सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
३३४ सार्थ तुकारामगाथा
अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचाचि थारा ।
बालत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥ ४ ॥
ऐसो उलघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलो काळें ।
आतां हे उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥ ५ ॥
सांडीन या संसाराची वाट । बहु येणे सोसविले कष्ट ।
दावी सत्या ऐसे नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट जालो देवद्रोही ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- दुस्तर-तरून जाण्यास कठिण, गणित-हिशेब, आवर्ती-चक्रात, खाणी-योनी, जन्म,
भोवंडिले-दमविले, उगवावे-मुक्त व्हावे
अर्थ - हा संसाररूपी सागर तरून जाण्यास फार कठिण असा आहे हा ओलांडून जाण्याचा प्रयत्न
केला तरी तो ओलांडिता येत नाही आजवर पुष्कळच या संसारसागराच्या पुरातून वाहून गेले त्यांना पैलतीर
हाती लागलाच नाही १ देवा, कित्येक जन्माचा फेरा चालू आहे हातांरा, याचा काही हिशेबच नाही मजजवळ,
या जन्माच्या चक्रात मी अवचितपणे सापडलो आहे फार मोठ्या संकटांतून फिरतो आहे २ माझे वय वाढले,
पण त्या मानाने बुद्धी काही वाढली नाही. मी अज्ञानीच राहिलो माझ्या बुद्धीने परमार्थाविषयी काही आस्था
धारण केली नाही अशा अवस्थेत मी परमार्थाविषयी विचार तरी कधी करावा ? ३ अनेक जन्मांतून आहार,
झोप, भय, मैथुन याचीच वस्ती झाली बाल्य, तारुण्य, वृद्धत्व, यातून भोगनाच प्राधान्य म्हणत मिळाले ४
अशा प्रकारच्या अनेक जन्माची स्थळे उल्लघून मी आलो पण या काळाने मला फार दमविले आता या प्रपंचाच्या
जाळयातून मुक्त व्हावे व दिवसाच्या साहाय्याने सुटका करून घ्यावी असे वाटते ५ आता या संसाराचा मार्ग मी
सोडूनच देणार आहे या प्रपंचमोहाने फार कष्ट झाले मला तुकाराम महाराज म्हणतात, हा नष्ट, दुष्ट संसार
खोटा असून खऱ्यासारखा भासतो, आणि त्यामुळेच देवाचा द्रोह करून आपण भ्रष्ट झाल्यासारखे होतो ६
६६३ विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी ।
विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥ १ ॥
विठ्ठल स्मरणा कोवळा । विठ्ठल गौरवी आगळा ।
आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीलाविग्रही ॥ २ ॥
उभाचि परी न मनी सीण । नाही उद्धरिता भिन्न ।
समर्थांचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥ ३ ॥
रुचीचे प्रकार । आणिताती आदरें ।
फोटें ही न पडे अंतर । थोरा थोर धाकुट्या धाकुटा ॥ ४ ॥
करिता बळ धरिता नये । शोभता डोळे मनेच होय ।
आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥ ५ ॥
पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तो नाहीं भरिले रिते ।
करितो सेयन आइतें । तुका म्हणे चितें चित्त मेळवूनी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- दानाविसीं-दानाविषयी, आर्तभूता-दुःखी झालेल्या प्राण्यांना
अर्थ - हा आमचा विठ्ठल देव भीमातीरावर निवास करून पंढरपुरात उभा आहे पुंडलिकापाशी हा तिष्ठत
उभा आहे. भक्तांच्यावर कृपा करण्यासाठी हा फार उदार आहे १ हा विठ्ठल स्मरण करणारांना अतिशय कोवळा
असून, त्याचा आणखी गौरव करणे कठिण आहे या गौरवाच्या पलीकडे तो आहे साऱ्या ब्रह्मांडास त्याचा आधार
असतो त्याच्या लीला सर्वत्र असतात. २ हा देव उभा असला तरी, त्याबद्दलचे दुःख कधी मानीत नाही. भक्तांचा
उद्धार करिताना हा भेदभाव मानीत नाही. समर्थांच्या घरी, श्रीमंताच्या घरी जसे सर्वांना एकाच प्रकारचे अन्न
मिळते, त्याप्रमाणे भुकेने दुःखीकष्टी झालेल्यांना हा देव क्षणोक्षणी सांभाळीत असतो. ३ मोठ्याच्या घरी
नाना रुचींचे, नाना प्रकार अन्नाचे केलेले असतात, मोठ्या आदराने वाढायला आणतात. त्यावेळी थोरांना थोर पदार्थ,
लहानांना किरकोळ पदार्थ, असा भेदभाव कुणी करीत नसतात. ४ हा देव नुसत्या बळाने कधी हातात सापडत नाही.
डोळ्यांनी त्याच्याकडे निरखून पाहताच सारे मनच तदाकार होऊन जाते. आपल्या भक्तांच्या मनांतील उद्देश हा
हृदयनिवासी विठ्ठल जाणून असतो ५ कुणी प्रेमी भक्त आल्यास प्रेमपान्हाास कधी अंतर पडत नाही. तो पान्हा
कधी संपतो असे घडतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या आयत्या प्रेमपान्ह्याचे सेवन मी त्याच्या
चित्तात माझे चित्त मिळवून करीत आहे. ६
६६४ ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख ।
अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥ १ ॥
न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी ।
स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ २ ॥
रामकृष्णध्यान वामननरसिंहों । उग्र आणि सौम्य कांहींच नाहीं ।
सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥ ३ ॥
गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण ।
व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हें ॥ ४ ॥
ठाण हें साजिरे सुंदर । अविनाश अविकार ।
अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥ ५ ॥
जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा ।
अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळ चरणसेवक¹ ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- उपजे-निर्माण होणे, धणी-तृप्ती.
अर्थ :-या श्रीहरीचे मुख इतके सुंदर आहे की, याकडे पाहताच सर्व ताप दूर होतात. भवरोगासारख कठीण
दुःखही दूर होते. याला पाहताच मोठे सुख निर्माण होते. माझ्या दृष्टीपुढेच हे सुख उभे आहे १ याला कितीही
पाहिले तरी, डोळ्याची तृप्ती होत नाही. याच्या कृपेची खाण मोठी आहे याचे स्तवन करिताना वेदवाणीही पुरी पडत
नाही. असा हा सारख्या पावलाचा श्रीहरी, कृपेचा साठा श्रीविठ्ठल उभा आहे. २ रामकृष्ण हे रूप वामनासारखे
या नरसिंहासारखे प्रथम उग्र, मग सौम्य, अथवा प्रथम सौम्य मग उग्र असे काहीच नाही. याच्याकडे भक्तीच्या
प्रवाहाने येणाऱ्या व भक्तिभावाने पाहणाऱ्या सेवकांनाच हा प्राप्त होतो. शुद्ध भाव हाच याचा प्रेमाचा खाऊ आहे ३
हा श्रीहरी गुणांनी गंभीर, चतुर, सुजाण, शूर, धीर, उदार असून त्रिभुवनांत भरून राहिलेला आहे. याचे सौंदर्य
मन मोहून टाकणारे आहे. ४ या नारायणाचे हे स्थान अतिशय सुंदर व शोभिवंत असे असून ते अविनाशी व
अविकारी आहे. त्याचे स्वरूप अनंत व अपार असूनही हा देव कमरेवर हात धरून उभा आहे. ५ याची वाणी
म्हणजे फुलांची माळच आहे. त्याची कृपा म्हणजे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे अमृतच होय. तुकाराम महाराज म्हणतात,
या अनंताच्या अंगी अनंत कला असून याच्याजवळ हा सेवक उभा आहे. ६
१ चरण सेवे.
