दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
| ३५० | श्रीदासबोध. | [ दशक |
|---|
अनुताप । तेथें कैंचें उरेल पाप । देहांततपें१ पुण्यरूप । दुसरा जन्म जाहला
॥ १२ ॥ अनुतापें आसन घातलें । देहाचें वारुळ जाहलें । तेंचि नाम पुढें
पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥ वारुळास वल्मीक बोलिजे । म्हणोन वा-
ल्मीक नाम साजे । जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसांचें ॥ १४ ॥
जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवीश्वरांमध्यें वरिष्ठ । जयाचें बोलणें स्पष्ट ।
निश्चयाचें ॥ १५॥ जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तीचें भूषण । ज्याची
धारणा असाधारण । साधकांस दृढ करी ॥ १६ ॥ धन्य वाल्मीक ऋषी-
श्वर । समर्थ जो कवीश्वर । तयासि माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ १७॥
वाल्मीक ऋषि बोलिला नसता । तरी आम्हांस कैंची रामकथा । म्हणो-
निया समर्था । काय म्हणोनि वर्णावें ॥ १८ ॥ रघुनाथकीर्ति प्रगट केली ।
तेणें तयाची महिमा वाढली । भक्तमंडळी सुखी जाहली । श्रवणमात्रें
॥ १९ ॥ आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमध्यें बुडाला । भूमं-
डळीं उद्धरिला । बहुत लोक ॥ २० ॥ रघुनाथभक्त थोर थोर । महिमा
जयांचा अपार । त्या समस्तांचा किंकर२ । रामदास म्हणे ॥ २१ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके वाल्मीकिस्तवननिरूपणं नाम
प्रथमः समासः ॥ १ ॥
२. सूर्यस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा सूर्यवंश । सकळ वंशांमध्यें विशेष ।
मार्तंड-मंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥ सोमीं४ अंगीं असे लां-
छन । एकापक्षीं ५ होय क्षीण । रविकिरण फांकतां आपण । कलाहीन होय
॥ २ ॥ या कारणें सूर्यापुढें । दुसरी साम्यता न घडे । ज्याच्या प्रकाशें
उजेडे । प्राणिमात्रांसीं ॥३॥ नाना धर्म नाना कर्मे । उत्तम मध्यम अधमें ।
सुगमें दुर्गमें नित्यनेमें । सृष्टीमध्यें चालती ॥ ४ ॥ वेदशास्त्रे आणि पुराणें ।
मंत्र यंत्र नाना साधनें । संध्या स्नान पूजाविधानें । सूर्याविणें बापुडीं ॥५॥
नाना योग नाना मतें । पाहों जातां असंख्यातें । जाती आपुलाल्या पंथें ।
सूर्य उदय झालिया ॥ ६ ॥ प्रापंचिक अथवा पारमार्थिक । कार्य करणें
• १. देहपात करणाऱ्या तपानें. २. सेवक. ३. सूर्य. ४. चंद्रावर. ५. कृष्णपक्षीं.
१६ वा. ] सूर्यस्तवन. ३५१
कोणी एक । दिवसैंविण निरर्थक । सार्थक नव्हे ॥ ७ ॥ सूर्याचें अधिष्ठान
डोळे । डोळे नसतां सर्व आंधळे । या कारणें कांहींच न चले । सूर्याविण
॥ ८ ॥ म्हणाल अंध कवित्वें करिती । तरी हेही सूर्याचीच गती । थंड
झालिया आपुली मती । मग मतिप्रकाश कैंचा ॥ ९ ॥ उष्ण प्रकाश तो
सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा । उष्णत्व नसतां देहाचा । घात होतो
॥ १० ॥ या कारणें सूर्याविण । सहसा न चले कारण । श्रोते तुम्ही विच-
क्षण । शोधून पाहा ॥ ११ ॥ हरिहरांच्या अवतारमूर्ती । शिवशक्तीच्या
अनंत व्यक्ती । यांपूर्वीं होता गभस्ती । आतांही आहे ॥ १२ ॥ जितुके सं-
सारासी आले । तितुके सूर्याखालीं वर्तले । अंतीं देह त्यागून गेले । प्रभा-
करो देखतां ॥ १३ ॥ चंद्र ऐलीकडे झाला । क्षीरसागर मंथूनि काढिला ।
चवदां रत्नांमध्ये आला । बंधु लक्ष्मीचा ॥ १४ ॥ विश्वचक्षु हा भास्कर ।
ऐसें जाणती लहान थोर । या कारणें दिवाकरें । श्रेष्ठाहून श्रेष्ठ ॥ १५ ॥
अपार नभमार्ग क्रमणें । ऐसेंच प्रत्यहीं येणें जाणें । या लोकोपकाराकारणें ।
आज्ञा समर्थाची ॥ १६ ॥ दिवस नसतां अंधकार । सर्वांसि न कळे सारा-
सार । दिवसैंविण तस्कर । कां दिवाभीत पक्षी ॥ १७ ॥ सूर्यापुढें आणिक
दुसरें । कोण आणावें समोरें । तेजोराशि निर्धारें । उपमेरहित ॥ १८ ॥
ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा । अगाध महिमा
मानवी वाचा । काय म्हणोन वर्णावा ॥ १९ ॥ रघुनाथवंश पूर्वापार ।
एकाहून एक थोर । मज मतिमंदास हा विचार । काय कळे ॥२०॥ रघुनाथा-
चा समुदाय । तेथें गुंतला अंतर्भाव । म्हणोनि वर्णितां महत्त्व । वाग्दुर्बळ
मी ॥ २१ ॥ सकळ दोषांचा परिहार । करितां सूर्यास नमस्कार । स्फूर्ति
वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेतां ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
षोडशदशके सूर्यस्तवननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
१. सूर्य. २. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्र, गाई, ऐरा-
वत, रंभा, सात मुखांचा अश्व, विष, धनु, शंख, आणि अमृत हीं चौदा रत्नें.
३. घुबड. ४. मनोभाव. ५. वाणीनें दुर्बळ.
१५२ श्रीदासबोध. [ दशक
३. पृथ्विस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हे बसुमती । इचा महिमा वर्णावा
किती । प्राणिमात्र तितुके राहती । तिच्या आधारें ॥ १ ॥ अंतरिक्ष राहती
जीव । तोहि पृथ्वीचा स्वभाव । देह जड नसतां जीव । कैसे लगती ॥२॥
ज्वालिती पोळिती कुदाळिती । नांगरती उकरिती खणिती । मळमूत्र तिज-
वरी करिती । आणि वमनें ॥ ३ ॥ नासकें कुजकें जर्जर । पृथ्वीविण कैंचा
थार । देहांतकाळीं शरीर । तिजवरी पडे ॥ ४ ॥ बरें वाईट सकळ कांहीं ।
पृथ्वीविण थार नाहीं । नाना धातु द्रव्य तेंही । भूमीचे पोटीं ॥ ५ ॥
एकास एक संहारिती । प्राणी भूमीवरी असती । भूमि सांडूनि जाती ।
कोणीकडे ॥ ६ ॥ गड कोट पुरें पट्टणें । नाना देश कळती अटणें¹ । देव दा-
नव मानवां राहणें । पृथ्वीवरी ॥ ७ ॥ नाना रत्नें हिरे परिस । नाना
धातु द्रव्यांस । गुप्त प्रगट करावयास । पृथ्वीविण नाहीं ॥ ८ ॥ मेरु मंदर
हिमाचल । नाना अष्ट² कुळाचॅल । नाना पक्षी मत्स्य व्याळ³ । भूमंडळीं ॥
९ ॥ नाना समुद्रांपैलीकडे । भोवंतें आवरणोदकाचें कडें । असंभाव्य उठले
कडे । भूमंडळाचे ॥ १० ॥ त्यामध्यें गुप्त विवरें । लहान थोरें अपारें । तेथें
निबिड अंधकारें । वस्ती कीजे ॥ ११ ॥ आवरणोदक तें अपार । त्याचा
कोण जाणे पार । उदंड दाटले जलचर । असंभाव्य मोठे ॥ १२ ॥ त्या
जीवनास आधार पवन । निबिड दाट आणि घन । फुटों शकेना जीवन ।
कोणीकडे ॥ १३ ॥ ह्या प्रभंजनास⁴ आधार । कठिणपणें अहंकार । ऐसा हा
भूगोलाचा पार । कोण जाणे ॥ १४ ॥ नाना पदार्थांच्या खाणी । धातु-
स्वांमंच्या वाटणी । कल्पतरु चिंतामणी । अमृतकुंडें ॥ १५ ॥ नाना द्वीपें
नाना खंडें । वसती उँद्रसें⁵ उदंडें । तेथें नाना जीवांचीं बंडें । वेगळालीं ॥
१६ ॥ मेरूर्भोवते कडे कापले । असंभाव्य कडोशे पडिले । निबिड तरु
लागले । नानाजिनसी ॥ १७ ॥ त्यासन्निध लोकालोक⁶ । जेथें सूर्याचें फिरे
चाकँ⁷ । चंद्राद्रि द्रोणाद्रि मैनाक । महागिरी ॥ १८ ॥ नाना देशीं पाषाण-
१. फिरण्यानें. २. कुलाचल सात प्रसिद्ध आहेतः-महेंद्रो मलयः सह्यः शक्तिमान्
मधमादनः ॥ विंध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वताः ॥ ३. सर्प. ४. वायूंस. ५.
