दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
प्रारंभिक पृष्ठ एवं ग्रन्थ-महत्व
श्रीसमर्थ रामदासस्वामी-विरचित
श्रीदासबोध.
( श्रीसमर्थांचें चरित्र व शिकवण यांसह )
प्रकाशक
भट आणि मंडळी, बुधवार पेठ पुणें शहर.
आक्टोबर सन १९१५.
किंमत एक रुपया.
हें पुस्तक अच्युत चिंतामण भट यांनीं १४८३ कसबा पेठ पुणें येथें
आपल्या यशवंत छापखान्यांत छापून प्रसिद्ध केलें.
श्रीसमर्थ रामदासस्वामी.
उपोद्घात.
श्रीसमर्थांचें अल्प चरित्र.
“ श्रीसमर्थांचें सारें चरित्र कोणासच ठाऊक नाहीं. अशा स्थितींत
ज्याला जितकी माहिती आहे तितकीच त्याजपासून घेऊन श्रीसमर्थांचे
स्वरूप ओळखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ”
—श्रीसमर्थप्रताप, प्रस्तावना (रा. देव).
महाराष्ट्रांत, महाराष्ट्रधर्माचा उदय होऊन मोंगलांच्या जाचांतून
त्याची सुटका होण्यापूर्वी जें संतमंडळ उद्भूत झालें व कै. न्या. रानडे यांच्या
मताप्रमाणें ज्या संतमंडळीनें राष्ट्रीय स्वातंत्र्याचें बीजारोपण करण्याकरितां
जमीन तयार केली, त्यांत श्रीसमर्थ रामदास हे अग्रेसर होत. सदर न्याय-
मूर्तीनीं आपल्या 'मराठ्यांच्या इतिहासां'त वर्णिलेल्या संतमालिकेंत श्रीसमर्थां-
चा उल्लेख जरी प्रमुखत्वानें करण्यांत आलेला आहे, तरी त्या वेळीं त्यांच्यासंबंधानें
सध्यां उपलब्ध असलेली माहिती अप्रसिद्ध असल्यामुळे न्यायमूर्तीना समर्थां-
च्या कृतींचें व योग्यतेचें यथास्थित शब्दचित्र रेखाटतां आलेलें नाहीं. तथापि
महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माचा प्रसार करून मराठ्यांना राष्ट्रीय वैभव प्राप्त करून
देण्याचा उद्योग करणाऱ्यांत समर्थ रामदास हे प्रमुख होते, असें त्यांनीं नमूद
करून ठेवलें आहे; मात्र त्यांनीं ह्या उद्योगाचें सर्वच श्रेय समर्थास न देतां
त्याचा कांहीं वाटा इतर संतांच्या पदरींहि घातलेला आहे. न्यायमूर्तीचें हें मत
प्रसिद्ध होऊन कांहीं काल लोटल्यानंतर महाराष्ट्र-इतिहासाचे संशोधक
प्रख्यात रा. रा. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनीं माजी 'ग्रंथमाला'
मासिकांत रामदासांवर एक विस्तृत निबंध लिहिला व त्यांत त्यांनीं
न्यायमूर्ति रानड्यांचें सदर मत खोडून काढून महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माची
स्थापना करण्याचें सर्व श्रेय एकट्या रामदासांसच देणें योग्य आहे, असें प्रति-
पादिलें. रा. राजवाडे यांचा हा गंभीर व विचारार्ह निबंध वाचून धुळ्याचे
प्रसिद्ध वकील शंकरराव देव यांना रामदासांसंबंधीं खरी व विश्वसनीय माहिती
२ उपोद्घात.
शोधून काढण्याची स्फूर्ति झाली व त्यांनीं गेल्या ७।८ वर्षांत एतद्विषयक जे
शोध केले, व तदनुसार जे ग्रंथ प्रसिद्ध केले, त्यावरून रा. राजवाडे यांचे वरील
प्रतिपादनासच विशेष पुष्टि मिळालेली आहे. इतकेंच नव्हे तर त्या प्रतिपादना-
संबंधीं प्रचलित विद्वान लोकांत खूप जोराची चर्चा होऊन अखेर बहुतेक सर्व
विचारी लोकांचें मत रा. राजवाडे यांच्या मताप्रमाणेंच बनलेलें आहे. न्याय-
मूर्ति रानडे जर आज हयात असते तर त्यांना देखील राजवाड्यांचें मत मान्य
करावें लागलें असतें व तसें त्यांनीं मोठ्या संतोषानें केलेंहि असतें. कारण ते
दुराग्रही नसल्यामुळे उपलब्ध झालेल्या माहितीचा व साधनांचा धिक्कार अथवा
विपर्यास करण्याच्या भानगडींत बिलकुल पडले नसते, अशी आमची खात्री आहे.
समर्थांचें खरें स्वरूप जाणण्याचे कामीं त्यांच्या हातून ज्या कांहीं चुका झाल्या
त्या त्यांनीं जाणून बुजून केलेल्या नसून योग्य माहितीच्या अभावीं झालेल्या
आहेत. समर्थांच्या चरित्राचे सर्व धागे सुव्यवस्थित रीतीनें उकलणें अद्यापहि
शक्य नाहीं. न्या. रानड्यांचा ‘The Rise of the Maratha Power’
हा आदरणीय ग्रंथ प्रसिद्ध होऊन गेल्यानंतर व विशेषेंकरून अलीकडील ७।८
वर्षांत समर्थांच्या चारित्र्यावर प्रकाश पाडणारी पुष्कळ नवी माहिती उपलब्ध
झालेली आहे; परंतु अद्यापहि समर्थांचें सर्वांगपरिपूर्ण असें चरित्र लिहितां येण्या-
इतकीं साधनें मिळालेलीं नाहींत असें रामदासी वाङ्मयसमुद्रांत नित्य पोहणारे
रा. देव यांचें मत आहे. आजपर्यंत झालेल्या शोधांचा विचार करितां समर्थां-
च्या चरित्राचीं कांहीं अंगें केवळ गुप्त असल्यामुळे तीं कधीं काळीं उघडकीस
येतील कीं नाहीं याबद्दल शंका वाटते. असें जरी आहे, तरी स्थूल मानानें सम-
र्थांच्या चरित्राची स्पष्ट रूपरेखा रेखाटण्याइतकी सामुग्री रा. देव यांच्या प्रयत्ना-
मुळें सध्यां प्रसिद्ध झालेली आहे. तिचा सामग्र्यानें विचार केल्यास समर्थांचें
एक सुसंबद्ध व बरेंच मोठें चरित्र लिहितां येईल. अर्थात् प्रस्तुतसारख्या उपो-
द्घातलेखांत अवश्य असणारें अल्पसें चरित्र तर त्यावरून निःसंशय लिहितां
येईल असें वाटतें. देवांचे ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वी समर्थांचीं बखरीवजा अशीं
४।५ चरित्रें प्रसिद्ध झालेलीं आहेत. त्यांत हनुमंतस्वामींनीं लिहिलेली बखर
विशेष प्रसिद्ध आहे. परंतु हीं सर्व चरित्रें इतिहासप्रिय चिकित्सकाच्या कसोटी-
पुढें नम्र होणारीं आहेत ! गबाळपणा, अतिशयोक्ति व भ्रामक विधानें यांनीं तीं
श्रीसमर्थांचें अल्प चरित्र. ३
लिप्त झालेलीं आहेत. तथापि त्यांत सत्यांशहि बराच आहे; यामुळे तीं टाकाऊ
ठरवितां येत नाहींत. या चरित्रांखेरीज रा. देव यांनीं समर्थांची आणखी दोन
चरित्रें प्रसिद्ध केलीं आहेत. त्यांत भीमस्वामीनामक समर्थशिष्यानें वर्णिलेलें
चरित्र असून तें पुष्कळ विश्वसनीय व ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचें आहे.
