सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
सार्थ तुकारामगाथा १९९
भावे गेले म्हणून न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा सग ।
तो तो केले हे पाठमोरे जग । ऐसे काय जाणे हे तुझे रंग ॥ ३ ॥
काय करू या नागविले कामें । लागलें तयातव इतुके सोसावे ।
नाहीं तरी का नव्हती ठावीं वर्मे । परद्वारीं ऐसा हाकलीती प्रसिद्धनावे ॥ ४ ॥
काय किती सागावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठुर ऐसा निर्गुण ।
आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि याहासी भाडण ॥ ५ ॥
इतुकियावरी म्हणे वैकुंठींचा राणा । होऊन गेलें तें नये आणू मना ।
आता न करीं तैसे करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - नवाजिले-नावाजले, चांगले म्हटले, बचनुक-फसवणूक, सत्राजिताची कुमरी-सत्रा-
जिताची कन्या सत्यभामा, फुसरी-कौशल्य, आर्त-इच्छा
अर्थ - श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून त्यावर ती म्हणाली, 'हृषीकेशी, देवा, तुम्ही तुमच्या चांगुलपणास
नावाजिले तरी, मग तुमची अशी फसवणूक का होते ? तुमच्या मनात हे सर्व सोंग असून तुम्ही त्याची बतावणी
मात्र फार चांगली करता १ सत्राजिताची कन्या सत्यभामा मग पुन म्हणाली 'देवा, दूर व्हा आता तुम्ही, तुमच्या
शब्दांचे हे कौशल्य मी चांगलेच जानते ना असेच लाघव करून आजवर मला फसविलत २ देवा, तुमचा वियोग
कधीही न व्हावा म्हणून मी तुमच्याकडे आले जन्मोजन्मी तुमची संगत घडावी अशी माझ्या मनाची तीव्र इच्छा म्हणून
तर जग पाठमोरे करून त्याची पर्वा न करता, तुमच्याकडे आले पण हे तुमचे असले ढंग मला काय माहीत ? ३ काय
करू हो देवा ? माझ्या या कामी मनानेच मला फसविये हो म्हणून तर मला इतके सोसावे लागले नाही तर देवा,
तुमच्या कृती काय मला माहीत नव्हत्या ? दुसऱ्याच्या स्त्रियाबद्दलची तुमची रहस्ये प्रसिद्धच आहेत ४ देवा,
आणखी किती गुण तुमचे सागावेत ? तुमची निष्ठुरता व दुर्गुणता वर्णन करण्यास वाणीसुद्धा समर्थ नाही तुमच्या
दृष्टीत आपले परक्याचे असे काही नाहीच आई, बहीण असाही फरक तुमच्या दृष्टीत नाही तुम्ही सासूसुनांचे भाडण
लावून देता ५ सत्यभामा जेव्हा इतके निष्ठुरपणे बोलली तेव्हा तो वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण तिला म्हणाला,
'भामे, आता पूर्वी जे होऊन गेले ते गेले पुन ते काही मनात आणू नकोस मी पुन तसल्या गोष्टी करणार नाही
अशी शपथ घेतो पाहा तुमच्यासाठी तुकयाबंधू कान्होबा म्हणतात, असा हा श्रीकृष्ण भक्तावर दया करणारा आहे ६
४०४ कान्हो ऐकली रे ऐकली रे । तुजसवे चुकले¹ रे ।
भय वाटे वनीं² मज अबळा धाकली रे ॥ १ ॥
निघता घरीं आई बा वारी । तुजसवे का आलियें हरी ॥ २ ॥
लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥ ३ ॥
पिकल्या चोरी जाले सामोरी । काय जाणे कोठें राहिला हरी ॥ ४ ॥
आड खुट जालिय जाळी । काय जाणो कान्हे माडिली रळी ॥ ५ ॥
तुका म्हणे जाउ आलिया वाटा । पाहो हरी पायीं न मोडे फाटा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - अबळा-अबला, बलहीन स्त्री, बा-वडील, वारी-नको म्हणत असताना, रळी-
मस्करी, चट्टा
अर्थ - श्रीकृष्णा, मी एकटीच आहे रे एकटी तुझ्या बरोबर येऊन चुकले १ आता या वनात मला भय वाटते
रे मी एक लहान, बलहीन अशी स्त्री आहे रे, घरून निघताना मला आई, वडील नको म्हणत असताना मी तुझ्या
बरोबर का आले कुणास माहीत ? २ वाटेने लोक सांगत होते की, तू खोटा आहेस, लबाड आहेस पण मला
१ चुकली, २ जनी,
२०० सार्थ तुकारामगाथा
तुझ्याच संगतीची चट लागली होती. ३ बोरीचा वृक्ष समृद्ध झालेला पाहून मी त्याच्या समोर आले, पण काय झाले कुणास माहीत, हा श्रीहरी कुठे गेला ? ४ आता पुढे खुंट जाळपाच तेवढ्या दिसतात. बोरीच्या काटेरी जाळयाच दिसतात, फळे नाहीत. या हरीने ही काय मस्करी आरंभिली आहे कुणास माहीत ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, तो मग म्हणाली, 'चला आपण आल्या वाटेनेच जाऊन त्या श्रीहरीस पाहू या. म्हणजे पायास काटा लागणार नाही' ६
४०५ क्याला मज आपो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥ १ ॥
बहु दिसीं जाली यासीं मज¹ भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ २ ॥
कोवळें बोलतो मना आवडेतें । डोळियांचें पातें ढापवेना ॥ ३ ॥
आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां नो पाठी वांयां पुरविली ॥ ४ ॥
तुमचें तें काय खोळंबलें काज । भल्या कां नो मज फोडा घरी ॥ ५ ॥
तुकयाचा धनी गोकुळनायक² । सरा कांहों एक बोलतो मी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- क्याला-कशाला, आपो-आई, सोकरा-छोकरा, मुलगा, ढापवेना-हालत नाही, चोलुनिया-चोरून, भल्या-बऱ्या, चांगल्या
अर्थ :- आई, मला घरी चल, घरी चल असे का म्हणतेस ? मला का निवारतेस ? मी नंदाचा मुलगा श्रीकृष्ण याच्याशी खेळत आहे ग. १ फार दिवसांनी त्याची माझी भेट झाली आहे ना त्याची व माझी तुटी आता होऊ नये अशी इच्छा आहे. २ तो कृष्ण फारच मृदू बोलतो, त्याचे शब्द माझ्या मनास फारच आवडतात. त्याला पाहाताना माझ्या डोळ्याचे पाते हालत नाही ३ आजही सगळ्यांना चोरून मी त्याच्याकडे आली आहे. पण तुम्ही माझी पाठ विनाकारण का ग पुरविता ? ४ यात तुमचे काय काम खोळंबिले आहे ? तुम्ही चांगल्या दिसत असून मला का ग घरी फोडून ठेविता ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, माझा हा धनी गोकुळाचा नायक श्रीकृष्ण आहे, दूर व्हा. मी त्याच्याशी काही थोडे बोलणार आहे आता ६
४०६ आतां न यें मागें । मी आलें याच्या रागें ।
काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥ १ ॥
कां गो कलित्यां कोल्हाल । तुम्ही भलत्याच सकल ।
येचाल ते बोल । झुठे होती बोलिले ॥ २ ॥
याचे भेटी माझें मन । स्वरूपीं ठाकले लोचन ।
वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥ ३ ॥
काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें ।
यांचिया भेदिलें । कामबाणीं अंतर ॥ ४ ॥
या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें ।
घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥ ५ ॥
आतां मोटी बार । माझी³ नका धरूं चार ।
तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों⁴ ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- रागें-प्रीतीने, कलिथ्या-करता, कोल्हाल-गोंगाट, झुठे-खोटे, बीजें-दुसऱ्याने, मोटी-मोठी आशा, सुतलों-निजलो
अर्थ :- मी काही आता मागे परतणार नाही मी आता या श्रीकृष्णाच्या मागेमागेच आले आहे. जगाने माझ्यामागे काय रागाने बोलायचे असेल ते बोलून घ्यावे. १ तुम्ही सर्वजणी आता गोंगाट का ग करता ? तुम्ही
१ मसी, २ वैकुंठनायक, ३ माजी, ४ सुतले
सार्थ तुकारामगाथा २०१
सर्वजणी आता मला परक्याच आहात. जे काही मला शब्द बोलाल, नावे ठेवाल, ते सर्व खोटे होईल. २ याच्या
भेटीमुळे माझे मन व माझे डोळे याच्याच स्वरूपात जडून राहिले आहेत. आता त्याच्यापासून वेगळे असण्याचा एक
क्षणही मला आवडणार नाही. ३ मला कसलेही काम आता नकोसे झाले आहे. दुसऱ्याने काही बोललेले मला
आवडणार नाही कारण या श्रीकृष्णाच्या कामबाणांनी मी विद्ध झालेली आहे. ४ आता या कृष्णाशिवाय जगणे
म्हणजे त्या जिण्यास आग लागो. आता माझ्या मनाने याची संगत निश्चीत केली आहे ती काही मी सोडणार नाही.
