सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
४३६ सार्थ तुकारामगाथा
न घडतां दृष्टादृष्टी । काय गोष्टी कोरड्या ॥ ३ ॥
अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका १ साक्षीतें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पाठवणें-पायरीला.
अर्थ :- देवाच्या देवळाच्या पायरीला नुसता स्पर्श करून, नमस्कार करून काय उपयोग ? त्याने उद्धार
कसा होणार ? १ प्रत्यक्ष भेटीत जे सुख उभे राहील, तेच सर्वात चांगले शोभून दिसणारे आहे. २ जर एकमेकांची
दृष्टादृष्टच झाली नाही, तर मग सर्व गोष्टी वरवरच्याच, कोरडयाच राहतात ३ तुकाराम महाराज म्हणतात,
यासाठीच मी अबोल झालो असून अंतःकरणात त्याच्या साक्षीने मौन धारण केले आहे. ४
९६४ अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥ १ ॥
तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ २ ॥
पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥ ३ ॥
तुका म्हणे कंठीं नाम । अंगीं भरलेंसे प्रेम ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अचळ-स्थिर, न चळणारे.
अर्थ :- निर्भय असणारे असे हे एकच स्थान म्हणजे, या विठ्ठलाचे चरण होत १ म्हणूनच मी याचा
विश्वास धरून याच्या पायांचा दास होऊन राहिलो आहे. २ या श्रीहरीच्या पायांची गोडी मला लागली, म्हणूनच
माझी आवड पूर्ण झाली आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कंठात या श्रीहरीचे नाम असून अंगात
रोमारोमी या श्रीहरीचे प्रेम भरून राहिले आहे ४
९६५ संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥ १ ॥
आतां नको मज खोट्यानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ २ ॥
गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥ ३ ॥
तुका म्हणे कसां निवडा जी खरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संदेह-संशय, निरसे-दूर होईल, फिक्यासी-रुचीहीन, फिके असणाऱ्यास, फटवूं-
फसवू, आळीपायीं-पायापाशी हट्ट
अर्थ :- सर्व संशयाचे निरसन झाले, ते दूर झाले तरच चांगले रुचकर असते. जे फिके व रुचिहीन असते,
त्याविषयी कुणासही आदर वाटत नाही कुणालाही ते आवडतही नाही. १ देवा, आता मला खोटी आशा दाखवून
उगाच फसवू नका मी आता तुमच्याकडे वारंवार कुठे ये-जा करू ? २ आता तुमच्या लाभावाचून माझा जीव
जरी गेला तरी काय संकट ओढवणार आहे ? मी वाचून तरी काय मोठे कार्य साधले जाणार आहे ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, आम्ही पोरांनी आपल्या पायांशी हट्ट केला आहे, तो तुम्ही नीट कसास लावून पुरवावा, आमची
निवड नीट करावी ४
९६६ वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचाचि वाहो बहुतेक ॥ १ ॥
आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलागा काळ जितितसे ॥ २ ॥
वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥ ३ ॥
तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें खरें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वाहो-प्रवाह, निश्चळ-स्वस्थ
अर्थ :- वाणीने वृथा बडबड पुष्कळ करण्यासारखी आहे; पण त्याप्रमाणे अनुभव मात्र दुर्लभ आहे. बहुतेक
ठिकाणी आधीची जी चाल असेल, तिचाच मागोवा घेत जाण्याची रीत असते. १ अशा परिस्थितीत आम्ही स्वस्थ
१ एका.
सार्थ तुकारामगाथा ४३७
इसे राहावे ? कारण आमच्या पाठीमागे एकसारखा काळ लागलेला आहे. तो आम्हास जिंकू पाहात आहे. २
केवळ पोट भरण्यासाठी परमार्थाचे व भक्तीचे ढोंग करून कसे चालेल ? त्यायोगे मूळ मुद्दलासच तोटा येईल ना. ३
तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, तुमच्या अभय अशा वरदहस्ताने मी माझ्या मनास जागृत ठेवणे हेच चांगले
होय. ४
१६७ उगॅचि हे मन राहाते निश्चळ । तरि कां तळमळ साट' होती ॥ १ ॥
काय तुमचीं नेणो कवतुक विदानें । सर्वोत्तमपणें खेळतसां ॥ २ ॥
नानाछंदें आम्हां नाचयावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साट-एकसारखी, विदाने-कौशल्ये
अर्थ :- माझे मन उगेच राहून स्थिर होत असूनही मग ही तळमळ एकसारखी का होत आहे हो ? १
तुमची कौशल्ये काय व कशी आहेत, हे काही ध्यानात येत नाही तुम्ही सर्वोत्तमपणाने क्रीडा करीत असता २ देवा,
तुम्ही नाना छंद करून आम्हा जीवांना नाना प्रकारांनी नाचविता, आमच्या हावा भलत्यासलत्या वाढविता. ३
तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या चेष्टा करीत आहात. ४
१६८ आम्ही बळकट जालो फिराउनी । तुमच्या वचनीं तुम्हां गोऊं ॥ १ ॥
जाले तेव्हां जाले मागील ते मागें । आतां धर्मलागे ठावो जालीं ॥ २ ॥
तोडावया अवघ्या चेष्टाचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध युद्ध व्हावें ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्हां आत्मत्वाची सोय । आपणचि होय तैसाचि तूं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- फिराउनी-फिरून, गोऊ-गुंतवू
अर्थ - देवा, आम्ही फिरून आता मोठे बळकट झालो आहोत. आम्हांस सांभाळण्याचे किंवा आमच्यावर
कृपा करण्याचे जे ब्रीद तुम्ही घेतले आहे, त्यात तुम्हास गुंतवून टाकू १ यापूर्वी काय झाले असेल ते असो, आता
मात्र तुला पकडण्याची सर्व धर्मे आम्हास माहीत झाली आहेत २ देवा, तुझ्या सर्व चेष्टाचा सबंध तोडण्यासाठीच
आम्ही शुद्ध भावाने तत्पर झालेले आहोत. तुम्हीही आमच्यासारख्या शुद्धापाशी शुद्धयुद्ध व्हावे ३ तुकाराम महाराज
म्हणतात, आम्हास आत्मस्वरूपात येण्याची जशी सोय आहे, तशीच ती तुम्हासही असेलच ४
१६९ तुम्ही साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसे ॥ १ ॥
कासया घातला लावणी उद्धार । ठेवा करकर बाह्यनियां ॥ २ ॥
सुटो नये ऐसे कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवूनि ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्ही समाग्य जी देवा । माझा तुम्हा केवा काय आला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर, नुपेक्षाल-अव्हेर करणार नाही, करकर-कटकट, बाह्यनियां-दूर करून,
निरुतें-खरोखर, केवा-पर्वा, फिकीर, अवघड
अर्थ:- देवा, तुम्ही माझा अव्हेर कधीही करणार नाही, अशीच खात्री मला आहे मला तुम्ही, फार अधीर
आहे मी, असेच समजता. १ देवा, माझ्या उद्धाराची गोष्ट एवढ्या लावणीवर का हो टाकली आहे ? एकदा
उद्धार करून ही कटकट कायमची मिटवा ना. २ खरोखर ही कटकट काही मागची सुटणार नाही, असे तुम्हांस
कळते तर मग पुनः पुनः अशी आळवणी करून का घेता हो ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मोठे
भाग्यवान आहात, तुम्हांला माझ्यासारख्याच्या उद्धाराचे एवढे अवघड का वाटावे ? ४
१ साठ.