ओसाड. ६. एक पर्वत. ७. रथ परत फिरतो.
भेद । नाना जिनसी मृत्तिकाभेद । नाना विभूती छंदभेद । नाना खाणी ॥
१९ ॥ बहुरत्ना वसुंधरा । ऐसा पदार्थ कैंचा दुसरा । अफाट पडली सैरा-
वैरा । जिकडे तिकडे ॥ २० ॥ अवघी पृथ्वि फिरोन पाहे । ऐसा प्राणी
कोण आहे । दुजी तुळणा न साहे । धरणीविषयीं ॥ २१ ॥ नाना वल्ली
नाना पिकें । देशोदेशीं अनेकें । पाहों जातां सारिख्यास सारिखें । एकहि
नाहीं ॥ २२ ॥ स्वर्ग मृत्यु पाताळें । अपूर्व रचिलीं तिन्ही तोळें । पाताळ-
लोकीं महान्योळें । वस्ती कीजे ॥ २३ ॥ नाना वल्ली बीजांची खाणी ।
ते हे विशाल धरणी । अभिनव कर्त्याची करणी । होऊन गेली ॥ २४ ॥
गड कोट नाना नगरें । पुरें पट्टणें मनोहरें । सकळां ठायीं जगदीश्वरें । वस्ती
कीजे ॥ २५ ॥ महा बळी होऊन गेले । पृथ्विवरी चौताळले । सामर्थ्यं
राहिले । हें तो घडेना ॥ २६ ॥ असंभाव्य हे जगती । जीव किती येती
जाती । नाना अवतारपंगती । भूमंडळावरी ॥ २७ ॥ सध्या रोकडें प्र-
माण । कांहीं करावें नलगे अनुमान । नानाप्रकारें जीवन । पृथ्विचेनि आ-
धारें ॥ २८ ॥ कित्येक भूमि माझी म्हणती । शेवटीं आपणचि मरोनि
जाती । कित्येक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥ ऐसा पृथ्वीचा
महिमा । दुसरी काय द्यावी उपमा । ब्रह्मादिकांपासोनी आम्हां । आश्रयचि
॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके पृथ्वीस्तवननिरू-
पणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. आपस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां सकळांचें जन्मस्थान । सकळ जीवांचें जीवन ।
जयास आपोनारायण । ऐसें बोलिजे ॥ १ ॥ पृथ्विस आधार आवरणो-
दक । सप्तसिंधूंचें शुद्धोदक । नाना मेघांचें मेघोदक । भूमंडळीं चालिलें ॥
२ ॥ नाना नद्या नाना देशीं । वाहत मिळाल्या सागरासी । लहान थोर
पुण्यराशी । अगाध महिमे ॥ ३ ॥ नद्या पर्वताहून कोसळल्या । नाना
सांकडींमध्यें रिचवल्या । धबधबां खळखळां चालिल्या । असंभाव्य ॥ ४ ॥
कूपें वाँपी सरोवरें । उदंड तळीं थोरथोरें । निर्मळें उचंबळती नीरें । नाना
१. स्थळें. २. महाभुजंगानें. ३. शिरल्या. ४. आड. ५. विहिरी.
३५४ श्रीदासबोध. [ दशक
देशीं ॥ ५ ॥ गायमुखें पाट जाती । नाना कालवे वाहती । नाना झरे झि-
रपती । झरती नीरें ॥ ६ ॥ ढुंइरे विहरे पाझर । पर्वत फुटोन वाहे नीर ।
ऐसे उदकाचे प्रकार । भूमंडळीं ॥ ७ ॥ जितुके गिरी तितुक्या धारा ।
कोसळती भयंकरा । पाभळे वोहळ अपारा । उकळ्या सांडिती ॥ ८ ॥
भूमंडळींचें जळ आघवें । किती म्हणोनि सांगावें । नाना कारंजी आणावें ।
बांधोनि पाणी ॥ ९ ॥ डोहो डबकें खबांडीं टाकीं । नाना गिरीकंदरीं अने-
कीं । नाना जलें नाना लोकीं । वेगळालीं ॥ १० ॥ तीर्थे एकाहून एक । म-
हापवित्र पुण्यदायक । अगाध महिमा शास्त्रकारक । बोलोन गेले ॥ ११ ॥
नाना तीर्थाचीं पुण्योदकें । नाना स्थळोस्थळीं शीतळोदकें । तैशींच नाना
उष्णोदकें । ठायीं ठायीं ॥ १२ ॥ नाना वल्लीमध्ये जीवन । नाना फळीं
फुलीं जीवन । नाना कंदीं जीवन । गुणकारक ॥ १३ ॥ क्षारोदकें शुद्धो-
दकें । विषोदकें पीयूषोदकें । नाना स्थळांतरीं उदकें । नाना गुणांचीं ॥ १४
॥ नाना इक्षुदंडांचे रस । नाना फळांचे नाना रस । नानाप्रकारींचे गोरस ।
मद पारा गूळ अन्न ॥ १५ ॥ नाना मुक्ताफळांचें पाणी । नाना रत्नीं तळपे
पाणी । नाना शस्त्रांमध्यें पाणी । नाना गुणांचें ॥ १६ ॥ शुक्र शोणित
लाळ मूत्र स्वेद । नाना उदकांचे नाना भेद । विवरोन पाहतां विशद ।
होत जातें ॥ १७ ॥ उदकाचे देह केवळ । उदकाचेंच भूमंडळ । चंद्रमंडळ
सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥ १८ ॥ क्षारसिंधु क्षीरसिंधु । सुरासिंधु आज्य-
सिंधु । दधिसिंधु इक्षुरससिंधु । शुद्ध सिंधु उदकाचां ॥ १९॥ ऐसें उदक विस्ता-
रलें । मुळापासूनी शेवटास आलें । मध्येंहि ठायीं ठायीं उमटलें । ठायीं ठायीं
गुप्त ॥ २० ॥ जे जे बीजीं मिश्रित झालें । तो तो स्वाद घेउनि उठिलें ।
वंसामध्ये गोडीस आलें । परम सुंदर ॥ २१ ॥ उदकाचा बांधा हें शरीर ।
उदकचि पाहिजे तदनंतर । उदकाचा उत्पत्ति विस्तार । किती म्हणोनि सां-
गावा ॥ २२ ॥ उदक तारक उदक मारक । उदक नाना सुखदायक । उद-
काचा विवेक । अलौकिक आहे ॥ २३ ॥ भूमंडळीं धांवे नीर । नाना ध्वनि
१. कुवँ. २. झरा. ३. लहान पाणटाकें. ४. अमृतोदकें. ५. उंसाचे. ६. दूध
वगैरे. ७. रेत. ८. रक्त. ९. क्रमानें मिठाचा, दुधाचा, मद्याचा, तुपाचा, दह्याचा,
उंसाच्या रसाचा व पाण्याचा असे हे सप्तसागर. १०. रुचि. ११. शरीर बनल्यावर.
