया मंगळी । करूं गदारोळी हरिकथा ॥ १ ॥
होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ २ ॥
भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होऊनि राहों ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही लाडिकी लेंकरें । न राहों अंतरें पायांविण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मंगळी-पवित्र, मगलदायक, गदारोळी-आग्रहाने, गर्जना करून
अर्थ :- देवा, आता तुला मंगलदायक ओव्या गाऊन तुझी आम्ही स्तुती करू. या हरिकीर्तनाची एकच
गर्जना सर्वत्र करून देऊ. १ आमच्यावर जी जी संकटे येतील त्याचे निवारण देवा, तूच करणारा होशील. भय,
तळमळ, पापपुण्य यांना दूर करण्याचे कार्य तूच देवा करशील. २ आम्ही आजपर्यंत जे जे भोग घेतले, ते ते सर्व
तुझ्या अंगी लावून आम्ही या जगात अलिप्त होऊन राहू. भोगणारा केवळ तूच आहेस, या जाणिवेने आमचेकडे
कर्तृत्व काही नाही असे समजू ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्ही सर्व लेकरे तुझी फारच लाडकी
आहोत रे. तुझे पाय सोडून आता आम्ही दुसरीकडे कुठेही राहणार नाही. ४
८६२ सर्व सुखें आजी येथेंचि वोळली । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥ १ ॥
सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणे काळें ॥ २ ॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंठित । पुढें जालें चित्त समाधान ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - वोळली-प्राप्त झाली, चरणांबुजें-चरणकमले, धणी-तृप्ती.
१ बरे.
सार्थ तुकारामगाथा ४०३
अर्थ :--आज सर्व सुखांची प्राप्ती मला येथेच झाली आहे. कारण येथे संतांचे चरणकमल मी पाहिले
आहेत. १ याच पावलांची इच्छा मी माझ्या मनात सदासर्वकाळ करीत होतो. आज मात्र माझी इच्छा तृप्त
झाली. २ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र माझी वाणी काही बोलू शकत नसून ती कुंठित झाली आहे;
व माझ्या चित्तात पूर्ण समाधान प्राप्त झाले आहे. ३
८६३ विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥ १ ॥
विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ २ ॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न येदे अन्यथा आन दुजें ॥ ३ ॥
सकळां इंद्रियां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोवाचें ॥ ४ ॥
तुका म्हणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा.- काया-शरीर, आन-दुसरे
अर्थ :-- हा विठ्ठल आता माझा अत्यंत आवडता असा सज्जन सोयरा झाला असून माझ्या चित्तात त्याचेच
स्थान दृढ झाले आहे. १ या विठ्ठलरूपानेच माझे सर्व शरीर व्यापून गेलेले असून माझी छायाही त्यामुळे विठ्ठल-
रूपाचीच बनलेली आहे. २ माझ्या जिव्हेच्या अग्रावर विठ्ठलच बसला असून, तो त्याच्यावाचून दुसऱ्या कुणाचे
नावही घेत नाही. ३ सर्व इंद्रियात मन हे प्रमुख इंद्रिय असून, तेही याच विठ्ठलाचे ध्यान करू लागले आहे ४
तुकाराम महाराज म्हणतात, आता या विठ्ठलास मला क्षणभरही विसरता येणार नाही. ५
८६४ होय¹ वारकरी । पाहें पाहे रे पंढरी ॥ १ ॥
काय करावी साधने । फळ अवघेंचि तेणें ॥ २ ॥
अभिमान नुरे । कोड अवघेंचि पुरे ॥ ३ ॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-- नुरे-उरत नाही, कोड-इच्छा.
अर्थ --अरे मनुष्या, तू पंढरपूरचा वारकरी हो ना. एकदा तरी पंढरपूर येथे जाऊन त्या विठ्ठलास डोळे भरून
पाहा ना १ इतर साधनांचा काय उपयोग ? सर्व फळ याच एका दर्शनाने मिळने २ याच्या भेटीमुळे मनात
अभिमान उरत नाही व मनातील सर्व इच्छा मात्र तृप्त होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सावळा विठ्ठल
माझ्या डोळ्यात निवास करून राहिला आहे ४
८६५ पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥ १ ॥
अवघा होप पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ २ ॥
न लगे धन मान । देहभावे उदासीन ॥ ३ ॥
तुका म्हणे मळ । नासी² तात्काळ तें स्थळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-- नासी-नाश होतो
अर्थ. - जो पंढरपूरला मनोभावे जातो, तो देवाच्या दर्शनाने इतका भारावला जातो की आपल्या आई-
बापासही विसरून जातो. १ तो सर्वार्थाने पांडुरंगच बनलेला असून बेधुंद अंग धरून राहिलेला असतो. २
त्याला धनाची वा मानाची मुळीच इच्छा नसते. स्वतःच्या देहाविषयीही तो उदासीन बनलेला असतो. ३ या
पंढरीच्या वास्तव्यामुळे मनात विकारादिकाचा जो मळ असतो त्याचा संपूर्ण नाश होत असतो. ४
१ होय होय, २ नाही.
४०४ सार्थ तुकारामगाथा
८६६ बळें बाह्यात्कारें संपादिले सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥ १ ॥
ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥
जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातो विसरोनि सकळ हे ॥ ३ ॥
प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले फरी नित्य वेवसाय ॥ ४ ॥
तुका म्हणे मज भोरप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- वेवसाय-उद्योग, व्यवसाय, भोरप्याचि परी-बहुरूप्याप्रमाणे.
