सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 247, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 247

२१२ श्रीदासबोध. [ दशक
आरंभ । जाहलाचि नाहीं ॥ ३१ ॥ जेणें दृश्य केलें विसंचें । तयास कैंचा
होय प्रपंच । या कारणें निष्प्रपंच । साधु जाणावा ॥ ३२ ॥ अवघें ब्रह्मांड
त्याचें घर । पांचभौतिक हा जोजार । मिथ्या जाणोनि सत्वर । त्याग केला
॥ ३३ ॥ या कारणें लोभ नसे । साधु सदा निर्लोभ असे । जयाची वासना
समरसे । शुद्ध स्वरूपीं ॥ ३४ ॥ आपला आपण आघवा । शोक कोणाचा
करावा । म्हणोनि साधु तो जाणावा । शोकरहित ॥ ३५ ॥ दृश्य सांडूनि
नाशवंत । स्वरूप सेविलें शाश्वत । या कारणें शोकरहित । साधु जाणावा
॥ ३६ ॥ शोकें दुखवावी वृत्ती । तरी ते झाली निवृत्ती । म्हणोनि साधु
आदिअंतीं । शोकरहित ॥ ३७ ॥ मोहें झळंबावें मन । तरी तें मनचि
झालें उन्मन । या कारणें साधुजन । मोहातीत ॥ ३८ ॥ साधु वस्तु अद्वय ।
तेथें कैंचें वाटेल भय । परब्रह्म तें निर्भय । तोचि साधु ॥ ३९ ॥ या कारणें
भयातीत । साधु निर्भय निवांत । सकळांस मांडेल अंत । साधु अनंतरूपी
॥ ४० ॥ सत्यस्वरूपीं अमर झाला । भय कैंचें वाटेल त्याला । या कारणें
साधुजनाला । भयचि नाहीं ॥ ४१ ॥ जेथें नाहीं द्वैतभेद । आपला आपण
अभेद । तेथें कैंचा उठेल खेद । देहबुद्धीचा ॥ ४२ बुद्धीनें निर्मिलें नि-
र्गुणा । त्यास कोणीच नेईना । या कारणें साधूजना । खेदचि नाहीं ॥ ४३ ॥
साधु आपण एक । तेथें कैंचा दुःख शोक । दुजेंविण अविवेक । येणार
नाहीं ४४ ॥ आशा धरितां परमार्थाची । दुराशा तुटली स्वार्थाची । म्ह-
णोनि नैराश्यता साधूची । ओळखावी ॥ ४५ ॥ मृदुपणें जैसें गगन । तैसें
साधूचें लक्षण । या कारणें साधुवचन । कठिण नाहीं ॥ ४६ ॥ स्वरूपाच्या
संयोगीं । स्वरूपचि झाला योगी । या कारणें वीतरागी । निरंतर ॥ ४७ ॥
स्थिति बाणतां स्वरूपाची । चिंता सोडिली देहाची । या कारणें होणाराची ।
चिंता नाहीं ॥ ४८ ॥ स्वरूपीं लागतां बुद्धी । तुटे अवघी उपाधी । या का-
रणें निरुपाधी । साधुजन ॥ ४९ ॥ साधु स्वरूपींच राहे । तेथें संगाचि न
साहे । म्हणोनि साधु तो न पाहे । मानापमान ॥ ५० ॥ अलक्षास लावि-
ती लक्ष । म्हणोन साधु परम दक्ष । वोहूं जाणती कैपक्ष । परमार्थाचा
॥ ५१ ॥ स्वरूपीं न साहे मळ । म्हणोनि साधु तो निर्मळ । साधु स्वरूप-
१. अदृश्य. २. एकरस होतें. ३. कल्पनारहित. ४. आसक्तिशून्य. ५. कैवार.