सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

' तरी तो कायेंवाचामनें । श्ांति कृपाळू दीवाकारणे । तोडी शिष्याचीं भयबंधनें । उठवी ठाणे अहंकाराचे ॥ जो
शब्दज्ञानें पारंगतु । ब्रह्मानंदें सदा डुल्लतु । शिष्य प्रबोधनों समर्थु । यथोचितु निजमायें । ' शिष्यप्रबोधन हे श्रीगुरूचे
महत्त्वाचे कार्य बाबाजी चैतन्यानी तुकारामबुवांच्या चित्ताचे प्रबोधन केले तुकारामबुवानी समकालीन भोंदू गुरूची
थट्टा केली आहे त्यांच्यासारख्या श्रेष्ठ सताला स्वत श्रीगुरू बाबाजी चैतन्य शोधीत आले हाही योग कमी
महत्त्वाचा नाही

३७२ देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥ १ ॥
ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ २ ॥
देवाची जतन । तया बाधू न शके अग्न ॥ ३ ॥
तुका म्हणे हरी । प्रल्हादासि यत्न करी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जतन-जपणूक, यत्न-यतन, जतन, रक्षण
अर्थ - देव एकदा सोबती झाल्यावर, त्याची कृपा झाल्यावर सगळ्या जगाची आपल्यावर कृपा झाल्या-
सारखी असते १ असा अनुभव असूनही जीव उगाचच कासावीस होत असतात २ ज्याला देवाने सरक्षण दिले,
ज्याची जपणूक ईश्वराने केली त्याला प्रत्यक्ष अग्नीही काही करू शकत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या
प्रल्हादासही आणीबाणीच्या संकटातून ईश्वरानेच साभाळले ४
विवरण - एकदा देवाने कृपा केली म्हणजे मग प्रत्यक्ष अग्नीसारख्या प्रखर पंचमहाभूताचाही त्रास होत
नाही हे सागताना बुवांनी प्रल्हादाचे एवच उदाहरण दिल आहे ते योग्यच आह प्रल्हाद हा हिरण्यकशिपु व कयाधू
याचा मुलगा हा मोठा विष्णुभक्त हाता याने वाढविलेले भक्तीचे स्ताभ त्याचे वडील हिरण्यकशिपुस न आवडल्या-
मुळे प्रल्हादाचा छळ करण्यास त्याच्या बापाने सुरुवात केली हत्तीच्या पायास बाधून तुडविणे, सर्प डसविने, वाघगी-
पाशाने बाधणे, शस्त्रप्रहार करणे, कडकड्यावरून लोटून देणे, अग्नीत टाकणे यासारख्या उपायानी प्रल्हादाचा छळ
झाला पण अत्यंत शात चित्ताने त्याने ता सहन केला व ईश्वराची भक्ती आणखी दृढ केली शेवटी ईश्वराने
नृसिंहाचा अवतार धारण करून प्रल्हादाच्या बापाचा वध केला याची विष्णुभक्ती श्रेष्ठ प्रकारची असून हा थोर
नृसिंहभक्त म्हणूनही प्रसिद्ध आहे

३७३ भले म्हणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥ १ ॥
ठसावितां यत्न लागती सायास । चुकतया घडे नास अल्प वर्म ॥ २ ॥
पाकसिद्धी लागे संचित आइते । घटता सोई ते तेव्हा गोड ॥ ३ ॥
तुका म्हणे बरे सांगताचि गोष्टी । रणभूमि दृष्टि न पडे तो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आइते-श्रम न करता मिळालेले, सायास-श्रम, नास-नाश, संचित-साहित्य
अर्थ - आम्ही संताचे सेवक आहोत असे म्हणताना बरे वाटते सतमाहात्म्याची आयती मिळालेली भीक
आपणास बरी वाटते १ पण त्याचा महिमा जनात ठसावना फार श्रम पडतात काही थोडे जरी चुकले तरी
संतत्वाचे मर्म नाहीसे होईल हेही ध्यानात हवे २ चांगल्या स्वयपाकाच्या प्राप्तीसाठी साधनसाहित्याची तयारी
आयती असेल सर उत्तम तरच सर्व स्वयंपाक गोड व रुचकर लागतो ३ युद्धाच्या वार्ता दूर राहूनच करावयास
गोड असतात प्रत्यक्ष रणक्षेत्र दृष्टीस पडले नाही तोपर्यंतच या वार्ता मनोरंजक असतात त्याप्रमाणे सतपणाच्या
गोड गोष्टी होत ४

३७४ संतसमागम एकांदिया परी । राहावे त्याचे द्वारीं¹ श्वानयाती ॥ १ ॥
तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचे ॥ २ ॥
१ घरीं

१८० सार्थ तुकारामगाथा
कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥ ३ ॥
तुका म्हणे सर्व सुख त्या संगतीं । घडेल पंगती संतांचिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- समागम-सहवास, परी-प्रकाराने, श्वानयाती-कुत्र्याची जात होऊन, कामारी-काम
करी, रंक-गरीब
अर्थ - संताचा सहवास अगदी हलक्या मार्गाने साधता आला, त्याच्या दारांत कुत्र्याच्या जातीचे होऊन
राहता आले तरी राहावे, १ कारण त्या ठिकाणी रामनामाचे श्रवण होईल व संताच्या भोजनानंतर उच्छिष्टाचे
सेवन करायला मिळेल २ तेथे कामकरी बटीक अशा गरीब वृत्तीनेही राहावे व संताची सेवा करावी. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, त्या संताच्या संगतीत सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील त्याच्या पंगतीत सुखमय असे भोजन
घडेल. ४
३७५ एकली राणागोविंदा सवे । गेले ठावें तें जाले ॥ १ ॥
मज न म्हणा न म्हणा शिंदळो । नाही विषम जवळों आतळले ॥ २ ॥
नव्हती देखिली म्या वाट । म्हणोनि हा धीट सग केला ॥ ३ ॥
भेणे मिठी दिधली गळा । सेजे जवळ दडाले ॥ ४ ॥
सलगी धरो पयोधर । साहाती करमुर सवे ॥ ५ ॥
आहेव मी गर्भीणपणे । हे सांगणे का लागे ॥ ६ ॥
तुका म्हणे सेवटा नेले । सपादिले उभयता ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - शिंदळो-वाईट चालीची स्त्री, विषम-विरुद्ध, सग-सहवास, सोबत, भेनें-भयाने
करमुर-एक प्रकारचे शस्त्र, आहेव-सौभाग्यवती
अर्थ :-त्या गोविंदाबरोबर रानावनात मी एकटी गेले हे तुम्हांस कळले वाटते ? १ पण त्यासाठी मला
वाईट चालीची म्हणू नका असे मी पुन पुन सांगते हो मी त्याच्याजवळ गेले हो काही लोकविरुद्ध गोष्ट मी केली असे
नाही २ मी या रानाची वाट कदा पाहिली नव्हती, मला ती माहित नव्हती म्हणून धीटपणाने त्याची सोबत
घेतली ३ रानावनातील श्वापदाच्या भयात मी त्याच्या गळ्यास मिठी मारली, मी त्याच्या शेजेजवळ दडून
राहिले, म्हणून काय झाले ? ४ त्याने गमतीने, थट्टेत माझे स्तन धरले, पण मी मात्र त्याचे करणे एक प्रकारच्या
शस्त्राप्रमाणे मानले, सहन केले ५ मी गर्भिण असले तरी मनात संशय धरू नका तुम्ही मी सौभाग्यवती आहे
ना ? तुम्हास हे सब सांगावया हवे का ? ६ तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माहिती देऊन तिने उभयताचा
लौकिक वाढवून आपले काय शेवटास नेले ७
विवरण - येथून पुढच काही अभग शृंगारमिश्रित अशा भक्तित्मायनचे आहेत श्रीकृष्णाशी आलेला सबंध
गोळणीच्या वा गापांच्या निमित्तान रिता विविध प्रकारचा होता, त्यात किती नाजुक छटा होत्या, याचे मोठे मनोहर
वर्णन तुकारामबुवांनी विविध प्रकारात कल आहे वरवरचा भावा शृंगाराची व स्त्रीपुरुष प्रमाची, परंतु बोध
किंवा अनुभव मात्र आत्मानुसन्धानाथा, भक्ताचा असा हा प्रकार या अभंगाचा आहे माग अभंग क्र ७ वर विवरण
केले आहे त पाहाव
३७६ होते बहुत हे दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं ॥
व्हावी भटी ते जाली गोविंदासीं । आता सेवा करीन निश्चयेंसीं वो ॥ १ ॥
स्थिर स्थिर मजचि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा ।
येथें आड मज न साहाये वारा । देउनि कपाट आले तें दुसरें वारा वो ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा १८१
मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदीं वेगळें होऊं एक घडी ।
नाहीं लौकिक स्मरला आवडी । आतां येणे काळें या वो लोभें वेडी वो ॥ ३ ॥
उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चितीने निश्चितो सावकाश ।
धरिये गोडी बहुत आला रस । तुका म्हणे हा मागुता न ये दिवस वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - साहे-मदत, सायासाची-प्रयत्नाने
अर्थ - या गोविंदाची भेट व्हावी असे माझ्या मनात फार दिवसापासून होते आज मात्र माझे सर्व नवस
फळास आले आहेत, पूर्ण झाले आहेत कारण आज त्या गोविंदाची व माझी भेट झाली आहे आता मी त्याची
जन्मभर सेवा करीत राहीन १ तुम्ही मात्र स्थिर राहून मला साह्य करा मी आजवर जन्ममृत्यूच्या फेरा घालून
खूप कष्ट सहन केले आता येथे मला दुजेपणाचा वारा सुद्धा सहन होत नाही मी आज दुजेपणाचे दार लावून आले
आहे दुजेपण आता दूर सारा २ मूळ स्वरूपाच्या सत्तेत असणारे हे स्थान मी मोठ्या प्रयत्नाने मिळविले आहे
आता त्याच्यापासून एक क्षणभरही मी दूर होणार नाही यासाठी मी लौकिकाचीहो फिकीर करणार नाही आता
यावेळो याचाच लोभ मला जडून मी त्याच्या नादाने वेडी झाले आहे हो ३ निजात्मबोधाच्या उदयाने माझाही
उदय झाला भी निश्चित झाले आहे याची गोडी फार लागल्यामुळे तिचाही आस्वाद फार घ्यायला आहे. तुकाराम
महाराज म्हणतात, असा हा भाग्याचा दिवस मागितला तरी पुन दिसणार नाही ४
३७७ स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ।
अवघ्या अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथेंचि त्याचा जीव वो ॥ १ ॥
आपआपणांशीं करितो नवल । परि वादावाद न संडितो बोल ।
एका मेघशामें जलधर वोल । रसीं उताविळ हृदय सलोल वो ॥ २ ॥
एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीने आवडी इतरीं ।
अंध बहिर हे प्रेतलोकाचारी । त्याची कीर्ति गाइली पुराणांतरीं वो ॥ ३ ॥
स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवों आदर ।
परस्परे हैं साबरा सादर । योग रञ्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥ ४ ॥
भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐसे ठेवी उरी ।
दुरी जवळी सचिता एसे घरी । रंगा रंगा ऐसे होणे लागे हरि वो ॥ ५ ॥
तुका लाधला हे उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें योरलून ।
पडिले कानी त्या जीवाचे जतन । धरियेले एकाभावे हृदयीं चरण वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - नवलाव-नवल, जलधर-मेघ, पराविया-दुसऱ्याच्या
अर्थ - श्रीकृष्णप्राप्तीचा अनुभव असा स्वतःस आल्यानंतर त्या गोपी एकमेकींना तो मोठ्या प्रीतीने सांगू
लागल्या हा श्रीकृष्ण नाना रूपे घेऊन सर्वांनाच कसा मिळाला ? हे नवल कसे घडले हो ? तो सर्वसाक्षी जो
श्रीकृष्ण त्याच्याच ठिकाणी त्याचा जीव जडून राहिला १ मग त्या आपापसात नवल करू लागल्या त्यांच्या
विषयांच्या वादविवादात सुख असल्यामुळे त्या ते सोडीत नाहीत या एका मेघश्यामाच्या, कृपेच्या मेघाच्या ओलाव्यामुळे
त्यांचे हृदय प्रीतीने द्रवून गेले आहे २ त्या सर्व गोपींचा एकच विषय म्हणजे तो श्रीकृष्ण बनला आहे त्याच्या-
वरील प्रीतीमुळे त्यांना इतर वस्तूवरील प्रीती ध्यानात येते बाह्य लौकिकाविषयी या गोपिका अंध, बहिऱ्याच झाल्या
आहेत लोकाच्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष नाही परंतु त्याची कीर्ती साऱ्या पुराणांनी गाइली आहे ३ आपल्या
आवडत्या व प्रीतीच्या माणसाची स्तुती कुणी दुसऱ्याने केली तर ती अधिक रुचकर लागते कारण आपल्या प्रीती-
पात्राचा गौरव त्यात असतो व त्याच गौरवाविषयी आवड आपल्या मनात निर्माण होते म्हणून या गोपी परस्परांशी