३३६ सार्थ तुकारामगाथा
कान्होबा० नाट अभंग ८
६६५ अगा ये वैकुंठनायका । अगा ये त्रैलोक्यतारका ।
अगा जनार्दना जगव्यापका । अगा पाळका भक्तांचिया ॥ १ ॥
अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा ।
अगा बळिवध वामना । अगा निधाना गुणनिधी ॥ २ ॥
अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा ।
अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥ ३ ॥
अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा ।
अगा सुदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वर्णू ॥ ४ ॥
अगा अवतारांपरंपरा । निरालबा' निर्विकारा ।
अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनांचिया ॥ ५ ॥
अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा ।
अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥ ६ ॥
अगा चतुरा सुजाणा । मधुरांगिरा सुलक्षणा ।
अगा उदारा असुरमर्दना । राखें शरणा तुकयाबंधू ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - निधाना-साठा, पार-अंत मधुरांगिरा-मधुरवाणी असलेला असुरमर्दना-असुरांचा
नाश करणारा
अर्थ - अरे वैकुंठनायका, माझे रक्षण करण्यास तू ये अरे त्रैलोक्याचे रक्षण करणाऱ्या देवा, अरे जनार्दना,
सर्व जगास व्यापून राहणाऱ्या देवा भक्तांचे पालन करणाऱ्या देवा, मी तुला शरण आहे १ अरे वसुदेवदेवकीच्या
मुला, अरे गोपिकांच्या रमणा अरे बळिराजास बांधून नेणाऱ्या वामना, अरे अनेक गुणांच्या साठ्या, मी तुला
शरण आलो आहे २ अरे द्रौपदीच्या सख्या अरे मित्रा पांडवा, अरे माझ्या जीवाच्या जीवा अरे माधवा, अरे मधु
नावाच्या दैत्याचा नाश करणाऱ्या मधुसूदना, मी तुला शरण आलो आहे ३ अरे महेश्वरा, अरे महाराजा, अरे
श्रीहरी, ज्याच्या ध्वजावर गरुडाचा निवास आहे, अशा गरुडध्वजा, अरे सुंदरा, अरे हजार हाताच्या सहस्रभुजा,
तुझ्या स्वरूपवर्णनास अंत नाही त्याचे मी काय वर्णन करू ? ४ अरे देवा, अवतारांची परंपरा तुझ्यापासूनच आहे
तुला कुठलाही आधार नसल्याकारणाने तू निरालंब आहेस, तू निर्विकार आहेस अरे हातावर गोवर्धन धारण कर-
णाऱ्या धरणीधरा अरे दीनांच्या माहेरा मी तुला शरण आलो आहे ५ अरे धर्मराया अरे धर्मशीला, तू कृपेचा
सागर आहेस अरे प्रेमाच्या कल्लोळा तू सर्व कलांत प्रवीण आहेस ६ अरे चतुरा, सुजाणा, अत्यंत गोड वाणी
असणाऱ्या मधुरांगिरा, सुलक्षणा, अरे उदारा, अरे असुरांचा नाश करणाऱ्या असुरमर्दना, हा तुकयाबंधू तुला शरण
आला आहे त्याचे रक्षण तू कर ७
विवरण - नाटाच्या या प्रसिद्ध अभंगातील या पुढचे महालात अभंग तुकयाबंधू या मुद्रेन अंकित झालेले
आहेत तुकयाबंधू याचे दोन अर्थ होऊ शकतात एक तुकारामबुवांचे धाकटे बंधू कान्होबा यांचे तरी हे अभंग
असावेत, किंवा तुकयाबंधू म्हणजे भक्तजनांचा बंधू तुकोबा असाही अर्थ असणे संभवनीय आहे तुकारामांच्याच
विचारांची छाप याही अभंगावर दिसते मागे अभंग क्र० ६४६ मध्ये ज्याप्रमाणे तुकारामबुवांनी अतिशय अव्यंग,
मनोहर आणि साभिप्राय विशेषणे या संवाद्यन वापरून भाव व्यक्त केला आहे, त्याचप्रमाणे याही अभंगात तुकयाबंधू
कान्होबा यांनी ईश्वराशी आपलं नाते वर्णन केले आहे
१ निरालंब
सार्थ तुकारामगाथा ३३७
६६६ उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी ।
पाउलें तरी समचि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥ १ ॥
शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें ।
पीतांबर उटी शोभे गोरेपणे । लोपली तेणें रवितेजें ॥ २ ॥
श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुद्रिका माळ ।
दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥ ३ ॥
कर्डी फडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां¹ ।
मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥ ४ ॥
सुंदरपणाची साम्यता । काय वर्णू ते पावे आतां ।
तुक्याबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- जडितमेखळा-रत्नजडित कंबरपट्टा, चिद्रत्नें-चैतन्यरूपी रत्ने, ढाळ-तेज, दशांगुळी-
दहा बोटात, मुद्रिका-मुद्रांकित अंगठ्या, कर्डी-करदोरा, बाहीं-दंडावर, बाहुवटे-बाहुभूषणे, मृगनाभी-कस्तुरी
अर्थ :- हा श्रीविठ्ठल मी आज भीमेच्या तीरावर उभा राहिलेला पाहिला. याने आपले हात कमरेवर ठेवून
मिरविले आहेत. याची पावले समान असून अत्यंत शोभिवंत अशी आहेत. याचे नाव अनंत रूपात असून अतिशय
गोड असे आहे. १ शंख, चक्र इत्यादींनी अंकित झालेली भूषणे याने घातली आहेत. चैतन्याच्या रत्नानी याचा
कंबरपट्टा जडविलेला आहे. याच्या गोरेपणामुळे याचा पीतांबर व याच्या अंगाची उटी या गोष्टी शोभून दिसतात.
याच्या तेजाने सूर्याचेही तेज लोपून गेलेले दिसते २ याच्या कानात कुंडले शोभत असून त्याचा प्रकाश पडत आहे.
याच्या दहाही बोटात रत्नजडित अंगठ्या असून याच्या गळ्यात माळ आहे. याच्या मुखातील दातांची ओळ हिऱ्या-
प्रमाणे चमकत आहे. याचे मुख निर्मळ असून ते एक अथांग अशा सुखाच्या राशीप्रमाणे आहे. ३ याच्या कमरेस
करगोटा आहे. याच्या दंडांवर वाक्या व इतर बाहुभूषणे शोभून दिसतात. याच्या गळ्यात पदक शोभत असते.
मृगाच्या नाभीतून मिळालेल्या कस्तुरीचा टिळा याच्या कपाळावर आहे. याचे डोळे विद्युल्लतेप्रमाणे चमकणारे
आहेत. ४ या श्रीहरीच्या सुंदरपणाची साम्यता काय वर्णन करावी ? तुक्याबंधू म्हणत आहे की, अरे अच्युता,
जी माता तुला प्रसविला ती धन्य होय. ५
६६७ एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी ।
मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥ १ ॥
नको दुजी बुद्धि आणीक । रिद्धिसिद्धी परलोक ।
तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ २ ॥
मना येईल तो जन्म देईं । भलते कुळीं भलते ठायीं ।
तें मी सांकडें घालीत नाही । हृदयींहुनी तूं न वजें ॥ ३ ॥
इतुले करीं भलत्या परी । भलत्या भावे तुझे द्वारीं ।
राहेन दास होऊनि कामारी । वदो वेखरी नित्य नाम ॥ ४ ॥
नको विचारूं दुसरें आतां । शरण आलो जी पंढरीनाथा ।
तुक्याबंधु म्हणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :-खंडणा-विरोध, सांकडे-संकट, न वजे-दूर होत नाहीस, कामारी-सेवक, वेखरी-वाणी.
१ माळा.
तु. गाथा...४३
३३८ सार्थ तुकारामगाथा
अर्थ - अरे हृषीकेशी, तुझ्याजवळ एकच मागणे आहे मी नीट सांगतो, ते तू चित्त लावून ऐक तुझ्या
चरणांशी माझें अंतर पडू देऊ नकोस, येवढी कृपा कर १ याशिवाय मजविषयी दुसरी बुद्धी तू धरू नकोस मला
रिद्धीसिद्धी नकोत, मला परलोक नको केवळ तू स्वामी व मी सेवक असे एकच नाते राहू दे यामध्ये मात्र विरोध
होऊ नये २ तुझ्या मनास येईल तो जन्म मला तू दे कोणत्याही कुळात, कोणत्याही ठिकाणी तू मला जन्मास
घाल हे सकट काही मी तुझ्यावर घालत नाही पण माझ्या हृदयातून तू दूर होत नाहीस हे मात्र पाहा ३
तू एवढेच करावेस, मग मी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही भावाने तुझ्या दारात येईन व तुझे काम करणारा सेवक
होऊन राहीन माझी वाणी तुझेच नाम नेहमी गात राहील ४ आता या खेरीज दुसरे काही विचारू नकोस
पंढरीनाथा, मी तुला आता शरण आलो आहे तुकयाबंधू म्हणत आहे की, अरे अच्युता, तू दाता व दानशूर
असा आहेस ५
..
६६८ कईं देखतां होईन डोळीं । सकळा भूतीं मूर्ति सावळी ।
जींवा नाव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥ १ ॥
ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन ।
प्रेमसागरीं बुडीन । होईल स्नान अनुतापीं ॥ २ ॥
ऐसा कईं येईन दैवास । दृश्य नासोनि जाईल आस ।
सदा सतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥ ३ ॥
कईं नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होईल पार ।
अमृत ते पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥ ४ ॥
प्रसन्न दया क्षमा शांति । कईं नवविधा होईल भक्ति ।
भोगीन वैराग्यसपत्ति । मनोरथ कळती तईं पुरले ॥ ५ ॥
तुकयाबंधु म्हणे साग । नव्हे तुजविण निरसेना पाग ।
म्हणोनि घातले साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - अनुतापीं-वैराग्यान, पश्चात्तापाने धणीबरी-आनंदाने, पाग-इच्छा
अर्थ - देवा, या माझ्या डोळ्यांनी सर्वभूतमात्रांमध्ये तुझी सावळी मूर्ती कधी, बरे पाहीन ? या भूमंडळात,
जळात, स्थळात, काष्ठात, पाषाणात जीवांना तुझच नाव आहे १ नारायणा, माझ्यावर अशी कृपा कर की, या
जगाचाच मी जीव होईन प्रेमसागरात बुडी देईन वैराग्याच्या किंवा पश्चात्तापाच्या पाण्यात स्नान करीन २
असे माझे दैव कधी होईल की, दृश्य असणारे जग नाहीसे होऊन माझी आशाही नष्ट होईल नेहमी सतचरणी वास
करीन व त्याचे उच्छिष्ट मोठ्या आनंदाने सेवन करीन ३ या माझ्या नवसाला कधी अंकुर फुटतील ? अपार असे
सुख मला कधी प्राप्त होईल ? या पृथ्वीवर आनंदामृताच्या सागराचे पूर कधी वाहू लागतील ? ४ प्रसन्नता, दया,
क्षमा, शांती इत्यादींची व नवविधा भक्तीची प्राप्ती मला कधी होईल ? वैराग्यसंपत्ती मी कधी भोगीन ? माझे
सर्व मनोरथ पूर्ण कधी होतील ? ५ तुकयावधू म्हणत आहे की देवा, तुझ्याशिवाय माझी ही इच्छा कुणीही पूर्ण
करणार नाही म्हणूनच देवा, पांडुरंगा तुमच्या चरणावर साष्टांग नमस्कार मी घातले आहेत ६
६६९ तू वळिया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं ।
रिघालो पाठी तुझी म्हणउनी । आता करीन मी असेल ते ॥ १ ॥
तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुराचा सुर ।
महावीरा वीर धनुर्धर । मी तो पामर काय तेथें ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा ३३९
कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ ।
संहारूनि राक्षसदाळ । शरणागत राजीं स्थापिला ॥ ३ ॥
उपक्रम करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत ।
उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥ ४ ॥
किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें ।
तुकयाबंधु म्हणे करावे । क्षेम अवघें येणें काळें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- प्रतापदिनकर-पराक्रमरूपी सूर्य, बंदशाळ-बंदिशाळा, तुरुंग.
