सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
३५० • सार्थ तुकारामगाथा
६९४ माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥ १ ॥
देवा अभिमान नको । माझे ठायीं देऊं सको ॥ २ ॥
देशीं चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥ ३ ॥
हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मवितें-मोजने, धणी-मालक.
अर्थ - धान्याचे माप उगाचच म्हणत असते की, मी धान्य मोजते; पण खरी गोष्ट अशी आहे की, मोजणारा
जो मालक आहे तोच ते माप भरीव असतो व रिकामे करीत असतो. १ देवा, माझ्या ठिकाणी असला अभिमान
नको २ ज्या नाण्यावर राजाचा शिक्का आहे, तेच त्या देशात चालते शिक्याशिवाय असणाऱ्या खोट्याख्या
नाण्याला कोण विचारणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हातात सत्तेचे सूत्र आहे, त्याचीच थोरवी
जिकडे तिकडे असते. ४
६९५ कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥ १ ॥
नेलें वाऱ्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ २ ॥
कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥ ३ ॥
तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसले भय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- निरसले-सपले.
अर्थ :- माझ्या या विठ्ठलाचे वैभव देशोदेशी सांगण्यासाठी कोण उपदेश करायला गेले होते ? १ माझा
मायबाप जो विठ्ठल, त्याच्याच कृपेने वाऱ्याबरोबरच त्याचे नाम सर्व देशभर पसरून राहिले २ माझी वाणी हा
उपदेश करीत आहे, तो तरी कुणाच्या सत्तेवर ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच निश्चयामुळे माझे भय दूर
झाले आहे. ४
६९६ सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥ १ ॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । घरें पारखुन बाधा गांठी ॥ २ ॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥ ३ ॥
तुका म्हणे चाली जाली चहूं देशीं । उतरला कसीं खरा माल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- चाली-चलती
अर्थ - सगळ्यांच्या पायाशी माझीही एक विनंती मस्तक चरणावर ठेवून करीत आहे १ अहो श्रोतेहो,
व वक्त्यांनो, सर्व लोकहो, कोणतीही गोष्ट नीट पारखून घ्या व आपल्या संग्रही ठेवा २ मी परमार्थविचाराचे
हे भांडार खुले केले आहे, पण हा सर्व माल त्या परमेश्वराचा असून मी फक्त ओझे वाहणारा हमाल आहे ३
तुकाराम महाराज म्हणतात, या मालाची चांगली चलती झाल्यामुळे, याची प्रसिद्धी चारी देशांना होऊन हा ईश्वराच्या
नामरूपाचा माल चांगला कसांत उतरला आहे ४
विवरण :-तुकाराम महाराजांचा हा एक अतिशय प्रसिद्ध अभंग असून, त्यांतील मी देवाचा केवळ भारवाही
हमाल आहे, हे परमार्थविचाराचे धन त्याचेच असून मी फक्त भांडार चालविणारा सेवक आहे, ही भावना त्यांच्या
इतर अभंगांतूनही प्रकट झाली आहे तुकोबा स्वत वाण्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे भांडार फोडणे, माल वाहून
नेणे, तो कसांस उतरणे, या शब्दप्रयोगाची त्यांना चांगलीच अनुभूती आहे ईश्वराच्या घरचे, श्रेष्ठ तत्त्वाचे भांडार
आपल्या हाती आले, याचा सार्थ अभिमान कधी कधी त्यांनी प्रकट केला आहे 'भांडाराची किल्ली माझे हातीं आहे।
पाहिजे तो वाग तेथें' असे बुवानी आणखी एका ठिकाणी म्हटले आहे
सार्थ तुकारामगाथा ३५१
६९७ कोण त्याचा पार पायला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥ १ ॥
अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्याही खुंटलिया ॥ २ ॥
फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तद्वरास अनेक किती ॥ ३ ॥
दाविलें अनंतें अर्जुनासि पोटां । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥ ४ ॥
तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- पार-अंत, सीमा.
अर्थ :- या विश्वात भरून राहिलेल्या विश्वंभराचा अंत कुणासही लागण्यासारखा नाही. कितीही त्याचा
शोध घेतला तरी त्याचा ठाव सापडत नाही. १ तो अणुरेणूइतका सूक्ष्म असून त्याच्या विस्तारलेल्या स्थूलपणास
तर सीमाच नाही. वेदश्रुतीही त्याचा शोध घेता घेता, 'नेति नेति...असा नाही, असा नाही' म्हणून खुंटल्या आहेत. २
हे विश्व तरी केवढे आहे ? फळातल्या कीटकास वाटते, फळाएवढेच सीमित आकाश. पण अशी फळे त्या झाडास
कितीतरी असतात. झाडे कितीतरी असतात आणि किडेही कितीतरी असतात. ३ या विश्वात पसारा केवढा असतो,
हे त्या श्रीकृष्णानें अर्जुनास दाखवून आपल्या पोटात अनेक सृष्टी, अनेक कृष्ण, अनेक लोक याचे स्थान कसे आहे हे
स्पष्ट केले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हांस जर या अनंत विश्वाचा अर्थ समजावून घ्यायचा असेल तर
संतांची संगत धरा. त्याचा आश्रय घ्याल तरच तुमचा जीव वाचेल. ५
६९८ जें जें कांहीं करितों देवा । तें तें सेवा समर्पे ॥ १ ॥
भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ २ ॥
आम्ही दुजें नेणों कोणा । हेंचि मना मन साक्ष ॥ ३ ॥
तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सर्वात्मना-सर्वांच्या मनांत असणाऱ्या.
अर्थ :- देवा, मी जे जे काही करीत आहे, ते ते सर्व तुमच्या सेवेसाठी समर्पित करीन. १ नारायणा, आता
तुमच्या-माझ्यात भेद नाही. देवा, तुझाच वास सर्वांच्या मनांत असतो ना ? २ देवा, तुम्हाशिवाय आम्ही दुसऱ्या
कुणासच जाणीत नाही. हीच साक्ष आमची आमच्या मनास आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जगन्नाथा, मी
जे हे सर्व म्हणत आहे ते काही व्यर्थ नाही. ४
६९९ स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥ १ ॥
परी हे वंखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ २ ॥
रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रह्मांडें हीं ॥ ३ ॥
तुका म्हणे तूं ऐसा एक साचा । ऐसी संध वाचा जाली नाहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वंखरी-वाणी, साचा-खरोखर.
अर्थ :- देवा, तुमची स्तुती करायला जावे तर ती समर्थ अशा वेदाकडूनही होऊ शकत नाही. अशा
परिस्थितीत माझे काय विचारावे ? १ पण ही माझी वाणी देवा, तुमच्या सुखासाठी व नामाच्या गोडीने गोडावलेली
आहे. माझी जिव्हा तुमच्या नामामृताच्या रसाचीच इच्छा करीत आहे. २ देवा, तुमचे रूपवर्णन करण्यास पुरेल
एवढी तरी मला बुद्धी आहे कुठे? कारण आपल्या स्वरूपाच्या एका केसाच्या अग्रावर हजारो ब्रह्मांडांची घडामोडी
होत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा या अचाट स्वरूपाचा तूच एक खरोखर आहेस, असे वर्णन
तर आजपर्यंत कुणीही केलेले नाही. ४
७०० तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥ १ ॥
सहस्रमुखें शेष शिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ २ ॥
३५२ सार्थ तुकारामगाथा
अव्यक्ता अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सच्चिदा नारायणा ॥ ३ ॥
रूप नाम घेसी आपुल्या स्वेच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥ ४ ॥
तुका म्हणे जरी दाविसी आपणा । तरिच नारायणा कळों येसी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - धडा-धड असलेल्या, अलक्षा-न दिसणारा
अर्थ - देवा, तुझे यथार्थ वर्णन करेल असा समर्थ तुझ्याशिवाय कुणीही त्रैलोक्यात नाही १ हजारो
मुखांनी तुझे वर्णन करता करता बिचारा नागराज शेषही थकून गेला व त्याच्या धड असलेल्या जिभाही दुमपून
गेल्या २ सच्चिदानंदा, नारायणा, तू निर्गुण असून अव्यक्त, न दिसणारा, अपार व अनंत अशा स्वरूपाचा आहेस ३
ज्याचा जसा भाव असेल, तसे रूप व नाम तू आपल्याच इच्छेने त्याच्यासाठी धारण करतोस ४ तुकाराम महाराज
म्हणतात, नारायणा, तुझे रूप जसे असेल, किंवा तू जसे दाखविशील तसेच आम्हास कळणार ५
७०१ पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥ १ ॥