१८२ सार्थ तुकारामगाथा
मोठ्या आदराने श्रीकृष्णच्या गुणगानात तल्लीन झाल्या या सज्जनाच्या सहवासाच्या सुखास अंत नाही ४ या
भक्तीचे प्रेम चराचर सृष्टीत निर्माण झालेले असते ते कधी तुटत नाही त्याच्या ठिकाणी वापरभावही निर्माण
होत नाही, हा आप्त म्हणून जवळचा, हा दूरचा असा विचार तेथे नसतो त्याच्याजवळ किंवा त्याच्याहून दूर हे
ज्याच्या त्याच्या संचित कर्माप्रमाणे ठरते ज्याच्या त्याच्या मनात कर्माचा जसा रंग असेल तसा श्रीहरी त्याला जवळचा
व दूरचा वाटतो ५ या गोपींच्या व संताच्या उच्छिष्टाचे भोजन मात्र या तुकारामास मिळाले आहे आतबाहेरून
प्रेमाचा पूर ओसंडून आला आहे या गोपिकांची श्रीकृष्णस्तुती ज्याच्या कानी पडली त्या जीवाचे जतन आपोआपच
होते तुकाराम महाराजसुद्धा हे श्रीचरण हृदयाशी धरतात ६
३७८ आजि का यो तू दिससी दुश्चित्ती । म्हणी एका मन लगे तुझ्या चित्तीं ।
दिले ठेवू ते विसरसी हाती । नेणो काय बैसला हरि चित्तीं वो ॥ १ ॥
सर सर परती जालीस आता भांड । कैसे दाखविसी जगासी या तोंड ।
व्याली माय ते लाजविली रांड । नाही थार दो ठायीं जाला खड वो ॥ २ ॥
होते तैसे ते उमटले वरी । बाह्य संपादणी अंतरीची चोरी ।
नाहीं मर्यादा निसंग' बावरी । मन हे गोविंदीं देह काम करी वो ॥ ३ ॥
नाहीं करीत उत्तर कोणासवे । पराधीन भोजन दिले खावे ।
नाही अचळ सांवरावा ठावे । देखो उदासीन तुज गे देहभावे वो ॥ ४ ॥
कोठें नेणो हा फावला एकांत । सदा किलकिल भोवती बहुत ।
दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥ ५ ॥
करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भाउवी सासुसुना ।
परा भक्ति हे शुद्ध तुम्ही जाणा । तुका म्हण ऐसे फळो यावे जना वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - दुश्चित्ती-उदास भांड-भांडखोर, अचळ-पदर, किलकिल-बिलबिल, गोंगाट, लाघव-
कौतुक
अर्थ - एक सासू आपल्या सुनेला म्हणत आहे आज तू मुली, अशी उदास का ग दिसत आहेस ? एका
कामात तुझे चित्त लागेल तर शपथ जी वस्तू ठेवून देतेस ते स्थान तू विसरून जातेस तुझ्या चित्तात काय त्या
श्रीहरीने ठाण दिले आहे काय न कळे १ दूर हो तू दूर हो तू पुरतीच भांडखोर व निर्लज्ज झालीस आता या जगास
तोंड कसे दाखवणार आहेस ? तुला जन्म देणारी तुझी आई रांडच म्हटली पाहिजे तिने रांडेलाही लाजविले आहे
तुला जन्म देऊन सासरमाहेर या दोन्ही बाजूचा तुझा संबंध तुटला ना २ तुझ्या मनात जे काळेबेरे होते तेच बाहेर
प्रकटले कितीही बाहेरची बतावणी केलीस तरी तुझ्या मनात जे चोरटपट होते ते प्रगट झालेच की तुला आता
काहीच मर्यादा नाही राहिली तू अगदी निसंग व बावरी बनली आहेस तू वरवर कामात देह राबवीत असलीस तरी
तुझ्या मनात त्या गोविंदाने कायमचे स्थान दिले आहे ३ तू धड कोणाशी बोलत नाहीस कुणाला उत्तर देत नाहीस
पराधीनासारखी वागतेस, कुणी भोजन दिले तरच घेतेस, अंगावरला पदर सावरावा हेही भान तुला उरत नाही
तुझा सारा देहभावच उदासीन होऊन गेलेला आहे ४ तसे पाहिले तर तुझ्या भोवती हा नेहमीच गजबजाट असतो
पण तुला कुठे एकांत मिळाला कुणास माहीत ! दोघांनी एकत्र राहून कसे व कुठ बोलणे केलेत हे कळत नाही
लाजलज्जा सोडून तू हरीच्या हातात हात दिलास तरी कसा ग ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे तो
श्रीकृष्ण कौतुकाने खेळ खेळतो सासूसुनांचे भांडण लावून कौतुक पाहतो तो परंतु ही श्रेष्ठ प्रकारची भक्ती तुम्ही
जाणा सर्व लोकांनी ही भक्ती समजावून घ्यावी ६
१ निशंक

सार्थ तुकारामगाथा १८३
३७९ भरिला सांडूनि रिता करी घट । मीस पाण्याचे गोविदाची चट ।
चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तोचि नीट वो ॥ १ ॥
चाळा लाविलेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें ।
दावो बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ २ ॥
मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार ।
उगा राहे कां मारिसी फंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥ ३ ॥
धरिली सोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मर्जी संगें ।
मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकीं पडिलीं तुझीं सोंगें रे ॥ ४ ॥
सुख अंतरींचें बाह्य ठसठसी । म्हणे विनोद हा काय सोंग यासी ।
तुज मज काय सोयरीक ऐती । नंदनंदन या थोरपणें जाती रे ॥ ५ ॥
खरी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचें बाह्य रंग जाणा ।
मन भिनलें रे तुका म्हणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- उलंडूनि-सांडून, रिता-रिकामा, मीस-निमित्त, चट-सवय, फंकर-खडा
अर्थ :- श्रीकृष्णाच्या दर्शनाची लालसा या गोपींच्या मनात पाहा किती आहे घरी पाण्याने भरलेला घट
त्यांनी सांडून दिला व पाणी भरण्याचे निमित्त करून त्या गोविंदाच्या दर्शनास चटावलेल्या गोपी नदीपलीकडे
निघाल्या श्रीकृष्णाकडे जाणारी वाट त्या झपाझपा चालू लागल्या आणि तो श्रीहरी आपलीच वाट पाहात आहे असे
त्यांनी पाहिले. १ अशा प्रकारे या श्रीकृष्णाने या गोपगोपिकांना चांगलेच छेडावून सोडले आहे त्यांना आपल्या
प्रीतीचे असे हे कृष्णरूपच जिथे तिथे दिसते. या गुणातीत श्रीकृष्णाने नाना वेष धारण करून हा खेळ मांडिला आहे. २
मनात जे आहे त्यास अनुसरून काही भाषण करावे त्याच्याशी, अशा आवडीच्या निमित्ताचा आधार घेऊन त्या म्हणू
लागल्या, 'कृष्णा, उगी रहा ना ! उगाच खडा का मारतोस ? माझ्याशी बोलणे वाढवून का उत्तर देतोस ? ३ अशी
ही पायीट सोड तू टाकून दे ना ही तुझी थट्टा माझ्यापाशी नाही चालणार. मी आपला जीव सोडून तुला मिठी देईन
तुझे असली सोंगे मला चांगलीच माहीत पडली रे.' ४ अशा प्रकारे या गोपींच्या हृदयात साठवलेले श्रीकृष्ण-
प्रीतीचे सुख बाहेर प्रगटून येते. त्या म्हणतात, 'असा या विनोदाचा अभिप्राय तू आमच्याशी का करतोस ? अशा
ऐट्रीचे तुझे व आमचे नाते तरी आहे का ? तू नंदाच्या थोरपणावर जाऊ नकोस तू श्रीमंताचा पोर म्हणून ऐट दाखवू
नकोस.' ५ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण काय रूप धरील ते कुणासही समजून देत नाही या गोपींच्या
बाह्य आचरणाचे रंग विविध प्रकारांचे असले तरी त्यांच्या मनातील सुख मात्र मोठेच आहे. या गोपींचे मन श्री-
कृष्णाच्या मनाशी मिळून गेले आहे त्यामुळे या गोपींचे सर्व भोग त्या श्रीकृष्णालाच प्राप्त होतात ६
३८० आजि नवल मीं आलें येणें राजें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें ।
गोठी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आगियेले तेणें वो ॥ १ ॥
गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जबळी दुजें नाहीं ।
अंगीं जडला मग उरलें तें काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ २ ॥
बहुत कामें मज नाहीं आरावूक । एक सारितां तों पुढें उभें एक ।
आजि मी टाकोनि आले सकळिक । तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥ ३ ॥
चिंता करितां हरिली नारायणें । अंगसंगें मिनतां' दोघेजणें ।
सुखें निर्भरे जालियें त्याच्या गुणें । तुका म्हणे खुंटलें येणे जाणें वो ॥ ४ ॥
१ जाता

