सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
सत्तावीस
पाणी आणून विनवितात, 'घाव घाली आई । आता पाहातेस काई ॥ धीर नाहीं माझे पोटीं । झालो
वियोगें शिपुटी ॥ करावें शीतल । बहु झाली हळहळ ॥ तुका म्हणे डोई । कई ठेवीन हे पायीं ?' या
मळमळयाने तुकोबाचा जीव फुटून निघत असे कधी त 'पढरीची वाट पाहे निरंतर । निढळावरी कर
ठेवूनिया' असे म्हणतात, तर बधी 'तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवा पाडुरंगा ?'
म्हणून अधीरता दाखवितात 'डोळिया पाझर कठ माझा दाटी । येई वो येई भेटी पाडुरंगे । बहु दिस
टाकिले निरास का केले । कोठे वो गुंतले चित्त तुझें ? । बहु घडा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव
माझा कंठीं ।' अशी अवस्था त्याच्या मनाची होऊन जात असे त्याचा जीव तृषाक्रान्त हात असे 'करावा
वर्षाव । तृषाक्रान्त झाला जीव' असे त्यांनी म्हटले आहे
प्रकाशाचा दिवस
अशा तळमळीतून एखादा दिवस मग प्रकाशाचा उगव शुभ शकुनाची खूण पटे संताचा
समागम होई श्रीविठ्ठलाचे चरण दिसताच सारी व्यथा दूर होऊन जाई 'शुभ झाल्या दिशा अवघाचि
काळ । अशुभ मंगळ मंगळाचे अशी स्थिती होत असे 'ढवळले तदाकार । अंधार जो निरसला । रूपो
जातां नाहीं ठाव । प्रकट आहे पसारा ।' असा अनुभव त्याना मध्येच येत असे. श्रीहरीच्या भेटीन
मन तृप्त होऊन जाई सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे, अशी जाणीव दाटून येई 'आत हरि बाहेर
हरि । हरिनें घरीं कोष्टिले' अशी सर्वात्मकता अनुभवास येत असे 'जेथें जातों तेथें तू माझा सागाती ।
चालविसी हातीं धरूनिया । चालीं वाटे आम्हीं तुझाचि आधार । चालविसी भार सर्व माझा' अशी
जवळीव पांडुरंगाची पटत असे 'सुखाचें ओतले । दिसे श्रीमुल चांगलें ।', 'मनें धरिला अभिलाष । मिठी
घातली पायांस । होता दृष्टा-दृष्टी । ताप गेला उठाउठी ॥ तुका म्हणे झाला । लाभैं लाभ दुनावला'
अशा भाषेत मग विठ्ठलभेंटीचा लाभ झाल्यावरची तृप्ती वर्णन केली जात असे 'देहभान पालटली काया ।
पडली छाया ब्रह्मची ॥ जोडिले हे न सरें धन । अविनाश आनंदघन ॥ अमूर्त मूर्ति मधुसूदन । सम-
चरण देखियेले ॥'
'हिरा शोभला कोदणीं'
या भेटीच्या आनंदात व संतसहवासात तुकोबाना आकाश ठेंगणे हाने त्याची दैन्याची अवस्था
संपते सर्व संशय फिटतान शंका निवारल्या जातात 'दैन्य गेले हरली चिंता । सदैव आता यावरी'
चिंतामुक्त अवस्थेचे वर्णनही तुकोबानी पुष्कळ अभंगात केलें आहे या आनंदाच व स्वसुखाचे चित्तवेधव
वर्णन तुकाराम महाराजानी एका अभगात केले आहे
सर्वत्र त्याचीच पावले दिसू लागली 'देव झाले अवघे जन । दोषगुण हरपले ।' अशी अवस्था होऊन
गेली 'आमुचा स्वदेश । भुवनत्रयामध्ये वास' अशी विशाल दृष्टी होत राहिली 'जेथे देखे तेथे तुझांच
पाऊलें । विश्व अवघें कोंदाटलें ।' ईश्वराच्या भेटीची, साक्षात्काराची, आत्मानुभूतीची बोलकी व
सजीव चित्रे, तुकाराम महाराजांच्या अभंगांतून स्पष्टपणे जाणवतात एकदा त्यांनी म्हटले आहे, 'माझे
माथा तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥ ऐसी पडियेली गाठीं । शरीरसंबधाची मिठी ॥'
अशा प्रकारे स्वानंदाचा लाभ तुकारामांना झाला ईश्वराची भेट झाली सर्वोत्तम सुखाचे
साधन हाताशी आले ते त्याच्या स्वरूपाशी जाऊन भिडले तो व आपण एकच, ही अनुभूती आली
आत्मा-परमात्मा, जीवशिव, याच्यातील भेद संपला पुढे काय ? ज्या अद्वैताच्या अनुभूतीसाठी तुकाराम
महाराजांचा जीव तळमळत होता, ती प्राप्त झाली ईश्वर अगदी जवळून भेटला दूरत्व संपले दुजाभाव
नाहीसा झाला अणुरेणूहूनही लहान असणारा तुका आकाशाएवढा झाला परंतु पुढे काय ? जीविताची
हीच सार्थकता असल्यावर पुढे काय ? हा प्रश्नच निरर्थक म्हणावयाचा की काय ?
'मग या सतसंगा पाहूं कोठें ?'
परंतु संतांच्या पारमार्थिक जीवनात याही प्रश्नास महत्त्व आहे आत्मस्थितीचे ज्ञान झाले,
ब्रह्माची अनुभूती आली, मोक्षसुखाची चव सापडली म्हणजे मग सर्व संपले की काय ? वैकुंठास
किंवा मोक्षास पोचल्यावर मग काय उरणार ? मुक्ती मिळाल्यावर मग आणखी काय हवे ? अद्वैताच्या
अनुभूतीपेक्षा आणखी श्रेष्ठ काय आहे ? तुकारामबुवांनी उत्तर दिले आहे, या ब्रह्मज्ञानापेक्षाही
भक्तीची आर्तता श्रेष्ठ आहे तू व मी एकच या भावापेक्षा, तू देव, मी भक्त, हे ऐक्यभावावरचे दुजेपण
अधिक गोड व रमणीय वाटते त्यांना ऐक्यभावाचे ज्ञान झाल्यावर, विठ्ठलाशी मीलन झाल्यावर, वेगळे
होता त्यावेळच्या सुखाची आठवण त्यांना होते सर्व एकच आहे अशा अनुभूतीत स्तवन कुणी कुणाचे
करायचे ? कुणी कुणाच्या पायावर डोके ठेवायचे ? आर्त वाणीने पुकार कुणी करायचा ? कुणी कुणास
दुःख सांगायचे ? कुणी कुणाची सेवा करायची ? कुणी कुणाचे रक्षण करायचे ? कुणी कुणावर
रुसायचे ? कुणी कुणाशी भांडायचे, लटक्या भावाने रागवायचे ? या मी-तूंपणाच्या भावातील
गोडीचे सुख मग संपलेच की काय? मुक्तीच्या स्थितीत, ऐक्यभावात, मोक्षसुखात तळमळ नाही, विरह
नाही, आर्त वाणी नाही, स्मरण नाही, उत्कंठा नाही, हुरहुर नाही, आणि म्हणून या अवस्थेतील सुखही
नाही संताची संगत नाही, की डोळे भरून सुंदर रूप पाहणे नाही म्हणूनच एकदम नामदेवतुकरामा-
सारखे संत बोलून जातात, 'झणी मुक्तीपद देशी पांडुरंगा । मग या सतसंगा पाहू कोठें ?'
एकोणतीस
अभंग ईश्वराच्या साक्षात्काराच्या आधीचे असतील, अस निश्चयान म्हणता येत नाही कारण भक्तीच्या
सुखासाठी, प्रेमाच्या भोगासाठी, नाना प्रकारचे भाव थोर भक्त पुन पुन व्यक्त करीत असतात
'मी भक्त तू देव ऐसे करी'
आणि याचसाठी पुष्कळ ठिकाणी त्यानी मुक्तीची किंवा ब्रह्मज्ञानाची अथवा आत्मस्थितीची
पर्वा केलेली नाही ' नसो ब्रह्मज्ञान आत्मस्थिति भाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥ दावी रूप मज
गोपिकारमणा । ठेवू दे चरणावरी माथा । पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंवलोण उतरेन ।
पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकान्त सुखगोष्टी' अशा प्रकारे सगुणाशी प्रेम वाढवावे, सगुणरूप
डोळे भरून पाहावे, चरणावर माथा ठेवावा, आलिंगन द्यावे, जीव ओवाळून टाकावा, काही मनातील
हितगुज करावे, एकान्तातील सुखगोष्टी कराव्यात व त्या प्रभूच्या नामस्मरणात आणि सत्सगात दग
होऊन जावे, पण हे सुख आत्मस्थितीच्या भावात, ब्रह्मपदात अथवा मोक्षस्थितीत नसले म्हणूनच
तुकाराम महाराज म्हणतात, 'सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करटा।' भक्तिरसाच्या गोष्टीत
मोक्षसुखास तुच्छ लेखिलेले असून 'अवघाचि ससार केला ब्रह्मरुप । विठ्ठल स्वरूप म्हणोनिया' हा
अनुभव अधिक श्रेष्ठत्वाचा त्यानी मानला आहे मुक्त तरी कुणास म्हणायचे ? ज्याला बंधनच नाही
त्याला कोण मुक्त करणार ? यासाठीच तुकाराम महाराज म्हणतात, 'देवा ऐक हे विनती । मज नको
रे हे मुक्ती' मग काय हवे ? त्याचेही उत्तर असे की, 'आत्मस्थिती मज नसो हा विचार । देई निरंतर
चरणसेवा' दया, तुझ्या पायाची सेवा, तुझ्या मुखाचे दर्शन, तुझ्या नामाचे भजन, मताचा सहवास,
अखंड तुझे अनुसंधान, याखेरीज मुग दुसरे कुठले रे ? म्हणूनच तुकोबानी विनविले आहे, 'मोक्ष तुमचा
देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा । मज भक्तीची आवडी । नाहीं अत्तरी ते गोडी' मोक्ष, वैकुंठ, मुक्ती,
ब्रह्मस्थिती याची थोरवी कोठवर आहे ? जोपर्यंत पंढरपूरचे वैभव पाहिले नाही तोपर्यंत, जोपर्यंत
पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तोपर्यंत या सत्ताचे सर्वसुख म्हणजे परपूराच्या विठ्ठलाचे पाय हेच होय.
तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,
जववरी नाहीं देखिली पंढरी । तववरी थोरी वैकुंठांची ॥
मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीन रूप ॥
वृंदावन सडे चोक रगमाळा । अभिनव सोहळा घरोघरीं ॥
नामघोष कथा पुराण कीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंगा ॥
सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्मा तें केवळ नांदतसे ॥
तुका म्हणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरी ॥
तीस
भाऊ पुंडलिक मुनि । चंद्रभागा आमुची वहिणी ॥ तुका जुनाट मिरासी । ठाय दिला पायापाशीं ' या
पंढरपुरास केवढे सुख आहे ! हे भूवैकुंठच आहे येथे पाऊल ठेविले की, 'सोनियाचा दीन' उगवतो
आनंदाचा गजर होतो संतसज्जनाची संगत मिळने. विठ्ठलास क्षेम, आलिंगन देता येते. सखा मायबाप
प्रत्यक्ष भेटतो 'माउली वोळली प्रेमपान्हा' असा अनुभव येतो
जे दोष इतर कोणत्याही तीर्थास गेल्याने जात नाहीत, ते पंढरपूर येथील वास्तव्याने दूर
होतात, असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे कारण पंढरपूर हे 'सकळ तीर्थांचे माहेर । भूवैकुंठ
निर्विकार । होतो नामाचा गजर । असुर काळ कापतो । नाहीं उपमा द्यावया । समतुल्य आणिक ठाया ।
धन्य धन्य जया । जे पंढरपूर देखती ' या क्षेत्राचे माहात्म्य मराठी संतांनी परोपरीने गाइले आहे
' ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे' असा या स्थानाचा महिमा आहे म्हणूनच तुकाराम महाराज
म्हणतात, 'तीर्थे केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥ जळो त्याचे जालेपण । न देखेचि समचरण ।'
या पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाचे समचरण पाहून मन तृप्त होते 'शीतळ हा पंथ माहेरची वाट । जयळीच
नीट सुखरूप ॥' हा पंढरपूरचा देव 'कृपावंत होय नामें एका' अशा थाटात तुकाराम महाराजांनी या
क्षेत्राचे, विठ्ठलाचे, साधुसंताच्या संगतीचे, नामस्मरणाचे महत्त्व परोपरीने सांगितले आहे
'ते हे जोडी संतपाय'
संतांची संगत तर तुकोबांना देवापेक्षाही प्रिय वाटते कारण संत हे देवाचेच रूप त्यांनी
मानले आहे या संतांचे उपकार किती सांगावेत ? नित्य मनास जागृती देण्याचे कार्य ते करीत
असतात त्यांच्यापायी जीव ठेविला तरी तो थोडा होईल धेनूच्या चित्तात जसे वत्स असते, तसे हे
संत माझी काळजी घेतात, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे संत हे त्यांना खरे सगेसोयरे
वाटतात 'दसरा दिवाळी तोचि सण आम्हा । सखे संतजन भेटतील' असा आनंद संतभेटीमुळे त्यांना
होत असतो या संतांच्या पादुका घेऊन मी नृत्य करीन, असे त्यांनी म्हटले आहे 'संत मार्गी चालती ।
त्याची लागे मज माती' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे 'संताच्या घरांचा दास मी कामारी ।
दारीं परवरीं लोळतसे' अशी त्यांची भूमिका होती 'सर्व सुखें आजी एथेंचि वोळलीं । संतांची देखिलीं
चरणार्वुजें' अशी त्यांची निष्ठा होती त्यांची संतांना नेहमी प्रार्थना असे की, 'तुमचिये दासीचा
दास करुनी ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज । आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥ गोमटें
तें करा माझें । भार ओझें तुम्हासी,' कारण आपले फार मोठे भाग्य म्हणून संतांचे हे पाय आपणास
पाहावयास मिळाले, असे त्यांना वाटे 'भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय । येथूनिया तुटो माया ।
मरणापासुनि सर्वथा ॥ होई बळकट । माझ्या मना रे तू धीट ।' अशा शब्दात संतकृपेने आपल्या
भाग्याचा उदय झाल्याचे तुकोबांनी सांगितले आहे
कीर्तनातील ब्रह्मारस
संतसहवासाप्रमाणेच नामस्मरणाची व कीर्तनाची, भजनाची महती तुकोबांनी वारंवार वर्णन
केलेली आहे 'नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींचीं' म्हणून त्यांनी या साधन-
मार्गांची सुलभता स्पष्ट केली आहे कारण या मार्गात 'न लगती सायास जाये धनान्तरा । सुखें
येतो घरा नारायण ॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥ राम कृष्ण हरी
विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥ याविण असता आणिक साधन । वाहत्से आण विठोबाची ॥'
याप्रमाणे तुकोबांनी सर्व लोकांना नामसंकीर्तनाचे एक सुलभ साधन उपलब्ध करून दिले 'नाम गोड
नाम गोड । पुरे कोड सगळही' अशी या नामाची महती आहे या नामामुळे व भजनकीर्तनाच्यामुळे
... एकतीस ...
तुकाराम महाराजांनी ईश्वराची जवळीक सर्वांच्या घरीच आणून उभी केली. कारण 'कथा देवाचें हें
ध्यान । कथा साधन मंडण ॥ कथे ऐसें पुण्य । आणिक नाहीं सर्वथा ॥ ऐसा साच खरा भाव । कथे-
माजी उभा देव ।।' एवढी महती कथाकीर्तनाची त्यांनी सांगितली आहे. या हरिरूपेत देव, भक्त
आणि नाम असा त्रिवेणीसंगम असतो. 'तीर्थे तया ठायां । येती पुनीत व्हावया' इतका या कथेचा
महिमा तुकारामांच्या मते मोठा आहे. या कीर्तनातील सुख किती मोठे आहे ?
सोपें धर्म आम्हां सांगितलें संतों । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा ॥
समाधीचें सुख सांडा ओवाळून । ऐसा या कीर्तनीं ब्रह्मरस ॥
कथा ज्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी आपल्या दूतांनी जाऊ नये, अशी यमाची त्यांना
आज्ञा असल्याचे तुकोबांनी सांगितले आहे. कीर्तन ही खरीखुरी व थोर दर्जाची समाधी असून सर्व
प्रकारची सुखे या कीर्तनात प्राप्त होतात
जप तप ध्यान नलगे धारणा । विठ्ठल कीर्तनामाजी उभा ॥
राहे माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥
कीर्तनीं समाधि, साधन तें मूळ । राहतील धारा धरोनियां ॥
तुका म्हणे मुक्ति हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी रिद्धीसिद्धी ॥
'उरलों उपकारापुरतां'
अशा प्रकारे तुकोबांची अभंगवाणी विठ्ठलप्रीतीने रंगलेली आहे. तीच स्वानुभूतीचे तेज आहे.
भक्तीचा जिव्हाळा आहे नामसंकीर्तनाचा, संतमाहात्म्याचा, विठ्ठलरूपाचा, व भक्तितत्त्वाचा जयजयकार
आहे या अतिशय पावन व परम मंगल अशा वाणीने समकालीन नव्हे, तर पुढेही अनेक शतके उपयुक्त
होईल, अशा उपदेशामृताचा वर्षाव केला आहे. आपली वाणी ही ईश्वराची वाणी असून आपण त्याचेच
कार्य करावयास आलो आहोत, असा सार्थ अभिमान व विश्वास त्यांना वाटत असे. त्यांच्या उपदेशात
ईश्वरी शक्तीचे तेज व स्वजनाविषयी तळमळ असल्यामुळेच त्याचा प्रभाव आजही पडण्यासारखा आहे.
'धर्मचें पाळण । करणे पाषांड खंडण ॥ हेंच आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥' या एका
कार्यासाठी आपला अवतार आहे असे त्यांनी म्हटले आहे 'आम्ही वैकुंठनवासी । आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥ झाडूं संतांचे मारग । आदरानीं भरले जग । उच्छिष्टाचा भाग ।
शेष उरला तो सेवूं ॥ अर्थ लोपलीं पुराणे । नाश केला शब्द ज्ञानें ॥ विषयलोभी मनें । साधनें बुडविलीं ॥
पिटूं भक्तीचा डांगोरा । कळी काळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥' या एकाच
कार्यासाठी तुकारामबुवा स्वतःस साक्षात्कार झाल्यानंतरही उरले होते 'तुका म्हणे आतां उरलों उप-
कारापुरता ॥' असे त्यांनीच म्हटले आहे. 'आपण जेवुनी जेववी लोकां । संतर्पण करी तुका' ही
त्यांची भूमिका होती. लोकांना सन्मार्गास लावून त्याचे सर्वतोपरी कल्याण साधणे, एवढेच कार्य त्यांना
आता उरले होते. या साठी 'तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे । नाहीं भीड भार । तुका म्हणे
सांगा थोर' अशी आपली भूमिका निर्माण करावी, या साठी ते 'कांस घालोनि बळकट । आलो कळि-
काळाशीं नीट' अशा भूमिकेवरून लोकांना म्हणत आहेत; 'या रे या रे लहान थोर । याती भलते
नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी' कुणासही चिंता उरू नये, या भूमिकेवरून त्यांनी
लोकांना उपदेश केला. तो आजही कितीतरी अधिक अर्थाने उपयुक्त आहे. पराकोटीची निवृत्ती कोण-
त्याही संताने शिकविली नाही. पण केवळ धनदौलत व स्वतःची बायकामुळे, यातच रमणाऱ्या माणसाची
गयही त्यांनी केलेली नाही. माणसाच्या जन्मास येऊन काय मिळवायचे, हे फक्त तुकाराम महाराजांसारखे
सद्गुरुच सांगू शकतात.
.. बत्तीस .
शाश्वतचा विसावा
अशी ही पावन व मगंलकारी तुकोबाची वाणी ही नारायणाच्या कृपेने रगलेली आहे ती
देवाचा निरोप सागणारो आहे खऱ्याखोट्याचा निवाडा करणारी आहे वेदाचा व पूर्वपरंपरेचा अर्थ
यथार्थत्वाने सागणारो आहे तिला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आहे परतत्त्वाच्या स्पर्शाने ती सतेज बन-
लेली आहे ईश्वरी प्रेमाने ती लडिवाळ व कमालीची रसाळ झाली आहे तिला अमृताचे माधुर्य आहे,
चंद्रिकेची शीतलता आहे. तिला चंदनाचा सुगध आहे, तिला विठ्ठलरूपाचा स्वाद आहे 'तुका म्हणे चवी
आले । जें कां मिश्रित विठ्ठले,' तुकोबाचे सर्व जीवनच विठ्ठलस्पर्शाने पावन झालेले होते त्याची शाश्वत
टिकणारी अशी ही अभंगवाणी, आजच्या पडत्या काळात, घाईगर्दीच्या काळात, तीव्र जीवनकलहाच्या
काळात, अशांततेच्या काळात, धामधुमीच्या व क्वचित प्रसंगी अराजकाच्या काळात, माणसाच्या मनास
सावरणारी आहे, धीर देणारी आहे तिच्या सावलीतच माणसाचे तप्त मन आजही विसावा घेऊ शकेल,
आजही त्यास अलौकिक सुखाचे व आंतरिक समाधानाचे मार्ग स्पष्टपणे दिसतील ते तुकाराम महारा-
जाच्या या वाणीच्या सौम्य व शीतल प्रकाशातच
॥ श्रीविठ्ठलाय नमः ॥
॥ श्रीनिवृत्तिनाथाय नमः ॥ श्रीज्ञानेश्वराय नमः ॥
॥ श्रीराघवचैतन्यश्रीकेशवचैतन्य ॥
॥ श्रीबाबाचैतन्यसद्गुरुभ्यो नमः ॥
मंगलाचरण-अभंग ६.
१ समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥ १ ॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ २ ॥
ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित' क्षणीं जडो देसी ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - समचरण- एकसारखी पावले, साजिरी-शोभिवंत, वृत्ति-अंतःकरणाची प्रवृत्ती,
चित्ताचे लक्ष, न लगे-लागत नाहीत, मायिक-डोळ्यांना दिसणारे, भासमान होणारे, परंतु वस्तुत नाशवंत वा
अशाश्वत असणारे, आर्त्त-इच्छा, आसुसलेली वृत्ती, ब्रह्मादिक-ब्रह्मलोक वगैरे, पदे-स्थाने, ठिकाणे, शिराणी-कळस,
शेवट, परिणाम क्षणीं-नको ( नयापारांत अप ) वर्म-मुख्य रहस्य, कर्मधर्म-कर्म आणि धर्म किंवा कर्ममूलक
धर्म, नाशवंत-नाश पावणारे
अर्थ - विटेवरील एकसारख्या पावलाकडे ज्याची दृष्टी लागली आहे, अशा सुशोभित मूर्तीकडे हे हरी,
माझ्या अंतःकरणाची प्रवृत्ती दृढ होवो १ याखेरीज दुसरे काही मायिक म्हणजे दृष्टीस मात्र दिसणारे पण वास्तविक-
पणे नसणारे असे पदार्थ मला नकोत; देवा, या पदार्थांवर माझी इच्छा कधीही जडू नये २ ब्रह्मलोक, विष्णूलोक,
इत्यादी ठिकाणे आहेत ती सर्व परिणामी दुःख देणारी असल्यामुळे त्या ठिकाणी माझ्या चित्तास लोभू देऊ नकोस ३
तुकाराम महाराज म्हणतात की कर्ममूलक असे जे जे नाना धर्म आहेत त्यांचे रहस्य आम्हास समजले आहे ते
सर्व नाशवंत असून तुझे रूप तेवढे शाश्वतवे आहे ४
विवरण -श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेतील पहिले सहा अभंग मंगलाचरणात्मक आहेत कोणत्याही
ग्रंथाचा आरंभ मंगलाचरणात्मक असावा असा रिवाज भारतीय कविमप्रदायात पुरातन काळापासूनचा आहे संस्कृत
साहित्यशास्त्रकारांनी मंगलाचरणाचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत आशीरूप, नमस्क्रियारूप, व वस्तुनिर्देशरूप
१ तेथें चित्त क्षणी
२ सार्थ तुकारामगाथा
या तीन प्रकारांनी ग्रंथाचा आरंभ मंगलमय करावा असा संकेत आहे प्रेक्षक, पाठक, श्रोता वा चिंतक यांचे कल्याण
व्हावे म्हणून जी प्रार्थना इष्ट देवतेची स्तवनवचनात केलेली असते ती आशीरूप मंगलाचरणाची होते इष्ट देवतेचे
स्मरण व वंदन ज्यात असते ते नमस्कार्यारूप मंगलाचरण व या दोन्ही प्रकाराखेरीज केवळ वस्तुनिर्देशरूप हाही मंगला-
चरणाचा एक प्रकार आहे कोणत्याही विशिष्ट देवतेचे स्मरण वा वंदन यात नसून पद्याचे आद्याक्षर अथवा आद्यपद
मंगलदायक वर्णांनी युक्त असते कधी कधी या तीनही प्रकारांच्या मंगलाचरणांनी ग्रंथास प्रारंभ केलेला असतो
तुकारामबुवांच्या गाथेच्या आरंभी असलेले सहा अभंगांचे मंगलाचरण मुख्यत नमस्कार्यारूपच आहे.
तुकारामांनी आपले अभंग लिहून ठेविले असावेत, परंतु त्या हस्तलिखिताचा पत्ता कुणासच लागलेला नाही
तुकारामांच्या काही शिष्यांनी त्यांचे पुष्कळ अभंग जतन करून ठेविले होते त्यांच्यातील अभंगाचा क्रम शक्य तो
जशाचा तसा ठेवून जी गाथा उपलब्ध आहे तीत हे सहा अभंग मंगलाचरणाचे आहेत या सहाही अभंगांत तुकाराम-
बुवांनी आपले आराध्य दैवत पंढरपूर येथील श्रीविठ्ठल यांचे अती सुंदर असे रूप वर्णन करून त्याच्या ठिकाणची
आपली अनन्य भक्ती व्यक्त केली आहे बुवांचे बरेचसे अभंग स्फुट आहेत, म्हणजे त्यातून भक्तीची स्फुट
अशी भावछटा प्रकट झाली आहे काही प्रासंगिक आहेत, आणि काहींचा अंतर्गत अशा अर्थसंधानाने गट निर्माण
झालेला आहे एखादे मोठे कथानक सांगावयास वा एखाद्या मोठ्या तात्त्विक विषयाचे निरूपण करावयास बुवा सिद्ध
झालेले नव्हते ज्याला ग्रंथ म्हणता येईल अशी रचना अर्थातच अभंगगाथेची नाही, त्यामुळे आरंभीचे मंगला-
चरण व त्याचा संदर्भ याचा अर्थ तात्पर्यानेच ध्यानात घ्यावयास हवा कुणी तरी जवळच्या शिष्याने बुवांचे चांगले
अभंग निवडून ते प्रथम मंगलाचरण म्हणून बसविले असण्याचीही शक्यता आहे आणि हे पूर्वप्रथेस शोभून दिसणारे
असल्याने संप्रदायातही रूढ झाले
पंढरपूरचे श्रीविठ्ठल किंवा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ,
तुकाराम आदी साधुसंतांनी याच दैवताच्या भक्तीचा पुरस्कार देशी भाषेतून काव्यरचना करून केला श्रीविठ्ठल हे
श्रीविष्णूचे वा श्रीकृष्णाचे बालरूप मानले जाते पुंडलीक महानुभींच्या काळापासून हे दैवत भक्तांच्या रक्षणासाठी
भिवरा नदीच्या या चंद्रभागेच्या काठावर विटेवर स्थिर झाले आहे पुंडलीक मुनींची मातृपितृभक्ती पाहून संतुष्ट
झालेले देव पंढरपुरास आले व त्यांच्या आग्रहाखातर तेथेच भक्तजनांसाठी राहिले अशी कथा आहे या विठ्ठलाचे
रूपवर्णन मोठ्या प्रेमाने अनेक संतांनी विविध प्रकारांनी केले आहे बहुतेकांच्या वचनांतून एक प्रकारची समानता
आहे श्रीविठ्ठल हा समचरणदृष्टीचा आहे असे सर्वांनी सांगितले आहे 'समचरणी मन माझें वेधलें', 'समचरणीं
उभा चैतन्याचा गाभा', 'समपाऊलें उभा', 'तें समचरण विटेवरी', 'समचरण विटेवर। कटीं धरूनिया कर'।
इत्यादी अनेक ओळींतून एकनाथांनी श्रीविठ्ठलाच्या समचरणांचे वर्णन केले आहे
श्रीविठ्ठल विटेवर उभा असल्याची साक्ष तर सर्वच अभंगांतून मिळते आईबापांच्या सेवेत रममाण झालेल्या
पुंडलीकाने एक वीट विठ्ठलास दिली व त्यावर उभे राहण्यास विनविले याचा कथासंदर्भ आहे या विटेचीही पुराणात
कथा सापडते इंद्राचा शत्रू वृत्रासुर यास तीन तोंडे असून त्याने इंद्रपदासाठी घनघोर तपश्चर्या आरंभिली होती
इंद्राने भयापोटी वृत्रासुराची तीन शिरे छेदून टाकली वृत्रासुराने इंद्रास शाप दिला की तू दिंडिरवनात वीट होऊन
पडशील मग इंद्रास शोक झाल्यावर विष्णूनी त्यास अभिवचन दिले की पुंडलिकाच्या आश्रमात मी येईन तेव्हा तुझा
उद्धार करीन ती ही वीट या विटेवर अखंडपणे उभा राहिला श्रीविठ्ठल, म्हणून इंद्राचा उद्धार झाला असा भावार्थ
थरवर असे दिसते की सारी पुण्यकर्मे वा कर्मकांडे करायची ती स्वर्गप्राप्तीसाठी इंद्रपद मिळावे, ब्रह्मलोक,
मोक्षपद याची प्राप्ती व्हावी, मुक्ती मिळावी, जन्ममरणाच्या फेऱ्या चुकाव्यात म्हणून सारा अट्टाहास असतो परंतु
विठ्ठलभक्तीत रंगून गेलेल्या साधुसंतानी अगदी वेगळे असे स्वगुगस्थान शोधून काढले आहे त्यांना स्वर्गसुख नको,
संपत्ती नको, ब्रह्मपद नको, मोक्षसुद्धा नको त्यांना हवे आहे केवळ श्रीविठ्ठलाचे सानिध्य श्रीविठ्ठल आपला प्राणसखा व
आपण त्याचे जिवलग भक्त या नात्यातील गोडी त्यांनी अनुभवली असल्याने ब्रह्मादिख पदांची त्यांना 'शिराणी' वाटली,
म्हणजे त्याची विटळ आली, अथवा परिणामी ती दुःखाची वाटली यात नवल काय? पंढरपूरच्या विठ्ठलाभोवती जो
भागवत संप्रदाय उभा राहिला, जो वारकरी पंथ वाटचाल करू लागला त्याचे हे मोक्षसुखाच्या तुच्छतेवाचे एक मुख्य
सार्थ तुकारामगाथा ३
वैशिष्ट्य मानावे लागेल इतर सर्वच स्वर्गासाठी, मोक्षासाठी बद्धहास असताना मराठी साधुसंत मात्र त्याकडे पाठ
फिरवून आहेत श्रीविठ्ठलाची मुखशोभा पाहावयास मिळावी म्हणून व संतसंगतीची माधुरी अनुभवास यावी म्हणून
अनेक जन्मांची येजा सुद्धा ते पसंत करतील 'मोक्षपदें तुच्छ केलीं या कारणे,' 'मोक्षा एवढें सुख । सुख नव्हेंचि
तें दुख,' 'सांडूनि सुखाचा वाटा। मुक्ति मागे तो करंटा,' 'मोक्ष तुमचा ठेवा। तुम्ही दुर्लभ तो देवा' इत्यादी
चरणांतून तुकारामबुवांनी ब्रह्मपद वा मुक्तिपद आम्हास काय कामाचे असाच भाव व्यक्त केला आहे ब्रह्मादिकांची
प्राप्ती म्हणजे शेवटी दुःखच परिणामीम येणार असा भावार्थ पुण्याचा साठा संपल्यावर परत मृत्युलोकी जर यावे
लागत असेल तर त्या स्वर्गसुखाची, मुक्तिसुखाची, ब्रह्मपदाची काय किंमत ?