४३८ सार्थ तुकारामगाथा
९७० तुम्हा होईल देवा पडिला विसर । आम्हीं ते उत्तर यत्न केलें ॥ १ ॥
पतितपावन ब्रीद मिरविसी । याचा काय देसी झाडा साग ॥ २ ॥
आहाच मी नव्हें अर्थाचे भुकेले । नलत्या एका बोले वारेन त्या ॥ ३ ॥
तुका म्हणे देह देईन साडणे । सहित अभिमाने ओवाळूनि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - झाडा-हिशेब, अर्थाचे-सपत्तीचा वारेन-दूर करता येईल
अर्थ - देवा, आमचा विसरच तुम्हास पडलेला दिसतो आम्ही तर उद्धारासाठी एकसारखी बडबड
तुमच्यासमोर केलेली आहे १ पतितपावन असे ब्रीद देवा, तू मिरवितोस, मग माझा जर उद्धार केला नाहीस, तर
या ब्रीदाचा हिशेब कसा देशील ? २ उगाच मी आपला काही सपत्तीचा भुकेलेला नाही तुम्हास भलत्या सलत्या
बोलाने मला दूर करता येईल असे नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा देह मी सर्व अभिमानासहित
तुमच्यावरून ओवाळून टाकीन ४
९७१ जडलो अगाअंगीं । मग ठेवी प्रसगो । कांहीं उरीजोगी । लोकी आहे पुरती ॥ १ ॥
ठेवी निवारुनि आधीं । अवकाश तोचि बुद्धी । सापडली संधी । मग बळ कोणासी ॥ २ ॥
गळा बाधेन पायीं । हालो नेदी ठायिचा ठायीं । निवाड तो तईं । अवकळा केलिया ॥ ३ ॥
तुका म्हणे ठावे । तुम्ही' असा जी वरचे । वोभाटाची सवे । मुळीहुनी विठोबा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उरीजोगी-शिल्लक राहील असा सवे-सवय
अर्थ - देवा, मी तुमच्या अंगाला येऊनच जडलो आहे अशा या प्रसंगी तुमचा मोठेपणा शिल्लक राहील,
असा काही मी ठेवणार नाही तुमचा व आमचा सबध कसा आहे याविषयीची कीर्ती लोकात पूर्णपणे आहेच १
आमच्या बुद्धीने अजून धीर धरला आहे, तोपर्यंतच देवा, तुम्ही पूर्णपणे विचार करा मग सधी सापडल्यावर आम्ही
तुला धरून ठेवले तर, बळ कुणाचे मोठे आहे हे ध्यानात येईल २ अशा वेळी माझा गळा आपल्या पायाशी बाधेन,
मग तुम्हाला जाग्यावरून काही हालता यायचे नाही यावेळी तुमची पुरती फजीती केल्याशिवाय निवाडा होईल
असे नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आम्हास पुरतेच ठाऊक आहात आपल्या दारात आलेल्या
याचकाला असेच ओरडत ठेवण्याची सवयच पहिल्यापासून तुम्हाला आहे ४
९७२ आम्ही शक्तिहीने । कैसे कराल ते नेणे ।
लिगाडाच्या गुणें । लोळमला राहिलो ॥ १ ॥
माझें मज देईं देवा । असे ठेविला तो ठेवा ।
नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ २ ॥
नाहीं गळा पडलो झोड । तुमचे तेचि माझें तोड ।
चोघा चार खड । लायणी हे अनुचित ॥ ३ ॥
नाही येत बळा । आता तुम्हासी गोपाळा ।
तुका म्हणे गळा । उगवा पाया लागतो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लिगाडाच्या-कटकटीच्या, झोड-निलाजरा, दांडगा
अर्थ - देवा, आम्ही तर शक्तीहीन आहोत आमचा उद्धार तुम्ही कसा करणार आहात, ते काही समजत
नाही तुम्हाला स्वतःपाठीमागे अशीच सारखी कटकट ठेवण्याची सवयच असल्यामुळे, मी असा कृपेशिवाय खोळंबून
राहिलो आहे १ देवा, मी माझा जो ठेवा तुमच्याजवळ ठेविला आहे, तो मला परत द्या ना मी काही आगली
अधिक मिळावे म्हणून काही हाव धरीत नाही २ मी एखादा दांडगा असून तुमच्या गळ्यात भलेच पडलो आहे
१ आम्हा
असे नव्हे तुमचे व माझे बोलणे एकसारखेच असल्याने दोघांना बोलावून दोघांच्या भांडणाचा निकाल लावून टाका
ना एकदाचा हे काम लावणीवर टाकणे उचित नाही देवा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी काही
आता निकरावर येत नाही तुमच्या पायावर मी माझे डोके ठेविले आहे, ते आणून माझी मुक्तता करा एवढीच
विनंती आहे ४
९७३ काय कृपेविण घालावे साकडें । निश्चिती निवाडें कोण्या एका ॥ १ ॥
आहो तैंसी पुढें असो दीनपणे । वेचूनि वचने करुणेची ॥ २ ॥
धरू भय आता काय वाहों चिंता । काय करु आता आप्तपण ॥ ३ ॥
तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साकडें-संकट
अर्थ - देवा, तुम्ही मजवर कृपा केलेली नाही म्हणून काय मी तुम्हास संकटात घालावे ? देवा, मी
निश्चित असावे, असा कोणताही एखादा निवाडा तुम्ही केलेला नाही १ देवा, यापुढेही आम्ही पूर्वी होतो तसेच
दीन वृत्तीने राहू करुणेची वचने तुमच्यासमोर बोलत राहू २ आता कसले भय धरून मनात चिंता वाहू ? आता
आप्तपणाच्या संबंधास तरी काय करावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जीव भावभक्तीच्या शिवाय
आहोत, म्हणूनच देव आमच्यापासून दूर झाला आहे ४
९७४ नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज का नारायण दुरी जाला ॥ १ ॥
अशंकितीं मनें करों आळवण । नाहीं समाधान निश्चितीचे ॥ २ ॥
दासाचा विसर हे तो अनुचित । असे¹ सर्व नीत पायापाशीं ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्हा लाज येत नाहीं । आम्हा चिंताडोहीं बुडविता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दुरी-दूर अशंकितें-संशयित होऊन
अर्थ - शास्त्रवचनांची अथवा साधुसंतांची मर्यादा मी अजून कधी ओलांडली नाही मग हा नारायण
मला एवढा दूर का बरे झाला आहे ? १ याच संशयित मनाने मी या देवाची प्रार्थना करीत आहे, पण माझ्या
मनाच्या ठिकाणी चिंतारहित असे समाधान नाही २ देवा, तुला तुझ्या दासाचा विसर पडला आहे हे तर फारच
अनुचित दिसते तुमच्याजवळ तर सर्व नीती आहे असे असून तुम्ही असे वागता ? ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, आम्हाला अशा प्रकारे नाना प्रकारच्या चिंताच्या डोहामध्ये बुडविताना तुम्हाला काही लाज वाटत नाही ? ४
९७५ जीव जायवरी सांडी करी माता । हे तो आश्चर्यता बाळकावी ॥ १ ॥
दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जाले ॥ २ ॥
क्षणक्षणा माझा न घ्यावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥ ३ ॥
तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल फटवेचि तें तें होय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सांडी-त्याग फल फटवेचि-फोलकटाप्रमाण
अर्थ - एखाद्या मुलाचा प्राण जाईपर्यंत त्याची आई त्याचा त्याग करते, हे एक मोठे आश्चर्यच आहे १
देवा, तुम्ही दुर्बळच आहात, काय ? मग आम्ही जे सांगतो आहोत, ते तुम्ही नीट कानानी का ऐकत नाही ? तुमच्या
ठिकाणी काय कमीपणा निर्माण झाला की काय हो ? २ क्षणाक्षणास आमचा सांभाळ तुम्ही करूच नये, अशा
दुर्दैवाचा काळ मोठा विपरीत आलेला दिसतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमच्या बोलण्यास काही
रुचीच नाही, असे झाले आहे फोलकटाप्रमाणे ते व्यर्थ होत आहे ४
१ असो
४४० सार्थ तुकारामगाथा
९७६ म्हणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥ १ ॥
कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मीच माझ्या वेचें अट्टाहासें ॥ २ ॥
कासयानें गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वांचुनिया ॥ ३ ॥
तुका म्हणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- विचारावें-विचार करावा
अर्थ :- देवा, मी तुमचा दास असून नसल्यासारखा झालो आहे. अनुभवानेच हे सर्व मी बोलतो आहे
स्वामीपुढे. १ देवा, मी तुमच्यापाशी एवढे बोलतो; तर तुम्ही उत्तर म्हणून एका शब्दाने का बोलत नाही
माझ्याशी ? मीच मात्र हट्टाने सारखी बडबड करीत आहे. २ देवा, तुमच्याबद्दल गोडी निर्माण होऊन तुमच्या-
विषयी विश्वास कसा वाटेल आम्हांस ? कारण तुमच्याआमच्यामध्ये प्रीतीचा थोडाही भाव दिसत नाही. ३
तुकाराम महाराज म्हणतात, अरे चतुरांच्यांत चतुर असणाऱ्या ईश्वरा, तूच तुझ्या मनात एकदा याचा विचार करून
पाहावा ना. ४
९७७ काय आतां आम्हीं पोटचि भरावें । जग चाळवावें भक्त म्हण ॥ १ ॥
ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ २ ॥
काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥ ३ ॥
तुका म्हणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- चाळवावे-फसवावे, गुंपोनि-गुंतून
अर्थ - देवा, आता तुझे भक्त म्हणून आम्ही ढोंगीपणाने लोकांना फसवून काय नुसते पोटच भरावे की
काय ? १ असाच तुमचा विचार असेल तर, तो आम्हांस सांगा ना एकदाचा देवा, आम्ही फारच कासावीस झालों
आहोत. २ अक्षरांची कशी तरी जोडणी करून आम्ही रूढीप्रमाणे कवित्व करूनच आयुष्य घालवावे की काय ? ३
तुकाराम महाराज म्हणतात, की देवा, आम्ही आमचा घात करून नेहमीच्या दुकानदारीतच गुंतून असावे की काय ? ४
९७८ वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥ १ ॥
बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ २ ॥
द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥ ३ ॥
तुका म्हणे सत्तावळें । लडिवाळें राखावीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- दावा-दाखवा
अर्थ :- देवा, आता तुमच्या प्राप्तीचे खरे वर्म काय आहे, ते तरी दाखवा ना. कारण मी खरे काय आहे
ते जाणीत नाही. १ अनेक इंद्रियांच्या सुखांच्या रंगात माझी वृत्ती हीनदीन झाल्यामुळे देवा, मी तुला शरण आलो
आहे २ देवा, तुम्हीच जर मला धीर द्याल, तर तुमच्या पायी माझे मन स्थिर होईल. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, तुम्ही तुमच्या सत्तेच्या बळाने माझ्यासारख्या लाडक्या बाळांचे रक्षण करावे ४
९७९ सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥ १ ॥
वांयां मज चुकूर करा । विश्वंभरा विनोदें ॥ २ ॥
आवडीच्या करा ऐसें । अंतर्यासीं जाणतसां ॥ ३ ॥
तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- चुकूर-गोधळलेला.
