सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा १४९
अणीक एक कोड । नरका जावयाची चाड ।
तरी सतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥ ४ ॥
तुक म्हणे ऐसे । मना लायी राम पिसें ।
नाहीं तरी आलिया सायासे । फुकट जासी ठकोनी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - कोड-हौंस, राम पिस-देवाची आवड, सायासे-प्रयत्नाने, ठकोनी-फसून
अर्थ - अरे गृहस्था, हा नरजन्म फुकट जावा असे तुला वाटत असेल तर तूं द्यूत खेळ ना सारीपाटाचा
डाव मांडून सारखा बैस १ मग देवाचे नाव कसले आले आहे? जागा असून झोपल्याचे सोंग जो करतो त्यास कुठला
राम ? कुठला देव ? असा हा मनुष्य जन्मोजन्मीचाच अधम समजावा. त्याने फार मोठ्या दुःखाचे साधन करून
ठेविलेले असते २ जो विषयसुखाविषयी लंपट आहे, दासींशी सबंध ठेवण्यात जो धीट आहे त्याच्या आयुष्याची
वाट अशीच अधोगतीचीच मानावयास हवी ३ आणखी कुणास नरकासच जायची हौस असेल तर नेहमी कौतुकाने
संताची निंदा करावी म्हणजे ठीक होईल ४ तुकाराम महाराज म्हणतात, अरे, तुझ्या मनाला रामाचे वेड लावून
घे ना नाही तर मोठ्या प्रयत्नाने मिळालेला हा नरजन्म फुकट जाईल ना ! विनाकारण फसशील ना तूं ५
३०८ अवघें ब्रह्मरूप रिता नाही ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥ १ ॥
नाहीं भाव तया सांगावे तें किती । आपुल्याला मतीं पाषाडिया ॥ २ ॥
जया भावें सत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकासि ॥ ३ ॥
तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळता खळीं दूषिला देव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - रिता-रिकामा, ठाव-स्थान, प्रतिमा-मूर्ती, पाषाडिया-नास्तिकांना, अनुमोदन-अनुभव,
खळीं-दुष्ट लोकांना
अर्थ - सर्व जगच ब्रह्मरूप आहे रिकामी जागा कुठही नाही, असे असताना मूर्तीत देव नाही असे कसे
म्हणता ? १ ज्याच्या मनांत भावच नाही, त्यांना सांगावे तरी किती ? असे नास्तिक लोक आपापल्या मतालाच
धरून असतात २ सत ज्या भावनेने बोलतात त्याची प्रचीती केवळ शब्दांतून कल्पून घेणारांना येत नाही ३
तुकाराम महाराज म्हणतात, संतानी केवळ भावालाच बलवान केले, महत्त्व दिले पण हे रहस्य न कळल्यामुळे
दुष्ट लोकांनी देवालाच दूषण दिले ४
विवरण - तुकारामादा मत हे सगुण ध्यानाचे मोठे उपासक हात निर्गुण, निराकारास आपल्या आवडयासाठी
देव व भक्त याच्या रूपान प्रकट झाला सगुणावर ध्यान केंद्रित करण सुलभ झाल हा देव भक्ताला आलिंगन देण्या
साठी दोन मांडून चार हात धारण करून प्रकट होत राहिंग यास नाना आकारानी व रूपानी सौदर्य प्राप्त झाल
देवाची खूण म्हणून एखादी मूर्ती वा एखादी प्रतिमा समोर आली म्हणून काही बिघडले असे नाही मवत्र ब्रह्मतत्त्व
पसरल आहे जिथा ब्रह्मतत्त्वच गच चराचर विश्वात व्यत्त झाले आह असे असेल तर प्रतिमेत किंवा मूर्तीत ते नाही
असे म्हणता येणार नाही मग मूर्तीवर भाव ठेवून तिची भजनी केल्यास बिघडले कुठे ? असा तुकारामाच्या म्हणण्याचा
भावार्थ, अधिक विवरण क्र २६२ च्या अभंगावरील पाहावे
३०९ एक तटस्थ मानसीं । एक सहजचि आळसी ॥ १ ॥
दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ २ ॥
एक ध्यानीं करितो जप । एक बैसुनि घेती झोप ॥ ३ ॥
एका सर्वस्वाचा त्याग । एका पोटासाठीं जोग ॥ ४ ॥
एका भक्ति पोटासाठीं । एका देवासवें गाठी ॥ ५ ॥
वर्म पोटीं एकां । फळें दोन म्हणे तुका ॥ ६ ॥

१५० सार्थ तुकारामगाथा ८
शब्दार्थ व टीपा - मानसीं-मनात, वर्म-खूण, रहस्य, जोग-भिक्षा
अर्थ - कुणी एक मनुष्य तटस्थ राहून ध्यानात मग्न आहे व दुसरा स्वभावत च आळशी आहे १ ही
दोनही माणसे एकसारखी वरवर दिसतात पण दोहोंच्यांतील फरक जाणणारे असतात तेच खरे पारख करणारे होत २
कुणी खरोखरीची ध्यानधारणा करतात, जपजाप्य करतात व दुसरे नुसतीच झोप काढतात, पण दोहोंत फारच
फरक आहे ३ एकाचा त्याग सर्वस्वाचा असून चित्त प्रभूशी रममाण झालेले असते, तर दुसऱ्या ढोंगी माणसाचे