बांधूं विठ्ठलसागडी । पोहुनि जाऊं पैल थडी ।
अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ २ ॥
हे तो नाहीं सर्वकाळ । अमुप अमृताचें जळ ॥ ३ ॥
तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पथें येणें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सागडी-भोपळ्याचा ताफा
अर्थ - या विठ्ठलभक्तीच्या आनंदाचा केवढा पूर आला आहे पाहा प्रेमाच्या लाटांवर लाटा उसळत
आहेत १ विठ्ठलरूपाची ही सागडी बांधून आपण हा भवसागर तरून पैलतीरावर जाऊ तुम्ही सर्व गडी मज-
बरोबर या व या पुरात उडी घाला २ कारण हरिभक्तीचा हा पूर सतत टिकणारा नाही अमाप आनंदाचे हे
पाणी कायम टिकणारे नसल्याने आत्ताच वेळ साधा ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे पुण्य थोर, म्हणून
भक्तिमार्गाचा हा पूर तुमच्या समोरून चालला आहे ४
७०२ आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें १ या चित्तापासुनिया ॥ १ ॥
पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं । जागृतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ २ ॥
पडिलें वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥ ३ ॥
तुका म्हणे नेत्रीं केले ओळखण । साजिरे ते ध्यान विटेवरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वळण-रिवाज रीत
अर्थ - या माझ्या चित्तात एका पांडुरंगाची स्थापना झाल्यापासून मला आता दुसरे काही करण्यासारखे
राहिलेच नाही १ माझ्या ध्यानात, माझ्या मनात तो एक पांडुरंगच वस्ती करून राहिला आहे माझ्या जागृत
अवस्थेत, माझ्या स्वप्नात तो पांडुरंगच भरून राहिला आहे २ माझ्या सर्व इंद्रियाचा रिवाज पांडुरंगाकडे जाऊन
काम करण्याचाच आहे याखेरीज दुसरा कुठला भावच माझ्यात उमटू शकत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात
माझ्या डोळ्यांनी विटेवरच्या या तटस्थ ध्यानाचीच चांगली ओळख करून घेतली आहे ४
७०३ मी तो सर्वभावे अनधिकारी । होइल कैसी परी नेणो देवा ॥ १ ॥
पुराणींचे अर्थ आयिता मनास । होय कासावीस जीव माझा ॥ २ ॥
इंद्रियांचीं आम्ही पांगिलो अकिर्तें । त्याचे रंगीं चित्त रंगलेसे ॥ ३ ॥
एकाचे ही मज न घडे दमन । अवघों नेमून कैसीं राखो ॥ ४ ॥
तुका म्हणे मज तारीं पंढरीराया । नाहीं तरी वाया गेलो दास ॥ ५ ॥
१ न मिळे
सार्थ तुकारामगाथा ३५३
शब्दार्थ व टीपा:- परी-प्रकार, पांगिलों-पंगू, अंकिते-स्वाधीन
अर्थ:- देवा, तुमची भक्ती करण्यास मी तर सर्वथा अनधिकारी आहे आता माझी स्थिती कोणत्या
प्रकारची होईल, हे काही समजत नाही १ पुराणात सांगितलेला अर्थ मनात आला म्हणजे देवा, माझा जीव फारच
कासावीस होतो २ इंद्रियांच्या स्वाधीन आम्ही झाले असल्याने पंगू आहोत त्याच्याच विषयाच्या रंगांनी आमचे
चित्त रंगून गेले आहे ३ एकाही इंद्रियाचे दमन करणे मला जमलेले नाही तर मग या सर्व इंद्रियांना व त्यांच्या
शक्तींना आवर मी कसा घालू ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीराया, तू माझे रक्षण कर नाही तर मी
आता अगदी वाया चाललो आहे ५ (पुढे थोड्याफार फरकाने हाच अभंग क्र ३८६२ म्हणून आलेला आहे )
७०४ लक्षूनिया योगी पाहाती आभास । ते दिसे आम्हास दृष्टीपुढें ॥ १ ॥
कर दोन्ही कटी राहिलासे उभा । सावळी हे प्रभा अंगकांती ॥ २ ॥
व्यापूनि वेगळें राहिलेसें दुरी । सकळा अंतरों निर्विकार ॥ ३ ॥
रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुल्या मानसीं शिव ध्याय ॥ ४ ॥
अंत नाहीं पार वर्ण नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाय ॥ ५ ॥
अचेत चेतले भक्ताचिया सुखें । आपुल्या कौतुके तुका म्हणे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - लक्षूनिया-लक्ष देऊन
अर्थ - काही नाही असा आभास, योगी लोक नीट लक्ष लावून पाहतात; पण तेच रूप सगुण होऊन
आम्हास आमच्या दृष्टीपुढे स्पष्टपणे दिसते १ आपले दोन्ही कर कमरेवर ठेवून हा विटेवर उभा राहिला आहे
याची प्रभा व अंगकांती सावळ्या रंगाची आहे २ निर्विकार असणारे हे तत्त्व सर्वत्र व्यापून, सर्वांच्या अंतःकरणात
सामावून वेगळे राहिलेले आहे ३ अशा या तत्त्वास रूप नाही, रेखा नाही, आकार नाही, नावसुद्धा नाही. असे हे
रूप आपल्या मनात शिव ध्यात आहे ४ यास कसलाही थारा नाही, जाती नाही, कुळ नाही, शिर नाही, हात
नाहीत, पाय नाहीत ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे चैतन्यरहित वाटणारे निर्गुणनिराकार रूप आपल्या
भक्तीच्या आवडीसाठी कौतुकाने व सुखाने सचेत होऊन सगुण व साकार झाले आहे ६
७०५ कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥ १ ॥
कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोणत्या भावे देवा आतुडसी ॥ २ ॥
कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणु कैसा तुज ॥ ३ ॥
कैसा गाऊ 'गीर्ती कैसा ध्याऊ चित्तीं । कैसी स्थिती मती दावी मज ॥ ४ ॥
तुका म्हणे जैसें दास केले देवा । तैसे हे अनुभवां आणीं मज ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - आतुडसी-प्राप्त होतोस.
अर्थ - देवा, मी तुमचे ध्यान तरी कसे करू हो ? तुला पाहू तरी कसे ? मला याचकास यासबंधीचे वर्म
दाखवाल काय ? १ देवा, मी तुमची भक्ती कशी करू ? सेवा कशी करू ? देवा, तू कोणत्या भावामुळे प्राप्त
होतोस ? २ तुझ्या कीर्तीचे वर्णन कसे करू ? तुमचे रूप लक्षात तरी कसे आणू ? तुला मी जाणून तरी कसे
घेऊ ? ३ गीतात देवा, तुला मी कसे गाऊ ? चित्तामध्ये ध्यान तरी कसे करू ? तुमची स्थिती कशी आहे? हे माझ्या
अल्प मतीस दाखवा ना ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही मला ज्या अर्थी दास केले आहे, त्या अर्थी हा
प्रत्यक्ष अनुभव मला आणून द्या ना ५
७०६ निगमाचे वन । नको शोधूं करूं सीण ॥ १ ॥
या रे गौळियाचे घरीं । बाधलें तें दावें यरी ॥ २ ॥
१ किर्ती, कीर्ती
तु. गाथा ४५
पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥ ३ ॥
तुका म्हणे भार । माया टाका अहंकार ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- निगमाचे-वेदाच्या अर्थांचे.
अर्थ :- या श्रीहरीचा शोध घेण्यासाठी तुम्ही वेदाच्या अर्थांच्या गहन अरण्यात कधी शिरू नका. तो त्रास
कधी घेऊ नका. १ ते सुख पाहायचे असेल तर, तुम्ही या गोकुळात गवळ्यांच्या घरी या. येथे या श्रीहरीला दाव्याने
बांधलेले तुमच्या दृष्टीस पडेल. २ तुम्हांस नीट वाट सापडली नाही व वर्म समजले नाही; म्हणूनच तुम्ही भ्रमात
पडलेले दिसता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तुमच्या शिरावर हा जो अहंकाराचा भार घेतला आहे, तो
टाकून द्यावा. ४
७०७ मन वोळी मना । बुद्धि बुद्धी क्षण क्षणां ॥ १ ॥
मीच मज राखण जालों । ज्यानें तेथेंचि धरिलों ॥ २ ॥
जें जें जेथें उठी । तें तें तया हातें कुंटी¹ ॥ ३ ॥
भांजिली² खांजनी³ । तुका साक्ष उरला दोन्ही ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वोळी-वळत आहे, रक्षण करीत आहे, भांजिली-ओहोटी, क्षय, खांजनी-भरती, वृद्धी.
अर्थ :- माझे मनच माझ्या मनास वळवीत आहे, रक्षण करीत आहे. क्षणोक्षणी माझी बुद्धीच माझ्या
बुद्धीस सावरीत आहे. १ मीच माझा राखण करणारा झालो असून, मी त्यामुळे जेथल्या तेथेच धरलो गेलो आहे. २
जे जे भाव मनात उठतात, ते ते त्याच मनाकडून कुंठित होतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मनाची ही ओहोटी
व भरती होत असताना मनच साक्षी राहिलेले आहे ४
७०८ ब्रह्म न लिंपे त्या मेळें । कर्माअकर्मा वेगळें ॥ १ ॥
तोचि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ २ ॥
शौच अशौचाचे संधी । तन आळा तनाचि मधीं ॥ ३ ॥
पापपुण्यां नाहीं ठाव । तुका म्हणे सहज भाव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- शोच-शुद्धी, अशोच-अशुद्धी, तन-शरीर.