२ सुंदर तें ध्यान उभें विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥ १ ॥
तुळसीहार¹ गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर² तेंचि रूप ॥ २ ॥
मकरकुंडलें तळपतीं श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥ ३ ॥
तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ध्यान-उभे राहण्याची ऐट, कर-हात, कटावरी-कमरेवर, तुळसीहार-तुळशीच्या
मंजिऱ्यांचा हार, गळां-गळ्यात, कासे-कमरेला, पीतांबर-पिवळया रंगाचे रेशमी वस्त्र, मकरकुंडलें-माशाच्या
आकाराची कुंडले, तळपती-चमकतात, श्रवणीं-कानात, कंठीं-गळ्यात, कौस्तुभमणि-श्रीविष्णूने कंठावर धारण
केलेल्या रत्नाचे नाव, विराजित-शोभत आहे श्रीमुख-श्रीविठ्ठलाचे सुंदर मुख, आवडीनें-भक्तीने, प्रीतीने
अर्थ - विठ्ठलाचे सुंदर रूप विटेवर उभे आहे, त्याने कमरेवर हात ठेविले आहेत १ त्याच्या गळ्यात
तुळशीचा हार असून कमरेभोवती जरेचा पीतांबर त्याने नेसला आहे असे हे श्रीविठ्ठलाचे रूपच मला नेहमी आवडते २
त्याच्या कानात मत्स्याच्या आकाराची कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे ३. तुकाराम
महाराज म्हणतात, विठ्ठलाचे हे सगुण सुंदर रूप हेच माझे सर्वसुख आहे याच मुखाकडे मी मोठ्या प्रीतीने पाहात
राहीन याच्या एकसारख्या दर्शनात माझे सर्वसुख आहे ४
विवरण - तुकारामबुवांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग असून वारकरी संप्रदायाच्या भजनाच्या सुरु-
वातीसच हा अभंग नेहमी आपले आराध्य दैवत जे श्रीविठ्ठल त्याचे अतीव सुंदर, मनोहर व सुखकारक स्वरूप यात
मोठ्या कोमलतेने बुवांनी वर्णन केले आहे श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे असेच बहारदार वर्णन स्वतः तुकारामबुवांनी व
इतर अनेक संतांनी अगदी मनापासून पून पून केले आहे विठ्ठलरूपाचे वर्णन करणे, चिंतन करणे हाच एक सुखाचा
ठेवा त्यांना वाटत असे श्रीविठ्ठलाचे ध्यान सुंदर आहे, ते विटेवर उभे आहे, त्याचे हात कमरेवर आहेत, त्याच्या
गळ्यात तुळशीची माळ आहे, तो पीतांबरधारी आहे, त्याच्या कानात मकरकुंडले चमकत आहेत, कंठावर कौस्तुभ-
मणी शोभत आहे या सर्व वर्णनात श्रीविठ्ठलाचे रूप सामावलेले आहे
श्रीविठ्ठल हा विष्णूचा अवतार असल्याच्या खुणा या अभंगात सहज सापडण्यासारख्या आहेत पीतांबर,
तुळशीचा हार, मकरकुंडले, कौस्तुभमणी या वस्तू श्रीविष्णूलाही अती प्रिय असल्याचे आपणास माहित आहेच
विष्णूचे व तुळशीचे सानिध्यही पुराणातून अनेक ठिकाणी वर्णन केले आहे वृन्दा ही जालंधराची पत्नी जालंधराने
आपली सत्ता सर्वत्र पसरविण्यास आरंभ केला त्याची पत्नी वृन्दा ही थोर पतिव्रता असल्याने त्याचा पराभव अशक्य
होऊन बसला विष्णूने तिचे कपटवेषाने पातिव्रत्य हरण केले वृन्देस याचे परम दुःख झाले तिने तुझ्याही भार्येचे
हरण होईल अशी वाणी उच्चारून अग्नीमध्ये प्रवेश केला शाप्या प्रकाराने श्रीविष्णूचे मन अतिशय अस्वस्थ झाले
तेव्हा त्यास शांत करण्यासाठी वृन्दामधून अग्निप्रवेशस्थली गौरी, लक्ष्मी व स्वधा यांच्या अंशांनी आवळी, तुळशी व
मालती अशा वनस्पती निर्माण झाल्या, तेव्हा विष्णूचे मन स्थिर झाले श्रीविष्णूचा हा तुळशीशी संबंध, श्रीकृष्ण-
यवतारातील वृंदावनलीला, कृष्ण व तुळस यांचा विवाह यातील रहस्य आता समजण्यासारखे आहे श्रीविष्णूच,
कृष्णच, म्हणजेच पर्यायाने विठ्ठलाला तुळशीची माळ यासाठी प्रिय आहे आपल्या पुराणग्रंथातून तुळशीमाहात्म्यही
१ गळा तुळसीहार २ आवडे निरंतर हेंचि ध्यान
४ सार्थ तुकारामगाथा
अनेक प्रकारांनी सांगितले आहे पद्मपुराणात तुळशीचे संपूर्ण स्तोत्र आलेले आहे पुन पाताळखंडात तुळशी-
दलाचे माहात्म्य वर्णन केले आहे तुल्सीदलाच्या सेवनाने अनेक रोग नाहीसे होतात, दारिद्रय नाहीसे होते, अनेक
पापे नाहीशी होतात असे तेथे सांगितले आहे (दारिद्रयदु सभोग्यादिपापानि सुवहून्यपि । तुल्सी हरते क्षिप्र रोगानिव
हरीतकी १४।८-९) मराठी संतानीही श्रीविष्णूवरावर आलेल्या या तुळशीचे मनापासून स्वागत केले आहे
'वैकुंठाहुनी आली । धन्य तुळशी माउली' म्हणून एकनाथानी तुळशीमाहात्म्यात तिचा गौरव केला आहे 'तुळशीचे
पान । एक त्रैलोक्यासमान,' 'देवासी प्रिय तुळशीपान', 'तुळशी जाला कृष्णराबो' इत्यादी वचनातून एकनाथानी
तुळशीचे माहात्म्य उत्तम रीतीने सांगितले आहे वारकरी पथात आजही तुळशीच महत्त्व विशेष आहे दारात
तुळशीवृदावन, गळ्यात तुळशीची माळ व देवाला तुळशीहार याची महती विशेष अशी या सप्रदायात दिसून येते
साधुसतानी केलेल्या विठ्ठलरूपाचे वर्णन वाचीत असताना एक प्रश्न मनात निर्माण होतो तो असा की हे
मव वर्णन विठ्ठलाचे खरे, पण हे कोणत्या मूर्तीचे ? आज पंढरपुरास उभी आहे तीच मूर्ती सर्वाच्या डोळयासमोर
होती काय ? आजही ती उभी आहे, तिला मुगुट आहे, कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, कौस्तुभ मण्याचा
हार गळ्यात आहे डाव्या छातीवर एक खळगा म्हणजे श्रीवत्सलाछन व उजव्या छातीवर एक वर्तुळ म्हणजे श्रीनिकेतन
आहे दंडावर बाजूबंद आहेत, मनगटावर मणिवंध आहेत डाव्या हातात शंख आहे, उजव्या हातात कमल आहे
विठ्ठलाचे असेच रूप सर्वसाधारणपणे साधुसन्तानी वर्णन केले आहे परंतु कधी फरक पडण्याचे कारण एक असू शकेल
की विठ्ठलमूर्तीस पोषाख घालून, डागदागिने घालून नटविण्याची प्रथा असल्याने त्या सालंकृत रूपाचे वर्णन थोडे
वेगळे यण्याची शक्यता आहे दुसरे असे की इतक्या दीर्घ कालावधीत मूर्ती एक जाऊन दुसरी आली असण्याची शक्यता
दिसते तिसरे अतिशय महत्त्वाचे कारण असे की नामस्मरणान व भक्तीच्या आवेशात साधुसत तल्लीन होत असतात
त्यांच्या नजरेसमोर सुशोभित झालेले सगुणसुंदर रूप नेहमीच असते मोठ्या आवडीने, कौतुकाने, प्रीतीच्या भराने
साधुसतांनी विठ्ठलरूपाचे वर्णन केले तर त्यातील रहस्य समजण्यासारखे आहे विठ्ठल हा मदनाचा पुतळा आहे, हा
चैतन्याचा गाभा आहे, ही अनंत लावण्याची शोभा आहे त्याच्या मुगुटाची शोभा मोठी सूर्याच्या झळाळासारखी आहे
या मंतवचनाचा भावार्थ रसिकतेनेच समजावून घेण्यासारखा आहे
३ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥ १ ॥
गोड तुझे रूप गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्व काळ ॥ २ ॥
विठो माउलिये हाचि वर देईं । सचरोनि' राहीं हृदयामाजी ॥ ३ ॥
तुका म्हणे काहीं न मागें आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा - सदा-नहमी, जडो-जडून, विळून राहोत रखुमाई-रुक्मिणीचे प्राकृत रूप, सोयरिया-
आप्तस्वकीया, सचरोनी-शिरून हृदयामाजी-अंत करणात, आणीक-इतर दुसरे
अर्थ -हे सख्या, रुक्मिणीपते, श्रीविठ्ठला, माझे डोळे नेहमी तुझ्या मूर्तीवर जडून राहोत १ तुझे रूप अती
गोड आहे, तुझे नावही अती गोड आहे याचेच प्रेम मला नेहमी देत जा २ हे विठ्ठल माऊली ! माझ्या अत करणात
निवास करून तू राहावेस हाच एक वर मग तू दे ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी दुसरे आणखी काही मागत
नाही, तुझ्या पायापाशीच मला सर्व प्रकारची सुखे मिळतात ४
विवरण -या अभगात तुकारामबुवा विठ्ठलाच्या गाड रूपाचे व नावाचे वर्णन करून आपल्या मनाची तळमळ
व एकमात्र इच्छा व्यक्त करतात परमेश्वरापाशी अगदी निकटची जवळीक प्रस्थापित करण्यासाठी भक्त विविध
प्रकाराची नाती त्यास जोडवीत असतात माउलीखेरीज अधिक गोजवळ, अधिक निकटच, अधिक वात्सल्यपूर्ण मान
दुसरे कोण ? 'विठो माऊलीय' असे म्हणून महाराज त्यास जणू मागोवरच बसत आहेत त्याला त्यांनी सोयरा
असेही येथे म्हटले आहे रखुमाईचा पती असे सबोधून आणखी एका नाजूक व रम्य अशा नात्याचा उल्लेख करून
बुवांनी आपल्या मनाची वावळीक प्रकट केली आहे रखुमाई हे रुक्मिणीचे प्राकृत रूप समजले जाने लक्ष्मीपासून
लक्ष्मा-लखुमा-रुखमा-रखुमा असाही क्रम सागण्यात येतो
१ यउनिया
४ राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥ १ ॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ २ ॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥ ३ ॥
कासे सोनसळा पांघरे पांटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो ॥ ४ ॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- राजस-सुंदर, राजतेजाने चमकणारा, सुकुमार-लहान मुलाप्रमाणे कोमल व नाजूक,
मदन-सौंदर्यवान कामदेव, रविशशिकळा-सूर्यचंद्राचे तेज, लोपलिया-नाहीशा झाल्या. कस्तुरी-एक सुगंधी द्रव्य,
मळवट-कपाळभर असलेला लेप, चंदन-एक सुगंधी वृक्ष, उटी-लेप, रुळे-डौलाने लोळते, वैजयंती-विष्णूच्या गळया-
तील माळ हिरा, माणिक, पाच, नीळ व मोती अशा पंचरत्नाची ही असते. ओतले-साच्यातून तयार केले, कासे-कम-
रेस, सोनसळा-जरीचा पीतांबर, पाटोळा-रेशमी वस्त्र, घननीळ-मेघाप्रमाणे निळा, सावळा-श्यामल, एकी-
सवा-एका बाजूस.