१८४ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा : - गोवी- गुतागुल, साव घालणे-हाक मारणे, गुमान-गुप्त, आराधूक-सौख्य, निर्भर-
पूर्ण, विश्वाती, सुटले-सपले
अर्थ : - आज फारच नवल झाले, कारण मी या रानात आले व गोविंदाची अवचितपणे भेट झाली हो
सर्व माणसे या भेटीविषयी फार गुतागुत सागत असत; पण हा नदाचा कान्हा माझ्या पूर्व पुण्याईने आज मला भेटला
हो १ आता जे व्हावचे ते होऊन गेले आता दुसरा काही उपायच उरला नाही बरे, त्यावेळी कुणास तरी हाक
मारावी तर कुणी दुसरे तिथे नव्हतेच मग तो श्रीकृष्ण माझ्या अगाशी जडला मग आता काय उरले? आता बाई
सर्व गुप्तपणे ठेवावे, पुणास काही सांगू नये हेच खरे २ आतापर्यंत मला पुष्कळ कामे होती, एक संपले, की दुसरे
उपस्थित होई मला कशी ती विश्वाती नव्हती पण आज मात्र मी ती सर्व कामे सोडली व येथे आले तो त्या
श्रीकृष्णाने येथे आणलीनच एक नवे कौतुक रचले पाहा ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी चिंता ती गोपी
करीत असतानाच तो नारायणाने दूर केली दोघाची अगे एकमेकास मिळाल्यावर दोघानाही सपूर्ण सुख झाले व
त्यामुळे पुन जन्मास येणे जाणे सपले ४
३८१ मैं भुली घरजानी वाट । गोरस बेचन आयै हाट ॥ १ ॥
कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरू देखै गोपाल ॥ २ ॥
फाहा पग डारू देख आनेरा । देखें तो सब थोहिने घेरा ॥ ३ ॥
हुं तो यकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा : - मैं-मी, भुली-विसरले, हाट-बाजार, पग-पाऊल
अर्थ - एक गोपी म्हणत आहे, मी या बाजारात गाईचे दूध विकण्यासाठी आले होते पण आता परत
जाताना घराची वाटच विसरून गेले आहे १ या मनमोहन कन्हैयाने, लालाने माझे चित्त हरण केले या गोपा-
ळाच्या नादात मी सर्व विसरून गेले २ मी आता पाऊल तरी कुठे टाकू ? जिकडे तिकडे त्याच्या रूपाने मला
घेरले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व लाघव पाहून ती गोपी चकित होऊन गेली. तिच्या मनातील
सर्व प्रकारची भीती नष्ट झाली ४
विवरण - येथून पुढचे दोन व हा एक असे तीन अभग मराठी भाषेतील नाहीत ते हिंदी भाषेतील आहेत.
मराठी सतार्नी हिंदी भाषेत फार मोठी रचना केलेली आहे राम व कृष्ण ही दोन प्रधान दैवते उत्तर हिंदुस्थानातील
गगा, यमुना हिमालय द्वारका, मथुरा, वृन्दावन काशी, पुरी ही प्रमुख तीर्थस्थाने उत्तरेसच तेव्हा पूर्वीपासून यात्रेच्या
निमित्तान उत्तर हिंदुस्थानात सारखी येजा असे नामदेव दोन वेळा उत्तरेत पजाबापर्यंत गेले होते पहिल्या खेपेस
त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरादिकाच सतसमळही होते एकनाथस्वामीनीही काशीयात्रा केलेली होती रामदास तर साऱ्या
भारतात बारा वर्षापर्यंत भ्रमण करीत होते लोकस्थिती डोळसपणे पाहात होते उत्तरेचे साधुसतही दक्षिणेकडे
रामेश्वरापर्यंत येत असत याच्या वैचारिक देवाण घेवाणीची भाषा अर्थातच सस्कृत किंवा हिंदी असावी श्रीकृष्णाच्या,
श्रीरामाच्या भक्तिभावाने त एकत्र बाघले गेले होते सर्व भारतीय माधुसताची निष्ठा एक आहे अनुभूती एक आहे
भक्तिमार्गाची चाल एक आहे भाषेचा, धर्माचा जातीचा विचार बाजून राहून या साधुसताच्या प्रचारकार्यात एक
परमेश्वराची जवळीक हेच नान दृढ होते कबीर, तुलसीदास, सूरदास, थी चैतन्यदेव नरसीमेहता त्यागराज, पुरदरदास
इत्यादी सतकवी श्रीकृष्ण, श्रीराम थोविठ्ठल याच्या प्रेमाने बद्ध झालेले असल्यामुळे त्याची अनुभूती समान होती
मराठी संतानी हिंदी भाषेत वचने कशासाठी केली ? हिंदी भाषाच जाणणाराची सोय त्यात किती होती
याविषयी तक करण कठिन आहे पण एक अदाज असा की सूरदास नददास, मीराबाई इत्यादी कृष्णभक्त कवीनी
व सतानी हिंदी भाषेतून अवीटपणे श्रीकृष्णाचे स्तवन केले आहे त्याच्या लीला गाइल्या आहेत हिंदी, विशेपत
ब्रजभाषा ही जणू कृष्णलीला गाण्यासाठीचे तयार झाली अनेक साधुसंताच्या व कृष्णलीलाच्या सहवासाने
पवित्र बनलेली ही भाषा याच प्रेमापोटी एकदा वापरून पाहण्याची इच्छा मगाठी संताना व्हावी हे साहजिकच आहे
या एका वृत्तीतून मराठी सताच्या हिंदी भाषेतील कृष्णलीलाकडे पाहाण्यासारखे आह

सार्थ तुकारामगाथा १८५
३८२ हरिविन रहिया न जाये जिहिरा । कबकी पाडी देखें राहा ॥ १ ॥
क्या मेरे लाल¹ कवन चुकी भई । क्या मोहिपासितो बेर लगाई ॥ २ ॥
कोई सखी हरी जावे बुलावन । वार हि डारू उसपर तन ॥ ३ ॥
तुका प्रभु कब देखें पाऊ । पासीं आऊ फेर न जाऊ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जिहिरा-प्राण, पाडी-वाट, बेर-वेळ, तन-शरीर
अर्थ - या श्रीहरीशिवाय माझा आता प्राण राहाणार नाही मी किती तरी वेळ झाला त्याची वाट पाहात
उभी आहे १ माझ्या लाला, कृष्णा माझ्या हातून काही चूक झाली का रे ? माझ्याकडे येण्यास एवढा वेळ तरी
का केलास ? २ कुणी एखादी सखी या श्रीहरीला बोलावणारी भेटेल तर मी तिच्यावरून जीव ओवाळून
टाकीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, या प्रभूची पायने मी कधी बरे पाहीन ? एवढा त्याच्यापाशी पोचल्यावर
मग मी परत फिरणार नाही ४
३८३ भलो नदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥ १ ॥
आगळ आवो² देवजी कान्हा । में घरछोडी³ आहे म्हागा ॥ २ ॥
उनसु कळना⁴ नव्हे तो भला । खसम अहकार दादुला ॥ ३ ॥
तुकाप्रभु परबल⁵ हरी । छपी आहे हु जगायी न्यारी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -डिकरो-मुलगा, आगळ-पुढे, खसम-कंठव, रागाट परवल-बलवान
अर्थ - ह्या नंदराजाचा मुलगा फार चांगला आहे कारण त्यानेच माझी लाज राखली आहे १ नदाच्या
कृष्णा, जरा पुढे ये ना तुझ्यासाठी मी घर सोडून भेटण्यासाठी आले आहे २ माझा अहंकाररूपी पती फार रागीट
आहे, त्यास कळता कामा नये नाही तर तो फार रागवेल ३ तुकाराम महाराज म्हणतात हा प्रभू फार बलवान
आहे याच्या मागेच मी या जगापासून वेगळी होऊन लपली आहे ४
३८४ नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करुं⁶ न साहती बहु होतो उवारा ।
मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा⁷ ॥ १ ॥
सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।
उमटली अंगीं यो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥ २ ॥
नये कळों नेदावी हे दुजियांसि मात । घडाया तयासी उत्कंठा एकांत ।
एकाएकीं साक्षों येयें आपुले चित्त । कोण्या काळें होईल नेणो भाग्य उदित वो ॥ ३ ॥
स्वाद सोण देहभान निद्रा खटन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन ।
अवघे वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापें आले जीवन ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उवारा-उष्णता वेशिया-आधार
अर्थ - श्रीकृष्णाच्या विरहाने तापलेली एक विरहिणी आपल्या मैत्रिणीस म्हणत आहे माझ्या शरीराला
काही शीतोपचार करू नका मैत्रिणींनो तुमचे उपचार काही मला आता सहन होत नाहीत त्यांच्यामुळे फारच
उष्णता वाढत आहे माझा रोग माझ्या मनास झालेला आहे त्याचे दुख मनास होणारे आहे एकच उपाय करता
येण्यासारखा आहे तो करा त्या नदाच्या कुमाराला लौकर आणा बर १ अग सख्यानो, मैत्रिणींनो, तुम्हीच मला
अशा प्रसंगी मोठा आधार आहात म्हणून माझ्या मनातील हा सर्व भाव मी तुम्हांस सांगितला हो त्या श्रीकृष्णाचा
वेध माझ्याकडे पाहा किती आहे त्याची सावळी प्रभा माझ्या अंगात उमटून आली आहे ही सब स्थिती खरीच
१ जाउ २ आवे ३ मे घर छाडी आहे म्हागा ४ उन्हम् कळना वेतो भला ५ परबली ६ न साहवे
मज बहु होतो उवारा ७ कुमारा वो ८ भावना वो
तु गाथा २४

१८६ सार्थ तुकारामगाथा
आहे, हे माझ्या या अवस्थेवरून समजेल तुम्हांस. २ माझ्या मनाची ही अवस्था पुन्हा दुसऱ्यास सांगू नका बरं. त्या
श्रीहरीशी एकान्त घडावा अशीच मनात उत्कट इच्छा आहे. यात आपले एकट्याचेच चित्त साक्षीत असावे. अहो
भाग्य माझे केव्हा उदयास येईल ग ? ३ रुची, शोष, देहभान, निद्रा याचा नाश होऊन तटस्थ अशी अवस्था केव्हा
प्राप्त होईल ? डोळे अर्धोन्मीलित कधी होतील ? सर्व काही नाहीसे होऊन त्या श्रीहरीचेच चरण मला केव्हा
दिसतील बरे ?' तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवालाच जगवणाऱ्या त्या देवाचे दर्शन मला झाले. ४
३८५ पडिली भुली धांवतें संराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट ।
मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवूनि ललाट वो ॥ १ ॥
कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें १ वहिले लपाला आतां खांदीं ॥
कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ २ ॥
मागें बहुताचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणे केला त्याग ।
पहिलें २ पाहतां ते हरपलें अंग । खुंटली वाट नाहीसे जाले जग वो ॥ ३ ॥
शोकें वियोगें घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा ।
केला उच्चार रे घडल्या दोषांचा । जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- भुली-मोह, भ्रम संराट-स्वैरतेने, चोजविते-शोधिने, शुद्धी-शोध, वहिले-सत्वर
अर्थ :-त्या श्रीकृष्णच्या नादाची भूल मला पडली आहे. मोह निर्माण झाला आहे. त्या गोविंदाचाच एक छंद
मला लागला असून मी त्याचीच वाट शोधीत आहे. लोक काय म्हणतात हे सर्व सोडून मी त्याच्या चरणावर डोके
ठेवून त्यास वंदन करीत आहे १ त्या गोविंदाचा शोध कोणी तरी करील काय ? हा सत्वर कुठे तरी झाडांच्या फांदी-
मागे लपला काय ? का माझीच देहबुद्धी कुठे आड आली म्हणून तो मला दिसत नाही काय ? त्या करुणेच्या सागराला,
कृपेच्या निधीला आळवून कुणी तरी बोलवा हो २ या कृष्णाच्यासाठी मी मागील सर्व संबंधियांचा संग सोडला;
आणि हा सख्य ज्याच्यासाठी सोडला तोही मला सोडून गेला ना. पुढे त्याची मूर्ती मला आता दिसेना व मागच्या
जगाचीही वाट खुंटल्यासारखीच झाली की हो ३ त्या गोपींचा घोर वियोगमुळे फार झाला. सगळ्यांना त्या
प्रभूचा वियोग घडला. मग त्या श्रीहरीला शरण गेल्या आम्ही फार अन्याय केला असे म्हणू लागल्या. हातून घडलेल्या
दोषांचा त्यांनी उच्चार केला आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, माझा स्वामी प्रकट झाला ४
३८६ काय उणे का करितोसि चोरी । किती सांगो तुज नाइकसी हरी ।
परपरता ३ तूं पळोनि जाशी दुरी । अनावर या लटिकिया बाहेरी वो ॥ १ ॥
माया करणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे ४ आघात ।
न पुरे अवसरु हेचि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि स्थिर चित्त वो ॥ २ ॥
बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी ।
करितां लाग न येसीच पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥ ३ ॥
तुज म्हणीयें मी न सगँ अनंता । नको जाऊं या डोळियां परता ।
न लगे जोडी हे तुजयिण आतां । तुक्यास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- परपरता-परा वाचेच्या पलीकडील
अर्थ :- श्रीकृष्णाच्या विविध खोड्या पाहून त्याची आई यशोदा त्याला एकदा म्हणाली, 'कृष्णा, अरे,
आपल्या घरी काय कमी आहे रे ? म्हणून तू दुसऱ्याच्या घरी जाऊन चोऱ्या करतोस ? तुला सांगावे तरी किती रे •
१ होते वाईले लपाले. २ पैल ३ परे परता ४ जगाचे

