सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

वरोन जाणिजे जीवें । व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥ एकीं
मागमागोन घेणें । एकां न मागतांच देणें । प्रचीतीनें सुलक्षणें । वोळखावीं
॥ ३ ॥ जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यांत मिसळावा । राहाराहोन
शोध घ्यावा । परांतराचा ॥ ४ ॥ जाणीव नेणिवेस आलें । ढिलेपणें हेवांड
झालें । नेमस्तपणें शोभलें । दृष्टीपुढें ॥ ५ ॥ तैसेंचि हें मनासि मन । वि-
वेकें जावें मिळोन । ढिलेपणें अनुमान । होत आहे ॥ ६ ॥ अनुमानें अनु-
मान वाढतो । भिडेनें कार्यभाग नासतो । याकारणें प्रत्यय तो । आधीं पा-
हावा ॥७॥ दुसऱ्याचे जीर्वींचें कळेना । परांतर तें जाणवेना । वश्य होती
लोक नाना । कोणत्या प्रकारें ॥ ८ ॥ अक्ल सांडून पैरती । लोक वशीकरणें
करिती । अपूर्णपणें हळू पडती । ठायीं ठायीं ॥ ९ ॥ जगदीश आहे जगदं-
तरीं । चेटकें करावी कोणावरी । जो कोणी विवेकें विवरी । तोचि श्रेष्ठ
॥ १० ॥ श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ । कर्मानुसार
प्राणी नष्ट । अथवा भले ॥ ११ ॥ राजे जाती राजपंथें । चोर जाती चोर-
पंथें । वेडा ठके अल्पस्वार्थे । मूर्खपणें ॥ १२ ॥ मूर्खास वाटे मी शाहणा ।
परी तो वेडा दैन्यवाणा । नाना चातुर्यांच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जो
जगदंतरीं मिळाला । तो जंगदंतराचि झाला । अरैत्रीं परैत्रीं तयाला । काय
उणें ॥ १४॥ बुद्धि देणें भगवंताचें । बुद्धीविना माणूस काचें । राज्य सांडून फु-
काचें । भीक मागे ॥ १५॥ जें जेथें निर्माण झालें । तें तें तयास मानलें । अ-
भिमान देऊन गोविलें । ठायीं ठायीं ॥ १६॥ अवघेचि ह्मणती आम्हीं थोर ।
अवघेचि म्हणती आम्ही सुंदर । अवघेचि म्हणती चतुर । भूमंडळीं ॥ १७॥
ऐसा विचार आणितां मना । कोणीच लहान म्हणवीना । जाणते आणिती
अनुमाना । सकळ कांहीं ॥१८॥ आपुलालया साभिमानें । लोक चालिले अ-
नुमानें । परंतु हें विवेकानें । पाहिलें पाहिजे ॥१९॥ लटिक्याचा साभिमान
घेणें । सत्य अवघेंच सांडणें । मूर्खपणाचीं लक्षणें । तीं हीं ऐसीं ॥ २०॥ स-
त्याचा जो अभिमान । तो जाणावा निरभिमान । न्याय अन्याय समान ।
कदापि नव्हे ॥२१॥ न्याय म्हणिजे तो शाश्वत । अन्याय म्हणिजे तो अशा-
श्वत । बाष्कळ आणि नेमस्त । एक कैसें ॥ २२ ॥ एक उघड भाग्य भो-


१. गुंतागुंत. २. दूर. ३. मंत्रानें लोक वश करणें. ४. इहपरलोकीं.

गिती । एक तस्कर पलोन जाती । एकाची प्रगट महंती । एकाची कान-
कोंडी ॥ २३ ॥ आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो शीण । धूर्त आणि
विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥ उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि
आकाळिले । धूर्तापासीं कांहीं न चले । बाजार्याचें ॥ २५॥ या कारणें मुख्य
मुख्य । तयांसी करावें सख्य । येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥
धूर्तांसि धूर्तचि आवडे । धूर्त धूर्तांच पवाडे । उगोचि हिंडती वेडे । कार्ये-
विण ॥ २७ ॥ धूर्तांसि धूर्तपण कळलें । तेणें मनासी मन मिळालें । परी हें
गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्व ॥ २८ ॥ समर्थांचे राखितां मन । तेथें येती
उदंड जन । जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥ २९ ॥ वोळखीनें वो-
ळखी साधावी । बुद्धीनें बुद्धि बोधावी । नीतिन्यायें वाट रोधावी । पाखं-
डाची ॥ ३० ॥ वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा । सगट
लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ ३१ ॥ निस्पृह आणि नित्य नूतन । प्र-
त्ययाचें ब्रह्मज्ञान । प्रकट जाणता सज्जन । दुर्लभ जगीं ॥ ३२ ॥ नान
जिन्नस पाठांतरें । निवती सकळांचीं अंतरें । चंचळपणें तदनंतरें । सकळा ठायीं
॥ ३३ ॥ एकेठायीं बैसोनि राहिला । तरी मग व्यापचि बुडाला । सावध-
पणें ज्याला त्याला । भेटी द्यावी ॥ ३४ ॥ भेटभेटों उरी राखणें । हीं चातु-
र्याचीं लक्षणें । मनुष्यमात्र उत्तमगुणें । सावधान पावें ॥ ३५ ॥ इति श्रीदास-
बोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चातुर्यनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. निस्पृहलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथवीमध्यें नानाशरीरें । उदंड दाटलीं लहान-
थोरें । पालटती मनोविकारें । क्षणक्षणां ॥ १ ॥ जितुक्या मूर्ति तितुक्या
प्रकृती । सारिख्याच नसती आदिअंतीं । नेमाचि नाहीं पाहावें किती ।
काय म्हणोनी ॥ २ ॥ कितेक म्लेंच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांतें
आटले । देशभाषेनें रोधिले । कितीएक ॥ ३ ॥ महाराष्ट्र देश थोडा उरला ।
राजकारणें लोक रोधिला । अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कार्मे ॥ ४ ॥
कित्येक युद्धप्रसंगीं गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले । रात्रंदिवस करूं लागले
१. चोर. २. मिसळतो. ३. स्वभाव. ४. ख्रिस्ती जातींत. ५. मराठ्यांचा.