तेथून काही मागे परतून फिरणार नाही. ५ आता माझ्यासंबधी काही मोठ्या आशा धरल्या असतील तर त्या
सोडून द्या. कारण मी आज तुकयाचा दाता स्वामी श्रीकृष्ण याच्या शय्येवर झोपलों आहे. ६
४०७ हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥ १
अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता१ ॥ २ ॥
याचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा ऐसा । देवपिशा उदारा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा .- हरिरता-हरीशी रममाण झालेल्या, लागवरी-गर्भधारणेच्या स्थितीत, देवपिशा-
देवाविषयी वेड्या
अर्थ :- श्रीहरीशी रममाण झालेल्या या गोपी फार चपळ असून त्याचा संग गर्भधारण करण्याच्या स्थितीत
कधीच येत नाही. १ अनेक भोग जरी त्यांनी भोगले तरी त्या सर्वांगानी उत्तम व पवित्र राहतात. २ त्याचे संबंध,
व त्याचे पावित्र्य याचे वर्णन वाणीने करता येण्यासारखे नाही. यासाठी काय करता येण्यासारखे आहे ? ३ तुकाराम
महाराज म्हणतात, याप्रमाणे या उदार गोळणी देवाविषयी वेड्या झालेल्या आहेत. ४
४०८ गोळणी आल्या याज२ । म्हणती या गे३ राखो आज ।
सांपडवुनी माज- । घरांत धरुनी कोंदू ।
उघडें४ कवाड उभ्या कान्होशाचे आट ।
साता पाँचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥ १ ॥
नित्य सोंकवला नेदी । सांगो चित्त बोला ।
आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ २ ॥
जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी ।
गडिया ठेविनि बाहेरी पूर्वद्वारें शिरे ।
त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें ।
पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥ ३ ॥
उतरोनि सिकें । पाहे चाखोनियां निकें ।
गोड तेंचि एका एकें । हातीं लांभवितो ।
जाणे राखती तयांसि । तेथें अधिकचि नासी ।
माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥ ४ ॥
जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी ।
माज५ कोडूनी भीतरी । घरांत६ घरीयेला ।
कां रे नागविसी । माझें मुळीं लागलासी ।
आणवीन तुजपासीं । मागें खादले तें ॥ ५ ॥
१ पुरता, २ बाजें, ३ रे, ४ उभे, ५ माजे, ६ घरात घरी एवला
तु गाथा .२६
२०२ सार्थ तुकारामगाथा
दोही' संधी² बाहे । धरुनि नेती माते पाहे ।
काय नासी केली आहे । घरामाजी येणें ।
तुका म्हणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख ।
बसवंती कवतुक । करुनी रंजविल्या ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाजें-रागाने, धमाने, काळोखाचे-अधाराच्या, पिलंगत-लपत छपत.
अर्थ :- मोठ्या कष्टाने, त्रासाने गोकुळच्या गोळणी एकत्र झाल्या व म्हणू लागल्या, या ग, आज आपण
त्याची राखण करू व सापडताच त्यास माजघरात कोंडून ठेवू. त्यानी मग दार उघडेच ठेविले व त्या पाचसातजणी
एकत्र येऊन अंधाराच्या आड मौन धारण करून गप्प राहिल्या. १ मनात म्हणत राहिल्या, हा देव रोज घरी
येऊन चोरी करून दूध लोणी खायला सोकावलाय किती सांगितले तरी त्याकडे लक्षच देत नाही आता बरा
सापडणार आहे. याला काही कुणी आता जियत सोडणार नाही २ या गोळणींचा हा बेत जाणून श्रीहरी त्याच
घरी चोरी करण्यासाठी आला. त्याने आपले सोबती बाहेर ठेविले व त्याने पूर्वच्या दाराने आत प्रवेश केला. त्या
गोपींच्या भीतीने सभोवताली पाहात पाहात तो लपत छपत चालू लागला आणि त्याने समोर पाहिले तो त्यास
लोणी दिसले. ३ मग त्याने शिक्यापरचे ते लोणी काढले. त्याने ते चाखून पाहिले. त्याला फार गोड लागले आणि
त्यातील सर्वांत गोड लोणी होते ते त्याने एकमेकांच्या हातानी लांबविले आणि जिथे गोळणींनी चांगली राखण
ठेवली होती तिथे त्याने दह्यादुधाचा चांगलाच नाश केला. मग त्या देवाने आपली चोरी समजावी म्हणून लोण्याचे
हात जागोजागी पुसले ४ त्या सर्व गोळणींनी मग त्याचे हे मूळ रहस्य जाणले. त्याला घरात कोंडून धरून
ठेविले आणि त्यांनी म्हटले, 'श्रीकृष्णा, असे आम्हास का सतावतोस ? आमच्या मागे का लागला आहेस ? यादृर्वा
तू जे जे खाल्लेस तेहो मी परत आणवीन अशाने ' ५ मग त्यानी त्याला दोन्ही बाजूनी धरून त्याच्या आईपाशी
नेले व म्हटले, 'या तुझ्या मुलाने आज काय घरात नासाडी केली आहे पाहा.' तुकाराम महाराज म्हणतात, पण त्या
श्रीहरीच्या मुखाकडे पाहताच त्या गोळणींना दुःख वाटेनासे झाले. त्या यशोदा मातेनेही मुलाचेच कौतुक करून त्या
गोपींचे रंजन केले ६
४०९ आलियें धांवति धांवति भेट होईल म्हणून ।
तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥ १ ॥
आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा ।
हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ २ ॥
लाधिला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा ।
सांभाळितां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥ ३ ॥
जळो आतां संसार वो कईं शेवट पुरे ।
तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सीण-त्रास, सांग-पूर्ण, असाग-अमर्याद
अर्थ :- या श्रीहरीची भेट होईल म्हणून मी धावतच आले. पण वेळ निघून गेल्यामुळे तो निघून गेला व
मला मात्र त्रास झाला १ आता मी काय करू सांग ? तो श्रीकृष्ण मला कसा भेटेल ? त्या श्रीहरीसाठी माझा
प्राण फुटून आता बाहेर जात आहे त्याची फार मोठी आशा मला आहे हो २ पुष्कळांची पुष्कळ ओढ असल्यामुळे
याच्या भेटीस मात्र उशीर होतो इतर सगळे सांभाळताना हा न मिळाल्यास अमर्याद दुख होते. ३ हा संसारहो
त्या श्रीहरीशिवाय असेल तर जळून जावा. याचा कधी शेवट होणार आहे काय ? तुकाराम महाराजांच्या स्वामीच्या
साठी, गोपाळासाठी जीव मात्र माझा झुरतच चालला आहे. ४
१ देहिं संदे बाहे, २ सदी.
सार्थ तुकारामगाथा २०३
४१० आणीक काय थोडीं । परि तीं फार खोटीं फुडीं ॥ १ ॥
सदा मोकळींच गुरें । होतो फजीत तीं पोरे ॥ २ ॥
सदा घालिती हुबरी । एक एकाचे न करी ॥ ३ ॥
तुका म्हणे घरीं । माय वेळोवेळा मारी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - फुडीं-वाईट
अर्थ - आम्ही पोरे काय थोडी आहेत ? पण ती सारी खोटी व वाईट बुद्धीची आहेत १ ज्याच्या
इंद्रियरूपी गाई नेहमी मोकळ्याच राहतात त्याची फार फजिती होते २ नेहमीच ते अहंब्रह्मची हुबरी घालतात ते
एकमेक एकमेकांसारखे करीत नाहीत ३ मग असल्या पोरांना तुकाराम महाराज म्हणतात, त्याची आई घरी मार
देत असते ४
४११ बहुतांचे संगती । बहु पावलो फजिती ॥ १ ॥
बरें केले मदयाळें । मागिलाचे तोड वाळें ॥ २ ॥
माझा करितील तटा । लपती आलिया चोभाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे काई । किती म्हणो बाप आई ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मदयाळें-श्रीकृष्णान
अर्थ - अनेक लोकाच्या संगतीत आतापर्यंत मी चांगलाच फजीत पावलो होतो १ पण आता आपली
सोबत देऊन या कृष्णाने फार चांगले केले मागच्या सर्व सोबत्याची तोडेच काळवडून टाकली २ हे सर्व सोबती
माझ्या बाबतीतले गाऱ्हाणे सांगून तटा धरतात व स्वतःचे काही बाहेर आले की मग लपून बसतात ३ तुकाराम
महाराज म्हणतात, अशा लोकांना, सोबत्याना आईबाप म्हणून मी किती जवळ करावे ? ४
४१२ गाईन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले सवगडे सहित गाई ॥ १ ॥
चोरिले नवनीत वाधविला गळा । जे तुम्हीं गोपाळा छंद केले ॥ २ ॥
मोहिल्या गोपिका पाव्याच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊ ॥ ३ ॥
मायबापा लाड दाखविले कौतुक । तें या आणू सुख अंतरासी ॥ ४ ॥
निर्दाळिले दुष्ट भक्ता प्रतिपाळी । ऐसा म्हणो बळी आमुचा स्वामी ॥ ५ ॥
तुका म्हणे सरसी असो येणे बोधें । लागोनि सबधें सर्वकाळ ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - लीळा-क्रीडा
अर्थ - आपले स्वतःचे सोबती व गाई यांचे तुम्ही रक्षण केले अशा अनंग कृत्यांचे व क्रीडांचे पवाडे मी