सार्थ तुकारामगाथा १८७
हरी ? तू काही माझे ऐकत नाहीस. तुला सांगावे तरी कसे ? कारण तू परा वाचेच्याही पलीकडे पळून जातोस
मोठाच अनावर तू झाला आहेस. लौकिका वेगळा होऊन वसला आहेस' १ अशी ही कृष्णाची आई मोठ्या करुण
वाणीने म्हणत आहे, 'मी आता किती लोकांचे आघात तुझ्यामुळे सोसू रे ? मला इतर कामांस वेळच मिळत नाही,
रोज हीच कटकट वाढत आहे. कृष्णा, तूच शांतचित्ताने यातून मला सोडीव रे बाबा. २ घरी पुष्कळ कामे असून
त्यांत मी गुंतून राहिलेले आहे; आणि तू डोळा चुकवून बाहेर जातोस. काही केल्या तू क्षणभरसुद्धा परत येत नाहीस.
तुला पकडण्यासाठी काही प्रयत्न करावेत असे उरलेच नाहीत ३ अनंता, याता यापुढे मी तुला पुन काही कामे
सांगणार नाही. पण तू आता माझ्या डोळयापुढून जाऊ नकोस दूर. तुझ्याशिवाय मला आता दुसऱ्या कोणाचीही
प्राप्ती नको आहे.' तुकाराम महाराज म्हणतात, हा तुकयाचा स्वामी कान्होबा असा गुणसंपन्न आहे. ४

३८७ घाली कवाड ढळली वाड राती । कामे व्यापिली कां पडिली दुश्चित्ती ।
कोणे लागला गे सदैवंचे हातीं । आजी शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥ १ ॥
बोले ऋतिकेशीं राधा हें वचन । मशों लाघव दाववी नारायण ।
म्हणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज *पूर्ण वो ॥ २ ॥
धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । ते पाचारिलें होउनि ये वो सीता ।
लाजिनली रूप न ये पालटिता । झाला सोमकने आपण रामें रीता वो ॥ ३ ॥
सत्यभामा दान करी नारदासी । तें कळला वो मज हृषीकेशी ।
तुळे घालितां न ये कनक वो राशी । सम तुके एक पान तुळसी वो ॥ ४ ॥
मज भुली पडली कैशापरी । आम्हां भोगूनि म्हणे मी ब्रह्मचारी ।
दिली वाट यमुने माये खरी । तुम्हां आम्हां न कळे अद्यापवरो वो ॥ ५ ॥
जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून ।
राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका म्हणे येथें भावचि कारण वो ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा - कवाड-दार, वाड-मोठी, संबोखिली-समजूत काढली.

अर्थ : - 'फार रात्र झाली आहे. आता दार लाव. या राधेचे हृदय श्रीकृष्णाच्या विरहाने व्यापून जाऊन
ती उदास झाली आहे हा पुन्हा सुदैवी स्त्रीच्या हाती सापडला की काय ग ? आज माझी शेज तर पतीशिवाय शून्य
दिसत आहे !' अशा प्रकारचे वचनही राधा आपल्या सखीजवळ बोलत आहे; ती म्हणते, 'हा नारायण मोठे कौतुक
मला दाखवितो. हा मनाचा मोठा कोमळ आहे ग; पण फार निर्गुण, अवगुणी बरं. मी याला त्याच्याशी बोलणारच
नाही. तो संपूर्णपणे मला समजला आहे. २ द्वारकेस असताना श्रीहरीने गरुडास पाठवून हनुमंताला बोलावून
आणले; व स्वतः श्रीहरी रामरूप झाले व सत्यभामेस सीता होऊन तू ये असे त्यांनी सांगितले. पण सत्यभामेस आपले
रूप एकदम पालटून सीता होता येईना तेव्हा तो फार लाजली तेव्हा मग रुक्मिणी सीता झाली व हा स्वतः राम
झाला. ३ सत्यभामेने नारदास या श्रीहरीचे दान केले तेव्हाच तो कसा आहे हे मला समजले. श्रीकृष्णाची तुला
करण्यासाठी सत्यभामेने आपल्या दागिन्यांच्या सर्व राशींच्या राशी घातल्या तरी त्याची तुलना होईना, मग रुक्मि-
णीने एक तुळशीचे पान टाकल्या बरोबर तुला पुरी झाली. ४ मला कसा विसर पडला, कुणास माहीत ? आम्हांस
भोगून हा मी ब्रह्मचारी आहे असेच म्हणाला होता त्या वेळेस हे वाक्य म्हटल्याबरोबर यमुनेने वाट दिली. अजूनपर्यंत
तुम्हाआम्हात याची थोरवी समजलीच नाही. ५ हा नारायण श्रीहरी सर्व जीवांचे विचार जाणतो. कारण तो सर्वत्र
व्यापून राहिलेला असून तो लपून राहिला असल्यामुळे दिसत नाही एवढेच. तुकाराम महाराज म्हणतात, राधेची स्वतः
विषयीची प्रीती जाणून त्याने तिला आलिंगन देऊन तिची समजूत काढली कारण भावभक्तीनेच हा प्रभू सर्वांनाच
प्राप्त होतो. ६

१८८ सार्थ तुकारामगाथा
३८८ मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणीं ।
दहि दुध तुप लोणी शिया मुरे काहीं ।
मेळवुनी पोरे तेथें रिघे एकसरें ।
बेगी आणोनी सामोरे तेथें लोणी खाय ॥ १ ॥
हरि सोकला वो हरि सोकला वो ।
सोकला तो वारी¹ तुज लाज नाहीं तरी ।
आम्हा सापडता उरी तुज मज नाहीं ॥ २ ॥
तुज वाटते कोड² यासि लागतसे गोड ।
काय हासतेसी वेड तुज लागले वो ।
आम्ही जाऊ तुजवरी पोरे चाळविल्या पोरी ।
काय सागो भाडखोरी लाज वाटे आम्हा ॥ ३ ॥
मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे ।
तब दसवती म्हणे आणा शीक लावू ।
चोर आणिला काटाळा घरी दारी लोकपाळी ।
डेरा रिघोनि मुसळा तेथें लोणी खाय ॥ ४ ॥
मिळोनि सकळा दाये लावूानया गळा ।
कैसा बांधिती उखळा येथें राहे उगा ।
बरा सापडलासी हरी आजिच्याने करिसिल चोरी ।
डोळे घालुनिया येरी येरीकडे हासे ॥ ५ ॥
फाकल्या सकळा उपडोनिया उखळा ।
मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही ।
उठिला गजर दसवती नव्हे घोर ।
धावे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - रिघे-शिरतो एकसरे-एकदम, वारी-आवर कोड-कौतुक हाथचियाचे-गळयाखालचा
खळगा, घोणे-माना खाला घालून बसण
अर्थ - साऱ्या गौळणी मिळून श्रीकृष्णाच्या खोड्याबद्दल यशोदा मातेजवळ गाऱ्हाणी सांगू लागल्या त्या
म्हणू लागल्या की, आमच्या घरी शिक्यावर दही, दूध लोणी तूप यापैकी तुझा मुलगा खोडरी काहीच उरू देत नाही
: गावातील पोरे तो जमवितो व घरात एकदम शिरून शिक्यावरील लोणी आम्ह्यासमोर खातो १ हा तुझा हरी असा
धीटपणा करून लोणी खायला सोकावला आहे तू त्याला आवर बाई, नाही तर तुलाही लाज नाही असे मानू आम्ही,
मग तो आमच्या हातात सापडला तर मात्र मग तुझे आमचे नाते विसरून आम्हीच त्याला शिक्षा करू २ तुला या
तुझ्या मुलाचे भारी कौतुक वाटते व त्यालाही ते मोठे गोड वाटते तू हसतेस काय ग? तुला काय वेडबीड लागले की
काय ? आम्ही आपल्या तुझ्या मोठेपणामुळे याच्याकडे दुलक्ष करतो, पण या तुझ्या मुलाने आमच्या मुलींना नादी
लाविले आहे भाडखोर बाई, तुला काय सांगू ? आम्हाला भारीच लाज आता याच्यामुळे वाटू लागली आहे ३
त्यावेळी जवळच श्रीकृष्ण म्लान मुख करून मान खाली घालून उभा होता त्यावर यशोदा माता म्हणाली, 'त्याला
१ वरी २ कोडें