सार्थ तुकारामगाथा ४४१
अर्थ - देवा, तुमच्या बोलाची आवड मला काय असते, ते काय सांगायाला हवे ? १ सर्व विश्वात भरून
असणाऱ्या देवा, विनोदाने मला गोधळलेल्या मनस्थितीत कृपा करून घालू नका २ देवा, तुम्ही नत करणात
निवास करीत असल्यामुळे सर्व काही जाणताच, तुम्हास जसे आवडेल तसे देवा, तुम्ही करा ३ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, मग मी मोठ्या समाधानाने मनापासून मोकळा होईन ४
९८० निर्धाराचे अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥ १ ॥
बैसलिया भाव पायीं । बरा तईं नाचेन ॥ २ ॥
स्वामी फळे सावधान । तरि मन उल्हासे ॥ ३ ॥
तुका म्हणे आश्वासावे । प्रेम द्यावे विठ्ठले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - तईं-तव्हा
अर्थ - कोणतीही गोष्ट निर्धाराने करणे, हेच गोड असून त्याचेच कोडकौतुक होते १ देवा तुझ्या
पायांशी एकदा माझा भाव निश्चित झाला की मग मी त्यानुसार सुंदर नृत्य करीन २ माझा स्वामी मोठ्या साव-
धतेने मजकडे लक्ष देत आहे, असे दिसल्यास मला मनात मोठाच उल्हास वाटेल ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, मला नीट आश्वासन देऊन तुजविषयीचे प्रेमतुझ द्यावे ४
९८१ जाली तडातोडी । अवघीं पडिलों¹ उघडीं ॥ १ ॥
नव्हो कोणाचीच काहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ २ ॥
पाथपला सवसार । मोडली बैसण्याची थार ॥ ३ ॥
आता म्हणे तुका । देवा अंतरें राखो नका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वाहीं-प्रवाहात, पाथपला-नष्ट झाला, थार-स्थान
अर्थ - देवा, आता आमची व लौकिक गोष्टींची ताटातूट झाली आहे त्यामुळे आम्ही आता उघडे पडलो
आहोत १ आता आमचा व कुणाचाच संबंध नाही, अशी स्थिती प्राप्त झाली असून आम्ही तुझ्या भक्तिमार्गाच्या
प्रवाहात सापडलो आहोत २ आमची आता संसारावरील आस्था संपल्यामुळे तो जवळजवळ नष्टच झाला आहे
हा संसार ज्या आसक्तीवर उभा राहतो, ती आसक्तीची बैठकच मोडून गेल्यासारखी झाली आहे ३ तुकाराम
महाराज म्हणतात, देवा, आता तुम्ही मला आपल्यापासून दूर अंतरावर ठेवू नका ४
९८२ आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥ १ ॥
तुम्हापाशी काय उणें । काय वेचे समाधाने ॥ २ ॥
सेवेच्या अभिलाषें । मन बहु जाले पिसे ॥ ३ ॥
अरे भक्तपराधीना । तुका म्हणे नारायणा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अभिलाषें-इच्छेने, पिसे-वेडे, भक्तपराधीना-भक्ताच्या स्वाधीन असणाऱ्या देवा
अर्थ - देवा, आता मला तुमच्याच पायाचा आश्रय मिळावा अशी मी इच्छा करीत आहे १ खरे पाहता
तुमच्यापाशी काय कमी आहे ? माझे थोडेवसे समाधान केले तर काय कमी पडणार आहे तुम्हास ? २ देवा,
तुमच्या सेवेच्या इच्छेने माझे मन येडे बनले आहे ३ अरे भक्ताच्या स्वाधीन असणाऱ्या देवा, नारायणा, तू माझी
अवस्था जाणून माझ्यावर कृपा कर ना ४
९८३ तुमचा तुम्हीं² केला गोवा । आता चुकवितां देवा ॥ १ ॥
फंसें सरे चाळवणे । केले फाशांला शाहाणे ॥ २ ॥
१ पडिली, २ आम्ही
तु गा ५६
४४२ सार्थ तुकारामगाथा
फासया रूपा । नाचा आलेति गा बापा ॥ ३ ॥
तुका म्हणे आता । न सरे हवाले घालिता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गोवा-गुतागुत, हवाले घालिता-हवाले देण्याने
अर्थ - देवा, हा व्यक्त होण्याचा तुमचा तुम्ही खेळ करून गुतागुत केलीत, आणि आता चुकाचुकी
करीत आहात ? अशी फसवणूक आता कशी चालेल हो ? आम्हाला जन्मास घालून असे शहाणे तरी कशास
केले ? २ देवा, तुम्ही पतितपावन, भक्तवत्सल, करुणासागर इत्यादी नामारूपास तरी का हो आलात ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, देवा, आता नुसते हवाले देऊन भागणार नाही माझ्यावर कृपा केलीच पाहिजे ४
९८४ माझी भक्ती भोळी । एकविध भावबळी ॥ १ ॥
मी का पडेन निराळा । ऐसा साडूनि सोहळा ॥ २ ॥
आता अनारिसा । येथें न व्हावे सहसा ॥ ३ ॥
तुका म्हणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - एकविध-एकनिष्ठ, अनारिसा-वेगळे
अर्थ - देवा, माझी ही भक्ती भोळीभावडी असली तरी, ती एकनिष्ठ व भावाने बळकट अशी आहे, १ अशा
प्रकारचा भवतीचा सोहळा सोडून मी काही निराळा होणार नाही २ आता या ठिकाणी वेगळे होणे सहसा जमणारे
नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही आपले पाय एकमेकास जुळवून आमच्यासमोर उगेच उभे राहावे,
आम्हास त्याच्यावर मस्तक ठेवायचे आहे ४
९८५ आहे तरि सत्ता । ऐशा करितो वारता ॥ १ ॥
अगसगाची उत्तरे । सलगीसेवेने लेकरे ॥ २ ॥
तरी निकटवासें । असो आशकेच्या नासें ॥ ३ ॥
तुका म्हणे रुची । येथें भिन्नता कैंची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वारता-वार्ता बोलणी, अगसगाची-जिव्हाळ्याने, आशकेच्या नासे-शकाकुशका टाकून
अर्थ - देवा, आमची तुमच्यावर थोडीबहुत सत्ता आहे, म्हणूनच अशी धिटाईची बोलणी मी करीत आहे १
मुलालेकराचे धनी आम्हीही असल्याने विशेष प्रकारच्या जिव्हाळ्याने व सलगीने आम्ही तुमच्याशी लडिवाळ बोलणी
करीत असतो. २ तरी मनातील सर्व शंकाकुशंका काढून टाकून आम्ही नेहमी तुमच्याजवळच असू ३ तुकाराम
महाराज म्हणतात, याच सानिध्याची मला मोठी रुची आहे यात भिन्नता नाही ४
९८६ काळ सारावा चिंतने । एकांतवासी गंगास्नाने । देवाचे पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या १ ॥ १ ॥
युक्त आहार विहार । नेम इंद्रियाचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ २ ॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया २ जतन । हे उपाय लाभाचे ॥ ३ ॥
देह समर्पिजे देवा । भार काहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - चिंतनें-ईश्वराच्या नामस्मरणात, विहार-विश्रांती, वासर-स्वच्छंदी
अर्थ - मनुष्याने आपले आयुष्य ईश्वराच्या नामस्मरणात घालवावे एकान्तवासात राहून गंगास्नाने
पवित्र व्हावे मनोभाव देवाचे पूजन करावे तुळशीस प्रदक्षिणा घालाव्यात १ विधियुक्त व उचित असा आहार
घेऊन आवश्यक तेवढीच विश्रांती घ्यावी इंद्रियसुखाना नियमितता हेच सुखी आयुष्याचे सार आहे उगाच
स्वच्छंदीपणाचे वागणे नसावे, फार झोप नसावी, फार बडबड नसावी २ परमार्थविचार हेच महाधन मानून देवाचे
चरण जोडावेत व एकदा जोडलेले हे चरण जपावेत कसे, यासंबंधीचे उपाय शोधणे हेच लाभाचे होण्यासारखे आहे ३
१ तुळशीची, २ करावया
देह परमेश्वरात समर्पित केलेला असावा. स्वतःच्या शिरावर मोठेपणाचे कसलाही भार घेऊ नये, यामुळे तुकाराम
महाराज म्हणतात, जीवनात आनंदीआनंद निर्माण होईल ४
विवरण - तुकारामबुवांच्या अभंगात कित्येक वेळा परस्परविरोधी वचने असल्यासारखी वाटतात.
संसार करावा की करू नये ? मुलामाणसांबद्दल प्रेमाने विनी असावीत ? घरदार मोडावयास हवे काय ? धनसंपत्तीचा
वीट विटौ मानायचा ? यासारख्या प्रश्नाचा विचार करताना मोठीच सावधगिरी बाळगून, संदर्भ पाहून निर्णय
घ्यावयास हवा. ज्यांना खरोखरीच परमार्थाचे गुह्य शोधावयाचे आहे, आत्मतत्त्वाची अनुभूती घ्यावयाची आहे,
अलौकिकाचा साक्षात्कार करवून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी प्रखर वैराग्यादी साधने आवश्यक आहेत परंतु सर्व-
सामान्य सांसारिक स्त्री-पुरुषांना तुकाराम महाराजांनी कोणता उपदेश केलेला आहे ? या प्रश्नाचे उत्तर या अभंगात
आहे. प्रपंच व परमार्थ हे एकाच वेळी एकाच माणसास जमणार नाहीत, असही तुकोबा मधून-मधून म्हणत असले तरी
सांसारिकांनी परमार्थविचार अगदीच मोडावा असे त्यांना कधीही सांगितले नाही. उलट भलत्यासलत्याच अधारी
मार्गाच्या साधनांची त्यांनी अवहेलना करून नामसंकीर्तनाचे, भजनमात्राचे सर्वश्रेष्ठ साधन उपलब्ध करून दिले. जे जे
फुटेर ते ते प्रभुसत्तेतूनच, अशी मनाची धारणा झाल्यावर मग संसाराचे रूपही पालटने यासाठी अगदी साधे आचार-
विचार तुकाराम महाराजांनी या अभंगात स्पष्टपणे सांगितले आहेत.
अखंड परमेश्वराचे अनुसंधान असावे, एकान्नवान्न सेवावा, गंगास्नान करावे, देवाचे पूजन, तुळशीला प्रद-
क्षिणा, युक्त असा आहार, नियमित विश्रांती, इंद्रियसुखांची नियमित प्राप्ती, परमार्थ हेच महाधन मानावे, दयाचे
धरण सोडू नये, असे अगदी साधे सोपे आचारविचार बुवांनी या अभंगात सांगितलेले आहेत. यात आचरावयास
कठीण अशी साधने नाहीत, की प्रदीर्घ व्रतवैकल्यांची यातायात नाही, यात कर्मकांड नाही, की गुंतागुंतीचे विधि-
निषेध नाहीत. अतिशय साध्या अशा आचरणमार्गाचा निदर्शक असा हा अभंग नित्य स्मरणीय असाच आहे.
९८७ मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऐसे ॥ १ ॥
मेले जित असो निजोनिया १ जागे । जो जो जें जें मागे ते ते देऊ ॥ २ ॥
भले तरि देऊ गांडीची लगोटी । नाठयाळाचि गांठी देऊ माथा ॥ ३ ॥
मायबापाहूनि बहु मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥ ४ ॥
अमृत तें काय गोड आम्हापुढें । विष तें बापुडें कडू किती ॥ ५ ॥
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचे पुरे कोड त्याचेपरि ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - नाठयाळा-दुष्टाच्या.
अर्थ - आम्ही विष्णुदास कसे आहोत ? तर प्रसंगी मेणाहूनही आम्ही मऊ आहोत, आणि प्रसंग पडला तर
इंद्राच्या वज्रासही आम्ही भेदून टाकू, अशी आमची शक्ती आहे. १. आम्ही देहबुद्धीन मेलेलो असून आत्मतत्त्वाच्या
जाणिवेने जिवंत आहोत. आम्ही देहबुद्धीच्या दृष्टीने झोपलेले असून आत्मतत्त्वाच्या जाणिवेने जागेच आहोत. २.
जे कुणी आम्हास चांगले भेटतील, त्यांना आम्ही कमरेची लंगोटीही देऊन टाकू, पण जर कुणी नाठाळ व दुष्ट
भेटतील, तर त्याच्या डोक्यात काठी आम्ही मारायला मागेपुढे पाहणार नाही. ३. आम्ही मायबापापेक्षाही पुष्कळच
दयाळू व कृपावंत आहोत, पण प्रसंग पडला तर आम्ही शत्रूपेक्षाही घातपात करू शकतो. ४. आमच्यापुढे अमृताची
गोडी अशी किती असणार ? आणि आम्हात्समोर विष तर बिचारे दोन होऊन उभे असते. ५. तुकाराम महाराज
म्हणतात, आम्ही सर्वच बाजूनी पूर्णपणे गोडच आहोत ज्याची जशी इच्छा असेल, तशी आमच्याकडून ती सफल
होईल. ६.