'अर्थ :- देवा, या त्रिभुवनांत तू सर्व बलवानांचा बलवान आहेस, म्हणूनच मी तुझ्या पाठीमागे निघालो
आहे. आता माझ्या मनात जे असेल ते मी करीन. १ देवा, तू पराक्रमरूपी सूर्य आहेस, देवासुरांचा वेध आहेस,
महावीरांचा धनुर्धर वीर आहेस. अशा तुझ्यापुढे मी पामर काय ? २ तू कृपासिंधू आहेस, दीनवत्सल आहेस,
तू देवांची बंदीशाळा फोडलीस, राक्षसांचा संहार केलास आणि जे शरण आले त्यांना राज्यावर बसविलेस. ३ मला
खूप नये नये उपक्रम करावेसे वाटतात. परंतु तू धर्मनीती जाणणारा आहेस, उचित काय, अनुचित काय, हेही तू
जाणतोस. मी तुला शरण आलो आहे. तू आता माझे रक्षण कर. ४ मी आता तुला किती विनंती करावी ?
मी जीवाभावाने तुला शरण आलो आहे. तुकयाबंधू म्हणत आहे की, या वेळेस माझे सर्व कल्याणाचे असेल
ते करावे ५.
६७० देवा मी चांडाळ चांडाळ । म्हणतां लागताहे वेळ ।
नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥ १ ॥
जन्मा उपजल्यापासुनी । असत्य कर्म तें अझुनी ।
सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥ २ ॥
भक्ति दया अथवा कथा । कानीं न साहवे वार्ता ।
अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥ ३ ॥
काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर ।
यांचे तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥ ४ ॥
निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस ।
करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भक्षिलें ॥ ५ ॥
पाळिलें नाहीं पितृवचन । सदा परद्वारीं परधनीं ध्यान ।
बोलों नये घडलें ऐसें अन्योन्यविण । दासीगमन आदिकरूनी ॥ ६ ॥
कायामनें वाचाइंद्रीयांशीं । सकळ पापांचीच राशी ।
तुकयाबंधु म्हणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥ ७ ॥
३४० सार्थ तुकारामगाथा
उपकार करणे, हा गुण तर मला वैऱ्यासारखा वाटतो. ४ दुसऱ्याची निंदा, द्वेष, विश्वासघात वगैरे करताना मी
आळस केलेला नाही. जे करू नयेत ते दोष मी केलेले आहेत. संतांची थट्टा केली आहे. जे भक्षण करू नये ते
भक्षण केले आहे. ५ मी आईवडिलांची आज्ञा कधी मानलेली नाही, माझे चित्त नेहमी दुसऱ्याच्या द्रव्यावर व
दुसऱ्याच्या स्त्रीवर जडून राहिलेले होते. ज्या दोहोंच्या बाबतीत जे बोलू नये ते माझ्या हातून घडले आहेत.
दासीगमनासारखे दोषही माझेकडून झाले आहेत. ६ काया, वाचा, मन, इंद्रिये या सर्वांची मिळून मी पापांचीच
राशी आहे. तुकयाबंधू म्हणत आहे की, असे असतानाही, देवा, हृषीकेशी, मी तुम्हांस शरण आलो आहे. ७
६७१ काय काय करितों या मना। परी नाइके नारायणा ॥
करूं नये त्याची करी विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥ १ ॥
भलतिया सवे धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट ।
न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥ २ ॥
न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा ।
घाली उडी बळौंचि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥ ३ ॥
चेतवूनि इंद्रियें सफळ । आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ ।
दुराविती शुद्ध बुद्धि केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हैं ॥ ४ ॥
आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी ।
तुकयाबंधु म्हणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी झाली ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- संराट-बेफाटपणे, दरकुट-दरी, कुडें-खोटे, राळ-नाहीशी.
अर्थ - देवा, मी या मनाला वळण लावण्यासाठी काय काय उपाय करून पाहतो? पण नारायणा, ते काही
ऐकत नाही करू नये त्याची चिंता करीत बसते व मला पतनाकडे जलदीने नेते. १ भलत्याच्याच संगतीने ते बेफाटपणे
धावत असते ते वाट, आडवाट, दऱ्या, दरकुटे काही पाहात नाही. खोटे किंवा कपटी आहे, कुणी मोठा घात आरं-
भिला आहे, याचाही ते विचार करत नाही. २ याच्या भ्रमणाला दाही दिशा पुरत नाहीत. सात पाताळे व आकाश
यांत बळेच उडी घालून फासात अडकत असते. यामुळे मी या दोषाचा स्वामो झालो आहे. ३ या मनानेच माझी
सर्व इंद्रिये चाळविली आहेत आशा, तृष्णा, काम, क्रोध हे सर्व काळ असून यांच्यामुळे माझी सर्व शुद्धी नाहीशी
झाली आहे माझी बुद्धीही नाहीशी झाली आहे. असे हे माझे मन मोठे अनिवार व चांडाळ आहे. ४ आता याला
करावे तरी काय ? याच्यामुळे मला फार त्रास झाला. मी फार कासावीस झालो आहे. तुकयाबंधू म्हणत आहे, देवा
हृषीकेशी, तू धावून ये. माझी कशी अवस्था झाली आहे ते नीट पाहा. ५
६७२ अखंडक्षीराब्धी भरितें आलें । अध्यात्मविद्येचें भांडार उघडलें ।
सूर्यकोटीस तेज फांकलें । ध्यानीं प्रगटलें भक्तांचिया ॥ १ ॥
अनादि ब्रह्मज्ञानाचें गुज । श्रवणीं अवचित पडलें सहज ।
परमनिर्वाणाचें बीज । गुंडाळिले निजसर्वभाग्यें ॥ २ ॥
मंत्र महामंत्र मंगळनिधी । सत्संगदर्शन प्रगटलें आधीं ।
वैराग्यविवेकाची बुद्धी । नामामृतसिद्धी साधिले ते ॥ ३ ॥
क्षमादवाशांतीचें निजसुख । सच्चित्सुखें बोलला पुंडलीक ।
अनंतसुखाचा हारिख । उगवला देख पंढरीये ॥ ४ ॥
सार्थ तुकारामगाथा ३४१
नेणे भवभक्तीची निरपेक्षता । नेणे भूतदयेची ममता ।
तुका म्हणे पढरीनाया । सग साधुसता देई आता ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - हारिख-आनंद, हर्ष
अर्थ - अखंडपणे पसरलेल्या या क्षीरसागराला प्रेमाचे भरते आले व त्यामुळे प्रमकृपेचे, अध्यात्मविद्येचे
भाडार उघडले गेले या योगाने जणु कोटी सूर्याचे तेज फाकून राहिले व ते भरताच्या अंत करणातून प्रकट झाले १
ज्या बह्मज्ञानास प्रारभ नाही, अशाचे रहस्य आमच्या कानी यामुळे सहजच पडून परमानिर्वाणाचे बीजच हाती आल्या-
सारखे झाले स्वतःच्यासाठी सर्व भाग्याचा ठेवाच हस्तगत झाला २ सर्व मागल्याचा साठा असा हा मंत्र अथवा
महामंत्र सत्सगाच्या दर्शनाने प्रकट झाला धियेकवैराग्याची बुद्धी विकसित झाली एका नामानृताच्या सिद्धीने
हे सर्व साघले ३ दया, क्षमा, शाती यानी साधलेले हे निजसुख किंवा चित्सुख पुडलीकाच्या मुखातून प्रकट झाले
यामुळे र्पन्नत सुखाचा हर्ष या पंदरी क्षेत्रात निर्माण झाला आहे ४ भक्तोमध्ये निरपेक्ष कसे असावे, हे मला समजत
नाही भूतमात्राविषयी ममता कशी बाळगायी, हेही समजत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीनाया, यासाठी
तू साधुसताची सगत मात्र अखडपणे दे मला ५
६७३ क्षीराब्धिवासा शेषशयना । लीळाविग्रहा गोपिकारमणा ।
सगुणस्वरूप भक्तभूषणा । गुणनिधाना गुप्तरूपा ॥ १ ॥
अनत अवतार धरितिया । अखडस्वरूपा करुणालया ।
