सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

१४ वा. ] हरिकथा. ३१९
श्रज्ञ तो । सर्वां ठायीं ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश
दशके कीर्तनलक्षणनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥

५. हरिकथा.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रश्न ।
सावध होऊन विचक्षण । परिसोत आतां ॥ १ ॥ हरिकथा कैसी करावी ।
रंगें कैसी भरावी । जेणें पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥ सोनें आणि
परिमळें । इक्षुदंडा लागती फळें । गौळ्यै माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता
॥ ३ ॥ तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । व्युत्पन्न
आणि वादरहित । तरी हेही अपूर्वता ॥ ४ ॥ रागज्ञानी तालज्ञानी । सक-
ळ कळा ब्रह्मज्ञानी । निरभिमानें वर्तें जनीं । तरी हेही अपूर्वता ॥ ५ ॥
मत्सर नाहीं जयासी । तो अत्यंत प्रिय सज्जनासी । चतुरंगे जाणे मानसीं ।
अंतर्निष्ठ ॥ ६ ॥ जयंत्यादिकें नाना पर्वैं । तीर्थे क्षेत्रे जीं अपूर्वे । जेथें वसि-
जे देवाधिदेवें । सामर्थ्यरूपें ॥ ७ ॥ तया तीर्थांतें न मानिती । शब्दज्ञानें
मिथ्या म्हणती । तयां पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥ निर्गुण नेलें
संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें । दोहींकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥
पुढें असतां सगुण मूर्ती । निर्गुण कथा जे करिती । प्रतिपादून उच्छेदिती ।
तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥ ऐसी न कीजे हरिकथा । अंतर पडे उभयपंथा ।
परिक्षा लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥ सगुणमूर्तीपुढें भावें । करुणा-
कीर्तन करावें । नाना ध्यानें वर्णावें । प्रताप कीर्तीतें ॥ १२ ॥ ऐसें गातां
स्वभावें । रसाळ कथा वोढवे । सर्वांतरीं हेह्लावे । प्रेमसुख ॥ १३ ॥ कथा
रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण । न बोलावे दोष गुण । पुढिलांचे
कदा ॥ १४ ॥ देवाचें वर्णावें वैभव । नाना प्रकारें महत्व । सगुणीं ठेवू-
निया भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥ लाज सांडून जनांची । आस्था
सांडून धनाची । नित्य नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥ नग्न
होऊनि राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणीं । करतालिकों नृत्यें वाणी ।
१. सुवासिक २. उंसास. ३. गोडी. ४. विद्वान् ५. सर्व अंगें. ६. उचंबळून
येतें. ७. न आणावें. ८. दुसऱ्यांचे. ९. टाळ्या. १०. नाचणें.

३२० श्रीदासबोध. [ दशक
नामघोषें गर्जावीं ॥ १७ ॥ एकाची कीर्ति एकापुढें । वर्णितां साहित्यें न
पडे । म्हणोनिया पवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥ मूर्ति नसतां सगुण । श्र-
वणीं बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ॥ १९ ॥ नाहीं
मूर्ति नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन । तरी करावें कीर्तन ।
प्रस्ताविक वैराग्यें ॥ २० ॥ शृंगारादि नवरसिक । त्यामध्यें सांडावें एक ।
स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णूंच नये ॥ २१ ॥ लावण्य स्त्रियांचें वर्णितां ।
विकार बाधिजे तत्वतां । धारिष्टापासोन श्रोता । चले तात्काळ ॥ २२ ॥
म्हणोनि तें त्यागावें । जें बाधक साधकां स्वभावें । घेतां अंतरीं ठसावे ।
ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥ लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार झालें मन ।
कैंचें आठवेल भजन । ईश्वराचें ॥ २४ ॥ स्त्री वर्णितां सुखावला । लाव-
ण्याचे भरीं भरला । तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासूनी ॥ २५ ॥
हरिकथेसि भावबळें । गेला रंग तो तुंबळे । निमिष एक जरी आकळे ।
ध्यानीं परमात्मा ॥ २६ ॥ ध्यानीं गुंतलें मन । कैंचें आठवेल जन । निः-
शंक निर्लज्ज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥ रागज्ञान तालज्ञान ।
स्वरज्ञानेंसि व्युत्पन्न । अर्थान्वयाचें कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥ छप्पन्न
भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा । परी तो भक्तिमार्ग वेगळा ।
भक्तचि जाणती ॥ २९ ॥ भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणती आन ।
कळावंताचें मन । कळाकार झालें ॥ ३० ॥ श्रीहरीवांचून जे कळा । ते
जाणवी अवकळा । देव सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥ सर्पी
वेढिलें चंदनासी । निधानां आड विवेंसी । नाना कळा देवासी । आड
तैशा ॥ ३२ ॥ सोडून देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावें मग्न । हेंच प्रत्यक्ष
विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥ एक मन तें गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा
श्रीहरी । बळेंच धरूनियां चोरीं । शुश्रूषा घेतली ॥ ३४ ॥ करितां देवाचें
दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरूनियां मन । स्वरामागें लाविलें
॥ ३५ ॥ भेटों जातां राजद्वारीं । मध्येंच धरिला बेगारी । कळावंतां तैशी
परी । कळेनें केली ॥ ३६॥ मन ठेवून ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी ।
१. भाषण लोकांस पटत नाहीं. २. वर्णन. ३. पश्चात्तापयुक्त. ४. कामेच्छेनें
व्याप्त. ५. अवदशा. ६. भूमींतील ठेव्यास. ७. पिशाच्च. ८. सेवा.

१४ वा. ] चातुर्यलक्षणं. ३२१
तोचि एक संसारीं । धन्य जाणावा ॥ ३७ ॥ जयास हरिकथेची गोडी ।
उठे नित्य नवी आवडी । तयास झाली जोडी । सर्वोत्तमाची ॥३८॥ हरि-
कथा मांडली जेथें । सर्व सांडून धांवे तेथें । आलस्य निद्रा दवडून स्वार्थे ।
हरिभक्तीसि सादर ॥ ३९ ॥ हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगिकारी ।
साह्यभूत सर्वांपरी । साक्षेपें होय ॥ ४० ॥ तया नांव हरिदास । जयास
नामीं विश्वास । येथूनि हा समास । संपूर्ण झाला ॥ ४१ ॥ इति श्री-
दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके हरिकथानिरूपणं नाम पंचमः
समासः ॥ ५ ॥
६. चातुर्यलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले
उपाय । कांहीं तरी धरावी सोय । आगंतुक गुणाची ॥ १ ॥ काळें माणूस
गोरें होयना । वोढाळास यत्न चालेना । मुक्यास वाचा फुटेना । हा सहज
गुण ॥२॥ आंधळें डोळस होईना । बधिर तें ऐकेना । पांगुळ पाय घेईना ।
कांहीं केल्या ॥३॥ कुरूपतेचीं लक्षणें । किती म्हणोन सांगणें । रूप लावण्य
या कारणें । पालटेना ॥ ४ ॥ अवगुण सोडिलीं जाती । उत्तम गुण अभ्यासि-
तां येती । कुविद्या सांडूनि अभ्यासिती । शाहणे विद्या ॥ ५ ॥ मूर्खपण
सांडितां जातें । शाहणपण शिकतां येतें । कारभार करितां उमजतें । सकळ
कांहीं ॥ ६ ॥ ऐसी प्रचीति येते मना । तरी स्वहित कां कराना । सन्मागें
चालतां जाणा । सज्जना माने ॥ ७ ॥ मान्यता आवडे जीवीं । तरी उपेक्षा
कां करावी । चातुर्यैविण उंच पदवी । कदापि नाहीं ॥ ८ ॥ अंतर्कळा
शृंगारावी । नाना परी उमजवावी । संपदा मेळवून भोगावी । साव-
काश ॥ ९ ॥ देह नेटकें शृंगारिलें । परी तें चातुर्यैविण नासलें । गुणें-
विण साजिरें केलें । बाष्कळ जैसें ॥ १० ॥ यत्न करीना ना शिकेना ।
शरीर तेंहि कष्टवीना । उत्तम गुण घेईना । सदा कोपी ॥ ११ ॥ आपण
दुसऱ्यास करावें । तेणें सर्वैचि उसणें घ्यावें । जना कष्टवितां कष्टावें ।
लागेल बहू ॥ १२ ॥ न्यायें वर्तेल तो शाहणा । अन्यायी तो दैन्यवाणा ।
नाना चातुर्यांच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जें बहुतांस मानलें । तें
१. श्रम करून. २. अंतःकरण.