देवांनीं प्रसिद्ध केलेले 'श्रीसमर्थप्रताप' व 'समर्थांसंबंधीं पत्रव्यवहारादि
कागदपत्र' हे दोन ग्रंथ, तसेंच त्यांनीं लिहिलेली दासबोधाची प्रस्तावना यांचा-
हि समर्थांचें चरित्र लिहिण्याचे कामीं विशेष उपयोग होण्याजोगा आहे. ह्या सर्व
ग्रंथांच्या आधारानेंच पुढील अल्प चरित्र लिहिलें आहे.
मोंगलाईंत औरंगाबाद जिल्ह्यांतील आंबड परगण्यांत जांब म्हणून गांव
आहे. तेथील सदाचारी व ईश्वरभक्त कुळकर्णी सूर्याजीपंत हे समर्थांचे जनक
होत. त्यांची भार्या राणूबाई हिच्या पोटीं शके १५३० मध्यें समर्थांनीं जन्म
घेतला. समर्थ हे अवतारी पुरुष असून मारुतीचा अवतार होते, अशी भाविकांची
समजूत आहे. त्यांचें पूर्वाश्रमींचें नांव नारायण असें होतें. त्यांस गंगाधरपंत
या नांवाचे एक वडील बंधु होते. हेहि परम भाविक व भगवद्भक्त असून
[L
४ उपोद्घात.
स्वरूपास नेऊन पोचवावयाचें असा त्याचा सहज स्वभाव बनणें अपरिहार्य होतें.
'संसारत्याग व मोक्षमार्गानुगामी परमार्थाचें ग्रहण' हें भक्तिमार्गाचें मुख्य ध्येय
नारायणाच्या चटकन लक्ष्यांत येऊन त्यांत त्याची तंद्री लागून राहिली आणि त्या-
मुळें संसार करण्याचा त्यास साहजिकच कंटाळा वाटूं लागला. तो संसारा-
विषयीं पूर्ण उदासीन बनून ईश्वरचिंतन करून ईश्वराचा शोध करण्याच्या मार्गास
लागला. त्याच्या आईनें व ज्येष्ठ बंधूनें त्याच्या भक्तिभावाच्या उत्तान स्वरूपास
मर्यादित करण्याचा पुष्कळ यत्न केला, पण तो साहजिकच व्यर्थ गेला. बाल-
पणीं बरोबरीचीं मुलें घेऊन रानावनांत फिरणें, जलाशयांत पोहणें, शरीरसामर्थ्य
वाढविणें इत्यादि कर्मे स्वैरपणें नारायण करीत असे. यथाकालीं त्याचें मौंजी-
बंधन झालें व तत्कालीन पद्धतीप्रमाणें थोडेंबहुत शिक्षणहि झालें. पुढें लग्नाचें
वय आलें, तरीहि त्याचा पूर्वीचा क्रम चालूच होता. मात्र त्याच्या प्रत्येक कृतींत
व वागणुकींत लोकोत्तरपणा दृग्गोचर होत असे. इतर मोठमोठे सत्पुरुष जसे भग-
वत्साक्षात्कारी होऊन जगदुद्धार करिते झाले त्याप्रमाणें आपणहि करावें अशी
भावना नारायणाच्या मनांत बाणली आणि त्याच कारणामुळे त्यानें लग्न कर-
ण्याचें टाळलें. त्याचे वडील बंधु व मातोश्री यांनीं बळेंच त्याचा विवाह कर-
ण्याचा घाट घातला. तेव्हां लग्नमंडपांतून आयत्या वेळीं त्यानें पलायन केलें.
(शके १५४२) या वेळीं त्याचें वय अवघें १२ वर्षांचें होतें. इतक्या अल्प वयांत
नारायणास उपरति व्हावी ही गोष्ट असामान्य आहे, यांत शंका नाहीं. परंतु
अशा गोष्टी अशक्य कोटींतील मात्र नाहींत. तैलबुद्धीच्या व तेजस्वी आणि करारी
पुरुषांच्या भावना अल्प वयांत देखील अत्यंत उत्कट व दृढ असतात, असें सृष्टीं-
तील अनेक थोर व श्रेष्ठ पुरुषांच्या उदाहरणांवरून सिद्ध करितां येईल. बालपणीं
अशा पुरुषांच्या डोक्यांत एखादी कल्पना अगर भावना संचरली कीं पुरे;
लागलीच ती तेथें दृढ होऊन तदनुसार कृति होण्यास विलंब लागत नाहीं. लग्नविधि
चालू असतां नारायणानें केलेलें पलायन हें वरील गोष्टीचेंच प्रत्यंतर होय. “संसार
मिथ्या आहे; त्याचा त्याग करून परमार्थसाधन करणें यांतच नरदेहाचें सार्थक
आहे.” अशी कल्पना ऊर्फ भावना नारायणाच्या मनोभूमींत दृढतर झाल्यामुळे
त्यास सहज लीलेनें, मोहक अशा लग्नसोहळ्याचा त्याग करितां आला. नारायण लग्न-
मंडपांतून नेसलेल्या व पांघरलेल्या २ धोतरांनिशीं घराबाहेर पळत सुटला, तेव्हां
श्रीसमर्थांचें अल्प चरित्र. ५
लोक त्याच्या मागें लागले. इतक्यांत त्यानें नदीतीर गांठलें व डोहांत उडी घेतली.
