सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 27, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 27

॥ श्रीविठ्ठलाय नमः ॥
॥ श्रीनिवृत्तिनाथाय नमः ॥ श्रीज्ञानेश्वराय नमः ॥
॥ श्रीराघवचैतन्यश्रीकेशवचैतन्य ॥
॥ श्रीबाबाचैतन्यसद्गुरुभ्यो नमः ॥
मंगलाचरण-अभंग ६.
१ समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥ १ ॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ २ ॥
ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित' क्षणीं जडो देसी ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - समचरण- एकसारखी पावले, साजिरी-शोभिवंत, वृत्ति-अंतःकरणाची प्रवृत्ती,
चित्ताचे लक्ष, न लगे-लागत नाहीत, मायिक-डोळ्यांना दिसणारे, भासमान होणारे, परंतु वस्तुत नाशवंत वा
अशाश्वत असणारे, आर्त्त-इच्छा, आसुसलेली वृत्ती, ब्रह्मादिक-ब्रह्मलोक वगैरे, पदे-स्थाने, ठिकाणे, शिराणी-कळस,
शेवट, परिणाम क्षणीं-नको ( नयापारांत अप ) वर्म-मुख्य रहस्य, कर्मधर्म-कर्म आणि धर्म किंवा कर्ममूलक
धर्म, नाशवंत-नाश पावणारे
अर्थ - विटेवरील एकसारख्या पावलाकडे ज्याची दृष्टी लागली आहे, अशा सुशोभित मूर्तीकडे हे हरी,
माझ्या अंतःकरणाची प्रवृत्ती दृढ होवो १ याखेरीज दुसरे काही मायिक म्हणजे दृष्टीस मात्र दिसणारे पण वास्तविक-
पणे नसणारे असे पदार्थ मला नकोत; देवा, या पदार्थांवर माझी इच्छा कधीही जडू नये २ ब्रह्मलोक, विष्णूलोक,
इत्यादी ठिकाणे आहेत ती सर्व परिणामी दुःख देणारी असल्यामुळे त्या ठिकाणी माझ्या चित्तास लोभू देऊ नकोस ३
तुकाराम महाराज म्हणतात की कर्ममूलक असे जे जे नाना धर्म आहेत त्यांचे रहस्य आम्हास समजले आहे ते
सर्व नाशवंत असून तुझे रूप तेवढे शाश्वतवे आहे ४
विवरण -श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेतील पहिले सहा अभंग मंगलाचरणात्मक आहेत कोणत्याही
ग्रंथाचा आरंभ मंगलाचरणात्मक असावा असा रिवाज भारतीय कविमप्रदायात पुरातन काळापासूनचा आहे संस्कृत
साहित्यशास्त्रकारांनी मंगलाचरणाचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत आशीरूप, नमस्क्रियारूप, व वस्तुनिर्देशरूप
१ तेथें चित्त क्षणी