दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 400, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१६ वा. ] गुणभूत. ३६५
कांहीं ॥ १० ॥ भूमंडळ आळोनि गोठलें । तें रविकिरणें वाळोन गेलें । मग
सहजचि देवें रचिलें । उपायासी ॥ ११ ॥ म्हणोनि केला पर्जन्यकाळ । थंड
झालें भूमंडळ । पुढें उष्णकाळीं शीतळ । शीतकाळ जाणावा ॥ १२ ॥ शीत-
काळें कष्टले लोक । कपोंनि गेले वृक्षादिक । म्हणोनि पुढें कौतुक । उष्ण-
काळाचें ॥ १३ ॥ त्याहिमध्यें प्रातःकाळ । मध्यान्हकाळ सायंकाळ । शीत-
काळ उष्णकाळ । निर्माण केले ॥ १४ ॥ ऐसें एकामागें एक केलें । विल्हेनें¹
नेमस्त लाविलें । येणेंकरितां जगले । प्राणिमात्र ॥ १५ ॥ नाना रसें रोग
कठिण । म्हणोनि औषधी केल्या निर्माण । परंतु सृष्टिरचनेचें विवरण । केलें
पाहिजे ॥ १६ ॥ देहमूळ रक्त रेत । त्या आपाचे होती दांत । ऐशी भूमं-
डळीं प्रचीत । नाना रत्नांची ॥ १७ ॥ सकळांसि मूळ जीवन बांधों । जी-
वनें चाले सकळ धंदा । जीवनेंविण हरि गोविंदा । प्राणी कैंचे ॥ १८ ॥
जीवनाचें मुक्ताफळ । शुक्रासारिखें सुढाळ । हिरे माणिक इंद्रनीळ । तेजाळ
झाले ॥ १९ ॥ महिमा कोणाचा सांगावा । तेजाळ कर्दै³मैचि आघवा । वे-
गळा वेगळा निवडावा । कोणत्या प्रकारें ॥ २० ॥ परंतु बोलिलें कांहीं एक ।
मनास कळावया विवेक । जनामध्यें तार्किक लोक । समजती अवघें ॥ २१ ॥
अवघें समजलें हें घडेना । शाखाशाखांसि पडेना । अनुमानें निश्चय होईना ।
कांहीं एक ॥ २२ ॥ अगाध गुण भगवंताचे । शेष वर्णू न शके वाचे । वेद
विधि⁴ तेहि काँचे⁵ । देवेंविण ॥ २३ ॥ आत्माराम सकळां पाळी । अवघें
त्रैलोक्य संभाळी । तया एकेंविण धुळी । होय सर्वत्रांची ॥ २४ ॥ जेथें आ-
त्माराम नाहीं । तेथें उरों न शके कांहीं । त्रैलोक्यांचे प्राणी सर्वही । प्रेतरूपी
॥ २५ ॥ आत्मा नसतां येती मरणें । आत्म्याविण कैंचें जिणें । बरा विवेक
समजणें । अंतर्यामीं ॥ २६ ॥ समजणें जें विवेकाचें । तेंहि आत्म्याविण
कैंचें । कोणी एकें जगदीशाचें । भजन करावें ॥ २७ ॥ उपासना प्रगट झाली ।
तरी हे विचारणा कळली । या कारणें पाहिजे केली । विचारणा देवाची ॥ २८ ॥
उपासनेचा मोठा आश्रय । उपासनेविण निराश्रय । उदंड केलें तरी तो
जय । प्राप्त नाहीं ॥ २९ ॥ समर्थांची नाहीं पाठी । तयास भलताच कुटी ।
या कारणें उठाउठी । भजन करावें ॥ ३० ॥ भजन साधन अभ्यास । येणेंचि
१. क्रमानें. २. कारण. ३. पंचभूतांचें मिश्रण. ४. ब्रह्मदेव. ५. अपुरे.