अर्थ :- स्वतः गोपीची भूमिका घेऊन आपल्या इतर सख्यांना तुकारामबुवा म्हणत आहेत, 'हा राजतेजाने
शोभणारा, अतिशय सुकुमार असणारा, विठ्ठल म्हणजे सौंदर्यवान कामदेवाचाच पुतळा आहे. याच्या तेजापुढे सूर्याचे
व चंद्राचे तेजसुद्धा लोपून जाते. १. याच्या कपाळावर कस्तुरीचा मळवट भरलेला असून सर्वांगावर चंदनाचा लेप
लाविला आहे. याच्या गळ्यात वैजयंती माळ मोठ्या डौलाने लोळत आहे. २. मुगुट व कुंडले यांनी याच्या सुंदर मुखास
शोभा चढली आहे. जणू काही हे मुख म्हणजे प्रत्यक्ष सुखच मुशीत घालून आकारात आले आहे. ३. या विठ्ठलाने
पीतांबर नेसला आहे आणि अंगावर रेशमी वस्त्र पांघरले आहे. मेघाप्रमाणे सावळ्या रंगाच्या अंगकांतीच्या या
श्यामल रूपाकडे बायांनो, पाहा तरी ४. तुम्हांला शक्य होत नाही तर तुम्ही सर्वजणी दूर व्हा पाहू; माझ्याच्यानें
आता अधिक धीर धरवत नाही. ५.'
विवरण :- परमेश्वराची जवळीक अधिक तीव्रतेने अनुभवण्यासाठी तुकाराममहाराजानी आणखी एका
नात्याने त्याची आराधना येथे केली आहे गोपीच्या भूमिकेतून इतर अनेक मैत्रिणींना बरोबर घेऊन बुवा विठ्ठलाकडे
पाहात आहेत राजस, सुकुमार, मदनाचा पुतळा या सर्व विशेषणात्मक वर्णनांचे सौंदर्य लक्षणीय आहे. कस्तुरी,
चंदन, जरीची व रेशमी वस्त्रे, यासहित साधलेल्या ऐश्वर्याचे राजस वर्णन या भूमिकेवर शोभण्यासारखे आहे. गोपी-
प्रमाणेच बुवा अगदी अधीर झाले आहेत. आपल्या मैत्रिणींना दूर सारून आपणच धावत जाऊन त्यास भेटावे अशी
उतावीळ त्यांना झालेली आहे. या भावाचे अधिक वर्णन तुकाराम महाराजांच्या विराण्या किंवा विरहिणींचे अभंग
अथवा गौळणीचे विवेचन करणेवेळी आपण पाहू. येथे श्रीविठ्ठलाला कृष्णाप्रमाणे घननीळ, सावळा असे सबोधिये
आहे गूढता, सौंदर्य, तीव्र भावना यांचे प्रतीक म्हणजे निळा वर्ण. विशाल आकाशाचा निळा रंग; अथाग सागराचा
निळा रंग, परमेश्वराच्या विस्तीर्ण रूपाची प्रभा निळसरच कल्पिली आहे योगप्रक्रियेतही या निळया रंगास महत्त्व
आहे. या सावळया वा निळया रूपाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी मोठ्या बहारीने केले आहे. 'निळिमे सारणी बाहे मोति-
याचे पाणी' हे त्याचे वचन प्रसिद्ध आहे. 'सांवलियाचें तेज सांवळा धोधरी', 'सावळाचि नयनां दिसे', 'नीळवर्ण
महा, नीळवर्ण स्यं', 'नीळवर्ण तनु नीळवर्ण गुणू'; 'नीळप्रभा दिसे, नीळपणे वसे' इत्यादी ओळींतून ज्ञानदेवानी
घननीळाचे सान्निध्य वर्णन केले आहे. 'निळा पंढरपूरचा लावण्य पुतळा' 'नीळवर्ण घनश्याम । आत्माराम विटेवरी'
अशा शब्दात एकनाथानी सावळया विठ्ठलास आळविले आहे मततत्त्वज्ञानात मुरलेले आधुनिक कवी 'बी' दानी
नीळवर्णाचे मोठे सुरेख व यथायोग्य वर्णन केले आहे. त्यांनी म्हटले आहे; 'गूढत्वाचें, सुंदरतेचें, भावानलकतेचे
नीलवर्ण हैं द्योतक यांच्या निःसीमतत्वाचें'
५ कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥ १ ॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ २ ॥
६' सार्थ तुकारामगाथा
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिलीं ऐसी मूर्ती ॥ ३ ॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसीं तेंचि रूप ॥ ४ ॥
झुरोनि पांजरा होऊं पाहे आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥ ५ ॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- कास-काचा, वहिली-सुंदर, गरुडपार-पंढरपूर येथील पाडुरंगाच्या मंदिरातील
सोळाखांबीमध्ये गरुडखांबाजवळची देवासमोरची जागा मानसीं-मनामध्ये, पांजरा-सापळा, अस्थिपंजर, आस-इच्छा,
उदास-व्यर्थ, दुर्लक्षित
अर्थ - हे हरी, हात कमरेवर आहेत, गळ्यात तुळशीच्या माळा आहेत असे तुमचे रूप माझ्या डोळ्यांना
दाखवा ना. १ दोन्ही पाय विटेवर स्थिर आहेत असे तुमचे रूप मला दाखवा ना. २ पीतांबराची सुंदर कास
शोभत आहे अशी तुमची सुंदर मूर्ती मला दाखवा ना. ३ विठ्ठला, तू गरुडपारावर उभा राहिला आहेस, हेच रूप
मला नेहमी आठवत असते. ४ पंढरीनाथा ! आता तू भेटायला ये ना. तुझी वाट पाहता पाहता मी झुरून चाललोय.
माझा देह म्हणजे नुसता हाडांचा सापळा राहिला आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनातील एवढी
इच्छा तुम्ही पुरवावी; माझ्या या विनंतीस व्यर्थ करू नका. तुम्ही उदास नका राहू. ६
विवरण:- या अभंगात अशी अशी मूर्ती हे हरी, तुम्ही दाखवा असे म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या
मनातील अधीरता दर्शविली आहे, 'गरुडपारावरी उभा राहिलासी' या रूपाची आठवण आपणास होते असे तुकोबांनी
म्हटले आहे विठ्ठलमंदिरातील सोळाखांबी मंडप प्रसिद्ध आहे या मंडपास सोळा खांब असून यातील दक्षिण व पूर्व
बाजूकडील दुसऱ्या ओळीतील एक खांब रुप्याच्या व सुवर्णाच्या पत्र्यांनी मढविलेला आहे यास गरुडखांब म्हणतात.
गरुड हे विष्णूचे, विठ्ठलाचे वाहन व भक्त, म्हणून या खांबास आलिंगन देऊन लोक विठ्ठलाच्या दर्शनास जातात येथील
जागेवरून विठ्ठलाचे मुखदर्शन पावले होते याच जागेस गरुडपार असेही म्हणतात पण या पारावर तू उभा राहिलास
व ते रूप मला आठवते असे बुवा म्हणतात याचा अर्थ काय ? पूर्वी देवाचे स्थान या ठिकाणी होते की काय ?
गरुडावरून देव आले ते प्रथम येथेच उभे राहिले असावेत इथेच त्यांना विटेवर उभे राहण्यास पुंडलिकाने सांगितले
असावे, मग पुढे केव्हातरी मंदिराची वाढ. जसजशी होत गेली तसतसे विठ्ठलाचे स्थान बदलले असावे
६ गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कें देखेन ॥ १ ॥
वरवया खरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ २ ॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥ ३ ॥
ओतिय श्रीमुल सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥ ४ ॥
उद्धव अक्रूर उभे दोहोंकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥ ५ ॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- गरुड-विष्णूचे वाहन, वारिके-वाहन, वरवया-सुंदर, सुरूप, खरवंटा-चांगला, सुंदर,
घनमेघ-दाट मेघ, झळाळ-लखलखाट, वामांगीं-डाव्या बाजूस, वेल्हाळ-लडिवाळ, लाडकी, उद्धव-श्रीकृष्णाचा परम
मित्र, अक्रूर-श्रीकृष्णाचा मदतनीस, पवाडे-स्तुतिस्तोत्रे, सनकादिक-सनक, सनंदन, सनातन व सनत्कुमार हे
ब्रह्मदेवाने चार मानसपुत्र आणिकांसारिखा-इतर देवांसारखा, पांडुरंग-विठ्ठलाचे एक नाव
अर्थ - गरुड ज्याचे वाहन आहे व ज्याने पीतांबर नेसलेला आहे ते सावळे व मन हरण करणारे रूप मी
केव्हां बरे पाहीन ? १. अतिशय सुंदर असणारा, घनदाट मेघांप्रमाणे सावळा असणारा व ज्याच्या गळयांत
वैजयंतीमाळ आहे असा विठ्ठल शोभून दिसतो. २. याच्या डोक्यावर जो मुगुट आहे त्याचा लखलखाट कोटी
सूर्यापेक्षाही अधिक आहे आणि याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी शोभून दिसत आहे. ३. याचे सुंदर मुख सर्व सुखांचे
सार्थ तुकारामगाथा ७
ओतून तयार करावे इतके शोभिवंत असून याच्या डाव्या अंगास रुक्मिणीदेवी आहे ४. याच्या दोन्ही बाजूस उद्धव
व अकूर उभे असून याची स्तोत्रे सनकादिक कुमार नेहमीं गात असतात ५. तुकाराम महाराज म्हणतात की हा
काही इतर देवांसारखा नसून अनन्यसाधारण असा माझा हा सखा पांडुरंग आहे ६
विवरण • श्रीविठ्ठल हे विष्णूचेच रूप, याचा आणखी एक दाखला म्हणजे विष्णूचे जे वाहन तेच गरुड
विठ्ठलाचेही या ठिकाणी कल्पिले आहे गरुड हा कश्यप व वनिता याचा पुत्र आईच्या दास्यविमोचनासाठी याने
अमृताचा कुंभ मिळविला या कृत्यामुळे श्रीविष्णू याच्यावर संतुष्ट झाले व त्यांनी त्यास आपल्या ध्वजावर जागा
दिली, व याने विष्णूचे वाहन होण्याचे मान्य केले विठ्ठलाच्या देवळात विठ्ठलासमोर महामंडपात एक लहानसे गरुड-
मंदिर आहे या अभंगात बामांगी रुक्मिणी असे म्हटले आहे आज रुक्मिणी अगदी जवळ मागेच डाव्या बाजूस
असली तरी थोड्या दूर अंतरावर शेजारीच तिचे स्वतंत्र देऊळ आहे परंतु सर्व संतानी विठ्ठलरखुमाई याचे सान्निध्य
मानलेले आहे पुंडलिकाच्या मातृसेवेस भुलून द्वारकेहून जेव्हा देव दिंडीरवनात आले तेव्हा त्याच्याबरोबर रुक्मिणीही
आली, पण आपल्यापेक्षा देवाला राधा व भक्तच अधिक प्रिय आहेत असे वाटून ती रुसली असल्याची समजूत आहे
म्हणून ती थोडी दूर पंढरपुरास आहे इतरत्र मात्र विठोबा व रखुमाई एकत्र असतात पूर्वी केव्हा तरी पंढरपुरासही
या दोन मूर्ती शेजारीशेजारीच असाव्यात असा जानत्याचा तर्क आहे
उद्धव हा श्रीकृष्णाचा एक प्रिय सखा नंद, यशोदा व गोपी याचे सांत्वन करण्यासाठी श्रीकृष्णाने यास
गोकुळात पाठविले होते हा मोठा ज्ञानी पुरुष, पण याच्या ज्ञानाचा परिणाम गोकुळातील भक्तावर फारसा झाला
नाही सगुण प्रेमाने ज्ञानी उद्धवासही भक्तीचा महिमा पटवून दिला असल्याचा उल्लेख संताच्या वचनातून अनेक
प्रसंगी येतो या आपल्या श्रेष्ठ भक्तास श्रीकृष्णाने सरस्वती नदीकाठी आत्मज्ञान सांगितले उद्धवगीता, अवधूतगीता
यातून निर्माण झालेली आहे अक्रूर हा श्रीकृष्णाचा आणखी एक सहाय्यक प्रथम श्रीकृष्णास शासन करण्यासाठी
मथुरेस घेऊन यावे म्हणून कंसाने याची योजना केली परंतु वाटेत यमुना नदीत स्नान करीत असताना याला
श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला व त्याचे माहात्म्य अक्रूरास पटले तेव्हापासून हा श्रीकृष्णाचा सहाय्यक बनला
ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली म्हणून विष्णू त्याच्या मानसपुत्राच्या रूपांनी प्रकट झाले तेच सनक, सनंदन, सनातन व