३२२ श्रीदासबोध. [ दशक

बहुतीं मान्य केलें । येर तें व्यर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥ लोकीं आप-
णास बोलावें । किंवा अवघेंचि कोसळावें । आपणासि समाधान फावे ।
ऐसें करावें ॥ १५॥ समाधानें समाधान वाढे । मैत्रीनें मैत्री जडे । मोडितां
क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥ अहो कांहो अरे कांरे । जनीं ऐकिजे कीं रे ।
कळत असतांच कां रे । निकामीपण ॥ १७ ॥ चातुर्यें शृंगारे अंतर । वस्त्रें
शृंगारे शरीर । दोहोंमध्यें कोण सार । बरें पाहा ॥ १८ ॥ बाह्यात्कारें शृंगा-
रिलें । तेणें लोकांच्या हातास काय आलें । चातुर्यें बहुतां संरक्षिलें । नाना
परी ॥ १९ ॥ बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । समस्तांस
बरें म्हणावें । ऐसें वाटे ॥ २० ॥ तनें मनें झिजावें । तेणें भलें म्हणोन
न्यावें । उगेंचि कल्पितां सिणावें । वाउगें जनीं ॥ २१ ॥ लौकिकीं कार्यभाग
भावडे । तो कार्यभाग जेथें घडे । लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥२२॥
म्हणोन दुसऱ्यास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें । दुसऱ्यास कष्ट-
वितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥ हें तों प्रगटचि आहे । पाहिल्याविण
कामा न ये । समजणें हाचि उपाय । सर्वत्रांसी ॥ २४ ॥ समजले आणि
वर्तले । तेचि भाग्यपुरुष झाले । या वेगळे उरले । ते करंटे पुरुष ॥ २५ ॥
जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव । समजला तरि
उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥ आळसें कार्यभाग नासतो । साक्षेपें होत
होत होतो । दिसते गोष्टी कळेना तो । शाहणा कैसा ॥२७॥ मैत्री करितां
होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्यु । बोलिलें हें सत्य कीं असत्य । ओळखावें
॥ २८ ॥ आपणास शाहणें करूं नेणे । आपलें हित आपण नेणे । जनीं
मैत्रिकी राखो नेणे । वैर करी ॥ २९ ॥ ऐसे प्रकारिचें जन । त्यास म्हणावें
अज्ञान । तयापाशीं समाधान । कोण पावे ॥३०॥ आपण एकाकी एकला ।
सृष्टींत मांडत चालिला । बहुतांमध्ये एकल्याला । यश कैचें ॥ ३१ ॥ बहु-
तांचे मुखीं उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें । उत्तम गुणीं विवरावें । प्राणी-
मात्रांसी ॥ ३२ ॥ शहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टीमध्यें
भगवद्भजन । वाढवावें ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश-
दशके चातुर्यलक्षणनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥

१४ वा.] युगधर्म. ३२३
७. युगधर्म.
श्रीगणेशाय नमः ॥ नाना वेष नाना आश्रम १ । सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम ।
जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥ १ ॥ देव ऋषि मुनि योगी । नाना
तापसी वीतरागी । पितृ आदिकरूनि विभागी । अतीत अभ्यागत ॥ २॥
गृहस्थाश्रमीं निर्माण झाले । आपुला आश्रम टाकून गेले । परंतु गृहस्था-
गृहीं हिंडों लागले । कीर्तिरूपें ॥ ३ ॥ या कारणें गृहस्थाश्रम । सकळांमध्यें
उत्तमोत्तम । परंतु पाहिजे स्वधर्म । आणि भूतदया ॥ ४ ॥ जेथें षट्कर्में २
चालती । विधियुक्त क्रिया आचरती । वाङ्मधुर्यै बोलती । प्राणिमात्रांसी
॥ ५ ॥ सर्व प्रकारें नेमका । शास्त्रोक्त करणें कांहीं एक । त्याहीमध्यें अलौ-
किक । तो हा भक्तिमार्ग ॥ ६ ॥ पुरश्चरणीं काया क्लेशी । दृढव्रती परम
सायासी । जगदीशावेगळें जयासी । थोर नाहीं ॥ ७ ॥ काया वाचा जीवें
प्राणें । कष्टे भगवंताकारणें । मनें घेतलें धरणें । भजनमार्गी ॥ ८ ॥ ऐसा
भगवंताचा भक्त । विशेष अंतरीं विरक्त । संसार सोडून झाला मुक्त । भ-
गवंताकारणें ॥ ९ ॥ अंतरापासून वैराग्य । तेंचि जाणावें महद्भाग । लोलं-
गते ३ एवढें अभाग्य । आणिक नाहीं ॥ १० ॥ राजे राज्य सोडून गेले । भ-
गवंताकारणें हिंडों लागले । कीर्तिरूपें पावन झाले । भूमंडळीं ॥ ११ ॥
ऐसा जो योगीश्वर । अंतरीं प्रत्ययाचा विचार । उकलू जाणे अंतर । प्राणि-
मात्रांचें ॥ १२ ॥ ऐसी वृत्ति उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान । दर्श-
नमात्रें समाधान । पावती लोक ॥ १३ ॥ बहुतांसि करी उपाय । तो ज-
नांच्या वाट्या न ये । अखंड जयाचें हृदय । भगवद्रूप ॥ १४ ॥ जनांस
दिसे हा दुश्चित । परी तों असे सावचित । अखंड जयाचें चित्त । परमेश्वरीं
॥ १५ ॥ उपासनामूर्तिध्यानीं । अथवा आत्मानुसंधानीं । नाहीं तरी श्र-
वणमननीं । निरंतर ॥ १६ ॥ पूर्वजांच्या पुण्यकोटी । संग्रहीं असिल्या
गांठी । तरीच ऐसियाची भेटी । होय जनांसी ॥ १७ ॥ प्रचीतीविण जें
ज्ञान । तें अवघेंच अनुमान । तेथें कैंचें परत्र ४ साधन । प्राणियांसी ॥ १८ ॥
१. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम. २. यजन,
याजन, दान, प्रतिग्रह, अध्ययन आणि अध्यापन हीं ब्राह्मणांचीं सहा कर्तव्यें.
३. भोगांची हांव असणें यासारखें. ४. परलोक ची प्राप्ति.