अर्थ - साधुत्वाच्या बळानेच बाह्यात्काराने सोंग संपादन केले; पण अंतरगातून मात्र इंद्रियसुखाचा त्याग
झाला नाही १ असे माझ्या अनुभवास नित्य येत असते व यासंबंधीचा खरा विचार काय आहे, याचीही जाणीव
माझ्या मनास नेहमीच असते २ जो अनुभव जागेपणीचा असतो, तो कधी स्वप्नामध्ये दिसत नाही. यावेळी मी
सर्व काही विसरून जातो ३ माझे चित्त खरोखर या प्रपंचातून बाहेर आलेलेच नाही. मागचेच सर्व उद्योग ते पुन'
एकसारखे करीत असते ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझी अवस्था निरनिराळी सोंगे घेणाऱ्या बहुरूप्याप्रमाणे
झालेली आहे. वरवर पुष्कळ सोंगे वेळोवेळी केली तरी आत जो जसाचा तसाच शिल्लक असतो. ५
८६७ म्हणवितो दास ते नाहीं कारणीं । आत घरी दोन्ही भिन्न भाव ॥ १ ॥
गातो नाचतों तें दाखवितो जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ २ ॥
पाविजे तें वर्म न कळेचि कांहीं । बुडालों या दोहों वघाचिया ॥ ३ ॥
भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥ ४ ॥
तुका म्हणे वांयां गेलो ऐसा दिसे । होईल या हांसें लौकिकाचें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - करणी-कृत्य, धर्म-रहस्य
अर्थ - मी स्वतःम ईश्वराचा दास म्हणवून घेतो; पण माझ्या हातून तशी कृत्ये मात्र होत नाहीत कधी.
माझ्या अंतरगातील व बाहेरचा भाव वेगवेगळाच दिसतो १ मी प्रेमाने हरीचे गुण गातो त्याच्यासाठी नाचतोही;
पण ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी आहे. माझ्या अंत करणात ईश्वराविषयी प्रेम हटकून आहेच असे मात्र नाही. २
ईश्वरस्वरूपाच्या रहस्याचे ज्ञान जे मला हवे आहे, ते काही अजून मिळालेले नाही या दोघांच्या डोहातच मी
पूर्णपणे बुडून जात आहे ३ माझ्या आयुष्याचे जे भांडवल होते ते मात्र काळाने हातोहात संपवीत आणले आहे.
ह्या माझ्या आयुष्यास माप लागले असल्याने ते उतरणीस लागले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी तर
या माणसाच्या जन्मास येऊन वायाच गेलो आहे असे दिसते माझ्या सर्व लौकिक संसाराचे हंसेच होईल असे
दिसते ५
विवरण-वरील दोन अभंगात भक्तश्रेष्ठ तुकोबानी आपल्या मनाची दुर्बलता स्पष्टपणे मांडलेली आहे
तुकारामबुवा एवढे साधू, एवढे विठ्ठलभजनात रंगलेले, एवढे परोपकारी, पण त्याचेही मन त्यांना चित्ती खात असावे
हे या अभंगातून ध्यानात येते आपण ह साधुत्वाचे बाह्यात्कारी सोंग पसरून लोकाच्या मनाची फसवणूक तर
करीत नाही ना? अशी शंका त्याच्या मनात चाटून गेलेली आहे आपले मन प्रपंचातून सपूर्णपणे निघालेले नाही,
जागृती व स्वप्नी एकच ईश्वरभाव अजून आपल्यात निर्माण झालेला नाही, आपण बहुरूप्याप्रमाणे वरवर सोंगधारीच
आहोत की काय ? आपले गाणे व आपले नाचणे हे केवळ वरवरचे तर नव्हे ? आपल्या अंतःकरणात ईश्वराविषयी
दृढ प्रेम किती आहे ? आपले आयुष्य काळाच्या मानाने हातोहात कमी तर होत नाही ना ? अशा एकसारख्या शंका
ह्यांना येत असून ते अत्यंत जागृकतेने आपले चित्त सदैव श्रीहरीच्या चरणी जडून राहील अशा विवंचनेत असतात.
स्वतःचे हे जे कठोर आत्मनिरीक्षण तुकोबानी केले आहे, त्यावरून वस्तुस्थितीच तशी होती असे मानण्याचे कारण
नाही.
सार्थ तुकारामगाथा ४०५
आपल्या मनात नारायणाविषयी प्रेम नाही व आपण अजून संसारापासून मुक्त झालो नाही, असे जेव्हा
तुकाबा म्हणतात, तेव्हा त्यांच्या म्हणण्यापाठीमागची भूमिका समजावून घ्यावयास हवी आपण जास्तीत जास्त
निर्विकार व्हाव, जास्तीत जास्त पूर्णत्वाने श्रीहरीशी एकरूप व्हावे, जास्तीत जास्त आपले चित्त निर्लेप व निर्मळ
असावे, हा त्यामागचा उद्देश आहे थोर थोर लोकांचेही मन कसे चळेल व मग सर्व आयुष्याचा नाश कसा होतो हे
त्यांना चांगलेच माहिती होते म्हणूनच त्यांनी आपल्या मनास नित्य वैराग्याचा डिवचावा, आत्मपरीक्षणाचा कठोर
अंकुश लावून घेतला दिसतो व या आत्मपरीक्षणामुळेच त्यांना सदैव जागृती येत राहिली हे स्पष्टच आहे म्हणूनच
एके ठिकाणी म्हटले आहे 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥'
८६८ न कळता काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥ १ ॥
येउनिया वास करिसी हृदयीं । ऐसे घडे करूं कासयाने ॥ २ ॥
साच भावे तुझें चिंतन मानसीं । राहे हे करिती कें गा देवा ॥ ३ ॥
लटके हे माझें करुनिया दुरी । साच तू अंतरीं येउनि राहे ॥ ४ ॥
तुका म्हणे मज राखावे पतिता । आपुलिया सत्ता पाडुरंगा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - साच-खऱ्या
अर्थ - देवा, माझ्या अंतःकरणातील प्रेमभाव सतत तुझ्या पायावर स्थिर व्हावा, अशासाठी मी काय उपाय
करावा ? हे काही समजत नाही १ देवा तू माझ्या हृदयात येऊन निवास करशील अशी गोष्ट कशाने बरे
होईल ? २ खऱ्या भावनेने तुझेच चिंतन घडेल व तेच मनात स्थिर राहील असे कधी होईल रे ? ३ देवा, माझ्यात
जे जे खोटे असेल ते दूर व्हावे व तूच खऱ्या स्वरूपात माझ्या अंतःकरणात दृढ व्हावास ४ देवा पांडुरंगा,
तुकाराम महाराज म्हणतात, मला या पतिताला तू आपल्या सत्तेने सांभाळावेस ५