सनत्कुमार या चार नावांनी प्रसिद्ध आहेत याची रूपे बालकाप्रमाणे असून मोठे विरक्त म्हणून याची प्रसिद्धी आहे
श्रीविठ्ठल हा इतर देवांप्रमाणे नाही हा एक मोठाच ध्यास साधुसंताना होता यज्ञयाग, जपजाप्य, योग-
साधना, कर्मकांड, नवस, तपश्चर्या इत्यादींनी इतर देव पावतात, तर विठ्ठल केवळ नामस्मरणाने, भजनाने, नुसती
हाक मारण्याने प्रसन्न होतो तो स्वभावत च भक्तावर प्रसन्न आहे इतर देवांप्रमाणे याच्याशी देवाणघेवाण करावी
लागत नाही 'न पूजीं आणिका देवा, न करूं त्याची सेवा,' 'आणिवांची रीति नाईके, न बोले,' इत्यादी वचनातून
तुकारामबुवांनी केवळ विठ्ठल हेच आमचे दैवत असे आग्रहाने सांगितले आहे इतर दैवताच्या नादी लागू नये असा
आग्रहही त्यांनी अनेक ठिकाणी धरला आहे या विठ्ठल दैवताचे दुसरे नाव पांडुरंग असे या अभंगात आले आहे
विठ्ठल हे विष्णूचे रूप याबद्दल संशय नाही विष्णु या शब्दाचा कानडी अपभ्रंश 'विट्टि' असा होता
या अपभ्रंशापासून विठ्ठल रूप तयार झाले असे डॉ रा गो भांडारकर यांनी सांगितले आहे विष्णु विठ्ठलु
व विठु किंवा विठ्ठल या मार्गानीही विठ्ठलाचा संबंध विष्णूशी पोचतो परंतु पांडुरंग हे नाव या देवास कसे मिळाले ?
याविषयी दोन तर्क संभवतात पांडुरंग हे शिववाचक नाव आहे शिव पांढऱ्या रंगाचा म्हणून पांडरंग किंवा पांडुरंग
पंढरपुरास प्रथम शिवाचे देवालय असल्यामुळे फार प्राचीन काळी पंडरगे, पाडुरंगपल्ली, पाडुरंगपूर इत्यादी नांवे या
गावास मिळाली व येथला देव पांडुरंग शिव ठरला परंतु पुढे श्रीविष्णूचे माहात्म्य वाढल्यावर शिवविष्णूचे ऐक्य
वाढवून विष्णूच्या अवतारास, विठ्ठलास पांडुरंग म्हणण्याचा प्रघात पडला असा एक तर्क आहे दुसरे अनुमान असे
की विठ्ठल हे दैवत पुंडलिकांमुळे भिवरेच्या तीरी स्थिर झाले तेव्हा हे पुंडलीकक्षेत्र, पौंडरिकक्षेत्र इत्यादी नावांनीही
प्रसिद्ध झाले यावरून कानडी पंडरगे हे नाव व यावरून पांडुरंग हे नाव बनले की काय ? पंडरगे या कानडी शब्दाचे
पंडरिका हे संस्कृत रूप व यावरून पांडुरंग हे नाव बनले असावे
८ सार्थ तुकारामगाथा
विराण्या-अभंग
७ वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥ १ ॥
सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥ २ ॥
नाइके वचन बोलतां या लोका । ह्मणे जालो तुका हरिरता ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाळो-वाळित टाकोत, दूर करोत, शिंदळी-दुराचारी, वाईट चालीची स्त्री, न
विसंबे-विश्वास ठेवीत नाही, लौकिक-या जगातील, हरिरता-परमेश्वराशी समरस झालेली
अर्थ :- सर्व लोकांनी जरी मला दूर केले किंवा माझ्यावर बहिष्कार टाकला व मला दुराचारी स्त्री म्हटले
तरी या त्यांच्या म्हणण्यावर हा वनमाळी श्रीविठ्ठल विश्वास ठेवणार नाही १ मी सर्व लौकिक म्हणजे या जगातील
व्यवहार सोडून उदास झाले आहे मला त्यामुळे कसलेच भय उरलेले नाही, अथवा जीवन जगण्याची आशाही
उरलेली नाही २ म्हणून या लोकांनी काही जरी कटु शब्दांनी मला म्हटले तरी मी ते आता ऐकणार नाही,
कारण मी आता पूर्णपणे एका ईश्वराशीच समरस झाले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात ३
विवरण - येथून पुढले पंचवीस अभंग 'विरहिणीचे अभंग' अथवा 'विराण्या'चे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत
परमेश्वराशी संपूर्ण ऐक्य जे अनुभवास आले त्याचे वर्णन करताना साधुसंत अनेक प्रसंगी नाइलाज म्हणून व्यावहारिक
प्रेमाचा, पतिपत्नीचा किंवा कधी प्रियकर-प्रेयसीचा दृष्टान्त घेऊन आपले मनोगत व्यक्त करतात पति-पत्नी किंवा
प्रियकर-प्रेयसी या नात्यातील तीव्रताच फक्त त्यांना अपेक्षित असते पतीची वा प्रियकराची वाट पाहण्यात, त्याचे
स्मरण करण्यात, त्याचा ध्यास लावून घेण्यात, त्याच्याबद्दल तळमळण्यात अपार सुख पत्नीस वा प्रेयसीस होते
प्रत्यक्ष मीलनातील आनंदापेक्षाही विरहातील आर्तता अधिक तीव्र, स्मरणाची जाणीव अधिक तीव्र, रूपचिंतनाची
माधुरी अधिक चविष्ट असल्यामुळे भक्तीच्या क्षेत्रात या विरहाला मीलनापेक्षाही फार महत्त्व असते मीलनात किंवा
अद्वैतानुभूतीत भोगसुख नाही सर्वच एक अशी अनुभूती आल्यावर कोण कुणाचे स्तवन करणार ? कोण कुणावर
लटके रागावणार ? कोण कुणाचे भजन करणार ? म्हणूनच कित्येक ठिकाणी 'अद्वैतीं तो नाही माझें समाधान'
यासारखे उद्गार साधुसंत काढतात
ज्ञानाच्या भूमिकेवर वा तात्त्विक भूमिकेवर अद्वैत, पण भोगासाठी किंवा अद्वैताच्या अनुभवासाठी द्वैत
भक्तीत पत्करावे लागते आणि या द्वैतात विरहाला फार मोठे स्थान आहे स्वत:स पत्नी वा प्रेयसी समजून साधु-
संतांनी आपले जे अनुभव प्रकट केले आहेत त्यातील माधुरी अवीट आहे यातील शृंगारिक अर्थ वरवरचा असून
त्याचा संबंध केवळ भाषेपुरता किंवा दृष्टान्तापुरताच आहे
शृंगाराचे वरवरचे रूप असणाऱ्या या भक्तीच्या विशिष्ट प्रकारास 'मधुरा भक्ती' असे नाव असून त्यास
शास्त्रकारांनी मान्यता दिलेली आहे नारदभक्तिसूत्रात भक्तीचे अकरा प्रकार सांगितले आहेत त्यात कांतासक्ती
म्हणून एका विशेष प्रकाराचा उल्लेख आलेला आहे नारदांनी श्रेष्ठ भक्तीचा हाच आदर्श सांगितला आहे
भगवंताला सर्वस्व अर्पण करणे, (तदर्पिताखिलाचारता), त्याच्या विस्मरणाने व्याकुळ होणे (तद्विस्मरणे परम-
व्याकुलतेति) हीच नारदाच्या मताने खरी भक्ती होय गोकुळातील गोपींनी याच प्रकारची भक्ती केली असून
त्यांचाच आदर्श नारदांनी मान्य केला आहे (यथा व्रजगोपिकानाम्) त्यांच्या मते भक्ती ही मुख्यतः प्रेमरूपच आहे
(परमप्रेमरूपा) भगवान शांडिल्य यांनी प्रेममय भक्तीचाच पुरस्कार केलेला आहे (सा परानुरक्तिरीश्वरे) रूपगो-
स्वामी, जीवगोस्वामी यांनी या भक्तीचे शास्त्रीय स्वरूप 'भक्तिरसामृतसिंधु', 'उज्ज्वलनीलमणि' यासारखे ग्रंथ
लिहून सिद्ध केले आहे
८ आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । ह्मणोनि व्यभिचारा टेकियें ॥ १ ॥
रात्रदिस मज पाहिजे जवळि । क्षण १त्यानिराळी न गमे घडी ॥ २ ॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आता । रातले अनंता तुका ह्मणे ॥ ३ ॥
१ क्षण एव निराळी
सार्थ तुकारामगाथा ९
शब्दार्थ व टीपा -आधिच्या-पूर्वजन्मीच्या, भ्रतारें-पतीकडून, रातले-रममाण झाले
अर्थ -पूर्वजन्मीच्या माझ्या पतीकडून माझी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मी आज या वरवर गैर वाटणाऱ्या
आचरणास प्रवृत्त झाले आहे १ तो धोंहोरो मला आता रात्रंदिवस माझ्याजवळ हवा त्याच्याशिवाय मला एक
क्षणभरही करमणार नाही २ आता माझ्यादाद्दलची सर्व आशा सोडून द्या, कारण तुकारामबुवा म्हणतात की
मी आता अनंताशी रममाण झाले आहे ३
विवरण - वरवर शृंगारात्मक दिसणाऱ्या या अभंगाच्या निमित्ताने तुकाराम महाराजानी आपण आता
परमेश्वराशी रममाण झालेलो असल्यामुळे आपली आशा आता लोकांनी सोडून द्यावी असे विनविले आहे
९ हाचि नेम आता न फिरे माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥ १ ॥
घररिघी जाले पट्टराणी बळें । वरिले सावळें परब्रह्म ॥ २ ॥
वळियाचा अगसंग जाला आता । नाही भय चिंता तुका म्हणे ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा -घररिघी-स्वत होऊन घरात शिरणारी, पट्टराणी-मुख्य आवडती राणी, वरिले-
स्वीकारिले, वळियाचा-बलवानाचा, समर्थाचा, अगसंग-संबध
अर्थ -मी आज श्रीप्रभुशेजारी बसले असल्याने तेथून आता माघारी फिरणार नाही, हाच माझा निश्चय
झाला आहे १ मी आता त्या सावळ्या परब्रह्मास वरले असल्यामुळे मी त्याची पट्टराणी झाले आहे मी स्वतः
होऊन त्याच्या घरात शिरले आहे २ आता माझा संबंध बलवंताशी झालेला आहे त्यामुळे मला कुठलीच भीती
किंवा चिंता उरली नाही ३
१० नाही काम माझें काज तुम्हासवे । होते गुप्त ठावे केले आता ॥ १ ॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सरती लोकांमाजी जाले ॥ २ ॥
न धरावा लोभ काहीं मजविशीं । जाले देवपिशी तुका म्हणे ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा -काज-काय, सरतो-मान्य, देवपिशी-देववेडी
अर्थ -भोवतालच्या लोकांना उद्देशून तुकारामबुवा म्हणत आहेत की, माझे आता तुमच्या बरोबर, काही
काम उरलेले नाही आजवर माझा गुप्त संबंध ईश्वराशी होता तो आता तुम्हा सर्वांना माहित झाला आहे १ माझे
हे निंद्यकर्म तुम्हास ठाऊक झाले आहे त्यामुळे माझे आचरण तुम्हास मान्य नाही २ तरी तुम्हीही आता माझ्या-
विषयी कसलाच लोभ धरू नये, मी आता पक्की देववेडी झाले आहे ३
११ विसरले कुळ आपुला आचार । पती भाये दीर घर सोय ॥ १ ॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातले अनंता चित्त माझें ॥ २ ॥
मज आता कोणी आळवाल क्षणी । तुका म्हणे कानीं बहिरी जाले ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - सांडिला-सोडिला, रातले-रममाण झाले, क्षणी-कवां
अर्थ -मी आता आपले कुलशीलही विसरून गेले असून माझे घर, सोयरे, दीर, पती इत्यादींनाही मी
विसरले आहे १ मी या जगातील रोजचा सर्व व्यवहार सोडून दिला असून मला आता कसलीच भीती व चिंता
उरलेली नाही माझे चित्त आता त्या अनंताशी रमले आहे २ आता मी परत संसारात किंवा लौकिक व्यवहारात
गुंतावे म्हणून कुणी मला आळवू नये तुकाराम महाराज म्हणतात, मी आता दोनही कानांनी बहिरीच झाले आहे ३
तु गाथा २
१० सार्थ तुकारामगाथा
१२ न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥ १ ॥
सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥ २ ॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा : नाइकें-ऐकणार नाही.