३२४ श्रीदासबोध. [ दशक
या कारणें मुख्य प्रत्यय । प्रचीतीविण कामा नये । उपायासारिखा अपाय ।
शहाणे जाणती ॥ १९ ॥ वेडे संसार सांडून गेले । तरी ते कष्ट कष्टोंच मेले ।
दोहींकडे अंतरले । इहलोक परत्रीं १ ॥ २० ॥ रागेंरागें निघोन गेला । तरी
तो भांडभांडोंच मेला । बहुत लोक कष्टी केला । आपणहि कष्टी ॥ २१ ॥
निघोन गेला परी अज्ञान । त्याचे संगतीस लागले जन । गुरुशिष्य दोघे
समान । अज्ञानरूपें ॥ २२ ॥ आशाबद्ध अनाचारी । निघोन गेला देशां-
तरीं । तरी तो अनाचारचि करी । जनांमध्यें ॥ २३ ॥ गृहीं पोटेंविण क-
ष्टी । कष्टी होऊन निघोन जाती । त्यास ठायीं ठायीं मारिती । चोरीं भरतां
॥ २४ ॥ संसार मिथ्या ऐसा कळला । ज्ञान समजोन निघोन गेला । तेणें
जन पावन केला । आपणा ऐसा ॥ २५ ॥ एके संगतीनें तरती । एके संग-
तीनें बुडती । या कारणें सत्संगती । बरी पाहावी ॥ २६ ॥ जेथें नाहीं वि-
वेकपरीक्षा । तेथें कैंची असेल दीक्षा । घरोघरीं मागतां भिक्षा । कोठेंहि
मिळेना ॥ २७ ॥ जो दुसऱ्याचें अंतर जाणे । देश काळ प्रसंग जाणे ।
तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ २८ ॥ नीच प्राणी गुरुत्व पावला ।
तेथें आचारचि बुडाला । वेद शास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ॥ २९ ॥ ब्रह्म-
ज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु । वर्णानां ब्राह्मणो गुरुः २ ।
ऐसें हें वचन ॥ ३० ॥ ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ।
गुरुत्व सांडून झाले । शिष्य शिष्याचे ॥ ३१ ॥ कित्येक दावल३मलकास
जाती । कित्येक पिरासी भजती । कित्येक तुरुंक ४ होती । आपुले इच्छेनें ॥
३२ ॥ ऐसा कलियुगीं आचार । कोठें राहिला विचार । पुढें पुढें वर्णसंकर ।
होणार आहे ॥ ३३ ॥ गुरुत्व आलें नीच याती । कांहीं एक वाढली महंती ।
शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥ ३४ ॥ हें ब्राह्मणास कळेना । त्याची
वृत्ति वळेना । मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५ ॥ राज्य नेलें
म्लेंच्छक्षेत्रीं ५ । गुरुत्व नेलें कुपात्रीं । आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहींच नाहीं
॥ ३६ ॥ ब्राह्मणास ग्रामण्यानें ६ बुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिरविलें । त्याच
विष्णूनें शापिलें । परशुरामा ॥ ३७ ॥ आम्हीहि तेचि ब्राह्मण । दुःखें
१. या लोकीं आणि परलोकीं. २. चारी वर्णांमध्यें ब्राह्मण श्रेष्ठ. ३. एक यव-
नांचा देव आहे त्यास. ४. म्लेंच्छ ५. म्लेंच्छ राजपुरुषांनीं. ६. घरकलहामुळे.

बोलिलों हें वचन । वडील गेले ग्रामणी करून । आह्मां भोंवते ॥ ३८ ॥
आतांच्या ब्राह्मणीं काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें । तुम्हां बहुतांचे
प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥ बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्म-
णांचें अदृष्ट¹ जाणावें । प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्षमा कीजे ॥ ४० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दशदशके युगधर्मनिरूपणं नाम सप्तमः
समासः ॥ ७ ॥
८. अखंड ध्यान.
श्रीगणेशाय नमः ॥ बरें ऐसा प्रसंग झाला । झाला तो होऊन गेला ।
आतां ब्राह्मणीं आपणाला । शहाणें करावें ॥१॥ देव पूजावा विमळहस्तीं ।
तेणें भाग्य पाविजे समस्तीं । मूर्ख अभक्त अव्यवस्थीं । दरिद्र भोगिजे ॥२॥
आधीं देवास ओळखावें । मग अनन्यभावें भजावें । अखंड ध्यान धरावें ।
सर्वोत्तमाचें ॥ ३ ॥ सर्वांमध्यें जो उत्तम । तया नांव सर्वोत्तम । आत्मा-
नात्मविवेकवर्म । ठायीं पाडावें ॥ ४ ॥ जाणजाणों देह रक्षी । आत्मा द्रष्टा
अंतरसाक्षी । पदार्थमात्रास परीक्षौ । जाणपणें ॥ ५ ॥ तो सकळ देहांमध्यें
वर्ततो । इंद्रियेंग्राम² चेष्टवितो । प्रचीतीनें प्रत्यय येतो । प्राणिमात्रांसी ॥६॥
प्राणिमात्रीं³ जगदंतरें । म्हणोनि राखावीं अंतरें । दाता भोक्ता परस्परें । स-
कळ कांहीं ॥ ७ ॥ देव वर्ततो जगदंतरीं । तोचि आपुले अंतरीं । त्रैलोक्यांचे
प्राणिमात्रीं । बरें पाहा ॥ ८ ॥ मुळीं पाहणार तो एकला । सकळां ठायीं
विभागला । देहप्रकृतीनें झाला । भिन्न भिन्न ॥ ९॥ भिन्न भासे देहाकारें ।
प्रस्तुत एकचि अंतरें । बोलणें चालणें निर्धारें । त्यासीच घडे ॥ १० ॥ आ-
पुले पारखी सकळ लोक । पक्षी श्वापद पश्वादिक । किडा मुंगी देहधारक ।
सकळ प्राणी ॥ ११ ॥ खेचरें⁴ भूचर वनचर । नाना प्रकारांचे जळचर ।
चारी खाणी विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १२ ॥ समस्त जाणिवेनें
वर्तती । रोकडी पाहावी प्रचीती । त्याची आपुली संगती । अखंड आहे
॥ १३ ॥ जगदंतरें वोळला धणी । किती एकवटील प्राणी । परी तो ओ-
१. दैव. २. सर्व इंद्रियें. ३. परमेश्वर जगदंतरीं आहे म्हणून प्राणिमात्रानें एक-
मकांचीं मनें राखावीं असा भाव. ४. आकाशांत वावरणारे.