सार्थ तुकारामगाथा १८९
बाना इकडे, आपण त्याला काही शिकवू किंवा शिक्षा करू. घरी दारी सर्वत्र भारी त्रास देऊन त्याने सर्वांना कंटाळा
आणला आहे, घरीसुद्धा ताक घुसळताना हा एकदम येतो व लोणी खाऊन जातो' ४ मग सर्वजणींनी मिळून एक
दावे आणले व ते कृष्णाच्या गळ्यात घालून त्याला उखळीशी चांगले बांधून टाकले. तसा तो तेथे उभाच राहिला
मग त्या श्रीकृष्णास म्हणाल्या, आता बरा सापडलास; आता करशील का चोरी ? असे म्हणून त्या एकमेकीकडे
पाहून, डोळे मिचकावून हासू लागल्या ५ शेवटी त्या गोळणी आपआपल्या घरी गेल्यावर त्या उखळासहित श्रीकृष्ण
चालू लागला दारातच शापाने दग्ध झालेले नलकूबर व मणिग्रीव या नावाचे दोन वृक्ष होते त्याच्या मादीत तो
अडकला. थोडा जोर करताच कडाडून आवाज झाला वृक्ष मोडून गेले. आवाज ऐकून यशोदेस दम निघेना, ती त्वरेने
बाहेर आली तिने धावत येऊन तुकोयाच्या स्वामीस आलिंगन दिले. ६
विवरण - या मागचे व पुढचे काही अभंग गोळणींच्या स्वरूपाचे आहेत श्रीकृष्णाने बालपणी गोकुळात
ज्या खोड्या केल्या त्याचे अतीव मनोहर वर्णन मराठी संतानी अभंगातून केलेले आहे श्रीकृष्णाच्या खोड्या विविध
प्रकारच्या असत दही, दूध, लोणी चोरून खाणे, नदीवर गौळणींची थट्टा करणे, सासूसुनात भांडणे लावणे, नवरा-
बायकोत भेद निर्माण करणे अशा त्याच्या खोडपानी गोकुळात व गोपगोपींना त्रास निर्माण झाला होता परंतु हा
त्रास कौतुकाचा होता श्रीकृष्णाचे सौंदर्य, त्याचे माहव रूप, त्याच्या लडिवाळ लीला, त्याचे लाघव, त्याची हसरी
मुद्रा याचा लोभ सर्वांनाच असे त्याच्यावरील गोपींचा व यशोदेचा रागही लटकराच असे गोपी नाना प्रकारची
गाऱ्हाणी यशोदा मातेकडे आणीत असत मग यशोदा त्याची समजूत काढीत असे कधी त्यानाच दोष देई, तर कधी
आपल्याच मुलान दोष देई
या कृष्णलीलावर मराठी संतांच्या गौळणी भक्तिरसानी आर्द्र झालेल्या आहेत श्रीकृष्णबाललीलाचे कौतुक
त्यानी विविध प्रकारानी वर्णन केले आहे 'रांगत रांगणों चोरितु लोणी । धावोनि धरिती गोळभी', 'त्वचेचिया
राना धाडू नको मना', 'काय सांगू तूतें बाई, काय सांगू तूतें' इत्यादी ज्ञानेश्वराच्या गोळणी प्रसिद्ध आहेत
'परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरीं । पाष्या बाळे अडु कृष्ण नवनीत चोरी', 'तळवे तळहात टेकीत । डाव्या
गुडघ्यानें रांगत', 'बाळ सगुण गुणाचे तान्हें ग । बाळ दिसते गोजिरवाणें', 'कान्हू थबाल ले थबाल आपुल्या गाई'
इत्यादी नामदेवाच्या गोड गोळणीनी उभ्या महाराष्ट्रातील भाविकाना कित्येक शतक गुग करून सोडले आहे श्रीकृष्ण
भारी खोड्या करतो म्हणून तक्रार करणाऱ्या गोपी एखाद्या दिवशी श्रीकृष्ण आला नाही तर का नाही आला,
म्हणूनही तक्रार करण्यात तयार असत एकनाथांनी तर या गोकुळच्या गोपींच्या गाऱ्हाण्यावर अनेक गोड गौळणी
लिहून मोठी बहार केली आहे 'गौळणी सांगती गाऱ्हाणी । रात्रीं आले चक्रपाणी,' 'भिंगाचे भिंगुले खांद्यावर
बागूले । नाचत तान्हुले यशोदेचे', 'कशी जाऊ बृन्दावना । मुरली वाजवि कान्हा', 'माझा कृष्ण देखिला काय ।
कोणी तरी सांगा गे', 'आह्या पाच गौळणी पाच रगाचे शुगार दारूनी' यासारख्या गोळणीतून नाथांनी
श्रीकृष्णाचे सारे लाघव प्रतिमत उभे केले आहे या गौळणीच्या अभंगातून मुख्यत श्रीकृष्णाच्या बाललीलांचे किंवा
खोडपाचे वर्णन असले तरी त्या निमित्ताने सुदरसा बोधही फार थोर दर्जाचा मधून मधून मिळतो
या अभंगात सर्व गोळणींनी यशोदेपाशी तक्रार केल्यावर सर्वानी मिळून श्रीकृष्णास उखळाशी बांधण्याचा
उल्लेख आहे या उखळासहितच श्रीकृष्ण भग अंगणात आला अगणात अर्जुन या नावाने दोन वृक्ष होते. ऐश्वर्य-
मदाने उन्मत्त झालेल्या या दोन कुबेरपुत्राची कथा भागवतात आहे नारदाच्या शापामुळे हे वृक्षरूप पावलेले दोन
कुबेरपुत्र नलकूबर व मणिग्रीव या दोघाचा उद्धार श्रीकृष्णाने यावेळळी केला या कुबेरपुत्रानी श्रीकृष्णाची प्रेमान
स्तुती केली व श्रीकृष्णाने त्या उभताना अभयदान दिले.
३८९ गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तव ती कृष्णाची करणी काय करी तेथें ।
झाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पयें ॥ १ ॥

सर¹ जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । फेपा खुंटलिया ॥ २ ॥
आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी ।
आलों गेलों बहु वेळां नेणो गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी² ॥ ३ ॥
आम्ही येथें अधिकारी मागें केली तुम्ही चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें ।
बोलिल्या हांसुनी आम्ही सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरुनी करी मात कांहीं ॥ ४ ॥
यांयां परनारी फांसा धरसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं ।
जडला जिव्हारीं फांको नेदी तया नारी । जेथें वर्म तें घरी जाऊं पाहे तियेंचें ॥ ५ ॥
तया हातीं सांपडल्या हातों पाटीं चुकाविल्या । कृष्णमिळणीं मिळाल्या त्याही न फिरती ।
तुका म्हणे संती यांयां न धरावी चित्तीं । होते तुमच्या संचितीं बोडवलें आजि ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - सांतें-बाजाराम, पानसरा-आडवा, समोर, नाट-धक्का, परता-दूर, संती-चिंता.
अर्थ :- सर्व गोळणी दही दूध डोक्यावर घेऊन बाजारास निघाल्या. त्यावेळी श्रीकृष्ण तिथे काय करू
लागला ? तो त्यांच्या समोर आला व त्याने त्याच्या पदरास धरिले व म्हटले, आधी माझे दान द्या. मला दूध लोणी
द्या व मग जा आपल्या मार्गाने. १ मग त्या म्हणाल्या, 'दूर हो, आम्हाला जाऊ दे मला त्याच वेळी तू भेटलास व
आमच्या संचित फर्माला तू धक्का लावलास. आमच्या जन्ममरणाचे फेरे यामुळे चुकले २ यावर श्रीकृष्णाने लागली
दुसरीचा पदर धरून तिलाही हासडले. त्यावेळी आणखी इतर गोळणी त्याच्या हाताला झोंबून बोलू लागल्या,
'अरे काय वेडा की काय तू ? आम्ही किती तरी वेळा या मार्गाने आलो व गेलो, पण तू गोरा की काळा हे देखील
आम्हांस समजले नाही. गाईराख्या, चल दूर हो पाहू आधी उगाच काय भलतेच बोलतोस ?' ३ त्यावर श्रीकृष्ण
त्यांना म्हणाला, 'मी या ठिकाणचा अधिकारीच आहे यापूर्वी तुम्हीच लबाडी करून अपराध केला आहे आता मला सर्व
कळले आहे.' त्यावेळी सर्व गोळणी त्याला हसून म्हणाल्या, 'अरे कृष्णा, आम्ही तर सासुरवासिनी गरीब गोळणी आहोत,
काही तरी खोडी काढून तू आमच्या अंगाला का रे झोंबतोस ? काय बोलायचे असेल तर ते दुरून बोल ना. ४
विनाकारण दुसऱ्याच्या स्त्रियांच्या पदरांस का धरतोस? ही तुझी करणी आमच्या घरच्या माणसांना माहीत झाली तर
मात्र तुझ्याआमच्यात काही खरे सबंध राहणार नाहीत.' असे त्या गोळणी म्हणत आहेत तो त्याच्या हृदयात श्रीकृष्ण
स्वतःच प्रकट झाला व त्यायोगे त्यांना दूर कुठे जाता येईना. त्याचे जे वर्म तेच त्याने धरून ठेविले त्यांच्या चित्तात
तो दृढ झाला. ५ अशा प्रकारे बाजारात जात असताना त्या गोळणी त्याच्या हाती सापडल्या व त्यामुळे जन्माला
येण्याजाण्याची यातायात चुकविली. श्रीकृष्ण स्वरूपाशी त्या मिळाल्या त्या काही परत लोकीक वृत्तीवर आल्या नाहीत
तुकाराम महाराज म्हणतात, चित्तात व्यर्थ चिंता बाळगू नये तुमच्या प्रारब्धात असेल तसेच घडेल. ६
३९० हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी ।
तुझ्या दर्शनें³ होइन काळी । मग हें वाळी जग मज ॥ १ ॥
उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगो रे गोवळा ।
तुझा खडबड कावळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ २ ॥
तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दूध तुप लोणी ।
घरिचें बाहेरील आणोनी । मी रे चादणी सुकुमार ॥ ३ ॥
मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन ।
अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होईल रे ॥ ४ ॥
१ सर जाउ दे रे तर जाऊ दे परता २ वेडा होसी ३ स्पर्शों.

सार्थ तुकारामगाथा १९१
तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही ।
आणीक मात बोलूं कांहीं । फसी भीड नाहीं तुज माझी ॥ ५ ॥
वचन मोडी नेदी हात । कळलें न साहेची मात ।
तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुक्त करूनि भोगी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- टाळो-टावतीस, उगला-उगाच, सडसड-खरखरीत, बावळा-धोंगडी, आलगटा-
छांदिष्टा, घुरट-उग्र, पिशुन-दुष्ट.
अर्थ :- अरे श्रीकृष्णा, तुझा रग सावळा आहे, आणि मी तर चाफेकळीप्रमाणे गोरीपान आहे. तुझ्या दर्शनाने
मी काळी होईन ना ! मग हे सर्व लोक मला टापतील रे. १ अरे उगाच राहा ना चाळा करू नकोस, तुला किती
सांगावे रे ? अरे छदिष्टा, नंदकुमारा, तुला किती सांगावे रे? २ तू फार दूध तूप लोणी खातोस म्हणून तुझ्या अंगास
उग्र वास येत आहे. लोकांच्या घरचे दूध लोणी बाहेर आणून तू खातोस आणि मी तर नाजूक धादणीच आहे ३
ते लोक मला हसतील, मला पाहून माझा धिक्कार करतील. तुझ्या दर्शनाने माझे काळे झालेले अंग पाहून ते माझी
पुरतीच विटंबना करतील रे. ४ तुला माझी लाज भय शंका लोकांची चाड दिसत नाही. मला मात्र सज्जन व काही
दुष्ट सोयरे धापरे व व्याही आहेत. आणखी किती हकीकत तुला सांगू रे ? तुला कशी भीड वा मर्यादा वाटत नाही ? ५
तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा स्वामी श्रीकृष्ण गोपींना दिलेले वचन मोडतो. हातावर हात देत नाही
त्याला त्यांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट पटत नाही, सहन होत नाही. तो त्यांना भोग देऊन जीवन्मुक्ती देतो ६
३९१ सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गार्हाणें देती कैसें ।
काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळेंची कैसें ।
दंहि दुध लोणी शिकों नुरेचि कांहीं कवाड जंशाचें तैसें ।
चाळवूनि नाशिलों कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे वाइये ॥ १ ॥
आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटीं ॥
मिळोनि सकळे जणी करूं वाळा सखी तुज मज होईल तुटी गे वाइये ॥ २ ॥
नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलतें करी ।
पाळतुनि घरीं आम्ही नसतां तेथें आपण संचार करी ।
सोग्या चुंबन देतो आलिंगन लोळे सेजावाजावरी ।
शिकों कडा फोडी गोसाचे डेरे धरितां न सांपडे करों गे वाइये ॥ ३ ॥
आता याची चाट नाहीं आम्हां भीड सांगतां फोड पुरवूं मनिंचें ।
रोसिलें बहु दिस नव्हता केला निस म्हणुनि एकुलतें तुमचें ॥
चरण खांधीं जीवें बांधेन सरिता जवे न चले कांहीं याचें ।
अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलते हो या जिवाचें गे वाइये ॥ ४ ॥
घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां ।
निष्ठुर वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाईल माझ्या बाळा ।
जेंयें लागे हात वाढते नवनीत अमृताच्या कल्लोळा ।
देखोनि तुक्यास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे वाइये ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :-कवाड-दार, विसे-वेड, वाळा-नाग, सोग्या-सोब्यास, निस-निवाडा, कल्लोळ-पूर
अर्थ :- गोकुळातील पाच सात गोळणी मिळून कृष्णाने केलेल्या खोडयाबद्दल यशोदामातेजवळ गाऱ्हाणी
सांगण्यासाठी जमा झाल्या व म्हणू लागल्या, 'काय या चोरट्या पोरास जन्म दिलास ग. मोठे शिरजोर असून मुलखा-