अमरपाळका देवराया । हरी भवभया भक्ताचिया ॥ २ ॥
सर्वव्यापका सर्वातीता । गजेंद्ररक्षका वैकुंठनाथा ।
भोळया भक्तासि सौख्यदाता । तुजविण सर्वथा असेचि ना ॥ ३ ॥
चित्तचाळका चैतन्यघना । भक्तकैवारी असुरमर्दना ।
भक्तअभिमानी नारायणा । जगज्जीवना पाडुरगा ॥ ४ ॥
ब्रह्मादिकाचा निजजनिता । सकळकारण अकर्ता ।
अणुरेणुव्याप्यभरिता । पावन पतिता तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - अनत-अनंत, भवभय-संसाराची भीती
अर्थ - क्षीरसागरात निवास करणाऱ्या देवा, शेषावर शयन करणाऱ्या नारायणा, अनेक लीला करून
गोपिकाचे मन हरण करणाऱ्या श्रीकृष्ण तू सगुण स्वरूपाचा असून भक्ताचे भूषण आहेस गुप्त रूपाने असलेल्या
अनेक गुणाचा साठा तुझ्या जवळ आहे १ तू अनेक अवतार धारण करतोस तुझे स्वरूप अखड असून तू करुणेचा
सागरच आहेस देवराया, तू प्रत्यक्ष देवाचाही साभाळ करतोस तू आता आम्हा भक्ताचे ससारभय दूर करावेंस २
तू सर्वव्यापक असून सर्वातीत आहेस गजेन्द्राचे रक्षण तूच केलेस वैकुंठनाथा, भोळया भक्ताना तू सुख देणारा
आहेस तुझ्याशिवाय दुसरे काही नाहीच ३ चैतन्याच्या मेघा, सर्वाच्या चित्ताचा चालकाही तूच आहेस तू
भक्ताचा कैवार घेतोस, असुराचा नाश करतोस नारायणा, तू भक्ताचा अभिमानी असून सर्व जगाचे जीवन तूच
आहेस ४ पाडुरगा, तू ब्रह्मादिकांनाही जन्म देणारा असून, सर्व कर्मे करणारा असूनही तू अकर्ता आहेस तू अणु
रेणूपासून सर्व त्रिभुवनात भरून राहिला आहेस तुकाराम महाराज म्हणतात, तू पतिताना पावन करणारा आहेस ५
६७४ अखडकर्मा कर्मप्रकाशका । मजसाठीं का रे जालासि मुका ।
धर्मा धर्मप्रतिपाळका । सर्वचाळका सर्वातीता ॥ १ ॥
न देखसी वर्णाश्रममर्यादा । त्याचा सर्वस्वे करिसी कामधंदा ।
कधीं न लाजसी तू गोविंदा । का रे मुकुदा बोल आता ॥ २ ॥
३४२ सार्थ तुकारामगाथा
मत्स्यकूर्मादि अवतारांसाठीं । श्रमले असतील जगजेठी ।
करितां घडमोड सृष्टी । जालासि कष्टी काय जाणें ॥ ३ ॥
किती म्यां विनवावें श्रीपती । पुन्हा पुन्हा यावें काकुलती ।
पुरे आतां तुझी संगती । करुणामूर्ती काय जालें ॥ ४ ॥
काय म्यां तुजसी करावें आतां । कां रे कोपलासी पंढरीनाथा ।
सकळ दुःख निवारिता । पावन पतिता तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- कामधंदा-कर्तव्य, घडमोड-घडामोड.
अर्थ :- अखंड कर्मात रममाण झालेल्या देवा, कर्माच्या प्रकाशा, सर्व कर्मात प्रकाशमान असणाऱ्या देवा,
माझ्या बाबतीतच तू मूक का झाला आहेस ? धर्माधर्माचे प्रतिपालन करणाऱ्या देवा, सर्व जगताचे बालपत्य
पत्करले असूनही तू सर्वातीत आहेस. १ तू वर्णाश्रम धर्माची मर्यादा पाहात नाहीस. या संबंधाचे सर्व कर्तव्यकर्म
तूच स्वतः करतोस. कोणतेही काम करायला तू कधी लाजत नाहीस. मुकुंदा, आताच का रे तू बोलत नाहीस ? २
मत्स्य, कूर्म, इत्यादी अवतार धारण करून तू दुष्ट शक्तींचा संहार केलास; त्यामुळे हे जगजेठी, तू फारच श्रमला
असशील या सर्व सृष्टीची अखंड घडामोड करीत असताना, तुला फार कष्ट झाले असतील. ३ श्रीपती, तुला मी
किती विनवावे रे ? तुझ्यापाशी पुनः पुनः किती काकुलतीस यावे ? तू प्रसन्न होत नाहीस असे पाहून वाटते की,
तुझी संगती आता पुरे झाली तू करूणेची मूर्ती असून मजबद्दलच तुला काय झाले रे ? ४ तुझ्यासाठी मी आता
करावे तरी काय ? पंढरीनाथा, तू एवढा रागावलास तरी का रे ? तुकाराम महाराज म्हणतात, तू सर्व दुःखे
निवारण करणारा आहेस ना ? तू पतितांना पावन करणारा आहेस ना ? ५
६७५ वासुदेवा दिनानाथा । कमललोचना श्रीअच्युता ।
निजभक्तांसि सौख्यदाता । तुजविण सर्वथा असेचि ना ॥ १ ॥
विठ्ठला अनंता विश्वपती । विराटस्वरूपा वामनमूर्ती ।
ब्रह्मादिकर्ता वैकुंठपती । अगम्यस्थिती वेदशास्त्रा ॥ २ ॥
अद्वैतअखंडभरिता । विश्वबाहु अपरिमिता ।
विश्वचक्षु विश्वदेवता । आदिपिता ब्रह्मयाचा ॥ ३ ॥
भक्ताधीना भवभयभंगा । परमपुरुषा पांडुरंगा ।
अनादि अखिलअंतरंगा । संगा असंगा वेगळाची ॥ ४ ॥
हें विराटस्वरूप भोळिया भक्तांसी । सर्वथा न फळे हृषीकेशी ।
सगुण रूप धरुनि त्यांसी । लावीं भजनासी तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- भवभयभंगा-संसारसागराचे दुःख दूर करणाऱ्या देवा.
अर्थ :- वासुदेवा, दीनांच्या नाथा, कमलाप्रमाणे डोळे असणाऱ्या देवा, अच्युता, तू स्वतःच्या भक्तांना
सौख्य देणारा आहेस. तुझ्याशिवाय असे सुख देणारा दुसरा कुणीही नाही. १ विठ्ठला, अनंता, तू विश्वाचा धनी
आहेस. तू विराट रूपाचा असूनही वामनमूर्ती आहेस. ब्रह्मादिकांनाही तूच निर्माण केले असून तूच वैकुंठाचा मालक
आहेस. वेदशास्त्रांनाही तुझी स्थिती कळून येण्यासारखी नाही. २ तू अद्वैत स्वरूपाचा असून सर्व विश्वात अखंड
रूपाने भरून राहिला आहेस. तू अपरिमित असल्याने तुझे मोजमापही करता येत नाही तुझे बाहू सर्व विश्वाला
कवटाळून आहेत. तू विश्वदेवता असल्याने व तू या विश्वाचा नेत्रच असल्याने तुला सर्व काही समजते. देवा, तूच
आदिपिता असून ब्रह्मदेवाचाही जनक तूच आहेस. ३ तू भक्तांच्या आधीन होतोस व त्यांच्या संसाराचे भय दूर
सार्थ तुकारामगाथा ३४३
करतोस. पांडुरंगा, तू परम पुरुष असून अनादी आहेस अखिल प्राणिमात्रांचे अंतरंग ओळखणारा तू असून संग व
असंग यांच्याहून तू वेगळाच आहेस. ४ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू सगुण रूप धारण करून त्यांना
भजनमार्गास लावतोस. ५
विवरण :- अभंग क्र ६०९ पासून सुरू झालेले नाटाचे ६३ अभंग; क्र. ६७१ च्या अभंगानंतर सारे म्हणजे
पूर्ण झाले. परंतु पुढील वरील अभंगापर्यतचे चार अभंगही नाटाचे अभंग म्हणूनच समजले गेले आहेत वरच्या तीन
अभंगातील नारायणास उद्देशून वापरण्यात आलेली विशेषणे व संबोधने लक्षपूर्वक समजावून घेण्यासारखी आहेत.
प्रत्येक विशेषणात व संबोधनात परमेश्वराचा एखादा विशेष गुण व त्याच्या कर्तृत्वाचे स्पष्ट दर्शन याचे महत्त्व
समजेल परमेश्वर निर्गुण, निराकार, सर्व विश्वात भरून राहिलेला असला तरी, आपल्या भोळ्या व भाविक भक्तां-
साठी तो सगुण झाला, अवतार धारण करणारा झाला, असंतो असून सर्व काही करणारा झाला; हा नेहमीचा विचार
येथे आहेच.
६७६ काय खावें आतां कोणीकडे जायें । गांवांत राहावें कोणत्या बळें ॥ १ ॥
कोपला पाटील गांवचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ २ ॥
आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥ ३ ॥
भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥ ४ ॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- चवी-रीत, सांडिली-सोडली.