३२६ श्रीदासबोध. [ दशक
ळखावयाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥ हें आपणाकडेच येतें । राजी
राखावें समस्तांतें । देहासि बरें करावें तें । आत्मयासि पावे ॥ १५ ॥ दुर्जन
प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव । रागास आला जरी राव ।
तरी तंडों नये ॥ १६ ॥ प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें । वि-
वेकें सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥ आत्मत्त्वीं दिसतो भेद । हा
अवघाचि देहसंबंध । एका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥ गरल
आणि अमृत झालें । परी आपण नाहीं गेलें । साक्षित्त्वें आत्मयासि पाहिलें ।
पाहिजे तैसें ॥ १९ ॥ अंतर्निष्ठ जो पुरुष । तो अंतर्निष्ठेनें विशेष । जगा-
मध्यें जो जगदीश । तो तयास ओळखे ॥ २० ॥ नयनेंचि पाहावे नयन ।
मनें शोधावें मन । तैसाचि हा भगवान । सकळां घटीं ॥ २१ ॥ तेणेंविण
कार्यभाग अडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे । प्राणी विवेकें पवाडे । तेणेंचि
योगें ॥ २२ ॥ जागृतीस व्यापार घडतो । संबंध तयासीच पडतो । स्वप्ना-
मध्यें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥ अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड
देवाचें स्मरण । याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥ सहज सां-
डूनि सायास । हाचि कोणी एक दोष । आत्मा सांडून अनात्म्यांस । ध्यानीं
धरिती ॥ २५ ॥ परी तें धरितांहि धरवेना । ध्यानीं येती व्यक्ति नाना ।
उगेचि कष्टविती मना । कासावीस करूनि ॥ २६ ॥ मूर्तिध्यान करितां
सायासें । तेथें एकाचें एक दिसे । भासों नये तेंच भासे । विलक्षण ॥ २७ ॥
ध्यान देवाचें धरावें । किंवा देवालयाचें करावें । हेंचि बरवें विवरावें ।
आपुले ठायीं ॥ २८ ॥ देह देऊळ आत्मा देव । कोठें धरूं पाहतां भाव ।
देव ओळखून जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥ अंतर्निष्ठा ध्यान ऐसें ।
दंडेकध्यान अनारिसें । प्रयत्नेंविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥
अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां संवेंचि मोडे । उगेचि कष्टती बापुडे ।
स्थूळध्यानें ॥ ३१ ॥ देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती ।
भोगणें लागे विपत्ती । देहयोगें ॥ ३२ ॥ ऐसें मनीं आठवतें । विचारितां
भलतेंच होतें । दिसों नये तेंच दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥ दिसतें तें
सांगतां न ये । बळें भावार्थ धरितां न ये । साधक कासाविस होय । अंत-
१. आत्मा नव्हे त्यास; अर्थात् स्वरूपाज्ञानावांचून. २. लोकरितीचें ध्यान.

१४ वा.] शाश्वत ब्रह्म. ३२७
याँमीं ॥ ३४ ॥ सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्षी आपुलें मन । मना-
मध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥ फुटकें मन एकवटिलें । तेणें
तुटकें ध्यान केलें । तेथें कोण सार्थक झालें । पाहाना कां ॥ ३६ ॥ अखंड
ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित । हाचि अर्थ सावचित्त ।
बरा पाहावा ॥ ३७ ॥ ध्यान धरितें कोण । ध्यानीं आठवितें तें कोण ।
दोनीमध्यें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥ अनन्य सहजाच आहे ।
साधक शोधून पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥ ऐसीं
हीं प्रत्ययाचीं कार्में । प्रत्ययेंविण बोलिजे भ्रमें । लोकदंडकसंभ्रमें । चालती
प्राणी ॥ ४० ॥ दंडकध्यानाचें लक्षण । धरूनि बैसले अवलक्षण । प्रमाण
आणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥ मिथ्या समाचार उठाविती ।
वाडग्याच बोंबा घालिती । मनास आणितां अंतीं । अवघेंच मिथ्या
॥ ४२ ॥ कोणी एक ध्यानस्थ बैसला । कोणी एक शिकवी त्याला ।
मुकुट काढून माळा घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥ मनाच्या येथें काय
दुष्काळ । जे आंखूड कल्पिली माळ । सांगते ऐकते केवळ । मूर्ख जा-
णावे ॥ ४४ ॥ प्रत्यक्ष कष्ट करावे न लागती । दोरें फुलें गुंफावीं न
लागती । कल्पनेची माळ थिटी करिती । काय निमित्त ॥ ४५ ॥ बुद्धीवि-
ण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ । तया मूर्खासि खळखळ । कोणें
करावी ॥ ४६ ॥ जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडैक
चालिला । सातां पांचांचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥ प्रत्ययेंविण
साभिमान । रोगी मारिले झांकून । तेथें अवधेंच अनुमान । ज्ञान कैंचें
॥ ४८ ॥ सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा । माया पूर्वपक्ष
खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्दश-
दशके अखंडध्याननिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. शाश्वत ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ पिंडांचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्म-
विवेक । पिंड अनात्मा आत्मा एक । सकळ कर्ता ॥ १॥ आत्म्यास अन-
१. लोकरीतीच्या मार्गानें. २. लोकाचाराचें ध्यान. ३. परिपाठ.

३२८ श्रीदासबोध. [ दशक
न्यतां बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली । आतां पाहिजे समजली ।
ब्रह्मांडरचना ॥ २ ॥ आत्मानात्मविवेक पिंडीं । सारासारविचार ब्रह्मांडीं ।
विवरतां विवरतां हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥ पिंड कार्य ब्रह्मांड
कारण । याचें करावें विवरण । हेंचि पुढें निरूपण । बोलिलें असे
॥ ४ ॥ असार म्हणजे नाशवंत । सार म्हणजे शाश्वत । जयास होईल
कल्पांतें । तें सार नव्हे ॥ ५ ॥ पृथ्वी जळापासूनि झाली । पुढें ते जळीं
मिळाली । जळाची उत्पत्ति वाढली । तेजापासुनी ॥ ६ ॥ तेज झालें वायू-
पासुनी । वायु झडपी तयालागुनी । तेज जाऊन दाटणी । वायूचीच
जाहली ॥ ७ ॥ तें जळ तेथें शोषिलें । महातेजें आटोनि गेलें । पुढें तेजचि
उरलें । सावकाश ॥ ८ ॥ वायु गगनापासुनि झाला । मागुता तेथेंचि
विराला । ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥ गुणमाया मू-
ळमाया । परब्रह्मीं पावती लया । तें परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे ॥१०॥
सर्व उपाधींचा शेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट । निर्गुण ब्रह्म घनदाट । सक-
ळां ठायीं ॥ ११ ॥ उदंड कल्पांत जाहला । तरी नाश नाहीं त्याला । माया-
त्यागें शाश्वताला । वोळखावें ॥ १२ ॥ देव अंतरात्मा सगुण । सगुणें पा-
विजे निर्गुण । सगुणज्ञानें निर्गुण । होत असे ॥ १३ ॥ कल्पनेतीत जें
निर्मळ । तेथें नाहीं मायामळ । मिथ्यात्वें दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥
जें होतें आणि सर्वैचि जातें । तें तें प्रत्ययास येतें । जेथें होणें जाणें नाहीं
तें । विवेकें ओळखावें ॥ १५ ॥ एक ज्ञान एक अज्ञान । एक जाणावें विप-
रीत ज्ञान । हे त्रिपुटी होय क्षीण । तेंचि ज्ञान ॥ १६ ॥ वेदांत सिद्धांत
धादांत । तयाची पाहावी प्रचीत । निर्विकारी सदोदित । जेथें तेथें ॥ १७॥
तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोन अनन्य राहावें । मुख्य आत्मनिवेदन जा-
णावें । याचें नांव ॥ १८ ॥ दृष्टीस दिसतें तें दृश्य । मनासि भासतें तो
भास । दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥ १९ ॥ पाहों जातां दुरि-
च्या दुरी । परब्रह्म सबाह्य अंतरीं । अंतचि नाहीं अनंत सैरी । कोणासी
द्यावी ॥ २० ॥ चंचल तें स्थिरावेना । निश्चळ तें कदापि चलेना । आभाळ
येतें जातें गगना । चळण नाहीं ॥ २१ ॥ जें विकारें वाढे मोडे । तेथें शा-
१. अभिन्नता; त्याहून भिन्न कांहींच नाहीं अशी स्थिति. २. नाश. ३. बरोबरी.