तेव्हां लोक ‘बुडाला रे बुडाला!’ म्हणून ओरडले. परंतु त्यांस दाद न देतां तो
पैलतीरास जाऊन पोंचला व दूर निघून गेला. पुढें ७ दिवस त्यानें अन्नपाणी वर्ज्य
करून श्रीरामाची प्रार्थना केली. तेव्हां त्यास श्रीरामानें दर्शन दिलें. त्यानंतर
तपश्चर्या करण्याकरितां तो टाकळीस निघून गेला. तेथें १२ वर्षांपर्यंत पुरश्चरण
करून त्यानें यौगिक सामर्थ्य संपादन केलें. त्यानंतर १२ वर्षे तीर्थाटन म्हणजे
सर्व भरतखंडभर प्रवास केला. व याच अवधींत त्यानें त्या वेळीं प्रचलित अस-
लेल्या सर्व शास्त्रांचा अभ्यास आणि लोकस्थितीचें अवलोकन केलें. तीर्थाटनाचा
काल जेव्हां पूर्ण झाला, तेव्हां नारायणाचें वय ३६ वर्षांचें होतें. त्यानंतर म्हणजे
शके १५६६ च्या सुमारास नारायण चाफळखोऱ्यांत येऊन राहिला व तेथें
दासबोध ग्रंथ निर्माण करून समर्थ रामदासस्वामी या नांवानें प्रसिद्धि पावून
अनेक ठिकाणीं मारुती व मठ यांची स्थापना करण्यांत व लोकसंग्रह करण्यांत
त्यानें सुमारें तीन तपें घालविलीं.
नारायण ऊर्फ समर्थ रामदास यांच्या तीर्थाटनाचा काल हा त्यांच्या
आयुष्यांतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ह्या कालांत त्यांस जो अनुभव
प्राप्त झाला, त्यावरच त्यांच्या पुढील आयुष्यक्रमाची भव्य व टोलेजंग इमारत
उभारलेली आहे. किंबहुना, या तीर्थाटनांतील अनुभवाची जोड जर समर्थांना
झाली नसती, तर त्यांच्या हातून पुढें जें मोठें राष्ट्रोद्धाराचें कार्य झालें तें झालें
असतें कीं नाहीं याची शंका आहे. समर्थ टाकळी येथें पुरश्चरण करून जेव्हां
यौगिक सामर्थ्य संपादन करिते झाले, तेव्हां स्वतःप्रमाणें भरतखंडांतील जनतेला-
हि परमार्थप्रवण करून जीवन्मुक्त करण्याच्या हेतूनें प्रेरित झाले; आणि तो हेतु
डोळ्यांपुढें ठेवूनच त्यांनीं तीर्थाटनास प्रारंभ केला. परंतु यावनी राज्याच्या भारा-
खालीं सर्व जनता इतकी वांकून गेलेली होती कीं, इतःपर तिचें व्यक्तित्व
जिवंत राहील कीं नाहीं, याविषयीं संशय वाटूं लागला होता. समाजरचना
अत्यंत विस्कळित झाल्यानें व धर्माचें अधिष्ठान नाहींसें होत गेल्यानें सर्व जनता
सर्वतोपरी पंगू बनली होती. तिच्यामध्यें सद्गुणांचा ऱ्हास व दुर्गुणांचा सुळ-
सुळाट चालू होता. सर्व समाजांत बजबजपुरी माजून राहिली होती. धर्मदृष्ट्या,
राजकीयदृष्ट्या व नैतिकदृष्ट्या तत्कालीन हिंदु समाजाची फार निकृष्ट अवस्था
| ६ | उपोद्घात. |
|---|
झालेली होती. सामान्य जन अन्नाला महाग झाले होते, व पतिव्रतेचें पातिव्रत्य
टिकणें मुश्किल झालें होतें. ह्या दुःस्थितीचें चित्र समर्थांनीं आपल्या दासबोधांत
यथास्थित रेखाटलें आहे. तें जिज्ञासूंनीं वाचावें. समाजाची ही दुर्दशा पाहून समर्थ
फार खिन्न झाले. त्यांचा उत्साहभंग होऊन त्यांस मोठें औदासीन्य प्राप्त झालें.
उदासीन हा काळ कोठें न कंठे, उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे,
वगैरे त्यांच्या उक्ती ह्या काळच्या परिस्थितीस अनुलक्षूनच त्यांच्या मुखांतून
बाहेर पडल्या आहेत. अशा रीतीनें ज्या समाजाची—जनतेची—दुर्दशा होत
चालली आहे, तिला केवळ मोक्षाचा उपदेश करून काय फायदा ? तो मोक्षहि
सर्वतोपरी बद्ध व पंगू झालेली जनता कशी मिळवूं शकणार ? तसेंच जेथें घटके-
घटकीं अधर्माचरण होत आहे तेथें धर्मस्थापना तरी कशी होणार ? इत्यादि प्रश्न
मनांत येऊन समर्थांचें अंतःकरण अगदीं उद्विग्न झालें. अशा जनतेचा उद्धार
करणें दुस्तर आहे असें वाटून एक वेळ ते हताशहि झाले असावेत असें वाटतें.
‘समर्थप्रताप’ ग्रंथांत असें वर्णन आहे कीं, तीर्थाटन करीत असतांना वैराग्याचा
अतिरेक होऊन एक वेळ त्यांनीं आपला देह हिमालयकुंडांत झोंकून दिला.