गात राहीन १ तुम्ही गोकुळात लोणी चोरून आपला गळा वाढवून घेतलात श्रीकृष्णा, गोकुळात ज्याज्या क्रीडा
केल्यात त्या सर्वांचे मी वर्णन करीन २ तुम्ही तुमच्या मुरलीच्या नादाने सर्व गोपींना वेधून टाकले त्याच्याबरोबर
रासक्रीडा केलीत, त्याचे वर्णन आम्ही मोठ्या संतोषाने करू ३ तुम्ही तुमच्या आईबापांना जे लाडाने व
कौतुकाने क्रीडाविश्व दाखविले ते सर्व सुख आम्ही आमच्या मनात साठवून ठेवू ४ भक्ताचा सांभाळ करण्यासाठी
तुम्ही दुष्टाचा नाश केलात असा हा आमचा बलवान स्वामी आहे असे आम्ही म्हणू ५ तुकाराम महाराज
म्हणतात, या आमच्या श्रीकृष्णबोधाचाच विजय नेहमी असावा त्याचाच सबंध सर्वकाळ आम्हास घडावा ६
डांका-अभंग ८
४१३ चौक भरियेला आसनों पाचारिली कुळस्वामिनी ।
वैकुंठवासिनि ये धावोनी झडकरी ॥ १ ॥
१०
रंगा येईं वो विठाई सांवळिये डोळसे ।
तुझें श्रीमुख साजिरें ते मी केधवां देखेन ॥ २ ॥
रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती ।
अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥ ३ ॥
मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी¹ ।
भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥ ४ ॥
डाका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे ।
आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- डाका-मोठा नगारा, खुनी माणसाचा तपास करण्यासाठी कुंभार वाजवितो ते वाद्य;
चौर-देवीला बसण्यासाठी पाटावर वस्त्र ठेवून त्यावर गहू, तांदूळ वगैरे धान्यानी काढलेल्या चतुष्कोनाची आकृती,
पाचारिली-बोलाविली, मनसा-इच्छा, हाकारा-पुकारा, पुरस्कार-देणगी
अर्थ :- या आसनावर चोक भरून कुळस्वामिनीला हाक मारली आहे. 'वैकुंठवासिनी विठाई ये धावत
लौकर' अशा तीव्र हाकेने तिला जागृत केले आहे. १ विठाई, सावळिये आई, तू डोळस आहेस, माझ्या अंत करणाचा
रंग ओळखून, भाव पाहून लौकर धावत ये. तुझे सुंदर श्रीमुख मी केव्हा पाहीन असे मला झाले आहे २ रजतमाची
धूपारती व पंचप्राणाची आरती अशी सर्व तयारी करून मी आज तू धावत झटकन ये अशी विनवणी करीत
आहे. ३ मनरूपी मेंढा एका घायासरसा मारून त्यातील आशा, इच्छा, तृष्णा याना काढून, सुटचा करून मी
भक्तिभावाने नैवेद्य ताटात वाढलेला आहे आणि तुला हाक मारण्यासाठी पुकारा करीत आहे. ४ तुकाराम महाराज
म्हणतात, अनुहात नादाचा डाका-नगारा ऐकून या देवीने माझ्या अंगात संचार केलेला आहे आणि आपले देणगी
घेऊन मला आरोग्यदान दिले आहे ५
विवरण - येथून पुढचे सात अभंग 'डाका' या नावाखाली असून ते सर्व रूपकात्मक असे आहेत. बहुजनात
भक्तिमार्ग प्रिय होण्यासाठी जे लोकवाड्मयात्मक असे भारूड वाङ्मय साधुसंतानी निर्माण केले त्यातलाच एक
प्रकार, 'डाका' म्हणजे मोठा नगारा देवाची आरती वगैरे सुरू असताना याच्या आवाजाने आसमंत दुमदुमून जातो
या ठिकाणी गोंधळाच्या वेळी जसे प्रमुख व इतर देवदेवताना पाचारण केले जाते त्याचप्रमाणे येथेही महाराष्ट्राची
कुलस्वामिनी, संतांची कुलदेवता वैकुंठवासिनी 'श्रीविठाई सावळिये' हीस पाचारण केले आहे आसन, चौर,
धूपारती, आरती, मेंढ्याचा बळी, अनुहात गजर, पुरस्कार वगैरे शब्दातून देवीच्या उपासनेचे रूपक या अभंगात
केलेले दिसून येईल
४१४ साच माझा देव्हारा । माफ ठेवा भाव खरा ।
त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥ १ ॥
माझें दैवत हे रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं ।
भरले मग अंगीं । निवाड करी दोहोंचा ॥ २ ॥
तुझें आहे तुजपासी । परि तूं जागा चुकलासी ।
चिघडूनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥ ३ ॥
आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवे ।
अंधकार व्हावे । नासु ठाव शोधावा ॥ ४ ॥
१ तुटी
सार्थ तुकारामगाथा २०५
आधळघासी डोळे । देते पागुळासी पाय ।
वांझा पुत्र फळे । नवस पुरविते विठाई ॥ ५ ॥
उगविलीं कोडों । मागें कित्येकाचीं बापुडीं ।
तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - साच-खरोखर, भारू-विश्वास, फुलबरा-फुलांचा गुच्छ, नासी-नाश, उगविलीं-
सोडविली
अर्थ - हा माझा देव्हारा खराच आहे तुम्ही तुमच्या नवमय वचनांचा विश्वास खरा धरून सत्व, रज
तम या गुणांच्या फुलांचा गुच्छ घेऊन या अशी मी तुम्हास विनंती करीत आहे १ माझे हे प्रिय दैवत या वैष्णवांच्या
समतीत रगत येऊन चालत आहे ते माझ्या हृदयात पूर्णपणे भरून असून प्रवृत्तिमिवृत्तींचा निवाडा करीत आहे २
तुझी हरवली आहे अशी वाटणारी वस्तु खर म्हणजे तुझ्यापाशीच असून तू मात्र शोधायची जागा चुकून व्यर्थ
वणवण करीत हिंडत आहेस तुझ्या अंत:करणात निवास करणाऱ्या कामक्रोधादी विकारांनी तिचा नाश आरंभिला
आहे ३ आता त्या वस्तूची नीट ओळख माझ्या एका बेतावाचून तुम्हास होणार नाही, यासाठी अंधाराचा नाश
व्हावा म्हणून त्याचा शोध घेणे अगत्याचे आहे ४ ही आमची विठाई आंधळ्यांना दृष्टी देते, पांगळ्या लोकांना
पाय देते, निपुत्रिकाला पुत्र देते भक्तांचे सब नवस ही परिपूर्ण करते ५ हिने याहीपूर्वी कित्येकांची रहस्ये पूर्णपणे
सोडविली असून तुकाराम महाराज म्हणतात, हिला आधी तुम्ही नवस करा तुमची संकटे दूर करण्यासाठी एका
क्षणाचाही वेळ लागणार नाही ६
४१५ विनंति घातली अवधारी । मज देईं वो अभय करों ।
पीडिलों खेंचरों । आणीक वारी नावाची ॥ १ ॥
रगा येईं वो एकला रग वोडवला ।
हरिनामे उठिला गजर केला हाकारा ॥ २ ॥
देवां चे दैवते । तुज नमिले आदिनाथे ।
ये वो कृपावते । भोगा माझ्या धावति ॥ ३ ॥
न लवी आता वेळ । आइत सारिली सकळ ।
तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - खेंचरी-कामक्रोधादा भुतांनी
अर्थ - या कामक्रोधादी भुतांनी मी त्रस्त झालो आहे विठाई, तू आपल्या अभय हातानी मला आश्वासन
दे इतर भूतांची भीतीही निवारण कर ही माझी विनंती तू ऐक १ हरिनामाचा पुकारा करून मी मोठा गजर
केला आहे त्याच्या रगात तुझ्या कृपेचा रग चढू दे ना २ हे आदिनाथे, तू सर्व देवाची देव असून मी तुला मनोभावे
नमस्कार करीत आहे तू कृपावंत होऊन मला माझ्या प्रारब्धकर्मापासून सोडिव आता तू उशीर लावू नकोस
तुझ्या पूजेची ही सब सामग्री मी आयतीच तयार केली असून तुकाराम महाराज म्हणतात, तू आमची कुलस्वामिनी
आहेस ४
४१६ माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा ।
त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसाये ॥ १ ॥
या रे लोटांगणीं । काहीं करा विनवणी ।
करील झाडणी । मूळ काढी संसार ॥ २ ॥
२०६ सार्थ तुकारामगाथा
पडिले विषयाचे गोधळीं । ते त्रिगुण आफळी ।
हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥ ३ ॥
घेतला अहंकारें । काम क्रोध या मत्सरे ।
पळती प्रेमभरें । अवघे ठाव सांडुनी ॥ ४ ॥
घेतलासे पुरा । माया ममता आसरा ।
अवघ्या एक सरा । पळती रग देखोनी ॥ ५ ॥
तुका म्हणे धावा भाव । फिटेल मनिचा संदेह ।
आणीक न लगे ठाव । काहीं कोठें हिंडावे ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - झाडणी करणे-दूर करणे, आफळी-बाधून गेले, आसरा-जलदेवता
अर्थ - हा माझा खरोखरचा देव्हारा आहे याप्रमाणे दुसऱ्या कुणाजवळच तो नाही याची कीर्ती साऱ्या
त्रिभुवनात पसरत राहिली आहे याच्यासंबंधी कुणास विचारण्याचीही जरूरी नाही १ या माझ्या देवास नमस्कार
करून सर्वजण लोटांगण घाला हो त्याला काही नम्र भावाने विनंती करा ना तुम्हास लागलेले विकारादींचे भूत हा
देव काढून टाकेल संसाराचे भूत दूर करील २ जे नाना विषयाच्या जंजाळात सापडले ते त्रिगुणाच्या बंधनात
गुरफटले गेले असून या परमेश्वराच्या नामाची आरोळी ऐकताच ही भुते उठून दूर जातील ३ काम, क्रोध, मत्सर
अहंकार इत्यादी भुते याचे प्रेमळपणाने घेतलेले नाव ऐकताच उठून पळून जातील ४ माया, ममता या जलदेवतांनी