विवरण - तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा हा एक अभंग आहे. विष्णुदास किंवा विठ्ठलभक्त कसे
असतात, याचे मोठे बोलके शब्दचित्र तुकाराबांनी यात काढले आहे. आम्ही विष्णुदास लोण्याहून मऊ आहात, कमरेची
लंगोटीही कुणी मागितली तर ती देऊ मायबापाहूनही आम्ही दयावंत आहात, अमृतापक्षा आमची गाठी अधिक
आहे वगैरे वर्णन संताचे, किंवा विठ्ठलभक्ताच सहज समजण्यासारखे आहे.
१ निजेलिया
४४४ सार्थ तुकारामगाथा
पण विष्णुदासाच्या स्वभावाची जी दुसरी एक बाजू या अभंगात दर्शविलेली आहे, ती अधिक महत्त्वाची
आहे किंबहुना ही दुसरी बाजू जेवढी भक्कम, तेवढी पहिलीची सुरक्षितता अधिक अस मानावे लागते साधुपुरुषाच्या
रक्षणाची पहिली पायरी म्हणजे दुष्टांचा नाश, असा निर्वाळा गीतेनेच दिलेला आहे तुकाराम महाराजांनीही दयेची
व्याख्या सांगताना 'दया तिचे नाव भूतांचे पाळण । आणिक निर्दाळण कंटकाचे' असेच आग्रहाने म्हटलेले बाहे दुष्ट
लोकांचा नाश हाही एक दयेचाच भाग मानणे क्रमप्राप्त असते, आणि याच हेतूस ध्यानात धरून या अभंगात बुवा
म्हणत आहेत, आम्ही कठिण अशा इंद्राच्या वज्रासही फोडून टाकू, नाठाळ माणसाच्या डोक्यावर आम्ही काठी हाणू,
शत्रू सुद्धा करणार नाही अस घातपात आम्ही करू आमच्या पुढे बडू विषाची काय किंमत ? अशा भाषेतील अति
शयोक्ती जरी सोडून दिली तरी मेणाहून मऊ असणाऱ्या विष्णुदासाच्या स्वभावातीलही कणखर बाजू ध्यानात येण्या-
सारखी आहे याच वृत्तीस शोभणार असा आणखी एक अभंग 'पाया जाला नारु' (क्रमांक ४३७८) या ओळीन
सुरू होणारा आहे त्यातील निष्कर्षही अर्थाभासी तो अधम' असाच आहे देव्हाऱ्यावर जर विंचू आला तर त्याची
पूजा कशी करावी ? या प्रश्नाचे उत्तर देताना बुवानी म्हटले बाहे, 'तेथे पैजारेचे काम यावरून संताच्या भवाळ
पणातील काठिण्य प्रसंगी किती प्रखर असते त ध्यानात येण्यासारखे आहे.
९८८ गाढवाचे ताने । पालटले क्षणक्षणे ॥ १ ॥
तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ २ ॥
उपजता बरे दिसे । रूप वाढता ते नासे ॥ ३ ॥
तुका म्हणे भुकेले वेळे । वेळ अयेळ न कळे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा - ताने-मूल पिल्लू, उपजता-जन्मास येताच
अर्थ - गाढवाचे लहान पिल्लू किती मोजिरवाणे दिसते पण त्याची वाढ होत असताना मात्र त्याचे गुण
क्षणाक्षणाला पालटलेले दिसतात ते अवगुणाकडे झुकते १ तशाच प्रकारे अधम माणसाचे गुण असतात त्याचे
मन एकचित्ताने कुठेच स्थिर राहात नाही २ गाढवाचे पिल्लू जन्माला आल्यावर फार चांगले दिसते पण वय
वाढल्यावर त्याचे रूप बिघडून जाते त्याचे अवगुण प्रकट होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे अवगुणी
गाढव वेळी अवेळी उगाच भुकत असते अधम माणसाचेही असेच असते ४
९८९ विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोवळा ॥ १ ॥
गद्य पद्य कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीनचि बुद्धि करुनी ठेवा ॥ २ ॥
विचाराचे काही करावे स्वहित । पापपुण्यातीत भांडवल ॥ ३ ॥
तुका म्हणे न लगे जावे यमातरा । विश्व विश्वंभरा सारिखँचि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उपाधी-अडचण
अर्थ - दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याची स्त्री याचा विटाळ मानून जो तेथून दूर राहतो, तोच खरा सोवळा
म्हणावा १ काही गद्य अथवा पद्य ग्रंथाचे पठण करून वृथा अडचण निर्माण न करिता आपली बुद्धी आपल्याच
स्वाधीन करून ठेवावी २ परमार्थविचार करून काही स्वहित साधावे व पापपुण्याच्या पलीकडे असणाऱ्या आत्म-
सुखाचे भांडवल प्राप्त करून घ्यावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, या सुखासाठी रानावनात जाण्याची जरूरी
नाही, कारण सबंध विश्वात भरून राहिलेला तो विश्वंभर व त्यापासून निर्माण झालेले हे चराचर विश्व, यात
भेद नाही तोच सर्वत्र सामावून राहिलेला आहे ४
९९० कल्पतरु रया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इच्छितिया १ ॥ १ ॥
उडड त्या गाई म्हंसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥ २ ॥
तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवे भेटी थोर पुण्य ॥ ३ ॥
१ इच्छी तया
सार्थ तुकारामगाथा ४४५
शब्दार्थ व टीपा :- रया-रुईची झाडे, कामधेनु-इच्छिलेली वस्तू देणाऱ्या गाई
अर्थ :- रुईची झाडे, बाभळींची झाडे हे काही कल्पतरु नव्हेत. त्यांच्यापासून इच्छिलेले फळ कधी प्राप्त
होणार नाही. १ सर्वसामान्य अशा गाई, म्हशी व शेळ्या पुष्कळच आहेत. परंतु मनात इच्छिलेली वस्तू देणाऱ्या
कामधेनू मात्र यांच्याहून वेगळ्याच आहेत. २ तुकाराम महाराज म्हणतात, देव आपणांस ज्या ज्या गोष्टी दाखवील
त्यांची भेट डोळघांनी घेणे, यातच फार मोठे पुण्य आहे असे समजावे. ३
९९१ जळो प्रेमा तैसा रंग । जाय उडोनि' पतंग ॥ १ ॥
सासूसार्टी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ २ ॥
मंद मुखाँचा फोवळा । भाव अंतरीं निराळा ॥ ३ ॥
जैसीं वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥ ४ ॥
बक ध्यान धरी । सोंग करुनि² मासे मारी ॥ ५ ॥
तुका म्हणे सर्प डोले । तैसा कयेमाजी खुले ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- पतंग-फुलपाखराची एक जात, मंद-लबाड, कपटी, वृंदावनकांती-कडू वृंदावनाचे
फळ, बक-बगळा.
अर्थ :- फुलपाखरांच्या एका जातीस, पतंगास दिव्याविषयी मोठेच प्रेम असते. या प्रेमापोटी तो दिव्यावर
झडप घालून जळून जातो. अशा प्रेमाच्या रंगास आग लागो. १ सासू मरण पावली म्हणजे सून रडत असते, पण
तिच्या अंतरंगातील भाव मात्र निराळाच असतो. २ कपटी मनुष्य हा चेहऱ्यावरून फार चांगला दिसतो, कोमलतेने
बोलतो, पण त्याच्या मनातील भाव मात्र निराळाच असतो. ३ कडू वृंदावनाच्या फळाची वरवरची कांती किती
शोभिवंत असते. पण आतून ते कडूच असल्यामुळे हातातही धरू नये ते. ४ बगळा नदीच्या काठी डोळे मिटून
ध्यान केल्यासारखा उभा राहतो; पण ते सर्व सोंग असते. संधी सापडताच मासे पकडण्यासाठी तो टपलेला असतो. ५
तुकाराम महाराज म्हणतात, गारुड्याच्या पुंगीच्या नादाने सर्प जसा डोलतो, तसाच हा वरवर भाविकपणा दाखविणारा
मनुष्य कथेमध्ये डुलत असतो; पण त्याचे हे करणे खरे नसते. ६
९९२ वेशा नाहीं बोल अवगुण दूपीले । ऐशा बोला भले ह्मणें क्षोभा ॥ १ ॥
कोण नेणे अन्न जीयाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ २ ॥
सोने शुध्द नेणे कोण हा विचार । डांकें हीनयर केलें त्यासी ॥ ३ ॥
याती शुध्द परि अधम लक्षण । वायां गेलें तेणें सोंगें ही तें ॥ ४ ॥
तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भार याहो ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- वेशा-वेषास, पोषाखास, ह्मणे क्षोभा-राग मानू नका, डांके-सराफानी, सोनारांनी,
हीनवर-हिणकस, मंडण-वरवरची शोभा.
अर्थ :- साधू लोकांनी घेतलेल्या वेषास मी बोल देत नसून त्यांच्या अंगच्या अवगुणांना मात्र दोष देत
आहे. माझ्या या बोलण्यामुळे भल्या माणसांनो, तुम्ही रागावू नये. १ सर्व वस्तुमात्रांचे व प्राण्यांचे जीवन अन्न
हेच आहे, असे कोण जाणीत नाही? पण त्यात विष कालविले गेले असेल तर सर्वच अन्न विषमय होऊन सर्वांनाच
घातककारक होईल ना. २ सोने हे शुद्ध व चांगलेच असते, असे कोण जाणीत नाही? पण सोनारानी मात्र त्यात हीन
धातूंचे मिश्रण करून ते हीन केलेले असते. ३ एखाद्याची जात जरी शुद्ध असली, तरी तो अधमाच्या लक्षणांनी
वायाच गेल्यासारखी असते. शुद्धत्वाचेही सोंग मग वायाच जाते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, शत्रूचा नाश
करून विजय संपादन करणारा तोच शूर होय. तोच मानसन्मानास योग्य होय. पण इतरांनी अंगावर सैनिकाची
वस्त्रे पांघरून शोभा वाढविण्याचा प्रयत्न केला तरी, ते केवळ ओझेच आहे असे मानणे भाग आहे. ५
१ भुलोनि, २ धरूनि.