१६ वा. ] अग्निस्तवन. ३५५
त्या सुंदर । धबावां धबावां थोर । रिचवती धारा ॥२४॥ ठायीं ठायीं डोह तुं-
बती । विशाल तळीं डबाबिती । चबाबिती थबाबिती । कालवे पाट ॥२५॥
एकी पालथ्या गंगा वाहती । उदकें सन्निधाचि असती । खळाळां झरे वा-
हती । भूमीचे पोटीं ॥ २६ ॥ भूमिगर्भी डोह भरले । कोणी देखिले ना ऐ-
किले । ठायीं ठायीं झरे झाले । विद्युल्लतांचे ॥ २७ ॥ पृथ्वीतळीं पाणी भ-
रलें । पृथ्वीमध्यें पाणी खेले । पृथ्वीवरी प्रगटलें । उदंड पाणी ॥२८॥ स्वर्ग
मृत्यु पाताळीं । एक नदी तिन्हीं ताळीं । मेघोदक अंतराळीं । पृथ्वीवरी वृष्टि
करी ॥ २९ ॥ पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ दहनें । दहनाचें मूळ
पवन । थोराहून थोर ॥ ३० ॥ त्याहून थोर परमेश्वर । महद्भूतांचा विचार ।
त्याहून थोर परात्पर । परब्रह्म जाणावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशि-
ष्यसंवादे षोडशदशके आपस्तवननिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. अग्निस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा वैश्वानरँ । होय रघुनाथाचा श्वशुर ।
विश्वव्यापक विश्वंभर । पिता जानकीचा ॥ १ ॥ ज्याच्या मुखें भगवंत
भोक्ता । जो ऋषींचा फलदाता । तमँ हिर्म रोगहर्ता । भर्ता विश्वजनांचा
॥ २ ॥ नाना वर्ण नाना भेद । जीवमात्रांस अभेद । अभेद आणि परम
शुद्ध । ब्रह्मादिकांसी ॥३॥ अग्नीकरितां सृष्टि चाले । अग्नीकरितां लोक धाले ।
अग्नीकरितां सकळ झाले । लहान थोर ॥ ४ ॥ अग्नीनें आळलें भूमंडळ ।
लोकांस राहाया झालें स्थळ । दीप दीपिका नाना ज्वाळ । जेथें तेथें ॥५॥
पोटामध्ये जठराग्नी । तेणें क्षुधा लागे जनीं । अग्नीकरितां भोजनीं । रुचि
येते ॥ ६ ॥ अग्नि सर्वांगीं व्यापक । उष्में राहे कोणी एक । उष्ण नसतां
सकळ लोक । मरोन जाती ॥ ७ ॥ आधीं अग्नि मंद होतो । पुढें प्राणी तो
नासतो । ऐसा हा अनुभव येतो । प्राणिमात्रांसी ॥ ८ ॥ असतां अग्नीचें
बळ । शत्रु जिंके तात्काळ । अग्नि आहे तावत्काळ । जिणें आहे ॥ ९ ॥
नानारस निर्माण झाले । अग्नीकरितां निपजले । महारोगी आरोग्य झाले ।
निमिषमात्रें ॥ १० ॥ सूर्य सकळांहून विशेष । सूर्या उपरि अग्निप्रकाश ।
१. भूमीखालून. २. विजा पडून. ३. स्थळाँ. ४. भांग. ५. अंधकार. ६. थंडी.
३५६ श्रीदासबोध. [ दशक
रात्रिभागीं लोक अभीस । साह्य करिती ॥ ११ ॥ अंत्यज-गृहींचा अग्नि
आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला । सकळां गृहीं पवित्र झाला । वैश्वां-
नरू ॥ १२ ॥ अग्निहोत्र नाना याग । अग्नीकरितां होती सांग । अग्नि तृप्त
होतां मग । प्रसन्न होय ॥ १३ ॥ देव दानव मानव । अग्नीकरितां झाले
सर्व । सकळ जनांस उपाव । अग्नि आहे ॥ १४ ॥ लग्नें करिती थोर थोर ।
नाना दारूंचा प्रकार । भूमंडळीं यात्रा थोर । दारूनें शोभती ॥ १५ ॥ नाना
लोक रोगी होती । उष्ण औषधें सेविती । तेणें लोक आरोग्य होती । व-
न्हीकरितां ॥ १६ ॥ ब्राह्मणास तन मन । सूर्यदेव हुताशेन । एतद्विषयीं
अनुमान । कांहींच नाहीं ॥ १७ ॥ लोकांमध्ये जठरानळ । सागरीं आहे व-
डवानळ । भूगोलाबाहेर आवरणानळ । शिवनेत्रीं विद्युल्लता ॥ १८ ॥ कुपी-
पासुनि अग्नि होतो । उंच दर्पणीं अग्नि निघतो । काष्ठमंथनीं
१६ वा.] वायुस्तवन. ३५७
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके अग्निस्तवननिरूपणं नाम पंचमः
समासः ॥ ५ ॥
६. वायुस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा वायुदेव । याचा विचित्र स्वभाव ।
वायूकरितां सकळ जीव । वर्तती जनीं ॥ १ ॥ वायूकरितां श्वासोच्छ्वास ।
नाना विद्यांचा अभ्यास । वायूकरितां शरीरास । चळण घडे ॥ २ ॥ चळण
वळण प्रसारण । निरोधन आणि आकुंचन । प्राणे अपाने व्याने उदान ।
समाने वायू ॥ ३ ॥ नागें कूर्म कृकले वायू । देवदत्तें धनंजयू । ऐसे हे
वायूचे स्वभावू । उदंड असती ॥ ४ ॥ वायु ब्रह्मांडों प्रगटला । ब्रह्मांडदेव-
तांस पुरवला । तेथून पिंडीं प्रगटला । नाना गुणें ॥ ५ ॥ स्वर्गलोकीं
सबळ देव । तैसेच पुरुषार्थी दानव । मृत्युलोकींचे मानव । विख्यात राजे
॥ ६ ॥ नरदेहीं नाना भेदें । अनंत भेदांचीं श्वापदें । वनचरें जलचरें आनंदें ।
क्रीडा करिती ॥ ७ ॥ त्या समस्तांमध्यें वायु खेले । खेचरकुळें अवघें
चले । उठती वन्हीचे उमाळे । वायूकरितां ॥ ८ ॥ वायु मेघांचे भरण भरी ।
सवेंचि पिटून परते सारी । वायुऐसा कारभारी । दुसरा नाहीं ॥ ९ ॥ परी
ते आत्मयाची सत्ता । वर्ते शरीरीं तत्वतां । परी व्यापकपणें या समर्था । तुल-
ना नाहीं ॥ १० ॥ गिरीहून दाट फौजा । मेघ उठिले स्वामिकाजा । गर्ज-
गर्जोनि तडकती विजा । वायुबळें ॥ ११ ॥ चंद्र सूर्य नक्षत्रमाळा । ग्रहमं-
डळें मेघमाळा । ये ब्रह्मांडों नाना कळा । वायूकरितां ॥ १२ ॥ एकवटलें
तें निवडेना । कालवलें तें वेगळें होईना । तैसें हें बेचाड नाना । केवीं कळे
॥ १३ ॥ वायु सुटे सरारा । असंभाव्य पडती गारा । तैसे जीव हे नीरा-
सरिसे पडती ॥ १४ ॥ वायुरूपें कमळेकळा । तोचि आधार जळा । तया
जळाच्या आधारें भूगोळा । शेषें धरिलें ॥ १५ ॥ शेषास पवनांचा आहार ।
आहारें फुगे शरीर । तरी मग घेतला भार । भूमंडळाचा ॥ १६ ॥ महा-
६कूर्माचें शरीर भलें । ब्रह्मांड पालथें घातलें । एवढें शरीर तें राहिलें । वायू-
१. हे पांच प्राण वायु. २. हे पांच उपप्राण. ३. सर्व पक्षी. ४. हा वायुरूप
कमळाचा कट्टा आहे. ५. वायूचा. ६. कूर्मावतार (कासव).