जो ताप दिलेला आहे त्या याचा रग पाहून ताबडतोब दूर पळून जातील ५ तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही
फक्त तुमच्या मनातील एकचित्त असा भाव साधा मग तुमच्या मनाचा संदेह फिटून जाईल मग इतर ठिकाणी
आश्रय घेण्यासाठी हिंडण्याचे कारणच पडणार नाही ६
४१७ पुढें येते देवी । तिची जती¹ चालो द्यावी ।
मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥ १ ॥
एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा ।
माझ्या भक्तापाशीं सांगा । पूजा भावे करावी ॥ २ ॥
मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ ।
तुम्हीं केले बळ । मग मी ठायीं न पडें ॥ ३ ॥
तुका म्हणे मुळीं । लागली ते आली कुळीं ।
वंदुनी सकळीं । जीवे भावे ओवाळा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जती-जत्रा यात्रा लोवाळ-गले लठ्ठ
अर्थ - पुढे येणाऱ्या देवीची यात्रा नेहमी चालू ठेवावी मायची आशा व मानाची भावना याचा त्याग
करावा १ ही एकवीरा देवी अंगात आली असून ती तुमचा सब रोग दूर करील माझ्या भक्ताना एकनिष्ठत पूजा
करण्यास सांगा असे ही सुचविते २ तिच्यासाठी चांगला गलेलेठ्ठ मनरूपी मेंढा मारून त्यायोगे तिला सर्व पूजा पोहोचेल
असे पाहावे याशिवाय तुमच्या कुठल्याही बळान मी सापडणार नाही असे ही सुचविते ३ तुकाराम महाराज
म्हणतात, ही देवी आमच्या कुळाचीच आहे या कुलस्वामिनीस सर्वांनी वंदन करावे व तिला जीवेभावे ओवाळावे ४
४१८ अवघ्या जेष्ठादेवी कोण पूजनाचा ठाव ।
धरिताचि भाव कोठें नाहींसे जाले ॥ १ ॥
१ जगति
सार्थ तुकारामगाथा २०७
दिसें सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें ।
तळीं गेलें देखें । वरी टोले' न साहाती ॥ २ ॥
पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी ।
बसकोळचा घागरी । डेरे रांजण भाडगीं ॥ ३ ॥
तुका म्हणे माना । येथें कोणीं रुसावें ना ।
आपुलाल्या स्थानां । जेथें त्याची शोभत्या ॥ ४
शब्दार्थ व टीपा - ज्येष्ठा-थोर, पट-सिंहासन, बसकोळचा-वंगट
अर्थ .-सर्वच देवी थोर व समान आहेत असे मानले तरी पूजा करण्यास कोणती घ्यावी याचा निवाडा करावाच
लागतो. असा एके ठिकाणी भाव धरताच मग दुसरीकडे पूजा योग्य वाटत नाही. १ सर्व वस्तु सारख्या दिसल्या तरी
एखाद्या निमित्ताने, कारणाने त्याची खरी किंमत ध्यानात येते. गाडग्याच्या उतरंडीत तळातील गाडग्यासच का मान असे
त्याच्यावरील गाडगी विचारतात; पण त्याना आपल्या वरच्या गाडग्याचे ओझे सहन होत नाही. २ सिहासनाचा
अधिकार एकासच असतो व इतर लोकांना त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे मान मिळतो. एकाच मातीच्या वसच्या
गौरी (लक्ष्मी), घागरी, डेरे, रांजण, गाडगी अशा वस्तू तयार होत असल्या तरी पूज्यस्थानाचे महत्त्व गौरीसच
असते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी मानाच्या जागेकरिता कोणी रुसू नये. आपापल्या योग्यतेच्या
स्थानावरच जो तो शोभून दिसतो. ४
४१९ खेचर खडतर । काळ कांपती असुर ।
नांदे भीमातीर । पंढरपुरपाटणीं ॥ १ ॥
आतां फ्री कां रे हांकारा । सहस्र नामें एकसरा ।
दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ २ ॥
सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या वनीं ।
पावली जननी । झोटि मोकळिया केशीं ॥ ३ ॥
लाविलें कावरें । प्रल्हादा म्हांसासुरें ।
आली येकसरें । दांत खात रंगासी ॥ ४ ॥
वसुदेवाचीं बाळें । सात खावलीं ज्या काळें ।
आली भोगवेळें । तया कारणें तेथें ॥ ५ ॥
पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं ।
धावोनियां काढी । अंगसंगें त्राहार्विलीं ॥ ६ ॥
नामाचे चिंतन । तेथें धांवते आपण ।
न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥ ७ ॥
कुळीची कुळदेवता । तुका म्हणे आम्हां माता
काय भय भूतां । काळ यमदूतांचें ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :-खेचर-आकाशात संचार करणारी भूतसृष्टी, पाटणीं-शहरात, झडपणी-बाधा,
वासुगीच्या-अशोकाच्या, झोटि-लांब केस, कावरे-त्रास, जाच, म्हांसासुरें-हिरण्यकशिपु या नावाच्या महिषासुराने,
बाज-नस्त, त्राहार्विली-रक्षण केली, हीण-कमीपणा
१ टोले साहातीं.
२०८ सार्थ तुकारामगाथा
अर्थ - ही आमंची प्रमुख देवी पंढरपूर शहरात भीमेच्या काठावर नांदत असल्याने तेथरावी इतर क्षुद्र
दैवते हिच्यापुढे थरथर कापत असतात १ आता या देवीच्या नावाने हजार नावांनी एकदम हाक मारा मग तो
तुमचा अगसंग करून या इतर क्षुद्र दैवताना दूर करेल २ इतर दैवताची अशीच बाधा सीतामाईस झालेली
असल्यामुळे तिला अशोकवनात बंदिस्त व्हावे लागले पण या वेळीही जगन्माता केस मोकळे सोडून तिच्या साह्यास
धावली व तिला हिनेच मुक्त केले त्या हिरण्यकशिपु नावाच्या महिषासुराने थोर भक्त प्रल्हादाला त्रास देण्यास
सुरुवात केली मग हीच माता एकदम दात ओठ खात नृसिंहाच्या रूपाने आली व या दैत्याच्या तिन नाश केला ४
ज्या कसाने वसुदेवाची सात मुले निर्दयपणे मारिली होती त्याचा नाश करण्यासाठी हीच कृष्णरूपाने वसुदेवाचे दुख
दूर करण्यास सिद्ध झाली ५ सर्व सामर्थ्यांनी सिद्ध असलेले पाडववीर या क्षुद्र दैवताच्या कोपानी त्रस्त झाले व
वनवासात भटकू लागले, पण या श्रेष्ठ देवीनेच त्याचे रक्षण करून अगसंग येऊन त्याची लाज राखली ६ जेथे श्व
हिच्या नामाचे चिंतन सुरू असते तेथे तेथे ही जाऊन मदत करते रक्षण करते अशा वेळी ही देवी कृपाचा कमोपणा
न पाहता फक्त भावभक्तीकडे लक्ष देते ७ तुकाराम महाराज म्हणतात, ही कुळीची देवता आम्हास मातेप्रमाण
आहे ही एकदा प्रसन्न झाल्यावर मग प्रत्यक्ष यमाचे किंवा यमदूताचे भय कसाल ? ८
४२० देवी देव जाला भोग सरला¹ यावरी ।
सांगाया दुसरी ऐसी² नाही उरली ॥ १ ॥
हरिनामे देवनाम तुम्ही गाऊनियां जागा ।
पैठवणी मागा नका ठेवू लिंगाड ॥ २ ॥
शेवटीं सुताळी वरवी वाजवावी डाक ।
ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥ ३ ॥
गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी ।
तुका म्हणे बरी आजि कोडीं उगविलीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पैठवणी-विदागी पाठवणी, लिंगाड-खटपट लचाट सुताली-चांगल्या ताळावर
अर्थ - देव झाला देवी झाली सर्व प्रारब्ध कर्मानुसार भोगावयाचे भोगही संपले आता काही दुसरे
करावचे आहे असे सांगायलाही काही उरले नाही १ आता तुम्ही या देवाचे हरीचे नाव घेऊन जागे राहा व
त्यासाठी आपली नेहमीची कृपेची विदागी मागा, उगाच मागे खटपट ठेवू नका २ आता या शब्दाच्या प्रसंगात
चांगल्या तालावर, सुरावर डाक वाजवा, व सरतेशेवटी संपल्यावर एक तालाने शेवटचा मेळ साधा ३ आता सर्व
मानकर्याचे मान देऊन झाल आहेत हा देव्हारा आता गुंडाळून ठेवा तुकाराम महाराज म्हणतात, कारण आता
सर्व संकटाचा परिहार झाला आहे सर्व रहस्ये उलगडली गेली आहेत ४
४२१ झाली झडपणी खडतर देवता । सचरली आतां³ निघो नये ॥ १ ॥
मज उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ २ ॥
नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी काही आता ॥ ३ ॥
तुका म्हणे कळो आले वर्तमान । माझें तो बचन आच्छादले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - झडपणी-बाधा
अर्थ - अरे मला कसली तरी बाधा झाली आहे कसल्या तरी खडतर देवतेने झपाटले आहे आता ती जी
अंगात झिरली आहे ती काही बाहेर निघत नाही १ आता मला लोकर काही तरी उपचार करा आता मला काही ही
१ सरले २ उरी ३ चित्ता रिघो नये
सार्थ तुकारामगाथा २०९
फार सहन होत नाहीं २ मला असे करा ना. चंद्रभागेच्या तीरावर एक देव आहे. त्याच्या पायांवर घाला ना मला.
आता माझ्या जीवात काही उरलेले नाही, म्हणून ही विनवणी करीत आहे. ३ तुम्हांस मी हे वर्तमान कळवीत
आहे तोवर तुकाराम महाराज म्हणतात, तो माझी वाणीही बंद होण्याची वेळ आली.