अर्थ - कर्माकर्माच्या योगाने ब्रह्म कधी लिप्त होत नाही, शिंपले जात नाही. १ ज्याला या ब्रह्मस्वरूपाचा
अनुभव आला आहे, तोच एक त्याला जाणू शकतो. २ असे हे ब्रह्म शुद्धता व अशुद्धता यांच्या संधीमध्ये असून
गवताच्याच आळयात गवत असते तसे हे समजावे. ३ या सहजभाव्यस्वरूप असणाऱ्या ब्रह्मतत्त्वात पाप वा पुण्य
काही असत नाही. ४
७०९ काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥ १ ॥
तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ २ ॥
रिघतां धांवा पंव्रामध्यें । जोडे सिद्धि ते ठायीं ॥ ३ ॥
काय भस्म करील राख । अंतर पाक नाहीं तों ॥ ४ ॥
वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालियां ॥ ५ ॥
तुका म्हणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- दरा-दरी, अंतर-मन, पाक-पवित्र.
अर्थ :- जोपर्यंत अंत:करण वासणारहित होऊन समाधानाच्या अवस्थेस आले नाही, तोपर्यंत रानावनात
अगर दरीमधील गुहेत निवास करून काय लाभ होणार ? १ तेथेच राहणारे प्राणी काय थोडे आहेत का ? त्यांना
१ कुटी, २ भाजिली, ३ खाजनी.
त्या वननिवासाचा काय लाभ झाला आहे ? २ धान्य काढण्यासाठी आपण पेवात शिरलो, तर त्या ठिकाणी काय
आपणांस सिद्धीची प्राप्ती कधी होते काय ? ३ अंत करण जर पवित्र नसेल तर, भस्माचे लेपन काय करील ? ही
केवळ राखच म्हणावी लागेल. ४ वर्णाश्रमधर्माप्रमाणे वागण्याचे मनात भाव नसताना ठरविले, तरी त्यामुळे वृथा
श्रमच होतील. ५ तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व सोंगे नवीन पाश निर्माण करणारी आहेत. जेणेकरून
आशा खुंटेल त्यातच खरे हित आहे. ६
७१० तें ही नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥ १ ॥
तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें ही नव्हे ॥ २ ॥
त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥ ३ ॥
तें ही नव्हे जें मोंवतें भोवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥ ४ ॥
तुका म्हणे एकचि आहे । सहजिं पाहें सहज ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- भोंवे-फिरण्यात
अर्थ :- जे काही तुम्ही कराल ती भक्ती नव्हे. ध्यान करणाऱ्याने ध्येयाचे ध्यान केले तरी, ती काही भक्ती
नव्हे. १ सर्व लोकांना ज्यामुळे परमार्थाची जाणीव होते, तीही भक्ती नव्हे मनास जे काही वाटते, ती सुद्धा भक्ती
नाही २ सर्व जगाचा कंटाळा येणे, सर्वांचा त्रास मानणे, अशुभ वाचाळपणा करणे, यांतही भक्ती नाही ३
एखाद्याच्या भोवती फिरत राहणे, ही भक्ती नव्हे की, नागवे धावत सुटणे यासही भक्ती म्हणता येणार नाही. ४
तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीची अवस्था एकच आहे, की ती सहजासहजी पडावी. ५
७११ बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां तीर कांपे ॥ १ ॥
नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वाटे खरें ॥ २ ॥
विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तोचि एक सोसी ॥ ३ ॥
तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - करणी-कार्य, सोपारें-सोपे.
अर्थ :- वैराग्याच्या अथवा परमार्थज्ञानाच्या गोष्टी बोलताना सोप्या वाटतात, पण त्याप्रमाणे कार्य करा-
यचे म्हटले, किंवा वागायचे म्हटले की, जीव घाबरा होतो. १ वैराग्याची गोष्ट काही एवढी सोपी नाही. कुणी
याविषयी बोलायला लागले तर, मला ते काही खरे वाटत नाही २ प्रत्येक घासाबरोबर विष खाण्यात जे दुःख
आहे, तेच वैराग्यधारणेत आहे. जो हे सर्व सहन करतो तो धन्य होय ३ तुकाराम महाराज म्हणतात, जो कुणी
वैराग्याप्रमाणे वागणूक करून दाखवील त्याचे पाय मी जीवात धारण करीन. ४
७१२ होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥ १ ॥
हाचि माझा नेम धर्म । अवघें विठोबाचे नाम ॥ २ ॥
हेचि माझी उपासना । लागेन संतांच्या चरणा ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपासना-ध्यानधारणा
अर्थ - सर्व वैभव सोडून मी भिकारी होईन, पण पंढरपुरचा वारकरी होईन. १ हाच एक माझा नेम-
धर्म असून माझ्या मुखात एकसारखे विठोबाचे नाम असते. २ माझी ध्यानधारणा किंवा उपासना हीच असून
माझे मस्तक नेहमी संतांच्या चरणावर असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हीच माझी आपली भोळी
सेवा आहे, असे तुम्ही समजा. ४
३५६ सार्थ तुकारामगाथा
७१३ साठविला हरी । जीहीं हृदयमंदिरीं ॥ १ ॥
त्याची सरली येरझार । जाला सफळ¹ व्यापार ॥ २ ॥
हरी आला हाता । मग कैंचीं भय चिंता ॥ ३ ॥
तुका म्हणे हरी । काहीं उरो नेदी उरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - येरझार-जन्ममृत्यूची कटकट
अर्थ - ज्याने आपल्या हृदयमंदिरात त्या श्रीहरीस साठविले आहे, १ त्याच्या पाठीमागची जन्ममृत्यूची
कटकट संपली असेच समजावे त्याच्या जीविताचा व्यापार सफळ झाला असे समजावे २ एकदा श्रीहरीच हाताशी
आल्यावर मग कसली चिंता किंवा भीती ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी एकदा भक्ताच्या अंत करणात
स्थिर झाला की मग कसलीही चिंता उरत नाही ४
७१४ मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ॥ १ ॥
मज भक्तीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ २ ॥
आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥ ३ ॥
तुका म्हणे भेटी । पुरे एकचि शेवटीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आवडी-प्रेम
अर्थ - देवा, तुमचा जो मोक्षाचा दुर्लभ ठेवा असेल, तो तुमचा तुम्हास ठेवा १ मला केवळ एका भक्ती-
चीच आवड किंवा प्रीती असून मनात दुसऱ्या कशाविषयीही प्रेम नाही २ देवा, दातारा, मोक्षासारखे जे काही
प्रकार तुमच्या जवळ असतील, त्याचा सांभाळ तुमचा तुम्ही करा ३ तुकाराम महाराज म्हणतात, मला तुमची
एक भेट झाली म्हणजे पुरे त्यात सर्व काही पावले ४
७१५ नामपाठ मुक्ताफळाच्या ओयणी । हे सुख सगुणी अभिनव ॥ १ ॥
तरी आम्ही जालो उदास निर्गुणा । भक्ताचिया मना मोक्ष नये ॥ २ ॥
द्यावे घ्यावे ऐसा येथें उरे भाव । काय ठाया ठाव पुसोनिया ॥ ३ ॥
तुका म्हणे आता अभयदान करा । म्हणा विश्वंभरा दिले ऐसे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ओयणी-ओवलेली माळ
अर्थ - हरिनामाचे पाठ हीच एक मोत्यांची ओवलेली माळ आहे, व तिचे सर्वांत मोठे सुख श्रीहरीच्या
सगुणवर्णनात आहे १ यासाठीच आम्ही निर्गुणाच्या स्वरूपाबद्दल उदास झालो आहोत कारण आम्हा भक्तांच्या
मनात मोक्षाची कल्पना कधीही नसते २ या सगुण स्वरूपात दोघे असल्याने प्रेम देणे व घेणे असा प्रकार असतो
मग इतर गोष्टींची चौकशी हवीच कशाला ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता अभयदान द्यावे अहो विश्व-
भरा, असे अभयदान दिले, असे एकदा म्हणा ना ४
७१६ भवासिंधूचे काय फोडें । दावी वाट चाले पुढें ॥ १ ॥
तारु भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ २ ॥
मागें उतरिले बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥ ३ ॥
तुका म्हणे लाग वेगें । जाऊ तयाचिया मार्गे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फोडें-अवघड, तारू-नाव, लाग वेगे-त्वरेने
अर्थ - या संसाररूपी सागराची भीती एवढी हवी कशास ? स्वतः विठ्ठलच वाट दाखवून आपल्या पुढे
चालत असतो १ हा पांडुरंगच संसारसमुद्र तरून जाण्याची एक भली मोठी नाव आहे. तो हा सागर तरत
१ सकळ
सार्थ तुकारामगाथा ३५७
असताना आपले अंग किंवा पायही कधी भिजू देत नाही. २ यापूर्वी या नावेच्या साहाय्याने पुष्कळ थोर साधुसंत
संसारसागर तरून गेले, पैलतीरावर कित्येकजण पोचले. ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्वरेने आपणही त्यांच्या
मागे जाऊ या. ४
७१७ नाहीं साजत हा मोठा । मज अळंकार खोटा ॥ १ ॥
असें तुमचा रजरेण । संतां पायांची वाहाण ॥ २ ॥
नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तिभाव करीं देखों ॥ ३ ॥
नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥ ४ ॥
नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा तें काई ॥ ५ ॥
कांहीं नव्हे तुका । पायां पडेन¹ हें ऐका ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- साजत-शोभत, रजरेण-धुळीचा कण.