८६९ चिंतितलें तें मनिंचें जाणे । पुरवी खुणे अंतरींचें ॥ १ ॥
रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत्त हे ॥ २ ॥
नवसियांचे नव' रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥ ३ ॥
तुका म्हणे समचि देणें । समचरण उभा असे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सम-एकसारखे स्वरूप
अर्थ - हा देव कसा आहे ? मनामध्ये जी जी इच्छा भक्त धारण करतो ती तो मोठ्या प्रेमाने पूर्ण
करतो १ त्याला रात्र झालेलीही समजत नाही, दिवस झालेलाही ध्यानात येत नाही पांडुरंग दैवत हे त्याच्या
अंतरंगात व शरीरात एकसारखे खेळत असते २ या देवाची प्राप्ती व्हावी म्हणून जे जे भक्त नवस करतात, ते
ते हा पूर्ण करतो जो यात स्मरण भोग भोगीत असतो त्यास तो भिन्न वाटत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात,
सर्व भक्तांना आपल्या एकसारख्या स्वरूपाची प्राप्ती करून देणारा हा विठ्ठल समचरणाने विटेवर उभा आहे ४
८७० उद्धाराचा२ संदेह नाहीं । याचा कांहीं सेवका ॥ १ ॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ २ ॥
बुडता जळीं जळता अग्नी । ते प्रसंगीं राखावे ॥ ३ ॥
तुका म्हणणे आम्हासाठीं । कृपा पोटों वागवी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संदेह-शंका, कोंवसा-आश्रय, आधार
अर्थ - हा देव आपला उद्धार करील की नाही, अशी शंका कधी त्याच्या सेवकाच्या मनात येत नाही १
हा पांडुरंग आपल्या भक्तांविषयी अभिमानी असून त्यांच्या जीवदानाचा एकमेव आधारच आहे २ पाण्यात
१ पुरवी नवस २ उधारीचा
४०६ सार्थ तुकारामगाथा
बुडण्याच्या प्रसंगीं किंवा अग्नीत जळण्याच्या प्रसंगी हा ईश्वर आपल्या भक्तांचे नेहमींच रक्षण करतो. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, हा देव आमच्यासाठीही आपल्या अंतःकरणांत निरंतर दया बाळगीत असतो. ४
८७१ काय विरक्ति फळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥ १ ॥
नाचो सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ २ ॥
शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेवांचूनियां ॥ ३ ॥
कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥ ४ ॥
कासया एकांत सेवूनया वना । आनंद तो जनामाजी असे ॥ ५ ॥
तुका म्हणे आम्हां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - वैष्णवमेळीं-विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात, घोळ-दीणा, सरसा-बरोबर
अर्थ:-वैराग्याची थोरवी आम्हांस कुठून कळणार? आम्ही त्या विठोबाचे एक नाममात्र जाणीत असतो. १
मोठ्या सुखाने व आनंदाने आम्ही विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात नाचत असतो. टाळ व घोळ यांच्या नादांत आम्ही
तल्लीन होत असतो. २ शांती, क्षमा, दया यांचे महत्त्व आम्ही काय जाणावे? या पांडुरंगाच्या, गोविंदाच्या
कीर्तनात हे सर्व काही येते. गुणकीर्तनावाचून दुसरे काहीही आम्ही जाणीत नाही. ३ नामामृताच्या सागरात बुडी
दिल्यानंतर देहावर उदास होऊन काय उपयोग? ४ या लोकातच एवढा आनंद भरलेला असताना मी रानावनात
जाऊन उगीच शीण कशास वाढवून घेऊ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस आता कसलीच भीती नाही.
कारण हा श्रीविठ्ठल आमच्याबरोबर आहे, असा विश्वास आम्हांस नेहमीच वाटत आलेला आहे. ६
८७२ जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥ १ ॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे १ यमापाशीं ॥ २ ॥
गरुडटक्यांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥ ३ ॥
सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥ ४ ॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥ ५ ॥
तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- ओखदासी-औषधासमुद्धा, भेणें-भयाने
अर्थ :- ज्या स्थानावर विठ्ठलभक्तांचा निवास असतो, ती भूमी व तो देश पुण्यवान आहे असेच समजावे १
या ठिकाणी औषधालासुद्धा दोष दिसणार नाही, असे यमाचे दूत यमास सांगत असतात. २ गरुडाचे निशाण ज्यांच्या
खांद्यावर आहे अशा वैष्णवांच्या समुदायाने व नामकीर्तनाने सर्वत्र या विठ्ठलाचाच जयजयकार होत असतो. ३
येथील लोकांच्या वाणीस गोविंद गोविंद-विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा सहजच छंद असतो ४ या ठिकाणी तुळशीची
वने असून नाना प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या असतात. येथील सर्व सोहळा वैकुंठाप्रमाणेच असतो. ५ तुकाराम
महाराज म्हणतात, भीतीने काळ या बाजूस फिरकतसुद्धा नाही. ६
८७३ माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ॥ १ ॥
पढियें देहभावें पुरवितो वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २ ॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥ ३ ॥
योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥ ४ ॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥ ५ ॥
१ सांगती.