अर्थ :- देवा, आता मी काय खावे ? मी कुणाच्या आश्रयास आता जावे ? कुणाच्या आधाराने या गावात
तरी राहावे ? १ या गावचा पाटील व इतर लोक आता मजवर रागावलेले आहेत. मला आता येथे भीक तरी
कोण घालणार ? २ सर्वजण मला उद्देशून म्हणतात की, याने आता रीतभात सोडून दिली आहे. याने सर्वांना
बुडविले आहे. सरकारात जाऊनच याचा निवाडा आता होण्यासारखा आहे. ३ मी चांगल्या लोकांना माझी ही
गोष्ट सांगून पाहिली. माझ्यासारख्या दुर्बळाचा घात या लोकांनी केला. ४ तुकाराम महाराज म्हणतात, यांची
संगत काही चांगली दिसत नाही. आता विठ्ठलालाच शोधीत जावयास हवे. ५
विवरण :- तुकोबाच्या ऐन तारुण्यात जी सकटपरंपरा कोसळली, त्या सुमाराच्या आपत्तीचे व मानसिक
चिंतेचे दर्शन घडविणारा हा अभंग आहे. सर्व लौकिक व्यवहाराची चव तुकोबानी सोडून दिली म्हणून आप्तवर्ग व
गावचे लोक आपणावर कसा गहजब करीत असत व त्यामुळे आपल्यासारख्या दुर्बलाचा घात कसा होतो याचे हृदय-
भेदक चित्र बुदानी येथे काढले आहे. याच्या संगतीपेक्षा सरळ घर सोडून जावे व विठ्ठलाच्या संगतीचे सुख भोगावे
असे बुदाना वाटत राहिले हाच एक अभंग पुनः गायेत क्र. १८४१ म्हणून 'आतां काय खावें कोणीकडे जावें' या
थोड्या शाब्दिक फरकाच्या ओळीने सुरु होणारा आलेला आहे.
६७७ संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥ १ ॥
संतांसी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन घेतो ॥ २ ॥
संतांसी देखोनि करितो ढवाळ्या । मायें धुतो चोळ्या दासीचिया ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ढवाळ्या-थट्टा, उपहास.
अर्थ :- हा मनुष्य कसा भ्रष्ट व मत्त झाला आहे पाहा. संतांनी एक चूळभर पाणी मागितले तर कधी
देणार नाही; हा पण दासीच्या अंघोळीसाठी मात्र पाणी भरून स्वतः ठेवितो. १ साधुसंत दाराशी दिसताच हा
३४४ सार्थ तुकारामगाथा
पाठमोरा होतो. परंतु, दासीच्या मुलास मात्र प्रेमभरानें चुंबन देतो. २ साधुसंत पाहताच हा त्यांची थट्टा करतो.
त्यांना हसतो; पण दासीच्या चोळघा मात्र प्रीतीने धूत असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा या अधम
माणसाच्या तोंडावर थुंकावे, हा मनुष्य यमलोकीचे दुर्भाग्य भोगायताच जातो. ४
६७८ एक प्रेमगुज ऐकें जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसें ॥ १ ॥
एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदें चरत होती वनीं ॥ २ ॥
अवचिता तेथें पारधी पावला । घेऊनियां आला श्वानें दोन्ही ॥ ३ ॥
एकीकडे त्याणें चिरिल्या वाघुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे ॥ ४ ॥
एकीकडे तेणें वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥ ५ ॥
चहूकंडोनियां मृगें वेढियेलीं । स्मरों तें लागलीं नाम तुझें ॥ ६ ॥
रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पायें आतां ॥ ७ ॥
कोण रखी आतां १ ऐसिये संकटीं । बापा जगजेठी तुजविण ॥ ८ ॥
आइकोनि तुम्ही तयांचीं वचनें । कृपाअंतःकरणें कळवळिलां ॥ ९ ॥
आज्ञा तये काळीं केली पर्जन्यासी । वेगीं पावकासी विझवावें ॥ १० ॥
ससें एक तेथें २ उठवुनी पळविलें । तया पाठीं गेलीं श्वानें दोन्ही ॥ ११ ॥
मृगें चमकौनी सत्वर चाललीं । गोविंदें रक्षिलीं म्हणोनियां ॥ १२ ॥
ऐसा तूं कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भक्तांसी जीवलग ॥ १३ ॥
ऐसी तुझी कीर्ती जीवीं आवडती । रखुमाईच्या पती तुका म्हणे ॥ १४ ॥
शब्दार्थ व टीपा - चिरिल्या-लावल्या, वाघुऱ्या-जाळी, वोणवा-अग्नी
अर्थ :- देवा, जगजेठी विठ्ठला, प्रेमाच्या हितगुजाची एक गोष्ट सांगतो ऐकतोस का ? सहज आठवली
म्हणून सांगतो. १ एक गरीब हरीण आपल्या दोन पाडसांसहित एका वनात मोठ्या आनंदाने चरत होते. २
तो अवचितपणे एक पारधी तेथे आला. त्याच्याजवळ शिकार करणारे भले मोठे दोन कुत्रे होते. ३ त्या पारध्याने
एका बाजूस त्या मृगांना पकडण्यासाठी जाळी लावली व दुसऱ्या बाजूस शिकारी कुत्र्यांना ठेविले ४ तिसऱ्या
बाजूस त्याने भला मोठा वणवा पेटवून तोही मार्ग बंद करून टाकला आणि उरलेल्या चौथ्या दिशेस तो पारधी
स्वतः शिकार टिपण्याच्या उद्देशाने उभा राहिला. ५ देवा, असे ते हरीण आपल्या लहान पाडसांबरोबर चारी
बाजूंनी संकटांनी वेढले गेले. त्यावेळी त्यांनी मनोभावे तुझे स्मरण केले ६ त्यांनी मोठ्या कळवळ्याने म्हटले,
"रामा, कृष्णा, श्रीहरी, गोविंदा, केशवा, देवाच्या देवा, आता तुम्हीच आमचे रक्षण करावे. ७ बापा जगजेठी,
विठ्ठला, आता या संकटप्रसंगी तुझ्यावाचून दुसरे कोण आमचे रक्षण करणार?" ८ या हरणाचे हे आर्त शब्द
ऐकून देवा तुमचे अंत करण कळवळून गेले ९ मग तुम्ही त्या वेळी पर्जन्यास आज्ञा करून पाऊस पाडला व एका
दिशेचा अग्नी विझवून टाकला १० दुसऱ्या एका दिशेकडून एक ससा निर्माण करून त्याच्या पाठीमागे ते दोन
कुत्रे घालवून दिले. ११ तुझ्या या अघटित लीलेने चमकून ही मृगे आनंदित होऊन या गोविंदाने आपले रक्षण
केले, असे म्हणून ती सुखरूपपणे तेथून निसटली. १२ असा देवा, तू अतिशय कृपाळू आहेस. आपल्या जिवलग
भक्तांवर अशीच कृपा तू करीत असतोस ! १३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी ही तुझी कीर्ती माझ्या
जीवास फार आवडते, रखुमाईच्या पती, माझेही रक्षण करा. १४
विवरण :- भक्तीचे माहात्म्य वाढविण्यासाठी, ईश्वर लहान, गरीब, दीन प्राण्याचे रक्षण संकटकाळी कसे
करतो, हे दाखविण्यासाठी अनेक प्रसंगी तुकाराम महाराजांनी पुराणातील दाखले दिले आहेत. त्याचप्रमाणे प्राण्यांच्या,
पक्ष्यांच्याही कल्पित कथा, कधी पुराणाचा आधार घेऊनही दिलेल्या आहेत. मागे अभंग ६०७ मध्ये वृक्षावर
१ आम्हा, २ उठोनि चालिले.
सार्थ तुकारामगाथा ३४५
असणाऱ्या पक्ष्याची करुणरम्य कथा बुवांनी सांगितलेली आपण पाहिली आहे. आता येथे पारध्याच्या तावडीत चहू
बाजूंनी सापडलेल्या एका हरिणाची व त्याच्या गोजिरवाण्या शावकाची तितकीच करुण कहाणी अत्यंत संक्षेपाने बुवांनी
येथे निवेदन केली आहे. शिकारी श्वान, स्वतः पारधी, जाळी व वणवा या चहूबाजूंन्या संकटातूनही ईश्वर कसे रक्षण
करितो, याचा एक समर्थ दिलासा भाविकांना तुकारामबुवांनी दिलेला आहे.