अर्थ :- मला फार मोठा संत समजू नका. मला हा एवढा मोठा दागिना शोभून दिसत नाही हो. कारण हा
गौरवाचा अलंकारच खोटा आहे. १ मी तुमच्याच पायांवरील धूळीचा एक कण असून संतांच्या पायीची वाहाण
आहे. २ मला त्या स्वस्वरूपाची ओळखही नसून भक्तिभावाविषयी म्हणाल तर, मी तो दुसऱ्यांचा पाहिला आहे
फक्त. त्याप्रमाणे मी करतो. ३ शून्याच्या आकाराची किंवा क्षराक्षर स्वरूपाची ओळखसुद्धा माझी नाही. ४
आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, यासंबंधीचा काहीही विवेक मी कधी केलेला नाही. ५ माझ्या ठिकाणी
कसलाही अधिकार नसून, संतांच्या पाया पडणे हे मात्र मी जाणतो, ते नीट ऐका. ६
७१८ सत्य साच खरें । नाम विठोबाचें वरें ॥ १ ॥
जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ति जेणें ॥ २ ॥
भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥ ३ ॥
तुका म्हणे भोळा । जिंकूं जाणे कळीकाळा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- उठाउठी-त्वरित.
अर्थ :- विठ्ठलाचे नाव हेच एक खरे; हे त्रिवार सत्य आहे. १ या नावाचा आश्रय केल्यानेच सर्व बंधने
तुटतात. यामुळे या लोकी व परलोकीही कीर्ती फार मोठी वाढते. २ ज्याच्या ठिकाणी भाव असतो, त्याला याच्या
प्राप्तीचा लाभ त्वरित होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या भोळ्या भावाने ईश्वरास शरण जाणारा
प्रत्यक्ष काळासही जिंकतो. ४
७१९ सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥ १ ॥
आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ २ ॥
आला भोग अंगा । न लवूं उसीर त्या त्यागा ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- विकल्प-संशय.
अर्थ:- जी गोष्ट सत्य आहे तीच आवडते. वृथा संशय धरल्यास भाव मात्र नाहीसा होतो. १ देवा,
तुमच्या कृपाप्रसादाने शुद्ध सोने कोणते, अशुद्ध कोणते, हे आम्ही नीट जाणतो. २ जो भोग दैवयोगाने प्राप्त होईल,
त्याचा त्याग करण्यासाठी आम्ही उशीर कधी करणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमची सेवा हेच
खरेखोटे जाणण्याचे एक प्रभावी असे अंजन आहे. ४
१ पडणे
३५८ सार्थ तुकारामगाथा
७२० करावे चिंतन । तेंचि बरे न भेटून ॥ १ ॥
वरथा अंगीं राहे भाव । तग तोचि जाणा देव ॥ २ ॥
दर्शनाची उरी । अवस्थाचि अंग धरी ॥ ३ ॥
तुका म्हणे मन । तेथें सकळ कारण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - तग किंवा तग-दृढ
अर्थ - देवाला प्रत्यक्ष न भेटता त्याचे चिंतन करीत असावे, हेच फार उत्तम आहे १ यामुळे मनात चांगला
भाव राहतो व या दृढ भावाचा मनुष्यच देव आहे असे मानावे २ त्याचे दर्शन जरी झाले नाही, तरी दर्शन
होणार हा भावच मनात स्थिर होतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या मनात एकदा देवाचे स्थान नक्की झाले
की, सर्व आले असे समजावे ४
७२१ जें जें जेयें पावे । तें तें समर्पाये सेवे ॥ १ ॥
सहज पूजा याचि नावे । गळित अभिमाने व्हावे ॥ २ ॥
अवघे भोगिता गोसावी । आदीं अवसानीं जीवी ॥ ३ ॥
तुका म्हणे सिण । न धरिता नव्हे भिन्न ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -पावे-प्राप्त होतील
अर्थ - या जन्मी जे जे भोग प्राप्त होतील, ते सर्व देवाच्या सेवेत समर्पण करावेत १ यालाच सहजपूजा असे
नाव असून, ही घडण्यासाठी मात्र आपण आपला अभिमान सोडून द्यावा २ सर्व भोग भोगूनही मग आपण वैराग्य-
शीलच राहतो जन्मापासून मृत्यूपर्यंत अशी व्यवस्था टिकून असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याग व भोग
यात भिन्नता न मानल्यास मग मात्र सारा त्रासच्च आहे ४
७२२ नसे तरी मनीं नसो । परी वाचे तरी वसो ॥ १ ॥
देह पडो या चिंतने । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ २ ॥
दंभस्थिती भलत्या भावे । मज हरिजन म्हणावे ॥ ३ ॥
तुका म्हणे काळें तरी । मज साभाळील हरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - हरिजन-हरिभक्त
अर्थ - मनात देवाविषयी प्रेम नसले तरी, वाणीतून ते प्रकट झाले तरी चालेल १ विठ्ठलनामाच्या
संकीर्तनात व चिंतनातच हा देह पडून जावा अशी इच्छा असावी २ मला लोकांनी हरिभक्त म्हणावे, या दंभाच्या
भावाने देवनामाचे चिंतन घडले तरी हरकत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात थोडा काळ का होईना, पण
यामुळे मला तो श्रीहरी साभाळील ४
७२३ नये जरी फाहीं । तरी भलतेंचि वाहीं ॥ १ ॥
म्हणविल्या दास । कोणी न धरी वेठीस ॥ २ ॥
समर्थाच्या नावे । भलतेंसे विकाये ॥ ३ ॥
तुका म्हणे सत्ता । वरी असते बहुता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -वाही-ओघाने, मार्गाने
अर्थ - तुला जरी पाहोही येत नसले तरी, कोणत्याही मार्गाने तू जा १ ईश्वराचा मी दास आहे, असे
म्हटल्याने तुला कुणी बळजबरीने कामास जुंपत नाही २ त्या समर्थ अशा ईश्वराच्या नावावर काय वाटेल ते
खपले जाते ३ तुकाराम महाराज म्हणतात, या समर्थ अशा ईश्वराची सत्ता सर्वांवर सारखीच असते ४
सार्थ तुकारामगाथा ३५९
७२४ न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥ १ ॥
म्हणउनी नारायणा । कीव भाकितो करुणा ॥ २ ॥
नाहीं अधिकार । काहीं घोकाया अक्षर ॥ ३ ॥
तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघेंच कोडें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -न सडवे-त्याग होत नाही, कोडें-अडचण
अर्थ:- मला अन्नाचा त्याग करवत नाही, वनवास पत्करावा असेही वाटत नाही १ म्हणूनच नारायणा,
मी तुझी प्रार्थना करीत आहे २ मला वेदांची अक्षरे म्हणण्यासही अधिकार नाही. ३ तुकाराम महाराज म्हण-
तात, देवा, हे आयुष्य थोडे व अडचणी फार अशी स्थिती आहे. ४
विवरण -या एका महत्त्वाच्या अभंगात दोन प्रमुख बाबींचा निर्देश आहे पहिली अशी की, ईश्वरप्राप्तीसाठी
कुणासही रानावनात जावयास नको, मला काही ते नीट घडत नाही, असे तुकारामबुवांनी येथे स्पष्टपणे सांगितले
आहे संसाराचा मोह सोडून तुकोबा भंडाऱ्याच्या किंवा भामनाथावरील वृक्षवल्लीच्या सहवासात वावरले, याचा अर्थ
त्यांनी सर्व संसार त्यागून केला असा नाही, किंवा देवासाठी या सर्व गोष्टी आग्रहाने सोडाव्यात असेही नाही मनात
भाव नसेल तर नुसत्या बाह्य त्यागाने काय होणार ? त्यापेक्षा अलप्त अनुसंधान राखून, आहे हे श्रीहरीचेच रूप समजून
बसल्या ठिकाणीच त्या प्रभूची आळवणी केली तर ती अधिक फलदायी ठरते
दुसरी महत्त्वाची बाब या अभंगातील अशी की, त्यांनी यात 'नाहीं अधिकार। काहीं घोकाया अक्षर'
असा स्पष्ट निर्देश केलेला आहे वेदांचे अध्ययन करण्यास स्त्रीशूद्रादिकांना अधिकार नसे, याचा उल्लेख या अभंगात
आहे तुकोबांनी ग्रंथांचे व वेदांचे अध्ययन किती केले होते, याविषयी भरपूर चर्चा अभ्यासकांनी केलेली आहे गीता,
भागवत व इतर पुराणे, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, विष्णुसहस्रनाम इत्यादी ग्रंथांच्या वाचनाने बुवांचे मन
संस्कारित झाले होते, यात संशय नाही. या सर्व ग्रंथातून वेदांचेच सार आले असल्याने प्रत्यक्ष वेदांचे अध्ययन
करण्याचीही जरुरी नाही तरीसुद्धा असे दिसते की, आपणास वेदांची अक्षरे घोकावयास अधिकार नाही, असे बुवा
म्हणत असले, व त्यांनी तसे अध्ययन केले नसले तरी गीता, भागवत, ज्ञानेश्वरी याच्या परिशीलनाने बुवांचे मन
कितीतरी प्रगल्भ व बहुश्रुत बनले होते पण या अभ्यासापेक्षाही महत्त्वाची बाब अशी की, गुरुकृपेने व विठ्ठलप्रसादाने
त्याच्या प्रतिभेत झालेला 'परतत्त्वाचा स्पर्श' एवढा थेट होता की, ते जे बोलले त्यातूनच वेदाचा अर्थ प्रकट होत
राहिला याही स्वानुभवाची यथार्थ जाणीव त्यांना होती 'वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाची साधिला । विठोबासी
शरण जाये । निर्लाभिष्ठें नाम गाये', 'वेद विहित तुम्ही आइका हो कर्म', 'वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा ।
येरांनी वहावा भार माथा' इत्यादी वचनावरून तुकोबांच्या वाणीतून वेदांचेच सार प्रकट होते, हे स्पष्ट आहे त्यामुळे
वेद जेथून स्फुरले, तेथूनच बुवांच्या वाणीला पालवी फुटली, असे मानणे अधिक सयुक्तिक दिसते
७२५ एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥ १ ॥
ऐशा देवाच्या विभूती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ २ ॥
एकांचीं वचनें । कटु अत्यंत तीक्ष्णे ॥ ३ ॥
प्रकाराचे तीन । तुका म्हणे केले जन ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- तीन-सत्त्व, रज व तम अशा गुणांचे.