१३ वा. ] माया. ३२९
श्वतता कैंची घडे । कल्पांत होतांचि बिघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥ जे
अंतरींच भ्रमले । मायासंभ्रमें संभ्रमले । तयांस हैं कैसें उकले । अव्हांटें १
चक्र ॥ २३ ॥ भिडेनें व्यवहार निवडेना । भिडेनें सिद्धांत कळेना । भिडेनें
देव आकळेना । अंतर्यामीं ॥ २४ ॥ वैद्याची प्रतीत येईना । आणि भी-
डही उल्लंघेना । तरी रोगी वांचेना । ऐसें जाणावें ॥ २५ जेणें राजा वोळ-
खिला । तो राजा म्हणेना भलत्याला । जेणें देव वोळखिला । तो देवरूपी
॥ २६ ॥ जयास मायिकांची २ भीड । तें काय बोलेल द्वाड । विचार पाहतां
उघड । सकळ कांहीं ॥ २७ ॥ भीड मायेयेलीकडे । परब्रह्म तें पैलीकडे ।
पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥ २८ ॥ लटिक्याची भीड धरणें । अभ्रें
भलतेंच करणें । ऐशीं नव्हेत कीं लक्षणें । विवेकाचीं

३३० श्रीदासबोध. [ दशक

तिचें नाम जन्मसावित्री । कुबेर हिंडे घरोघरीं । तैसी माया ॥ ९ ॥
दशावतारांतील कृष्णा । उपजे जीर्णवस्त्राची तृष्णा । कां नदी नामें पयो-
ष्णा । तैसी माया ॥ १० ॥ बहुरूप्यांतील रामराव । ग्रामस्थांपुढें दाखवी
हावभाव । कां महाराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥ देव्हारीं
असे अन्नपूर्णा । आणि गृहीं अन्नचि मिळेना । नामें सरस्वती शिकेना । सु-
भाषित ॥ १२ ॥ सुंण्यासि व्याघ्र नाम ठेविलें । पुत्रासि इंद्र नामें पाचारिलें ।
कुरूप परी आळविलें । सुंदरा ऐसें ॥ १३ ॥ मूर्ख नामें सकळकळा । रा-
सभी नामें कोकिळा । नातरी डोळसाचा डोळा । फुटका जैसा ॥ १४ ॥
मातंगीचें नाम तुळसी । चर्मिकेचें नाम काशी । बोलती अतिशूद्रीणिसी ।
भागीरथी ऐसें ॥ १५ ॥ साउली आणि अंधकार । एक होतां तेथींचा वि-
चार । उगाच दिसे भासमात्र । तैसी माया ॥ १६ ॥ श्रवणें बोटें संधीं क-
रतळ । रविरश्मीं दिसती इंगळ । रम्य आरक्त रंगकल्लोळ । तैसी माया
॥ १७ ॥ भगवें वस्त्र देखतां मनाला । वाटे अग्निच लागला । विवंचितां
प्रत्यय आला । तैसी माया ॥ १८ ॥ जळीं चरणकरांगुलें । आखूड लांब
किरकोळें । विपरीत काणे दिसती जळें । तैसी माया ॥ १९ ॥ भोवंडीनें
पृथ्वी कलथली । कामिणीनें पिवळी झाली । सन्निपातें अवस्था अनुभविली ।
तैसी माया ॥ २० ॥ कोणी एक पदार्थविकार । उगाच दिसे भासमात्र ।
अन्याचा अन्य प्रकार । तैसी माया ॥ २१॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चतुर्दशदशके मायानिरूपणं नाम दशमः समासः ॥१०॥ ओवी ४०६.


दशक पंधरावा.

१. चातुर्य.

श्रीगणेशाय नमः ॥ अस्थिमांसांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें ।
नानाविंकारीं विकारीं । प्रवीण होईजे ॥ १ ॥ घनवट पोंचट स्वभावें । वि-


तळटीपा (Footnotes):
१. कुत्र्यास. २. गाढवी. ३. चांडाळणीचें. ४. चांभारणींचें. ५. कान. ६.
सूर्यकिरणांतून पाहतां. ७. निखाऱ्यासारखे लाल. ८. तरंग. ९. काविळीनें.
१०. कामक्रोधादि मनोविकारांनीं. ११. वृद्धिक्षयादि देहविकारांनीं.

वरोन जाणिजे जीवें । व्हावें न व्हावें आघवें । जीव जाणे ॥ २ ॥ एकीं
मागमागोन घेणें । एकां न मागतांच देणें । प्रचीतीनें सुलक्षणें । वोळखावीं
॥ ३ ॥ जीव जीवांत घालावा । आत्मा आत्म्यांत मिसळावा । राहाराहोन
शोध घ्यावा । परांतराचा ॥ ४ ॥ जाणीव नेणिवेस आलें । ढिलेपणें हेवांड
झालें । नेमस्तपणें शोभलें । दृष्टीपुढें ॥ ५ ॥ तैसेंचि हें मनासि मन । वि-
वेकें जावें मिळोन । ढिलेपणें अनुमान । होत आहे ॥ ६ ॥ अनुमानें अनु-
मान वाढतो । भिडेनें कार्यभाग नासतो । याकारणें प्रत्यय तो । आधीं पा-
हावा ॥७॥ दुसऱ्याचे जीर्वींचें कळेना । परांतर तें जाणवेना । वश्य होती
लोक नाना । कोणत्या प्रकारें ॥ ८ ॥ अक्ल सांडून पैरती । लोक वशीकरणें
करिती । अपूर्णपणें हळू पडती । ठायीं ठायीं ॥ ९ ॥ जगदीश आहे जगदं-
तरीं । चेटकें करावी कोणावरी । जो कोणी विवेकें विवरी । तोचि श्रेष्ठ
॥ १० ॥ श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ । कृत्रिम करी तो कनिष्ठ । कर्मानुसार
प्राणी नष्ट । अथवा भले ॥ ११ ॥ राजे जाती राजपंथें । चोर जाती चोर-
पंथें । वेडा ठके अल्पस्वार्थे । मूर्खपणें ॥ १२ ॥ मूर्खास वाटे मी शाहणा ।
परी तो वेडा दैन्यवाणा । नाना चातुर्यांच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जो
जगदंतरीं मिळाला । तो जंगदंतराचि झाला । अरैत्रीं परैत्रीं तयाला । काय
उणें ॥ १४॥ बुद्धि देणें भगवंताचें । बुद्धीविना माणूस काचें । राज्य सांडून फु-
काचें । भीक मागे ॥ १५॥ जें जेथें निर्माण झालें । तें तें तयास मानलें । अ-
भिमान देऊन गोविलें । ठायीं ठायीं ॥ १६॥ अवघेचि ह्मणती आम्हीं थोर ।
अवघेचि म्हणती आम्ही सुंदर । अवघेचि म्हणती चतुर । भूमंडळीं ॥ १७॥
ऐसा विचार आणितां मना । कोणीच लहान म्हणवीना । जाणते आणिती
अनुमाना । सकळ कांहीं ॥१८॥ आपुलालया साभिमानें । लोक चालिले अ-
नुमानें । परंतु हें विवेकानें । पाहिलें पाहिजे ॥१९॥ लटिक्याचा साभिमान
घेणें । सत्य अवघेंच सांडणें । मूर्खपणाचीं लक्षणें । तीं हीं ऐसीं ॥ २०॥ स-
त्याचा जो अभिमान । तो जाणावा निरभिमान । न्याय अन्याय समान ।
कदापि नव्हे ॥२१॥ न्याय म्हणिजे तो शाश्वत । अन्याय म्हणिजे तो अशा-
श्वत । बाष्कळ आणि नेमस्त । एक कैसें ॥ २२ ॥ एक उघड भाग्य भो-