३५८ श्रीदासबोध. [ दशक
चेनि ॥ १७ ॥ वराहें आपुले दंतीं । पृथ्वी धरिली होती । तयाची एवढी
शक्ती । वायुबळें ॥ १८ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । चवथा आपण जगदीश्वर ।
वायुस्वरूपविचार । विवेकी जाणती ॥ १९ ॥ तेहतीस कोटी सुरवर ।
अठ्यायेशीं सहस्र ऋषीश्वर । सिद्धयोगी भारेंभार । वायूकरितां ॥ २० ॥
नवकोटी कात्यायनी । छपन्नकोटी चामुंडिणी । औट कोटि भूतखाणी ।
वायुरूपें ॥ २१॥ भूतें दैवतें नाना शक्ती । वायुरूपें त्यांच्या व्यक्ती । नाना
जीव नेणों किती । भूमंडळीं ॥ २२ ॥ पिंडीं ब्रह्मांडीं पुरवला । बाहेर कंचु-
कासें गेला । सकळां ठायीं पुरवला । समर्थ वायु ॥ २३ ॥ ऐसा हा समर्थ
पवन । हनुमंत जयाचा नंदन । रघुनाथस्मर्णीं तन मन । हनुमंताचें ॥२४॥
हनुमंत वायूचा प्रसिद्ध । पित्यापुत्रास नाहीं भेद । म्हणोनि दोघेहि अभेद ।
पुरुषार्थविषयीं ॥ २५ ॥ हनुमंतास बोलिजे प्राणनाथ । येणें गुणें हा समर्थ ।
प्राणेंविण सकळ व्यर्थ । होत जातें ॥ २६ ॥ मागें मृत्यु आला हनुमंता ।
तेव्हां वायु रोधला होता । सकळ देवांस अवचिता । प्राणांत मांडले ॥२७॥
देव सकळ मिळोन । केलें वायूचें स्तवन । वायु प्रसन्न होऊन । मोकले
केले ॥ २८ ॥ म्हणोनि प्रतापी थोर । हनुमंत ईश्वरी अवतार । याचा पुरु-
षार्थ सुरवर । पाहतचि राहिले ॥ २९ ॥ देव कारागृहीं होते । हनुमंतें
देखिलें अवचितें । संहार करून लंकेभोवतें । विटंबूनि पाडिलें ॥ ३० ॥
उसणें घेतलें देवांचें । मूळ शोधिलें राक्षसांचें । मोठें कौतुक पुच्छकेतूचें ।
आश्चर्य वाटे ॥ ३१ ॥ रावण होता सिंहासनावरी । तेथें जाऊन ठोंसरे
मारी । लंकेमध्यें निरोध करी । उदक कैंचें ॥३२॥ देवांस आधार वाटला ।
मोठा पुरुषार्थ देखिला । मनामध्यें रघुनाथाला । करुणा करिती ॥ ३३ ॥
दैत्य अवघे संहारिले । देव तात्काळ सोडिले । प्राणिमात्र सुखी जाहले ।
त्रैलोक्यवासी ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके वायु-
स्तवननिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. महद्भूतस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ अन्न । अ-
१. आवरण करण्यास. २. पुच्छ हाच ध्वज ज्याचा अशा हनुमंताचें.
१६ वा. ] महद्भूतस्तवन. ३५९
क्षीचें मूळ पवन । मागां निरूपिलें ॥ १ ॥ आतां ऐका पवनाचें मूळ । तो
हा अंतरात्माचि केवळ । अत्यंतचि चंचल । सकळांमध्ये ॥ २ ॥ तो येतो
जातो दिसेना । स्थिर होऊन बैसेना । ज्याचें रूप अनुमानेना । वेदस्मृ-
र्तीसी ॥ ३ ॥ मुळीं मुळींचें स्फुरण । तेंचि अंतरात्म्याचें लक्षण । जगदी-
श्वरापासुनि त्रिगुण । पुढें जाहले ॥ ४ ॥ त्रिगुणापासुनि झालीं भूतें । पा-
वलीं स्पष्टदशेतें । त्यां भूतांचें रूप तें । विवेकें ओळखावें ॥ ५ ॥ त्यांमध्ये
मुख्य आकाश । चौं भूतांमध्ये विशेष । त्याच्या प्रकाशें प्रकाश । सकळ
कांहीं ॥ ६ ॥ एक विष्णु महद्भूत । ऐसा भूतांचा संकेत । परंतु याची
प्रतीत । पाहिली पाहिजे ॥ ७ ॥ विस्तारें बोलिलीं भूतें । त्या भूतांमध्ये
व्यापक तें । विवरोन पाहतां येतें । प्रत्ययासी ॥ ८ ॥ आत्म्याच्या चपळ-
पणापुढें । वायु तो किती बापुडें । आत्म्याचें चपळपण रोकडें । समजोन
पाहावें ॥ ९ ॥ आत्म्यावेगलें कर्म चालेना । आत्मा दिसेना आढळना ।
गुप्तरूपें विचार नाना । पाहोन सोडी ॥ १० ॥ पिंडब्रह्मांड व्यापून भरलें ।
नाना शरीरीं विकासलें । विवेकी जनास भासलें । जगदंतरीं ॥ ११ ॥
आत्म्याविण देह चालती । हें तों न घडे कल्पांतीं । अष्टधा प्रकृतीच्या
व्यक्ती¹ । रूपास आल्या ॥ १२ ॥ मुळापासुनि शेवटवरी । सकळ कांहीं
आत्माच करी । आत्म्यापैलकिडे निर्विकारी । परब्रह्म तें ॥ १३ ॥ आत्मा
शरीरीं वर्ततो । इंद्रियग्रामें² चेष्टवितो । नाना सुखदुःखें भोगितो । देहा-
त्मयोगें ॥ १४ ॥ सप्तकंचुक³ हें ब्रह्मांड । त्यामध्यें सप्तकंचुकें पिंड ।
त्या पिंडामध्ये आत्मा जड । विवेकें वोळखावा ॥ १५ ॥ शब्द ऐकोन सम-
जतो । समजोन प्रत्युत्तरें देतो । कठिन मृदु शीतोष्ण जानतो । त्वचेमध्यें
॥ १६ ॥ नेत्रीं भरोन पदार्थ पाहणें । नाना पदार्थ परीक्षणें । उंच नीच
समजणें । मनामध्यें ॥ १७ ॥ क्रूरदृष्टी सौम्यदृष्टी । कपटदृष्टी कृपादृष्टी । नाना
प्रकारच्या गोष्टी । भेद जाणे ॥ १८ ॥ जिव्हेमध्यें नाना स्वादें⁴ । निवडून
जाणे भेदाभेद । जें जें जाणे तें तें विशद् । करूनि बोले ॥ १९ ॥ उत्तम अ-
न्नाचे परिमळ । नाना सुगंध परिमळ । नाना फळांचे परिमळ । घ्राणेंद्रियें
जाणे ॥ २० ॥ जिव्हेनें स्वाद घेणें बोलणें । पाणींद्रियें⁵ घेणें देणें । पादेंद्रियें
१. आकृति. २. इंद्रियसामूह. ३. सात आवरणांचें. ४. रुचि. ५. हातानें.