काम केवळ पोटासाठी भिक्षा मागण्याचे होते ४ एकाची भक्ती पोटासाठी असते, तर दुसऱ्याची देवाची भेट
घेण्यासाठी असते ५ या शब्दांतील रहस्य तुकाराम महाराज म्हणतात असे आहे की, वरवर एकसारख्या
दिसणाऱ्या कर्माचे फळ मात्र भिन्न भिन्न असते ६
३१० काय फळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥ १ ॥
आहे नाहीं हे न फळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ २ ॥
देखिले तें दृष्टी । मागे घालूनिया मिठी ॥ ३ ॥
तुका म्हणे भावे । माझ्या मज समजावे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - सदैव-भाग्यवंत
अर्थ - आपला बाप भाग्यवंत आहे की दुबळा दरिद्री आहे, हे काय लहान मुलाला समजत नसते ? १
आपण मागीत आहोत ती वस्तू बापाजवळ आहे की नाही हे काय त्यावेळी मुलाला समजत असते का ? २
त्याला एवढेच माहीत असते की, जे पाहिले ते मागायचे, बापाला मिठी घालून त्याचा हट्ट धरायचा ३ तुकाराम
महाराज म्हणतात, देवा, याच भावाने मी तुम्हास मागत आहे माझी समजूत काढावी ४
३११ भजन घाली भोगावरी । अकर्तव्य¹ मनीं धरी ॥ १ ॥
धिग त्याचे साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ २ ॥
नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जीवे आस² ॥ ३ ॥
हे ना ते से जाले । तुका म्हणे वाया गेले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अकर्तव्य-जे करू नये ते कर्म जीर्वे-मनापासून, जीवे-जिवंत राहता
अर्थ - या माणसाचे भजन भोगासाठीच असते जे कर्म करू नये त्यासाठी, भोगासाठीच ज्याचा तर्कही
करता येणार नाही अशाच्या प्राप्तीसाठीच हे भजन त्याचे असते १ अशा माणसाच्या साधुपणाचा धिक्कार असो
त्याचे मन विटाळूनच जगात वावरत असते २ त्याच्या मनात वैराग्याचा लेशही नसतो त्याला पैशाची हास मना
पासून असते त्यासाठीच तो जगत असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाला काही प्राप्त होत नाही
त्याला इहलोकी समाधान मिळत नाही त्यास परलोकातही स्थान नसते त्याचे जीवितच वाया गेलेले असते ४
३१२ एकादशीस अन्न पान । जे नर करीती भोजन ।
श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥ १ ॥
ऐका व्रताचे महिमान । नेमें आचरती जन ।
गाती ऐकती हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ २ ॥
अशुद्ध विटाळसीचे फळ । विष्ठा भक्षिता तांबूल ।
सापडे सबळ । काळहातीं न सुटे ॥ ३ ॥
सेज चाज विलास भोग । करी कामिनींशीं संग ।
तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी मळिवंत ॥ ४ ॥
१ अकर्तव्य त २ जीवे आस

सत्य तुकारामगाथा १५१
आपण न वजे हरिकीर्तना । अणिका वारी जातां कोणा ।
त्याच्या पापें आणा । ठेंगणा महा मेरु ॥ ५ ॥
तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - अधम-दुष्ट खळ-दुष्ट, न वजे-जात नाही, वारी-अडथळा आणतो
अर्थ - जे लोक एकादशीच्या दिवशी अन्न खातात, सुग्रास अन्नाचे भोजन करतात, त्यांचे खाणे कुत्र्याच्या
विष्ठेप्रमाणे समजावे ती माणसेही अधमच म्हणावीत १ या थोर एकादशी व्रताचे माहात्म्य ऐका याचे आचरण
लोक नित्यनेमाने करतात या दिवशी लोक परमेश्वराचे कीर्तन करतात, स्वतः त्याचे स्तवन गातात, ऐकतात असे
लोक प्रत्यक्ष विष्णूसारखेच होत २ या दिवशी विडा खाल्ला तर ते खाणे विडाळणीच्या विष्ठाळाप्रमाणे अशुद्ध
मानावे असा पापी मनुष्य कलिष्ट अशा यमाच्या हातांतच सापडत असतो तो काही त्याच्या हातून सुटणार नाही ३
या दिवशी जो खाली शय्या करून स्त्रीशी विलास भोग करतो त्याला क्षयरोग जडतो त्याला जन्माच्या भयंकर अशा
व्याधी जडतात ४ असा हा दुष्ट मनुष्य आपण स्वतः हरिकीर्तनास तर जात नाहीच, पण दुसरे कोणी जात असतील
तर तो अडथळा आणतो याची पापे फार मोठी असतात, त्याच्यापुढे मेरुंपर्यंत ठेंगणाच वाटावा ५ त्याला
यमदूत नेहमीच शिक्षा देतात, ते त्याचेच अंकित होतात तुकाराम महाराज म्हणतात, एकादशी व्रत न केल्यान
असा हा परिणाम होतो ६
विवरण - भागवत संप्रदायात एकादशी महाव्रताचे माहात्म्य फार मोठे सांगितले आहे या दिवशी उपवास