१५ वा. ] निस्पृहलक्षण. ३३३

युद्धचर्चा ॥ ५ ॥ उद्यम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोटधंदा लागला । निरंतर ॥ ६ ॥ षट्दर्शनें¹ नाना मतें । पाषां-
डें उठलीं बहुतें । पृथ्वीमध्यें जेथें तेथें । उपदेशिती ॥ ७ ॥ स्मार्ती आणि
वैष्णवीं । उरलीं सुरलीं नेलीं आघवीं । ऐसी पाहतां गाथागोवी । उदंड
जाहली ॥ ८ ॥ कित्येक कामनेचे भक्त । ठायीं ठायीं झाले आसक्त । युक्त
अथवा अयुक्त । पाहतो कोण ॥ ९ ॥ या गलबल्यामध्यें गलबला । को-
णीं कोणीं वाढविला । त्यास देखों शकेनासा झाला । वैदिक लोक ॥ १० ॥
त्यांहिमध्यें हरिकीर्तन । तेथें वोढले कित्येक जन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान ।
कोण पाहे ॥ ११ ॥ या कारणें ज्ञान दुर्लभ । पुण्यें घडे अलभ्य लाभ । वि-
चारवंता सुलभ । सर्व कांहीं ॥ १२ ॥ विचार सकळांला सांगतां न ये ।
उदंड येती अंतरायें³ : उपाय योजितां अपाय । आडवे येती ॥ १३ ॥ त्यां-
हिमध्यें जो तीक्ष्ण । रिकामा जाऊं नेदी क्षण । धूर्त तार्किक विचक्षण ।
सकळांस माने ॥ १४ ॥ नानाजिन्नस उदंड पाठ । वदों लागले गडगडाट ।
अव्हांटांची² केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥ प्रबोधशक्तीचीं अनंत द्वारें ।
जाणे सकळांचीं अंतरें । निरूपणें तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥ मतें
मतांतरें सगट । प्रत्यय बोलून करी सपाट । दंडक सांडून नीट । वेधी
जनां ॥ १७ ॥ नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें⁴ । उदासवृत्तीच्या
गुमानें । उठोन जातो ॥ १८ ॥ प्रत्यय बोलोन उठोन गेला । चटक ला-
गली लोकांला । नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १९ ॥ परी
तो कोठें आढळेना । कोणे स्थळीं सांपडेना । वेष पाहतां हीनदीन । सा-
रिखा दिसे ॥ २० ॥ उदंड करी गुप्तरूपें । भिकाऱ्यासारिखा स्वरूपें । तेथें
यश कीर्ति प्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥ ठायीं ठायीं भजन लावी । आ-
पण तेथून चुकवी । मत्सरमताची गोंवी⁵ । लागोंच नेदी ॥ २२ ॥ खना⁶-
ळामध्यें जाऊन राहे । तेथें कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्व-
काळ ॥ २३ ॥ अवघडस्थळीं कठिण लोक⁷ । तेथें राहणें नेमक । सृष्टीमध्यें
सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥ तेथें कोणाचें चालेना । अणुमात्र अ-


१. सौर, शाक्त, गाणपत्य, शैव, वैष्णव आणि स्कांद हीं सहा मतें. २. आड-
वाटांची. ३. अडथळे. ४. वळानें. ५. संबंध. ६. दरीखोऱ्यांत. ७. स्थान.

जुमानेना । कट घालून राजकारणा । लोकां लावी ॥ २५ ॥ लोकीं लोक
वाढविले । तेणें अमर्याद झाले । भूमंडळीं सत्ता चाले । गुप्तरूपें ॥ २६ ॥
ठायींठांयीं उदंड थोंबे¹ । मनुष्यमात्र तितुकें झोंबे । चहूकडे उदंड लांबे ।
परमार्थबुद्धी ॥ २७ ॥ उपासनेचा गजर । स्थळोस्थळीं थोरथोर । प्रत्ययानें
प्राणिमात्र । सोडविले ॥ २८ ॥ ऐसें कैवांड उदंड जाणे । तेणें लोक होती
शहाणे । जेथें तेथें प्रत्यय बाणे । प्राणिमात्रांसीं ॥ २९ ॥ ऐशी कीर्ति करून
जावें । तरीच संसारास यावें । दास म्हणे हें स्वभावें । संकेतें बोलिलों
॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके निस्पृहलक्षणं नाम
द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. श्रेष्ठ अंतरात्मा.
श्रीगणेशाय नमः ॥ मुळापासून सैरावैरा । अवघा पंचीकरण पसारा ।
त्यांत साक्षित्वाचाँ दोरा । तोहि तत्वरूपँ ॥ १ ॥ दुरस्तां दाटल्या फौजा ।
उंच सिंहासनीं राजा । याचा विचार समजीं । अंतर्यामीं ॥ २ ॥ देहमात्र
अस्थिमांसाँचें । तैसेंचि जाणावें नृपतीचें । मुळापासून सृष्टीचें । तत्वैरूप
॥ ३ ॥ रायाचे सत्तेनें चालतें । परंतु अवघीं पंचभूतें । मुळीं अधिक जा-
णीवेचें तें । अधिष्ठान आहे ॥ ४ ॥ विवेकें बहुत पैसावले । म्हणोन अ-
वतारी बोलिले । मनु चक्रवर्ती झाले । येणेंचि न्यायें ॥ ५ ॥ जेथें उदंड
जाणीव । तेचि तितुके सदैवँ । थोडे जाणीवेनें निर्देवँ । होती लोक ॥ ६ ॥
व्याप आटोप करीती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी सदैव होती ।
देखतदेखतां ॥ ७ ॥ ऐसें हें आतां वर्ततें । मूर्ख लोकांस कळेना तें । वि-
वेकी मनुष्य समजतें । सकळ कांहीं ॥ ८ ॥ थोर लहान बुद्धीपाशीं । स-
गट कळेना लोकांसी । आधीं उपजले तयांसी । थोर म्हणती ॥ ९ ॥ वयॆं
धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती । विचित्र विवेकाची गती ।
कळली पाहिजे ॥ १० ॥ सामान्य लोकांचें ज्ञान । तें अवघेंच अनुमान ।


तळटीपा (Footnotes):
. १. समुदाय. २. कारस्थान. ३. मूळमायेपासून. ४. पंचभौतिक. ५. आणि-
वेचा. ६. फौजेच्या मध्यभागीं राजा, त्याप्रमाणें जगताचे अंतरीं जाणीव म्हणजे
साक्षित्व आहे. परंतु राजा व फौज हे जसे सर्व देहच, त्याप्रमाणें जगत् वँ
साक्षित्व हें सर्व पंचभौतिकच होय. ७. भाग्यवान्. ८. भाग्यहीन.

१५ वा. ] श्रेष्ठ अंतरात्मा. ३३५
दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडें ॥११॥ नव्हे कोणास म्हणावें । सामा-
न्यास काय ठावें । कोण कोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥१२॥ धाकुटा
भाग्यास चढला । तरी तुच्छ करिती तयाला । या कारणें सलगीच्या लो-
कांला । दुरी धरावें ॥१३॥ नेमस्त कळेना वचन । नेमस्त न ये राजकारण ।
उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४॥ नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त
कोणीच मानीना । आधीं उपजलें त्या थोरपणा । कोण पुसे ॥ १५ ॥
वडिलां वडिलपण नाहीं । धाकुट्या धाकुटेपण नाहीं । ऐसें बोलती त्यांस
नाहीं । शहाणपण ॥ १६ ॥ गुणांविण वडिलपण । हें तों अवघेंच अप्रमाण ।
त्याची प्रचीत प्रमाण । थोरपणीं ॥ १७ ॥ तथापि वडिलांस मानावें ।
वडिलें वडिलपण जाणावें । नेणतां पुढें, कष्टावें । थोरपणीं ॥ १८ ॥ तस्मात्
वडिल अंतरात्मा । जेथें चेतला तेथें महिमा । हें प्रगटचि आहे आम्हां । शब्द
नाहीं ॥१९॥ या कारणें कोणी एकें । शाहाणपण शिकावें विवेकें । विवेक
न शिकतां तुकें । तुटोन जाती ॥ २० ॥ तुक तुटलें म्हणिजे गेलें । जन्मास
येऊन काय केलें । बळेंच सांडीस घातलें । आपणासी ॥ २१ ॥ सगट
बायका शिव्या देती । सांडीस पडला ऐसें म्हणती । मूर्खपणाची प्राप्ती ।
ठाकून आली ॥ २२ ॥ ऐसें कोणी एकें न करावें । सर्व सार्थकाचि करावें ।
कळेना तरी विवरावें । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥ शाहण्यास कोणी तरी बाहती ।
मूर्खास लोक दवडून देती । जीवास आवडे संपत्ती । तरी शाहणें व्हावें
॥ २४ ॥ अहो या शहाणपणाकारणें । बहुतांचे कष्ट करणें । परंतु शहाण-
पण शिकणें । हें उत्तमोत्तम ॥ २५॥ जो बहुतांस मानला । तो जाणावा
शाहाणा झाला । जनीं शाहण्या मनुष्याला । काय उणें ॥ २६ ॥ आपुलें
हित न करी लौकिकीं । तो जाणावा आत्मघातकी । त्या मूर्खा एवढा पात-
की । आणिक नाहीं ॥ २७ ॥ आपण संसारीं कष्टतो । लोकां करवीं रागे-
जोन घेतो । जनांमध्यें शहाणा तो । ऐसें न करी ॥ २८ ॥ साधकां शिक-
विलें स्वभावें । मानेल तरी सुखें घ्यावें । मानेना तरी सांडावें । एकीकडे
॥ २९ ॥ तुम्ही श्रोते परम दक्ष । अलक्ष्यास लावितां लक्ष । हें तों सामान्य
प्रत्यक्ष । जाणतसां ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके
श्रेष्ठअंतरात्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥

३३६ श्रीदासबोध. [ दशक
४. शाश्वत ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीपासून झालीं झाडें । झाडापासून होती
लांकडें । लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होय ॥१॥ पृथ्वीपासून वेल होती ।
नाना जिन्नस फांपावती । वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होय ॥ २ ॥
नाना धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें कारिती भोजनें । नाना विष्ठा नाना
वमनें । पृथ्वीच होय ॥ ३ ॥ नाना पक्ष्यादिकीं भक्षिलें । तरी पुढें तैसेंच
झालें । वाळोन भस्म होऊन गेलें । पुनः पृथ्वी ॥४॥ मनुष्यें मरतांच ऐका ।
कृमि भस्म मृत्तिका । ऐशा काया पडती अनेका । पुढें पृथ्वी ॥ ५ ॥ नाना
तृणें पदार्थ कुजती । पुढें त्यांची होय माती । नाना किडे मरोन जाती ।
पुढें पृथ्वी ॥ ६ ॥ पदार्थ दाटले अपार । किती सांगावा विस्तार । पृथ्वी-
वांचून थार । कोणास नाहीं ॥ ७ ॥ झाडपाले आणि तृण । पशु भक्षितां
होतें शेण । खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ॥ ८ ॥ उत्पत्ति स्थिति
संहारतें । तें तें पृथ्वीस मिळोन जातें । जितुकें होतें आणि जातें । पुनः
पृथ्वी ॥ ९ ॥ नाना बीजांचिया राशी । विरुढोन लागती गगनासी । पुढें
शेवटीं पृथ्वीसी । मिळोन जाती ॥१०॥ लोक नाना धातु¹ पुरिती । बहुतां
दिवसां होय माती । सुवर्ण पाषाणांची गती । तैसीच आहे ॥११॥ मातीचें
होतें सुवर्ण । आणि मृत्तिकेचे होती पाषाण । महा अग्निसंगें भस्मोन ।
पृथ्वीच होय ॥ १२ ॥ सुवर्णाचें रजें² होतें । रज शेवटीं कुजोन जातें ।
रस होऊन वितुळतें । पुनः पृथ्वी ॥ १३ ॥ पृथ्वीपासून धातु निपजती ।
अग्निसंगें भस्म होती । तया रसाची होय जगती³ । कठीणरूपें ॥ १४ ॥
नाना जळासि गंधी उठे । तेथें पृथ्वीचें रूप प्रगटे । दिवसेंदिवस जळ आटे ।
पुढें पृथ्वी ॥ १५ ॥ पत्रें पुष्पें फळें येती । नाना जीव खाऊन जाती । ते
जीव मरतां जगती । नेमस्त होय ॥ १६ ॥ जितुका कांहीं झाला आकार ।
तितुक्यास पृथ्वी आधार । होती जाती प्राणिमात्र । शेवटीं पृथ्वी ॥ १७ ॥
हें किती म्हणोन सांगावें । विवेकें अवघेंचि जाणावें । खाजणीभाजणीचें⁴
समजावें । मूळ तैसें ॥ १८ ॥ आप आळोन पृथ्वी झाली । पुनः आपींच
विराली । अग्नियोगें भस्म झाली । म्हणोनियां ॥ १९ ॥ आप झालें तेजा-
१. सोनें, रुपें इत्यादि. २. बारीक कण. ३. पृथ्वी. ४. उभारणी-संहारणीचें.

१५ वा.] चंचललक्षण. ३३७
पासुनी । पुढें तेजें घेतलें शोषूनी । तें तेज झालें वायूचेनी । पुढें वायु
झडपी ॥ २० ॥ वायु गगनीं निर्माण झाला । पुढें गगनींच विराला । ऐसें
खाजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥ जें जेथें निर्माण होतें । तें तेथें लया
जातें । येणें रीती पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥ भूत म्हणिजे निर्माण
झालें । पुनः मागुतें निमालें । पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥ तें
परब्रह्म जों कळेना । तों जन्ममृत्यु चुकेना । चार खाणी जीव नाना । होणें
घडे ॥ २४ ॥ जडाचें मूळ तें चंचल । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळास
नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे झालें । सिद्धांत म्हणिजे
निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥ हैं प्रचीतीनें जाणावें ।
विचारें खुणेसि बाणावें । विचारेंविण शिणावें । तेंचि मूर्खपण ॥ २७ ॥
ज्ञानी भिडेनें दडपिला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करिती
गलबला । मायेमध्यें ॥ २८ ॥ माया निःशेष नासली । पुढें स्थिति कैसी
उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥ विशेष मायेचें निर-
सन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥
लोकांचे बोलीं जो लागला । तो अनुमानानेंचि बुडाला । या कारणें प्रत्ययाला ।
पाहिलेंचि पाहावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके
शाश्वतब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. चंचललक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ दोघां ऐशीं तीनै चालती । अगुणीं अष्टधा प्रकृती ।
अधोध्वं सांडून वर्तती । इंद्रफणी ऐशी ॥ १ ॥ पर्णतोंडें भक्षितो पँण-
जा । मूँल बापासैं मौरी वोर्जा । चुकाऱ्या गेला रोंजा । चौघांजणांचा
१. अनुभवाचें ज्ञान. २. प्रकृति व पुरुष; म्हणज मुळमाया. ३. त्रिगुण; म्हणजे
गुणमाया. ४. निर्गुणाचे ठिकाणीं. ५. खालीं नव्हे, वर नव्हे; इंद्रधनुष्याप्रमाणें अंत-
रिक्षांत. ६. अग्नि, आप, पृथ्वी व वनस्पती असा उत्पत्तिक्रम आहे; तेव्हां वन-
-स्पत्यादिकांस अग्नि भक्षण करितो असा अर्थ. (?) ७. पंचभूतांच्या उत्पत्तिक्रमानें
पाहतां पृथ्वी उदकास शोषते, उदक तेजास विझावितें, इत्यादि. (?) ८. कुशलतेनें.
९. पृथ्वी, आप, तेज व वायु यांचें मुख्य तत्त्व आकाश; अंतरात्मा.