३६० श्रीदासबोध. [ दशक
येणें जाणें । सर्वकाळ ॥ २१ ॥ शिश्नेंद्रियें सुरतभोग । गुदेंद्रियें मलोत्सर्ग ।
मनेंकरूनि सकळ सांग । कल्पूनि पाहे ॥ २२ ॥ ऐसे व्यापार परोपरी ।
त्रिभुवनीं एकलाचि करी । त्याची वर्णावया थोरी । दुसरा नाहीं ॥ २३ ॥
त्याविण दुसरा कैंचा । जे महिमा सांगावा तयाचा । व्याप आटोप आत्म-
याचा । नै भूतो न भविष्यति ॥ २४ ॥ चौदाहिविद्या चौसष्ट कळा । धूर्त-
पणाच्या नाना कळा । वेदशास्त्रपुराण जिव्हाळा । तेणेंविण कैंचा ॥ २५ ॥
इहलोकींचा आचार । परलोकीं सारासारविचार । उभय लोकींचा निर्धार ।
आत्माच करी ॥ २६ ॥ नाना मतें नाना भेद । नाना संवाद वेदवाद ।
नाना निश्चय भेदाभेद । आत्माच करी ॥ २७ ॥ मुख्य तत्व विस्तारलें ।
तेणें तयास रूप आणिलें । येणेंकरितां सार्थक झालें । सकळ कांहीं ॥ २८॥
लिहिणें वाचणें पाठांतर करणें । पुसणें सांगणें अर्थ करणें । गाणें वाजवणें
नाचणें । आत्म्याचकारितां ॥ २९ ॥ नाना सुखें आनंदतो । नाना दुःखें
कष्टी होतो । देह धरितो आणि सोडितो । नाना प्रकारें ॥ ३० ॥ एकलाच
नाना देह घरी । एकलाच नटे परोपरी । नटनाट्य कळाकुसरी । त्याविण
नाहीं ॥ ३१ ॥ एकलाचि झाला बहुरूपी । बहुरूपी बहु साक्षेपी । बहुरूपें
बहु प्रतापी । आणि लंडीं३ ॥ ३२ ॥ एकलाच विस्तारला कैसा । पाहे
बहुविध तमासा । दंपत्याविण कैसा । विस्तारला ॥ ३३ ॥ स्त्रियांस पाहिजे
पुरुष । पुरुषांस पाहिजे स्त्रीवेष । ऐसा आवडीचा संतोष । परस्परें ॥ ३४ ॥
स्थूलांचें मूळ तें लिंग । लिंगामध्यें हे प्रसंग । येणेप्रकारें जग । प्रत्यक्ष
चाले ॥ ३५ ॥ पुरुषांचा जीव स्त्रियांचे जीवीं । ऐशी होते उठाठेवी । परी
या सूक्ष्माची गोवी । समजली पाहिजे ॥ ३६ ॥ स्थूळाकारितां वाटे भेद ।
सूक्ष्मीं अवघेंच अभेद । ऐसें बोलणें प्रसिद्ध । प्रत्यया आलें ॥ ३७ ॥ बाय-
कोनें बायकोस भोगिलें । ऐसें नाहीं कीं घडलें । बायकोस अंतरीं लागलें ।
ध्यान पुरुषाचें ॥ ३८ ॥ स्त्रीस पुरुष पुरुषास वधू । ऐसा आहे हा संबंधू ।
या कारणें सूक्ष्म संवादू । सूक्ष्मींच आहे ॥ ३९ ॥ पुरुषइच्छेमध्यें प्रकृती ।
प्रकृतीमध्यें पुरुषव्यक्ती । प्रकृतिपुरुष बोलती । येणें न्यायें ॥ ४० ॥ पिंडा-
वरून ब्रह्मांड पाहावें । प्रतीतीनें प्रतीतीस घ्यावें । उमजेना तरी उमजावें ।
१. अलौकिक २. खटपटी. ३. भित्रा. ४. शरीराचें. ५. मन.
१६ वा.] अंतरात्मा. ३६१
विवरविवरोनी ॥ ४१ ॥ द्वैतइच्छा होते मुळीं । तरी ते आली भूमंडळीं ।
भूमंडळीं आणि मुळीं । रुजु पाहावें ॥ ४२ ॥ येथें मोठा झाला साक्षेप ।
फिटला श्रोत्यांचा आक्षेप । जे प्रकृतिपुरुषांचें रूप । निवडोन गेलें ॥४३॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके महद्भूतस्तवननिरूपणं नाम
सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. अंतरात्मा.
श्रीगणेशाय नमः ॥ नमूं गणपती मंगलमूर्ती । जयाचेनि मतिस्फूर्ती ।
लोक भजती स्तवन करिती । आत्मयाचें ॥ १ ॥ नमूं वैखरी वागीश्वरी¹ ।
अभ्यंतरीं प्रकाश करी । नाना भरोवेरीं² विवरी । नाना विद्या ॥ २ ॥ स-
कळ नामामध्यें नाम । रामनाम उत्तमोत्तम । श्रम जाऊन विश्राम । चंद्र³-
मौळी पावला ॥ ३ ॥ नामाचा महिमा थोर । रूप कैसें उत्तरोत्तर । परात्पर
परमेश्वर । त्रैलोक्यधर्ता ॥ ४ ॥ आत्माराम चहूंकडे । लोक वावडे जिकडे
तिकडे । देह पडे मृत्यु घडे । आत्म्याविण ॥ ५ ॥ जीवात्मा शिवात्मा परमा-
त्मा । जगदात्मा विश्वात्मा गुह्यात्मा । आत्मा अंतरात्मा सर्वात्मा । देव दान-
व मानवीं ॥ ६ ॥ सकळ मार्ग बोलती चालती । अवतार पंगतीची गती ।
आत्म्याकारितां होत जाती । ब्रह्मादिक ॥ ७ ॥ नादरूप ज्योतिरूप । सूक्ष्म-
रूप सत्तारूप । चैतन्यरूप सुखरूप । द्रष्टारूप जाणिजे ॥ ८ ॥ नरोत्तम
वीरोत्तम । पुरुषोत्तम रघूत्तम । सर्वोत्तम उत्तमोत्तम । त्रैलोक्यवासी ॥ ९ ॥
नाना खटपट आणि चटपट । नाना लटपट आणि झटपट । आत्मा नसतां
सर्व सपाट । चहूंकडे ॥ १० ॥ आत्म्याविण वेडें कुडें⁴ । आत्म्याविण मडें
बापुडें । आत्म्याविण थडें रोकडें । शरीराचें ॥ ११ ॥ आत्मज्ञानी समजे
मनीं । पाहे जनीं आत्म्यालागुनी । भुवनीं आणि त्रिभुवनीं । आत्म्याविण
बोस ॥ १२ ॥ परम सुंदर आणि चतुर । जाणे सकळ सारासार । आत्म-
याविण अंधकार । उभय लोकीं ॥ १३ ॥ सर्वांगीं सिद्ध सावध । नाना भेद
नाना वेध । नाना खेद आणि आनंद । तेणेंचिकारितां ॥ १४ ॥ रंक अथ-
वा ब्रह्मादिक । एकचि चालवी अनेक । पाहावा नित्यानित्यविवेक । को-
१. सरस्वती. २. विस्तारानें. ३. शंकर. ४ खोटें.