४२२ अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे ।
कोणाचे हे चाळे सुख दुःख न मनितां ॥ १ ॥
मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं ।
पालटाचा घेईं । भाव खरें लोपे ना ॥ २ ॥
आपुलाले तुम्ही पुसा । सोवा एव्याच सरिसा ।
स्थिरावल्या कैसा काय जाणों विचार ॥ ३ ॥
तुका म्हणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ ।
मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सोवा - मनातील गोष्टी, एथ्याच - उगाच
अर्थ:- माझ्या अंगात देवी संचारली आहे हे तुम्हांस कुणास समजत नाही काय ? माझी सर्व सुखदुःखे व
त्याचे चाळे कुणी संपविले ? १ मी तर आता बेहभानावर नाही माझ्या या बोलण्यावरूनच काही ओळख पटल्यास
पाहावी. माझ्यात जो पालट झाला आहे त्याचा खरा भाव काही लपणारा नाही २ आपल्या मनातल्या गोष्टी तुम्ही
उगाच विचारून तर पाहा. त्या कशा स्थिर झाल्या आहेत याचा नीट विचार करा ३ तुकाराम महाराज म्हणतात,
हा लाभ होण्याचा काळ असून थट राहण्याचे येथे कारण नाही अशी संधी आता पुन: कशी व केव्हा येणार ? ४
४२३ पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय ।
बैसलों जयावरी सैराट तें जाय ।
खेतितां फुंप फांटी । खुंट दरडी न पाहे ।
आधार' नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥ १ ॥
दाते हो दान करा । जातें पंढरपुरा ।
न्या मज तेथवरी । अल्लमाचा सोयरा ॥ २ ॥
हिंडतां गव्हाणें गा । शिणलों बारोदारीं ।
न मिळेचि दाता कोणी । जन्मदुःखातें वारी ।
कीर्ति हे संतां मुखीं । तोचि दाखवा हरी ।
पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥ ३ ॥
- या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना ।
न सरेचि बापमाय । भीक नाहीं खंडणा ।
पुढारा म्हणती एक । तया नाहीं करुणा ।
श्वान हे लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥ ४ ॥
काय मी चुकलौं गा । मार्गे नेणवे फांहीं ।
न कळेचि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं ।
१ आधार नाही कोणी। मज बाप ना माय ॥ २ येरझारी, ३ जन्मदु ख निवारी, ४ नाही भीक, ५ नेगवेचि.
तु. गाथा....२७
२१० सार्थ तुकारामगाथा
मी माझी भुल्लों गा । दीप पतंगासोयी ।
द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥ ५ ॥
दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण ।
यावया येथवरी । होतें हेंचि कारण ।
दुर्लभ भेटी तुम्हां । पायीं जालें दरुशन ।
विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सैराट-भलतीकडेच, फुंप-कुपण, खुंट-खाट, दरडी-नदीचे उंच तीर, अरामाचा-पांगु-
ळाचा, गव्हाल-पांगळयाच्या हातातील काठी, पागोरा-अंकीत.
अर्थ:- देवा, मी पांगळा झालो आहे. मला हातपाय नाहीत य ज्यावर मी बसलो आहे ते भलतीकडेच
कुठेही बेदरकारपणे जाते ते फाट्यास, कुपणास, खाडास, नदीच्या उंच तीरास न पाहता वाटेल तसे धावते. देवा,
मला कुणाचाच आधार नाही. ना आईचा, ना बापाचा १ अहो दाते लोकहो, मला दान करा ना. मी पंढरपुरास
निघालो आहे. मला तेथवर न्याना तुम्ही. तुम्हीच संतजन आमच्यासारख्या पांगळयांचे सोयरे आहात २ या
काठीच्या साहाय्याने मी सर्वत्र हिंडून हिंडून शिणून गेलो आहे. माझे दुःख निवारण करणारा दाता अजून मला
कुणीच भेटला नाही. संतांच्या मुखातून अशी कीर्ती ऐकली आहे की तो पंढरपूराचा धीहरी पांगळया माणसांस पाय
देतो. तो मला दाखवा ना. ३ मी या पोटाच्या निमित्ताने लोकांच्या अकित झालो आहे; त्यामुळे प्रत्येक आईबापास
हे माझे म्हणणे असतेच, ते कधी सरतच नाही. भीक मागणेही संपत नाही. काही लोक मला दारात पाहताच
पुढे जा म्हणतात. त्यांना काही दया मायाच नाही; पण महादारुण अशी ही आशा कुत्र्याप्रमाणे माझ्या पाठेमागे
लागली आहे. ४ मी पूर्वी काय व कसे चुकलो कुणास माहित, मला पापपुण्यही कळेनासे झाले आहे. दिव्यावर
पतंग झेप घालतो त्याप्रमाणे मी माझ्याच वृत्तीवर राहिलो. संतमहानुभाव लोकहो, मला जीवदान द्या. ५ मी फार
दूरच्या गावाहून आलो आहे. मला फार मोठे दुःख झाले आहे याच दुःखाच्या पोटी मी येथवर आलो बाहे. तुमची
भेट दुर्लभ असली तरी आज तुमच्या पायाचे मला दर्शन झाल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, आज तुम्हां संताना
दोन्ही हात जोडून नमस्कार असोत. ६
४२४ देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों ।
करूं सत्ता कवणावरी । कोठें स्थिर राहिलों ।
पाय डोळे म्हणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलीं ।
परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगूळ जालों ॥ १ ॥
आतां माझी करीं चिंता । दान देईं भगवंता ।
पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ २ ॥
चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं ।
बहुत जन गेलीं । नाहीं आलीं भागुतीं ।
न देखें काय जालें । कान तरी ऐकती ।
बैसलों संधिभागीं । तुज धरुनि चित्तीं ॥ ३ ॥
भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाय ।
न भरें पोट कधीं । नाहीं निश्चळ पाय ।
हिंडतां भागलों गा । लक्ष चौऱ्याशीं गांव ।
धरुनि राहिलों गा । हाचि बसता ठाय ॥ ४ ॥
भरवसा काय आतां । कोण आणि अयचिता ।
तैसीच जाली कीर्ति । तया मज बहुतां ।
म्हणउनि मारीं हाका । सोयी पावे पुण्यवंता ।
लागली भूक थोरी । तूं चि कृपाळु दाता ॥ ५ ॥
संचित सांडवलें । कांहीं होतें जबळीं ।
वित्त गोत पुत भाया । तुटली हे लागावळी ।
निष्काम जालों देवा । होतें माझे कपाळीं ।
तुका म्हणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - सघोभायीं- संसार व तू यात, ठाव-मूळ ठिकाण, वित्त-संपत्ती, गोत-नातेवाईक,
पुत-पुत्र, लागावळी-मायेचा सबंध.
अर्थ:- हा काहो माझा देश या येय नसूनही मी या ठिकाणी फिरत फिरत आलो आहे. मी आता कुणावर
सत्ता करावी ? मी स्थिर कुठे राहिलो आहे ? माझ्या पायांनी व डोळ्यांनी तर मला सोडूनच दिले आहे असा मी
आंधळा, पांगळा या परदेशी असून मला कुणीही प्रेमाचे नाही. १ देवा, आता माझी चिंता तूच करावीस तुझ्या कृपेचे
दान द्यावेस. मागेपुढे राहून कुणी साभाळणारे मला नाही; म्हणून तू मला आता या साधुसंतांच्या हाती सोपीव २
याउ चालत असताना मला फार भय बाटले. कारण या वाटेने पुष्कळ लोक गेले; पण ते काही परत आले नाहीत.
त्यांची काय गती झाली ती काही कानावर आली नाही. काही दिसलेही नाही. यामुळे संसार व तू माच्यात धित ठेवून,
मनात तुला बाणवून मी बसलो आहे. ३ देवा, तुझ्या ठायीचे मूळ ठिकाण सोडल्यापासून मी तुझी करुणा भाकीत
आहे. कोणत्याही एकाच गळी मी निश्चल होऊन राहिलो नाही. खूप हिंडता हिंडता थकून गेलो. चौऱ्याऐशी लक्ष
गावे हिंडून हिंडून मी फार थकलो आहे देवा, आता तुझ्याकडे पाहात याच जागेवर स्थिर होण्याच्या प्रयत्नात आहे. ४
कुणीतरी अवचित मजसाठी काही घेऊन येईल असा भरवंसा मला नाही. कारण माझ्या पूर्वीच्या लोकात तशीच
कीर्ती झालेली आहे. म्हणून तर देवा, तुला मी हाका मारीत आहे पुण्यवंता, माझ्यावर कृपा कर. मला फार भूक
लागली आहे रे, आजि तुझ्याशिवाय कृपाळू व उदार दाता असा कुणी नाही ५ माझ्याजवळ जे काही थोडे पूर्व-
कर्माचे संचित होते ते सर्व खर्च झाले. संपत्ती, नातेवाईक, पुत्र यांच्या मायेचा सबंधही संपून गेला देवा, मी आता
खरोखरीच निष्काम बनलो आहे. हेच माझ्या कपाळी होते तुकाराम महाराज म्हणतात, आता तूच माझा सर्वस्वी
हित करणारा प्रभू आहेस. ६
विवरण :- वरील दोन अभंग पांगळ्याचे म्हणून तुकारामबुवांनी लिहिले आहेत धडधाकट, श्रीमंत, कला-
चतुर, श्रेष्ठ वर्णाची, देखणी माणसे कुणालाही प्रिय होतील पण आंधळे, लुळे, पांगळे याचा कणव कुणाला येणार ?