अर्थ : मी आता दुसरे काहीच पाहणार नाही, बोलणार नाही; आणि ऐकणार नाही; कारण माझ्या चित्तात
आता एक श्रीहरी स्थिर झाला आहे. १ सासरी व माहेरी आता मला माझे म्हणून कोणी नाही; श्रीहरीच्या
रूपात मी दोन्हीचे एकच स्वरूप मानले आहे. २ मीच भांडखोर म्हणून मजवर आळ आलेला होता; पण आता
त्या प्रभूंसच मिळवून मी सर्वांवर मात केली आहे. ३
१३ दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासुनिया ॥ १ ॥
बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥ २ ॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिका गोविंदोसी ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा : दुजा-दुसरा, प्रीतिका-प्रीति करणाऱ्या
अर्थ अनंत स्वरूपाच्या असणाऱ्या या हरीवाचून आता दुसरा कोणी बलवान आहे ? १ आणि या
बलवंताच्या प्राप्तीमुळे आम्हीही बलवान झालो असून आमची सत्ता आता सर्वांवर राहील. २ तुकाराम महाराज
म्हणतात की आम्ही मूळचेच अतःकरणाने उदार आहोत; म्हणूनच गोविंदास प्रेम करून आम्ही जवळ करू
शकलो. ३
१४ क्षणभरी आम्हीं सोसिलें घाईट । साधिलें अवीट निजसुख ॥ १ ॥
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥ २ ॥
तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा : अवीट-वीट किंवा, कंटाळा न येणारे, निजसुख-मोक्षाचे सुख, साडीमांडी-टाळणे, पुन.
घेणे, भरोवरी-श्रम, कष्ट
अर्थ : लोकांच्या दृष्टीने मी त्याची निंदा क्षणभर सहन केली; पण त्या योगाने ज्याचा कधी कंटाळा
येणार नाही असे मोक्षसुख मी मिळविले. १ पूर्वायुष्यात अनेक प्रकारची यातायात केली. अनेक गोष्टी टाळल्या.
पुनः घेतल्या. सुखप्राप्तीसाठी अनेक परिश्रम घेतले, पण ते सर्व मला अधिकच दुःखाचे झाले. २ पण आता या
अनंत स्वरूपाच्या प्रभूशी लीन झाल्यामुळे, पायांशी राहिल्यामुळे जाणेयेणे अथवा त्यातील कष्टच संपून गेले. ३
१५ आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥ १ ॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥ २ ॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा : दुजें-दुसरे, एकविध-एकनिष्ठ, अंगसंग-शरीराची जवळीक, शरीराचा भोग.
अर्थः-आता मला कोणी वडील, कोणी धाकटे नाही. मीच मला वडील आहे व धाकटीही आहे. आता
माझ्या मागाहून येणारे कोणी नाही ; पुढेही आलेले कोणी नाही. १ आता मला चांगला एकांतही मिळतो,
तेव्हा एकनिष्ठ भावनेनेच मी राहतो व तो श्रीहरी माझयारोबर सर्व प्रकारच्या क्रीडा करतो. २ आमच्या दोघां-
शिवाय दुसरे तेथे कोणीही नसते ३
१६ सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥ १ ॥
याचसाठीं सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषासीं ॥ २ ॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥ ३ ॥
सार्थ तुकारामगाथा ११
शब्दार्थ व टीपा:- जाळ-जाळे, सांडियेले-सोडले, भरतार-पती, परपुरुष-श्रेष्ठ परमेश्वर
अर्थ-आता मी सर्व सुखे नेहमीच भोगीन. मी सर्व मायापाश व नात्याची जाळी तोडून टाकली आहेत. १
या प्रभूसाठी मीं माझ्या पतीसही सोडले. मी या श्रेष्ठ परमेश्वराशी रममाण झाले आहे. २ त्यामुळे आता मला
पुनः गर्भवासाची यातना राहणार नाही; आता प्रभुप्राप्तीचे औषध असेच केले आहे की जे फळ धरूच देणार नाही.
पुन: लौकिकाची आशाच उरणार नाही. ३
१७ एका जिवें आतां जिणें जालें दोन्हीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥ १ ॥
नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥ २ ॥
तुका म्हणे जाले सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- वेगळीक-वेगळेपणा, भाक-वचन, इच्छा.
अर्थ:-आता माझे व श्रीहरीचे अशी दोनही जीविते एकच झाली आहेत. आता वेगळेपणा असा काही
उरलाच नाही. १ मी व नारायण यांच्यात आता निराळेपणा नाही. त्याला मी आर्त्त होऊन हाक मारली; तो मला
मिळाला, माझी इच्छा त्याने पुरी केली व मला जवळ करून सांभाळले. २ माझ्या थोड्याफार परिश्रमाचे मला
हे फळ मिळाले; आता ती दुजेपणाची वेळ संपली. ३
१८ हासों रूसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट तें ॥ १ ॥
सेवासुखें करूं विनोदेवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥ २ ॥
तुका म्हणे आम्ही जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा:- आवडी-प्रेम, अंतरींची-मनाची.