३६२ श्रीदासबोध. [ दशक
णी एकें ॥ १५ ॥ ज्याचे घरीं पद्मिनी नारी । आत्मा तंववरी आवडी
तरी । आत्मा गोलिया शरीरीं । तेज कैंचें ॥ १६ ॥ आत्मा दिसेना
ना भासेना । बाह्यात्कारें अनुमानेना । नाना मनांच्या कल्पना । आत्म-
याचेनी ॥ १७ ॥ आत्मा शरीरीं वास्तव्य करी । अवघें ब्रह्मांड विवरी भ-
री । वासना भावना परोपरी । किती ह्मणोन सांगाव्या ॥ १८ ॥ मनाच्या
अनंत वृत्ती । अनंत कल्पना धरिती । अनंत प्राणी सांगों किती । अंतरा-
त्माचें ॥ १९ ॥ अनंत राजकारणें धरणें । कुबुद्धि सुबुद्धि विवरणे । कळों
न देणें चुकावणें । प्राणिमात्रांसी ॥ २० ॥ एकास एक जपती टपती । ए-
कास एक खपती लपती । शत्रुत्वाची स्थिती गती । चहूकडे ॥ २१ ॥
पृथ्वीमध्यें परोपरी । एकास एक सिंतरी । कित्येक भक्त परोपरी । परोपका-
र कारिती ॥ २२ ॥ एक आत्मा अनंत भेद । देहपरत्वें घेतो स्वादें । आत्मा
ठायींचा अभेद । भेदहि धरी ॥ २३ ॥ पुरुषास स्त्री पाहिजे । स्त्रीस पुरुष
पाहिजे । नवरीस नवरी पाहिजे । हें तों घडेना ॥ २४ ॥ पुरुषांचा जीव
स्त्रियांचे जीवीं । ऐशी नाहीं उठाठेवी । विषयसुखाची गोवी । तेथें भेद आ-
हे ॥ २५ ॥ ज्या प्राण्यास जो आहार । तेथेंचि होती तत्पर । पशूचे आहा-
रीं नर । अनादरें वर्तती ॥ २६ ॥ आहारभेद देहभेद । गुप्त प्रगट उदंड भे-
द । तैसाचि जाणावा आनंद । वेगळाला ॥ २७ ॥ सिंधुगर्भीचीं नीरें । त्या
नीरामधील शरीरें । आवरणोदकींचीं जळचरें । अत्यंत मोठीं ॥ २८ ॥ सू-
क्ष्मदृष्टी आणितां मना । शरीरांचा अंत लागेना । मां तो अंतरात्मा अनु-
माना । कैसा येतो ॥ २९ ॥ देहात्मयोग शोधूनि पाहिला । तेणें कांहीं
अनुमांनला । स्थूळ सूक्ष्मांचा गलबला । गाथागोवी ॥ ३० ॥ गाथागोवी
उगवावयाकारणें । केलीं नाना निरूपणें । अंतरात्मा कृपाळूपणें । बहुतां
मुखें बोलला ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके अं-
तरात्मनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. उपासना.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें लोक नाना । त्यांस नाना उपासना ।
१. अत्यंत सुंदर. २. इच्छा. ३. कल्पना. ४. फसचितो. ५. रुचि. ६. मग.
१६ वा. ] उपासंना. ३६३
भावार्थे प्रवर्त्तले भजना । ठायीं ठायीं ॥ १ ॥ आपुलाल्या देवास भजती ।
नाना स्तुति स्तवनें करिती । जे ते निर्गुण म्हणती । उपासनेसी ॥ २ ॥ या-
चा कैसा आहे भाव । मज सांगिजे अभिप्राय । अरे हा स्तुतीचा स्वभाव ।
ऐसा आहे ॥ ३ ॥ निर्गुण म्हणिजे बहुगुण । बहुगुणी अंतरात्मा जाण ।
सकळ आहे प्रमाण । प्रतीत पाहा ॥ ४ ॥ सकळ जनास मानावें तें । एका
अंतरात्म्यास पावतें । अधिकारपरत्वें तें । मान्य कीजे ॥ ५ ॥ श्रोता म्हणे हें
अनुमान । मुळीं घालावें जीवन । तें पावे पानोपान । हे सद्यःप्रचीती ॥
६॥ वक्ता म्हणे तुळसीवरी । उदक घालावें पात्रभरी । परी न थिरे निमि-
षभरी । भूमीस भेदे ॥ ७ ॥ थोर वृक्षास कैसें करावें । शेंड्यास पात्र कैसें
न्यावें । त्याचा अभिप्राय देवें । मज निरूपावा ॥ ८ ॥ पर्जन्याचें उदक पडतें ।
तें तों मुळाकडेच येतें । हातचि पावेना तेथें । काय करिती ॥ ९ ॥ सकळांस
मूळ सांपडे । ऐसें पुण्य कैंचें घडे । साधुजनांचें पवाडे । विवेकीं मन ॥ १० ॥
तथापि वृक्षाचेनि पडिपाडें । जीवन घालितां कोठें पडे । ये गोष्टीचें सांकडें ।
कांहींच नाहीं ॥ ११ ॥ मागील आशंकेचें निरसन । होतां जाहलें समा-
धान । आतां गुणास निर्गुण । कैसे म्हणती ॥ १२ ॥ चंचळपणें विकारलें ।
सगुण ऐसें बोलिलें । येर तें निर्गुण उरलें । गुणातीत ॥ १३ ॥ वक्ता म्हणे
हा विचार । शोधून पाहावें सारासार । अंतरीं राहतां निर्धार । नांव नाहीं
॥ १४ ॥ विवेकेंचि तो मुख्य राजा । आणि सेवकाचें नांव राजा । याचा
विचार समजा । विवाद खोटा ॥ १५ ॥ कल्पांतप्रळयीं जें उरलें । तें
निर्गुण ऐसें बोलिलें । येर तें अवघेंचि जाहलें । मायेमध्यें ॥ १६ ॥ सेना
शहर बाजार । नाना यात्रा लहान थोर । शब्द उठती अपार । कैसे निव-
डावे ॥ १७ ॥ काळामध्यें पर्जन्यकाळ । मध्यरात्रीं होतां निवळ । नाना
जीव बोलती सकळ । कैसे निवडावे ॥ १८ ॥ नाना देश भाषा मतें । भूमंडळीं
असंख्यातें । बहु ऋषि बहु मतें । कैसीं निवडावीं ॥ १९ ॥ वृष्टि होतांच
अंकुर । सृष्टीवरी निघती अपार । नाना तंतु लहान थोर । कैसे निवडावे
॥ २० ॥ खेचरें भूचरें जलचरें । नाना प्रकारोंचीं शरीरें । नाना रंग चित्र-
विचित्रें । कैसीं निवडावीं ॥ २१ ॥ कैसें दृश्य आकारलें । नाना प्रकारें,
१. थिरतें. २. तुलनेनें. ३. पक्षी. ४. पशु वगैरे.
३६४ श्रीदासबोध. [ दशक
विकारलें । उदंडाचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥ पोकळीमध्यें गंधर्व-
नगरें । नाना रंग लहान थोरें । बहुत व्यक्ति बहु प्रकारें । कैशीं निवडावीं
॥२३॥ दिवसरजनीचा प्रकार । चांदणें आणि अंधकार । विचार आणि
अविचार । कैसा निवडावा ॥२४॥ विसर आणि आठवण । नेमस्त आणि
बाष्कळपण । प्रचीत आणि अनुमान । येणें रीती ॥ २५ ॥ न्याय आणि
अन्याय । होय आणि न होय । विवेकेंविण काय । उमजों जाणे ॥ २६ ॥
कार्यकर्ता आणि निकामी । शूर आणि कुकर्मी । धार्मिक आणि अधर्मी ।
कळला पाहिजे ॥ २७ ॥ धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तस्कर ।
खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥ वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट
आणि अंतर्निष्ठ । सारासारविचार स्पष्ट । कळला पाहिजे ॥२९॥ इति श्री-
दासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके उपासननिरूपणं नाम नवमः
समासः ॥ ९ ॥
१०. गुणभूत.
श्रीगणेशाय नमः ॥ पंचभूतें चाले जग । पंचभूतांची लगबग । पंचभूतें
गेलिया मग । काय आहे ॥ १ ॥ श्रोता वक्तयास बोले । भूतांचे महिमै
वाढविले । आणि त्रिगुण कोठें गेले । सांगा स्वामी ॥ २ ॥ अंतरात्मा पां-
चवें भूत । त्रिगुण त्याचे अंगभूत । सावध करूनियां चित्त । बरें पाहा
॥ ३ ॥ भूत म्हणिजे जितुकें झालें । त्रिगुण झाल्यांत आले । इतुकैन मूळ
खंडलें । आशंकेचें ॥ ४ ॥ भूतांवेंगळें कांहीं नाहीं । भूतजात हें सर्वही ।
एका वेगळें एक कांहीं । घडेचि ना ॥ ५ ॥ आत्म्याचेनि झाला पवन ।
पवनाचेनि प्रगटे अन । अग्नीपासून जीवन । ऐसें बोलती ॥ ६ ॥ जीवन
अवघें दबाबिलें । तें रविमंडळें आळलें । वन्हिवायूचेनि झालें । भूमंडळ
॥ ७ ॥ वन्हि वायु रवि नसतां । तरी होती उदंड शीतळता । ते शीतळते-
मध्यें उष्णता । येणेंचि न्यायें ॥८॥ अवघें वर्मास वर्म केलें । तरीच एवढें
फांपावलें । देहमात्र तितुके झाले । वर्माकरितां ॥ ९॥ अवघें शीतळचि
असतें । तरी प्राणिमात्र मरोनि जाते । अवघ्या उष्णेचि करपतें । सकळ
१. आकाशांत भासमान् होणारें नगर. २. भूतापासून झालेलें. ३. भरलें.