४४६ सार्थ तुकारामगाथा
१९३ अणुरणीया' थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ १ ॥
गिळुनि सांडिले कळिवर । भव भ्रमाचा आकार ॥ २ ॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥ ३ ॥
तुका म्हणे आता । उरलों उपकारापुरता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अणुरणीया-अणुरेणूपेक्षाही, थोकडा-सूक्ष्म, त्रिपुटी-ज्ञेय ज्ञाता, ज्ञान इत्यादी तिहीचा
समुदाय
अर्थ - मी तुकाराम तसे पाहिले तर अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असूनही आकाशाएवढा विस्तारलेलो आहे १
मी देहादी व प्रपंचादिकाचा अभिमान गिळून शरीर सोडून दिल्यासारखेच आहे प्रपंचरूपी भ्रमाचा आकारही मी
सोडलेला आहे २ ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान अशासारख्यांची त्रिपुटी सोडून मी आत्मज्ञानाचा दीप माझ्या देहामध्ये
प्रज्वलित केला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता केवळ दुसऱ्यावर उपकार करण्यासाठींच
उरलेलो आहे ४
विवरण - या अतिशय प्रसिद्ध अशा अभंगात तुकाराम महाराजांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व
आकाशापेक्षाही विशाल असे आहोत, याचे त्यांच्या श्रेष्ठ अनुभूतीवरून वर्णन केले आहे एवच सूक्ष्म तत्त्व सर्व जगतात
भरून राहिलेले आहे, याचा सुंदर अविष्कार जो 'अणोरणीयान्महतो महीयान' या कठोपनिषदातील सूत्रात झालेला
आहे, त्याचा अनुवाद तुकोबांनी सहजमहनी या अभंगात मार्मिकपणे केलेला आहे 'अणु अणोरणीया आगळें' या
शब्दांनी मागेही अभंग क्र ४५१ मध्ये बुवानी असेच वर्णन केलेले आपण पाहिले आहे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असलेल्या
तत्त्वाचाच सर्व विश्वात भरून राहिलेला अविष्कार असल्याने त्याला सोडून दुसरे काहीच नाही याची जाणीव श्रेष्ठ
साधकास नेहमीच होत असते जळीस्थळी ईश्वरतत्त्व पाहाणे व एकाच आत्मतत्त्वाच्या धाग्याने सर्व सृष्टी गुंफिली
गेली आहे, असे अनुभवास येणे, हाच ईश्वरी साक्षात्काराचे मर्म होय तुकोबांना ही अनुभूती तीव्रतेने आलेली होती
'आत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें', 'नभोमय जाले जळ । एकीं सकळ हरपले', 'तुका म्हणे कल्प
झाला । अस्त गेला उदयो', 'काहींच मी नव्हे कोणिये गांवींचा । एकटा ठांयींच्या ठायीं एक', 'आमुचा स्वदेश
भुवनत्रयामध्यें वास' इत्यादी वचनातून तुकारावाच्या अनुभूतीची विशालता ध्यानात येण्यासारखी आहे
अनुभूतीची एवढी विशालता व तीव्रता ज्यांना लाभली आहे, ते देह धारण करून जगतात तरी कशासाठी ?
याही प्रश्नाचे उत्तर तुकारामबुवांनी या अभंगात दिले आहे इतर लोकांच्यावर उपकार करण्यासाठी आपण आता
उरलेलो आहोत, असे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे स्वतःस साक्षात्कार झाल्यावर 'आपण जेऊन जेववी
लोकां । सतर्पण करो तुका' अशी भूमिका तुकोबांसारख्या सत्पुरुषांना घ्यावी लागते लोकांनी सन्मार्गावर राहावे,
केवळ प्रपंच व पैसापैगा न करिता ईश्वराची आठवण ठेवावी, अनाचारात व व्यसनात रमू नये, दुष्टाच्या संगतीत
राहू नये, म्हणून साधुसंतांच्या एकसारख्या उपदेशाची फार मोठी जरूरी असते 'उपदेशी तुका । मेघवृष्टीने जाइरा'
असा निर्वाळा दुसऱ्या एका अभंगात त्यांनी दिलेला आहे मेघाचा स्वभावच सहज वृष्टीचा असून त्याचा फायदा
ज्याचा त्यान घ्यावयाचा असतो
१९४ धन्य आजि दिन । जाले संताचे दर्शन ॥ १ ॥
झाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥ २ ॥
झाले समाधान । पायीं विसावले मन ॥ ३ ॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दिन-दिवस, तुटी-नाश, उठाउठी-ताबडतोब, त्वरित
१ अणुरेणुया
सार्थ तुकारामगाथा ४४७
अर्थ :- आजचा दिवस केवढा धन्यतेचा आहे ! कारण आज मला संतांचे दर्शन झाले १ यांच्या दर्शनाने
माझे पाप ताप नष्ट झाले माझे आजवरचे दैन्य त्वरित नाहीसे झाले २ माझ्या मनाचे पूर्ण समाधान झाले व या
संताच्या पायाशी माझे मन पूर्णपणे विसावले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे साधुसंत आमच्या घरी
आलेले असल्यामुळे आम्हाला दिवाळीदसर्याच्या सणाचाच आनंद झालेला आहे ४
९९५ हेचि माझें धन । तुमचे वदावे चरण ॥ १ ॥
येणे भाग्यें असो जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ २ ॥
सांभाळिले देवा । मज अनाथा जी जीवा ॥ ३ ॥
जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जीत-जगण्याचे
अर्थ - देवा, तुमचे चरण वदावेत हेच खरे म्हणजे माझे धन आहे १ तुमच्या पायावर चित्त समर्पून
टाकावे यातच खरे म्हणजे जगण्याचे सार्थक आहे २ देवा, मजसारख्या अनाथाचा तुम्ही नीटपणे सांभाळ केलात ३
हा तुकाराम दास देवा, तुम्हास हात जोडून विनंती करीत आहे ४
९९६ फजितखोरा मना किती तुज सांगो । नको कोणा लागो मागे मागें ॥ १ ॥
स्नेहभावें दुःख जडलेसे अंगीं । निष्ठुर हे जगीं प्रेमसुख ॥ २ ॥
निंदास्तुति कोणी करो दयामाया । न धरीं चाड या सुखदुःखे ॥ ३ ॥
योगिराज का रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं याचि गुणे ॥ ४ ॥
तुका म्हणे मना पाहें विचारून । होईं रे कठिण वज्राऐसें ॥ ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - चाड-पर्वा
अर्थ - माझ्या फजितखोरा मना, तुला आता किती सांगावे ? किती शिकवावे ? तू आता कुणाच्याही
मागे जाऊ नकोस कधी १ कुणाच्या विषयी प्रेम धरले की, आपल्या अंगी दुःख मात्र निर्माण होते. त्यामुळे जे
निष्ठुर राहतात, त्यांनाच श्रीहरीचे प्रेमसुख प्राप्त होते २ कुणी निंदा करील, कुणी स्तुती करील, कुणी दयामाया
करील, पण मी या सुखदुःखाची अथवा दयामाया करणाराची पर्वा करणार नाही कधी ३ मना, याचसाठी योगि-
राज एकाच स्थानावर, एकाच आसनावर स्वस्थपणे बसून नाही का राहात ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू
या सर्व गोष्टींचा विचार कर व इंद्राच्या वज्राप्रमाणे कठिण होऊन राहा ५
९९७ जळो माझी ऐसी बुध्दी । मज घाली तुजमध्यीं ।
आवडे हे विधि । नियेंधींचि चांगली ॥ १ ॥
तू स्वामी मी सेवक । उच्च पद निघ एक ।
ऐसे करावें कौतुक । नको करु खडणा ॥ २ ॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा ।
भोक्ता निराळा । तेणें गोडी निवडिली ॥ ३ ॥
हिरा शोभला कोदणें । अळकारी मिरवे सोनें ।
एक असता तेणे । काय दुजें जाणावें ॥ ४ ॥
उष्णे छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे ।
एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥ ५ ॥
तुका म्हणे हित । हेचि मानी माझें चित्त ।
नव्हे आता मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥ ६ ॥
४४८ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा :- खडणा-भेदास
अर्थ - देवा, तुझ्यामध्ये मी सर्व भावांनी मुरून जावे, विलीन व्हावे, अशी जर माझी क्षुद्र बुद्धी असेल तर
तिला आग लागो. ऐक्यभावाच्या या विधीचा निषेध करण्याचीच आवड मला मोठीच आहे १ खरे म्हणजे देवा,
तू आमचा स्वामी व्हावेस, मी तुझा सेवक व्हावे तुमचे स्थान उच्चावर असावे, माझे खाली असावे, असे कौतुक
देवा, तू करावेस यामध्ये कधी भेदास वा तुटीस समय प्राप्त न व्हावा २ कारण, मग एकच सर्व झाल्यावर काय
उपयोग ? पाणी कधी पाण्यास पीत असते काय ? वृक्षच कधी आपल्या फळाचा उपभोग घेतात काय ? या ठिकाणी
भोग घेणारा निराळाच असल्याने सेवनातील गोडी कायम टिकलेली आहे ३ हिरा नेहमी त्याच्या कोंदणातच
शोभून दिसतो सुवर्णाची शोभा दागिन्याच्या रूपानेच ध्यानात येते जर सर्व एकच असते, तर एकाने दुसऱ्यास कसे
जाणावे ? एकाने दुसऱ्याची शोभा कशी पाहावी ? ४ उन्हात तापल्यानंतरच थंडगार सावलीचे सुख वाटते,
बालकाच्यामुळेच आईला पान्हा फुटतो ना ? एक दुसऱ्यास वेगळेपणाने भेटतो म्हणूनच सुख आहे ५ तुकाराम
महाराज म्हणतात, असे वेगळे राहण्यातच माझे मोठे हित असून मी आता मुक्त होणारच नाही, असा मला विश्वास
वाटू लागला आहे ६
विवरण -या एका सुंदर अभंगात तुकारामबुवांनी आपण स्वस्वरूपात न मिळावे, मोक्षपदी न बसावे,
ईश्वरस्वरूपात विलीन न व्हावे, ब्रह्मपदाची प्राप्ती न व्हावी म्हणून परमेश्वरास आग्रहाने विनविले आहे खर म्हणजे
यांचसाठी सर्व खटाटोप असतो जीवदशा सपावी, देहात्मबुद्धीचा नाश व्हावा, द्वैतपणा सपावा, ईश्वर व आपण
एकच अशी अनुभूती येऊन आपले सर्वस्व त्याच्याच स्वरूपात समर्पित व्हावे, यापेक्षा श्रेष्ठ अवस्था कोणती ? पण
थोर भक्तास अशी विलीनस्थिती, अशी समर्पित स्थिती, अशी ब्रह्मस्थिती अथवा मुक्तीची स्थिती अडचणीची वाटते
एकत्वाची अनुभूती आल्यानंतर कोण कुणाचे स्तवन करणार ? कोण कुणास डोळे भरून पाहणार ? कोण कुणापुढे
लडिवाळ हट्ट करणार ? कोण कुणावर लटक्या प्रीतीने रुसणार ? दूर असलेल्या स्थितीमधील हुरहूर, मनाची
तळमळ, उल्ठा यातील सुख मग कुणास मिळणार ? नामसंकीर्तन कोण कुणाचे गाणार ? आणि मग सतसगतीच
काय ? या सतांच्या संगतीत असणारा आनंद आत्मस्थितीपेक्षाही, मोक्षस्थितीपेक्षाही फार मोठा असल्यामुळेच
पुष्कळदा नामदेवतुकारासारखे साधुसत म्हणतात, 'झनी मुक्तिपद देशी पाडुरगा । मग या सत संगा पाहू कोठें ?'