सार्थ तुकारामगाथा ४०७
शब्दार्थ व टीपा - पडिये-आवडत, आघात-सकट, जड-राकट
अर्थ - या माझ्या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे म्हणून सांगू ? तोच माझा देव व तोच माझा गुरू झालेला
आहे १ भक्ताना जे जे आवडते, प्रिय आहे ते ते किंवा ती ती इच्छा हा देव पुरवितो आणि शेवटी आपणापाशी
घेऊन येतो त्याना २ आपल्या प्रिय भक्ताच्या मागेपुढे उभा राहून हा त्याचा साभाळ करीत असतो येईल त्या
सकटाचे निवारण करीत असतो ३ आपल्या भक्ताचे मोठे सक्ट जाणून त्याचे रक्षण करून त्याचा हा देव नीट
योगक्षेमही चालवितो हाताला धरून या भक्तिमार्गाची वाट तो दाखवीत असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात,
माझ्या या वचनावर ज्याचा विश्वास नाही, त्यानी पुराणातील अनेक दाखल्याचा विचार करावा ५
विवरण - ईश्वर आपल्या भक्ताची काळजी कशी करतो, त्याचे सकट कसे निवारण करतो, त्याचा
योगक्षेम कसा चालवितो, याबद्दल तुकारामबुवानी अनेक अभंगातून फार कोवळीकतेने दिग्दर्शन केले आहे. स्वतःचे
अनुभवही सागितले आहेत या एक फार गोड व तत्त्वस्पर्शी अभंगात बुवा अगदी साध्या भाषेत आपल्या विठोबाच्या
प्रेमभावाचे वर्णन करीत आहेत आपल्या भक्ताची जी जी इच्छा असत, ती ती हा पूर्ण करीत असतो आपल्या
लाडक्या भक्ताच्या मागेपुढे उभे राहून हा त्याच रक्षण करीत असतो हातात धरून तो भक्ताना परमार्थमार्गाची
किंवा स्वरूपाची वाट दाखवीत असतो, आणि हा सब भाव पुराणातूनही व्यक्त झालेला आहे, असे बुवा आत्म-
विश्वासाने सागत आहेत
८७४ सकळ धर्म मज विठोबाचे नाम । आणीक ते वर्म नेणें कांहीं ॥ १ ॥
काय जाणो सता निरविलें देवे । करिती या भावें कृपा मज ॥ २ ॥
तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळो यावा ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - निरविले-सोपविले.
अर्थ - या विठोबाच्या एका नामोच्चारात मला सर्व धर्म घडतात याखेरीज दुसरे कुठलेही वर्म मी जाणीत
नाही १ या सतानी मजवर कृपा करावी म्हणूनच देवाने मला त्याच्यावर सोपविले की काय न जाणे २ तुकाराम
महाराज म्हणतात, नाही तर असा माझा काय अधिकार आहे, की हा भक्तिज्ञानाचा विचार मला पूर्णपणे
समजून यावा ? ३
८७५ उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥ १ ॥
उडदा अक्षरा करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥ २ ॥
तुका म्हणे नाहीं भोळेपणाविण । जाणीय ते सिण रितें माप ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - उदंड-पुष्कळ, भरोवरी-श्रम, सायास, सिण-त्रास
अर्थ - नाना प्रकारचे तर्क करणारे शहाणे पुष्कळच आहेत पण त्यांना या विठ्ठलाच्या स्वरूपाचा अंत
काही लागणार नाही १ अक्षरे घोकून पाठांतर करणारे व अभ्यासाचा त्रास घेणारेही पुष्कळ आहेत, पण त्यांना
काही विठ्ठलाची थोरवी समजून येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाचा लाभ भोळेपणाशिवाय
होणार नाही ज्ञानाची जाणीव ही त्रास देणारीच वाटते कारण ज्ञानाच्या या मापाने या थोर विठ्ठलाला मापताच
येणार नाही ज्ञानाचे माप कितीही मोठे असले तरी ते रितेच असते ३
८७६ आधारावाचुनी । काय सागसी कहाणी ॥ १
ठावा नाहीं पंढरीराव । तोवरी अवघेंच वाय ॥ २ ॥
मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मज्ञान ॥ ३ ॥
तुका म्हणे ठेवा । जाणपण एक सवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -- वाय-व्यर्थ, एक सवा-एकाबाजूला
४०८ सार्थ तुकारामगाथा
अर्थ - शास्त्रपुराणांतील किंवा साधुसंताच्या वचनावाचून तू ज्ञानाची कसली कहाणी सांगतोस ? १
जोपर्यंत तुला हा पंढरीचा राणा माहीत झालेला नाही, तोपर्यंत तुझे हे ज्ञानसंपादन सर्वच व्यर्थ आहे २ तुझे हे
कोरडे ब्रह्मज्ञान कोण मानायला तयार होईल ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अहो पंडित लोकांनो, तुम्ही तुमच्या
जाणिवेचा ठेवा एका बाजूलाच ठेवून द्या ४
८७७ अनाथाची तुम्हा दया । पंढरीराया येतसे ॥ १ ॥
ऐसी ऐकोनिया कीर्ति । बहु विश्रांति पावलो ॥ २
अनाथाच्या धावा घरा । नामें करा कुडावा ॥ ३ ॥
तुका म्हणे सवघड हित । ठेवू चित्त पायांपैं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कुडावा-रक्षण, सवघड-उघड असलेले
अर्थ - पंढरीराया, जे अनाथ असतात, त्यांची दया तुम्हांस नेहमीच येत असते १ अशी तुमची कीर्ती
ऐकून माझ्या मनास फारच समाधान लाभले आहे २ देवा, तुम्ही अनाथाचे रक्षण करण्यासाठी त्याच्या घरी
धावून जाता व तुमच्या नामाच्या साह्याने त्याचे रक्षण करता ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझे हे उघड
असणारे चित्त मी तुमच्या पायावर ठेवीत आहे ४
८७८ येथे नाही उरो आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥ १ ॥
विषयाचे झगी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ २ ॥
वाहोनिया भार कुथसील ओझे । तेंचि माझें थीता त्याग ॥ ३ ॥
तुका म्हणे कैसी नाही त्याची लाज । संतीं केशिराज साधिपेला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लोलिंगत-आसक्त
अर्थ - मत्स्य, कूर्म इत्यादी अवतारही जेथे उरले नाहीत, तेथे मजसारख्या सामान्य माणसाची व गरीब
पामराची काय कथा आहे ? १ इंद्रियाच्या विषयांशी जर आसक्त व्हाल तर ती इंद्रिये एकदा चेतवली गेली की
मग त्याचा अंत लागेनासा होतो २ या इंद्रियसुखाचे ओझे डोक्यावर वागवीत बसला व मग विनाकारण कुंथाल
तर मात्र माझ्या भावाचा त्याग करावा लागेल ३ तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी या विठ्ठलाला मिळवून
घेतला आहे, याची लाज तुम्हास कुणास कशी नाही ? ४
८७९ हींच त्याचीं पचभूतें । जीवन भाते प्रेमाचे ॥ १ ॥
कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ २ ॥
हाच काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥ ३ ॥
तुका म्हणे दिवसराती । हेचि खाती अन्न ते ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भातें-अन्न, निगुती-बरोबर, कैवाड-स्वीकार
अर्थ - या विठ्ठलाविषयीचे प्रेम हेच या भक्ताचे मुख्य जीवनदायी अन्न व पंचभूतात्मक शरीर आहे १
या संतांनीच या श्रीहरीविषयी चित्तात कळवळा धारण करून खरोखर त्याचा स्वीकार केलेला आहे २ या
हरीविषयी त्यांना वाटणारे हे प्रेम हेच त्यांचा वर्तमानकाळ असून सर्व साधनसंपत्तीही याच स्वरूपाची आहे ३
तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस हे हरिमक्त हेच प्रेमाचे अन्न सेवन करीत असतात ४
८८० दीप न देखे अंधारा । आता हेचि करा जतन ॥ १ ॥
नारायण नारायण । याठी धन बळकट ॥ २ ॥
चिंतामणीपाशी चिंता । तस्वता ही नयेत ॥ ३ ॥
तुका म्हणे उभयलोकीं । हेचि निकी सामग्री ॥ ४ ॥
सार्थ तुकारामगाथा ४०९
शब्दार्थ व टीपा :- गांठी-भांभाळावे, चिंतामणी-चिंतितलेले देणारे रत्न, निकी-चांगली.