पाप नसल्यामुळे, डोळे नसल्यामुळे अधिकच दयनीय अवस्था झाल्यावर एका पांडुरंगाखेरीज दुसरा कोणी दाता नाही
अशीच या पांगळ्याची खात्री झालेली दिसते अशा पांगळ्याला कुणी सांभाळणारा नसतो, कुणी जवळ करणारा
नसतो, भारी दुखे याला भोगावी लागतात, सर्वांनी त्याची उपेक्षा केलेली असते तेव्हा संताच्या सहवासात, साधूच्या
संगतीत त्याच्या जीवास तेवढेच सुख होते ईश्वराकडे चित्त लागल्यामुळे तेवढीच दुःखाची जाणीव कमी होऊन या
पांगळ्या-आंधळ्याची जीवितातील करुणा भक्तीस मोठी पोषक झाली. देवासही अशा माणसाचा फार लोभ कारण
याना साभाळणारा हाच एक पाडुरंग असल्याची जाणीव त्यालाही आहेच या पुढचेही आंधळ्यावरील रूपकात्मक
अभंग याच भूमिकेवरचे आहेत
४१५ देखत होतो आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टो गेली वरी आले पडळ ।
तिमिर फोडलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालो देवा । काय ज्याल्याचें फळ ॥१॥
२१२ सार्थ तुकारामगाथा
आता मज दृष्टी देईं । पांडुरंगा मायबापा ।
शरण आलो आतां । निवारूनिया पापा ।
अंजन लेववूनी । करीं मारग सोपा ।
जाईन सिद्धपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ २ ॥
होतसे खेद चित्ता । काहीं नाठवे विचार ।
जात होतो जना मागें । तोही सांडिला आधार ।
हा ना तोसा ठाव जाला । अवघा पडिला अंधार ।
फिरलीं माझों मज । कोणी न देती आधार ॥ ३ ॥
जोवरि चळण गा । तोवरि म्हणती माझा ।
मानिती लहान थोर । देहसुखाच्या काजा ।
इंद्रियें मावळलीं । आला बागुल आजा ।
कैसा विपरीत जाला । तोचि देह नव्हे दुजा ॥ ४ ॥
गुंतलो या संसारे । कैसा जालोसे अंध ।
मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध ।
स्वहित न दिसेचि । केला आपुला वध ।
लागले काळ पाठीं । सवे काम हे क्रोध ॥ ५ ॥
लागती चालता गा । गुणदोषांच्या ठेंसा ।
सांडिली वाट मग । जालो निराळा कैसा ।
पाहातो वास तुझी । थोरी करुनी आशा ।
तुका म्हणे वैधराजा । पंढरीच्या निवासा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा — पडळ-पडदा, चळण-चलती, सिद्धपंथें-तयार मार्गाने, साधुसंताच्या मार्गाने
अर्थ - देवा, यापूर्वी मी सर्व काही पाहात होतो. मागेपुढे पाहून सर्वत्र तू भरून राहिला आहेस हे दिसत
होते पुढे माझी दृष्टी गेली माझ्या डोळ्यावर पडदा येऊन अंधाराने सारे भरून आले. सर्वत्र अंधार वाढला पुढे
तो अधिकच वाढला मी मग भयभीत झालो मी हा असा आंधळा झाल्यामुळे जन्मास येऊन काय उपयोग देवा ? १
पांडुरंगा, मायबापा, आता मला दृष्टी दे ना मी तुला मनोभावे शरण आलो आहे माझी काही पापे असतील ती
दूर कर माझ्या डोळ्यात चांगली दृष्टी येईल असे अंजन घालून पुढचा मार्ग चांगला सोपा असा दाखव मग मी
ह्या सिद्ध झालेल्या मार्गाने जाईन व जन्ममरणाच्या फेऱ्या चुकवीन २ देवा, माझ्या चित्तास फार खेद होत आहे रे
कोणताही विचार सुचत नाही मी लोकांच्या मागे मागे जात होतो, तोही आधार माझा संपला मी आंधळा
झाल्यामुळे त्यांनीही माझा संग सोडून दिला सर्वत्रच अंधार झाला माझी माझी म्हणून जी माणसे होती तीही
फिरली, त्यांनीही मला सोडून दिले आता मला कुणीच आधार देत नाही ३ जोपर्यंत माझे सर्व इंद्रिये चलनवलन
करीत होती, जोवर चलती होती, तोवर सर्व आप्तवर्ग मला आपला म्हणत होता लहानथोर लोक मला मान देत
होते देहसुखासाठी लोक मला जवळ करीत होते पण आता माझ्या इंद्रियांचे सामर्थ्य संपले तेव्हा तीच माणसे मला
पाहून 'हा पाहा आजोबा बागुल बुवा आला' असे म्हणू लागली आहेत कसे विपरीत घडत आहे माझा देह
पहिलाच आहे दुसरा नवीन नाही पण लोकांची दृष्टी फिरली ना ४ या लौकिक संसारात गुंतल्यामुळे मी हा
असा आंधळा झालो मायेची व नाना तृष्णांची बाधा मला झाल्यामुळे स्वहित नेमके कशात आहे हे मला समजेनासे
झाले असा मीच आपला वध करुन घेतला आहे. माझ्या पाठीमागे हे काम क्रोधाचे काळ लागले आहेत ५ मी आंधळा
झालो असल्याने रस्त्याने चालताना मला गुणदोषांच्या अनेक ठेचा लागतात. म्हणून मी तो रस्ता सोडला व या
रानात येऊन पडलो. आता या निराळघाच मार्गावर राहून देवा, तुझी वाट पाहत आहे. मला तू कृपा करशील अशी
फार मोठी आशा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, विठ्ठला, पंढरपूर येथे राहणाऱ्या पांडुरंगा, तूच खरा
वैद्यराज आहेस, तूच माझे दुखणे बरे कर. ६
४२६ सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें ।
वृत्ति हे निवृत्ति जाली जन न दिसे तेथें ।
मी माजें हारपलें ठायीं जेथींचा तेथें ।
अदृश्य तेंचि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥ १ ॥
सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें ।
त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ २ ॥
टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा ।
कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा घोळसा ।
न मागे मी भीक आतां हाचि जाला भरवसा ।
वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥ ३ ॥
उर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद ।
अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।
घेऊनि आला दान निजतत्त्व निजबोध ।
स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥ ४ ॥
शब्द हा बहुसार उपकाराची राशी ।
म्हणोनि चालविला मार्ग येतील त्यांसीं ।
मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी ।
तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥ ५ ॥
वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव ।
जाणिवनागवण नेदी लागो ठाव ।
म्हणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव ।
तुका म्हणे ह्याचि संतों मार्गे केला उपाय ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- त्रिकूटशिखरीं-त्रिपुटीच्या शिखरावर, त्रिपुटी-ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, अथवा कर्म, कर्ता, क्रिया
इत्यादी त्रिधाचा समुदाय कोल्हाळ-कटकट, घोळसा-त्रास, वोळली-प्रसन्न झाली, सत्रावी-जीवनकला, ज्ञानकला,
अमृतवाहिनी ज्ञानभवनी, उपाय-उपाय.
अर्थ :- देवा, मी तर सहजच आंधळा आहे. निजस्वरूपाच्या, निराकाराच्या ठिकाणी मला दृष्टी नाही.
बाह्य रूप पाहणे संपल्यामुळे माझी वृत्तीच निवृत्ती झाली. मला हे बाह्य जग दिसेनासे झाले. मी व माझे शरीर या
माझ्या वृत्ती हा भाव पण संपला. जे होते ते आपल्याच ठायी अदृश्य झाले १ सर्व शून्याचा त्याग करून, त्रिपुटीच्या
शिखरावर जाऊन मी सुखाने झोप घेतली तेथे मला आयतेच दान मिळाले २ धर्म व अधर्म अशा वृत्तींची झोळी
मी फेकून दिली. पात्रही टाकून दिले. सर्व प्रकारची कटकट चुकविली सत्व, रज, तम या त्रिगुणांचा त्रास घालविला.
आता भीक मागण्याचेही कारण उरले नाही कारण सत्रावीची जीवनकला आता प्रसन्न झाली असल्याने तिने माझी
इच्छा पूर्ण केली. तिचाच मोठा भरंवसा मला वाटतो ३ वर मुख करून सोहम् शब्दाने त्याची आळवणी केली; त्या
२१४ सार्थ तुकारामगाथा
रूपविहीनाची स्तुती केली मग त्या छदाने तो दाता जागा झाला व त्याने मला हे दान दिले त्याने मला निज
बोधाचे, निजतत्त्वाचे ज्ञान दिले आपल्या स्वरूपात मिळवून घेतले ईश्वर व भक्त हा भेद केवळ तात्पुरता ठेवला ४
सर्वांत शब्द हे एकच सार आहे तीच एक परोपकाराची रास आहे म्हणूनच माझ्या मागून येणाऱ्यासाठी हा दगड
दान दिलेला आहे खरे म्हणजे ही वाट पूर्वीपासूनच चालत आलेली आहे अनेक सिद्ध लोक या वाटेने गेले व भव
सागर तरले त्यामुळे इतरांनाही या वाटेसंबंधी विश्वास निर्माण झाला आहे ५ या वाटेवरचे धर्म एकच आहे
आणि ते म्हणजे ईश्वरावर दृढ विश्वास ठेवावा त्याखेरीज जाणतेपणीही नागवण होण्याचा संभव आहे मग देवाचा
ठायठिकाणाही सापडेनासा होतो म्हणून हा बाह्य सोंग सोडून त्या प्रभूशी एकत्वाचा भाव तेवढा कायम करावा
तुकाराम महाराज म्हणतात, मागील संतानी हाच उपाय केलेला होता ६
४२७ आंधळयापांगळ्याचा एक विठोबा दाता ।
प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता ।
घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचीता ।
भवदु ख कोण वारी तुजवाचुनि चिंता ॥ १ ॥
धर्म गा जागो तुझा तूंचि कृपाळू राजा ।
जाणसी जीर्वीचे गा न सागता सहजा ॥ २ ॥
घातली लोळणी या पुंडलिके वाळवटीं ।
पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटी ।
न देखें दुसरे गा । जाली अदृश्यदृष्टी ।
वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥ ३ ॥
आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें ।
न देखे न चलवे जना चालते वाटे ।
घातली लोळणी या हरिनामा घोभाटे ।
पावला त्याकारणें धाव घातली नेटें ॥ ४ ॥
बैसोनि खोळीं शुक राहे गर्भ आंधळा ।
झीणला येरझारी दु ख आठवी वेळा ।
मागील सोसिले तें ना भी म्हणे गोपाळा ।
पावला त्याकारणे । लाज राखिली कळा ॥ ५ ॥
न देखे जो या जना तया दावी आपणा ।
वेगळा सुखदु खा मोहो साठवी १ घना ।
आपपर तेही नाहीं बंधुवर्ग सज्जना ।
तुकया तेचि परी जाली पाये नारायणा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - हेळामात्रें-एक क्षणात, वोळला-प्रसन्न झाला उपमन्यू-व्याघ्रपादचा मुलगा खोळीं-
आईच्या पोटात, शुक-शुकाचार्य
अर्थ - या आंधळ्यांना, पांगळ्यांना दान देऊन संतुष्ट करणारा फक्त विठोबाच आहे सर्व विश्व त्याच्या
पासूनच निर्माण झाले असल्यामुळे तो मोठा सर्व काही जाणणारा आहे एक क्षणात तो या विश्वाची घडामोड करतो
पापपुण्य, संचित कर्म, भवदु ख यांचे निवारण त्याच्यावाचून दुसरे कुणीही करीत नाही देवा, तुझ्यावाचून माझी
१ नाठवी
सार्थ तुकारामगाथा २१५
चिंता कोण दूर करील ? कोण माझे दुःख कमी करील ? १ देवा, तू कृपाळू राजा आहेस. कृपा करण्याचा धर्म तुझा
तूच राहा. आमच्यासारख्या जीवाच्या मनात काय आहे हे नेमके तूच जाणतोस तुला न सांगता आमचे दुःख
समजते. २ त्या पुंडलीकाने या वाळवंटात लोळण घातली. असे हे पंढरपूर निरेभिमरेच्या तीरावर मोठ्या पुण्याचे
स्थान निर्माण झाले आहे. त्या पुंडलीकास दुसरे काहीच दिसत नव्हते त्याची दृष्टी दुसरे पाहावयास तयार नव्हतो.