१. गुंतागुंत. २. दूर. ३. मंत्रानें लोक वश करणें. ४. इहपरलोकीं.

गिती । एक तस्कर पलोन जाती । एकाची प्रगट महंती । एकाची कान-
कोंडी ॥ २३ ॥ आचारविचारेंविण । जें जें करणें तो तो शीण । धूर्त आणि
विचक्षण । तेचि शोधावे ॥ २४ ॥ उदंड बाजारी मिळाले । परी ते धूर्तेंचि
आकाळिले । धूर्तापासीं कांहीं न चले । बाजार्याचें ॥ २५॥ या कारणें मुख्य
मुख्य । तयांसी करावें सख्य । येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥ २६ ॥
धूर्तांसि धूर्तचि आवडे । धूर्त धूर्तांच पवाडे । उगोचि हिंडती वेडे । कार्ये-
विण ॥ २७ ॥ धूर्तांसि धूर्तपण कळलें । तेणें मनासी मन मिळालें । परी हें
गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्व ॥ २८ ॥ समर्थांचे राखितां मन । तेथें येती
उदंड जन । जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥ २९ ॥ वोळखीनें वो-
ळखी साधावी । बुद्धीनें बुद्धि बोधावी । नीतिन्यायें वाट रोधावी । पाखं-
डाची ॥ ३० ॥ वेष धरावा बावळा । अंतरीं असाव्या नाना कळा । सगट
लोकांचा जिव्हाळा । मोडूं नये ॥ ३१ ॥ निस्पृह आणि नित्य नूतन । प्र-
त्ययाचें ब्रह्मज्ञान । प्रकट जाणता सज्जन । दुर्लभ जगीं ॥ ३२ ॥ नान
जिन्नस पाठांतरें । निवती सकळांचीं अंतरें । चंचळपणें तदनंतरें । सकळा ठायीं
॥ ३३ ॥ एकेठायीं बैसोनि राहिला । तरी मग व्यापचि बुडाला । सावध-
पणें ज्याला त्याला । भेटी द्यावी ॥ ३४ ॥ भेटभेटों उरी राखणें । हीं चातु-
र्याचीं लक्षणें । मनुष्यमात्र उत्तमगुणें । सावधान पावें ॥ ३५ ॥ इति श्रीदास-
बोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके चातुर्यनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. निस्पृहलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथवीमध्यें नानाशरीरें । उदंड दाटलीं लहान-
थोरें । पालटती मनोविकारें । क्षणक्षणां ॥ १ ॥ जितुक्या मूर्ति तितुक्या
प्रकृती । सारिख्याच नसती आदिअंतीं । नेमाचि नाहीं पाहावें किती ।
काय म्हणोनी ॥ २ ॥ कितेक म्लेंच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांतें
आटले । देशभाषेनें रोधिले । कितीएक ॥ ३ ॥ महाराष्ट्र देश थोडा उरला ।
राजकारणें लोक रोधिला । अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कार्मे ॥ ४ ॥
कित्येक युद्धप्रसंगीं गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले । रात्रंदिवस करूं लागले
१. चोर. २. मिसळतो. ३. स्वभाव. ४. ख्रिस्ती जातींत. ५. मराठ्यांचा.

१५ वा. ] निस्पृहलक्षण. ३३३

युद्धचर्चा ॥ ५ ॥ उद्यम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोटधंदा लागला । निरंतर ॥ ६ ॥ षट्दर्शनें¹ नाना मतें । पाषां-
डें उठलीं बहुतें । पृथ्वीमध्यें जेथें तेथें । उपदेशिती ॥ ७ ॥ स्मार्ती आणि
वैष्णवीं । उरलीं सुरलीं नेलीं आघवीं । ऐसी पाहतां गाथागोवी । उदंड
जाहली ॥ ८ ॥ कित्येक कामनेचे भक्त । ठायीं ठायीं झाले आसक्त । युक्त
अथवा अयुक्त । पाहतो कोण ॥ ९ ॥ या गलबल्यामध्यें गलबला । को-
णीं कोणीं वाढविला । त्यास देखों शकेनासा झाला । वैदिक लोक ॥ १० ॥
त्यांहिमध्यें हरिकीर्तन । तेथें वोढले कित्येक जन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान ।
कोण पाहे ॥ ११ ॥ या कारणें ज्ञान दुर्लभ । पुण्यें घडे अलभ्य लाभ । वि-
चारवंता सुलभ । सर्व कांहीं ॥ १२ ॥ विचार सकळांला सांगतां न ये ।
उदंड येती अंतरायें³ : उपाय योजितां अपाय । आडवे येती ॥ १३ ॥ त्यां-
हिमध्यें जो तीक्ष्ण । रिकामा जाऊं नेदी क्षण । धूर्त तार्किक विचक्षण ।
सकळांस माने ॥ १४ ॥ नानाजिन्नस उदंड पाठ । वदों लागले गडगडाट ।
अव्हांटांची² केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥ प्रबोधशक्तीचीं अनंत द्वारें ।
जाणे सकळांचीं अंतरें । निरूपणें तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥ मतें
मतांतरें सगट । प्रत्यय बोलून करी सपाट । दंडक सांडून नीट । वेधी
जनां ॥ १७ ॥ नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें⁴ । उदासवृत्तीच्या
गुमानें । उठोन जातो ॥ १८ ॥ प्रत्यय बोलोन उठोन गेला । चटक ला-
गली लोकांला । नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १९ ॥ परी
तो कोठें आढळेना । कोणे स्थळीं सांपडेना । वेष पाहतां हीनदीन । सा-
रिखा दिसे ॥ २० ॥ उदंड करी गुप्तरूपें । भिकाऱ्यासारिखा स्वरूपें । तेथें
यश कीर्ति प्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥ ठायीं ठायीं भजन लावी । आ-
पण तेथून चुकवी । मत्सरमताची गोंवी⁵ । लागोंच नेदी ॥ २२ ॥ खना⁶-
ळामध्यें जाऊन राहे । तेथें कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्व-
काळ ॥ २३ ॥ अवघडस्थळीं कठिण लोक⁷ । तेथें राहणें नेमक । सृष्टीमध्यें
सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥ तेथें कोणाचें चालेना । अणुमात्र अ-


१. सौर, शाक्त, गाणपत्य, शैव, वैष्णव आणि स्कांद हीं सहा मतें. २. आड-
वाटांची. ३. अडथळे. ४. वळानें. ५. संबंध. ६. दरीखोऱ्यांत. ७. स्थान.