अर्थ :- सर्वत्र, सर्वकाळ प्रकाशमान असणारा दिया कधी कधी अंधाराला पाहात नाही. हाच भाव मनात
धारण करून तुम्ही ईश्वरास जवळ करा. १ नारायण, नारायण हे धन तुम्ही चांगले जतन करून सांभाळावे. २
चिंतामणी जवळ असल्यावर खरे पाहता मग कसलीही चिंता उरू नये. ३ तुकाराम महाराज म्हणतात, उभय लोकी
याच ईश्वरप्रेमाच्या रूपाच्या धनाची सामग्री फार चांगली आहे ४
८८१ धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥ १ ॥
संदेहाची सुटली गांठी । जालें पोटी शीतल ॥ २ ॥
भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥ ३ ॥
तुका म्हणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- संदेहाची-संशयाची, गाठी-प्रश्न, तारा-नाव.
अर्थ :- या संताच्या पायांशी मिठी पडते, तो काळ फारच धन्य होय. १ यांच्या भेटीमुळे संशयाचे सर्व
प्रश्न सुटून जातात आणि त्यामुळे मन शांत व प्रसन्न होते. २ यांच्या कृपेने भवनदीच स्वतः नाव होऊन कृपा-
प्रसादाने तरून नेण्यास समर्थ बनते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता या संतापेक्षा अधिक मंगलदायक असा
दाता कोण आहे ? ४
८८२ दिनरजनीं हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥ १ ॥
संकल्पिला देहू देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ २ ॥
नाहीं अवसान घडी । सफळ जोडी इंद्रिया ॥ ३ ॥
कीर्ति मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- दिनरजनी-रात्रंदिवस, हेवा-हाव.
अर्थ - रात्रंदिवस या गोविंदाची कीर्ती पोवाड्यातून गावी, हाच एक आमचा सततचा उद्योग आहे १
या सर्व देहाचा संकल्पही देवा, तुझ्यासाठी अर्पण व्हावा अशी आमची एकमेव इच्छा आहे. २ सर्व इंद्रियाची
वृत्ती हीच असून याखेरीज दुसरो भावना क्षणभरसुद्धा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीची कीर्ती
मी गर्जून सर्वत्र पसरवीत आहे व सर्व लोकांना सावध करीत आहे. ४
८८३ सरें नानवट निक्षेपीचें जुने । काढिलें ठेवणें समयचिं ॥ १ ॥
मजुराच्या हातें मापाचा उफल । मी तो येथें फोल सत्ता त्याची ॥ २ ॥
कुलाळाच्या हाते घटाच्या उत्पति । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥ ३ ॥
तुका म्हणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीर्णी प्रकाशाची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-नानवट-नाणे, निक्षेपीचे-पुरून ठेवलेले, कुलाळाच्या-कुंभाराच्या, कीर्णी-किरणांमधून.
अर्थ :- समर्थ अशा संताच्या घरी विठ्ठलकृपाचे जुनाट नाणे जमिनीत पुरून ठेविलेले होते, ते मी बाहेर
सर्वांसाठी काढले आहे १ मजुराच्या हातानेच धान्याचे माप होत असले भी या ठिकाणी फुकटचा असून तरी
सत्ता त्याचीच आहे. २ कुंभाराच्या हातून घटांची उत्पत्ती होते, हे खरे असले तरी, जो कोणी खरेदी करणारा
असतो, तोच त्यांना स्वयंपाकाच्या ठिकाणी पाठवीत असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सूर्याचेच तेज त्याच्या
किरणांतून फाकत असते, त्याप्रमाणे सर्व ध्येयातून नारायणच व्यक्त होत असतो. ४
८८४ गंगेचिया अंताचिण काप चाड । आपुले तें कोड तुपेपाशीं ॥ १ ॥
विठ्ठल हे मूर्ति साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ २ ॥
१ पालू.
तु गाथा ५२
४१० सार्थ तुकारामगाथा
कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥ ३ ॥
बाळाचे सोईतें घांस घाली माता । अट्टाहास चिंता नाहीं तया ॥ ४ ॥
गाऊं नाचूं करूं आनंदसोहळा । भावचि आगळा' नाहीं हातां ॥ ५ ॥
तुका म्हणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- अंताविण-खोलो समजल्याशिवाय.
अर्थ - जो तान्हेलेला आहे त्याने गंगेचे पाणी प्यावे. ह्या पाण्याच्या खोलीची चौकशी त्याने कधी करु
नये. तहान भागली की नाही, हे मात्र त्याने पाहावे. १ त्याचप्रमाणे इतर कसलीही चौकशी न करिता विठ्ठलाची
ही साजिरी व सुंदर अशी मूर्ती निरंतर हृदयात स्थिर करुन ठेवावी. २ सारभूत असणाऱ्या नवनीतापाशीच आपले
काम असावे. इतर गबाळापाशी आपण संबंध कशास ठेवावा ? ३ बाळाची सोय व्हावी म्हणून आई त्याला एक
एक घास करुन घालीत असते. त्यासंबंधी कसली चिंता किंवा कसला खटाटोप बाळाला कधी करण्याची जरूरी
नसते. ४ त्याचप्रमाणे आम्ही या श्रीहरीच्या प्रेमात नाचू, गाऊ व आनंदाने सुखाचा सोहळा करु. याखेरीज दुसरा
भाव आपल्या मनात कधी नसतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता सर्व एक श्रीहरिमय झाल्यामुळे आम्हास
परलोकीचे भय उरलेलेच नाही. ६
८८५ स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥ १ ॥
आतां सोडवणें धांवा नारायण । मज हे वासना अनावर ॥ २ ॥
येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुम्हीं देवा सांभाळावें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- पडिभर-अधिक प्रेम.