त्या वेळीं श्रीरामांनीं त्यांस वरच्यावर धरिलें. तेव्हां समर्थांनीं त्यांस ‘कां धरिलें’
म्हणून विचारितां—
तुम्हांसी जगोद्धार करणें आहे । तुमची तनु ते आमची तनु पाहें ।
दोनी तपें तुमची रक्षिली काया हे । धर्मस्थापनेकारणें ॥
असें श्रीरामचंद्रांनीं उत्तर दिलें. आणि नंतर त्यांनीं समर्थास आपल्या
जटाकलापीं असलेला हुर्मुजी रंगाचा फेटा त्यांचे हवालीं करून त्यांस परत
पाठविलें. या प्रसंगाचा इत्यर्थ इतकाच दिसतो कीं, वर सांगितल्याप्रमाणें सम-
र्थास जें औदासीन्य प्राप्त झालें होतें तें हिमालयांत त्यांच्याहून श्रेष्ठ अशा कोणा तरी
महात्म्यानें दूर करून त्यांचें मन पुन्हा स्थिर केलें. कदाचित् त्यांचें त्यांनींहि
तसें केलें असेल. त्यानंतर समर्थांनीं फिरून भरतखंडाच्या अंतर्भागीं प्रवेश
केला व ते कृष्णातीरीं चाफळखोऱ्यांत येऊन लोकोद्धाराचें कृत्य कोणत्या रीतीनें
करावें याचा विचार करूं लागले. हा विचार करीत असतांनाच, तत्कालीन जन-
तेचें ऐहिक कल्याण साधण्याचा यत्न केल्यावांचून त्यांचें पारमार्थिक कल्याण
साधतां येणार नाहीं, असें त्यांस आढळून आलें. अशा रीतीनें काय करावयाचें
श्रीसमर्थांचें अल्प चरित्र. ७
याचा निर्णय व निश्चय त्यांच्या मनाशीं ठरल्यावर मग त्यांनीं पुढें मठस्थापना
व लोकसंग्रह इत्यादि अचाट व्याप सुरू केला. समर्थांच्या वेळीं धार्मिकदृष्ट्या
त्यांच्याइतकेच श्रेष्ठ असे अनेक संत महाराष्ट्रांत होते, व त्या सर्वांना महा-
राष्ट्राच्या तत्कालीन स्थितीबद्दल तळमळ वाटत होती. परंतु नुसत्या मानसिक
तळमळीनें ती स्थिति थोडीच बदलते ! ती बदलण्यास कांहीं तरी योग्य प्रयत्नच
केला पाहिजे. असा प्रयत्न करण्याची कल्पना फक्त एकट्या समर्थांच्याच
मनांत आली व त्याप्रमाणें त्यांनीं प्रयत्न करून त्यांत यशहि संपादन केलें. इतर
संतांची प्रवृत्ति अखेरपर्यंत निवृत्तिपरच राहिली. रामदासांनीं मात्र कालाकडे नजर
देऊन आपल्या प्रवृत्तींत अंशतः बदल केला; म्हणजे त्यांनीं प्रवृत्ति व निवृत्ति
या दोहोंची सांगड घालून ‘महाराष्ट्रधर्म’ या नांवाची एक विशिष्ट शिकवण
तत्कालीन जनतेस शिकविली. व शिवाजीसारख्या पराक्रमी क्षत्रियाची दैवयोगानें
त्यांस जोड मिळाल्यामुळे त्यांची ही शिकवण तत्काल फलद्रूपहि झाली.
राष्ट्रोद्धाराचें कार्य करण्याचा मनांत संकल्प केल्यानंतर समर्थांनीं कृष्णा-
तीरीं चाफळखोऱ्यांत आपल्या आयुष्याचा बहुतेक काल घालविला व तेथूनच
त्यांनीं आपल्या अवाढव्य उद्योगाचीं सर्व सूत्रें चालविलीं. यावरून कोणतेंहि
महत्त्वाचें संघटनात्मक कृत्य करण्यास महाराष्ट्रांतील सह्याद्रीचा टापू व कृष्णा-
तीरचा प्रदेश विशेष अनुकूल असावा असें दिसतें. तसें नसतें तर समर्थांनीं
आपल्या वास्तव्याकरितां तो निवडला नसता. वस्तुतः समर्थांची जन्मभूमि
पाहिली तर ती ह्या प्रदेशापासून पुष्कळ दूर आहे. तसेंच समर्थांनीं भरतखंडां-
तील इतर प्रदेशहि सूक्ष्मदृष्टीनें पाहिलेले होते. मग त्या सर्वांत ज्या अर्थी त्यांनीं
महाराष्ट्रांतील उपरोक्त प्रदेशच आपल्या कार्याचें मुख्य क्षेत्र बनविला, त्या अर्थी
त्या प्रदेशाचे अंगीं खरोखरच कांहीं तरी अपूर्व नैसर्गिक सामर्थ्य असलें पाहिजे,
यांत कांहीं शंका नाहीं. शिवाय हाच प्रदेश आपल्या कार्यक्षेत्राकरितां निवड-
ण्याचें आणखी एक कारण दिसतें व तें रा० राजवाडे यांनीं आपल्या राम-
दासांवरील निबंधांत नमूद केलेलें आहे. तें असें:—
“दासांच्या निरूपणाचा मुख्य कटाक्ष महाराष्ट्रावर सर्वस्वीं असलेला
दिसतो. बहुतेक सर्व हिंदुस्थान व महाराष्ट्राचा बराच भाग म्लेंच्छ संस्कृतीनें
भिनून गेला होता. तेव्हां बाकी उरलेला जो थोडा महाराष्ट्र देश त्याला
त्या वेळीं पक्व झाला होता.”` (तेवढा)
- L5:
याचा स्पष्टार्थ असा कीं, महाराष्ट्राच्या कांहीं विशिष्ट भागांत स्वधर्म - L6:
व स्वराज्य यांची जाणीव उत्पन्न झाल्यास तत्प्रीत्यर्थ उद्योग करणारे पुरुष व - L7:
त्यास लागणारें सामर्थ्य तेथें अस्तित्वांत होतें. महाराष्ट्रांतील सह्याद्रीच्या प्रदे- - L8:
शांत स्वधर्म व स्वदेश यांची व्यक्त व अव्यक्त रूपानें चाड बाळगणारे अनेक - L9:
सरदार व जहागीरदार त्या वेळीं होते व त्यांना योग्य मार्गदर्शक मिळाल्यास स्व- - L10:
राज्यस्थापनेचें कार्य त्यांच्या हातून होण्याचा संभव दिसत होता. थोडीबहुत तरी - L11:
राजकीय सत्ता, सैन्य व संपत्ति त्यांचेपाशीं होती. या साधनांच्या साहाय्यानें - L12:
**समर्थांसारख्यांचा** उपदेश अंमलांत आणणें त्यांस शक्य होतें. - L13:
महाराष्ट्रांत आल्यावर **समर्थांनीं** अनेक अलौकिक कृत्यें केलीं व त्यामुळें - L14:
लोकांचें त्यांच्याकडे विशेष लक्ष वेधून त्यांचा शिष्यसांप्रदाय वाढत चालला. - L15: `महाराष्ट्रांत त्यांनीं ११ मारुतींची ठिकठिकाणीं
एकांतवासाचें स्थल होय. त्या ठिकाणीं-तेथील भुयारांत-समर्थ वर्षांतून कांहीं
महिने जाऊन रहात असत. चाफळास राहिल्यानंतर समर्थांनीं शिष्यसमुदाय
व लोकसंग्रह (ज्याला हल्लींच्या भाषेंत संघटना म्हणतां येईल तो) करण्यास सुरु-
वात केली. 'सामर्थ्य आहे चळवळीचें' वगैरे त्यांची उक्ति कृतींत उतरविण्याचें
काम त्यांनीं येथेंच केलें. चाफळ हेंच त्यांच्या चळवळीचें केंद्रस्थान होय.