मग हा प्रेमदाता पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाला त्याने त्यांच्यावर कृपामृताचा वर्षाव केला. ३ एक उपमन्यू
नावाचे लहान मूल होते. त्याला लोकाच्याबरोबर नीट चालवत नसे त्याला त्यामुळे नीट जग दिसतही नसे. मग
त्याने हरिनामास सुरवात केली. हरिनामाचा गजर झाल्यावर मात्र हा देव सावध झाला व त्याने धावत जाऊन त्याचे
तत्परतेने रक्षण केले. ४ जग न पाहावे म्हणून शुकाचार्य आईच्याच गर्भामध्ये आंधळा होऊन राहिला होता. कारण
त्याला जन्ममृत्यूच्या रोपांनी फार दुख झालेले होते त्याने यापूर्वी फारच सोसले होते. याच्यासाठी देवाने धावत
जाऊन भिऊ नकोस, भिऊ नकोस असे म्हटले व त्याचे रक्षण करून लाज राखली. ५ जो सुखदुःखापासून वेगळा
आहे, ज्याला धनाचा मोह नाही, ज्याला आपपर भाव नाही, जो भोवतीच्या आप्त स्वकीयात रमत नाही अशा
लोकांनाच देव दर्शन देतो, स्वतःचे मानतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्यातही तोच भाव निर्माण झाल्यामुळे
नारायणा, माझ्यावर कृपा करा. ६
विवरण :- दुःखाचे आघात झाल्यावर कष्टी झालेल्यांना देव कशी मदत करतो, एकचित्ताने ईश्वरावर
विश्वास ठेवणाऱ्यांना तो कशी मदत करतो हे सांगण्यासाठी तुकारामबुवांनी येथे उपमन्यू व शुकाचार्य याची उदाहरणे
दिली आहेत पैकी उपमन्यू हा धौम्य ऋषीचा शिष्य होय हा आंधळा झाला होता याची निर्वाहाची सर्व साधने बंद
झाल्यामुळे याने रुईची पाने भक्षण केली. त्यामुळे याची दृष्टी जाऊन यास भोवळ आले. तो एकदा चालताना विहि-
रीत पडला. पुढे याने गुरूच्या सांगण्यावरून अश्विनीकुमाराची प्रार्थना करून स्वतःस दृष्टी प्राप्त करून घेतली. हा
दरिद्री असल्यामुळे इतरत्र गोड दुधाची चव त्याने पाहिली होती, पण याला घरी दूध मिळत नव्हते. आईने पाण्यात
पीठ कालवून त्याला दिले. मग दूध मिळविण्यासाठी याने शंकराची प्रार्थना करून अवघा क्षीरसमुद्रच मिळविला.
ईश्वराने असे याचे अज्ञान दूर केले याची दुधाची इच्छा तृप्त केली.
४२८ भगवंता तुजकारणें मेलों जीताचि कैसी ।
निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी ।
न चलती हात पाय दृष्टि फिरली कैसी ।
जागतां न देखों गा खर आणि अक्षरासी ॥ १ ॥
विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा ।
कीर्ति हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ २ ॥
भुक्ति मुक्ति तूं चि एक होसि सिद्धीचा दाता ।
म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता ।
सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां ।
कृपादान देईं देवा येउनि सामोरा आतां ॥ ३ ॥
संसारसागर गा भयदुःखांचें मूळ ।
जनवाद अंथरुण माजी केले इंगळ ।
इंद्रियें वन्यघातें तपे उष्ण वरी जाळ ।
सोसिलें काय करूं दुर्धर हे चांडाळ ॥ ४ ॥
तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा ।
थेंधलों यदि सोडा भाव धरुनि टँका ।
२१६ सार्थ तुकारामगाथा
जाणवो नरनारी जागो धरम लोकां ।
पावती पुण्यवंत सोई आमुचिये हाका ॥ ५ ॥
नाठवे आपपर आतां काय या करूं ।
सारिखा सोइसवा १ हारपला विचारु ।
घातला योगक्षेम तुज आपुला भारु ।
तुकया शरणागता देई अभयकरु ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा : - क्षर-नाशवंत, अक्षर-अविनाशी, इगळ-अग्नी, दुर्मर-भरण्यास कठिण वेंदलों-चढलो
टेंका-आधार
अर्थ :- ईश्वरा, तुझी प्राप्ती जर होणार नसेल तर आम्ही जियत कसले आहोत ? मेल्यासारखेच समजले
आम्हास. आमची बुद्धी निष्काम व्हावयास हवी तिचे चलनवलन थांबले पाहिजे हातापायाचेही व्यापार थांबावया
हवेत. आमची दृष्टीही आंधळी झाली आहे फिरली आहे. तू क्षर-नाशवंत व अक्षरही-अविनाशी आहेस हेही आमच्या
ध्यानात येत नाहीसे झाले आहे. १ विठ्ठला, तुझ्या कृपेचे दान मला दे ना देवा, तुझी कीर्ती व तुझे नाम याची कीर्ती
अमर्यादपणे वाढली आहे २ या लोकीचे भोग व परलोकीची मुक्ती सर्व काही तूच आहेस सर्व सिद्धींचा दाता तू
आहेस म्हणूनच आमची भीती, लज्जा शोकादी वृत्ती दूर झालेली आहे. आम्ही सर्वस्वाचा त्याग करून तुझ्याकडेच
धाव घेतली आहे आता देवा, तू कृपेचे दान द्यावेस. तू आता माझ्या दृष्टीसमोर असावेस. ३ हा संसारसागर हेचं
दुःखाचे मूळ आहे. लौकिक अर्थाचे शब्द हे अग्नीच्या निखाऱ्याप्रमाणे आहेत इंद्रियांचे आघात हे वज्रासारखे असून
उष्ण ज्वालांचा एकसारखा भडका त्यामुळे उठत आहे. देवा, हे सर्व मी सोसले आहे. न सोसून काय करू ? हे
सर्व विकार दुष्ट, चांडाळ, व भरण्यास कठीण असे आहेत ४ तुझे नाम मात्र तीनही लोकात वृक्षाच्या फांद्याप्रमाणे,
पानाप्रमाणे वाढत राहिले आहे याच संसाररूपी झाडाच्या मूळ खोडावर मी चढलो. भावभक्तीचा मला आधार
मिळाला. तेथून मी लोकांसाठी हा तुझा धर्म सांगत आहे. पुण्यवंत असतील ते आमच्या उपदेशाप्रमाणे वागतील ५
मला आपले व दुसऱ्याचे असा भेद करता येत नाही. त्याला मी काय करावे ? मला सर्व सारखेच दिसते. संसार-
परमार्थ याचा विचारही संपला मी माझ्या योगक्षेमाचे ओझे देवा तुझ्यावर सोपविले आहे. हा तुकाराम तुला शरण
आहे. त्याला अभय दे. ६
४२९ मनुराजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी ।
पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणे कृपा केली आम्हावरी गा ॥ १ ॥
म्हणउनि आलो या देशा । होतों नाहीं तरी भुलों दिशा ।
दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा ॥ २ ॥
सवे घेउनि चौघेजण । आला कुमार सुलक्षण ।
कडे चुकवुनि कांटेवण । ऐका आणिलीं तीं कोण कोण गा ॥ ३ ॥
पुढें भक्तीनें धरिले हातीं । मार्गे ज्ञान वैराग्य धर्म येती ।
स्थिर केलों जीं आचपळें होतीं । सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा ॥ ४ ॥
केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसो माय ।
धर्मे त्याच्या देखियेले पाय । दिले अक्षय भय वारुनि दान गा ॥ ५ ॥
होतो पीडत हिंडता गांव । पोट भरेना राहावया ठाव ।
तो येणें अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥ ६ ॥
१ आमुचिया.