६७९ आशाबद्ध वक्ता । धाक१ श्रोतयाच्या चित्ता ॥ १ ॥
वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ २ ॥
बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥ ३ ॥
माप तैसी गोणी । तुका म्हणे रितीं दोन्ही ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- धाक-धास्ती, भीती, गोणी-धान्याचे ओझे
अर्थ:- ब्रह्मज्ञान किंवा परमार्थनिरूपण करणारा वक्ता जर आशाबद्ध असेल, त्याला जर लौकिकाची
आशा असेल, अथवा श्रोत्यांच्याकडून आपणांस काही मिळावे, असा जर त्याला लोभ असेल, तर त्याचे निरूपण
ऐकणाऱ्याच्या चित्तास धास्तीच वाटते १ त्याचे भजन व त्याचे निरूपण यामुळे वायाच जाते. कारण या ठिकाणी
सर्वांचेच मन लोभात गुंतलेले असते. २ एक वक्ताच बहिर्मुख असल्यामुळे तो व त्याचे श्रोते दोघांचीही गती
तशीच होते. ३ धान्याच्या गोणीत, ओझ्यात जे असेल तेच मापात येणार ना ? तुकाराम महाराज म्हणतात, दोनही
वस्तु रिकाम्याच असल्यावर मग उपयोग काय ? ४
६८० विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥ १ ॥
विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ २ ॥
विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥ ३ ॥
विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥ ४ ॥
विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सोस घेतला जीवें ॥ ५ ॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये२ कां झडकरी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा:- कोड-हौस, सोस-ध्यास
अर्थ- विठ्ठला, तू उदाराचा राजा आहेस रे. या सर्व जगाचा प्राण आहेस. १ सर्व उदारांची तू रास
असून तुझ्यापाशी सर्व प्रकारच्या सिद्धी असतात. २ विठ्ठला, तुझे नाव अतिशय गोड असून तू भक्तांची सर्व हौस
पूर्ण करतोस. ३ विठ्ठला, तुझे श्रीमुख फारच शोभायंत व चांगले असून त्याच्या ध्यानात माझे चित्त गुंतून गेले
आहे. ४ विठ्ठला, या माझ्या वाचेने तुझेच नाम निरनिराळ्या रसांत घेतले आहे. विठ्ठला, तुमचाच ध्यास या
माझ्या जीवाने एकसारखा घेतला आहे. ५ विठ्ठला, हा तुका तुझ्यासाठी शोक करीत असल्याने तू लवकर येऊन
माझे रक्षण का करीत नाहीस ? ६
६८१ बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटाळिलों ॥ १ ॥
एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ २ ॥
जालीं दोनी नामें एकाचि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालों ॥ ३ ॥
तुका म्हणे दाखविल्या मुक्ताफळां । शिपलेचि स्वस्थळीं खुंटलिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वेटाळिलों-गुंतलो होतो
अर्थ :- या बाह्य संसारात मी गुंतून गेलो होतो. पण मी आपल्या कर्तव्याच्या जोरावर सुखरूपपणे
बाहेर पडलो. १ आता पुन: संसारात गुंतणार नाही. ताकातून एकदा लोणी बाहेर काढले की, ते परत काही
१ भय, २ येगा.
तु. गा...४४
३४६ सार्थ तुकारामगाथा
त्याच्यात मिसळत नाही. तशी माझी अवस्था झाली आहे. २ ताक व लोणी ही दोन्ही नावे एकाच मंथनातून
झाली, किंवा सार व असार असा भेदही एकाच्याचमुळे झाला असला, तरी वरवरच्या गुणांमुळे दोन वेगळी दिसतात. ३
तुकाराम महाराज म्हणतात, शिंपल्यातून एकदा मोती वेगळे काढून दाखविल्यावर मग शिंपला जरी जन्मठिकाण
असला तरी तो मोती काही त्याच्याशी पहिल्यासारखा जडला जात नाही. तसे संसाराशी माझे नाते पुनः काही
जडणार नाही. ४
६८२ वरवा वरवा वरवा रे देवा तूं । जीवाहूनि आवडसी जीवा रे देवा तूं ॥ १ ॥
पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ २ ॥
अष्ट अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वर्णितां लक्षण रे देवा ॥ ३ ॥
मन जालें उन्मन अनुपम ग्रहण¹ । तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वरवा-चांगला, तनु-शरीर, अनुपम-दुसरी तुलना नसलेले.
अर्थ :- देवा, तू फारच चांगला आहेस रे. म्हणूनच तू आम्हांस आमच्या जीवापेक्षाही आवडतोस. १
तुझे शोभिवंत मुख पाहताच आमचे डोळे तृप्त होतात. तुझे गुण ऐकून कान संतुष्ट होतात. २ तुला पाहताच,
तुझी सर्व लक्षणे वर्णन करू लागताच देवा, माझ्या अष्टांगातील ताप व मनाचा शीण नाहीसा होतो ३ तुझ्या या
अतुलनीय रूपलावण्याची शोभा पाहून माझे मन उन्मन होऊन गेले आहे. तुकयाबंधू म्हणत आहे, देवा, तुझा महिमा
काही ध्यानात येण्यासारखा नाही. ४
६८३ सोइरियासि करी पाहुणेरु बरा । काढितो ठोंवरा संतांलागीं ॥ १ ॥
गाईसि देखोनि बदबदा मारी । घोड्याची चाकरी गोड लागे ॥ २ ॥
पानफुल वेश्येसी नेलसे उदंड । देखों² नेदी खांड ब्राह्मणासी ॥ ३ ॥
बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । माता पितियासी दवडितो ॥ ४ ॥
तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावाया ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- पाहुणेरु-पाहुणचार, ठोंवरा-बडगा.
अर्थ :- हा अधम मनुष्य पाहा कसा आहे चांगले श्रीमंत नातेवाईक आले की, त्यांना मनापासून पाहुणचार
करितो, व दारात साधुसंत पाहताच त्यांच्या पाठीमागे बडगा घेऊन लागतो. १ गरीब बिचारी पवित्र गाय पाहताच
तिला एकसारखा मारीत बसतो, पण धन्याच्या घोड्याची मात्र मनापासून सेवा करीत असतो. २ वेश्येला मात्र
कौतुकाने व प्रीतीने पानफूल देऊन तिचे गुणगान हा करतो; पण ब्राह्मणाला मात्र फुटके सुपारीचे खांडही कधी
याच्या हातून मिळणार नाही. ३ प्रिय असणाऱ्या बायकोच्या नातेवाईकांना हा मोठ्या आवडीने पोशीत असतो;
पण स्वतःच्या आईबापांचा मात्र याने त्याग केलेला असतो. ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांच्या
तोंडावर थुंकून त्याचा धिक्कार करावा. यमलोकीचे भोग भोगायलाच तो गेलेला असतो ५
विवरण :-केवळ संसारावर आसक्त होऊन बेताल बनलेल्या माणसाची जशी चित्रे तुकानी अनेक काढली
आहेत त्याचा कडक शब्दात निषेधही केलेला आहे त्यानी हाच अभंग पुढे क्र १८४९ व ४२९६ म्हणून थोडयाफार
ओळीच्या फरकानी पुन आलेला आहे
६८४ सोलीय जें सुख अतिसुखाहुनि । उमें हें³ अंगणीं वैष्णवांच्या ॥ १ ॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ २ ॥
भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥ ३ ॥
१ अनुपम्प गहन, २ देखो, ३ तें.
सार्थ तुकारामगाथा ३४७
नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥ ४ ॥
तुका म्हणे मोक्ष भक्तांचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- सोलीव- अस्सल, गाभ्यातील.
अर्थ :- गाभ्यामधील असल्याप्रमाणे अस्सल सुखाचा जो भाग अति सुखाहूनही मोठा असून तो वैष्णवाच्या
अंगणांत उभा आहे. १ या वैष्णवांच्या अंगणांत तुळशीवृंदावन असून सडासंमार्जन केले आहे. नाना प्रकारांच्या
सुंदर रांगोळ्या काढून चौक भरले आहेत. हा सर्व थाट पाहून देव मोठ्या आनंदाने येथे नाचतो. २ हा विष्णु-
भक्त नेहमींच मुद्रा व गळ्यात तुळशीची माळ या अलंकारांनी सुशोभित झालेला असतो. ३ अमृताचे सार असे
असणारा नामाचा ओघ त्याच्या मुखात असतो व देवाच्या पायांवरील धूलिकणानी याचे मस्तक सहजच पवित्र
झालेले असते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या मनांत मोक्षाची चुकून देखील इच्छा नसते उलट मोक्षच
यांची इच्छा करीत असतो. ५
६८५ तीर्थे केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥ १ ॥
जळो त्याचें ज्यालेंपण । न देखेचि समचरण ॥ २ ॥
योग याग अनंत केले । नाही समचरण देखिले ॥ ३ ॥
तुका म्हणे विठ्ठलपायीं । अनंत तीर्थे घडलीं पाहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- ज्यालेंपण-जन्म, जगण्याची स्थिति.
अर्थ :- कुणी कोट्यवधी तीर्थयात्रा केल्या, पण पंढरपूर मात्र पाहिले नाही, १ तर त्याच्या जगण्याला आग
लागो. काय त्याचा उपयोग ? कारण त्याने विटेवर उभ्या असलेल्या श्रीविठ्ठलाचे समचरण पाहिलेले नसतात. २
पुष्कळ यज्ञयाग केले आणि पांडुरंगाचे समचरण पाहिले नाहीत, तर काय त्यांचा उपयोग ? ३ तुकाराम महाराज
म्हणतात, एका विठ्ठलाच्या चरणांच्या दर्शनाने अनंत तीर्थयात्रा केल्याचे सार्थक आहे ४
६८६ कोणतें कारण राहिलें यामुळे । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥ १ ॥
नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ २ ॥
नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ॥ ३ ॥
हें तौं तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक' वरी साच भाव ॥ ४ ॥
तुका म्हणे देवा नासियंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- लाखणीक-लबाडी.
अर्थ :- देवा, असे कोणते कारण उरले आहे की, ज्यामुळे मी तुला मुद्दाम बळेच कष्ट द्यावेत ? १ माझा
काही जीव जात नव्हता, की कसली हानीही होत नव्हती हे सहज मनात आठवले इतकेच. २ मला कसलीही
चिंता नव्हती, की मी काही उपाशी मरत नव्हतो; किंवा गाई म्हशी याची प्राप्ती व्हावी असेही मला वाटत नव्हते. ३
देवा, हे तर सर्व तुला तुझ्या मनात ठाऊक आहेच. माझ्या मनात खरा भाव आहे, की सर्व लबाडीच आहे हे तुला
समजते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व गोष्टी नाशवंत असून त्यांच्या पायी तुझ्या पायाची ताटातूट
व्हावी हे ठीक नव्हे. ५
३५० सार्थ तुकारामगाथा
६९४ माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥ १ ॥
देवा अभिमान नको । माझे ठायीं येऊं सको ॥ २ ॥
देशीं चाले सिका । रितें कोण लेखी रका ॥ ३ ॥
हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मवितें-मोजते, धणी-मालक.