तेथून सुमारें अकराशें शिष्य ऊर्फ महंत त्यांनीं भरतखंडांत पसरविले होते.
भरतखंडाच्या बहुतेक प्रमुख भागांत त्यांनीं आपल्या सांप्रदायाचे मठ स्थापन
केलेले होते. हे मठ किती होते याचा अद्याप नक्की आंकडा कळलेला नाहीं,
तथापि उपलब्ध झालेल्या माहितींत सुमारें १५० मठांचा थांग लागलेला आहे.
त्यावरून त्यांनीं केवढें मोठें संघटनात्मक यंत्र महाराष्ट्राच्या नैतिक व राष्ट्रीय
उन्नतीकरितां तयार केलें होतें याचा अंदाज करितां येईल. समर्थांनीं योजलेलें
हें कार्य सिद्धीस नेण्याचे कामीं त्यांस क्षत्रियकुलावतंस श्रीशिवाजीमहाराज
यांचा फार उपयोग झाला. समर्थांची व शिवाजीमहाराजांची प्रथम भेट शके
१५६९ च्या सुमारास झाली. त्या वेळीं शिवरायाचें वय सुमारें १९।२० वर्षांचे
होत. ह्या प्रथमभेटीनंतर लवकरच उभयतांमध्ये गुरुशिष्याचें नातें सुरु झालें.
समर्थांच्या विवेकपूर्ण उपदेशामुळे शिवाजीच्या हातून स्वराज्यस्थानेचें काम
विशेष सुयंत्रितपणें पार पडलें असें म्हणण्यास हरकत नाहीं. शिवाजी समर्थां-
च्या सेवेस नेहमीं तत्पर असे; तथापि समर्थांचें वर्तन सर्वथा निस्पृहपणाचें
असे. फार काय सांगावें, चाफळास श्रीरामाचें देवालय बांधण्याचे कामींहि
समर्थांनीं शिवाजीची मदत घेतली नाहीं ! हें देवालय आपण बांधून द्यावें अशी
शिवरायांची इच्छा होती व ती त्यांनीं समर्थचरणीं निवेदनहि केली. परंतु
समर्थांनीं त्यांची विनंती मान्य न करितां सामान्य भिक्षेवरच आपल्या शिष्यां-
करवीं तें देवालय बांधविलें. यासंबंधानें समर्थप्रतापांत पुढील उल्लेख आहे:—
समर्थआज्ञा पुसे शिवराजा । श्रीरघुनाथदेवालय मी बांधेन वोजा ॥
समर्थ म्हणती शिष्यसमुदाय माझा । देवालयें करवीन अनंतहस्तें ॥
अशी त्यांची निस्पृहवृत्ति होती, म्हणूनच त्यांच्या हातून महत्कार्य झालें. एकदा
शिवरायांनीं समर्थांस ११००० होन अर्पण केले. ते त्यांनीं लागलीच ब्राह्मणांस
वांटून टाकले. समर्थांस अनेक लोकांकडून अनेक प्रकारच्या देणग्या येत असत,
१० | उपोद्घात.
परंतु त्यांचा त्यांनीं स्वतःचे उपयोगाकरितां म्हणून कधींहि स्वीकार केला नाहीं.
अशा सर्व वस्तु ते बांटून टाकीत असत. समर्थ दिसण्यांत बेडसर अथवा बाव-
ळट दिसत; तसेंच त्यांची वृत्ति अगदीं सौम्य व मृदु दिसे; परंतु वस्तुतः ते मोठे
सावध, इंद्रियदमनी, करारी व कडक प्रकृतीचे पुरुष होते. त्यांचें अंतरंग जाणणें
फार कठीण असे, इतकें तें खोल होतें. त्यांची त्यांच्या शिष्यावर्गावर मोठी जरब
होती. तसेंच त्यांच्या सांप्रदायाची शिस्तहि फार चोख असून ती कडकपणें
पाळली जावी म्हणून त्यांचा मोठा कटाक्ष असे. त्यांनीं जागोजाग ठेवलेले महंत
पुष्कळ थोर योग्यतेचे होते; परंतु त्यांच्यापैकीं कोणीं सांप्रदायाची शिस्त मोड-
ल्यास त्यास ते तत्काल कडक शासन करीत. महंत आपलें काम बरोबर करितो
कीं नाहीं हें ते फार सूक्ष्म प्रकारची कसोटी लावून पहात असत. जवळच्या
महंतांनीं दर तीन वर्षांनीं व दूरच्या महंतांनीं ११ वर्षांच्या आंत एकदां
श्रीसमर्थांचें अल्प चरित्र. ११
तारण्याइतकें त्यांचें शरीर बळकट होतेंः तसेंच तें पूर्ण निरोगीहि होतें. समर्थां-
च्या वागणुकीसंबंधानें 'समर्थप्रताप' नामक ग्रंथांत बरेंच विस्तृत वर्णन आहे.
यावरून असें दिसून येतें कीं, समर्थ भराभर चालत; मित भाषण करीत;
अहंकारानें त्यांजकडे कोणी गेल्यास त्यांशीं मुळींच बोलत नसत. नवीन मनुष्य
विनयानें बोलल्यास प्रथम भेटीस थोडे बोलत, पण पुढें जास्त सहवास घडल्यास
विशेष सलगीनें बोलत. त्यांची सामान्यतः नेहमीं अधोदृष्टि असे. तसेंच त्यांची
चर्या ध्यानस्थ-विचारमग्न-दिसत असे. भोजनापेक्षां फलाहार त्यांस विशेष
प्रिय असे, तथापि दिवसांतून एकवार ते यथास्थित भोजन करीत. उपोषण
करून काया कृश करावी, हें आळशी वेदान्त्यांचें तत्त्व त्यांस मान्य नव्हतें.