वेगळेच आहे हे पोर तुझे आमच्या घरी शिंयावरचे दही, दूध, लोणी शिंयावर उरतच नाही कुठून येतो हा तुझा
पोर? कारण दार पाहिले तर ते जसेच्या तसे लावलेले असते या तुझ्या मुलाने आमच्या मुलांमुलींना नादावून सोडले
आणि आमच्या सुनांना वेड लाविले ना मा कृष्णाने १ तू अजून तरी याला नीट समजावून सांग ना या गोष्टी बऱ्या
नाहीत असे याला बजाव नाही तर आम्ही आमच्या जियाची सुद्धा परवा करणार नाही आम्ही सर्वजणी मग मिळून
आमचा नाश करून घेऊ मग मात्र तुमच्या आमच्यान अंतर निर्माण होईल २ हा तुझा पोरगा आपले परके असा लौकि-
कातील काही भेदच ठेवीत नाही भलत्याच गोष्टी करीत असतो हा पाळत ठेऊन हा आम्ही घरी नाही असे पाहून
हा आमच्या घरात शिरतो व आमच्या सुनांचे त्याच्या सोऱ्यास धरून चुंबन घेतो, आलिंगन देतो व त्याच्या बाजवर
देखील लोळत राहतो हा तुझा मुलगा हा आमच्या दह्यादुधाचे घट कडाकडा फोडून टाकतो, यशोदाबाई याला
धरू पाहावे तर हा हातात सुद्धा लागत नाही ३ आता मात्र याची भीडमुवत आम्ही काही ठेवणार नाही तो
आमच्या हातात लागला तर मग आमच्या मनात येईल ते आम्ही करू आम्ही खूप दिवस याचा त्रास सोसला तुझे हे
एकुलते एक पोर म्हणून आम्ही आतापर्यंत याच्या खोड्यांकडे दुर्लक्ष केले निवाडा केला नव्हता पण आता तो
हातात सापडला म्हणजे आम्ही त्याचे पाय जवळच्या खांबास बांधून टाकू मग काही त्याचे चालणार नाही मग
याने द्रव्य दिले प्राण दिला तरी आम्ही काही याला सोडणार नाही, मग जियाचे काय वाटेल ते होवो यशोदाबाई ! ४
तेव्हा यशोदा मातेने श्रीकृष्णाला धरून गोळणींच्या हाती दिले व म्हटले, 'हा पाहा माझा मुलगा तुम्ही सर्व निष्ठुर-
पणे या माझ्या बाळात बोलाल व तुमचा हा क्षोम त्याला बाधेल मात्र याची गुणवत्ता अशी आहे की याचा हात
जिथे लागेल तिथे दूधलोण्याचाच काय पण अमृताचाही पूर लोटतो' तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या स्वामीस
पाहून मग त्या गौळणी देशास व स्वतःच्या देहभानास विसरून गेल्या ५

३९२ विरहतापें फुदे छंद करित जाली । हा गे तो गे सावधान सवेचि दुश्चितीं ।
न सामाळुनि अंग लोटी पाहे भोवतीं । वेगळीच पडो पाहे कुळाहुनिया ती ॥ १ ॥
खुंटलीसी झाली येथें अवघियाची गती । आपुलीं परावीं कोण नेंणे भोवती ।
त्याची' नांवें बोमे अहो अहो थोपती । नवलच हा येरां वाटोमिया हासती ॥ २ ॥
बाहेरीच धांवे रान। न धरीच घर । न कळे बघना जाला तेणे संचार ।
विसरोनि गेली सासुरे कीं माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥ ३ ॥
तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आता येऊ येथें सर्वया बळा ।
त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्याळा । बहुता मते तर्कवाद निराळा ॥ ४ ॥

शब्दार्थ व टीपा - कुदे-हृदया दई, बोमे-हाका मारो, निश्चळ-स्तभ्य
अर्थ - एक गोपी या श्रीकृष्णाच्या विरहतापाने हुदयो देत देत नानाप्रकारचे शब्द बरळत आहे ती म्हणते
'अग हा पाहा हरी तो पाहा हरी' मग लागलीच सावध होऊन उदास बनते ही मग तिला धीर निघत नाही ती
पडून राहते सभोवती पाहते आपल्या जातिकुळातून तो वेगळीच झालेली असते १ तिला सावध करण्याविषयी
सर्वांचे प्रयत्न संपले ती सभोवतीच्या माणसांनाही थापकी की दुसऱ्याची अशी ओळखीनाशी झाली फक्त श्रीकृष्णा
श्रीकृष्णा, अशा हाका मात्र ती मारू लागली तेव्हा भोवतीच्या इतर गोळणींना नवल वाटून त्या हसू लागल्या २
ती गोपी घरात न राहता बाहेर रानावनातच धावू लागली तिला भगवद्भक्तीमुळे कुठलेच बंधन उरले नाही
सासरमाहेर याचा तिला विसर पडला केवळ श्रीहरीलाच ती पाहात असल्यामुळे इतराचा तिला विसर पडला ३
तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व गोळणी आता स्तब्ध राहा आता येथे कुणी कसलीही बळजबरी करू नये
ज्याच्या त्याच्या मुखाने येथे निर्णय झालेला आहे बहुमतनि व तर्कवादानेच येथे निर्णय ठरलेला आहे आता उगाच
आपली वाद नको ४

१ त्याच्या नावे वो बोमे बोमे भावो श्रीपनी

सार्थ तुकारामगाथा २९३
३९३ ये रे कृष्णा खुणाविती खेळो भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें ।
कळों नेदी माया त्याचे त्यास ठाउके । खेळतोसे दावी लक्षलक्षार्थे मुकें ॥ १ ॥
अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया१ त्या वाहाती संकल्प मना ।
काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेवोनिया राणा२ ॥ २ ॥
अवघियांचा जाणे जाला मेळासा हरी । मिळोनिया जावे तेथें तया भीतरी ।
कळों नेदी घरिच्या करी गोवूनि चोरी । हातोहातीं नेती परपरत्या दुरी ॥ ३ ॥
आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिले पारिखें जन ।
एकाएकीं तेथें नाहीं दुसरे भिन्न । तुका म्हणे एका नारायणा वाचून ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - भातुकें-भातुकलीचा खेळ चटे-सवयी
अर्थ - अरे कृष्णा ये ना, आपण भातुकलीचा खेळ खेळू सर्व गोळणी एकत्र जमून असे त्या कृष्णाला
म्हणाल्या पण हा देव त्याची माया कुणास समजू देत नाही त्याची त्यासच ठाऊक असते आपण खेळतो आहोत
असे दाखवीत असला तरी त्याचे लक्ष स्वरूपावस्थेने मुकेपणाने होते १ गवळणीनी या कृष्णास अनेक सवयी लाविल्या
नाना संकल्पांनी आवडेल त्या भावनेने त्या त्याला चिंतू लागल्या कायेने, वाणीने, मनाने, वासनेने त्याचे समस्वरू
त्या रूपातच गुंतून राहिले एकान्तात मिळणारे त्या श्रीहरीचे सुख त्या रानावनात मिळवू लागल्या २ सर्व गोळणींचा
जमाव जमला आहे असे पाहून या श्रीकृष्णाने त्यांच्यात मिसळून जाण्याचा संकल्प केला व कुणासही कळू न देता
त्याने त्यांच्या घरी प्रवेश करून चोरी केली व त्यांना हातोहात फसवून ठाणीच्या पलीकड असणारे त्याचे चित्तच त्याने
चोरून घेतले ३ मग त्या गोळणी आपणाशीच आपण अशा नादात मोठ्या आनंदाने क्रीडा करू लागल्या त्यांनी
इतर परक्या लोकांचा त्याग केला व त्या दुसऱ्या कुठल्याही वस्तूस न मानता तुकाराम महाराज म्हणतात, एका
श्रीकृष्णास स्मरून एकाएकीच राहिल्या ४
३९४ खेळता मुरारी जाय सरोवरा तिरीं । तव नग्नचि या नारी तेथें देखियेल्या ।
मांडिलें विदान ख्याल सुखाचे सधान । अग लपवूनि मान पिलगत चाले ॥ १ ॥
ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे ।
पाया पडता रे । न सोडी नेदी साउला रे ॥ २ ॥
साडचा साउलीं३ पातळें गोडें फसविया चोळ्या ।
बुथी घेऊनि सकळा कळंबायरी पळे ।
खांदी४ धरूनिया करों दृष्टि घालोनि सामोरी ।
बैसें पाला योढी वरी खदखदा हासे ॥ ३ ॥
आनंदें कल्लोळ बाळा खेळती सफळ देती उलटिया चपळ ।
एकी एकीहूनि म्हेररा बेल सुर काढी ।
एकी उगविती५ फोडीं ।
नाना परीच्या भिकडी६ खेळ माडियेला ॥ ४ ॥
एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तव नारी ।
म्हणे नाहीं नेले चोरी काय जाणो केंव्हा ।
१ तया त सवरूप वाहाती मना तया तया सवल्प वाहाती मना २ राना ३ पाथळा, ४ खादी घालुनिपा,
५ नागविती, ६ बिकडी
तु गाथा २५