१६ वा. ] गुणभूत. ३६५
कांहीं ॥ १० ॥ भूमंडळ आळोनि गोठलें । तें रविकिरणें वाळोन गेलें । मग
सहजचि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥ म्हणोनि केला पर्जन्यकाळ । थंड
झालें भूमंडळ । पुढें उष्णकाळीं शीतळ । शीतकाळ जाणावा ॥ १२ ॥ शीत-
काळें कष्टले लोक । कपोंनि गेले वृक्षादिक । म्हणोनि पुढें कौतुक । उष्ण-
काळाचें ॥ १३ ॥ त्याहिमध्यें प्रातःकाळ । मध्यान्हकाळ सायंकाळ । शीत-
काळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥ ऐसें एकामागें एक केलें । विल्हेनें¹
नेमस्त लाविलें । येणेंकरितां जगले । प्राणिमात्र ॥ १५ ॥ नाना रसें रोग
कठिण । म्हणोनि औषधी केल्या निर्माण । परंतु सृष्टिरचनेचें विवरण । केलें
पाहिजे ॥ १६ ॥ देहमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दांत । ऐशी भूमं-
डळीं प्रचीत । नाना रत्नांची ॥ १७ ॥ सकळांसि मूळ जीवन बांधों । जी-
वनें चाले सकळ धंदा । जीवनेंविण हरि गोविंदा । प्राणी कैंचे ॥ १८ ॥
जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ । हिरे माणिक इंद्रनीळ । तेजाळ
झाले ॥ १९ ॥ महिमा कोणाचा सांगावा । तेजाळ कर्दै³मैचि आघवा । वे-
गळा वेगळा निवडावा । कोणत्या प्रकारें ॥ २० ॥ परंतु बोलिलें कांहीं एक ।
मनास कळावया विवेक । जनामध्यें तार्किक लोक । समजती अवघें ॥ २१ ॥
अवघें समजलें हें घडेना । शाखाशाखांसि पडेना । अनुमानें निश्चय होईना ।
कांहीं एक ॥ २२ ॥ अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णू न शके वाचे । वेद
विधि⁴ तेहि काँचे⁵ । देवेंविण ॥ २३ ॥ आत्माराम सकळां पाळी । अवघें
त्रैलोक्य संभाळी । तया एकेंविण धुळी । होय सर्वत्रांची ॥ २४ ॥ जेथें आ-
त्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं । त्रैलोक्यांचे प्राणी सर्वही । प्रेतरूपी
॥ २५ ॥ आत्मा नसतां येती मरणें । आत्म्याविण कैंचें जिणें । बरा विवेक
समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥ समजणें जें विवेकाचें । तेंहि आत्म्याविण
कैंचें । कोणी एकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥ उपासना प्रगट झाली ।
तरी हे विचारणा कळली । या कारणें पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥
उपासनेचा मोठा आश्रय । उपासनेविण निराश्रय । उदंड केलें तरी तो
जय । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥ समर्थांची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी ।
या कारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥ भजन साधन अभ्यास । येणेंचि
१. क्रमानें. २. कारण. ३. पंचभूतांचें मिश्रण. ४. ब्रह्मदेव. ५. अपुरे.
३६६ श्रीदासबोध. [ दशक
पाविजे परलोकास । दास म्हणे हा विश्वास । धरिला पाहिजे ॥३१॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके गुणभूतनिरूपणं नाम दशमः
समासः ॥ १०॥ ओंव्या ३०२.
दशक १७ वा.
१. देवबलात्कार.
श्रीगणेशाय नमः ॥ निश्चळ ब्रह्मीं चंचल आत्मा । सकळां पर जो पर-
मात्मा । चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । षड्गुणेश्वर ॥ १॥ सकळ जगाचा ईश्वर ।
म्हणोनि नामें जगदीश्वर । तयापासून विस्तार । विस्तारला ॥ २ ॥ शिव-
शक्ति जगदीश्वरी । प्रकृतिपुरुष परमेश्वरी । मूळमाया गुणेश्वरी । गुणक्षो-
भिणी ॥ ३ ॥ क्षेत्रज्ञ १ द्रष्टा २ कूटस्थै ३ साक्षी । अंतरात्मा सर्व लक्षी । शुद्ध-
सत्व महत्तत्व परीक्षो । जाणता साधु ॥ ४ ॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । नाना
पिंडीं जीवेश्वर । त्यांस भासती प्राणिमात्र । लहान थोर ॥ ५॥ देव देवळा४-
मध्यें बैसला । न भजतां मारितो देहाला । म्हणोनि त्याच्या भेणें तयाला ।
भजती लोक ॥ ६ ॥ जे वेळेसि भजन चुकलें । ते तेव्हां पछाडिले । आव-
डीनें भजों लागले । सकळ लोक ॥ ७ ॥ जें जें जेव्हां आँक्षेपिलेँ । तें तें
तात्काळचि दीधलें । त्रैलोक्य भजों लागलें । येणें प्रकारें ॥ ८ ॥ पांचां वि-
६षयांचा नैवेद्य । जेव्हां पाहिजे तेव्हां सिद्ध । ऐसें न करितां सद्य । रोग
होती ॥ ९ ॥ जेणें काळें नैवेद्य पावेना । तेणें काळें देवै ८ राहिना ।
भाग्य वैभव पदार्थ नाना । सांडून जातो ॥ १० ॥ जातो तों कळों
देईना । कोणास ठाऊक होईना । देवेंविण अनुमानेना । कोणास देव
॥ ११ ॥ देव पहावयाकारणें । देऊळें लागती पाहणें । कोठें तरी देउळा-
च्या गुणें । देव प्रगटे ॥ १२ ॥ देऊळें म्हणिजे नाना शरीरें । तेथें राहिजे
जीवेश्वरें । नाना शरीरें नाना प्रकारें । अनंत भेद ॥ १३ ॥ चालती बो-
लती देऊळें । त्यांमध्यें राहिजे राऊळें । जितुकीं देऊळें तितुकीं सकळें । कळलीं
१. देहादींस जाणणारा. २. जगद्भास पाहणारा. ३. गुप्तरूपानें राहणारा. ४.
शरीरांत. ५. मागितलें. ६. शब्द, स्पर्श इत्यादींचा. ७. जीवात्मा. ८. देवानें.
१७ वा.] शिवशक्ति. ३६७
पाहिजे ॥ १४ ॥ मत्स्य कूर्म वराह देउळें । भूगोल धरिला सर्वकाळें । क-
राळें विक्राळें निर्मिलें । कितीएक ॥ १५ ॥ कितीएक देउळीं सौख्य पाहे ।
भरितें अवघे सिंधूस आहे । परी तें सर्वकाळ न रहे । अशाश्वत ॥ १६ ॥
अशाश्वताचा मस्तकमणी । जयाची एवढी करणी । दिसेना तरी काय झालें
धनी । तयासीच म्हणावें ॥ १७ ॥ उद्भवोन्मुख होतां अभेद । विमुख
होतां उदंड खेद । ऐसा अधोध्वं संवाद । होत जातो ॥ १८ ॥ सकळांचें
मूळ दिसेना । भव्य भारी आणि भासेना । निमिष एक वसेना । एके
ठायीं ॥ १९ ॥ ऐसा अगाध परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । तुझी
लीला सर्वोत्तमा । तूंचि जाणसी ॥ २० ॥ संसारास आलियाचें सार्थक ।
जेथें नित्यानित्यविवेक । इहलोक आणि परलोक । दोन्ही साधिले ॥ २१
॥ मननशीळ लोकांपासीं । अखंड देव अहर्निशीं । पाहतां त्यांच्या पूर्व-
संचितांसी । जोडा नाहीं ॥ २२ ॥ अखंड योग म्हणोनि योगी । योग नाहीं
तो वियोगी । वियोगी तोहि योगी । योगबळें ॥ २३ ॥ भल्याची महिमा
ऐसी । जे सन्मार्ग लावी लोकांसी । पोहणार असतां बुडत्यासी । बुडों
नेदी ॥ २४ ॥ स्थूळसूक्ष्म तत्त्वझाडा । पिंडब्रह्मांडाचा निवाडा । प्रचीत
पाहे ऐसा थोडा । भूमंडळीं ॥ २५ ॥ वेदांतींचें पंचीकरण । अखंड तयाचें
विवरण । महावाक्यें अंतःकरण । रहस्य पाहे ॥ २६ ॥ जे पृथ्वीमध्यें वि-
वेकी असती । धन्य तयांची संगती । श्रवणमात्रें पावती गती । प्राणि-
मात्र ॥ २७ ॥ सत्संग आणि उत्तम गुण । सत्संग आणि सच्छास्त्रश्रवण ।
अखंड होतसे विवरण । नाना परोपकारांचें ॥ २८ ॥ जे सत्कीर्तीचे पुरुष ।
ते परमेश्वराचे अंश । धर्मस्थापनेचा हव्यास । तेथेंचि वसे ॥ २९ ॥ विशेष
सारासारविचार । तेणें होय जगदुद्धार । संगत्यागें निरंतर । होऊन गेले ॥
३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देवबलात्कारनिरूपणं
नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. शिवशक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । जैसें गगन अंतराळ । निरा-
१. विश्वांतपत्तीचा विचार करितां. २. विश्व आणि ब्रह्म. ३. पुण्यास.