अर्थ :- काही लोकांचे बोलणे अमृताप्रमाणे गोड व मधुर असते १ अशा या देवाच्याच विभूती असून
प्रारब्धाप्रमाणे भिन्न भिन्न गती त्यांना प्राप्त होतात. २ काही लोकांचे बोलणे अत्यंत कडक व कडवट असते ३
तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे सत्त्व, रज, तम या तीन गुणाना अनुसरून लोकांचे वर्ग बनलेले असतात ४
७२६ वचने ही नाठ । न बोले तें मुके खोड ॥ १ ॥
दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ २ ॥
३६० सार्थ तुकारामगाथा
अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥ ३ ॥
बीज पृथिवीच्या पोर्टी । तुका म्हणे दावी दृष्टी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- नाड-अडचण, खोड-न बोलणारा, मूकस्तंभ.
अर्थ :- फार बोलत राहिल्यासही अडचण निर्माण होते. बरे, काहीच न बोलले तर, मग एखाद्या खोडा-
सारखे मूकस्तंभ म्हटले जाते. १ या दोहोंपेक्षा वेगळेच वागले तर, ते फायद्याचे होईल, बोलणेच असे असावे की,
त्यात अबोलाचे गुण असावेत, अशी नीती आहे. २ दिवस मावळायला लागला की, प्रकाशालाच अंधार येऊन रात्र
येत असते. तसे अबोलातच बोलणे वा बोलण्यात अबोलत्व असावे. ३ पृथ्वीच्या पोटीच असणारे बीज वरील संपन्न
झालेली व फुलांफळांनी बहरलेली सृष्टी दाखविते, त्याप्रमाणे बोलीतच अबोलत्वाचे गुण असावेत. ४
७२७ विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥ १ ॥
देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ २ ॥
देवाचिया चाडें । देवा द्यावें जें जें घडें ॥ ३ ॥
तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- बांधा-बांधलेला समुदाय, गोमटें-चांगले.
अर्थ :- आत्मविचाराशिवाय मनास खरे समाधान व्हायचे नाही. १ हा देह सत्व, रज व तम या गुणांचा
एकत्र बांधलेला समुदाय असून, त्यात एकही चांगला गुण नाही २ देवाची इच्छा मनात ओळखून जे काही द्यायचे
असेल, ते देवाला समर्पण करावे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे करणे हेच मोठे उचित व चांगले होते. ४
७२८ तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥ १ ॥
ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ २ ॥
बसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥ ३ ॥
तुका म्हणे माया । होय दासी लागे पायां ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपाः-खंडे-संपतात, त्रिविधताप-आधिदैविक, आध्यात्मिक, आधिभौतिक अशा तीन प्रकारचे ताप.
अर्थ :- विठ्ठलाच्या नामामुळे भवरोगाचा नाश होतो, तो संपतो. संचित, क्रियमाण यांचे भोगही त्यामुळे
संपतात. १ विठोबाच्या नामाचा असा हा प्रभाव असून त्याचा उच्चार करिताच जन्ममरणाच्या फेऱ्या संपतात. २
त्याच्या सान्निध्यात पापाचा निवास असू शकत नाही, व मनास होणाऱ्या त्रिविध तापांचा नाश होतो. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, माया ही दासी होऊन मग त्याच्या पायास स्पर्श करू लागते. ४
७२९ मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥ १ ॥
एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ २ ॥
सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे नवें । नव्हे जाणवे हें देवें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मुसावले-भरून गेले, थेंबुडा-थेंब
अर्थ :- ब्रह्माच्या रंगात जीवाचा रंग मिळविल्यामुळे सर्व अंगच ब्रह्मभावाने अथवा प्रेमभावाने भरून गेले
आहे. १ आत्मा परमात्म्याच्या स्वरूपात, जीव शिवाच्या स्वरूपात दृढ झाल्यामुळे आपल्या मूळच्या स्थानावर
आल्याचेच समाधान वाटले. २ मोठ्या सागरातील पाण्याचा थेंब, हा त्या पाण्यापासून वेगळा कधी काढता येईल
का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे मी काही नवीन तत्त्वज्ञान सांगत आहे असे नाही. हे पूर्वापासुनचे, मूळचेच
आहे, असे देवाने जाणावे. ४
सार्थ तुकारामगाथा ३६१
७३० अनुतापें दोष । जाय न लगता निमिष ॥ १ ॥
परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ २ ॥
हेचि प्रायश्चित्त । अनुतापी न्हाय चित्त ॥ ३ ॥
तुका म्हणे पापा । शिवो नये अनुतापा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अनुतापें-पश्चात्तापाने निमिष-क्षण
अर्थ - खरोखरचा पश्चात्ताप झाला तर मग एका क्षणाचाही विलंब न लागता सर्व दोष नाहीसे होतात १
पण जन्माच्या आरंभापासून नीट स्थिर असलेला पश्चात्ताप असेल तर तो चांगला २ पश्चात्तापाच्या जलामध्ये
स्नान करणे हेच खरे प्रायश्चित्त ३ तुकाराम महाराज म्हणतात, पश्चात्तापाच्या वृत्तीस पाप शिवत सुद्धा
नाही ४
७३१ चहू आश्रमाचे धर्म । न राखता जोडे कर्म ॥ १ ॥
तेंसी नव्हे भोळी सेवा । एक भावचि कारण देवा ॥ २ ॥
तपें इंद्रिया आघात । क्षणे एका वाताहात ॥ ३ ॥
मत्र चले थोडा । तरि घडचि होय वेडा ॥ ४ ॥
व्रतें करिता सांग । तरी एक चुकता भंग ॥ ५ ॥
धर्म सत्वचि कारण । नाहीं तरी केला सिण ॥ ६ ॥
भूतदयेसि आघात । उच्चनीच वाताहात ॥ ७ ॥
तुका म्हणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा - घड-शहाणा, सांग-पूर्ण
अर्थ - ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व सन्यासी या चार आश्रमाचे धर्म न राखताच नुसतेच कर्म करीत
राहिल्यास त्यात त्याचा काय उपयोग ? १ तशी या विठ्ठलाची भोळी सेवा नाही एकनिष्ठ भावानेच हा देव प्रसन्न
होतो २ उग्र तपश्चर्येने इंद्रियावर आघात होतो, पण एखाद्या क्षणी विपरीत प्रसंग आला की, मग सर्व तपाचा
नाश होतो ३ मंत्राने काही फायदा होईल हे खरे, पण त्यात थोडी जरी चूक झाली तरी, शहाणा मनुष्य वेडा
होईल ४ व्रते-वैकल्ये पूर्णपणे केली तरच ठीक पण थोडे जरी त्यात चुकले तरी त्याचा भंग होतो ५ सत्व गुणाने
युक्त असा धर्म केला तरच तो उपयुक्त होतो नाही तर विनाकारण त्रासच्च होतो ६ भूतदया चांगली खरी, पण
तीमध्येही हा उच्च, हा नीच असा भाव निर्माण झाला तर मग त्याही उपायाची वाताहत होते ७ म्हणून तुकाराम
महाराज म्हणतात, एका भक्तीशिवाय इतर मार्गांनी जाण्यात विधिनिषेधाचे ओझे फार मोठे आहे ८
विवरण - यज्ञयाग, जपतपादी साधने, तीर्थयात्रा, कर्मकांड, तपश्चर्या, योगादि निष्ठा यासारख्या मार्गापेक्षा
भक्ती फार सोपी, अशी ग्वाही भगवद्गीतेने दिली तिचाच पाठपुरावा साधुसंत नेहमी करीत असतात भोळया-
भाबड्या भाविकांना खडतर साधने व क्लेशकारक उपाय जमण्यासारखे नसल्यामुळे त्यांना हरिभक्ती हाच एक सहज
व सोपा असा उपाय असतो 'नामसंकीर्तन साधन पै सोपें । जळतील पापें जन्मांतरें' असे तुकारामबुवांनी म्हटल
आहे 'जरी तुज व्हावा देव । तरि हा सुलभ उपाय', 'भावाचि कारण भावाची कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें'
यासारख्या वचनातून भक्तीची सुलभता तुकाराम महाराजांनी वर्णन केली आहे
७३२ सोडिला ससार । माया तयावरि फार ॥ १ ॥
धावत चाले मागें मागें । सुखदु ख साहे अगें ॥ २ ॥
तु गाथा ४६
३६२ सार्थ तुकारामगाथा
याने घ्यावे नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥ ३ ॥
तुका म्हणे भोळी । विठ्ठलकृपेची कोवळी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साहे-सहन करतो, अगें-स्वत
अर्थ - ज्याने या श्रीहरीच्या प्राप्तीसाठी संसाराचा लोभ सोडला, त्याच्यावर देवाची फार मोठी माया
असते १ अशा भक्ताचे काम देव त्याच्यामागे धावत जाऊन करीत असतो त्याचे सुखदु ख तो स्वतः होऊन सहन
