दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 248, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८ वा. ] शून्यत्वनिरसन. २१३
चि केवळ । म्हणोनियां ॥ ५२ ॥ सकळ धर्मांमध्यें धर्म । स्वरूपीं¹ राहणें हा
स्वधर्म । हेंचि जाणिजे मुख्य वर्म । साधुलक्षणाचें ॥ ५३ ॥ धरितां साधू-
ची संगती । आपैसीच लागे स्वरूपस्थिती । स्वरूपस्थितीनें बाणती । लक्षणें
अंगीं ॥ ५४॥ ऐसीं साधूचीं लक्षणें । अंगीं बाणती निरूपणें । परंतु स्वरूपीं
राहणें । निरंतर ॥५५॥ निरंतर स्वरूपीं राहतां । स्वरूपाचि होइजे तत्वतां ।
मग लक्षणें अंगीं बाणतां । वेळ नाहीं ॥ ५६ ॥ स्वरूपीं राहिल्या मती ।
अवगुण अवघेच सांडती । परंतु यासि सत्संगती । निरूपण पाहिजे ॥ ५७ ॥
सकळ सृष्टीच्या ठाईं । अनुभव एकचि नाहीं । तो बोलिजेल सर्वही । पुढि-
ले समासीं ॥ ५८ ॥ कोणे स्थितीनें राहती । कैसा अनुभव पहाती । राम-
दास म्हणे श्रोतीं । अवधान द्यावें ॥ ५९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे अष्टमदशके सिद्धलक्षणनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. शून्यत्वनिरसन·
श्रीगणेशाय नमः ॥ जगाचे अनुभव पुसतां । कलह उठला अवचिता ।
हा कथाकल्लोळ श्रोतां । कौतुकें ऐकावा ॥ १ ॥ एक म्हणती हा संसारु ।
करितां पाविजे पैलपारु । आपुला नव्हे कीं जोजारु । जीव देवाचे ॥ २ ॥
एक म्हणती हें न घडे । लोभ येऊनि अंगीं जडे । पोटास्तव करणें पडे ।
सेवा कुटुंबाची ॥ ३ ॥ एक म्हणती स्वभावें । संसार करावा सुखेनैव² ।
कांहीं दान पुण्य करावें । सद्गतीकारणें ॥ ४ ॥ एक म्हणती संसार खोटा ।
वैराग्यें घ्यावा देशवटा । तेणें स्वर्गांच्या वाटा । मोकळ्या होती ॥ ५ ॥
एक म्हणती कोठें जावें । उगेंच कासया हिंडावें । आपुले आश्रमीं असावें ।
आश्रमधर्म करुनी ॥ ६ ॥ एक म्हणती कैंचा धर्म । अवघा होतसे अधर्म ।
ये संसारीं नाना कर्मे । करणें लागे ॥ ७ ॥ एक म्हणती बहुतां परी ।
वासना असावी वरी । येणेंचि तरिजे संसारीं । अनायासें ॥ ८ ॥ एक
म्हणती कारण भाव³ । भावेंचि पाहिजे देव । येर हें अवघेंच वाव ।
गाथागोवी ॥ ९ ॥ एक म्हणती वाडिलें जीवीं⁴ । अवघीं देवचि मानावीं ।
मायबापें पूजीत जावीं । एकभावें ॥ १० ॥ एक म्हणती देवब्राह्मण । त्यांचें
१. स्वरूपाचे चिंतनांत. २. सुखेनैव. ३. भक्ति. ४. अंतःकरणांतून.