३३८ श्रीदासबोध. [ दशक
॥ २ ॥ देवे देवालयामध्यें लपला। देऊळ पूजितां पावे त्याला। सृष्टीमध्यें
ज्याला त्याला। ऐसेंचि आहे ॥ ३ ॥ दोन्ही नामें एकास पडिलीं। लोकीं
नेमस्त कल्पिलीं। विवेकें प्रत्ययें पाहिलीं। तों एकचि नाम ॥ ४ ॥ नाहीं
पुरुष ना वनिता। लोकीं कल्पिलें तत्त्वतां। याचा बरा शोध घेतां। कांहीं
नाहीं ॥ ५ ॥ स्त्री नदी पुरुष खळाळ। ऐसें बोलती सकळ। विवरोन पहा-
तां निवळ। देह नाहीं ॥ ६ ॥ आपण आपणास कळेना। पाहों जातां आ-
कळेना। कशास कांहींच मिळेना। उदंडपणें ॥७॥ एकलाचि उदंड झाला।
उदंडाचि एकला पडिला। आपणासि आपला गलबला। सोसवेना ॥ ८ ॥
एक असोन फुटी पडली। फुटी असोन स्थिति एकली। विचित्र कळा पै-
सावली। प्राणिमात्रीं ॥ ९ ॥ वल्लीमध्यें जळ संचरे। कोरडेपणें हें वावरे।
[L1

१५ वा. ] चातुर्यलक्षण. ३३९
समाधान होतें ॥ २१ ॥ मनास मिळतां मन । पाहून येती निरंजन । चं-
चळचक्रें² उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥ एकदां जाऊन पाहून आले ।
मग तें सन्निध देखिलें । चर्मचक्षू लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥ नाना श-
रीरीं चंचळ । अखंड करी चळवळ । परब्रह्म तें निश्चळ । सर्वां ठायीं ॥ २४।¹
चंचळ धांवे एकीकडे । वोस पडे दुसरीकडे । चंचळ पुरे सर्वांकडे । हैं तों घ-
डेना ॥ २५ ॥ चंचळ चंचळास पुरेना । अवघें चंचळ विवरेना । निश्चळ अ-
पार अनुमाना । कैसें येतें ॥ २६ ॥ गगनीं चालिली हवावी³ । कैसी पावेल
पार पदवी । जातां मध्येंच विझावी । हा स्वभाव तिचा ॥ २७ ॥ मनो-
धर्म एकदेशी । कैंची आकळील वस्तूसी । निगुर्ण सांडून अपैसीं⁴ । सर्व
ब्रह्म म्हणे ॥ २८ ॥ नाहीं सारासार विचार । तेथें अवघा एककार । खरें
सांडून खोटें पोर । नेणतें घेतें ॥ २९ ॥ ब्रह्मांडाचें महाकारण । तेथूनि हें
पंचीकरण । महावाक्याचें विवरण । वेगळेंच असे ॥ ३० ॥ महत्तत्व मह-
द्भूत । तोचि जाणावा भगवंत । उपासना हे समाप्त । येथून झाली ॥ ३१ ॥
कर्म उपासना आणि ज्ञान । त्रिकांड⁵ वेद हे प्रमाण । ज्ञानाचें होतें विज्ञान ।
परब्रह्मीं ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चंचल-
लक्षणनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥

६. चातुर्यलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ पिल्यापासून⁶ कृष्णें⁷ झालें । भूमंडळीं विस्तारिलें ।
तेणेंविण उमजलें । हें तों घटेना ॥ १ ॥ आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची
सांठवण । अधम आणि उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २ ॥ महीसुत⁸ सर-
साविला । सरसाऊन द्विधा केला । उभयतां मिळोन चालला । कार्यभाग
॥ ३ ॥ श्वेताश्वेतास⁹ गांठी पडतां । मध्यें कृष्णें¹⁰ मिश्रित होतां । इहलोक-
सार्थकतैं¹¹ । होत आहे ॥ ४ ॥ विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होय
चतुर । सद्यःप्रचीत साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥ सकळांस जें मान्य ।

१. शुद्ध ब्रह्म. २. मायेचें चक्र. ३. बाण. ४. आपल्याशींच. ५. तीन भागांचा.
६. सर्वांचें मूळ ब्रह्म त्यापासून. ७. माया. ८. अहंकार. ९. सत्त्वगुणाची व रजो-
गुणाची. १०. तमोगुण. ११. जगाची राइटी.

३४० श्रीदासबोध. [ दशक

तेंचि होतसे सामान्य । सामान्यास अनन्य । होइजेत नाहीं ॥ ६ ॥ उत्तम
मध्यम कनिष्ठ रेखा । अदृष्टींची गुप्त रेखा । तत्त्वाचा अनुभव सारिखा ।
होत नाहीं ॥ ७ ॥ चौदा पिढ्यांचे पवाडे¹ । सांगती ते शाहणे कीं वेडे । ऐ-
क्यता घडे कीं न घडे । ऐसें पाहावें ॥ ८ ॥ रेखा तितुकी पुसोन जाते ।
प्रत्यक्ष प्रत्यया येते । डोळेझांकणी करावी ते । काय निमित्त ॥ ९ ॥ बहु-
तांचे बोलीं लागले । ते प्राणी अनुमानीं बुडाले । मुख्य निश्चय चुकले ।
प्रत्ययाचा ॥ १० ॥ उडंडाचें उदंड ऐकावें । परी तें प्रत्ययें पाहावें । खरें
खोटें निवडावें । अंतर्यामीं ॥ ११ ॥ कोणासि नव्हे म्हणों नये । समजावे
अपाय उपाय । प्रत्यय घ्यावा बहुत काय । बोलोनियां ॥ १२ ॥ माणूस
हेकाड आणि कौंचें² । मान्य करावें तयाचें । येणेंप्रकारें बहुतांचें । अंतर रा-
खावें ॥ १३ ॥ अंतरीं पीळ पेंच वळसा³ । तोचि वाढवी बहुवसा । तरी
मग शाहणा कैसा । निवहूं जाणे ॥ १४ ॥ वेडे करावे शाहाणे । तरीच
जिणें श्लाघ्यवाणें । उगेंच वादांगें⁴ वाढवणें । हें मूर्खपण ॥ १५ ॥ मिळोन
जाऊन मिळवावे । पडी घेऊन उलथावे । कांहींच कळों न द्यावें । विवेक-
बळें ॥ १६ ॥ दुसऱ्याचे चालणीं चालावें । दुसऱ्याचे बोलणीं बोलावें । दु-
सऱ्याच्या मनोगतें जावें । मिळोनियां ॥ १७ ॥ जो दुसऱ्याच्या हितावरी ।
तो विपटें⁵ कांहींच न करी । मानत मानत विवरी । अंतर तयाचें ॥ १८ ॥
आधीं अंतर हातीं घ्यावें । मग हळूहळू उकलावें । नाना उपायें न्यावें ।
परलोकासी ॥ १९ ॥ हेकाडास हेकाड मिळाला । तेथें गलबलाचि झाला ।
कलह उठतां चातुर्याला । ठाव कैंचा ॥ २० ॥ उगीच करिती बडबड । परी
करून दाखवणें हें अवघड । परस्थळ साधनें जड । कठिन आहे ॥ २१ ॥
धक्के चपेटा सोसावे । नीच शब्द सोशीत जावे । प्रस्ताबोन परावे । आपले
होती ॥ २२ ॥ प्रसंग जाणोन बोलावें । जाणपण कांहींच न घ्यावें । लीनता
धरून जावें । जेथें तेथें ॥ २३ ॥ कुग्रामें अथवा नगरें । पाहावीं घरांचीं
घरें । भिक्षामिषें लहान थोरें । परीक्षून सोडावीं ॥ २४ ॥ भोंवर्तीं कांहीं
तरी सांपडे । विचक्षण लोकीं मैत्री घडे । उगेंच बैसतां कांहीं न घडे । फिरणें⁶
विवरणें ॥ २५ ॥ सावधपणें सर्व जाणावें । वर्तमान आधींच घ्यावें । जाऊं
१. वर्णनें. २. कच्चें. ३. कपट. ४. वादाचा प्रसंग. ५. अनिष्ट. ६. फिरल्यानें.