१९४ सार्थ तुकारामगाथा

केला सकळीं हाकारा तंव आलिया बाहेरा ।
आतां म्हणतील घरां जावे केंशा परी ॥ ५ ॥
तंव हासे वनमाळी वरी पाहोनी सकळी ।
लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात ।
लाज राखावी गोपाळा आम्हांजनौंची सकळां ।
काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥ ६ ॥
जोडोनियां कर या गे सकळी समोर ।
वांयां न बोलावे फार वडबड कांहीं ।
भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन ।
करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥ ७ ॥
एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे ।
म्हणे चला आतां सये जाऊं तयापाशीं ।
जोडोनियां हात कँशा राहिल्या निवात ।
तुका म्हणे केली मात लाज राखिली तयांची ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :- विंदान-कौशल्य, ख्याल-खेळ, विसंगत-वाकबूल, साउली-वस्त्रे, बुधी-तोशबदन
घेण्याचे वस्त्र, हाकारा-गोंगाट, भातुके-खाऊ वगैरे, चाड-हौस, किमत
अर्थ - खेळता खेळता श्रीकृष्ण एके दिवशी यमुनेच्या तीरावर येऊन पोहचला तेव्हा त्याने नग्न अवस्थेत
न्हात असलेल्या स्त्रिया पाहिल्या त्यावेळी त्याने तेथे मौजेची क्रीडा सुरु केली आपले अंग दिसू न देता, मान खाली
घालून त्याने यमतीचा खेळ केला. १ या श्रीकृष्णाने असा खेळ केला की काही विचारू नका. पाया पडल्याखेरीज
त्यांची वस्त्रे त्याने दिली नाहीत २ कुणाच्या साड्या, कुणाची पातळे, कुणाच्या वेणीतले गोंडे, कुणाच्या चोळ्या,
कुणाचे तोंडावर घेण्याचे वस्त्र, अशी सर्व वस्त्रे घेऊन तो पळाला व शेजारच्या कदबाच्या झाडावर चढून हातात
फांदी धरून समोर नग्न स्त्रियाकडे त्याने आपली दृष्टी वळविली गोपींची ती धादल पाहून झाडाच्या पानाच्या
आड आपले मुख लपवून तो खदखदून हसू लागला ३ आनंदाच्या कल्लोळात रममाण होऊन त्या गोपी पाण्यात
खेळत होत्या कित्येक जणी मोठ्या चपळाईने पाण्यात उड्या मारीत होत्या दुसऱ्या काहीजणी आपापसात स्पर्धा
लावून सुईर्शोप्रमाणे पाण्यात डुबून लांबवर निघत होत्या कित्येकजणी नाना प्रकारचे खेळ शरीत होत्या ४ मग
काहीजणी बाहेर काठावर येऊन आपापली लुगडी पाहू लागल्या, तो ती वस्त्रे तेथे त्यांना दिसेनात मग त्या
एकमेकींस म्हणत राहिल्या, 'या ठिकाणी आपली लुगडी दिसत नाहीत कुणी चोराने नेली काय ? केव्हा नेली ?'
मग सगळ्यांनी एकत्र गोंगाट करून म्हटले, आता घरी तरी जावे कसे ? ५ इतक्यात वृक्षावरील श्रीकृष्ण हसला,
तेव्हा त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले मग त्या लाजल्या व मागेपुढे हात धरून त्या पुन: पाण्यात शिरल्या व श्रीकृष्णास
म्हणू लागल्या, 'कृष्णा, आमची सर्वांची लाज राख, काय मागशील ती गूळघाटी आम्ही तुला देऊ ' ६ त्यावर
कृष्ण म्हणाला, 'तुम्ही सर्वजणी हात जोडून माझ्यासामोर यावे, व्यर्थ बडबड उगाच करू नका मला खाऊची किंवा
धनाची मुळीच गरज नाही एकचित्त मन करुन मला वंदन करा म्हणजे झाले' ७ मग त्या गोपी एकमेकींकडे
पाहू लागल्या व आपण सारी लाज सोडून चला त्या कृष्णास जाऊन वदू या, असे म्हणत राहिल्या मग त्यानी
हात जोडून, निवान्त राहून त्या श्रीकृष्णाची प्रार्थना केली तुकाराम महाराज म्हणतात, अशा योगाने श्रीकृष्णाने त्या
सर्व गोपींची लाज राखली ८
विवरण - श्रीकृष्णचरित्रातील हा एक प्रसंग भागवत, ब्रह्मवैवर्त पुराणातून आलेला आहे श्रीकृष्णासारखा
पती आपणाम मिळावा म्हणून गोकुळातील कुमारीनी हेमतऋतूत कात्यायिनी देवीचे व्रत केले भद्रकाली नावाच्या

सार्थ तुकारामगाथा १९५
कात्यायिनी देवीची आराधना करून त्या श्रीकृष्णस्वरूपांत दंग झाल्या होत्या एके दिवशीं श्रीकृष्णचरित्राचे गुणगान
करीतच आपलीं वस्त्रे कांठावर ठेवून त्या पाण्यांत विहार करू लागल्या श्रीकृष्णाने त्यांची वस्त्रे दूर करून ती
कदंब वृक्षावर नेऊन ठेविली गोपी त्याला वस्त्रे देण्याबद्दल गळघाडतबमा पाण्यात राहून विनवू लागल्या 'आपण
थंडीने कांकडत आहात, आमची वस्त्रे द ना' अशी त्यांनी परोपरीने त्यांना विनंती केली त्याने सांगितले की,
'नग्न होऊन तुम्ही या यमुनंत स्नान करीत हाता त्यामुळे तुमच्या व्रताचा भंग झाला आह आता मला हात जोडून
नमस्कार करा म्हणजे ता दोष दूर होईल' मग गोपी बाहेर आल्या व त्यांनी लज्जेचा भान दूर राखून श्रीकृष्णास
वदन वेल व श्रीकृष्णाने त्यांनी वस्त्रे त्यांना परत दिली सर्व भावनांचा त्याग करूनच ईश्वरात शरण जावे लागते
असे या कथेने तात्पर्य मागण्यात येते त्या मुग्ध युवतींना कृष्णाविषयी आणखीन प्रीती वाटू लागली घरी
जाण्याचेही भान त्यांना उरले नाही व त्यांना त्यांच्या मनासारखेच घडेल असे आश्वासन देऊन त्यांना गोकुळात
परत जाण्याम श्रीकृष्णान प्रवृत्त केले मग अंतर्यामी श्रीकृष्णाचे स्मरण करीतच त्या गाकुळात परत फिरल्या
३९५ धरिला पालव न सोडी माझा येणे। काहीं करिता या नदाचिया कान्हे।
एकली न येतें मी ऐसे काय जाणे। कीठें भरले अवघड या राणे रे ॥ १ ॥
सोडों पालव जाऊ दे मज हरी। वेळ लागला रे खोपतील घरों।
सासू दारुण सासरा आहे भारी। तुज मज सागता नाहीं उरी रे ॥ २ ॥
सह्या¹ वशिया होत्या मजपाशीं। तुज फावले रे फाकता तपासी।
होतें अंतर तर सापडते फेंसी। एकाएकी अगी जडलासी रे ॥ ३ ॥
केंसी भागली हे करिता उत्तर। शमित मावळल्या आसुडिता कर।
स्वामी तुकयाचा भोगिता चतुर। भोग भोगी त्याचा राखे लोकाचार वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - पालव-पदर, वशिया-प्रिय फाकता-दूर होताच
अर्थ - या कृष्णाने माझा पदर धरला आहे तो काही केल्याने आता सोडायला तयार नाही असे हा नदाचा
कान्हा काही करील हे मला ठाऊक असते, तर मी येथे एकटी आलेच नसते या भारी अशा अवघड रानात कधी येऊन
पडले आहे कुणास माहीत ? १ श्रीहरी, तू माझा पदर सोड ना मला घरी जाऊ दे घरी जायला मला वेळ लागला
तर सर्वजण माझ्यावर रागावतील ना माझ्या घरी माझे सासुसासरे फार रागीट आहेत त्याना जर हे समजले तर
ते तुझी माझी काही भीड उरू देतील असे नाही २ माझ्या प्रिय मैत्रिणी माझ्याजवळ होत्या त्या दूर होताच तुला
माझी खोडी काढण्याचे फावले रे मी तुझ्यापासून दूर असते तर तुला सापडलेच नसते पण तू माझ्या अगदी निकटच
अगशी होतारा ३ याप्रमाणे तिने श्रीकृष्णास म्हटल्यावर ती श्रमाने थकून गेली कारण त्या श्रीकृष्णाने तिचा हात
हिसकल्यामुळेच ती फारच फष्टी झाली होती तुकाराम महाराजाचा हा स्वामी असे भोग घेण्यात एवढा चतुर आहे
की तो ज्यांच्याशी भोग भोगतो त्याचा लौकिक आचार तो नीट सांभाळीत असतो ४
३९६ गाई गोपाळ यमुनेचे तटीं। येती पाणिया मिळोनि जगजेटी।
चेंडू चौगुणा खेळतो वाळवटीं। चला चला म्हणती पाहू दृष्टी वो ॥ १ ॥
ऐसा गोपिका त्या कामातुरा नारी। चित्त विव्हळ देखावया हरी।
मिस पाण्याचे करितील घरी। बारा सोळा मिळोनि परस्परी वो ॥ २ ॥
चिरें चोळिया त्या धुता विसरती। ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती।
कोणा नाठवे कोण कुळ याती। जालों तटस्थ² सकळ नेत्रपाती वो ॥ ३ ॥
दंतधावनाचा मुखामाजी हात। वाद्ये वाजती नाइके जनमात।
करी श्रवण कृष्णवेणुगीत। स्वामी तुकयाचा पुरवोल मनोरथ वो ॥ ४ ॥
१ सखिया वशिया होतिया, २ तटस्त

१९६ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - मिस-निमित्त, चिरें-कपडे, तटस्थ-तटस्थ, दंतधावन-दात घासणे
अर्थ - या श्रीकृष्णाबरोबर गाई व गोपाळ हे यमुनेचे पाणी पिण्यासाठी नदीच्या तीरावर सर्व मिळून येतात
व चौगुणांचा चेंडू वाळवंटात खेळू लागतात अशा या श्रीकृष्णास चला आपण पाहू या असे त्या गोपी परस्परांत
म्हणू लागल्या १ अशा या गोपी त्या भगवंताविषयो कामातुर झाल्या असून त्यांचे चित्त विव्हळ झालेले असते
हरीला पाहण्यासाठीच त्या पाणी भरण्याचे निमित्त करून बारा सोळा गोपिका यमुनेच्या तीरावर येतात २ पण
त्यांचे लक्ष जर श्रीकृष्णमूर्तीकडेच एकसारखे लागलेले असल्याने त्या कपडे किंवा धोळधा धुण्याचे विसरूनच जात
आपले कूळ काय, आपली जात कोणती याची आठवणही त्यांना श्रीकृष्णवेधात उरत नसे त्या सर्व गोपिकांच्या
डोळ्याची पाती श्रीकृष्णदर्शनाने तटस्थ, स्थिर बनली होती ३ कुणी गोपिका दात घासत होत्या, त्यांचा हात मुखा-
तच राहिला तिये माना यांचे वाजत होती तो आवाज लोकांच्या गलबल्यामुळे कमी वाटत होता परंतु पुरुषाचा
स्वामी हा श्रीकृष्ण सर्वांचे मनोरथ पूर्ण करील या सर्व गोपी त्याचे वेणुगीत ऐकण्यात तल्लीन झाल्या होत्या ४
३९७ कोठें मी तुझा धरू गेले संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥ १ ॥
सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ २ ॥
रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोवतीं मी ते माझी ॥ ३ ॥
तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला । बोलोंच अबोला करूनिया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - संग-सोबत, गोवळा-गोपाळा
अर्थ - या कृष्णाची संगत कुठून मी धरली असे मला झाले आहे त्यामुळे सारे जग माझ्या पाठीमागे लागले
आहे १ अरे अवगुणी गोपाळा, दूर सर ना तू येथे कसलेही खोटे चाळे करू नकोस २ तुझ्या रूपलावण्याच्या नेध
मला लागल्याने माझी चित्तवृत्ती तुझ्या स्वरूपीं जडली आहे रे तिला मी व माझे भाव दिसेनाने झाले आहेत ३
तुकाराम महाराजांचा हा स्वामी आता त्याच्या जीवात जाऊन स्थिर झाला आहे त्याच्या बोलण्यातच अबोला आहे ४
३९८ गोड लागे परी सांगताचि न ये । बैसें मिठी सये आवडीची ॥ १ ॥
वेधलें वो येणे श्रीरंगरंगें । मीमाजी १ अगें हारपलीं ॥ २ ॥
परतेचि ना दृष्टी बैसली ते ठायीं । बिसावोनि पायीं ठेले मन ॥ ३ ॥
तुकयाच्या स्वामीसवे झाली भेटी । तेंव्हा झाली तुटी मागिल्याची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सये-सखे, आवडीची-प्रेमाची, वेधले-हरून घेतले
अर्थ - या श्रीकृष्णाची संगत इतकी गोड आहे की ती किती गोड आहे हे सांगताच येत नाही सखे, प्रीतीची
मिठी त्याच्या पायाशीच मी मारली आहे १ या श्रीरंगाने माझे चित्त हरून घेतले आहे माझी सर्व अंगे विकारा-
सहित माझ्यातच सामावली आहेत २ त्याच्या ठिकाणी जी एकदा दृष्टी स्थिर झाली ती पुन परत वळतच नाही
त्याच्याच पायाशी मन विसावले आहे ३ तुकयाच्या या स्वामीशी एकदा जीवाची भेट झाल्यानंतर मग पूर्वीचा
संबंध सर्व सुटतो ४
३९९ पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥ १ ॥
बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवू ॥ २ ॥
जीवा आवडे जीवाहुनि । नव्हे क्षण वेगळा ॥ ३ ॥
जाले विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नभा-आभाळात
१ मी हे माझी.