करून दिवस व रात्र हरिभजनात, नामसंकीर्तनात, प्रभूचिंतनात घालविण्याचा प्रघात आहे विठ्ठलाच्या भक्तांना
या एकादशीचे महत्त्व विशेष वाटते मन व वाणी पवित्र असावी, ध्यानधारणा सुलभ व्हावी आत्मचिंतनास सुकरता
यावी म्हणून एकादशीचा उपवास सागितला आहे तुकोबांनी या एकादशी माहात्म्यास वारंवार उचलून धरले आहे न
यासाठीच 'जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत याव लोकीं', 'एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण
त्याची गति होईल नेणा' 'पंधरा दिवसा एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार।' इत्यादी ओळींतून त्यांना
एकादशीचे महत्त्व सांगितले आहे एकनाथानी एकादशीमाहात्म्य नावाच स्वतंत्र प्रकरणच लिहिले आहे 'अनंत
व्रतांचिया राशी । पाया लागतो एकादशी।' अस म्हणून एकादशी व्रत कस आचराव हेही त्यांनी विम्तारान सांगी
तले आहे तुकारामबोवाप्रमाणेच त्यांनीही म्हटले आहे,
ज्यासी न माने एकादशी । तनू जाणावी ती राक्षसी । त्यासी संपती घडे ज्यासी । नरकयासी तो होय ॥ ज
एकादशीस भक्षिती अन्न । ते श्वानविष्ठेसमान । तांबुल तें रुधिरपान । रजस्वले स्त्रियेचें । एकादशीस स्त्रीभोग ।
क्यासी लागे क्षयरोग । यमयातना दुःखें अनेक । व्यथा जगीं तो पावे ॥ जो विंदो एकादशी । नरका जाणे न लागे
त्यासी । तो स्वयेंचि नरपदासी । म्हणो आल्हाळा ॥
उलट जे एकादशी व्रत नियमाने करतात त्याचे भाग्य कसे असते ? एकनाथांनीच वणन कल आह
'जो एकादशी व्रत धरी । तो अतिशय पवित्र हरी । या लागी देव त्याचे घरीं । निरंतरी तिष्ठत ॥ जथें
राहिले हरि वरिष्ठ । तोचि आश्रम होय श्रेष्ठ । ब्रह्मानंदें पिकली पेठ । ग्राहक तेथें हरिभक्त ॥ ऐसे एकादशीचे
व्रत । निर्विकल्प पा आचरत । त्याचे घरों हरि तिष्ठित । कातेसहवर्तमान ॥ माघरी एकादशी । भक्त उद्धरती
दोन्ह पक्षीं । मोक्षांचिया राशी । तिथियात्रा जोडिती ॥ घरों जरी व्रतासी दृढभाव । तरी सबाह्य प्रकट देव ।
वदनी संसार चाय । निजात्मठाय निजपदों ॥ जो एकादशीचा व्रती, त्यासी तीर्थे पें सेधिती । तेथे पुण्यं भगव प्राप्ती ।
क्षणमात्र न लागता ॥'
या एकादशी व्रताची कथा व माहात्म्य याच वर्णन पुराणांतून आले आहे भागवताच्या नवम स्कंधातील
अध्याय चार ते सहामध्ये अंबरीष राजाचे आख्यान आले आहे द्वादशीच्या दिवशी त्याच्या येथे दुर्वास ऋषी अतिथी
म्हणून आले त्यांना भोजनाम येण्यास उशीर झाला, पण व्रतभंग होऊ नये म्हणून या भगवद्भक्त राजाने तोय पाऊन

१५२ सार्थ तुकारामगाथा
एकादशी सोडली त्यामुळे दुर्वास रागावले आपल्या जटेतून त्यांनी एक कृत्या निर्माण करून अंबरीषावर सोडली
राजा विष्णुभक्त असल्यामुळे सुदर्शनचक्र दुर्वासाच्या पाठीमाग लागले दुर्वास घाबरून अखेर राजाकडे आले एक
वर्षाच्या उपवासानंतर त्याने मग दुर्वासासह भोजन करून पारणे फेडले हा अंबरीष राजा असा विष्णुभक्त होता हा
बार्शी येथील राहणारा असून वारकरी पंथीयांना बार्शीच्या भगवानाचे दर्शन यासाठीच प्रिय आहे
३१३ करवितां व्रत अर्धं पुण्य लाभे । मोडवितां दोघें नरका जाती ॥ १ ॥
शुद्धबुद्धि होय' दोघा एक मान । चोरासवे कोण जिवे राखे ॥ २ ॥
आपुले देऊनी आपुलाचि घात । न करावा थीत जाणोनिया ॥ ३ ॥
देउनिया वेच धाडी वाराणसी । नेदावे चोरासि चंद्रवळ ॥ ४ ॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडू नये ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - थीत-व्यर्थ, वेच-खर्च, चंद्रबळ-चंद्राचे बळ मारग-मार्ग
अर्थ - कुणाकडून का होईना पण एखादे व्रत करविले तर त्यास अर्धे पुण्य लागते त्या व्रताचा भंग केला
तर मात्र दोघेही नरकास जातात १ दोघांचीही बुद्धी शुद्ध असली तरच दोघांची मनेही एकच होतात चोराच्या
संगतीत कुणाला स्वतःच्या जिवाची शाश्वती वाटणार ? २ आपले देऊन आपलाच घात होणार असेल तर तसे
व्यर्थ न करणे हेच योग्य नाही का ? ३ एकादा काशीयात्रेस जात असेल तर त्याला खर्चासाठी पैसे देऊन पाठवावे