१५ वा. ] अधोर्ध्वलक्षण. ३४१
नये तिकडे जावें । विवेकेंसहित ॥ २६ ॥ नाना जिन्नस पाठांतरें । नि-
वती सकळांचीं अंतरें । लिहोन देतां परोपकारें । सीमा सांडिली ॥ २७ ॥
जैसें जयास पाहिजे । तैसें तयासि दीजे । तरी मग श्रेष्ठ होइजे । सकळां
मान्य ॥ २८ ॥ भूमंडळीं सकळां मान्य । तो म्हणूं नये सामान्य । कित्येक
लोक अनन्य । तया पुरुषासी ॥ २९ ॥ ऐशीं चातुर्याचीं लक्षणें । चातुर्यै
दिग्विजय करणें । मग तयास काय उणें । जेथें तेथें ॥ ३० ॥ इति श्री-
दासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चातुर्यलक्षणनिरूपणं नाम षष्ठः स-
मासः ॥ ६ ॥
७. अधोर्ध्वलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ नाना विकारांचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ ।
अचंचळीं जे चंचल । सूक्ष्मरूपें ॥ १ ॥ मूळमाया जाणिवेची । मुळींच्या
मूळसंकल्पाची । वोळखी षड्गुणेश्वराची । येणेंचि न्यायें ॥ २ ॥ प्रकृति-
पुरुष शिवशक्ती । अर्धनारीनटेश्वर म्हणती । परी ते अवघी जगज्योती ।
मूळ त्यासी ॥ ३ ॥ संकल्पाचें लक्षण । तोचि मूळमाया जाण । वायु आणि
त्रिगुण । पंचभूतें ॥ ४ ॥ पाहतां कोणी एक वेल । त्याच्या मुळ्या असती
खोल । पत्रें पुष्पें फळें केवळ । मुळाचपासीं ॥ ५ ॥ याहि वेगळे नाना
रंग । आकार विकार तरंग । नाना स्वाद अंतरंग । मुळामध्यें ॥ ६ ॥ तेंचि
मूळ फोडून पाहतां । कांहींच नाहीं वाटे आतां । पुढें वाढतां वाढतां ।
दिसों लागे ॥ ७ ॥ कड्यावरील वेल निघाला । अधोमुखें बळें चालिला ।
फांपावोन पुढें आला । भूमंडळीं ॥ ८ ॥ तैशी मूळमाया जाण । पंचभूतें
आणि त्रिगुण । मुळीं आहेत हें प्रमाण । प्रत्ययें जाणावें ॥ ९ ॥ अखंड वेल
पुढें वाढला । नाना विकारीं शोभला । विकाराचा विकार झाला । असं-
भाव्य ॥ १० ॥ नाना फडगरें फुटलीं । नाना जुंबाडें वाढलीं । अनंत अग्रें
चालिलीं । सृष्टीमध्यें ॥ ११ ॥ कित्येक फळें तीं पडती । सर्वेंचि आणिक
निघती । ऐशीं होती आणि जाती । सर्वकाळ ॥ १२ ॥ एक वेलचि वा-
ळले । पुनः तेथेंचि फुटले । ऐसे आले आणि गेले । कितीएक ॥१३॥ पानें
झडती आणि फुटती । पुष्पें फळें तेणेंचि रीती । मध्यें जीव हे जगती ।

असंभाव्य ॥ १४ ॥ अवघा वेलचि करपतां । मुळापासोन पुनः होतो ।
ऐसा अवघा विचार जो तो । प्रत्यक्ष जाणावा ॥ १५ ॥ मूळ खाणोन काढिलें ।
प्रत्ययज्ञानें निर्मूळ केलें । तरी मग वाढणोंचि राहिलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥
मुळीं बीज शेवटीं बीज । मध्यें जळरूप बोज । ऐसा हा स्वभाव सहज ।
विस्तारला ।: १७ ॥ मुळामधील ज्या गोष्टी । सांगतां हे बीजसृष्टी । जेथील
अंश तेथें कष्टी । न होतां जातो ॥ १८ ॥ जातो येतो पुनः जातो । ऐशा
प्रत्यावृत्ति करितो । परंतु आत्मज्ञानी जो तो । अन्यथा न घडे ॥ १९ ॥ न
घडे ऐसें जरी म्हणावें । तरी कांहीं तरी लागे जाणावें । अंतरींच पडे ठावें ।
सकळांस कैंचें ॥ २० ॥ तेणेंसीच कार्यभाग करिती । परंतु तयास नेणती ।
दिसेना ते काय करिती । बापुडे लोक ॥ २१ विषयभोग तेणेंचि घडे । तेणें-
विण कांहींच न घडे । स्थूळ सांडून सूक्ष्मीं पवाडे । ऐसा पाहिजे ॥ २२ ॥
जें आपलेंचि अंतर । तद्रूपचि जगदंतर । शरीरभेदाचे विकार । वेगळाले
॥ २३ ॥ अंगुळीची अंगुळीस वेदना । एकीची एकीस कळेना । हात पाय
अवयव नाना । येणेंचि न्यायें ॥ २४ ॥ अवयवाचें अवयव नेणे । मग तो
पराचें काय जाणे । परांतर या कारणें । जाणवेना ॥ २५ ॥ एकेंचि उदकें
सकळ वनस्पती । नाना अग्रें भेद दिसती । खुडिलीं तितुकींच सुकती । येर
तीं टवटवीत ॥ २६ ॥ येणेंचि न्यायें भेद झाला । कळेना एकाचें एकाला ।
जाणपणें आत्म्याला । भेद नाहीं ॥ २७ ॥ आत्मत्वीं भेद न दिसे । हें प्रकृ-
त्तिकारितां भासे । तरि जाणतचि असे । बहुतेक ॥ २८ ॥ देखोन ऐकोन
जाणती । शहाणे अंतरीं परीक्षिती । धूर्त ते अवघेचि समजती । गुप्तरूपें
॥ २९ ॥ जो बहुतांचें पाळण करी । तो बहुतांचें अंतर विवरी । धूर्तपणें
ठाउकें करी । सकळ कांहीं ॥ ३० ॥ आधीं मनोगत पाहती । मग विश्वास
धरिती । प्राणिमात्र येणेंचि रीती । वर्तताहे ॥ ३१ ॥ स्मरणामागें विस्मरण ।
रोकडी प्रचीत प्रमाण । आपलें ठेवणें आपण । चुकताहे ॥ ३२ ॥ आपलेंच
आपणा स्मरेना । बोलिलें तें आठवेना । उठती अनंत कल्पना । ठाउक्या
कैंच्या ॥ ३३ ॥ ऐसें हें चंचल चक्र । कांहीं नीट कांहीं वक्र । झाला राव
अथवा शक्र । तरी स्मरणास्मरणें ॥ ३४ ॥ स्मरण म्हणिजे देव । विस्मरण
१. फेरे. २. दृश्य आकार. ३. ब्रम्हाकडे. ४. मग.