अर्थ - धान्याचे माप उगाचच म्हणत असते की, मी धान्य मोजते, पण खरी गोष्ट अशी आहे की, मोजणारा
जो मालक आहे तोच ते माप भरीत असतो व रिकामे करीत असतो १ देवा, माझ्या ठिकाणी असला अभिमान
नको २ ज्या नाण्यावर राजाचा शिक्का आहे, तेच त्या देशात चालते शिक्क्याशिवाय असणाऱ्या गरिबाच्या
नाण्याला कोण विचारणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हातात सत्तेचे सूत्र आहे, त्याचीच थोरवी
जिकडे तिकडे असते. ४
६९५ कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥ १ ॥
मेलें वाऱ्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ २ ॥
कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥ ३ ॥
तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसले भय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - निरसले-संपले.
अर्थ :- माझ्या या विठ्ठलाचे वैभव देशोदेशी सांगण्यासाठी कोण उपदेश करायला गेले होते ? १ माझा
मायबाप जो विठ्ठल, त्याच्याच कृपेने वाऱ्याबरोबरच त्याचे नाम सर्व देशभर पसरून राहिले २ माझी वाणी हा
उपदेश करीत आहे, तो तरी कुणाच्या सत्तेवर ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच निश्चयामुळे माझे भय दूर
झाले आहे. ४
६९६ सकळिकांच्या पाया माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥ १ ॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । वरे पारखून बांधा गाठी ॥ २ ॥
फोडिलें भाडार धन्याचा हा माल । मी तव हामाल भारवाही ॥ ३ ॥
तुका म्हणे चाली जाली चहूँ देशीं । उतरला कसीं खरा माल ॥ ४ ॥
आपुलेंचि मन । करवी आपणां बंधन ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । तुम्ही कोडीं हीं उगवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- झाकुळिलें-झाकून टाकले, उगवा-सोडवा.
अर्थ :- सर्व विश्वात भरून टाकणारी जी माया, तिने छायेप्रमाणे सर्व जगाला झाकून टाकले आहे. १
त्यामुळे जगातील सत्य वस्तूचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. अविद्येचे अथवा मिथ्या वस्तूचे महत्त्व मात्र एकसारखे वाढत
आहे २ आपलेच मन आपल्याला या संसारबंधनात जखडून टाकीत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा,
या मिथ्या मायेची कोडी तुम्हीच सोडवा. ४
६९१ पोटीं जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥ १ ॥
रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥ २ ॥
तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - आप्तवर्ग-जवळचे नातेवाईक
अर्थ :- आपल्या पोटात अनेक रोगांचा जन्म झाला; म्हणून काय त्यांना आपण आपल्या मुलाप्रमाणे,
आप्तवर्गाप्रमाणे मानतो की काय ? १ रानात पुष्कळ वनस्पती औषधाच्या असतात; म्हणून काय त्या निष्फळ
झाल्या ? २ आपल्या शरीराचे व आपले नाते तसेच असते. तेवढाच त्याच्या क्रियाचा व आपल्या नात्याचा संबंध
असतो. ३
६९२ नव्हे शब्द एक देशी । सांडी गद्यशी कोणाला ॥ १ ॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ २ ॥
मोकलिलें जावें बागें । भाता जेणें वाईलें ॥ ३ ॥
आतां येयें कैंचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥ ४ ॥
३४८ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा :- मिलटीधिया-भिल्लीणीच्या.
अर्थ - अयोध्येच्या राजा, अरे रामराया, दीनानाथा, सख्या, १ तू माझे पाप, ताप व विघ्न दूर कर.
दीनानाथा, मला सुखी कर. २ त्या भिल्लोणीची उष्टी बोरे खाऊनही तू भ्रष्ट झाला नाहीस. ३ मग मी तर
तुझ्याशी प्रेमाने सलगी करणारे एक मूल आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू मोठ्या सखोल अंतःकरणाचा
आहेस. ४
६८८ आमिषाचिये आसे गळ गिळी मासा । फुटोनिया घसा मरण पावे ॥ १ ॥
मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥ २ ॥
अंतकाळीं ज्याच्या नाम आले मुखा । तुका म्हणे सुखा पार नाही ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- आसे-आशेने
अर्थ - मासे पकडणारे लोक आपल्या गळाला काही आमिष लावून गळ पाण्यात सोडतात त्या खाद्य
पदार्थाच्या मिषाने मासे तो गळ गिळण्याचा प्रयत्न करतात व घसा फुटून मरण पावतात १ मरणाच्या वेळी तो
तळमळ करीत असल्याने त्यास देवाची आठवण होते. २ तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाळी का होईना, पण
ज्याच्या मुखात ईश्वराचे नाव येते, त्याच्या सुखाला अंत असत नाही ३
विवरण - अंतकाळी आपण परमेश्वराचे स्मरण केले तर, आपणास याची प्राप्ती होईल, हा विचार सर्वच
साधुसंतानी सांगितला आहे. भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायातील पाचव्या श्लोकात 'अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा
कलेवरम् । य प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय ' जो अंतकाळी माझेच स्मरण करतो व देह सोडतो तो
माझ्या स्वरूपाला येऊन पोचतो, असे आश्वासन माणसांस स्वतः भगवंतानेच दिलेले आहे येथे एक सावधपणाची
सूचना अशी की, जन्मभर वाटेल ती कर्मे करून शेवटी मात्र परमेश्वराचे चिंतन केल्याने सर्व साधेल, अशी कल्पना
येथे नाही अंतकाळी तरी परमेश्वराचे चिंतन का घडते ? तर जन्मभर त्याच्याच स्वरूपचिंतनात रंगून जाण्याची
सवय असते म्हणून म्हणूनच गीतेच्या या श्लोकापुढील श्लोकातच नेहमी भगवंतास स्मरून वर्तन करण्याची सूचना
दिलेली आहे कारण जन्मभर ज्याचे ध्यान तोच अंत काळीही स्मरणात येणार यासाठी परमेश्वराचे स्मरण अखंड-
पणे नेहमीच हवे 'तेंवि जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तैंचि मरणाचिये मेरे । फार हों लाये ॥ आणि
मरणीं ज्या जें आठवे । तो तेचि गतीते पावे । म्हणोनि सदां स्मरावे । मातेंचि तुवां' या ज्ञानेश्वराच्या उक्तीमधील
'सदा स्मरावे' यातील भावार्थ स्पष्ट आहे
६८९ तुजवरी ज्याचे मन । दरुशन दे त्याचें ॥ १ ॥
कैसा जाती शुद्ध भाव । हात पाय ना वृत्ती ॥ २ ॥
अवघियाचा करुनि मेळा । तुज डोळा रोखिले ॥ ३ ॥
तुका म्हणे तुज आट । लपोनि कोड दावीं देवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दरुशन-दर्शन
अर्थ :- देवा, ज्याच्यावर तुझे प्रेम आहे, त्याचे तरी दर्शन मला दे ना. १ त्याची जात कशी शुद्ध आहे,
त्याचा भावही कसा शुद्ध आहे, त्याच्या हातापायाचे व्यापार स्वतंत्र राहिलेले नाहीत, हे तरी मला पाहू दे ना. २
सर्व इंद्रियांचा एक मेळ करून ज्यांनी आपले डोळे तुमच्यावरच लाविले आहेत, ३ त्याचे कौतुकाने दर्शन मला द्या,
देवा, मी तुमच्या आड उभा राहीन व ते सर्व पाहीन ४
६९० विश्वव्यापी माया । तिणे झाकुळिलें छाया ॥ १ ॥
सत्य गेलें भोळथावरी अविद्येची चाली थोरी ॥ २ ॥
आपुलेंचि मन । करवी आपणां बंधन ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । तुम्ही फोडीं हीं उगवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- झाफुळिलें-झाकून टाकले, उगवा-सोडवा.
अर्थ :- सर्व विश्वात भरून टाकणारी जी माया, तिने छायेप्रमाणे सर्व जगाला झाकून टाकले आहे. १
त्यामुळे जगातील सत्य वस्तूचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. अविद्येचे अथवा मिथ्या वस्तूचे महत्त्व मात्र एकसारखे वाढत
आहे २ आपलेच मन आपल्याला या संसारबंधनात जखडून टाकीत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा,
या मिथ्या मायेची कोडी तुम्हीच सोडवा. ४
६९१ पोटों जन्मती रोग । तरि कां म्हणावे आप्तवर्ग ॥ १ ॥
रानीं वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी ॥ २ ॥
तैसें शरीराचें नातें । तुका म्हणे सर्व आप्तें ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- आप्तवर्ग-जवळचे नातेवाईक.
अर्थ :- आपल्या पोटात अनेक रोगाचा जन्म झाला; म्हणून काय त्यांना आपण आपल्या मुलांप्रमाणे,
आप्तवर्गाप्रमाणे मानतो की काय ? १ रानात पुष्कळ वनस्पती औषधाच्या असतात; म्हणून काय त्या निष्फळ
झाल्या ? २ आपल्या शरीराचे व आपले नाते तसेच असते. तेवढाच त्याच्या क्रियाचा व आपल्या नात्याचा संबंध
असतो. ३
६९२ नव्हे शब्द एक देशी । सांडी गविशी कोणाला ॥ १ ॥
जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ २ ॥
मोकलिलें जावें बाणें । भाता जेणें वाहिलें ॥ ३ ॥
आतां येथें केंचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गविशी-सापडून देणारा, सिका-शिक्का.