भोजन झाल्यावर तांबुल भक्षण करीत असत. तांबुल तयार करून कुटून
देण्याचें काम भोळाराम नामक एका लडिवाळ शिष्याकडे असे. भोजनोत्तर दोन-
प्रहरीं कांहीं वेळ निद्रा करीत, परंतु रात्रीं क्वचितच झोंप घेत! रात्र बरीच
झाली म्हणजे जवळ असलेल्या महंतादि मंडळीस निजावयाची आज्ञा करून व
आपणहि निजावयास जातों असें सांगून ते निजावयास गेल्यावर आपण
एखाद्या डोंगराची वाट धरावयाची असा त्यांचा परिपाठ असे! ते नेहमीं
जमिनीवर घोंगडीचें हांतरूण करून त्यावर निजत. बैठकीच्या वेळीं सिद्धासन
घालीत. त्यांचें राहणें सतत एके ठिकाणीं फार थोडें असे. स्नानसंध्या एके
ठिकाणीं तर भोजन दुसऱ्या ठिकाणीं, तांबूल सेवन त्याहून अन्य ठिकाणीं व
विश्रांति अथवा शयन त्याहूनहि अन्यत्र, अशी त्यांची वागणूक असे. त्यांची
वृत्ति नेहमीं उदास व निस्पृह अशी असे. सदासर्वकाळ एकान्तीं बसून स्वज-
नांची ऐहिक व पारमार्थिक उन्नति कशी होईल, याची ते एकसारखी विवंचना
करीत असत. याविषयीं 'समर्थप्रतापांत' पुढील उल्लेख आहे:—
श्रीगुरुसमर्थ एकांतीं बैसती । प्रांतींचे लोक दर्शनासी येती ।
सकळ प्रांतींचा स्वामी परामृश घेती । चिंता करिती विश्वाची ॥
देशकाळवर्तमानानें । आपण चिंताग्रस्त होती मनें ।
म्हणती कैसीं वांचतीळ जनें । कैसीं ब्राह्मण्यें राहतील ॥
कैसी क्षेम राहेल जगती । कैसीं देवदेवाल्यें तगतां ।
कैसे कुटुंबवत्सल लोक जगती । कोणेकडे जातील हे ॥
१२ उपोद्घात.
हा उतारा किंचित् लांब वाटेल, परंतु तो मुद्दाम दिला आहे. त्यावरून समर्थांना
कोणतें कार्य करावयाचें होतें व तें किती महत्त्वाचें आणि बिकट होतें याची
वाचकांस बरोबर कल्पना करतां येईल. हें कार्य करण्यांतच समर्थांनीं चाफळ-
खोऱ्यांतील आपलें आयुष्य घालविलें. आणि तें कार्य सिद्ध झाल्यानंतर शिवाजी-
महाराजांच्या आग्रहावरून ते परळीनजिक सज्जनगडावर रहावयास गेले. सज्जन-
गडावरहि त्यांनीं श्रीरामाचें देवालय बांधून उपासना सुरू केली. यापुढें त्यांचा
बहुतेक काळ केवळ परमार्थाचा उपदेश करण्यांत गेला. राष्ट्रप्रपंचाची घडी
यथास्थितपणें नीट बसविल्यानंतर सर्वतोपरी श्रेष्ठ असा जो मोक्षधर्म त्याचा
उपदेश करण्यांत त्यांनीं धन्यता मानावी हें साहजिक आहे. तथापि ह्या कालां-
तहि राष्ट्रप्रपंचाकडे त्यांची दृष्टि होतीच. स्वतःच्या 'दासबोध' ग्रंथांतील
शिकवणीचा आपल्या महंतांकडून भरतखंडांत प्रसार करविणें, त्या कामीं
नियोजित केलेल्या शिष्यवर्गांच्या भेटी घेणें व त्यांना वारंवार योग्य ती सल्ला-
मसलत देणें, या गोष्टी त्यांनीं चालू ठेवल्याच होत्या. शिवाजीमहाराजहि
त्यांचें दर्शन घेऊन त्यांच्या बोधामृताचें पान करण्याकरितां सज्जनगडावर वारं-
वार येत असत. सज्जनगडावर आल्यानंतर शके १६०० मध्यें म्हणजे समर्थांचें
देहावसान होण्याचा समय जवळ आल्यावर शिवाजीमहाराजांच्या इच्छेवरून
त्यांनीं आपल्या पश्चात् आपला सांप्रदाय दीर्घकाल टिकावा म्हणून चाफळ व
इतर ठिकाणच्या देवालयांस उत्पन्न संपादन करून ठेवलें. ह्या प्रसंगीं शिवाजी-
महाराजांनीं समर्थांस लिहिलेलें पत्र रा. देव यांनीं प्रसिद्ध करून महाराष्ट्रावर
मोठे उपकार केले आहेत. कारण त्या पत्रावरून समर्थ व शिवाजी राजे यांचा
परस्परसंबंध कशा प्रकारचा होता, हें कोणासहि स्पष्टपणें कळून येण्याजोगें आहे.
तें पत्र इतकें महत्त्वाचें आहे कीं, त्यांतील महत्त्वाचा भाग येथें उद्धृत करून
घेतल्यावांचून राहवत नाहीं. तें पत्र असें:—
श्री
श्रीरघुपती. श्रीमारुती.
श्रीसद्गुरुवर्य श्रीसकलतीर्थरूप श्रीकैवल्यधाम
श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामीचे सेवेसीं.
चरणरज शिवाजी राजे यानी चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना जे: मजवर
श्रीसमर्थांचे अल्प चरित्र. १३
कृपा करूनु सनाथ केले आज्ञा केली कीं, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करूनु धर्म-
स्थापना देवब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून पाळणरक्षण करावे; हें व्रत
संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जें मनीं धराल तें श्री......सिद्धींस पाववील.
त्याजवरून जो जो उद्योग केला, व दुष्ट तुरूक लोकांचा नाश करावा, विपुल द्रव्य
करूनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐसीं स्थळें दुर्घट करावी, ऐसें जें जें मनीं धारिलें
ते ते स्वामींनीं आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केले. याउपरी राज्य सर्व संपादिले, तें
चरणीं अर्पण करूनु सर्व काळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला. तेव्हां
आज्ञा जाहाली कीं, तुम्हास पूर्वी धर्म सांगितले ते च करावेस, तीच सेवा होय,
ऐसें आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें, श्री......ची
स्थापना कोठें तरी होऊनु सांप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीर्ण घडावी, ऐसी
प्रार्थना केली; तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करूनु चाफळीं श्री......ची
स्थापना करूनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली. त्यास चाफळीं श्री....ची
पूजा मोहोच्छाव ब्राह्मणभोजन अतिथि इमारत सर्व यथासांग घडावे. जेथें जेथें श्री...
च्या मूर्तिस्थापना जाहाली तेथें उच्छाव पूजा घडावी, यास राज्य संपादिले. यांतील
ग्रामभूमि कोठें काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हां आज्ञा जाहाली कीं, विशेष
उपाधींचें कारण काय ? तथापि तुमचे मनीं श्री...ची सेवा घडावी हा निश्चय झाला.