पण चोरास मात्र चंद्राचे बळ अनुकूल असल्याचेही सांगू नये ४ तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थव्रत याग हा
भक्तीचा माग आहे, तो सोडू नये कधी ५
३१४ इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥ १ ॥
अवघेची येती वाण । अवघें शकुन लाभाचे ॥ २ ॥
अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वाण-जिनस उरी-बाकी
अर्थ - या पंढरपुरात भक्तजनांचे घनदाट माग सुरू झाले आहेत ही एक त्याची इनामाची पेठच आहे १
या पेठेत सर्व वस्तू येतात येथे सर्व शकुन लाभदायक होतात २ या ठिकाणी सर्व प्रकारच्या अडचणी दूर
होतात, देण्याघेण्यातील बाकी येथे काही उरत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या पेठेत ज्याने आपला
स्वतःचाच लाभ करून घेतला तो धन्य होय ४
३१५ वेदाचे गह्वर न कळे पाठका । अधिकार लोकां नाहीं येरा ॥ १ ॥
विठोबाचे नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ २ ॥
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र फाळ । येर तो सकळ मूढ लोक ॥ ३ ॥
तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गह्वर-अतरंग मम सोपारें-सोपे एकसरें-एकदम
अर्थ - नुसते शब्द पाठ करणाऱ्या शास्त्रीपंडितांना वेदाचा अर्थ समजत नाही व दुसऱ्याही लोकांना त्याचा
अधिकार नाही १ एका विठ्ठलाचेच नांव सहज, सुलभ व सोपे आहे ते एकदम संसारसागर तरून नेण्यास समर्थ
आहे २ जे केवळ मंत्र, तंत्र काळवेळ मानाच म्हणतात त्यांना मात्र हे असाध्य आहे, व इतर लोक तर मूर्खच
आहेत ३ तुकाराम महाराज म्हणतात विधिनिषेध सपल्यामुळे या मार्गाचा नाग झाला आहे ४
१ दोघा होय

३. नाम-स्मरण व संकीर्तन महिमा

सार्थ तुकारामगाथा १५३
३१६ विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥ १ ॥
मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ २ ॥
बहु अतिशय खोटा । तकें होती बहु वाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- विधीनें-योग्य मार्गानें, आदि-प्रारंभ, अवसान-शेवट.
अर्थ :- योग्य मार्गाने किंवा शास्त्र सांगेल त्या मार्गाने विषयसेवन केले तर ते विषयत्यागाएवढेच श्रेष्ठ
होय. १ या धर्माचे मुख्य रहस्य असे की देह धारण केल्यापासून तो तो नष्ट होईपर्यंत देवास मनात वागवावे हे उत्तम. २
कोणत्याही गोष्टीची अतिशय विचित्रता खोटी आहे; कारण केवळ बुद्धीच्या वाटेने, केवळ तर्काच्या मार्गाने
पुष्कळ पर्यायांच्या वाटा निर्माण होऊन कार्यनाश मात्र होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराविषयी एक-
चित्ताने भाव ठेविल्यासच त्याची कृपा प्राप्त होते. ४
३१७ येथींचिया अलंकारें । काय खरें पूजन ॥ १ ॥
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व सांठा ते ठायीं ॥ २ ॥
येथींचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥ ३ ॥
तुका म्हणे वैष्णव जन । माहे गण समुदाय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-येथींचिया-या जगातील, साठा-साठा, गण-समुदाय
अर्थ - या लोकातील अलंकाराने भूषविणे हे काय खरे पूजन आहे ? हे तर सर्व नाश पावणारे अलंकार
होत १ म्हणून वैकुंठाच्या वाटा निर्माण करू. कारण सर्व सुखांचा साठा तिथे आहे. २ या जगातील सर्वच प्रकार
नाशवंत आहेत. मग त्यांच्या नादाने उगाचच लोकांना कशासाठी फसवू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवजन
किंवा विष्णुभक्त हाच माझा आवडता समुदाय आहे. तोच मला प्रिय आहे. ४
३१८ उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवड ॥ १ ॥
बोलविले बोल बोले । धनी विठ्ठला सन्निध ॥ २ ॥
तरी मनीं नाहीं शंका । वळें एका स्वामींच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-उजळावया-स्वच्छ करण्यासाठी
अर्थ :- भक्तिमार्गाच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी, त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठीच मी येथे आलो आहे.