१५ वा. ] सूक्ष्म जीव. ३४३
म्हणिजे दानव । स्मरणविस्मरणें मानव । वर्तती आतां ॥ ३५ ॥ म्हणोन
दैवी आणि दानवी । संपत्ती द्विधा जाणावी । प्रचीत मानसीं आणावी ।
विवेकेंसहित ॥ ३६ ॥ विवेकें विवेक जाणावा । आत्म्यानें आत्मा ओळ-
खावा । नेत्रें नेत्रचि पाहावा । दर्पणींचा ॥ ३७ ॥ स्थूळें स्थूळ खाजवावें ।
सूक्ष्में सूक्ष्म समजावें । खुणेनें खुणेसि बाणावें । अंतर्यामीं ॥ ३८ ॥ वि-
चारें जाणावा विचार । अंतरें जाणावें अंतर । अंतरें जाणावें परांतर ।
होऊनियां ॥ ३९ ॥ स्मरणामाजी विस्मरण । हेंचि भेदाचें लक्षण । एक-
देशी परिपूर्ण । होत नाहीं ॥ ४० ॥ पुढें शिके मागें विसरे । पुढें उजेड
मागें अंधारें । पुढें स्मरे मागें विस्मरे । सकळ कांहीं ॥ ४१ ॥ तुर्या जाणा-
वी स्मरण । सुषुप्ती जाणावी विस्मरण । उभयतां शरीरीं जाण । वर्तती
आतां ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके अधोध्वं-
निरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. सूक्ष्म जीव.
श्रीगणेशाय नमः ॥ रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचें आयुष्य निपट थोडें ।
युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयांमध्ये ॥ १ ॥ ऐसे नाना जीव असती । पाहों
जातां न दिसती । अंतःकरणपंचकाची स्थिती । तेथेंहि आहे ॥ २ ॥ त्या-
पुरतें त्यांचें ज्ञान । विषय इंद्रियें समान । सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहतो
कोण ॥ ३ ॥ त्यास मुंगी महाथोर । नेणों चालिला कुंजरें । मुंगीस सुताचा
पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥ ते मुंगीसमान शरीरें । उदंड असती लहान
थोरें । समस्तांमध्ये जीवेश्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥ ऐशिया किडियांचा
संभार । उदंड दाटला विस्तार । अत्यंत साक्षेपी जो नर । तो विवरोन पाहे
॥ ६ ॥ नाना क्षेत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वताएवढे । आयुष्यहि
तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥ पक्ष्यायेवढें लहान नाहीं । पक्ष्यायेवढें
थोर नाहीं । सर्प आणि मत्स्य पाहीं । येणेंचि पाडें ॥ ८ ॥ मुंगीपासून थोर-
थोरें । चढती वाढती शरीरें । त्यांचीं निर्धारीतां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥
१. आसुरी. २. सदगुणसंपत्ति. ३. समाधि. ४. झोंप. ५. हत्ती. ६. जीव तोच
ईश्वर, त्यानें. ७. प्रयत्नशील. ८. प्रमाणानें.

३४४ श्रीदासबोध. [ दशक
नाना वर्ण नाना रंग । नाना जीवांचे तरंग । एक सुरंग एक विरंग । किती
म्हणोन सांगावें ॥ १० ॥ एक सुकुमारें एक कठोरें । निर्माण केलीं जगदी-
श्वरें । सुवर्णासारिखीं शरीरें । देदीप्यमानें ॥ ११ ॥ शरीरभेद अहंकारभेद ।
वाचाभेद देहभेद । अंतरीं वसिजे अभेद । एकरूपें ॥ १२ ॥ एक त्रासकें एक
मारकें । पाहों जातां नाना कौतुकें । कितीएक अमोलिकें । सृष्टीमध्यें ॥१३॥
ऐशीं अवघीं विवरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे । आपुल्यापुरतें जाणो-
न राहे । किंचिन्मात्र ॥ १४ ॥ नवखंड हे वसुंधरा । सप्तसागरांचा फेरा ।
ब्रह्मांडाबाहेरील नीरें । कोण पाहे ॥ १५ ॥ त्या नीरामध्ये जीव असती ।
पाहों जातां असंख्याती । त्या विशाल जीवांची स्थिती । कोण जाणे ॥ १६ ॥
जेथें जीवन तेथें जीव । हा उत्पत्तीचा स्वभाव । पाहतां याचा अभिप्राय ।
उदंड असे ॥ १७ ॥ भूगर्भी नाना नीरें । त्या नीरामध्ये शरीरें । नाना
जिन्नस लहान थोरें । कोण जाणे ॥ १८ ॥ एक प्राणी अंतरिक्ष असती ।
तिहीं नाहीं देखिली क्षिती१ । वरिच्यावरी उडोन जाती । पक्ष फुट-
ल्यानंतर ॥ १९ ॥ नाना खेचरें आणि भूचरें । नाना वनचरें आणि
जळचरें । चौऱ्यायशीं लक्ष योनिप्रकार । कोण जाणे ॥ २० ॥ उष्ण तेज
वेगळें करुनी । जेथें तेथें जीवयोनी । कल्पनेपासून होतो प्राणी । कोण जाणे
॥ २१ ॥ एक नाना सामर्थ्यें केले । एक इच्छेपासून झाले । एक शब्दासारि-
खे पावले । शापदेह ॥ २२ ॥ एक देह बाजींगरीचे । एक देह वोडंबैरीचे ।
एक देह देवतांचे । नाना प्रकारें ॥ २३ ॥ एक क्रोधापासून झाले । एक
तपापासून जन्मले । एक उःशापें पावले । पूर्व देह ॥ २४ ॥ ऐसें भगवं-
ताचें करणें । किती म्हणोन सांगणें । विचित्र मायेच्या गुणें । होत जातें
॥ २५ ॥ नाना अवघड करणी केली । कोणी देखिली ना ऐकिली । विचित्र
कळा समजली । पाहिजे सर्व ॥२६॥ थोडें बहुत समजलें । पोटापुरती विद्या
शिकले । प्राणी उगेंच गर्वें गेलें । मी ज्ञाता म्हणोनी ॥ २७ ॥ ज्ञानी एक
अंतरात्मा । सर्वांमध्ये सर्वात्मा । त्याचा कळावया महिमा । बुद्धी कैंची ॥
॥ २८ ॥ सप्तकंचुक ब्रह्मांड । त्यांत सप्तकंचुक पिंड । त्या पिंडामध्यें उदंड ।
१. पृथ्वी. २. पाण्यास. ३. पृथ्वांचे पोटीं. ४. पक्षी. ५. मनुष्यें,, पशु वगैरे.
६. जादूचे. ७. राक्षसी मायेचे. ८. सात कंचुक म्हणजे आवरणें ज्यास आहेत तें.

१५ वा. ] पिंडोत्पत्ति. ३४५
प्राणी असती ॥ २९ ॥ आपुल्या देहांतील न कळे । मग तें अवघें कैंचें
कळे । लोक होती उताविळे । अल्प ज्ञानें ॥ ३० ॥ अणुरेणुऐसे जिन्नस ।
त्यांचे आम्ही विराटपुरुष । आमुचें उदंडाच आयुष्य । त्यांच्या हिशोबें
॥ ३१ ॥ त्यांच्या रीती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक । जाणे सर्वहि
कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥ धन्य परमेश्वराची करणी । अनुमानेना अं-
तःकर्णीं । उगीच अहंता पापिणी । वोढा लावी ॥ ३३ ॥ अहंता सांडून
विवरणें । कित्येक देवाचें करणें । पाहतां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥
थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिताती रडाया । शरीर अवघें पडा-
वया । वेळ नाहीं ॥ ३५ ॥ कुश्चिळ ठायीं जन्मलें । आणि कुश्चिळ रसांचि
वाढलें । यास म्हणती थोरलें । कोणत्या हिशोबें ॥ ३६ ॥ कुश्चिळ आणि
क्षणभंगुर । अखंड व्यथा चिंतांतुर । लोक उगेच म्हणती थोर । वेडेपणें ॥ ३७ ॥
काया माँया दो दिवसांची । आदिअंतीं अवघें ची ची । झांकातापा करून
उगेची । थोरीव दाविती ॥ ३८ ॥ झांकिलें तरी उपंदरें पडे । दुर्गंधी सुटे
जिकडे तिकडे । जो कोणी विवेकीं पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥ उगेंच
कासया तंडावें । मोडा अहंतेचें पुंडावें । विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमो-
त्तम ॥ ४० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके सूक्ष्मजीवनिरू-
पणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. पिंडोत्पत्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ चौखाणीचे प्राणी होती । अवघे उदकेंचि वाढती ।
ऐसे होती आणि जाती । असंख्यात ॥ १ ॥ तत्त्वाचें शरीर झालें । अंतरा-
त्म्यासगट वळलें । त्याचें मूळ जों शोधिलें । तों उदकरूप ॥ २ ॥
शरत्काळींचीं शरीरें । पिळपिळीं झिरपती नीरें । उभय रेत एकत्रें । मिस-
ळती रक्तीं ॥ ३ ॥ अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस । रसद्रव्यें सावकाश ।
वाढों लागे ॥ ४ ॥ वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठिण झालें । पुढें उ-
दक पैसावलें । नाना अवयवीं ॥ ५ ॥ संपूर्ण होतां बाहेर पडे । भूमीस पडतां
मग तें रडे । अवघ्यांचें अवघें घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥ कुंडी वाढे कुबुद्धि
१. मग. २. क्षणभंगुर ३. संपत्ति. ४. जन्ममरणकाळीं. ५. उघडें. ६. शरीर-