हे सुख अखंड टिकावे म्हणूनच विलीन होण्याची कल्पना संतांना सहन होत नाही प्रेमसुखासाठी आपण सेवक अथवा
भक्त व ईश्वर धनी अथवा स्वामी या दोनपणाच्या भूमिकेवरच असणे यात खरी बहार आहे पुन एव उच्च स्थानी,
एक खालच्या पायरीवर उभा असलेला असे असेल तरच अधिक सुख या सुखास सोडून मुक्तीची अथवा स्वस्वरूपी
विलीन होण्याची आशा धरील तो करटा, असे तुकारामबुवांनीच दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे, 'सांडुनि सुखाचा
वाटा । मुक्ति मागे तो करटा' या साधुसंतांना 'या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी' हीच इच्छा नेहमी असते
'जन्मोन्ममीं तुझा दास पुरूत्तमा । हेचि गोडी माझ्या देई जींवा' अशी मागणी या संतांची असते 'देवभक्त कोड
तेथें नाहीं' अशा मुक्तीची फिकीर संत कधीच करीत नाहीत यासाठीच 'तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं येरे । तुझेचि
अकिले पाडुरंगा' अशी इच्छा त्यांच्या मनात सतत असते
१९८ मनीं वसे त्याचे आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥ १ ॥
जातीचे तें झुरे येर येरासाठीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ २ ॥
भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर बापुताले ॥ ३ ॥
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - येरयेरासाठी-एक दुसऱ्यासाठी, वारता-धाडविले
अर्थ - आपल्या मनात ज्याच्याविषयी प्रेम आहे त्याचे बोलणे आपणास पसंत असते त्याचाच समाचार
घ्यावा असे आपणास पुन पुन वाटते १ जे एका जातीचे, एका आवडीचे असतात तेच एकमेकांसाठी झुरत
सार्थ तुकारामगाथा ४४९
असतात यामुळे वियोगातही कधी त्याच्यात तुटी पडत नाही २ एकमेक एकमेकांच्या भेटीची इच्छा धरीत
असतात, कुणी त्यांना थांबविले, तर ते धीर धरून पुनः पुनः त्याच्याविषयीच विचारतात ३ तुकाराम महाराज
म्हणतात, हे हरिभक्त माझ्या जीवाचे जीवन असून माझे केवळ प्राणसखेच आहेत ४
९९९ नव्हे आराणूक परि मनीं वाहे। होईल त्या साहे पांडुरंग ॥ १ ॥
पंढरीसि जावे उद्वेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥२ ॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हे चिंतन टाको नको ॥ ३ ॥
तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणे याजसाठीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - आराणूक-शांती, सुख, उद्वेग-तळमळ
अर्थ - मनात कसलेही सुख नसतानाही जो निरंतर पांडुरंगासच मनात वागवितो, त्याचेच नित्य स्मरण
करितो, त्यासच तो विठ्ठल मदत करीत असतो १ पंढरपुरास जावे, पंढरपुरास जावे, अशी एकसारखी मनात
तळमळ धरशील, तरच तू निःसंशय त्या ठिकाणी पावशील २ मग तुझा देह पराधीन असो, अथवा त्यात बळ
नसो, पण पांडुरंगाचे चिंतन कधी सोडू नये ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलचिंतनात देह पडला तरी
त्याची पर्वा करू नये कारण पुढे याच चिंतनासाठी देह धारण करावा लागला तरी त्याची चिंता नसावी ४
१००० कोठें देवा आले अगा थोरपण । बरें होतें १ दीन होतो तरीं ॥ १ ॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ २ ॥
न पुसते कोणी कोठें ही असता । समाधान चित्ताचिया सुखें ॥ ३ ॥
तुका म्हणे जन अव्हेरिलें मज । तरी केशवराज सांभाळिता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - कोठें-कशासाठी, अव्हेरिलें-दूर लोटतात
अर्थ - देवा, माझ्या अंगाला असा हा मोठेपणा व्यर्थ कशासाठी आला आहे ? मी आपला दीन वृत्तीने
होतो तेच बरे नव्हते का ? १ संतांची सेवा करीत असणे हेच एक उत्तम साधन आहे मी मोठ्या प्रीतीने श्रीहरीचे
नाम घेत राहीन २ मी कुठेही मनमोकळेपणाने गेलो असता कुणी विचारीत नाही, माझ्या चित्तात एक प्रकारचे
समाधान पूर्णपणे भरून राहिलेले असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोक मला दूर लोटतात, माझा अव्हेर
करतात, अशा वेळी देवा, तूच माझा सांभाळ करितोस ४
१००१ चतुर मी झालो आपुल्या भोवता । भावैविण रिता २फुज अगो ॥ १ ॥
आता पुढें वाया जावे हे ते काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ २ ॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुध्दि ॥ ३ ॥
तुका म्हणे करूं उपदेश लोका । नाहीं जालो एका परता दोषा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - फुज-अभिमान, गव, जगाचे अंतरा-लोकांच्या अंतःकरणातील
अर्थ - मी माझ्या भोवतीच केवढा चतुर होऊन राहिलो आहे पाहा श्रीहरीच्या भावभक्तीशिवाय मी
रिकामाच आहे उगाच पोकळ अभिमान मात्र अंगात वाढला आहे १ आता माझे आयुष्य यापुढे वाया जाईल
यात नवल काय ? माझ्यात कामक्रोधांनीही वास्तव्य केलेले आहे २ लोकाच्या अंतरकरणातील गुणदोष एकत्र
होऊन माझ्याही मनात ते निर्माण झाले आहेत सर्व प्राणिमात्रचा मत्सर करावा अशीच बुद्धी मजमध्ये निर्माण
झाली ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांना उपदेश करतो, पण मी स्वतः मात्र एकाही दोषापासून
मुक्त झालेलो नाही ४
१ होतो, २ स्फुद
तु गाथा ५७
४५० सार्थ तुकारामगाथा
१००२ धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥ १ ॥
येथे उपकारासाठीं । आले घर ज्या वैकुंठीं ॥ २ ॥
लटके वचन । नाहीं देहीं उदासीन ॥ ३ ॥
मधुरा वाणी ओठीं । तुका म्हणे भाव पोटीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अंतरीं-मनात, लटके-खोटे, ओठीं-ओठात, भाव-माया
अर्थ - जे अंत करणात दयावंत असतात, तेच या संसारात धन्यवान म्हणून गणले जातात १ खरे म्हणजे
या साधुसंतांचे घर वैकुंठातच असते पण ते इतरावर उपकार करण्यासाठीच या जगतात वावरत असतात २
यांना खोटे भाषण माहीत नसते हे स्वतःच्या देहाविषयी नेहमीच उदासीन झालेले असतात ३ तुकाराम महाराज
म्हणतात, यांच्या ओठात मधुर अशी वाणी असून पोटात पुष्कळच थोर माया असते ४
१००३ कुटल्याविण' नव्हे माडा । आळसे धोंडा पडतसे ॥ १ ॥
राग नको धरू मनीं । गाडगणी सांगतों ॥ २ ॥
तरटापुढें खरें नाचे । सुते काचे मुसळ ॥ ३ ॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शहाणे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गाडगणी-गुह्य गोष्ट, तरटापुढे-चावकापुढे
अर्थ - कणीक चांगली कुटून घेतल्याखेरीज चांगला मांडा कधी तयार होत नाही या कामी आळस केला
तर मात्र पदरात धोंडा पडतो १ या आमच्या स्पष्टपणे सांगण्याचा राग तुम्ही मनात धारण करू नये आम्ही ही
एक गुह्य गोष्टच तुम्हास सांगितली आहे २ चाबकापुढे घोडा बरोबर नाचतो सुतानी मुसळही काचले जाते ३
तुकाराम महाराज म्हणतात, कुणाला शहाणे करायचे असेल तर, समजावून सांगायचे तर, हातामधील काठी हेच
प्रमुख साधन आहे ४
१००४ कळों येतें तरि का नव्हे । पडती गोवे भ्रमाचे ॥ १ ॥
जाणतांचि होतो घात । परिसा मत देवा हे ॥ २ ॥
आमिसासाठीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥ ३ ॥
तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोठें बळिवंत ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गोवे-गुंते, परिसा-ऐका मत-मात, हकीकत, मान-गळा
अर्थ - खरी स्थिती काय आहे, हे समजत असूनही लोक भ्रमाच्या गुंत्यात का सापडतात ? १ देवा, खरे
काय आहे याची जाणीव असतानाही याचा घात कसा होतो हे ऐका २ आमिष पाहून मासा फासात अडकतो, त्या
प्रमाणे धनाच्या इच्छेने लोक त्यात गुरफटून जातात ३ तुकाराम महाराज म्हणतात, कर्म मोठे बलवान असते
त्यामुळे जर खोटे व्हायचे असेल तर होईलच ४
१००५ मोकळें मन रसाळ वाणी । याचि गुणीं संपन्न ॥ १ ॥
लक्ष्मी ते ऐसा नावे । भाग्यें ज्यावे तरि त्यानी ॥ २ ॥
नमन नम्रता अंगीं । मेघ रंगीं पालटे ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याच्या नावे । घेता व्हावे संतोपी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ज्यावे-जगावे
अर्थ - ज्याची वाणी रसाळ असून मन मोकळे आहे, तोच सर्वगुणसंपन्न असतो १ त्यालाच लक्ष्मी प्रसन्न
आहे, असे समजावे त्यानेच भाग्यवंत होऊन जगावे २ त्याच्या अंगी नमन करण्याची वृत्ती व नम्रता, या दोन
१ कांडल्या कुटिल्या हावा माडा
गुणांचा वास असावा मग त्याच्या स्थितीत कधीही पालट होणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे
नाव एवढे मोठे असते की, त्याच्या नावानेही सर्वानी संतोषित व्हावे ४
१००६ शेवटोची विनवणी । सतजनों परिसावी ॥ १ ॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हासी ॥ २ ॥
पुढे फार बोलो काई । अवघे पायीं विदित ॥ ३ ॥
तुका म्हणे पडिलों पाया । करा छाया कृपेची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - परिसावी-ऐकावा, विदित-माहीत