मला खऱ्याखोट्याचा निवाडा करावयाचा आहे. १ ईश्वर, विठ्ठल हा माझा धनी आहे. तो ज्याप्रमाणे बोलवील
त्याप्रमाणे मी बोलतो. २ त्या माझ्या स्वामीच्या पाठबळामुळे मी बोलत असल्याने मला कसलीच शंका नसते ३
तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यापुढे गबाळघासारखे काम कधीच चालणार नाही. ४
विवरण- या एका लहानशा अभंगात तुकारामबुवा आपल्या आयुष्याचा हेतू स्पष्टपणे सांगत आहेत. आपण
जे बोलत आहोत तो देवाचाच निरोप आहे अशी भावना त्याची नेहमीच होती. भांडार फोडून तो धन्याचा माल
आपण भारवाहीप्रमाणे वाहतो अशी त्याची श्रद्धा होती जो कृपावंत सखा पांडुरंग तोच बोलविता असून आपली
वाणी त्याचीच आहे असे ते वारंवार सांगतात. ' नव्हती माझे बोल बोले पांडुरंग ।' अशी त्याची निष्ठा होती
आपण भक्तिमार्गाचा प्रसार करण्यास आलो आहोत, सत्याचा मार्ग स्वच्छ करावयास आलो आहोत, जग सर्व
आडरानात सापडले असून त्याच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी आपण आहोत असेही ते अनेकदा बोलतात
तु गाथा २०

१५२ | सार्थ तुकारामगाथा
एकादशी सोडली त्यामुळे दुर्वास रागावले आपल्या जटेतून त्यांनी एक कृत्या निर्माण करून अबरीषावर सोडली
राजा विष्णुभक्त असल्यामुळे सुदर्शनचक्र दुर्वासाच्या पाठीमागे लागले दुर्वास घाबरून अखेर राजाकडे आले एक
वर्षाच्या उपवासानंतर त्याने मग दुर्वासासह भोजन करून पारणे फेडले हा अबरीष राजा असा विष्णुभक्त होता हा
बार्शी येथील राहणारा असून वारकरी पंथीयांना बार्शीच्या भगवंताचे दर्शन यासाठीच प्रिय आहे
३१३ करविता व्रत अर्ध पुण्य लाभे । मोडविता दोघं नरका जाती ॥ १ ॥
शुद्धबुद्धि होय¹ दोघां एक मान । चोरासये कोण जियें राखे ॥ २ ॥
आपुले देऊनी आपुलाचि घात । न करावा धोत जाणोनिया ॥ ३ ॥
देऊनिया बेच धाडी वाराणसी । नेदावे चोरासि चंद्रबळ ॥ ४ ॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडू नये ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा. - धोत-व्यर्थ, वेच-खर्च, चंद्रबळ-चंद्राचे बळ, मारग-मार्ग
अर्थ - कुणाकडून का होईना पण एखादे व्रत करविले तर त्यात अर्धे पुण्य लाभते त्या व्रताचा भंग केला
तर मात्र दोघेही नरकास जातात. १ दोघांचीही बुद्धी शुद्ध असली तरच दोघांची मनेही एकच होतात चोराच्या
संगतीत कुणाला स्वतःच्या जिवाचो शाश्वती वाटणार ? २ आपले देऊन आपलाच घात होणार असेल तर तसे
व्यर्थ न करणे हेच योग्य नाही का? ३ एखादा काशीयात्रेस जात असेल तर त्याला खर्चासाठी पैसे देऊन पाठवावे
पण चोरास मात्र चंद्राचे बळ अनुकूल असल्याचेही सांगू नये ४ तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थव्रत, याग हा
भक्तीचा मार्ग आहे, तो सोडू नये कधी ५
३१४ इनामाची भरली पेठ । याहाती दाट मारग ॥ १ ॥
अवघेची येती याण । अवघं शकुन लाभाचे ॥ २ ॥
अडचणी त्या केल्या दुरी । वेच्या उरी घेण्याच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे जोडी झाली । ते आपुली आपणा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - याण-जितम, उरी-बाकी
अर्थ :-या पंढरपुरात भक्तजनांचे घनदाट मार्ग सुरू झाले आहेत ही एक त्याची इनामाची पेठच आहे !
या पेठेत सर्व वस्तू येतात येथे सर्व शकुन लाभदायक होतात २ या ठिकाणी सर्व प्रकारच्या अडचणी दूर
होतात, देण्याघेण्यातील बाकी येथे काही उरत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या पेठेत ज्याने आपला
स्वतःचाच लाभ करून घेतला तो धन्य होय ४
३१५ वेदाचे गह्वर न कळे पाठका । अधिकार लोका नाहीं येरा ॥ १ ॥
विठोबाचे नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ २ ॥
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥ ३ ॥
तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गह्वर-अंतरंग, मर्म सोपारे-सोपे, एकसरें-एकदम
अर्थ - नुसते शब्द पाठ करणाऱ्या शास्त्रीपंडितांना वेदाचा अर्थ समजत नाही व दुसऱ्यांतरे लोकाना त्याचा
अधिकार नाही १ एका विठ्ठलाचेच नांव सहज, सुलभ व सोपे आहे ते एकदम संसारसागर तरून नेण्यास समर्थ
आहे २ जे केवळ मंत्र, तंत्र शाळवेळ यांनाच जाणतात त्यांना मात्र हे असाध्य आहे, व इतर लोक तर मूर्खच
आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, विधिनिषेध संपल्यामुळे या मार्गांचा नाश झाला आहे ४
१ दोघा होय

सार्थ तुकारामगाथा १५३
३१६ विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥ १ ॥
मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ २ ॥
बहु अतिशय खोटा । तकें होती बहु वाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा .- विधीनें-योग्य मार्गानें, आदि-प्रारंभ, अवसान-शेवट
अर्थ :-योग्य मार्गानें किंवा शास्त्र सांगेल त्या मार्गानें विषयसेवन केले तर ते विषयत्यागाएवढेच श्रेष्ठ
होय. १ या धर्माचे मुख्य रहस्य असे की देह धारण केल्यापासून तो तो नष्ट होईपर्यत देवास मनात वागवाये हे उत्तम. २
कोणत्याही गोष्टीची अतिशय चिकित्सा खोटी आहे; कारण केवळ बुद्धीच्या वाटेने, केवळ तर्काच्या मार्गाने
पुष्कळ पर्यायाच्या वाटा निर्माण होऊन कार्यनाश मात्र होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराविषयी एका-
चित्ताने भाव ठेवल्यासच त्याची कृपा प्राप्त होते. ४
३१७ येथींचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥ १ ॥
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व सांटा ते ठायीं ॥ २ ॥
येथींचिया नाशवंतें । काय रिते चाळवून ॥ ३ ॥
तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण समुदाय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -येथींचिया-या जगातील, सांटा-साठा, गण-समुदाय
अर्थ - या लोकातील अलंकारानें भूपविणे हे काय खरे पूजन आहे ? हे तर सर्व नाश पावणारे अलंकार
होत १ म्हणून वैकुंठाच्या वाटा निर्माण करू. कारण सर्व सुखाचा साठा तिथे आहे. २ या जगातील सर्वच प्रकार
नाशवंत आहेत. मग त्याच्या नादाने उगाचच लोकांना कशासाठी फसवू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवजन
किंवा विष्णुभक्त हाच माझा आवडता समुदाय आहे. तोच मला प्रिय आहे. ४
३१८ उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥ १ ॥
बोलविले बोल बोले । धनीविठ्ठला सन्निध ॥ २ ॥
तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामींच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-उजळावया-स्वच्छ करण्यासाठी
अर्थ - भक्तिमार्गाच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी, त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठीच मी येथे आलो आहे.
