दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 390, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१६ वा. ] अग्निस्तवन. ३५५
त्या सुंदर । धबावां धबावां थोर । रिचवती धारा ॥२४॥ ठायीं ठायीं डोह तुं-
बती । विशाल तळीं डबाबिती । चबाबिती थबाबिती । कालवे पाट ॥२५॥
एकी पालथ्या गंगा वाहती । उदकें सन्निधाचि असती । खळाळां झरे वा-
हती । भूमीचे पोटीं ॥ २६ ॥ भूमिगर्भी डोह भरले । कोणी देखिले ना ऐ-
किले । ठायीं ठायीं झरे झाले । विद्युल्लतांचे ॥ २७ ॥ पृथ्वीतळीं पाणी भ-
रलें । पृथ्वीमध्यें पाणी खेले । पृथ्वीवरी प्रगटलें । उदंड पाणी ॥२८॥ स्वर्ग
मृत्यु पाताळीं । एक नदी तिन्हीं ताळीं । मेघोदक अंतराळीं । पृथ्वीवरी वृष्टि
करी ॥ २९ ॥ पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ दहनें । दहनाचें मूळ
पवन । थोराहून थोर ॥ ३० ॥ त्याहून थोर परमेश्वर । महद्भूतांचा विचार ।
त्याहून थोर परात्पर । परब्रह्म जाणावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशि-
ष्यसंवादे षोडशदशके आपस्तवननिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. अग्निस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा वैश्वानरँ । होय रघुनाथाचा श्वशुर ।
विश्वव्यापक विश्वंभर । पिता जानकीचा ॥ १ ॥ ज्याच्या मुखें भगवंत
भोक्ता । जो ऋषींचा फलदाता । तमँ हिर्म रोगहर्ता । भर्ता विश्वजनांचा
॥ २ ॥ नाना वर्ण नाना भेद । जीवमात्रांस अभेद । अभेद आणि परम
शुद्ध । ब्रह्मादिकांसी ॥३॥ अग्नीकरितां सृष्टि चाले । अग्नीकरितां लोक धाले ।
अग्नीकरितां सकळ झाले । लहान थोर ॥ ४ ॥ अग्नीनें आळलें भूमंडळ ।
लोकांस राहाया झालें स्थळ । दीप दीपिका नाना ज्वाळ । जेथें तेथें ॥५॥
पोटामध्ये जठराग्नी । तेणें क्षुधा लागे जनीं । अग्नीकरितां भोजनीं । रुचि
येते ॥ ६ ॥ अग्नि सर्वांगीं व्यापक । उष्में राहे कोणी एक । उष्ण नसतां
सकळ लोक । मरोन जाती ॥ ७ ॥ आधीं अग्नि मंद होतो । पुढें प्राणी तो
नासतो । ऐसा हा अनुभव येतो । प्राणिमात्रांसी ॥ ८ ॥ असतां अग्नीचें
बळ । शत्रु जिंके तात्काळ । अग्नि आहे तावत्काळ । जिणें आहे ॥ ९ ॥
नानारस निर्माण झाले । अग्नीकरितां निपजले । महारोगी आरोग्य झाले ।
निमिषमात्रें ॥ १० ॥ सूर्य सकळांहून विशेष । सूर्या उपरि अग्निप्रकाश ।
१. भूमीखालून. २. विजा पडून. ३. स्थळाँ. ४. भांग. ५. अंधकार. ६. थंडी.