३४६ श्रीदासबोध. [ दशक
वाढे । मुळापासूनी अवघें घडें । अवघेंच वाढे आणि मोडे । देखतां देखतां
मोड १ ॥ ७ ॥ पुढें अवघें शरीर । दिवसेंदिवस जाहलें थोर । सुचों लागला विचार ।
कांहीं कांहीं ॥ ८ ॥ फळामध्यें बीज आलें । तेणें न्यायें येथें जाहलें । ऐकतां
देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥ बीजें उदकें अंकुरती । उदक नसतां
उडोन जाती । एके ठायीं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥ दोहींमध्यें असतां
बीज । भिजोन अंकुर सहज । वाढतां वाढतां पुढें रिझें । उदंड जाहे ॥ ११ ॥
जिकडे मुळ्या धांव घेती । तिकडे अग्रें हेलावती । मुळें अग्रें द्विधा होती ।
बीजापासुनी ॥ १२ ॥ मुळ्या चालिल्या पाताळीं । झाडें धांवती अंतराळीं ।
नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥ फळांवडील सुमनें २ ।
सुमनां वडील पानें । पानांवडील अनुसंधानें ३ । काष्ठें अवघीं ॥ १४ ॥
काष्ठांवडील मुळ्या बारीक । मुळ्यांवडील तें उदक । उदक आळोनि
कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥ याची ऐशी आहे प्रचीती । तेव्हां सकळां
वडील जगती । जगतीवरील मूर्ती । आपोनारा४यणाची ॥ १६ ॥ तया-
वडील अग्निदेव । अग्निवडील वायुदेव । वायुदेवावडील स्वभाव । अंतरात्म्या-
चा ॥ १७ ॥ सकळां वडील अंतरात्मा । त्यासि नेणे तो दुरात्मा । दुरात्मा
म्हणिजे दूर आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥ जवळीं असोन चुकलें ।
प्रत्ययास नाहींसें केलें उगेंचि आलें आणि गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥
म्हणोन सकळां वडील देव । त्यासि होतां अनन्यभाव । मग हे प्रकृतीचा
स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥ करी आपुला ब्यासंग । कदापि नव्हे ध्यान-
भंग । बोलणें चालणें व्यंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥ जें वडीलीं निर्माण केलें ।
तें पाहिजे पाहिलें । काय काय वडिलीं केलें । किती पाहावें ॥ २२ ॥ तो
वडील जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष झाला । अल्प चेतनेनें तयाला ।
अल्प भाग्य ॥ २३ ॥ तया नारायणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं ।
मग ते लक्ष्मी तयापासुनी । जाईल कोठें ॥ २४ ॥ नारायण असे विश्वीं ।
त्याची पूजा करीत जावी । या कारणें तोषवावी । कोणी तरी काया ५ ॥ २५ ॥
उपासना शोधून पाहिली । तों ते विश्वपालिती झाली । न कळे लीला
परीक्षिली । न वचे कोणा ॥ २६

पाहे कोण । पाहणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥ उपासना सकळां
ठायीं । अंतरात्मा कोठें नाहीं । या कारणें ठायीं ठायीं । रामें आटोपिलें ॥ २८॥
ऐशी माझी उपासना । आणितां न ये अनुमाना । नेऊनि घाली निरंजना-
पैलीकडे ॥ २९ ॥ देवाकरितां कर्में चालतीं । देवाकरितां उपासक होती ।
देवाकरितां ज्ञानी असती । कितीएक ॥ ३० ॥ नाना शास्त्रें नाना मतें ।
देवचि बोलिला समस्तें । नेमकानेमक व्यस्ताव्यस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥
देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितकें घ्यावें । अधिकारासारखें
बोलावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥ औवाहन विसर्जनें । ऐसेंचि बोलिलें वि-
धानें । पूर्वपक्ष झाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥ वेदांत सिद्धांत घों-
टांत । प्रचीत प्रमाण नेमस्त । पंचीकरण सोडून हित । वाक्यार्थ पाहावा
॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके पिंडोत्पत्तिनिरूपणं
नाम नवम समासः ॥ ९ ॥

१०. सिद्धांत.
श्रीगणेशाय नमः ॥ गगनीं अवघेंच होत जातें । गगनाऐसें तगेना तें ।
निश्चळीं चंचल तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥ आंधार दाटला बळें । वाटे गगन
झालें काळें । रविकिरणें तें पिवळें । सर्वैचि वाटे ॥ २ ॥ उदंड हिंव जेव्हां
पडलें । गमे गगन थंड झालें । उष्णझळेनें वाळलें । ऐसें वाटे ॥ ३ ॥ ऐसें
जें कांहीं वाटलें । तें तें झालें आणि गेलें । आकाशासारखें तगलें । हें तों घ-
डेना ॥ ४ ॥ उत्तम जाणिणेचा जिन्नस । समजोन पाहे सावकाश । निरा-
भास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥ उदक पसरे वायु पसरे । अंतरात्मा
अत्यंतचि पसरे । तत्त्वें तत्व अवघेंच पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥ चळतें
आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें । विवरणेंचि निवडतें । प्राणि-
मात्रांसी ॥ ७ ॥ विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी । झा-
लियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥ जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि
मनाचें होतें उन्मन । तत्वनिरसन अनन्व । विवेकें होतें ॥ ९ ॥ वडिलास
शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्चळ झालें । देवभक्तपण गेलें । तये ठायीं,

१. मायेची उभारणी-संहारणी. २. रीत. ३. शंकावचन. ४. स्वानुभव.