करीत असतो २ या भक्ताने ईश्वराचे नाव घ्यावे व ईश्वराने त्याची सर्व कामे करावीत असे नाते मग निर्माण
होत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही विठ्ठल माउली मोठी कृपाळू असून मनाची मोठी भोळी पण
कोवळी आहे ४
७३३ बैसो खेळूं जेवू । तेथें नाम तुझें गाऊ ॥ १ ॥
रामकृष्णनाममाळा । घालू ओवुनियां गळा ॥ २ ॥
विश्वास हा धरू । नाम बळकट करू ॥ ३ ॥
तुका म्हणे आता । आम्हा जीवन शरणागता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - शरणागतां-शरण आलेल्यांना
अर्थ - बसत असताना, खेळत असताना, जेवण करीत असताना, प्रत्येक हालचालीत देवा, तुझे नाम
आम्ही घेत राहू १ रामकृष्ण या नामाची माळ ओवून आम्ही आमच्या गळ्यात धारण करू २ याच नामाचा
विश्वास धरून नामस्मरणाच्या भक्कम मार्गाने आम्ही जाऊ ३ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा शरण आले-
ल्यांना या विठ्ठलाचे नाव हेच एक जीवन आहे ४
७३४ पाठीं पोटीं देव । कैंचा हरिसा भेव ॥ १ ॥
करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ २ ॥
एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥ ३ ॥
तुका म्हणे धनी । सपुरता काय वाणी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भेव-भय, आशंकित-संशयित, सपुरता-पूर्णत्व, वाणी-कमतरता
अर्थ - हा देव मागे, पुढे, आत, बाहेर सर्वत्र वसलेला असल्यामुळे हरिदासांना भय कसले आहे ? १
आनंदाने तुम्ही कीर्तन करून त्या प्रभूचे गुणगान करावे मन कधीच संशयित असे ठेवू नका २ या देवापाशी
प्रत्यक्ष काळाचेही बळ काही करू शकणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा धनी जर प्रसन्न झाला तर
मग पूर्णत्वास काय कमतरता आहे ? ४
७३५ मनोमय पूजा । हेचि पढीयेँ¹ केशीराजा ॥ १ ॥
घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाह्य रग ॥ २ ॥
अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥ ३ ॥
तुका म्हणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पडीयें-आवडती, कुडें-खोटा
अर्थ - मनातील शुद्ध भावाने होणारी पूजा त्या श्रीहरीला फारच आवडते १ त्याच्या विषयी मनात
ज्या विविध भावाच्या कल्पना असतात, त्याच्या भोगातच तो सुखावतो मग त्याला बाह्य रंगाचा थाटमाट नको
असतो २ हा देव मागचे, चालू व पुढचे काळात जे जे मनात असेल ते जाणतो ३ तुकाराम महाराज म्हणतात,
खोटा भाव त्यापुढे कसा टिकून राहील ? ४
१ पडीये
सार्थ तुकारामगाथा ३६३
७३६ जाणे भक्तीचा जिव्हाळा । तोचि देवाचा १ पुतळा ॥ १ ॥
आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ २ ॥
नामरूपी जडले २ चित्त । त्याचा दास मी अंकित ॥ ३ ॥
तुका म्हणे नवविध । भक्ति जाणे तोचि शुद्ध ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नवविध - श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन
अशा नऊ प्रकारांनी भक्ती.
अर्थ - जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो, जिव्हाळ्याने भक्ती करितो, तो प्रत्यक्ष देवाचाच पुतळा आहे, असे
समजावे. १ मग तो पंडित आहे की नाही, शहाणा आहे की नाही, हे काही माझ्या मनात येत नाही. २ माझे
चित्त त्याच्या नामरूपात जडलेले असते. मी त्याचा अंकित दास बनलेलो असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात,
श्रवण, कीर्तन, स्मरण इत्यादी नऊ प्रकाराची भक्ती जो जाणतो तोच खरा शुद्ध होय ४
७३७ याजसाठीं वनान्तर । जातो सांडुनियां घर ॥ १ ॥
माझें दिठावेल प्रेम । बुद्धि होईल निष्काम ॥ २ ॥
अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥ ३ ॥
तुका म्हणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सांडुनिया - सोडून, दिठावेल - दृष्ट लागेल
अर्थ - मी घर सोडून वनात यासाठीच जातो की, १ श्रीहरीच्याबद्दल माझ्या मनात जो प्रेमभाव आहे
त्यास दृष्ट लागेल, अशी एकसारखी भीती मला असते या वनवासाने माझी बुद्धीही निष्काम होत राहील. २
अद्वैताचे बोलणे मी माझ्या कानानी कधी ऐकत नाही ३ मीच ब्रह्म आहे, अशा भ्रमास मी माझ्या सगुण प्रेमाच्या
आड येऊ देणार नाही ४
विवरण - सगुणभक्तीच्या आवडीचा हा एक लहानसा पण गोड असा अभंग अर्थपूर्ण आहे तत्त्वज्ञानाच्या
दृष्टीने अद्वैत हेच खरे, पण त्याची अनुभूती घ्यायची ती द्वैती भूमिकेवरील भक्तीमध्ये लवथून परमार्थ भोगा-
साठी अगेव झाला याची अनुभूती भक्तीच्या प्रेमसुखात मोठी असते तुकारामबुवा म्हणत आहेत, माझे हे सगुणाचे
प्रेम दृष्ट लागून कमी होईल, म्हणून मी रानावनात जातो तेथे मग माझी बुद्धीही इतर विषयातून कमी कमी होऊन
केवळ त्याच्या रूपातच जडेल अद्वैताच्या प्राप्तीचा ध्यास लागला की, मग मीच ब्रह्म अशी भावना होईल तत्त्वज्ञानाच्या
दृष्टीने ही भावना ठीक असली तरी, भक्तिसुखास तिने उणेपणा येतो मीच ब्रह्म आहे अशी धारणा झाली तर मग
भक्ती कुणी कुणाची करायची ? म्हणून तुकोबा म्हणतात की, असल्या अहंब्रह्माची बाधा मला होऊ नये
७३८ बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥ १ ॥
नको मानूं भार । पाहो दोषांचे डोंगर ॥ २ ॥
आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥ ३ ॥
तुका म्हणे दोषी । मी तो पातकाची राशी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आवरीं - सावरून धर, रक्षण कर
अर्थ - देवा, मी या भवसागरात बुडून जात आहे तू त्यातून माझे रक्षण कर १ माझ्या दोषांचे किंवा
अपराधांचे डोंगर पाहून त्याचे ओझे तू मानू नकोस २ पतित लोकांना पावन करून घेण्याचे जे तुझे ब्रीद आहे
त्याचा तू सांभाळ कर ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर पातकाची रास असून दोषी आहेच, पण
तू पतितपावन आहेस ना ? ४
१ देवाचा, २ मीनले
३६४ सार्थ तुकारामगाथा
७३९ अक्षई तें झालें । आतां न मोडे रचिले ॥ १ ॥
पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ २ ॥
होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥ ३ ॥
तुका म्हणे बोली । पुढें कुटितचि जाली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – अक्षई-कायम टिकणारी
अर्थ - या भक्तिमार्गाची इमारत आम्ही उभी केली आहे, ती कायम टिकणारी आहे आता जी उभी
राहिली आहे, ती काही केल्या मोडणार नाही १ चांगला खोल असा तिचा पाया असल्यामुळे तेथे कुणाचे काही
चालणार नाही २ आजवर सर्व हिशेब पसरून राहिला होता काही तपास लागत नव्हता, पण आता तपास
करता सर्व हिशेब नीट लागला व ताळाही जमून आला ३ तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून या मार्गाविषयीचे
पुढील बोलणेही आमचे सपत्यासारखे झाले ४
७४० तुझे थोर थोर । भक्त करिती विचार ॥ १ ॥
जपतपादि साधने । मज चिंतवेना मनें ॥ २ ॥
करुणावचनें । म्या भाकावीं तुम्हा दीने ॥ ३ ॥
तुका म्हणे घेईं । माझें थोडें फार ठावीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भाकावीं-बोलावीत
अर्थ - देवा, तुझे मोठे मोठे भक्त तुझ्याविषयी फार मोठा विचार करतात. १ देवा, त्यांच्यासारखी
जपतपादी साधनेही मला माझ्या मनात सुद्धा आणता येत नाहीत २ करुण अशा वाणीने मी दीनाने तुमच्याशी
बोलावे, कृपा मागावी, एवढेच मला येते ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी जी काही माझी थोडीफार
सेवा असेल ती तू घ्यावीस ४
७४१ लावुनि काहाळा । सुखें करितो सोहळा ॥ १ ॥
सादवीत गेलो जना । भय नाहीं सत्य जाणा ॥ २ ॥
