सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 377, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३४३
करतोस. पांडुरंगा, तू परम पुरुष असून अनादी आहेस अखिल प्राणिमात्रांचे अंतरंग ओळखणारा तू असून संग व
असंग यांच्याहून तू वेगळाच आहेस. ४ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू सगुण रूप धारण करून त्यांना
भजनमार्गास लावतोस. ५
विवरण :- अभंग क्र ६०९ पासून सुरू झालेले नाटाचे ६३ अभंग; क्र. ६७१ च्या अभंगानंतर सारे म्हणजे
पूर्ण झाले. परंतु पुढील वरील अभंगापर्यतचे चार अभंगही नाटाचे अभंग म्हणूनच समजले गेले आहेत वरच्या तीन
अभंगातील नारायणास उद्देशून वापरण्यात आलेली विशेषणे व संबोधने लक्षपूर्वक समजावून घेण्यासारखी आहेत.
प्रत्येक विशेषणात व संबोधनात परमेश्वराचा एखादा विशेष गुण व त्याच्या कर्तृत्वाचे स्पष्ट दर्शन याचे महत्त्व
समजेल परमेश्वर निर्गुण, निराकार, सर्व विश्वात भरून राहिलेला असला तरी, आपल्या भोळ्या व भाविक भक्तां-
साठी तो सगुण झाला, अवतार धारण करणारा झाला, असंतो असून सर्व काही करणारा झाला; हा नेहमीचा विचार
येथे आहेच.
६७६ काय खावें आतां कोणीकडे जायें । गांवांत राहावें कोणत्या बळें ॥ १ ॥
कोपला पाटील गांवचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ २ ॥
आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥ ३ ॥
भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥ ४ ॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- चवी-रीत, सांडिली-सोडली.
अर्थ :- देवा, आता मी काय खावे ? मी कुणाच्या आश्रयास आता जावे ? कुणाच्या आधाराने या गावात
तरी राहावे ? १ या गावचा पाटील व इतर लोक आता मजवर रागावलेले आहेत. मला आता येथे भीक तरी
कोण घालणार ? २ सर्वजण मला उद्देशून म्हणतात की, याने आता रीतभात सोडून दिली आहे. याने सर्वांना
बुडविले आहे. सरकारात जाऊनच याचा निवाडा आता होण्यासारखा आहे. ३ मी चांगल्या लोकांना माझी ही
गोष्ट सांगून पाहिली. माझ्यासारख्या दुर्बळाचा घात या लोकांनी केला. ४ तुकाराम महाराज म्हणतात, यांची
संगत काही चांगली दिसत नाही. आता विठ्ठलालाच शोधीत जावयास हवे. ५
विवरण :- तुकोबाच्या ऐन तारुण्यात जी सकटपरंपरा कोसळली, त्या सुमाराच्या आपत्तीचे व मानसिक
चिंतेचे दर्शन घडविणारा हा अभंग आहे. सर्व लौकिक व्यवहाराची चव तुकोबानी सोडून दिली म्हणून आप्तवर्ग व
गावचे लोक आपणावर कसा गहजब करीत असत व त्यामुळे आपल्यासारख्या दुर्बलाचा घात कसा होतो याचे हृदय-
भेदक चित्र बुदानी येथे काढले आहे. याच्या संगतीपेक्षा सरळ घर सोडून जावे व विठ्ठलाच्या संगतीचे सुख भोगावे
असे बुदाना वाटत राहिले हाच एक अभंग पुनः गायेत क्र. १८४१ म्हणून 'आतां काय खावें कोणीकडे जावें' या
थोड्या शाब्दिक फरकाच्या ओळीने सुरु होणारा आलेला आहे.
६७७ संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥ १ ॥
संतांसी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन घेतो ॥ २ ॥
संतांसी देखोनि करितो ढवाळ्या । मायें धुतो चोळ्या दासीचिया ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ढवाळ्या-थट्टा, उपहास.
अर्थ :- हा मनुष्य कसा भ्रष्ट व मत्त झाला आहे पाहा. संतांनी एक चूळभर पाणी मागितले तर कधी
देणार नाही; हा पण दासीच्या अंघोळीसाठी मात्र पाणी भरून स्वतः ठेवितो. १ साधुसंत दाराशी दिसताच हा