सार्थ तुकारामगाथा १९७
अर्थ:- आकाशासारखी निळसर अशी ज्याची शोभा आहे ती पाहावयास मी गेले होते तेव्हा त्याची शोभा
फारच चांगली दिसली १ तो माझ्या मनात बसला आहे म्हणून कोणी लावू नका. २ माझ्या जीवाला तो
स्वतःच्या गोपापेक्षा आवडतो. माझ्यापासून तो एक क्षणभरही वेगळा होत नाही ३ तुकयादासी ही त्याच्या
स्वामीसारखी, विश्वंभरासारखीच बनून गेली आहे. ४
४०० कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस म्हणे घ्या हरी ॥ १ ॥
देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ २ ॥
आपुलियाचा विसर भोळा । गोविंद फळा कौतुकें ॥ ३ ॥
तुका म्हणे हांसे जन । नाही कान ते ठायी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा.- भुलली-विसरली, फळा-कला
अर्थ :- कुणी एक गवळण श्रीकृष्णाच्या नादात इतकी रमून गेली, स्वतःस इतके विसरली की, डोक्यावरील
ओझे आठवून 'गोरस घ्या, दही दूध घ्या' असे म्हणायच्या ऐवजी ती 'श्रीहरी घ्या' असेच म्हणू लागली १ तिने जो
डोळ्यांनी पाहिला तोच तिच्या मनात स्थिर झाला असून तो तिच्या तोंडूनही उच्चारला जात आहे. २ तिला
स्वतःला आपला विसर पडला व ती गोविंदाच्या फलकौतुकात रममाण झाली ३ तुकाराम महाराज म्हणतात,
या तिच्या कृत्यास लोक हसतात तरी ती त्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांच्याकडे कानच देत नाही ४
४०१ करुनी आइत सत्यभामा मंदिरिं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे ।
न येचि देव येतील कामलहरी रे । पडिलो बुद्दिचिती तंव तो कवाड टिमकारी रे ॥ १ ॥
सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरते हे दाविसी लाघव रे ।
बोलतोसी ते अवघो तुझी माय रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ २ ॥
मीच वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा जाली काय रे ।
मागुती ब्रम्हासि भेटी दिली तंई रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि १तरी रे ॥ ३ ॥
भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे ।
नटा क्रिया नाहीं मी तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडचा कौसल्या रे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - आइत-सर्व सामग्रीची तयारी, सत्यभामा-श्रीकृष्णपत्नी, कवाड-दार, टिमकारी-धक्का
दिला, माय-गोटी माया, कानडा-न कळण्यासारखा
अर्थ - एके दिवशी श्रीकृष्णपत्नी सत्यभामेने रात्री आपल्या मंदिरात श्रीकृष्णभेटीसाठी सर्व प्रकारचा साज-
शृंगार करून तयारी केली व सबंध रात्र संपून गेली तरी ती कृष्णाची वाट पाहात बसली परंतु श्रीकृष्ण काही आले
नाहीत तिच्या अंगच्या कामलहरी वाढत राहिल्या ती अशा प्रकारे चिंतामग्न असतानाच दारावर कुणी तरी धक्का
दिला १ तेव्हा रागावून सत्यभामा त्या श्रीकृष्णास म्हणाली, 'दूर सरा तुम्ही, तुमची मजविषयी प्रीती आहे ती
समजली मला. केवळ कार्य साधण्यासाठी तुम्ही हे गोडीचे कौतुक दाखविता. पण तुम्ही जे बोलता ते सर्व खोटेच
असते जाणूनबुजून जनु माझी थट्टा करण्यासाठीच तुम्ही उजाडता उजाडता आलात २ पण याचा बोल तुम्हास
देऊन काय उपयोग ? मी भोळी वेडी ना ! नारदास मी तुमचे दान दिले तेव्हा माझी विटंबना झाली ती पुरी वाटली
नाही. पुनः ब्रह्मास भेट दिली त्यावेळीही अशीच विटंबना माझी झाली असे असून अजूनही मी तुमच्यावर विश्वास
ठेवीत आहे हेच माझे चुकले ना. ३ माझा सर्व भ्रम होता तो आता समजला, दूर झाला मी तुम्हास भला मानून
चालत होते. पण तुमची क्रिया तुमच्या बोलण्याप्रमाणे नाही असे मला कळून आल्यामुळे तुम्ही नटाप्रमाणेच मला
वाटता. तुकया बंधूचा हा स्वामी सहजासहजी न समजणारा असून मोठा खुशाल आहे. ४
१ नाही

१९८ सार्थ तुकारामगाथा
विवरण - सत्यभामा ही श्रीकृष्णाची एक पट्टराणी तिने एक नाजूक तक्रार या अभंगात केलेली आहे
श्रीकृष्णभेटीसाठी आसुसलेल्या चित्ताने ती रात्री वाट पाहात असताना मध्यरात्र उलटून गेली तरी श्रीकृष्ण आला
नाही म्हणून ती रागवली आहे श्रीकृष्ण इतर नायिकाच्या बहुधा रुक्मिणीच्या मंदिरातच रमला असावा अशा
शंकेने ती व्यथित होऊन त्याला रागावून बोलत आहे याच वेळी नारदास देण्याच्या तुलादानाचे समयी सर्व
दागिन्यानी भरलेली पण समतोल न झालेली व रुक्मिणीच्या तुलसीपत्राने समतोल झालेली तुला ध्यानात येताच ती
रुष्टी झालेली आहे या आपल्या विटंबनेची खंत तीव्र वेदना तिच्या मनात होती नारदानी स्वर्गांतून आणलेली
पारिजातपुष्पे कृष्णास दिली ती त्याने सत्यभामेशिवाय इतर स्त्रियाना दिली नाही कृत्याचा राग सत्यभामेस आला
तिच्या रागाची अशी निमित्ते वारंवार उमटलेली दिसतात त्यातील एक बारीक निमित्त बुवांनी या अभंगात साकार
केले आहे येथून पुढचे काही अभंग 'तुकयाबंधू' या नावाने मुद्रांकित झाले आहेत याचा अर्थ तुकारामबंधू म्हणत
आहे किंवा तुकारामबंधू सांगत आहे असा घेता येतो तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा नावाचे होते त्यांनीही
काही अभंग केले असावेत या कान्होबाचा उल्लेखही पुढे काही अभंगातून आहे हा कान्होबा शब्द श्रीकृष्णवाचक
दितो व तुकोबाच्या बंधूचा उल्लेख म्हणून किती हे सांगणे कठिण आहे
४०२ तव तो हरि म्हणे वो निजगाने वो । लाइ नीच का देसीस डोहणे वो ।
मजपें दुजें आलें ते देव जाणे वो । शब्द फाय हे बोलसी ते उणे वो ॥ १ ॥
पाहा मनीं विचारूनी आधि वो । साडूनि देईं¹ भ्रांति करों स्थिर बुद्धि वो ।
तट केले हे माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आजुनि तरी घरी शुद्धि वो ॥ २ ॥
कोठें तरी दुनियांत वर्तले वो । स्त्रियानों भ्रतारा दाना दिले वो ।
फंसा भला मी नव्हे ते सोसिंले वो । रुसतेसी² तू उफराटें नवल जाले वो ॥ ३ ॥
काय सांग म्या दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वं आणविले हनुमंतासि वो ।
कष्टी केले मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधू म्हणे खरे खोटें नव्हे यासि वो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लाइ- अति, डोहणे-टोमणे, मजपें-मजकड तट-बडबड तटा
अर्थ - सत्यभामेचे वरील भाषण ऐकून तो श्रीकृष्ण मग तिला म्हणाला, प्रिये असे अति वाईट बोलून
मला टोमणे का देतेस ? माझ्याकडे दुसरे कुणी आले असेल तर एक देवच जाणे उगाच उणेदुणे शब्द का बोलतेस
मला ? १ तू मनात तुझा विचार करुन पाहा ना सर्व भ्रम सोडून तुझी बुद्धी स्थिर करुन पाहा आजपर्यंत तुझे माझे
अशी बडबड करुन जो तटा केलास त्याचा काय उपयोग ? नीट डोळे उघडून अजून तरी शुद्धीवर ये ना २ असे
कुठे तरी जगात घडले आहे का ? स्त्रियांनी आपल्या पतीचे दान दिल्याचे कुठे कधी घडले का ? पण ती गोष्ट तू
केलीस ; व मी ती सोसली असा पाहा मी किती चांगला आहे असे सांगून तूच रुसतेस माझ्यावरच हा उलटाच
न्याय म्हणायचा नवलच म्हणायचे ३ सांग बरे, मी काय तुझी विटंबना केली ? तुझा गर्व दूर व्हावा म्हणून मी
हनुमंताला आणले यावेळी हनुमंत व गरुड यांच्यात भांडण होऊन गरुडास किती त्रास झाला बरे मलाही राम
होण्यासाठी, रुक्मिणीस सीता होण्यासाठी किती त्रास झाला ? तुकयाबंधू म्हणत आहे, खरेच खऱ्याखोट्याचा
निवाडाच कुणी करीत नाही ४
४०३ तव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो। नवाजिले³ तुम्हीं म्हणा आपणासि वो ।
तरी कां वचनुक सुमनासि वो । नट नाटय बरे सपादू जाणतोसि⁴ वो ॥ १ ॥
सर हो परता परता⁵ हो आता हरी । म्हणे सनाजिताची कुमरी ।
जाणतें मी या शब्दाच्या कुसरी। ऐसेच करून ठकविले आजिवरी ॥ २ ॥
१ दहेभ्रांती, २ रमसी ते ३ नावाजीत होता आपणासी ४ जाणसी परी, ५ आता हरी आता हो,