अर्थ - देवा, या स्त्रीपुत्रादिक नातेवाईकांविषयी मला विशेष प्रेम वाटते व विषयसुखांवर माझे अधिक
प्रेम आहे. १ नारायणा, तुम्ही धावत यावे व मला यातून सोडवावे. या वासना मला आवरेनाशा झाल्या आहेत. २
ही लोकलाज्जा आमच्या मार्गात उभी राहिलेली असल्यामुळे देवा, आमचे कार्य दूर झाले असे वाटते. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, आम्हांस जिथे तिथे गुंतून पडण्याचेच प्रसंग दिसतात नारायणा, अशा ठिकाणी तुम्हीच मला
सावरावे. ४
८८६ पडिलों भोवनीं १ होतों बहु चिंतवनी ॥ १
होतों चुकलों मारंग । लाहो केला लाग' वेगें ॥ २ ॥
इंद्रियांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥ ३ ॥
तुका म्हणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- भोवनीं-भोवऱ्यात, चिंतवनीं-चिंतेत, संदीं-अडचणीत.
अर्थ-मी या संसारचक्राच्या भोवऱ्यात सापडलो होतो. फार मोठ्या चिंतेत होतो. १ मी मार्ग चुकून
गेलो होतो. पण आता मात्र त्वरित लाभ करून घेतला आहे. २ इंद्रियवृत्तींच्या अडचणीत मी चांगलाच सापडलो
होतो, चांगलाच बंदिवासात फसत होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण बरे झाले; माझ्या वाचेतून विठ्ठलाचे
नाम आले ४
८८७ बरें जालें आलौं ज्यांचीं त्यांच्या घरा । चुकला पान्हेरा³ ओढाळांचा ॥ १ ॥
बहु केलें दुखीं त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ २ ॥
१ वेगळा, २ वेग, ३ पान्हेरा
सार्थ तुकारामगाथा ४११
त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥ ३ ॥
नाहीं कोठें स्थिर राहो दिलें क्षण । आजिवरी सिण पावलो तो ॥ ४ ॥
वेगळाळ्या खोडी केली तडातडी । सांगावया घडी नाहीं सुख ॥ ५ ॥
- निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - पन्हेरा-सवध, गोवारें-समुदाय
अर्थ - देवा, हे एक बरे झाले बाहेर धावणारी इंद्रिये आत मुरडून ज्याची त्याची आपापल्या घरात येऊन
मुरडून राहिली या ओढाळ इंद्रियाचा सवय आता सुटला १ याचा सांभाळ करता करता मला फार दुःख झाले.
पण आता त्याच्याबद्दल असणाऱ्या लाभाचे अथवा लोभाचे तोंड काळेच झाले असे समजा ना २ या इंद्रियांनी जर
काही अन्याय आता केला तर, त्या अन्यायाची फळे मला शरीरावर भोगावी लागत असत ३ या इंद्रियांनी मला
कुठेही एक क्षणभरसुद्धा स्थिर राहू दिले नाही याच्या नादाने आजपर्यंत फारच क्षीण मला झाला ४ या इंद्रियाच्या
निरनिराळ्या खोडींपायी माझी व ईश्वराची ताटातूट अनेकदा झाली सांगण्यासारखे सुख यानी मला एक क्षण-
भरही दिले नाही ५ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता या इंद्रियाचा समुदाय देवापाशी सोपवून, त्याच्यावर
याचा भार टाकून निघालो आहे ६
८८८ न करावी आता पोटासाठीं चिंता । आहे त्या संचिता माप लावू ॥ १ ॥
दृष्टि ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपांयीं सिण जाला ॥ २ ॥
येथें तब नाहीं घेइंजेसे सवे । काही नये जीवे येचो मिथ्या ॥ ३ ॥
खडणेचि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असो ॥ ४ ॥
दोवटा पावती नावेचे बैसणे । भुजाबळें कोणे कष्टी व्हावे ॥ ५ ॥
तुका म्हणे आता सकळांचे सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - भुजाबळे-हाताच्या वळान
अर्थ - आता पोटासाठी चिंता करण्याची जरूरी नाही जे अन्नधान्य जवळ आहे, तेच पुरवून पुरवून खाऊ १
आपली दृष्टी परमार्थाच्या विचारात गुंतवावी, उगाच बाकीच्या क्षुल्लक उपायाचा त्रास कशाला घ्यावा ? २
काही येथून आपल्याबरोबर घ्यावे असे नाही खोट्या लाभासाठी आपल्या जीवाची शक्ती कशाला खर्च
करायची ? ३ आपल्या चिंतेने जन्ममृत्यूच्या खेपात काही कधी खड पडणार नाही आम्ही संसारात नेहमीच
गुरफटून दीन झालेलो आहोत ४ पण शेवटी या भवसागरावरील नौवेत बसलो आहोत ती प्रयास शेवटपर्यंत
सुखरूप करणारी असताना तिच्या गतीसाठी उगाच आपल्या हाताचे बळ कशासाठी खर्च करायचे ? ५ तुकाराम
महाराज म्हणतात सर्वांचे सार जे असेल तेच आता आपण करीत असावे ६
८८९ आमच्या हे आले भागा । जिव्हार या जगाचे ॥ १ ॥
धरूनिया ठेलो जीवे । बळकट भावे एकविध ॥ २ ॥
आणूनिया केला रूपा । उभा सोपा जबळी ॥ ३ ॥
तुका म्हणे अवित्त केला । खालीं आला वचनें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जिव्हार-अन्न वरण
अर्थ - सर्व जगास अंतःकरणरूपाने असणारा हा विठ्ठल आमच्या वाट्याला आला आहे १ यास मी
आपल्या जीवात मोठ्या थळकट भावाने धारण करून ठेवले आहे २ या निर्गुण निराकारास आम्ही सगुण रूप
देऊन नीट आकारात आणले ३ तुकाराम महाराज म्हणतात, मीच त्याला आपल्या स्वाधीन केला असून आपल्या
प्रेमळ वचनामुळे तो आपल्या उच्च स्थानापासून खाली उभा आहे ४
४६२ सार्थ तुकारामगाथा
८९० खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥ १ ॥
सवंगाचें केणें सांपडलें घरीं । भरुनि वैखरी सांटविलें ॥ २ ॥
घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥ ३ ॥
फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥ ४ ॥
तुका म्हणे आतां जालीसे निश्चिती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- उदमासी-व्यापारास, केणे-जिनस, माल, फडा-मंडळीस.
