सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 36, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१० सार्थ तुकारामगाथा
१२ न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥ १ ॥
सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥ २ ॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा : नाइकें-ऐकणार नाही.
अर्थ : मी आता दुसरे काहीच पाहणार नाही, बोलणार नाही; आणि ऐकणार नाही; कारण माझ्या चित्तात
आता एक श्रीहरी स्थिर झाला आहे. १ सासरी व माहेरी आता मला माझे म्हणून कोणी नाही; श्रीहरीच्या
रूपात मी दोन्हीचे एकच स्वरूप मानले आहे. २ मीच भांडखोर म्हणून मजवर आळ आलेला होता; पण आता
त्या प्रभूंसच मिळवून मी सर्वांवर मात केली आहे. ३
१३ दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासुनिया ॥ १ ॥
बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥ २ ॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिका गोविंदोसी ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा : दुजा-दुसरा, प्रीतिका-प्रीति करणाऱ्या
अर्थ अनंत स्वरूपाच्या असणाऱ्या या हरीवाचून आता दुसरा कोणी बलवान आहे ? १ आणि या
बलवंताच्या प्राप्तीमुळे आम्हीही बलवान झालो असून आमची सत्ता आता सर्वांवर राहील. २ तुकाराम महाराज
म्हणतात की आम्ही मूळचेच अतःकरणाने उदार आहोत; म्हणूनच गोविंदास प्रेम करून आम्ही जवळ करू
शकलो. ३
१४ क्षणभरी आम्हीं सोसिलें घाईट । साधिलें अवीट निजसुख ॥ १ ॥
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥ २ ॥
तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा : अवीट-वीट किंवा, कंटाळा न येणारे, निजसुख-मोक्षाचे सुख, साडीमांडी-टाळणे, पुन.
घेणे, भरोवरी-श्रम, कष्ट
अर्थ : लोकांच्या दृष्टीने मी त्याची निंदा क्षणभर सहन केली; पण त्या योगाने ज्याचा कधी कंटाळा
येणार नाही असे मोक्षसुख मी मिळविले. १ पूर्वायुष्यात अनेक प्रकारची यातायात केली. अनेक गोष्टी टाळल्या.
पुनः घेतल्या. सुखप्राप्तीसाठी अनेक परिश्रम घेतले, पण ते सर्व मला अधिकच दुःखाचे झाले. २ पण आता या
अनंत स्वरूपाच्या प्रभूशी लीन झाल्यामुळे, पायांशी राहिल्यामुळे जाणेयेणे अथवा त्यातील कष्टच संपून गेले. ३
१५ आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥ १ ॥
फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥ २ ॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा : दुजें-दुसरे, एकविध-एकनिष्ठ, अंगसंग-शरीराची जवळीक, शरीराचा भोग.
अर्थः-आता मला कोणी वडील, कोणी धाकटे नाही. मीच मला वडील आहे व धाकटीही आहे. आता
माझ्या मागाहून येणारे कोणी नाही ; पुढेही आलेले कोणी नाही. १ आता मला चांगला एकांतही मिळतो,
तेव्हा एकनिष्ठ भावनेनेच मी राहतो व तो श्रीहरी माझयारोबर सर्व प्रकारच्या क्रीडा करतो. २ आमच्या दोघां-
शिवाय दुसरे तेथे कोणीही नसते ३
१६ सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥ १ ॥
याचसाठीं सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषासीं ॥ २ ॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥ ३ ॥