मला खऱ्याखोट्याचा निवाडा करावयाचा आहे १ ईश्वर, विठ्ठल हा माझा धनी आहे. तो ज्याप्रमाणे बोलवील
त्याप्रमाणे मी बोलतो २ त्या माझ्या स्वामीच्या पाठबळामुळे मी बोलत असल्याने मला कसलीच शंका नसते ३
तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यापुढे गबाळमास्तरांचे काम कधीच चालणार नाही. ४
विवरण- या एका लहानशा अभंगात तुकारामबुवा आपल्या आयुष्याचा हेतू स्पष्टपणे सागत आहेत आपण
जे बोलत आहोत तो देवाचाच निरोप आहे अशी भावना त्याची नेहमीच होती भाडार फोडून तो धन्याचा माल
आपण भारवाहीप्रमाणे वाहतो अशी त्याची श्रद्धा होती जो कृपावत सखा पाडुरंग तोच बोलविता असून आपली
वाणी त्याचीच आहे असे ते वारवार सांगतात ' नव्हती माझे बोल बोले पाडुरग ।' अशी त्याची निष्ठा होती
आपण भक्तिमार्गाचा प्रसार करण्यास आलो आहोत, सत्याचा मार्ग स्वच्छ करावयास आलो आहोत, जग गर्व
लाडरानात सापडले असून त्याच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी आपण आहोत असेही ते अनेकदा बोलतात
तु गाथा २०

१५६ साथ तुकारामगाथा
──────────────────────────────────────────────────────────
नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । चिंतन तें तुझी सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वर्म-रहस्य भावें-तुजविषयीच्या भक्तिभावामुळे, कासवाचे परी-आपले सब अवयव
पोटाशी धरून कासव ज्याप्रमाणे असते तसे
अर्थ - देवा, तुझे रहस्य मला माझा जो तुजविषयी भक्तिभाव आहे त्यामुळे सापडले आहे १ कासवाप्रमाणे
मी सर्व अवयव आत धरून तुझे रूप मनात साठवून ठेवीन २ तुझ्या रूपाची व माझी तुटातूट होऊ देणार नाही दृष्टीने
दृष्टीस दृष्टी मिळवून राहीन ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमचे चिंतन हीच खरी तुमची सेवा आहे ४
३२५ गहू रुप जाती । परी त्या पाघाणी नासिती ॥ १ ॥
धर्म जाणावे ते सार । फोल काय थोडें फार ॥ २ ॥
कमाईच्या सारे । जाति दावितो प्रकार ॥ ३ ॥
तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -पाघाणी-आडाणी वायटा, कमाई-मेहनत

सार्थ तुकारामगाथा १५३
३१६ विधींनें सेवन । विषयत्यागातें समान ॥ १ ॥
मुख्य धर्म ठेव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ २ ॥
बहु अतिशय खोटा । तकें होती बहु वाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा :- विधीने-योग्य मार्गाने, आदि प्रारंभ, अवसान-शेवट
अर्थ:- योग्य मार्गाने किंवा शास्त्र सांगेल त्या मार्गाने विषयसेवन केले तर ते विषयत्यागाएवढेच श्रेष्ठ
होय. १ या धर्माचे मुख्य रहस्य असे की देह धारण केल्यापासून तो तो नष्ट होईपर्यंत देवास मनात वागवावे हे उत्तम. २
कोणत्याही गोष्टीची अतिशय चिकित्सा खोटी आहे; कारण केवळ बुद्धीच्या वाटेने, केवळ तर्काच्या मार्गाने
पुष्कळ पर्यायांच्या वाटा निर्माण होऊन कार्यनाश मात्र होतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वरविषयी एक-
चित्ताने भाव ठेविल्यासच त्याची कृपा प्राप्त होते. ४
३१७ येथींचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥ १ ॥
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व सांटा ते ठायीं ॥ २ ॥
येथींचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥ ३ ॥
तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण समुदाय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा -येथींचिया-या जगातील, सांटा-साठा, गण-समुदाय
अर्थ - या लोकातील अलंकाराने भूषविणे हे काय खरे पूजन आहे? हे तर सर्व नाश पावणारे अलंकार
होत. १ म्हणून वैकुंठाच्या वाटा निर्माण करू. कारण सर्व सुखाचा साठा तिथे आहे. २ या जगातील सर्वच प्रकार
नाशवंत आहेत. मग त्यांच्या नादाने उगाचच लोकांना कशासाठी फसवू? ३ तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवजन
किंवा विष्णुभक्त हाच माझा आवडता समुदाय आहे. तोच मला प्रिय आहे. ४
३१८ उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥ १ ॥
बोलविले बोल बोले । धनीविठुला सन्निध ॥ २ ॥
तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामींच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गवाळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा :- उजळावया स्वच्छ करण्यासाठी