गात नाचत विनोदें । टाळघागऱ्याच्या छंदें ॥ ३ ॥
तुका म्हणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - काहाळा-झांजा, सादवीत-सावध करीत, सागत, भेव-भीती
अर्थ - मी झांजा वगैरे वाजवून मोठ्या सुखाने भजनाचा सोहळा करितो १ याच मार्गाने मी लोकांना
सावध करीत गेलो आहे सत्यास कधीही भय नाही, असे मी सागत आलो आहे २ मोठ्या तल्लीनतेने मी गातो,
नाचतो, टाळघागऱ्याच्या छंदावर माझे कीर्तन सुरू असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, आता मला कसली
भीती आहे ? प्रत्यक्ष देव माझ्या पुढेच आहे ना ४
७४२ मुक्त फासया म्हणावे । बंधन तें नाहीं ठावें ॥ १ ॥
सुखें करितो कीर्तन । भय विसरले मन ॥ २ ॥
देखिजेना नास । घालू कोणावरि कास ॥ ३ ॥
तुका म्हणे साहे । देव आहे तंसा आहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फासया-वधास, साहे-नाह्य,
अर्थ :- बंधन म्हणजे काय हेच मला माहीत नसल्याने, मुक्तता किंवा मोक्ष कशास म्हणावे, हेच मला समजत
नाही १ मी या ठिकाणी आता सुखाने कीर्तन करीत असून मला कसलीही भीती नाही २ आता कुणाचा नाश
सार्थ तुकारामगाथा ३६५
करावा अशी वस्तूच समोर दिसत नसल्यामुळे कास घालून आता कुणाचा प्रतिकार करावा ? ३ तुकाराम महाराज
म्हणतात, हा देव मला सदैव साह्य करीत असून तो आहे तसाच कृपाळू आहे. ४
७४३ ओनाम्याच्या काळें १ । खडे मांडविले २ वाळें ॥ १ ॥
तेंचि पुढें पुढें काई । मग लागलिया सोई ॥ २ ॥
रज्जु सर्प होता । तोंवरीचि न कळतां ॥ ३ ॥
तुका म्हणे साचें । भय नाहीं वागुलाचें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा.- ओनाम्याच्या काळें-ओनामा शिकण्याच्या वेळेस, लहानपणी, रज्जु-दोर
अर्थ :-लहानपणी ओनामा किंवा श्रीगणेशा शिकत असताना प्रथम एकेक अक्षरावर खडा ठेवून शिकवले
जाते. लहान मुलांसाठी ही रीत असते. १ पण मग पुढे चांगला अभ्यास झाल्यावरही खडे मांडून शिकविण्याची
काय जरूरी आहे ? २ दोर हा सर्प आहे अशी भावना होती, तोपर्यंतच त्याची भीती होती. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, बागुलाचे भय तो केवळ बागुलबुवा आहे, हे सत्यज्ञान होताच नाहीसे होते. ४
७४४ आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥ १ ॥
नको बडबडूं भांडे । फोडीं वाउगें तें रांडे ॥ २ ॥
विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥ ३ ॥
तुका म्हणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-आठव-स्मरण, वैखरी-वाणी
अर्थ :- माझ्या वाणीने आता यापुढे स्मरण म्हणून त्या विठ्ठलाचेच नाम घ्यावे. १ हे वाचे, उगाच बडबड
करून भांडणे उकरू नकोस. २ विठ्ठल विठ्ठल असे शब्द सोडून तू दुसरे काहीही बोलू नकोस. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, असे जर न करशील तर तुला देवाची शपथ आहे. ४
७४५ काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥ १ ॥
मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ २ ॥
त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहेँ ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । सत्य घ्यावी आतां सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- शिखा-शेंडी, अंगुष्ट-पायाचा अगठा, त्राहि-रक्षण कर
अर्थ:- देवा, तू मनात आणशील तर काय करणार नाहीस ? आता माझी लाज तू राख ना. १ देवा,
मी तर अपराधांची रास असून शेंडीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत पापांनी भरून गेलो आहे. २ देवा, तू माझे रक्षण
करावेस, अशी मी त्रिवार प्रार्थना करीत आहे. मजवर कृपा दृष्टीने पाहा ना. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा,
माझी ही सत्य स्वरूपाची सेवा घ्या ना तुम्ही ४
७४६ वंदीन मी भूतें । आतां अघौंचि समस्तें ॥ १ ॥
तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ २ ॥
गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥ ३ ॥
तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- भूतें-प्राणिमात्र, गाळुनिया -सोडून.
१ वेळें, २ माहवले.
३६६ सार्थ तुकारामगाथा
अर्थ:- देवा, आता सर्व प्राणिमात्रांना मी नमस्कार करीन. १ नारायणा, पदोपदी मी तुमच्याच भावनेने
पाहीन २ लहानमोठा असा भेद सोडून मी वागेन मी याबद्दल वेदास प्रमाण मानीन. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, एवढे झाल्यावर मला दुसऱ्या कुणाची संगत सहन होणार नाही ४
७४७ पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥ १ ॥
ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ २ ॥
देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥ ३ ॥
गेला अभिमान । लाज वोळविला मान ॥ ४ ॥
शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥ ५ ॥
तुका म्हणे सखे । विठोबाच ते सारिखे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - पुज्यमान-पूजा करण्यास योग्य असे. ओतली-निर्माण झाली, बोळविला-नाहीसा केला.
अर्थ - पूजा करण्यास योग्य असे जे हे हरिभक्त कथेसाठी उभे आहेत, १ आणि कीर्तनामधून ज्याचे
गुणगान ते करीत आहेत, त्याची मूर्तीच त्यांच्यासमोर उभी आहे, निर्माण झाली आहे. २ या हरिभक्तांना स्वतःच्या
देहाचा विसर पडला असून त्यांनी केवळ आनंदातच संचार केला आहे. ३ त्यांच्यामधील सर्व अभिमान संपला
असून लाज व मान यांचाही प्रभाव नाहीसा झाला आहे. ४ शोक, मोह, चिंता यांचे नाव सुद्धा आता ते जाणीत
नाहीत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे विठ्ठलभक्त केवळ विठ्ठलच बनून गेले आहेत. ६
७४८ भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥ १ ॥
धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ २ ॥
हिरा हिरकणी । काढी आंतुनि अहिरणी ॥ ३ ॥
तुका म्हणे केलें १ । मन २ शुद्ध हें चांगलें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - येरयेरां-एकमेकाना, अहिरणी-ऐरण
अर्थ :- जैसा भक्तिभाव असेल, तसे फळ आपणांस प्राप्त होईल. इतर बळाचा काही उपयोग देवाच्या
प्राप्तीसाठी होणार नाही. १ जो ज्या जातीपाशी असेल, त्या जातीपाशी तो धावून जाईल. कारण परस्परांचे चित्त
एकमेकांना समजत असते. २ वरून घाव बसले असताना न फुटता हिरा ऐरणीतच अडकतो; पण हिरकणीने तो
बाहेर येतो. ३ त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, आपले मन शुद्ध, चांगले व ईश्वरभक्ताच्या जातीस
मिळणारे असावे. ४
७४९ वरि बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥ १ ॥
ऐसे लटके जे ठक । तयां इह ना पर लोक ॥ २ ॥
परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥ ३ ॥
तुका म्हणे हाडें । कुत्र्या लाविलें झगडें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फोस-पोकळ, व्यर्थ, ठक-फसविणारे.
अर्थ :- वरवर परमार्थज्ञान सांगणाऱ्याचे बोल चांगले रसाळ वाटतात; पण खऱ्या व शुद्ध ज्ञानाच्या
दृष्टीने पाहिल्यास त्याचे अंतरंग पोकळच असते. १ असे हे लोक फसविणारे असतात. त्यांना घड हाही लोक मिळत
नाही व परलोकही उरत नाही. २ तो ऐकतो एक व सांगतो दुसरे भलतेच. ३ अंगाला परमार्थविचाराची धूळ
धडही लागू देत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हाडकाच्या तुकड्यासाठी भांडणाऱ्या कुत्र्यांसारखी त्यांची
स्थिती असते ४
१ भले, २ मन शुद्ध जीही केले.
