दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 387, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१५२ श्रीदासबोध. [ दशक
३. पृथ्विस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हे बसुमती । इचा महिमा वर्णावा
किती । प्राणिमात्र तितुके राहती । तिच्या आधारें ॥ १ ॥ अंतरिक्ष राहती
जीव । तोहि पृथ्वीचा स्वभाव । देह जड नसतां जीव । कैसे लगती ॥२॥
ज्वालिती पोळिती कुदाळिती । नांगरती उकरिती खणिती । मळमूत्र तिज-
वरी करिती । आणि वमनें ॥ ३ ॥ नासकें कुजकें जर्जर । पृथ्वीविण कैंचा
थार । देहांतकाळीं शरीर । तिजवरी पडे ॥ ४ ॥ बरें वाईट सकळ कांहीं ।
पृथ्वीविण थार नाहीं । नाना धातु द्रव्य तेंही । भूमीचे पोटीं ॥ ५ ॥
एकास एक संहारिती । प्राणी भूमीवरी असती । भूमि सांडूनि जाती ।
कोणीकडे ॥ ६ ॥ गड कोट पुरें पट्टणें । नाना देश कळती अटणें¹ । देव दा-
नव मानवां राहणें । पृथ्वीवरी ॥ ७ ॥ नाना रत्नें हिरे परिस । नाना
धातु द्रव्यांस । गुप्त प्रगट करावयास । पृथ्वीविण नाहीं ॥ ८ ॥ मेरु मंदर
हिमाचल । नाना अष्ट² कुळाचॅल । नाना पक्षी मत्स्य व्याळ³ । भूमंडळीं ॥
९ ॥ नाना समुद्रांपैलीकडे । भोवंतें आवरणोदकाचें कडें । असंभाव्य उठले
कडे । भूमंडळाचे ॥ १० ॥ त्यामध्यें गुप्त विवरें । लहान थोरें अपारें । तेथें
निबिड अंधकारें । वस्ती कीजे ॥ ११ ॥ आवरणोदक तें अपार । त्याचा
कोण जाणे पार । उदंड दाटले जलचर । असंभाव्य मोठे ॥ १२ ॥ त्या
जीवनास आधार पवन । निबिड दाट आणि घन । फुटों शकेना जीवन ।
कोणीकडे ॥ १३ ॥ ह्या प्रभंजनास⁴ आधार । कठिणपणें अहंकार । ऐसा हा
भूगोलाचा पार । कोण जाणे ॥ १४ ॥ नाना पदार्थांच्या खाणी । धातु-
स्वांमंच्या वाटणी । कल्पतरु चिंतामणी । अमृतकुंडें ॥ १५ ॥ नाना द्वीपें
नाना खंडें । वसती उँद्रसें⁵ उदंडें । तेथें नाना जीवांचीं बंडें । वेगळालीं ॥
१६ ॥ मेरूर्भोवते कडे कापले । असंभाव्य कडोशे पडिले । निबिड तरु
लागले । नानाजिनसी ॥ १७ ॥ त्यासन्निध लोकालोक⁶ । जेथें सूर्याचें फिरे
चाकँ⁷ । चंद्राद्रि द्रोणाद्रि मैनाक । महागिरी ॥ १८ ॥ नाना देशीं पाषाण-
१. फिरण्यानें. २. कुलाचल सात प्रसिद्ध आहेतः-महेंद्रो मलयः सह्यः शक्तिमान्
मधमादनः ॥ विंध्यश्च पारियात्रश्च सप्तैते कुलपर्वताः ॥ ३. सर्प. ४. वायूंस. ५.
ओसाड. ६. एक पर्वत. ७. रथ परत फिरतो.