त्यास यथाअवकाश जेथें जें नेमावेसे वाटेल तें नेमावें व पुढें जसा सांप्रदायाचा व
राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तसें करीत जावें. याप्रकारें आज्ञा जाहाली. या-
वरूनु देशांतरीं सांप्रदाय व श्री......च्या स्थापना जाहल्या, त्यास ग्रामभूमीचीं
पत्रें करून पाठविलीं. श्री......संनिध चाफळीं एकशैकवीस गांव सर्वमान्य व
एकशैकवीस गांवीं अकरा बिघेप्रमाणें भूमि व अकरा स्थळीं श्री......ची स्था-
पना जाहाली. तेथें नैवेद्य पूजेस भूमि अकरा बिघेप्रमाणें नेमिले आहेती. ऐसा
संकल्प केला आहे, तो सिद्धीस नेहण्याविषयीं विनंति केली; तेव्हां संकल्प केला
तो परंपरेनें सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहाली. त्याजवरून सांप्रत गाऊ व
भूमी नेमिले.........तपशील.
( येथें ३३ गांवे, ४१९ बिघे जमीन, एक कुरण,
१२१ खंडी धान्य यांचा तपशील आहे.)
येकूण दरोबस्त सर्वमान्य गांउ तेहतीस व जमीन बिघे गाऊगना चारशें
येकोणीस व कुर्ण येक, व गल्ला खंडी एकशेंएकवीस श्री......चे पूजाउच्छाहाबद्दल
संकल्पांतील सांप्रत नेमिले व उच्छाहाचे दिवसास व इमारतीस नक्की ऐवज व
धान्य मनयाचे समयास प्रविष्ट करीन. येणेंकरोन अक्षई उच्छाहादि चालविण्या-
विषयां आज्ञा असावी-राज्याभिषेक ५, कालयुक्ताक्षी नाम संवत्सरे, आश्विन शुद्ध
१० दशमी, बहुत काय लिहिणें हे विज्ञापना.
या पत्रावरून असें स्वच्छ दिसून येतें कीं, शिवाजीमहाराजांस स्वराज्य-
स्थापनेचा कानमंत्र समर्थांनींच सांगितला. तसेंच समर्थांचें वर्तन महाराजां-
बरोबर फारच निस्पृहपणाचें होतें. समर्थ सांप्रदायाच्या रूपानें उपाधीचा
विस्तार करीत; पण स्वतः मात्र त्यांत लिप्त होत नसत. चाफळास त्यांनीं
रामस्थापना केली, परंतु ते स्वतः बहुधा गिरिगव्हरींच राहत. इतर साधुसंतां-
प्रमाणें सांप्रदायामुळे प्राप्त होणारे भोग त्यांनीं कधीं उपभोगिले नाहींत. त्यांच्या
चरित्राचें खरें रहस्य व थोरवी त्यांच्या ह्या वर्तनांतच आहे.
समर्थ सज्जनगडावर राहूं लागल्यावर थोड्याच वर्षांनीं (शके १६०२)
शिवछत्रपति कैलासवासी झाले. त्या कारणानें त्यांस मोठें दुःख झालें. संभाजीची ।
लहरी व दुराचारी वृत्ति त्यांस ठाऊक असल्यामुळे तर त्यांचें हें दुःख विशेषच
दुणावलें. बहुत सायास व कष्ट सोसून शिवरायाच्या हस्तें ज्या स्वराज्यमंदिराची
भव्य व दैदीप्यमान इमारत आपण उभारली, तिची हा करंटा पोर वाताहात
करील कीं काय, अशी त्यांस शंका वाटू लागली होती. परंतु त्याला सर्वस्वीं
ताळ्यावर आणण्याचा अथवा तसें न झाल्यास राज्यरक्षणार्थ अन्य कांहीं घडा-
मोड करण्याचा यत्न करणें, वृद्धापकाळामुळे (वय ७२) त्यांस अशक्य झालेलें होतें.
तथापि ह्या राज्यरक्षणासंबंधीं त्यांच्या मनाला जी तळमळ वाटत होती, ती
त्यांनीं पत्रद्वारें संभाजीस कळवून त्यास आपल्या पित्याचें अनुकरण करून
त्याचा नांवलौकिक राखण्याचा उपदेश त्यांनीं मोठ्या कळवळ्यानें केला
होता. त्या उपदेशाचा मनावर परिणाम होऊन संभाजी राजा समर्थांच्या
भेटीसहि आला होता. पुढें लवकरच म्हणजे शके १६०३ मध्यें सम-
१. त्यांच्या ह्या दुःखाचें वर्णन 'समर्थप्रतापांत' असें आहे:—
समर्थ स्वप्रकाशें अंधारीं तीन मास बैसताती । मुरुमपात्रें उदकें सेविताती ।
शकलपात्रें घेऊनि धावताती । अरण्याकडे दुश्चित्तें ॥ ६४ ॥ ( स० २० )
श्रीसमर्थांची शिकवण. १५
त्यांचेहि देहावसान झाल्यामुळे संभाजीच्या मनावर साक्षात् त्यांच्या दिव्य
मूर्तीचें पडणारें दडपण नष्ट झाल्यानें त्यांचा उपदेशहि तो विसरत गेला.
त्याचे अखेर परिणाम काय झाले, हें मराठ्यांचा इतिहास सांगतच आहे ! संभाजी-
च्या दुर्वर्तनामुळे शिवाजीनें उभारलेल्या स्वराज्याच्या भव्य इमारतीस बरेच धक्के
बसले; परंतु समर्थांनीं आपल्या सांप्रदायाच्या द्वारानें महाराष्ट्रांत ‘महाराष्ट्र-
धर्माची ( नीति + धर्म + राजकारण = महाराष्ट्रधर्म ) स्थापना करून महाराष्ट्रीय
लोकांमध्ये जी कर्तव्यबुद्धि जागृत केली होती, तिचीं पाळेमुळे महाराष्ट्रसमा-
जांत खोलवर जाऊन पोंचलेलीं असल्यामुळे सदर धक्क्यांनी ती इमारत ढांसळून
पडली नाहीं. उलट पुढें तिचा मोठा विस्तार होऊन सुमारें एक शतकभर ती
उद्दिष्ट कार्य चांगल्या रीतीनें करीत होती. एवढें मोठें सामर्थ्य महाराष्ट्रांत ज्या
सांप्रदायाच्या द्वारें समर्थांनीं उत्पन्न केलें, त्या सांप्रदायाचें स्वरूप काय व त्याच्या
द्वारें महाराष्ट्रास त्यांनीं काय शिकविलें याचा अंम
१६ उपोद्घात.
सना, आणि (२) निरूपण म्हणजे अद्वैताचें विवरण, असे दोन विभाग आहेत.
पैकीं पहिला, समाजास परमेश्वराची भक्ति करावयास लावून त्यास नीतिमान
व स्वधर्मपरायण बनवितो; आणि दुसरा, जीवशिवांचें ऐक्य घडवून मनुष्यास
मोक्षाचा लाभ करून देतो. मोक्ष-मुक्ति-हेंच मानवी प्राण्यांचें अंतिम साध्य
आहे, असें समर्थांचें मत असून खुद्द त्यांचें स्वतःचेंहि तेंच ध्येय आहे.