अर्थ - भक्तिमार्गाच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी, त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठीच मी येथे आलो आहे-
मला खऱ्याखोट्याचा निवाडा करावयाचा आहे. १ ईश्वर, विठ्ठल हा माझा धनी आहे. तो ज्याप्रमाणे बोलवील
त्याप्रमाणे मी बोलतो. २ त्या माझ्या स्वामीच्या पाठबळामुळे मी बोलत असल्याने मला कसलीच शंका नसते ३
तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यापुढे गबाळघासारखे काम कधीच चालणार नाही. ४
विवरण-या एका लहानशा अभंगात तुकारामबुवा आपल्या आयुष्याचा हेतू स्पष्टपणे सांगत आहेत आपण
जे बोलत आहोत तो देवाचाच निरोप आहे अशी भावना त्याची नेहमीच होती भाडार फोडून तो धन्याचा माल
आपण भारवाहीप्रमाणे वाहतो अशी त्याची श्रद्धा होती. जो कृपावत सखा पाडुरंग तोच बोलविता असून आपली
वाणी त्याचीच आहे असे ते वारंवार सागतात ' नव्हती माझे बोल बोले पाडुरंग ।' अशी त्याची निष्ठा होती
आपण भक्तिमार्गाचा प्रसार करण्यास आलो आहोत, सत्याचा मार्ग स्वच्छ करावयास आलो आहोत, जग सर्व
आडरानात सापडले असून त्याच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी आपण आहोत असेही ते अनेकदा बोलतात
तु. गाथा.. २०

१५२ सार्थ तुकारामगाथा
एकादशी सोडली. त्यामुळे दुर्वास रागावले. आपल्या जटेतून त्यांनी एक कृत्या निर्माण करून अंबरीषावर सोडली
राजा विष्णुभक्त असल्यामुळे सुदर्शनचक्र दुर्वासाच्या पाठीमागे लागले दुर्वास घाबरून अखेर राजाकडे आले. एक
वर्षाच्या उपवासानंतर त्याने मग दुर्वासासह भोजन करून पारणे फेडले. हा अंबरीष राजा असा विष्णुभक्त होता हा
बार्शी येथील राहणारा असून वारकरी पथीयोना बार्शीच्या भगवानाचे दर्शन यासाठींच प्रिय आहे
३१३ करवितां व्रत अर्धं पुण्य लाभे । मोडवितां दोघें नरका जाती ॥ १ ॥
शुद्धबुद्धि होय' दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ २ ॥
आपुलें देऊनी आपुलाचि घात । न करावा थीत जाणोनियां ॥ ३ ॥
देऊनियां वेच धाडी वाराणसी । भेदावें चोरासि चंद्रबळ ॥ ४ ॥
तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोहूं नये ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- थीत-व्यर्थ, वेच-खर्च, चंद्रबळ-चंद्राचे बळ, मारग-मार्ग
अर्थ - कुणाकडून का होईना पण एखादे व्रत करविले तर त्यात अर्धं पुण्य लागते. त्या व्रताचा भंग केला
तर मात्र दोघेही नरकास जातात. १ दोघांचीही बुद्धी शुद्ध असली तरच दोघांची मनेही एकच होतात. चोराच्या
संगतीत कुणाला स्वत.च्या जिवाची शाश्वती वाटणार ? २ आपले देऊन आपलाच घात होणार असेल तर तसे
व्यर्थ न करणे हेच योग्य नाही का ? ३ एखादा काशीयात्रेस जात असेल तर त्याला खर्चासाठी पैसे देऊन पाठवावे
पण चोरास मात्र चंद्राचे बळ अनुकूल असल्याचेही सांगू नये. ४ तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थव्रत, याग हा
भक्तीचा मार्ग आहे; तो सोडू नये कधी. ५
३१४ इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥ १ ॥
अवघेची येती वाण । अवघें शकुन लाभाचे ॥ २ ॥
अडचणी त्या केल्या दुरी । येण्या उरी घेण्याच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वाण-जिन्नस, उरी-बाकी
अर्थ :-या पंढरपुरात भक्तजनांचे घनदाट मार्ग सुरू झाले आहेत. ही एक त्याची इनामाची पेठच आहे १
या पेठेत सर्व वस्तू येतात. येथे सर्व शकुन लाभदायक होतात. २ या ठिकाणी सर्व प्रकारच्या अडचणी दूर
होतात, देण्याघेण्यातील बाकी येथे काही उरत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या पेठेत ज्याने आपला
स्वतःचाच लाभ करून घेतला तो धन्य होय ४
३१५ वेदाचे गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥ १ ॥
विठोबाचें नाम सुलभ सोपारे । तारी एक सरे भवसिंधू ॥ २ ॥
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥ ३ ॥
तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- गव्हर-अंतरंग, मर्म, सोपारें-सोपे, एकसरें-एकदम
अर्थ - नुसते शब्द पाठ करणाऱ्या शास्त्रीपंडितांना वेदांचा अर्थ समजत नाही व दुसऱ्याही लोकांना त्याचा
अधिकार नाही. १ एका विठ्ठलाचेच नांव सहज, सुलभ व सोपे आहे. ते एकदम संसारसागर तरून नेण्यास समर्थ
आहे. २ जे केवळ मंत्र, तंत्र काळवेळ यानाच जाणतात त्यांना मात्र हे असाध्य आहे; व इतर लोक तर मूर्खच
आहेत. ३ तुकाराम महाराज म्हणतात, विधिनिषेध संपल्यामुळे या मार्गांचा नाश झाला आहे. ४
१ दोघां होय.