३५८ श्रीदासबोध. [ दशक
॥ १०॥ ठाव म्हणतां पदार्थ नाहीं। पदार्थमात्र मुळींच नाहीं। जैसें तैसें
बोलों कांहीं। कळावया ॥ ११॥ अज्ञानशक्ति निरसली। ज्ञानशक्ति माव-
ळली। वृत्तिशून्य कैसी झाली। स्थिति पहा ॥ १२ ॥ मुख्य शक्तिपात
तो ऐसा। नाहीं चंचळाचा वळसो¹। निवांतीं निवांत कैसा। निर्विकारी
॥ १३॥ चंचळाचा विचार पालटे। तें चंचलचि तेथें आटे। चंचल निश्चळ
बनवटे। हें तों घडेना ॥ १४ ॥ महावाक्याचा विचार। तेथें संन्याशासि
अधिकार। दैवी कृपेचा जो नर। तोहि विवरोन पाहे ॥ १५॥ संन्यासी
म्हणजे षडंगन्यासी²। विचारवंत सर्व संन्यासी। आपली करणी आपणा-
पासीं। निश्चयेंसी ॥ १६ ॥ जगदीश वोळख्यावरी । तेथें कोण अनुमान
करी। आतां असो हें विचारी। विचार जाणती ॥ १७॥ जे जे विचारी स-
मजले। ते ते निःसंग होऊन गेले। देहाभिमानी जे उरले। ते देहाभिमान
लक्षिती ॥ १८ ॥ लक्षीं बैसलें अलक्ष। उडोनि गेला पूर्वपक्ष। हेतूरूपें अं-
तरसाक्ष। तोहि मावळला ॥ १९ ॥ आकाश आणि पाताळ। दोन्ही नामें
अंतराळ। काढितां दृश्याचें पडळ⁵। अखंड⁴ झालें ॥ २०॥ तें तों अखंडचि
आहे। मन उपाधि लक्षून पाहे। उपाधिनिरासें राहे। शब्द कैसा ॥ २१॥
शब्देंपर⁶ कल्पने पैर⁷। मनबुद्धि अगोचर⁸। विचारें पहावा विचार। अंत-
र्यामीं³ ॥ २२ ॥ पहातां पहातां कळों येतें। कळलें तितुकें व्यर्थ जातें। अव-
घड कैसें बोलावें तें। कोण्या प्रकारें ॥ २३ ॥ वाच्यार्थ वाच्यांशीं शोधिला।
अलक्षीं लक्ष्यांश बुडाला। पुढें समजोन बोला। कोणी करी ॥ २४ ॥ शा-
स्त्रास शोधीत गेला। तेणें ज्ञानी साच झाला। विकार सांडून मिळाला।
निर्विकारीं ॥२५॥ दुःस्वप्न उदंड देखिलें। जागें होतां लटिकें झालें। पुनः
जरी तें आठवलें। तरी तें मिथ्या ॥ २६ ॥ प्रारब्धयोगें देह असे। असे
अथवा नासे। विचार अंतरीं बैसे। चलेना ऐसा ॥ २७ ॥ बीज अग्नीनें
भाजलें। त्याचें वाढणेंचि खुंटलें। ज्ञात्यास तैसें झालें। वासनाबीज ॥२८॥
विचारें निश्चळ झाली बुद्धि। बुद्धीपासीं कार्यसिद्धी। पाहतां वडिलांची
बुद्धि। निश्चळीं गेली ॥ २९ ॥ निश्चळास ध्यातां निश्चळ। चंचळास ध्यातां
१. वेष्टन. २. षड्विकारांचा त्याग करणारा. ३. चित्तांत. ४. ब्रह्म. ५. पडदा.
६. शब्दातीत. ७. पलीकडे. ८. अगम्य.

१६ वा. ] वाल्मीकिस्तवन. ३४९
चंचल । भूतांस ध्यातां केवळ । भूत होय ॥ ३० ॥ जो पावला शेवटवरी ।
तयास हें कांहींच न करी । अंतर्निष्ठा बाजिगिरी । तैसी माया ॥ ३१ ॥
मिथ्या ऐसें कळों आलें । विचारोन सदृढ झालें । अवघें भयचि उडालें ।
अकस्मात ॥३२॥ उपासनेचें उत्तीर्ण¹ व्हावें । भक्तें भजन वाढवावें । अंतरीं
विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
पंचदशदशके सिद्धांतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३३७.
दशक सोळावा.
१. वाल्मीकिस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक ।
जयाचेनि हा त्रिलोक । पावन जाहला ॥ १ ॥ भविष्य आणि शतकोटी ।
हें तों नाहीं देखिलें दृष्टी । धांडोळितां सकळ सृष्टी । श्रुत नव्हे ॥२॥ भवि-
ष्याचें एक वचन । कदाचित झालें प्रमाण । तरी आश्चर्य मानिती जन ।
भूमंडळींचे ॥ ३ ॥ नसतां रघुनाथ अवतार । नाहीं पाहिला शास्त्राधार ।
रामकथेचा विस्तार । विस्तारला जेणें ॥ ४ ॥ ऐसा जयाचा वाग्विलास² ।
ऐकोनि संतोषला महेश । मग विभागिलें त्रैलोक्यास । शतकोटि रामायण
॥ ५ ॥ जयाचें कवित्व शंकरें पाहिलें । इतरां न वचे अनुमानलें । राम-
उपासकांस झालें । परम समाधान ॥ ६ ॥ ऋषि होते थोर थोर । बहुतीं
केला कवित्वविचार । परी वाल्मीकासारिखा कवीश्वर । नै भूतो न भवि-
ष्यति³ ॥ ७ ॥ पूर्वी केलीं दुष्ट कर्में । परी पावन झाला रामनामें । नाम
जपतां दृढ नेमें । पुण्यें सीमा सांडिली ॥ ८ ॥ उफराटें नाम म्हणतां वाचे ।
पर्वत फुटले पापाचे । ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते ॥९॥ वाल्मीकें
जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन झालें । शुष्ककाष्ठीं अंकुर फुटले । तपो-
बळें जयाच्या ॥ १० ॥ पूर्वी होता वाल्हा कोळी । जीवघातुक भूमंडळीं ।
तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषीश्वरीं ॥ ११ ॥ उपरति⁴ आणि
१. उतराई. २. भाषाप्रावीण्य. ३. झालों नाहीं व होणारही नाहीं. ४. वैराग्य.

३५०श्रीदासबोध.[ दशक

अनुताप । तेथें कैंचें उरेल पाप । देहांततपें१ पुण्यरूप । दुसरा जन्म जाहला
॥ १२ ॥ अनुतापें आसन घातलें । देहाचें वारुळ जाहलें । तेंचि नाम पुढें
पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥ वारुळास वल्मीक बोलिजे । म्हणोन वा-
ल्मीक नाम साजे । जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसांचें ॥ १४ ॥
जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवीश्वरांमध्यें वरिष्ठ । जयाचें बोलणें स्पष्ट ।
निश्चयाचें ॥ १५॥ जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तीचें भूषण । ज्याची
धारणा असाधारण । साधकांस दृढ करी ॥ १६ ॥ धन्य वाल्मीक ऋषी-
श्वर । समर्थ जो कवीश्वर । तयासि माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ १७॥
वाल्मीक ऋषि बोलिला नसता । तरी आम्हांस कैंची रामकथा । म्हणो-
निया समर्था । काय म्हणोनि वर्णावें ॥ १८ ॥ रघुनाथकीर्ति प्रगट केली ।
तेणें तयाची महिमा वाढली । भक्तमंडळी सुखी जाहली । श्रवणमात्रें
॥ १९ ॥ आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमध्यें बुडाला । भूमं-
डळीं उद्धरिला । बहुत लोक ॥ २० ॥ रघुनाथभक्त थोर थोर । महिमा
जयांचा अपार । त्या समस्तांचा किंकर२ । रामदास म्हणे ॥ २१ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षोडशदशके वाल्मीकिस्तवननिरूपणं नाम
प्रथमः समासः ॥ १ ॥


२. सूर्यस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा सूर्यवंश । सकळ वंशांमध्यें विशेष ।
मार्तंड-मंडळाचा प्रकाश । फांकला भूमंडळीं ॥ १ ॥ सोमीं४ अंगीं असे लां-
छन । एकापक्षीं ५ होय क्षीण । रविकिरण फांकतां आपण । कलाहीन होय
॥ २ ॥ या कारणें सूर्यापुढें । दुसरी साम्यता न घडे । ज्याच्या प्रकाशें
उजेडे । प्राणिमात्रांसीं ॥३॥ नाना धर्म नाना कर्मे । उत्तम मध्यम अधमें ।
सुगमें दुर्गमें नित्यनेमें । सृष्टीमध्यें चालती ॥ ४ ॥ वेदशास्त्रे आणि पुराणें ।
मंत्र यंत्र नाना साधनें । संध्या स्नान पूजाविधानें । सूर्याविणें बापुडीं ॥५॥
नाना योग नाना मतें । पाहों जातां असंख्यातें । जाती आपुलाल्या पंथें ।
सूर्य उदय झालिया ॥ ६ ॥ प्रापंचिक अथवा पारमार्थिक । कार्य करणें


• १. देहपात करणाऱ्या तपानें. २. सेवक. ३. सूर्य. ४. चंद्रावर. ५. कृष्णपक्षीं.