सार्थ तुकारामगाथा ३६७
७५० हेचि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥ १ ॥
अवघीं तुझीं पदें । नमस्कारीन अभेदें ॥ २ ॥
न वर्जितादिशा । जाय तेथेंचि सरिता ॥ ३ ॥
नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अभेदें-अभेद समजून, न वर्जित-न सोडता
अर्थ :- देवा, आता मी तुझी पूजा अशाच प्रकारे करीन. १ मी अभेदत्व समजून, सर्वत्र तुझेच पावले
आहेत, असे समजून नमस्कार करीन. २ कोणत्याही दिशेस न वगळता, न सोडता, सर्वत्र समत्वाच्या भावाने जाऊन
पाहीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी गुणदोषाच्या बाबतीत एकदेशी होणार नाही ४
७५१ आपले तो कांहीं । येथें सांगिजेंसें नाहीं ॥ १ ॥
परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ २ ॥
पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वे निराळा ॥ ३ ॥
तुका म्हणे भुली । इच्छ्या उफराट्या चाली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वायचळ-वाचाळ, बरळ-बडबड, भुली-चुकीने
अर्थ - या मानवी जन्मात आपले असे काही आहे, हे सांगता यायचे नाही. १ पण ही माझी वाणी
वाचाळ असून व्यर्थ बडबड करण्याचा छंद घेते. २ हा देह म्हणजे पंचमहाभूतांचा एक मेळावा असून आत्मतत्त्वा-
पासून तो निराळाच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या वाणीमुळे देह व आत्मा एकच मानण्याची चूक
होत असते. ४
७५२ विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साठीं वाचा ॥ १ ॥
कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ २ ॥
न पाहे सिदोरी । जाती¹ कुळ न विचारी ॥ ३ ॥
तुका म्हणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नावाडा-नावाडी, फुकाचा-फुकटचा.
अर्थ - भवसागरातून तरून नेणारा हा विठ्ठल फुकटचा नावाडी आहे. मात्र त्याची आळवणी आपण
आपल्या वाणीने सतत केली पाहिजे १ हा देव कमरेवर हात ठेवून जशाचा तसा उभा असून खालीही बसत नाही. २
पारपुण्याची शिदोरी किती आहे किंवा भक्ताची जातकूळी कोणती आहे, याचा विचार न करता हा भक्तावर कृपा
करतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, भक्तानी हाक मारल्याबरोबर हा देव त्वरित त्याला भेट देतो. ४
७५३ कृपावंत किती । दीनैं बहु आवडती ॥ १ ॥
त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ २ ॥
भुलो नेदी वाट । करीं धरुनि दावी नीट ॥ ३ ॥
तुका म्हणे जीवे । अनुसरता एका भावें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - योगक्षेमचिंता-कल्याणाविषयी सर्व प्रकारची काळजी.
अर्थ - हा ईश्वर किती कृपाळू आहे । याला आपले दीन भक्त नेहमी आवडतात. १ तो स्वतः त्यांचा
सर्व भार शिरावर घेऊन त्याची सर्व कल्याणदायक चिंता तोच वाहतो. २ तो कधी सन्मार्ग चुकू देत नाही हात
धरून नीट वाट दाखवितो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, याला एकनिष्ठेने आपण शरण जावे. ४
१ याती.
३६८ सार्थ तुकारामगाथा
७५४ नेणती वेद श्रुति कोणी । आम्हां भाविकां वांचुनी ॥ १ ॥
रूप आवडे आम्हांसी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ २ ॥
आम्हीं भावें बळिवंत । तुज घालूं हृदयांत ॥ ३ ॥
तुका म्हणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – जोडी-प्राप्ती, धाक-भीती.
अर्थ - या ईश्वरास आम्ही भाविक भक्त जितके ओळखतो, तितके कोणीही, वेदश्रुतीसुद्धा याला जाणीत
नाहीत. १ याचे रूप आम्हास फार आवडते. त्याप्रमाणे आम्ही याची प्राप्ती करून घेतली आहे २ आम्ही भक्ति-
भावामुळे बलवान झालो असून त्यायोगे देवा, तुला आमच्या हृदयात घालून ठेवू. ३ तुकाराम महाराज म्हणतात,
देवा, आमची तुला मोठीच भीती असल्याने हाक देताच तू आम्हास पावतोस. ४
७५५ मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥ १ ॥
मागें परतावी१ तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ २ ॥
येउनिषां घाली घाला । नेणों काय होई२ तुला ॥ ३ ॥
तुका म्हणे येणें । बहु नाडिले शाहाणे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा – लुलया-विषयात, नाडिले-फसविले.
अर्थ - मन या विषयाच्या ठिकाणी गुंतून राहिले आहे ते पुन पुन त्याच ठिकाणी जात आहे १ त्या
मनास तेथून मागें फिरवील तोच या पृथ्वीवर मोठा शूर समजावा लागेल. २ हे मन जेव्हा घाला घालील तेव्हा
काय होईल ते समजणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या अवखळ मनाने पुष्कळ शहाण्याना फसविले
आहे. ४
७५६ घेईं३ माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥ १ ॥
तुम्हीं घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ २ ॥
तुम्हीं ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥ ३ ॥
मना तेथें धांव घेईं । राहें विठोबाचे पायीं ॥ ४ ॥
तुका म्हणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - तेथे-विठ्ठलचरणी.
अर्थ:- माझ्या वाचे, तू या विठोबाचे गोड नाम सतत घेत जा १ डोळ्यानो, तुम्ही पोट भरून असे याच
विठोबाचे मुख पाहून सुखी व्हा. २ कानानो, या माझ्या विठोबाचेच गुण तुम्ही सदैव ऐका ३ माझ्या मना, त
या विठ्ठलाच्या चरणीच धाव घेऊन तेथेच स्थिर राहा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, जीवा, आता या विठ्ठलास
तू कधी सोडू नकोस ५
७५७ धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टीं न्याहाळितां ॥ १ ॥
बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ २ ॥
सर्वमंगळाचें सार । मूळ सिद्धींचें भांडार ॥ ३ ॥
तुका म्हणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपाः- धणी-तृप्ती, बरवा-चांगला, सुरंग-सुंदर, अतपार-सीमा, लेखा-समजा.
१ परतवी, २ होईल, ३ घेई घेई
सार्थ तुकारामगाथा ३६९
अर्थ:- या श्रीहरीचे गुण कितीही गायिले तरी मनाची कधी तृप्ती होत नाही याचे रूप न्याहाळून पाहताना
दृष्टीचे सुखही अपार होते. १ हा पांडुरंग फारच चांगला आहे. याची कांती सावळी व सुंदर अशी आहे २ याचे
रूप म्हणजे सर्व मंगल पदार्थांचे सार असून सर्व सिद्धींचे ते एक उत्तम भांडार आहे. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, या श्रीहरीच्या सुखाला काही सीमा नाही असेच समजा. ४
७५८ जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥ १ ॥
म्हणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ २ ॥
लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड¹ जैसा ॥ ३ ॥
तुका म्हणे याचकभावें । कल्पतरू मान² पावे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - कैंचा-कसा, कृपानिधी-कृपेचा साठा, लोहो-लोखंडाने.
अर्थ:- देवा, मी जर येथे पतित नसतो, तर तुझी पतितपावन म्हणून येथे कीर्ती कशी झाली असती? तू
पतितपावन कसा बनला असतास? १ म्हणून माझे पतित हे नाव तुझ्या आधी असून मग तू पतितपावन असा
कृपेचा साठा आहेस. २ लोखंडामुळे खरे म्हणजे परिसाला महत्त्व आले आहे. नाहीतर तो दगडाप्रमाणेच
झाला असता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी याचकभाव धरून उभा आहे म्हणून त्या कल्पतरूला महत्त्व व
मान मिळत आहे नाही तर तो इतर वृक्षाप्रमाणेच झाला असता, तसे देवा, माझ्यामुळे तुम्हास महत्त्व आहे. ४
७५९ एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥ १ ॥
कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ २ ॥
आठवचि पुरे । सुख अवघें मोहोरे ॥ ३ ॥
तुका म्हणे मन । पूजा इच्छी नारायण ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मोहोरे-प्राप्त होते.
अर्थ :- या प्रभूविषयी एकनिष्ठेचा भाव चित्तात असावा. मग इतर युक्त्यांची काही जरूरी लागत नाही. १
हे सर्व मला माझ्या शुद्ध भावामुळे समजून आले आहे २ नुसती त्याची आठवण झाली तरी ती पुरी आहे.
तिच्यामुळे सर्व सुखांची प्राप्ती होत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा नारायण मनोमय पूजेची इच्छा
करीत असतो. ४
७६० मज संतांचा आधार । तूं एकलें निर्विकार ॥ १ ॥
पाहा विचारुनि देवा । नको आम्हांसवें दावा ॥ २ ॥
तुज बोल न बोलवे । आम्हां भांडायाची सवे ॥ ३ ॥
तुका म्हणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सवे-सवय.
अर्थ :- देवा, मला या संतांचा तरी केवढा आधार आहे. पण तू मात्र एकटाच असून निर्विकार आहेस १
देवा, तुम्हीच नीट विचार करून पाहा, उगीच आमच्या बरोबर दावा धारण करू नका. २ तुम्हाला एक शब्दही
बोलायला नको व आम्हास मात्र भांडण करण्याची सवय आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, यासाठी
ऐक्यभाव उरेल असे कर. ४
७६१ तुज मागणे तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥ १ ॥
आन नेघों देसी तरी । रिद्धि सिद्धि मुक्ति चारी ॥ २ ॥
१ दगडा ऐसा, २ नाम.
तु गाथा .४७