अर्थ:- या विठ्ठलाच्या रूपाने खरेखुरे भांडवल आमच्या हाती आले असल्यामुळे याला काही आमच्या
व्यापारात तूट येणार नाही. १ अतिशय स्वस्त असलेला असा विठ्ठलरूपी माल आमच्या घरीच सापडला असून
त्याला आम्ही आमच्या वाणीतून साठवून ठेविला आहे. २ याचा लाभ सर्वांना देताना व घेताना होत असून सुदैवी
असो, अथवा दुर्बल असो, सर्वांना त्यांच्या त्यांच्या भावाप्रमाणे हा प्राप्त होतो. ३ एकदा विठ्ठलभक्तांच्या मंडळीत,
मेळाव्यात तो असला म्हणजे, काही मग निराश होत नाही हा; मग जरी त्यास आपण समजून घेण्याच्या प्रयत्नात
नसलो तरी चालेल. ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र माझी निश्चिती झाली असून या विठ्ठलनामरूपी
भांडवलाखेरीज आता चित्तात दुसरे काहीच धरणार नाही. ५
८९१ पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥ १ ॥
रघवूनि ठेलों ठाव । जागा वाय सफळ ॥ २ ॥
पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥ ३ ॥
तुका म्हणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - रघवूनि-व्यापून, क्षरभागी-क्षरणाऱ्या, कमी होणाऱ्या.
अर्थ.-या श्रीहरीला मी माझे अंग पावलोपावली दिलेले असल्यामुळे माझे सर्व कार्य आता पूर्ण झाले आहे. १
जेवढी म्हणून विस्तृत जागा होती तो सर्व मी व्यापून राहिलो आहे. २ पुढे पुढे जाण्यात मनाला आनंद होत असून
देहामध्ये संतोषही वाढत आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक दिवशी कमी कमी होत जाणाऱ्या या
जगाच्या आत, बाहेर मी सर्वत्र व्यापून राहिलो आहे. ४
८९२ निवडूनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥ १ ॥
आतां पुढें 'भावसार' । जीवना थार पाहावया ॥ २ ॥
पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥ ३ ॥
तुका म्हणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- संचित-नशिबात
अर्थ :- आम्ही आता श्रीहरीच्या नामाचे नवनीत सर्वांना निवडून दिले आहे. ज्याने त्याने आपल्या
नशिबाप्रमाणे त्याचा आस्वाद घ्यावा. १ आता यापुढे जीवनाला काही आधार शोधायचा असेल तर, हरिविषय
हा एकच आधार होय. २ जे कोणी परीक्षा करणारे डोळस असतील, त्यांच्या हाती हे हरिनामाचे नवनीत पडेल व
जे देहादिकांच्या दृष्टीने आंधळे बनलेले असतील, ते मात्र उगाच चाचपडत राहतील. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
जो कोणी याचे मनोभावे सेवन करील, त्यासच हा लाभ निश्चित होईल. ४
८९३ उचित न कळे इंद्रियाचे ओढी । मुखें बडबडी शिकिलें तें ॥ १ ॥
आपण जाऊन न्यावीं नरकास । वळें वेताळीस कुळें जग ॥ २ ॥
१ भवसार.
सार्थ तुकारामगाथा ४१३
अबोलणे बोले डोळे झांकुनिया । बडबडी वाया दंभासाठीं ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणो खरें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - देखोवेखी-दुसऱ्याचे पाहून
अर्थ :- जे केवळ इंद्रियांच्याच ओढीमुळे त्याच्या आधीन झालेले असतात, त्यांना योग्य काय, अयोग्य काय,
हे काहीसुद्धा समजत नाही आपल्या गुरुजवळ ते जे शिकले त्याची वृथा बडबड मात्र करीत असतात १ अशा
वागण्याने हे लोकही नरकास जातातच, पण यांच्या आधीच्या बेचाळीस पिढ्यातील पूर्वजही नरकास जातात २ हे
लोक नुसते डोळे झाकतात व ब्रह्माचा अनुभव आला असल्याचे अबोल राहून बोलून दाखवितात. याची दांभिक
बडबड मात्र व्यर्थ असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तर तेथील चांगले परीक्षा करणारे असून जे
दुसऱ्याचे पाहून ढोंग करून नाचतात, त्यांना आम्ही नीट जाणतो हे खरे आहे ४
८९४ एक मन तुझ्या अवघ्या भाडवला । वाटिता ते तुला येई कैसें ॥ १ ॥
म्हणउनि दृढ धरीं पातुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ २ ॥
आणिका संकल्पा नको गोऊ मन । तरीच कारण साध्य होय ॥ ३ ॥
तुका म्हणे ऐसे जाणावे उचित । तरी सहज स्थित येईल कळो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - स्थित-स्थित
अर्थ - तुला असणारे एक मन तू निरनिराळ्या व्यवहाराकडे कसे वाटून देणार आहेस ? १ यासाठी तू
मनात पांडुरंग दृढ धरून राहा ना, व तुझा देह प्रारब्धाच्या संगतीत लाव ना. २ याखेरीज इतर कुठल्या संकल्पा-
तून तू आपल्या मनास गुंतवू नकोस असे झाले तरच तुझे जीवितध्येय जे परमार्थसाधन ते साध्य होईल. ३
तुकाराम महाराज म्हणतात, असे हे जे उचित आहे ते तू जाणावेस असे तू जाणलेस तर तुला सहजास्थित अशी
असणारी आत्मभावाची स्थिती समजून येईल ४
८९५ गावे म्हणउनि गीत । धरुनि राहे तैसे चित्त ॥ १ ॥
हेचि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ २ ॥
ऐकावी म्हण कथा । राहे तैसे धरूनि चित्ता ॥ ३ ॥
तुका म्हणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - धणी-तृप्ती
अर्थ :- या श्रीहरीचे जे गीत असेल तेच गावे व त्या गाण्यातील रुपच मनात धरून असावे १ पण हे
फारच अवघड काम असून, नुसते अन्न पाहून कधी भूक लागलेल्या माणसाची भूक भागेल काय ? २ म्हणून या
श्रीहरीची कथा चित्तात राहील तशीच धरून ठेवावी लागते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरी तृप्ती पोटभर
जेवण केल्याखेरीज होत नसते. ४
८९६ कळेल हे खूण । तरि दावी नारायण ॥ १ ॥
सत्य संतापाशीं राहे । येरा भय आड आहे ॥ २ ॥
अणुचिया ऐसें । असे भरले प्रकाशें ॥ ३ ॥
इंद्रियाचे धनी । ते हे जाती समजूनि ॥ ४ ॥
तर्क फुटकें वाटा । नागवण घटापटा ॥ ५ ॥
तुका म्हणे ल्यावें । डोळा अंजन वरवे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :-येरा-मत्नाशिवाय इतरांना, घटापटा-घटाकाश, पटाकाश अशी वेदान्तातील शुष्क चर्चा.