अर्थ - माझी एक शेवटची विनंती आहे ती साधुसंतानी ऐकावी १ ती अशी की तुम्हास व देवास कधी
माझा विसर पडू नये २ यापुढे आम्ही अधिक काय बोलावे ? तुमच्या पायाजवळ सर्व सांगितले असल्यामुळे माहीत
आहेच ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पाया पडलो आहे, तुम्ही मजवर कृपेची छाया करावी ४
१००७ करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥ १ ॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ २ ॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदें ॥ ३ ॥
निमित्त मापासी बैसविले आहे । मी तो काही नव्हे स्वामिसत्ता ॥ ४ ॥
तुका म्हणे आहे पाईकचि खरा । वागवितो मुद्रा नामाची हे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - पाईक-प्रामाणिक सेवक शिपाई गडी
अर्थ - मी तुकाराम कवित्व करीत आहे, असे जर कोणी म्हणत असले, तर खरी स्थिती अशी आहे की
कवित्वाची वाणी ही काही माझ्या पदरची नाही १ कवित्वाचा हा सर्व प्रकार केवळ माझ्याच युक्तीचा नसून मला
तो विश्वंभर बोलवितो त्याच्याकडून मला बोलाविले जाते २ त्याशिवाय मी पामर निरनिराळ्या शब्दांचे अर्थ-
भेद जाणणार तरी कसे ? हा गोविंद जे मला वदवितो, तेच मी बोलतो ३ मी फक्त माप टाकण्याच्या निमित्तात
मात्र बसलो आहे या कामी मी खरे म्हणजे कोणीच नव्हे त्या स्वामीची सर्व सत्ता आहे ४ तुकाराम महाराज
म्हणतात, मी या देवाचा खराखुरा असा प्रामाणिक सेवक आहे त्याच्याच नामाची चिन्हे मी माझ्या अंगावर बाग-
वीत आहे नामदेवाच्या मुद्रेन मी अंकित झालेलो आहे ५
विवरण - तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती कधी व कव्हां झाली यासंबंधी स्वतंत्र विवरण पुढे 'नामदेवें
केलें स्वप्नामाजीं जागें (अभंग क्र १,२०) व सत्य अमृत्वाशी मन केलें ग्वाही (अभंग क्र १३३३) च्या वेळी
स्वतंत्रपणे येईलच येथे फक्त एवढ्याच बाबीचाच खुलासा करावयाचा आहे पहिली गोष्ट अशी का, आपण कवित्व
करिता याविषयी तुकोबांची भूमिका अत्यंत नम्रतेची पण निश्चयाची होती तुकोबासारख्या भक्तान वेदवाणीचा
अर्थ मराठी भाषेत सांगण्याचा धाडा कवित्वातून कराव हे अलौकिक होतच पण याही दिव्य वाणीस प्रारंभ प्रथम
विरोध झाला तुकोबा हे काही जन्मान वरिष्ट वर्णातील नसून वेदानात परमाथनान सस्कृताखेरीज इतर को
भाषेत येत होत, हीही काहीजणाना पसंत नसून या सर्वोना उत्तर म्हणून या कधी वस्तुस्थित्यान निवेदन म्हणून
तुकोबा आपल्या कवित्वाच वैशिष्टय मधून मधून सागाताना दिसतात
त्याच्या कवित्वाचे एक वैशिष्टय या अभंगात असे आले आहे की, आपल्या कवित्वाची वाणी ही आपली
स्वतःची नसून ती त्या विश्वभरान, ईश्वरान वदविली आहे आपण केवळ निमित्तमात्र आहात केवळ धान्याच्या
मागाच माप टाकणारे आहात आपण फाल असून त्याचीच सत्ता खरा आहे, असा भाव इतरही सवत्र प्रकटपण
दिसून येतो 'मजुराच्या हातें मापाचा उबल । मी तों येथें फोल सत्ता ह्याची' 'नव्हे अप शांहीं राहतो माझे बोल ।
महती माझ योजू बोले पांडुरंग', 'माझी वदवितों वाणी । ज्याणें घरिली धरणी', 'आपुलिया बळें नाहीं मी बोलत ।
४५२ सार्थ तुकारामगाथा
सल्ला कृपावंत याचा त्याची', ' शिकविता धनी वेगळाचि', ' परि त्या विश्वभरें बोलवितें', ' तुका म्हणे मज बोल-
वितो देव', ' वदें साक्षत्देशीं वाणी । नारायणीं मिश्रित ' अशा अनेक वचनांतून तुकोबांनी आपली वाणी ही आपली
नसून प्रत्यक्ष विठ्ठलाची, विश्वंभराची आहे असे पुनःपुनः सांगितले आहे म्हणूनच तुकोबांच्या वाणीचे व कवित्वाचे
तंग दिव्य, अलौकिक व जिव्हाळभाये असे आहे कवित्वाचे शब्द हे काही टांकसाळींतील नाणे नव्हे, असेही त्यांनी
एका अभंगात म्हटल आहे केवळ देवानेच प्रेरणा दिली म्हणूनच आपली वाणी एवढी दिव्य व रसाळ झाली, असा
ययाचा अभिप्राय आहे याच अभंगात त्यांनी या तीर्थाचे वर्णन करताना म्हटल आहे ' तुका म्हणे देवें केला
बलात्कार '
सारांश, आपण पामर आहोत साध्या साध्या शब्दांचेही अय आपणास समजणारे नाहीत, पण तो गोविंद
बदविणारा असल्यामुळे आपल्याकडून हा कवित्वाचा प्रकार होतो आपण खरे म्हणजे ईश्वराचे केवळ एकनिष्ठ
सेवक आहोत, व त्याच्या नामाची मुद्रा आपल्या कृतीवर असल्याने ती प्रासादिक व प्रसादपूर्ण झाली आहे या
अभगांतील 'मुद्रा नामाची' यावरी इत्येही ध्यानात घेण्यासारखा आहे तुकोबांना कवित्वाच देणे नामदेवाच्या
परंपरेपासून लाभलेले आहे नामदेवांनी त्यांना अभंगरचनेची स्फूर्ती दिली अशी त्याचीच साक्ष आहे 'मुद्रा नामाची'
म्हणजे नामदेवरायाची मान्यता असाही अर्थ शोधून दिसणारा आहे
१००८ आम्हो गावे तुम्ही कोणीं कांहीं न म्हणावे । ऐसे तब आम्हा सागितले नाहीं देवे ॥ १ ॥
म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ २ ॥
सहज घडे तया आळस करणे ते काई । अग्नीचे भातुके हात पाळितां' कां पायीं ॥ ३ ॥
येथे नाहीं लाज भक्तिभाव लौकिक । हासे तया घडे ब्रह्महत्यापातक ॥ ४ ॥
जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥ ५ ॥
सदैव ज्या कथा काळ घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले पाषाण ॥ ६ ॥
शब्दार्थ य टीपा - भातुके-साद्य, साळविताळ-ताल, बेताल येर-दुसरे
अर्थ - आम्ही मात्र देवाचे नाम घ्यावे व तुम्ही मान कुणी काहीही म्हणू नये, हा प्रकार काही आम्हास
आमच्या देवानी सांगितलेला नाही १ यासाठी तुम्ही मुखाने रामराम म्हणावे, हातानी टाळी वाजवावी आणि
स्वहितासाठी प्रेमाने प्रभूसाठी नाचा, डोलत राहा २ प्रभुमाप्ती जो अशी सहज होणारी आहे, तिच्याविषयी
आळस काय कामाचा ? आपल्या हातापायाना जपून का ठविता ? शेवटी त्याचे भाग्य अग्नीसच होणार आहे ना ?
मग त्याचा उपयोग आधीच हरिभजनाकडे का नाही करीत ? ३ भक्तिभावाच्या ठिकाणी लाज कसली आली आहे?
लौकिकाची पर्वा तरी कशास हवी ? या ठिकाणी जो कुणी हसेल, त्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल ४ ज्याचा जसा
भाव असेल, तसे त्याने भक्तींचे प्रतिपादन करावे या ठिकाणी देवास भजनातील तालाची किंवा बेतालाची पर्वा
मुळीच नसते ५ हरिकथेच्या वेळेस ज्याला श्रवण घडते, तो सुदैवीच म्हणावयास हवा तुकाराम महाराज
म्हणतात, 'हरिभजन न करणारे दुसरे जे कुणी लोक असतील ते मनुष्याच्या जन्माला येऊन दगडच आहेत
असे समजावे ६
१००९ देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥ १ ॥
देव न लगे देव न लगे । साटवणेचे रघले जाये ॥ २ ॥
देव मदला देव मदला । भाव बुडाला काय करू ॥ ३ ॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥ ४ ॥
दुबळा तुका भावेविणे । उधारा देव घेतला गुणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - रघले-अडून गेले, फुका-फुकट, रुका-पैसा
१ पोळिता
अर्थ :- कोणी तरी या देवास घ्याहो. देवास घ्याहो. आयता तुमच्या घरास चालून आला आहे हा देव. १
आणि लोक म्हणतात, देव नको, देव नको, घरी साठवण करून सर्व जागा अडून गेली आहे. आता आणखी जागा
देयाला नाहींच. २ अशा प्रकारे देवाचा भाव मंदावला आहे. देवाचा भाव घसरला. आता काय करु हो? ३
मग हा देव अगदी फुकटचाच आहे. हा तरी आता घ्या ना. याला काही पैसे द्यावे लागत नाहीत. याला काही किंमत
पडत नाहीं. ४ हा तुकाराम अतिशय दुबळा आहे. त्याच्या मनात पुरता भावसुद्धा नाही. पण त्याने देवास उधार
घेऊनच ऋण करुन ठेविले आहे. ५
१०१० विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥ १ ॥
साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ २ ॥
भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे वर्म भजनेंचि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- येरांनीं-इतरांनी, अहंमान-अभिमान, ओस-रिकाम्या
अर्थ :- सर्व जग विष्णूने भरलेले आहे, याची जाणीव फक्त विष्णुभक्तांनाच असते. इतरांनी मात्र वृथा
ज्ञानाचे ओझे डोक्यावर धरावे. १ नाना प्रकारांच्या साधनाच्या संकटांचा शीण मात्र सहन करावा लागतो. तेव्हा
मुख्यत अभिमान गळून जाणे हे महत्त्वाचे आहे २ पण अहंकाराचा भाव हा अतिशय कठिन आहे. एखाद्या वेळेस
इंद्राच्या वज्राचा भंग करता येईल, पण मायाजाळाचा भंग करणे जमणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या
देवाचे वर्म केवळ भजनामुळे हाताशी येईल. इतरांना मात्र सर्व दिशा शून्य होऊन जातील. त्याच्या हाती काहीही
सापडणार नाही. ४
१०११ कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥ १ ॥
कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देईल ॥ २ ॥
वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥ ३ ॥
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सहा-कामक्रोधादी सहा शत्रू, खळ-शत्रू, दुष्ट, जिणावें-जिंकावेत.