जुमानेना । कट घालून राजकारणा । लोकां लावी ॥ २५ ॥ लोकीं लोक
वाढविले । तेणें अमर्याद झाले । भूमंडळीं सत्ता चाले । गुप्तरूपें ॥ २६ ॥
ठायींठांयीं उदंड थोंबे¹ । मनुष्यमात्र तितुकें झोंबे । चहूकडे उदंड लांबे ।
परमार्थबुद्धी ॥ २७ ॥ उपासनेचा गजर । स्थळोस्थळीं थोरथोर । प्रत्ययानें
प्राणिमात्र । सोडविले ॥ २८ ॥ ऐसें कैवांड उदंड जाणे । तेणें लोक होती
शहाणे । जेथें तेथें प्रत्यय बाणे । प्राणिमात्रांसीं ॥ २९ ॥ ऐशी कीर्ति करून
जावें । तरीच संसारास यावें । दास म्हणे हें स्वभावें । संकेतें बोलिलों
॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके निस्पृहलक्षणं नाम
द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. श्रेष्ठ अंतरात्मा.
श्रीगणेशाय नमः ॥ मुळापासून सैरावैरा । अवघा पंचीकरण पसारा ।
त्यांत साक्षित्वाचाँ दोरा । तोहि तत्वरूपँ ॥ १ ॥ दुरस्तां दाटल्या फौजा ।
उंच सिंहासनीं राजा । याचा विचार समजीं । अंतर्यामीं ॥ २ ॥ देहमात्र
अस्थिमांसाँचें । तैसेंचि जाणावें नृपतीचें । मुळापासून सृष्टीचें । तत्वैरूप
॥ ३ ॥ रायाचे सत्तेनें चालतें । परंतु अवघीं पंचभूतें । मुळीं अधिक जा-
णीवेचें तें । अधिष्ठान आहे ॥ ४ ॥ विवेकें बहुत पैसावले । म्हणोन अ-
वतारी बोलिले । मनु चक्रवर्ती झाले । येणेंचि न्यायें ॥ ५ ॥ जेथें उदंड
जाणीव । तेचि तितुके सदैवँ । थोडे जाणीवेनें निर्देवँ । होती लोक ॥ ६ ॥
व्याप आटोप करीती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी सदैव होती ।
देखतदेखतां ॥ ७ ॥ ऐसें हें आतां वर्ततें । मूर्ख लोकांस कळेना तें । वि-
वेकी मनुष्य समजतें । सकळ कांहीं ॥ ८ ॥ थोर लहान बुद्धीपाशीं । स-
गट कळेना लोकांसी । आधीं उपजले तयांसी । थोर म्हणती ॥ ९ ॥ वयॆं
धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती । विचित्र विवेकाची गती ।
कळली पाहिजे ॥ १० ॥ सामान्य लोकांचें ज्ञान । तें अवघेंच अनुमान ।


तळटीपा (Footnotes):
. १. समुदाय. २. कारस्थान. ३. मूळमायेपासून. ४. पंचभौतिक. ५. आणि-
वेचा. ६. फौजेच्या मध्यभागीं राजा, त्याप्रमाणें जगताचे अंतरीं जाणीव म्हणजे
साक्षित्व आहे. परंतु राजा व फौज हे जसे सर्व देहच, त्याप्रमाणें जगत् वँ
साक्षित्व हें सर्व पंचभौतिकच होय. ७. भाग्यवान्. ८. भाग्यहीन.

१५ वा. ] श्रेष्ठ अंतरात्मा. ३३५
दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडें ॥११॥ नव्हे कोणास म्हणावें । सामा-
न्यास काय ठावें । कोण कोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥१२॥ धाकुटा
भाग्यास चढला । तरी तुच्छ करिती तयाला । या कारणें सलगीच्या लो-
कांला । दुरी धरावें ॥१३॥ नेमस्त कळेना वचन । नेमस्त न ये राजकारण ।
उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४॥ नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त
कोणीच मानीना । आधीं उपजलें त्या थोरपणा । कोण पुसे ॥ १५ ॥
वडिलां वडिलपण नाहीं । धाकुट्या धाकुटेपण नाहीं । ऐसें बोलती त्यांस
नाहीं । शहाणपण ॥ १६ ॥ गुणांविण वडिलपण । हें तों अवघेंच अप्रमाण ।
त्याची प्रचीत प्रमाण । थोरपणीं ॥ १७ ॥ तथापि वडिलांस मानावें ।
वडिलें वडिलपण जाणावें । नेणतां पुढें, कष्टावें । थोरपणीं ॥ १८ ॥ तस्मात्
वडिल अंतरात्मा । जेथें चेतला तेथें महिमा । हें प्रगटचि आहे आम्हां । शब्द
नाहीं ॥१९॥ या कारणें कोणी एकें । शाहाणपण शिकावें विवेकें । विवेक
न शिकतां तुकें । तुटोन जाती ॥ २० ॥ तुक तुटलें म्हणिजे गेलें । जन्मास
येऊन काय केलें । बळेंच सांडीस घातलें । आपणासी ॥ २१ ॥ सगट
बायका शिव्या देती । सांडीस पडला ऐसें म्हणती । मूर्खपणाची प्राप्ती ।
ठाकून आली ॥ २२ ॥ ऐसें कोणी एकें न करावें । सर्व सार्थकाचि करावें ।
कळेना तरी विवरावें । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥ शाहण्यास कोणी तरी बाहती ।
मूर्खास लोक दवडून देती । जीवास आवडे संपत्ती । तरी शाहणें व्हावें
॥ २४ ॥ अहो या शहाणपणाकारणें । बहुतांचे कष्ट करणें । परंतु शहाण-
पण शिकणें । हें उत्तमोत्तम ॥ २५॥ जो बहुतांस मानला । तो जाणावा
शाहाणा झाला । जनीं शाहण्या मनुष्याला । काय उणें ॥ २६ ॥ आपुलें
हित न करी लौकिकीं । तो जाणावा आत्मघातकी । त्या मूर्खा एवढा पात-
की । आणिक नाहीं ॥ २७ ॥ आपण संसारीं कष्टतो । लोकां करवीं रागे-
जोन घेतो । जनांमध्यें शहाणा तो । ऐसें न करी ॥ २८ ॥ साधकां शिक-
विलें स्वभावें । मानेल तरी सुखें घ्यावें । मानेना तरी सांडावें । एकीकडे
॥ २९ ॥ तुम्ही श्रोते परम दक्ष । अलक्ष्यास लावितां लक्ष । हें तों सामान्य
प्रत्यक्ष । जाणतसां ॥३०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके
श्रेष्ठअंतरात्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥

३३६ श्रीदासबोध. [ दशक
४. शाश्वत ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीपासून झालीं झाडें । झाडापासून होती
लांकडें । लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होय ॥१॥ पृथ्वीपासून वेल होती ।
नाना जिन्नस फांपावती । वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होय ॥ २ ॥
नाना धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें कारिती भोजनें । नाना विष्ठा नाना
वमनें । पृथ्वीच होय ॥ ३ ॥ नाना पक्ष्यादिकीं भक्षिलें । तरी पुढें तैसेंच
झालें । वाळोन भस्म होऊन गेलें । पुनः पृथ्वी ॥४॥ मनुष्यें मरतांच ऐका ।
कृमि भस्म मृत्तिका । ऐशा काया पडती अनेका । पुढें पृथ्वी ॥ ५ ॥ नाना
तृणें पदार्थ कुजती । पुढें त्यांची होय माती । नाना किडे मरोन जाती ।
पुढें पृथ्वी ॥ ६ ॥ पदार्थ दाटले अपार । किती सांगावा विस्तार । पृथ्वी-
वांचून थार । कोणास नाहीं ॥ ७ ॥ झाडपाले आणि तृण । पशु भक्षितां
होतें शेण । खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ॥ ८ ॥ उत्पत्ति स्थिति
संहारतें । तें तें पृथ्वीस मिळोन जातें । जितुकें होतें आणि जातें । पुनः
पृथ्वी ॥ ९ ॥ नाना बीजांचिया राशी । विरुढोन लागती गगनासी । पुढें
शेवटीं पृथ्वीसी । मिळोन जाती ॥१०॥ लोक नाना धातु¹ पुरिती । बहुतां
दिवसां होय माती । सुवर्ण पाषाणांची गती । तैसीच आहे ॥११॥ मातीचें
होतें सुवर्ण । आणि मृत्तिकेचे होती पाषाण । महा अग्निसंगें भस्मोन ।
पृथ्वीच होय ॥ १२ ॥ सुवर्णाचें रजें² होतें । रज शेवटीं कुजोन जातें ।
रस होऊन वितुळतें । पुनः पृथ्वी ॥ १३ ॥ पृथ्वीपासून धातु निपजती ।
अग्निसंगें भस्म होती । तया रसाची होय जगती³ । कठीणरूपें ॥ १४ ॥
नाना जळासि गंधी उठे । तेथें पृथ्वीचें रूप प्रगटे । दिवसेंदिवस जळ आटे ।
पुढें पृथ्वी ॥ १५ ॥ पत्रें पुष्पें फळें येती । नाना जीव खाऊन जाती । ते
जीव मरतां जगती । नेमस्त होय ॥ १६ ॥ जितुका कांहीं झाला आकार ।
तितुक्यास पृथ्वी आधार । होती जाती प्राणिमात्र । शेवटीं पृथ्वी ॥ १७ ॥
हें किती म्हणोन सांगावें । विवेकें अवघेंचि जाणावें । खाजणीभाजणीचें⁴
समजावें । मूळ तैसें ॥ १८ ॥ आप आळोन पृथ्वी झाली । पुनः आपींच
विराली । अग्नियोगें भस्म झाली । म्हणोनियां ॥ १९ ॥ आप झालें तेजा-
१. सोनें, रुपें इत्यादि. २. बारीक कण. ३. पृथ्वी. ४. उभारणी-संहारणीचें.

१५ वा.] चंचललक्षण. ३३७
पासुनी । पुढें तेजें घेतलें शोषूनी । तें तेज झालें वायूचेनी । पुढें वायु
झडपी ॥ २० ॥ वायु गगनीं निर्माण झाला । पुढें गगनींच विराला । ऐसें
खाजणीभाजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥ जें जेथें निर्माण होतें । तें तेथें लया
जातें । येणें रीती पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥ भूत म्हणिजे निर्माण
झालें । पुनः मागुतें निमालें । पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥ तें
परब्रह्म जों कळेना । तों जन्ममृत्यु चुकेना । चार खाणी जीव नाना । होणें
घडे ॥ २४ ॥ जडाचें मूळ तें चंचल । चंचळाचें मूळ तें निश्चळ । निश्चळास
नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे झालें । सिद्धांत म्हणिजे
निमालें । पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥ हैं प्रचीतीनें जाणावें ।
विचारें खुणेसि बाणावें । विचारेंविण शिणावें । तेंचि मूर्खपण ॥ २७ ॥
ज्ञानी भिडेनें दडपिला । निश्चळ परब्रह्म कैंचें त्याला । उगाच करिती
गलबला । मायेमध्यें ॥ २८ ॥ माया निःशेष नासली । पुढें स्थिति कैसी
उरली । विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥ विशेष मायेचें निर-
सन । होतां आत्मनिवेदन । वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥
लोकांचे बोलीं जो लागला । तो अनुमानानेंचि बुडाला । या कारणें प्रत्ययाला ।
पाहिलेंचि पाहावें ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचदशदशके
शाश्वतब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. चंचललक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ दोघां ऐशीं तीनै चालती । अगुणीं अष्टधा प्रकृती ।
अधोध्वं सांडून वर्तती । इंद्रफणी ऐशी ॥ १ ॥ पर्णतोंडें भक्षितो पँण-
जा । मूँल बापासैं मौरी वोर्जा । चुकाऱ्या गेला रोंजा । चौघांजणांचा
१. अनुभवाचें ज्ञान. २. प्रकृति व पुरुष; म्हणज मुळमाया. ३. त्रिगुण; म्हणजे
गुणमाया. ४. निर्गुणाचे ठिकाणीं. ५. खालीं नव्हे, वर नव्हे; इंद्रधनुष्याप्रमाणें अंत-
रिक्षांत. ६. अग्नि, आप, पृथ्वी व वनस्पती असा उत्पत्तिक्रम आहे; तेव्हां वन-
-स्पत्यादिकांस अग्नि भक्षण करितो असा अर्थ. (?) ७. पंचभूतांच्या उत्पत्तिक्रमानें
पाहतां पृथ्वी उदकास शोषते, उदक तेजास विझावितें, इत्यादि. (?) ८. कुशलतेनें.
९. पृथ्वी, आप, तेज व वायु यांचें मुख्य तत्त्व आकाश; अंतरात्मा.

३३८ श्रीदासबोध. [ दशक
॥ २ ॥ देवे देवालयामध्यें लपला। देऊळ पूजितां पावे त्याला। सृष्टीमध्यें
ज्याला त्याला। ऐसेंचि आहे ॥ ३ ॥ दोन्ही नामें एकास पडिलीं। लोकीं
नेमस्त कल्पिलीं। विवेकें प्रत्ययें पाहिलीं। तों एकचि नाम ॥ ४ ॥ नाहीं
पुरुष ना वनिता। लोकीं कल्पिलें तत्त्वतां। याचा बरा शोध घेतां। कांहीं
नाहीं ॥ ५ ॥ स्त्री नदी पुरुष खळाळ। ऐसें बोलती सकळ। विवरोन पहा-
तां निवळ। देह नाहीं ॥ ६ ॥ आपण आपणास कळेना। पाहों जातां आ-
कळेना। कशास कांहींच मिळेना। उदंडपणें ॥७॥ एकलाचि उदंड झाला।
उदंडाचि एकला पडिला। आपणासि आपला गलबला। सोसवेना ॥ ८ ॥
एक असोन फुटी पडली। फुटी असोन स्थिति एकली। विचित्र कळा पै-
सावली। प्राणिमात्रीं ॥ ९ ॥ वल्लीमध्यें जळ संचरे। कोरडेपणें हें वावरे।
[L1