संसार हा सर्व मायेचा पसारा असून खोटा आहे. माया ही सत्त्व, रज व तम
या तीन गुणांनीं युक्त आहे, त्यामुळे ती तापत्रयास कारण आहे. परंतु मनुष्य-
प्राणी जन्मास आला कीं, तो या त्रिगुणातीत मायेच्या पाशांत सांपडल्यावांचून
रहात नाहीं. ह्या मायापाशांतून सुटून मुक्तस्थितीस जाऊन पोंचणें यासच
समर्थ परमार्थ म्हणतात. तो परमार्थ कसा साधावा हा अध्यात्मज्ञानाचा विषय
असून आमच्याकडील वेदान्तग्रंथांत त्यासंबंधानें यथास्थित विवरण केलेलें आहे.
समर्थांच्या दासबोध ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय ह्याच आहे. आणि त्या-
करितांच त्यांनीं 'हरिकथानिरूपण' हें आपल्या शिकवणीचें व सांप्रदायाचें मुख्य
अंग मानिलें आहे.
मोक्षसाधन हें जरी मनुष्यप्राण्याचें अथवा मानवसमाजाचें मुख्य ध्येय
असलें, तरी यच्चयावन् सर्व मानवी प्राणी हें ध्येय प्राप्त करून घेण्यास पात्र
असतात-म्हणजे कोणत्याहि काळीं सर्वत्रांची एकसारखीच स्थिति असते-असें
मात्र दिसून येत नाहीं. हें ऐतिहासिक सत्य विचारांत घेऊन समर्थांनीं मानव-
समाजाच्या ४ अवस्था कल्पिल्या आहेत. (१) बद्ध, (२) मुमुक्षु, (३) साधक
व (४) सिद्ध ह्या त्या अवस्था होत. मोक्षसाधन हें प्रत्येक मनुष्यास शक्य आहे,
असें वेदान्त्यांप्रमाणें समर्थांचेंहि मत आहे. परंतु 'सिद्धा'ची अवस्था प्राप्त
झाल्याखेरीज मात्र कोणासहि मोक्ष मिळवितां येणार नाहीं, हें त्यांनीं स्पष्ट
करून सांगितलेलें आहे. ही अवस्था प्रत्येक माणसास प्राप्त करून घेतां येईल
असें त्यांनीं—
कोणासीच नाहीं बंधन । आंतीस्तव भुलले जन ।
दृढ घेतला देहाभिमान । म्हणोनिया ॥ ५।६।५७ ॥
या ओवीच्या द्वारां सूचित केलें आहे. परंतु सिद्धाची अवस्था प्राप्त होण्यास
मायेचा बंध तोडून टाकावा लागतो. तो तोडून टाकणें हें जरी शक्य असलें
तरी तें फार दुस्तर असल्यामुळे अखिल मानवप्राण्यांना एकसमयावच्छेदेंकरून
तें साध्य होत नाहीं, असें मानवसमाजाच्या आजपर्यंतच्या इतिहासावरून सिद्ध
आहे. मानवसमाजांतील बहुतेक प्राणी उपरोक्त मायेनें लिप्त म्हणजे बद्ध स्थितीं-
तच असतात. कांहीं थोडे लोक मुमुक्षु बनलेले असतात, व त्यांतूनही थोडे
साधक, आणि फारच थोडे—हाताच्या बोटांनीं मोजण्याइतके—सिद्धकोटींत गेलेले
असतात. ह्या निरनिराळ्या अवस्थांचीं लक्षणें समर्थांनीं दासबोधांत विस्तृतपणें
सांगितलीं आहेत. त्यावरून असें दिसून येतें कीं, मनुष्याची ‘बंधनभ्रांति’
उडून गेली म्हणजे त्याचे ठायीं मुमुक्षेचा उदय होतो. तो झाल्यावर तो मनुष्य
सत्त्वगुणसंपन्न व परोपकारी बनतो. त्याचा अहंकार जळाला म्हणजे तो साधक
होतो. साधक झाला तरी त्याचे ठायीं ‘तें’ व ‘मी’ ह्या भेदाची जाणीव रहा-
तेच. ती नष्ट होऊन ‘तें’ (ब्रह्म) व ‘मी’ एकच अशी भावना जेव्हां होते,
तेव्हां तो सिद्धाच्या स्थितीस पोचून मोक्षाचा मालक होतो. सिद्ध व साधक
हे जरी थोडे असले तरी बाकीच्या सर्व मानवांना मोक्षमार्गाकडे नेण्यास ते
समर्थ असतात; व तसें करणें हें रामदासांच्या मतें त्यांचें कर्तव्यच आहे.
कारण त्यांत त्यांचें स्वतःचेंहि हित आहे. सर्व समाज जर बद्ध अतएव विपन्न
व दुःखी असेल, तर त्या स्थितीचा स्पर्श अंशतः तरी सिद्ध व साधक यांस
होऊन त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा भंग झाल्यावांचून राहणार नाहीं. अर्थात्
त्यांनाहि दुःखाचे आवेग सहन करण्याचा प्रसंग येऊन तेहि विपन्न व बद्ध होऊं
लागतील! ही स्थिति टाळण्याकरितां म्हणून तरी स्वसमाजाला उन्नतावस्थेकडे
नेणें त्यांस भाग आहे. हें कार्य त्यांनीं कसें सिद्धीस न्यावें याचा विस्तृत प्रपंच
करण्यांतच समर्थांनीं आपल्या दासबोधाचा बहुतेक भाग व्यापला आहे. हें
कार्य साधण्याकरितां तीन उपाय किंवा साधनें समर्थांनीं सांगितलीं आहेत. ते
तीन उपाय म्हटले म्हणजे नीति, धर्म व राज्य—अर्थात् स्वराज—यांची समा-
जांत स्थापना करून त्यांची अभिवृद्धि करणें हे होत. सगुणोपासना किंवा हरि-
कथा आणि वर्णाश्रमधर्मांचें निरूपण करून त्यांनीं नीति व धर्म यांच्या स्थापनेचा
मार्ग दाखवून दिला आहे. परंतु धर्म व नीति यांस जर राज्यसंस्थेचें पाठबळ
नसेल तर त्यांची अभिवृद्धि होण्यास मोठी अडचण पडते. ती कशी याचें स्पष्ट
चित्र त्या वेळच्या समाजस्थितीच्या रूपानें समर्थांच्या डोळ्यांपुढें होतें. तें त्यांनीं