अर्थ :- या देवास कीर्तनसुखाची गोडी स्वतः होऊन निवडायोगी वाटते; त्याला ती फार आवडते. १ या
कीर्तनसुखासाठी जर कोणी अधिकारी असतील, तर त्यांस श्रीहरी हे सुख प्राप्त करून देईल. २ तीव्र वैराग्याच्या
बळावर कामक्रोधादी सहा शत्रू जिंकावेत. ३ एवढे झाल्यावर मग काही करायचे साहे, असे उरणार नाही; असा
बोभाटा, अशी गर्जना मी तुकाराम करीत आहे. ४
१०१२ कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥ १ ॥
अवघें आलें आंत पोटा पडलें थीतें । सारूनि निश्चित' जालों देवा ॥ २ ॥
द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मयेशा तुज ठायी ॥ ३ ॥
तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥ ४ ॥
तुका म्हणे तुझे खतों जें गुंतलें । करूनि आपुलें घेई देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- जोडीलागीं-प्राप्तीसाठी, थीतें-पुरे, मयेशा-प्रिय स्वामी, खतों-कर्जरोख्यात
अर्थ :- देवा, माझे, शरीर, माझी वाणी, माझे मन; या सर्व गोष्टी मी तुमच्यापाशी गहाण ठेविल्या आहेत.
तुझ्या प्राप्तीसाठी मी कर्ज घेतले आहे. १ आता माझ्या पोटात सर्व काही सामावून पुरे झाले आहे. मी यामुळे
आता अगदी निश्चित आहे. २ आता देवा, यापुढे तुला देण्यासाठी म्हणून मजजवळ अगदी तोळामासा एवढेसुद्धा
१ निश्चित.
४५४ सार्थ तुकारामगाथा
सोने उरले नाही, आणि प्रिय स्वामी, या पूर्वीची हकीकत तर तुम्हास माहीत आहेच ३ देवा, तुझ्या या प्रपंचाच्या
ऋणाने किती तरी लोक बद्ध झाले आहेत, ते सर्व माझ्यापेक्षा किती तरी थोर थोर आहेत ४ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा तुझ्या कर्जरोख्यासारख्या कागदपत्रात जे गुंतून गेले आहेत, त्याना तू आपलेसे करून घे ना ५
ध्रुवंक—अभंग २८.
१०१३ करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥ १ ॥
देसी कीं न देसी पायाचे दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ २ ॥
बोलसी कीं न बोलसी मजसवे देवा । म्हणोनिया जीवा भय वाटे ॥ ३ ॥
होईल कीं न होय तुज माझा आठव । पडिला संवेह हाचि मज ॥ ४ ॥
तुका म्हणे मी तो कमाईचे हीण । म्हणऊनि सीण करों देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा — अंगीकार—स्वीकार, संवेह—संशय
अर्थ — देवा, तू माझा स्वीकार करशील, न करशील असा मला विचार पडलेला आहे १ तू मला तुझ्या
पायाचे दर्शन देशील न देशील, अशा शंकेने माझे मन अस्थिर बनलेले आहे २ देवा, तू माझ्याशी बोलशील न
बोलशील, या संशयाने माझ्या मनास भीती वाटत आहे ३ देवा, तुला माझी आठवण होईल न होईल, या शंकेने
मी व्यथित झालो आहे रे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझी कमाई कमी, माझ्याकडून मेहनतही फार
होत नाही म्हणून मनाला फार शीण वाटतो ५
१०१४ ऐसा माझा कोण आहे मोडभार । नावाचा मी फार वाया गेलो ॥ १ ॥
काय सेवा रुजु आहे सत्तावळ । तें मज राउळ कृपा करी ॥ २ ॥
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणे पडे वर्म तुझे ठायीं ॥ ३ ॥
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥ ४ ॥
तुका म्हणे वाया जातो भूमी भार । होईल विचार काय नेणो ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा — भीडभार—भीडेचे ओझे, राउळ—देव
अर्थ — असा मी कोण एवढा थोर आहे की, माझी भीड ध्यानात ठेवून माझे काम व्हावे ? उलट मी तर
एक वाया गेलेला मनुष्य आहे १ माझी काय ईश्वराच्या चरणी सेवा रुजू झालेली आहे ? का त्याच्यावर सत्ता
करीन असे बळ तरी माझ्याजवळ आहे ? २ माझी काय जात शुद्ध आहे ? की कूळ पवित्र आहे ? काय म्हणून
देवा, तुझे रहस्य माझ्या ध्यानी यावे ? ३ मी काय असा मोठा तपस्वी आहे ? की दानधर्म मनोभावे करणारा
आहे ? माझ्या अंगी काही सत्ता आहे ? बळ आहे काय ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, या जगात जन्मास
येऊन मी भूमीला भारच झालो आहे या सर्व आयुष्याची अखेर काय होणार आहे कुणास माहित ? ५
१०१५ साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काय नव्हे ॥ १ ॥
करावें तें बरें जेणे समाधान । सेवावें हैं वन न बोलावें ॥ २ ॥
शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरिच हे वेई निवडूनि ॥ ३ ॥
उचित अनुचित कळो आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥ ४ ॥
तुका म्हणे मज पायांसवें चाड । सागरी ते गोड आहे मज ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा — साच—खरी, चाड—इच्छा
अर्थ — देवा, खरी स्थिती काय आहे, हेसुद्धा मला कळू नये ना ? तुझी सेवा मी कधीच करीत नसतो
काय ? १ जेणेकरून माझे समाधान होईल, ते देवा, तुम्ही करा ना नाही तर न बोलता वनात जाऊन एकांत-
सार्थ तुकारामगाथा ४५५
वासात मी राहावे हेच उत्तम नाही का ? २ जेणेकरून माझा भाव देवा, तुझ्या पायांवर शुद्धपणे समर्पित होईल,
असे काही निवडून मजजवळ दे. ३ पांडुरंगा, तुझ्या कृपादृष्टीमुळे योग्य काय, अयोग्य काय, हे मला चांगलेच
समजून आले आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला तुमच्या पायांचीच एक इच्छा आहे. जे तू मला
सांगशील ते गोडच वाटेल मला. ५
१०१६ नाहीं कांटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥ १ ॥
जन वन आम्हां समानचि जालें । कामक्रोध गेले¹ पायटणी ॥ २ ॥
षडऊर्मी शत्रु जितिले² अनंता । नामाचिया सत्तावळें तुझ्या ॥ ३ ॥
मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥ ४ ॥
म्हणऊनि तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- पायटणी-पायऱ्या, अवलोकुनी-पाहून, वास-वाट.
अर्थ :- देवा, मी आयुष्यास काही कंटाळलो नाही; पण काय करावे, न करावे या संभ्रमात मी असल्या-
मुळे भयभीत झालो आहे. १ वनवास व जनवास हे आम्हास सारखेच झाले असून कामक्रोधांना आम्ही
आमच्या घराच्या पायऱ्या केल्या आहेत. २ अनंता, तुझ्या नामाच्या सत्तेमुळे आम्ही कामक्रोधादी मनाच्या सहा
ऊर्मी जिंकल्या आहेत. ३ स्वामीची आज्ञा शिरसावंद्य मानून ती पाळावी हाच आम्हा सेवकाचा धर्म आहे. ४
तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच देवा, मी तुमची पवित्र पावले पाहून, त्यावर लक्ष ठेवून, तुमच्या कृपेच्या
वचनाची वाट पाहात आहे. ५
१०१७ वांयाविण वाढविला हा लौकिक । आणिका लटिक वाद दोघां ॥ १ ॥
नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ २ ॥
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं विंबेचि ना ॥ ३ ॥
जालों परदेशी गेलें दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥ ४ ॥
तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- वैखरी-वाणी, साच-खरे,
अर्थ :- देवा, मी हा परमार्थाचा लौकिक व्यर्थच वाढविला, असे मला वाटते. धड प्रपंच नाही, धड परमार्थ
नाही. असे होऊन गेल्यामुळे या दोघांचा वाद लटफाच ठरलेला आहे. १ आता माझ्या मनास असे वाटत आहे की,
या जगात देवच नाही, मग तो भुकेलेल्याचे जेविणे जाणणार तरी कसे ? २ उगाच मी आपली वाणी शब्दरूपाने
गौरवून पाहिली. पण ईश्वराच्या रूपाचे खरे बिंब काही तीमध्ये उमटलेले मला दिसले नाही. ३ असा मी देवा,
परदेशी बनलो आहे. दोन्ही मार्ग हुकले धड परमार्थही नाही, धड संसारही नाही तुझ्या पायांपासून असा मी अंतरलो
आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असे मागेच मला समजून येते, तर मी हे तुझे वेड माझ्या मनास लावूनच
घेतले नसते. ५
१०१८ न कळे तत्त्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥ १ ॥
आगमाचे भेद मी तों काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ २ ॥
कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होईल त्याचा त्यास अभिमान ॥ ३ ॥
संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥ ४ ॥
मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥ ५ ॥
तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥ ६ ॥
१ केले, २ जिविले.