दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 246, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंअसे जाण । सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥ ११ ॥ बाह्य साध-
काचे परी । आणि स्वरूपाकार अंतरीं । सिद्धलक्षण तें चतुरीं । जाणिजे ऐ-
सें ॥ १२ ॥ संदेहरहित साधन । तेंचि सिद्धाचें लक्षण । अंतर्बाह्य समाधा-
न । चलेना ऐसें ॥ १३ ॥ अचल झाली अंतरस्थिती । तेथें चळणास कैंची
गती । स्वरूपीं लागतां वृत्ती । स्वरूपचि जाहली ॥ १४ ॥ मग तो चळ-
तांच अचल । चंपळपणें निश्चळ । निश्चळ असोनि चंचल । देह त्याचा
॥ १५ स्वरूपीं स्वरूपचि झाला । मग तो पडोनीच राहिला । अथवा उ-
ठोन पळाला । तरी तो चलेना ॥ १६ ॥ येथें कारण अंतरस्थिती । अंतरींच
पाहिजे निवृत्ती । अंतर लागलें भगवंतीं । तोचि साधु ॥ १७ ॥ बाह्य
भलतैसें असावें । परी अंतर स्वरूपीं लागावें । मग लक्षणें दिसती स्वभावें ।
साधूअंगीं ॥ १८ ॥ राज्यीं बसतां अवलीळा । अंगीं बाणे राजकळा ।