अर्थ : आता आम्ही हसू, एकमेकांवर रुसू व यातून प्रेमाची वाढ करू. मनातील अवीट गोडी चाखून एक-
मेकांची सेवा करू. १ काही विनोदवचनांनी संभाषण करू. आता मी व नारायण हे एकच आहोत. २ मी आता या
लौकिक जगाविषयी उदासीन झाले आहे. कारण मी हा श्रेष्ठ ईश्वर पती म्हणून केला असून मी त्याला स्वतःच्या
आधीन करून ठेवला आहे. ३
१९ मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयांनो ॥ १ ॥
न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥ २ ॥
तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळियासवें आम्ही ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- न साहवे-सहन होत नाही, कूट-निंदा, ओखटें-वाईट, अमंगल, विचरों-हिंडत राहू
अर्थ - आपल्या मागे मागे येणाऱ्या सांसारिक व लौकिकावर दृष्टी ठेवणाऱ्या स्त्रियांना उद्देशून तुकाराम
महाराज म्हणत आहेत; आता तुम्ही कोणी माझ्याबरोबर येऊ नका. बायांनो, तुम्ही सर्वजण सासुरवासिनी आहात. १
तुम्हांला हे लोक निंदात्मक शब्द बोलतील ते सहन होणार नाहीत कारण ते लोक फार वाईट व अमंगल असे
बोलतात. २ पण मी मात्र सर्व लौकिकापासून मोकळी व विरक्त झाली असल्यामुळे या गोपाळकृष्णाबरोबर मी
वाटेल तशी वागू शकते. ३
२० शिकविले तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥ १ ॥
प्रसंगीं या नाही देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥ २ ॥
तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - नित्य-अक्षय, कायम टिकणारे, अनित्य-क्षर, नाश होणारे
अर्थ.-लौकिक संसाराविषयी तुम्ही मला जे शिकविले ते श्रीहरीशी माझा वियोग जोपर्यंत होता तोपर्यंतच
मला पटत होते. १ आता या ऐक्याच्या भावनेत देहाची देखील शुद्ध आम्हास नाही; तेथे तुमचे वचन आता कोण
१२ सार्थ तुकारामगाथा
मानणार ? २ तुकाराम महाराज म्हणत आहेत की माझ्या चित्तात आता अनंतस्वरूपाचा परमेश्वर बसलेला
असल्यामुळे मला आता नित्य व अनित्य यांतील भेदही दिसेनासा झाला आहे ३
२१ सांगतो ते तुम्हीं अइकावे कानीं । आमुचे नाचणी नाचू नका ॥ १ ॥
जोवरी या तुम्हा मागिलाची आस । तोवरी उदास होऊ नका ॥ २ ॥
तुका म्हणे काय वायाविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा -नाचणी-नादाने, मागिलाची-संसाराची लौकिकाची, आस-इच्छा धिंद-फजिती
अर्थ -बायानो, मी सांगते ते तुम्ही आपल्या कानांनी नीट ऐका-माझ्या नादी काही केल्या तुम्ही सांगू
नका १ कारण जोपर्यंत तुम्हांला लौकिक संसाराची जबर हाव आहे तोपर्यंत उदास होऊन वैराग्याचा आव आणू
नका २ तुकाराम महाराज म्हणतात की अशामुळे काहीच पदरी न पडता तुमची फजिती मात्र होईल इकड़ेही
पतीची मर्जी पालवून बसाल व तिकडे परमेश्वरासही मुकाल ३
२२ आजिवरी तुम्हा आम्हा नेणपण । कौतुके खेळणे सग होता ॥ १ ॥
आतां अमावर जाले अगुणाची । करू नये तेचि करों सुखें ॥ २ ॥
तुका म्हणे आता बुडविली दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा -नेणपण-अज्ञान, सग-सोबत अगुणाची-निर्गुणाची
अर्थ -आजपर्यंत तुम्ही व आम्ही अज्ञानाने लौकिक प्रपंचासच महत्त्व देऊन कौतुकाने खेळ एकमेकांच्या
संगतीने खेळलो १ आता मात्र सर्व गुणाचा त्याग करून मी त्या निर्गुण परमेश्वराशी लीन झाले, आणि करू नयेत
ते खेळ सुखाने करण्यासाठी तत्पर झाले २ तुकारामबुवा म्हणतात आता मी दोन्ही कुळे सासरची व माहेरची
बुडवून एक नारायणास मात्र हृदयात स्थान दिले आहे ३
२३ सासुरिया वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावेचि ॥ १ ॥
साडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगू आता ॥ २ ॥
न व्हावी ते जाली आमुची भडाई । तुका म्हणे काई लाजो आता ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा -साडवर-नवरा टाकलेली स्त्री भडाई-अपकीर्ती
अर्थ -माझ्या सासुरवाडीस असे घडले की माझ्या पतीसच माझा वीट आला, आणि माहेरास तर दिलेली
मुलगी दुसऱ्याचीच या भावनेने अलिप्तपणा सहजच होता १ आता या नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीस कोण आधार
देणार ? जे काय व्हायचे नशिबात असेल ते भोगू आता २ दोन्ही ठिकाणी भांडणे होऊ नयेत, ती माझी झाली
खरी, आता त्याबद्दल लाज धरण्यात काय अर्थ आहे ? ३
२४ मरणाही आधीं राहिलो मरोनी । मग केलें मनीं होते तैसे ॥ १ ॥
आता तुम्ही पाहा आमुचे नवल । नका वेचू बोल वायाविण ॥ २ ॥
तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसी सग सरी तुम्हा आम्हा ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा -वायाविण-व्यर्थ
अर्थ -मरणाचे दुःख मी याच जन्मी जगू भोगले आहे प्रत्यक्ष देहत्यागापूर्वीच ती अवस्था या देहधारी
अवस्थेतही आम्ही भोगत आहोत माझा संपूर्ण पालट झाला आहे, मग जे माझ्या मनात होते ते मी करीत राहिलो. १
आता तुम्हीच आमच्या आयुष्यातील नवल पाहा उगाच व्यर्थ वचन मात्र अर्थशून्य बोलू नका २ तुकाराम
महाराज म्हणतात की तुम्ही सर्व बायका भयभीत आहात, तुम्हांला लौकिकाची आशा सुटलेली नाही तेव्हा तुमच्या-
आमच्या संगतीची बरोबरी कशी होणार ? होणार नाहीच ३
सार्थ तुकारामगाथा १३
२५ परपुरुषाचे सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावे सीस ॥ १ ॥
संसारा आगी आपुलेनि हाते । लावूनि मागुतें पाहू नये ॥ २ ॥
तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई १ ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - सीस-डोके, मागुतें-मागे
अर्थ -त्या श्रेष्ठ पुरुषाच्या, परमेश्वराच्या सहवासाचे सुख भोगावयाचे असेल तर तळहातावर शीर
घेऊनच जावे लागते, म्हणजे जिवावर उदार व्हावे लागते १ आपल्या हाताने आपल्या संसाराला आग लावावी
लागते, संसारसुखावर पाणी सोडावे लागते, पुन त्याच्याकडे मागे वळूनही पाहू नये २ तुकाराम महाराज
म्हणतात की दिव्यावर झेप घेणारा पतंग जसा जिवावर उदार होऊन झडप घालतो त्याप्रमाणे या मार्गातील
लोकांनी धीट व्हावयास हवे ३
२६ आइकाल परी ऐसे नव्हे ताई । न सडा या सोई अंतराची ॥ १ ॥
नव्हे आराणूक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविले तें ॥ २ ॥
तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशी ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा -न सडा-सोडू नका, आराणूक-तृप्ती, संतोप, गोविले-गुंतवून ठेविल
अर्थ -बापानो, तुम्ही माझे म्हणणे ऐकाल, पण त्याप्रमाणे वागणे तुमचे किती होईल कुणास माहित ?
पण तुम्ही या परमश्रेष्ठ संतांची संगत मात्र सोडू नका १ आणि लक्षात असू द्या की या लौकिक संसारापासून
कसलाच संतोप तुमच्या मनास लाभणार नाही, पण आपले आपणच त्या संसारात गुंतून राहिलेले असतो २ तेव्हा
मन जरा कठिण करा व ज्याचे मन असे कठिण होईल तेवढयाच माझ्या मार्गाने या ३
२७ आहाच वाहाच आत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हा संशा ॥ १ ॥
भेऊ नये तेथें भेडसावू कोणा । आवरूनि मना बद द्यावा ॥ २ ॥
तुका म्हणे काही अभ्यासावाचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - आहाच-आत वाहाच-बाहेर, गडणी-सावतीण, मैत्रिण, बद-बंदी, वायूचा निरोध
करण्याची योगमार्गातील एक प्रक्रिया,
अर्थ -आत मनात एक व बाहेर तोंडात एक अशा मैत्रिणी आम्हांस नकोत १ आमच्या मनात कसलेच
भय नसते, मग आम्ही तरी इतरांना कसे दाखवू ? तुम्हीही आपले मन आवरून बदिस्त करून ठेवा २ आणि
लक्षात असू द्या की कोणत्याही गोष्टीचा चांगला अभ्यास असल्यावाचून काही साध्य होईल असे नसते ३
२८ बहुताच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥ १ ॥
विचार करिता वाया जाय काळ । लटिकॆ ते मूळ फजितीचे ॥ २ ॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - लटिकॆ-बाट, घटापटा-व्यथ खटपट घटाबादा म्हणजे आकाश बस कवडे, तर
घटाच्या आकारात सामावलेले पट म्हणजे वस्त्र व त्यास ततू याच्या सवधावरून ईश्वर व जगत याच्या सवधाचे
वगन करण्याची जी वेदान्ताची परिभाषा ती या पटपटादी खटपटीवरून प्रकट होते
अथ -आम्ही काही पुष्कळ लोकाच्या मतांना मानणार नाही, कारण प्रत्येकाची भावना कशी वेगळी
असेल याचे काय सागावे ? १ याबद्दल जो जो विचार करावा तो तो वेळ मात्र वाया जातो असे दिसते व ही
चर्चाच व्यर्थ असून तोमुळे फजिती मात्र पदरी येते २ तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही वाटल्यास ही
घटपटादी खटपट करा खुशाल, पण आमच्या वाटेस मात्र कोणी जाऊ नका ३
१ दीपावरी
१४ सार्थ तुकारामगाथा
२९ त्याचे सुख नाहीं आले अनुभवा । कठिण हे जिवा तोचिवरी ॥ १ ॥
मागिलाचे दुःख लागो नेदी अगा । अंतर हे सगा नेदी पुढें ॥ २ ॥
तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसे ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - नेदी-देत नाही, सगा-भगतीस, श्रुति-वेद
अर्थ - जोपर्यंत त्या परमपुरुषाच्या सहवासाचे सुख अनुभवास आले नाही तोपर्यंतच जिवाला हा मार्ग
भारी कठिण वाटतो १ पण एकदा त्याची भेट झाली म्हणजे मग मात्र मागचे दुःख जाणवत नाही, आणि जे
संगतीचे सुख मिळेल त्यात अंतरही पडत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात की हा परमपुरुष सर्वांना संपन्न
असाच असून त्याचाच महिमा सर्व वेदांनी जाणून गाइला आहे ३
३० न राहे रसना बोलता आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मने ॥ १ ॥
मानेल त्या तुम्ही अइका स्वभावे । मी तो माझ्या भावे अनुसरले ॥ २ ॥
तुका म्हणे तुम्हीं फिरावे बहुतों । माझी तो हे गती जाली आता ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - रसना-जीभ वाणी आवडी-प्रेमाने
अर्थ - बाबांनो, त्या श्रेष्ठ पुरुषाविषयी बोलताना प्रेमामुळे माझ्या वाणीला भान राहात नाही माझ्या
मनाने तर त्याच्याच पायावर बुडी दिलेली आहे १ तुमचा जसा स्वभावविशेष असेल त्याप्रमाणे तुम्ही एकावे, मी
मात्र माझ्या स्वभावानुसार त्याला अनुसरले आहे २ तुकारामबुवा म्हणतात, बाबांनो तुम्ही आता मागे फिरावे
हे बरे माझी तर आता ही अशी गत होऊन गेली आहे ३
३१ न बोलता तुम्हा कळो न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥ १ ॥
आता तुम्हा पुढे जोडीतसे हात । नका कोणी अत पाहो माझा ॥ २ ॥
तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी । करील ते हरी पाहो आता ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - गुज-गुपित गोष्ट सांडियेली-सोडली
अर्थ - बाबांनो, मी ही माझ्या मनातील गुपित गोष्ट जर बोलले नसते तर तो तुम्हास समजली नसती,
म्हणून तर लाज सोडून मी ही तुम्हास सांगितली १ पण आता मात्र मी तुमच्यापाशी हात जोडून विनवणी करीत
आहे की आता माझा अंत कोणी पाहू नका २ तुकारामबुवा म्हणतात, आम्ही आता त्याच्या शेजारी सुखाने बसलो
आहोत, आता तो श्रीहरी जे करील ते आम्ही पाहू ३
विवरण - येथ विराण्यांचे पंचवीस अभंग संपले अत्यंत तीव्र अशा अनुभूतीच्या प्रकटीकरणासाठी
तुकाराम महाराजांनी ही अशी शृंगारिक भाषा वापरली असली तरी त्यातील रूपक एकदा ध्यानात आल्यावर मग
मथितार्थ सरळपण ध्यानात येण्याजोगा असतो
३२ नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ॥ १ ॥
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ २ ॥
देवापाशीं मागे आवडीची भक्ति । विश्वासेसीं प्रीति भावबळें ॥ ३ ॥
तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार दिसेदिस ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सुस्वर-गोड आवाज, निर्धार-निश्चय
अर्थ - तुकारामबुवा आपल्या मनास उपदेश करीत आहेत की मना, तुला मधुर शब्दांनी परमेश्वराचे
स्तवन करता येत नसेल, कारण तसा गोड आवाज तुला मिळाला नसेल १ पण ध्यानात ठेव की ईश्वर काही
त्याच्यासाठी भुकेलेला नाही तुला जसे येईल तसे 'रामकृष्ण रामकृष्ण' असे म्हण २ देवापाशी मोठ्या प्रेमाने