४१४ सार्थ तुकारामगाथा
अर्थ - हा नारायण कृपा करील, धर्म दाखवील तरच पुढील खूण कळेल १ सत्य संतापाशी असते व
त्याच्याशिवाय इतरांना मात्र मयाचीच परिस्थिती असते २ या परमेश्वराचे स्वरूप अणुरेणुएवढे असून त्याच्यात
सर्वत्र प्रकाशच भरून राहिलेला आहे ३ इंद्रियावर स्वामित्व ठेवणारे जे कोणी आहेत त्यांनाच हे वर्म नीटपणे
समजते ४ अनेक तर्क व कुतर्क करून नाना वाटा निर्माण करणारे व घटापटादिकांची शुष्क चर्चा करणाराची व्यर्थ
नागवणूक मात्र होते ५ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी चांगले असे ज्ञानाजन डोळ्यात घालावे ६
८९७ जातो न येति या वाटा । काय निरवितो करटा ॥ १ ॥
कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ २ ॥
पाहे वैरियाकडे । डोळे वासुनिया रडे ॥ ३ ॥
बांधुनिया यमा हातीं । दिला नाहीं त्याची खती ॥ ४ ॥
नाही यापें काम । ऐसे जाणे तो अधम ॥ ५ ॥
अजून तरि मुका । का रे जालासि म्हणे तुका ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - बेश्रम-निलाजरा
अर्थ - जेथे गेल्याने परत येता येणार नाही, अशी वस्तुस्थिती असली तरी आपल्या धनदौलतीची व
संपत्तीची व्यवस्था हा करटा पुरुष अशाही वेळेस करीत बसला आहे १ कसा हा निलाजरा झाला आहे पाहा
याला कसलीच लाज नाही रामाचे नाम घ्यायला काही हा तयार नाही २ हा अजूनही आपल्या शत्रूकडे डोळे मोठे
करून पाहतो व रडतो ३ सर्वांनी मिळून याला बांधून यमाच्या हातात दिलेले असले तरी त्याची काही चिंता
दृष्टी हा करीत नाही ४ या यमदूतांशी आपले काहीच काम नाही, असे अजूनही हा अधम समजत असतो ५
तुकाराम महाराज म्हणतात, तू या प्रभूचे नाम घेण्याविषयी अजून तरी का मूक राहिला आहेस ? ६
८९८ वाटा घेईं लवकरि । मागें अतरसी दुरी । केली भरोवरी । सार नेती आणीक ॥ १ ॥
ऐसीं भांबावलीं किती । काय जाणो नेणो किती१ । समय नेणती । माथा भार वाहोनि ॥२॥
नाहीं सारिले तोवरी । धाव घेईं वेग करीं । घेतले पदरीं । फावले ते आपुलें ॥ ३ ॥
फट लडी म्हणे तुका । एक न राहावे धका । तरिच या सुखा । मग कैसा पावसी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भरोवरी-खटपट, फटलडी-हलकट मनुष्य
अर्थ - अरे माणसा, नीट ध्यानात घे परमार्थाचा वाटा लौकर घे ना पदरात नाही तर मग विनाकारण
प्रभूला तू अतरला जाशील सारी खटपट त केलीस व त्या श्रमाचे श्रेय इतरच घेऊन जात आहेत असे होऊ नये १
अशाच भ्रमात कितीजण सापडली आहेत ते काही नीट समजत नाही ही माणसे प्रसंग न ओळखता वृथा
संसाराचा भार डोक्यावर वागवून कष्टी होत असतात २ जोपर्यंत आयुष्य सरले नाही, तोपर्यंतच वेगाने, त्वरेने
धाव घेऊन जे पदरात आहे ते आपलेच आहे असे समजून घेत ३ तुकाराम महाराज म्हणतात, अरे हलकट मनुष्या,
तुला सत्यज्ञानाचा किंवा परमार्थविचाराचा एक धकासुद्धा सहन होत नाही असे असेल तर मग तुला या परमार्थ
सुखाचा ठेवा कसा प्राप्त होईल ? ४
८९९ चालावा पथ तो पाहिजे त्या ठाया । ऐकिल्या वाया वारता त्या ॥ १ ॥
ऐका जी वोझे पडतसे पाया । भावाची तें जायावाट नव्हे ॥ २ ॥
व्याली कुमारीचा अनुभवे अनुभव । सांगता तो भाव येत नाहीं ॥ ३ ॥
तुका म्हणे येथें पाहिजे आरालेँ । बियों निव्वळलें तरि भासे ॥ ४ ॥
१ भिती