सार्थ तुकारामगाथा २१७
शब्दार्थ व टीका - मनु-मन, देहपुरी-देहरूपी शहरान, आचपळें-अति चपळ
अर्थ - देहरूपी एका गावात मन नावाचा राजा राज्य करीत आहे प्रवृत्ती व निवृत्ती या त्याला दोन बायका
असून तो पुत्रपौत्रादिकांनी अतिशय संपन्न असा आहे त्याने आमच्यावर फार मोठी कृपा केली हो ? म्हणून तर
आम्ही या देशात येऊन पोचलो मानी दिशा सुकून भलतीकडेच मी गेलो असतो येथे आल्यावर इच्छेप्रमाणे दान देणारा
दाता भेटला त्याने आम्हाला फार चांगला मार्ग दाखविला २ मनोरूपी राजा आपले चार सुलझणी कुमार घेऊन
आमच्याबरोबर आला वाडे व काटे चुकवून त्यानेच आम्हास आणले त्याच्याबरोबर कोण कोण मुलेहोती त्याची नावे
ऐका ३ त्याच्यापुढे भक्ती स्वतः चालत होती व तिच्याबरोबर ज्ञान, वैराग्य व धर्म हे येत होते जे अति चपळ
होते ते स्थिर झाले सिद्धही याच पथास त्यानी आणून लावले ४ त्यानी आमच्यावर जे उपकार केले त्याचे महत्त्व
काय सांगू ? आईबापसुद्धा असे उपकार करणार नाहीत त्याच्याच धर्मामुळे मला देवाचे हे पाय दिसले व मला
अभयदान कायमचे मिळाले ५ पूर्वी अनेक जन्मी अनेक यात्रौ दु खोरुष्टी होऊन हिंडत होतो त्यावेळी धड नीट
पोट भरले नाही की राहायला नीट जागा कधी मिळाली नाही पण या मनरूपी राजाने सर्व संशय फेडले व हा
तुकोबाना याघवासारखा त्यामुळे वाढतो ६
४३० गातो वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावे एका ।
डोळे झाकुनि रान करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥ १ ॥
राम राम स्मरा आधीं । लाहो करा गाठ घाला मूळबदीं ।
सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावूनि राहा गोविंदों गा ॥ २ ॥
ऐसा अल्प मानवी देह । शत गणिले अर्ध रात्र खाय ।
पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरले ते पाहे गा ॥ ३ ॥
क्षणभगुर नाहीं भरवसा । व्हा रे सावध सोडा १ माया आशा ।
न चले बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥ ४ ॥
कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भक्ति भाव धरा बळकट ।
तन मन ध्यान लावूनिया नीट । जर असेल करणे गोड शेवट गा ॥ ५ ॥
विनवितो सकळा जना । कर जोडुनि थोरा लाहना ।
दान इतुले द्या मज दीना । म्हणे तुकयावधु राम म्हणा गा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीका - लेखा-हिशेब, शत-शंभर, लाहो-लाभ, वोळसा-फेरे, लागपाठ-त्वरा
अर्थ - मी वासुदेव गात आहे त्याचा अर्थ नीट लक्ष देऊन ऐका डोळे मिटून व्यर्थ आयुष्य घालवू नका
कारण त्याचा काटेकोर हिशेब यम किंवा काळ करीत बसला आहे १ आधी रामराम असे स्मरण करा पाहू
त्याचा लाभ करून घेऊन त्याला मूळ स्वरूपात गाठा इतर बाकीच्या संसाराच्या सर्व उपाधी सोडून द्या या एका
गोंविदावर सर्व चित्त ठेवून राहा तुम्ही २ या मानवी देहास फार थोडे आयुष्य आहे शंभर वर्षे आहे असे मानले
तरी त्यातील अर्ध रात्रीच्या झोपेतच जाते मग बालपण, दुख, रोग, क्षयासारख्या व्याधी यात काही वर्षे जाणारच
मग ईश्वराच्या भजनासाठी किती उरले पाहा बरे ३ जे काही हाताशी असलेले आयुष्य आहे तेही क्षणभंगुरच
यासाठी तुम्ही सर्व सावध होऊन याह्या आशा किंवा माया सोडून द्या एकदा यमाचा फास गळ्याशी पडला म्हणजे
मग मात्र कुणाचे काही चालत नाही पुढे फार मोठ्या फेऱ्याच्या संकटात पडावे लागणार आहे हे ओळखून असा ४
काही थोडी त्वरा करून भक्तीचा भाव नीट बळकट करून ठेवा नीट तन, मन, ध्यान लावून या देवास सर्व
अर्पण करुन शेवट गोड करण्याचे कार्य साधा ५ सर्व लहानथोराना मी वासुदेव हात जोडून सांगत आहे की,
एवढेच दान मला द्या तुकयावधू सुद्धा म्हणत आहेत की, तुम्ही मुखाने नेहमी रामराम म्हणावे ६
१ तोडा
तु गाथा २८
२१८ सार्थ तुकारामगाथा
विवरण :- वरील दोन व पुढील चार अभंगातून वासुदेवाच्या भूमिकेवरून तुकोबानी सर्वसामान्य जनतेस
रूपकाच्या भाषेत बोध केला आहे तुकारामासारख्या अनेक मराठी संतानी सांस्कृतिक उद्बोधनाचे, धर्मप्रसाराचे व
रक्षणाचे, जनतेस सन्मार्ग दाखविण्याचे फार मोठे कार्य केले आहे पारमार्थिक तत्त्वज्ञान, वेदान्तविचार, आध्यात्मिक
अनुभूती याचा त्यांनी स्वत अनुभव घेतला व तो इतरांसाठी अतिशय सुलभ भाषेत काव्याच्या आधारे शब्दबद्ध केला
रामकृष्णच्या, कौरवपांडवाच्या कथा सांगून आबालवृद्धांना थोर परंपरेची ओळख त्यांनी वारंवार करून दिली
मराठी संतांचे हे पारमार्थिक विचारधन प्रत्येकाच्या घरी नेऊन पोचते करण्याचे महान कार्य मनोरंजनाच्या द्वारे
करणारा एक मोठा वर्ग त्यावेळी समाजात होता त्यावेळी मुद्रणकलेचा शोध आपल्या देशांत आलेला नसल्यान,
पुस्तकें मुद्रित स्वरूपात नव्हती, शिक्षणाचा प्रसार नव्हता, विद्यालये नव्हती अशा काळात बहुजनास परमार्थप्रवण
करून बहुश्रुत करण्याचे कार्य साधुसंतानी केलेच, पण त्याच्या कार्याला फार मोठा विस्तार मनोरंजनाच्या द्वारे
खेड्यापाड्यातही घरोघरी जाऊन करणारा एक मोठा समिश्र वर्ग होता हा वर्ग म्हणजे गोंधळी, भुत्ये, वासुदेव,
वाघ्या-मुरळी, नंदीबैलवाले इत्यादींचा हाय अजूनही यांच्यापैकी काहीजण रस्त्यातून दिसतात आज नाही उद्या
या मंडळींचे भवितव्य काय होणार आहे ? कुणास माहीत ? पण आज भिकाऱ्याप्रमाणे वाटणारे लोक एके काळी
सांस्कृतिक उद्बोधनाचे व प्रसाराचे कार्य फार चांगल्या प्रकारे करीत असत महाराष्ट्राच्या समाजशिक्षणाचे हे एक
प्रधान अंग होते निरक्षर असणाऱ्या, अज्ञानामध्ये जीवन कंठणाऱ्या, व आपली शेती आणि खेडे सोडून न जाणाऱ्या
शेतकरीवर्गास त्याच्या घरी जाऊन त्यास त्याच्या दैवदेवतांची आठवण करून देणे, रोजची तिथी, रोजचे नक्षत्र,
रोजचा सण याची आठवण करून देणे हे महत्त्वाचे कार्य लोकरंजनाच्या साहाय्याने गोंधळी, भुत्या, वासुदेव, कानफाट
योगी, वाघ्या मुरळी, बाळसंतोष, शरोदा (पिंगळा ), कुडमुड्या जोशी, कोल्हाटी, डोंबारी, फकीर, जागले, भोपी,
बहुरूपी, कडकलक्ष्मी, वैदू इत्यादी अनेक प्रकाराच्या लोकांनी केले आहे याच्या परमार्थनिरूपणास विनोदाची,
अतिशयोक्तीची, उपरोधाची किनार असल्यामुळे याची भावत समाजास उपकारक वाटली
या काही व पुढल्या तीनचार अभंगात तुकारामबुवांनी वासुदेवाच्या भूमिकेवरून परमार्थनिरूपण केलेले
आहे वासुदेवाची जमात द्वारकेपासून आली असावी हे मोठे कृष्णभक्त असून आजही त्यांच्या चिपळ्या, त्याचा टाळ,
त्याचा पावा सकाळच्या वेळी श्रीकृष्णगीतातून साथ देणाऱ्या या गोष्टी आहेत श्रीकृष्ण किंवा विठ्ठल याची उपासना
हे लोक करतात याचा वेष बालकृष्णाचा असतो डोक्यावर मयूरपिसाची टोपी असते, पायात घुंगूर असतात
ताडाशी अलगुज असते जुन्या पद्धतीचा पायघोळ अंगरखा असतो त्यावर तांबडे अलवण असते कृष्णभक्तीची गाणी
गाऊन हे सकाळच्या प्रहरी लोकांना सुखवीत असत या वासुदेवावर ज्ञानेश्वरएकनाथादी संतानीही अभंग रचना
केलेली आहे ' मुळुमुळा वाजवो टाळ । झणझणा नाद रसाळ ' या चरणाचा ज्ञानदेवाचा एक नादमधुर अभंग
वासुदेवावर आहे ' वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरण व्याधी । अहं सोहं कोहं मूळ या सांडी उपाधी ' अशा भाषेत
एकनाथांनी वासुदेवाचे माहात्म्य सांगितले आहे
४३१ गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अजून ।
जागे होऊनि करा कांहीं दान । नका ऐकोनि १ झाकों लोचन गा ॥ १ ॥
हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसे जना ।
चिपळया टाळ हातीं मुर्ली घोप । नारायणा २ गा ॥ २ ॥
जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय ।
ह्या परी मीस घेऊ नका भाई । पुढें विन्मुख होता वरे नाहीं गा ॥ ३ ॥
देवाकारणे भाव तस्मात । द्यावे न लगे फारसे वित्त ।
जाले एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठी नका करु वाताहात गा ॥ ४ ॥
१ ऐको झाकीनि, २ नामनारायणा गा
१०