अर्थ :- एकाच अर्थाला सोडून देणारा किंवा सापडून देणारा असा माझा शब्द एकदेशी नाही. १ खरे
म्हणजे माझी वाणी सर्वव्यापक असून विश्वंभरासही भरून राहिली आहे. २ ज्याने बाणांचा भाता खांदयावर
वागविला आहे, त्याच्याकडून सुटलेले बाण हवे तिकडे जाऊ शकतात. ३ आता येथे नुसत्या तुकारामाचे बोल तुम्ही
समजू नयेत. त्यावर स्वामीचा, पांडुरंगाचा शिक्का मारल्यामुळे ते माझे आहेत असे नाही. ४
६९३ गायनाचे रंगीं । शक्ति अद्भुत हे अंगीं ॥ १ ॥
हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ २ ॥
अंगीं प्रेमाचें भरतें¹ । नाहीं उतार चढतें ॥ ३ ॥
तुका म्हणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- खाणी-खाण.
अर्थ :- देवा, तुझे गुणगान ज्यात आहे, असे संगीत गायन फार श्रेष्ठ असते. त्याच्या रंगात अद्भुत शक्तीचा
निवास असतो. १ आणि देवा, हे तर तुमचेच देणे असल्यामुळे अशी सेवा तुम्ही आमच्याकडून नेहमी घ्यावी. २
ज्या सेवेत प्रभू प्रेमाचे भरते असते, त्यात कधी चढउतार असू शकत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरीचे
चिंतन करणारी ही वाणी, संगीतवाणी अमृताची मोठी खाणच होय. ४
१ भाते.
३५० • सार्थ तुकारामगाथा
६९४ माप म्हणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥ १ ॥
देवा अभिमान नको । माझे ठायीं देऊं सको ॥ २ ॥
देशीं चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥ ३ ॥
हातीं सूत्रदोरी । तुका म्हणे त्याची थोरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- मवितें-मोजने, धणी-मालक.
अर्थ - धान्याचे माप उगाचच म्हणत असते की, मी धान्य मोजते; पण खरी गोष्ट अशी आहे की, मोजणारा
जो मालक आहे तोच ते माप भरीव असतो व रिकामे करीत असतो. १ देवा, माझ्या ठिकाणी असला अभिमान
नको २ ज्या नाण्यावर राजाचा शिक्का आहे, तेच त्या देशात चालते शिक्याशिवाय असणाऱ्या खोट्याख्या
नाण्याला कोण विचारणार ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या हातात सत्तेचे सूत्र आहे, त्याचीच थोरवी
जिकडे तिकडे असते. ४
६९५ कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥ १ ॥
नेलें वाऱ्या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ २ ॥
कोणाची हे सत्ता । जाली वाचा वदविता ॥ ३ ॥
तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसले भय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- निरसले-सपले.
अर्थ :- माझ्या या विठ्ठलाचे वैभव देशोदेशी सांगण्यासाठी कोण उपदेश करायला गेले होते ? १ माझा
मायबाप जो विठ्ठल, त्याच्याच कृपेने वाऱ्याबरोबरच त्याचे नाम सर्व देशभर पसरून राहिले २ माझी वाणी हा
उपदेश करीत आहे, तो तरी कुणाच्या सत्तेवर ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच निश्चयामुळे माझे भय दूर
झाले आहे. ४
६९६ सकळिकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥ १ ॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । घरें पारखुन बाधा गांठी ॥ २ ॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥ ३ ॥
तुका म्हणे चाली जाली चहूं देशीं । उतरला कसीं खरा माल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- चाली-चलती
अर्थ - सगळ्यांच्या पायाशी माझीही एक विनंती मस्तक चरणावर ठेवून करीत आहे १ अहो श्रोतेहो,
व वक्त्यांनो, सर्व लोकहो, कोणतीही गोष्ट नीट पारखून घ्या व आपल्या संग्रही ठेवा २ मी परमार्थविचाराचे
हे भांडार खुले केले आहे, पण हा सर्व माल त्या परमेश्वराचा असून मी फक्त ओझे वाहणारा हमाल आहे ३
तुकाराम महाराज म्हणतात, या मालाची चांगली चलती झाल्यामुळे, याची प्रसिद्धी चारी देशांना होऊन हा ईश्वराच्या
नामरूपाचा माल चांगला कसांत उतरला आहे ४
विवरण :-तुकाराम महाराजांचा हा एक अतिशय प्रसिद्ध अभंग असून, त्यांतील मी देवाचा केवळ भारवाही
हमाल आहे, हे परमार्थविचाराचे धन त्याचेच असून मी फक्त भांडार चालविणारा सेवक आहे, ही भावना त्यांच्या
इतर अभंगांतूनही प्रकट झाली आहे तुकोबा स्वत वाण्याचा व्यवसाय करीत असल्यामुळे भांडार फोडणे, माल वाहून
नेणे, तो कसांस उतरणे, या शब्दप्रयोगाची त्यांना चांगलीच अनुभूती आहे ईश्वराच्या घरचे, श्रेष्ठ तत्त्वाचे भांडार
आपल्या हाती आले, याचा सार्थ अभिमान कधी कधी त्यांनी प्रकट केला आहे 'भांडाराची किल्ली माझे हातीं आहे।
पाहिजे तो वाग तेथें' असे बुवानी आणखी एका ठिकाणी म्हटले आहे
सार्थ तुकारामगाथा ३५१
६९७ कोण त्याचा पार पायला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥ १ ॥
अणुरेणु सूक्ष्मस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्याही खुंटलिया ॥ २ ॥
फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तद्वरास अनेक किती ॥ ३ ॥
दाविलें अनंतें अर्जुनासि पोटां । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥ ४ ॥
तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- पार-अंत, सीमा.
अर्थ :- या विश्वात भरून राहिलेल्या विश्वंभराचा अंत कुणासही लागण्यासारखा नाही. कितीही त्याचा
शोध घेतला तरी त्याचा ठाव सापडत नाही. १ तो अणुरेणूइतका सूक्ष्म असून त्याच्या विस्तारलेल्या स्थूलपणास
तर सीमाच नाही. वेदश्रुतीही त्याचा शोध घेता घेता, 'नेति नेति...असा नाही, असा नाही' म्हणून खुंटल्या आहेत. २
हे विश्व तरी केवढे आहे ? फळातल्या कीटकास वाटते, फळाएवढेच सीमित आकाश. पण अशी फळे त्या झाडास
कितीतरी असतात. झाडे कितीतरी असतात आणि किडेही कितीतरी असतात. ३ या विश्वात पसारा केवढा असतो,
हे त्या श्रीकृष्णानें अर्जुनास दाखवून आपल्या पोटात अनेक सृष्टी, अनेक कृष्ण, अनेक लोक याचे स्थान कसे आहे हे
स्पष्ट केले. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हांस जर या अनंत विश्वाचा अर्थ समजावून घ्यायचा असेल तर
संतांची संगत धरा. त्याचा आश्रय घ्याल तरच तुमचा जीव वाचेल. ५
६९८ जें जें कांहीं करितों देवा । तें तें सेवा समर्पे ॥ १ ॥
भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ २ ॥
आम्ही दुजें नेणों कोणा । हेंचि मना मन साक्ष ॥ ३ ॥
तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सर्वात्मना-सर्वांच्या मनांत असणाऱ्या.
अर्थ :- देवा, मी जे जे काही करीत आहे, ते ते सर्व तुमच्या सेवेसाठी समर्पित करीन. १ नारायणा, आता
तुमच्या-माझ्यात भेद नाही. देवा, तुझाच वास सर्वांच्या मनांत असतो ना ? २ देवा, तुम्हाशिवाय आम्ही दुसऱ्या
कुणासच जाणीत नाही. हीच साक्ष आमची आमच्या मनास आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जगन्नाथा, मी
जे हे सर्व म्हणत आहे ते काही व्यर्थ नाही. ४
६९९ स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥ १ ॥
परी हे वंखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ २ ॥
रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रह्मांडें हीं ॥ ३ ॥
तुका म्हणे तूं ऐसा एक साचा । ऐसी संध वाचा जाली नाहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वंखरी-वाणी, साचा-खरोखर.
अर्थ :- देवा, तुमची स्तुती करायला जावे तर ती समर्थ अशा वेदाकडूनही होऊ शकत नाही. अशा
परिस्थितीत माझे काय विचारावे ? १ पण ही माझी वाणी देवा, तुमच्या सुखासाठी व नामाच्या गोडीने गोडावलेली
आहे. माझी जिव्हा तुमच्या नामामृताच्या रसाचीच इच्छा करीत आहे. २ देवा, तुमचे रूपवर्णन करण्यास पुरेल
एवढी तरी मला बुद्धी आहे कुठे? कारण आपल्या स्वरूपाच्या एका केसाच्या अग्रावर हजारो ब्रह्मांडांची घडामोडी
होत असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा या अचाट स्वरूपाचा तूच एक खरोखर आहेस, असे वर्णन
तर आजपर्यंत कुणीही केलेले नाही. ४
७०० तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥ १ ॥
सहस्रमुखें शेष शिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ २ ॥