३६८ श्रीदासबोध. [ दशक
कार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥ अंतचि नाहीं तें अनंत । शाश्वत आणि
सदोदित । असंत१ नव्हे तें संत । सर्वकाळ ॥ २ ॥ परब्रह्म तें अविनाश ।
जैसें आकाश अवकाश । न तुटे न फुटे सावकाश । जैसें तैसें ॥ ३ ॥ तेथें
ज्ञान ना अज्ञान । तेथें स्मरण ना विस्मरण । तेथें अखंड निर्गुण । निर२व-
लंबी ॥ ४ ॥ तेथें चंद्र सूर्य ना पावक । नव्हे काळोख प्रकाश । उपाधी-
वेगळें एक । निरूपाधि ब्रह्म ॥ ५ ॥ निश्चळीं स्मरण चेतलें । त्यास चैतन्य
ऐसें कल्पिलें । गुणसमानत्वें झालें । गुणसाम्य ऐसें ॥ ६ ॥ गगनीं आली
अभ्रच्छाया३ । तैशी जाणिजे मूळमाया । उद्भव आणि विलया । वेळ नाहीं ॥
॥ ७ ॥ निर्गुणीं गुणविकार । तोचि षड्गुणेश्वर । अर्धनारी नटेश्वर । तयासि
म्हणिजे ॥ ८ ॥ आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति । तेथून पुढें
नाना व्यक्ती । निर्माण झाल्या ॥ ९ ॥ तेथून पुढें शुद्ध सत्व । रजतमाचें
गूढत्व । तयासि म्हणिजे महत्तत्व । गुण४क्षोभिणी ॥ १० ॥ मुळीं असेचि
ना व्यक्ती । तेथें कैंची शिवशक्ती । ऐसें म्हणाल तरी चित्तीं । सावधान
असावें ॥ ११ ॥ ब्रह्मांडावरून पिंड । अथवा पिंडावरून ब्रह्मांड । अधोध्वं
पाहतां निवाड । कळों येतें ॥ १२ ॥ बीज फोडून आणिलें मना । तेंथें
फळ तों दिसेना । वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ॥ १३ ॥ फळ फो-
डितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । तैसा विचार असे । पिंड-
ब्रह्मांडीं ॥ १४ ॥ नरनारी दोन्ही भेद । पिंडीं दिसती प्रसिद्ध । मुळीं न-
सतां विशद । होतील कैसीं ॥ १५ ॥ नाना बीजरूप कल्पना । तींत काय
एक असेना । सूक्ष्म म्हणोन भासेना । एकाएकीं ॥ १६ ॥ स्थूळाचें मूळ
तें वासना । ते वासना आधीं दिसेना । स्थूळा वेगळें अनुमानेना । सकळ
कांहीं ॥ १७ ॥ कल्पनेची सृष्टि केली । ऐशीं वेदशास्त्रं बोलिलीं । दिसेना
म्हणोन मिथ्या केलीं । न पाहिजेत कीं ॥१८॥ पडदा एकेक जन्माचा । तेथें
विचार कळेल कैंचा । परंतु गूढत्व हा नेमाचा । ठाव आहे ॥ १९ ॥ नाना
पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । एकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥
२० ॥ नवरीस नवरी नलगे । ऐसा भेद दिसों लागे । पिंडावरून उमगे ।
ब्रह्मांडबीज ॥२१॥ नवरीचें मन नवऱ्यावरी । नवऱ्याचें मन नवरीवरी । ऐशी
१. असत्. २. आश्रयरहित. ३. ढगांची सांवली. ४. त्रिगुणांस चाळविणारी.
१७ वा. ] श्रवणोपदेश. ३६९
वासनेसी परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥ वासना मुळींच अभेद । देहसंबंधें
झाला भेद । तुटतां देहाचा संबंध । भेद गेला ॥ २३ ॥ नरनारीचें बीज
कारण । शिवशक्तीमध्यें जाण । देह धरितां प्रमाण । कळों आलें ॥ २४ ॥
नाना प्रचीतींच्या वासना । एकाचें एकास कळेना । तीक्ष्ण दृष्टीनें अनुमाना ।
कांहींसें येतें ॥ २५ ॥ बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुषाचेनी ।
उपाधि वाढे जयाचेनी । ते हे वनिता ॥ २६ ॥ वीट नाहीं कंटाळा नाहीं ।
आलस्य नाहीं त्रास नाहीं । इतुकी माया कोठेंचि नाहीं । माते वेग-
ळी ॥ २७ ॥ नाना उपाधि वाढवूं जाणे । नाना मायेनें गोवूं जाणे । नाना
प्रीति लावूं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥ पुरुषास स्त्रीचा विश्वास ।
स्त्रीस पुरुषाचा संतोष । परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ॥ २९ ॥ ईंश्वरें
मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें । लोभाचें गुंडाळें केलें । उग-
वेना ऐसें ॥ ३० ॥ ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची महा गोडी । हे मु-
ळींहून चालली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥ मुळीं सूक्ष्म निर्माण
झालें । पुढें स्पष्ट दिसोन आलें । उत्पत्तीचें कार्य चाले । उभयतांकरितां ॥ ३२ ॥
मुळीं शिवशक्ती हें तों खरें । पुढें झालीं वधुवरें । चौऱ्याशीं लक्ष विस्तारें ।
विस्तारली जे ॥ ३३ ॥ येथें शिवशक्तीचें रूप केलें । श्रोतीं मनास पाहिजे
आणिलें । विवरल्याविण बोलिलें । तें व्यर्थ जाणावें ॥ ३४ ॥ इति श्रीदा-
सबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तदशदशके शिवशक्तिनिरूपणं नाम द्वितीयः
समासः ॥ २ ॥
३. श्रवणोपदेश.
श्रीगणेशाय नमः ॥ थांबा थांबा ऐका ऐका । आधींच ग्रंथ सोडूं नका ।
सांगीतलें तें ऐका । सावधपणें ॥ १ ॥ श्रवणामध्यें सार श्रवण । तें हें अ-
ध्यात्मनिरूपण । सुचित्त करूनि अंतःकरण । ग्रंथामध्यें विवरावें ॥ २ ॥
श्रवण मननाचा विचार । निजध्यासें साक्षात्कार । रोकडा मोक्षाचा उधार ।
बोलोंच नये ॥ ३ ॥ नाना रत्नें परीक्षितां । अथवा वजनें करितां । उत्तम
सोनें पुटीं घालितां । सावधान असावें ॥ ४ ॥ नाना नाणीं मोजून घेणें ।
१. सूक्ष्म विचारानें. २. बायको. ३. पाहावें. ४. मुशींत.