सार्थ तुकारामगाथा १५३
३१६ विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥ १ ॥
मुख्य धर्म ठेव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ २ ॥
बहु अतिशय खोटा । तकें होती बहु वाटा ॥ ३ ॥
तुका म्हणे भावे । कृपा करीजेते देवे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - विधीनें योग्य मार्गानें, आदि-प्रारंभ, अवसान-शेवट
अर्थ :- योग्य मार्गानें किंवा शास्त्र सांगेल त्या मार्गानें विषयसेवन केले तर ते विषयत्यागाएवढेच श्रेष्ठ
होय. १ या धर्माचे मुख्य रहस्य असे की देह धारण केल्यापासून तो तो नष्ट होईपर्यंत देवास मनात वागवावे हे उत्तम २
कोणत्याही गोष्टीची अतिशय चिकित्सा खोटी आहे, कारण केवळ बुद्धीच्या घाटेने, केवळ तर्कांच्या मार्गाने
पुष्कळ पर्यायाच्या वाटा निर्माण होऊन कार्यनाश मात्र होतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराविषयी एक-
चित्ताने भाव ठेवल्यासच त्याची कृपा प्राप्त होते ४
३१७ येथींचिया अळकारें । काय खरें पूजन ॥ १ ॥
वैकुंठींच्या लावू वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ २ ॥
येथींचिया नाशवंते । काय रित्ते चाळवून ॥ ३ ॥
तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण समुदाय ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - येथींचिया-या जगातील साटा-साठा, गण-समुदाय
अर्थ - या लोकातील अलकाराने भूषविणे हे काय खरे पूजन आहे ? हे तर सर्व नाश पावणारे अलकार
होत १ म्हणून वैकुंठाच्या वाटा निर्माण करू कारण सर्व सुखाचा साठा तिथे आहे २ या जगातील सर्वच प्रकार
नाशवंत आहेत मग त्याच्या नादाने उगाचच लोकाना कशासाठी फसवू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवजन
किंवा विष्णुभक्त हाच माझा आवडता समुदाय आहे तोच मला प्रिय आहे ४
३१८ उजळावया आलो वाटा । खरा खोटा निवाड ॥ १ ॥
बोलविले बोल बोले । धनी विठ्ठला सन्निध ॥ २ ॥
तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥ ३ ॥
तुका म्हणे नये आम्हा । पुढें कामा गबाळ ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उजळावया स्वच्छ करण्यासाठी
अर्थ - भक्तिमार्गाच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी, त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठीच मी येथे आलो आहे.
मला खऱ्याखोट्याचा निवाडा करावयाचा आहे १ ईश्वर, विठ्ठल हा माझा धनी आहे. तो ज्याप्रमाणे बोलवील
त्याप्रमाणे मी बोलतो २ त्या माझ्या स्वामीच्या पाठबळामुळे मी बोलत असल्याने मला कसलीच शंका नसते ३
तुकाराम महाराज म्हणतात, आमच्यापुढे गबाळ्यासारखे काम कधीच चालणार नाही ४
विवरण- या एका लहानशा अभंगात तुकारामबुवा आपल्या आयुष्याचा हेतू स्पष्टपणे सांगत आहेत आपण
जे बोलत आहोत तो देवाचाच निरोप आहे अशी भावना त्याची नेहमीच होती भांडार फोडून तो धन्याचा माल
आपण भारवाहीप्रमाणे वाहतो अशी त्याची श्रद्धा होती जो कृपावत संता पांडुरंग तोच बोलविता म्हणून आपली
वाणी त्याचीच आहे असे ते वारंवार सांगतात ' नव्हती माझे बोल बोले पांडुरंग।' अशी त्याची निष्ठा होती
आपण भक्तिमार्गाचा प्रसार करण्यास आलो आहोत, संताचा मार्ग स्वच्छ करावयास आलो आहोत, जग सर्व
आडरानात सापडले असून त्याच्या वाटा स्वच्छ करण्यासाठी आपण आहोत असेही ते अनेकदा बोलतात
तु गाथा २०

१५४ सार्थ तुकारामगाथा
३१९ बोलावे तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥ १ ॥
काशासाठीं खावे शेण । जेंणे जन थुकीं तें ॥ २ ॥
दुजें ऐसे काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥ ३ ॥
तुका म्हणे शूर रणीं । गाढें मनीं चुरचुरी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गांढे-भित्रे
अर्थ - नीट डोळे उघडे ठेवून जें बोलायचे ते धर्मास अनुकूल असेल ते नेहमी बोलावे १ ज्या बोलण्यावर
लोक तिरस्कारानें थुकतील असे बोलून कशाला शेण खाये ? २ सत्य व स्पष्ट बोलणे हे अग्नीप्रमाणे असल्याने
या अग्नीस कोण जाळील ? कोण असा शूर आहे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा सत्य व स्पष्ट आणि
धर्मानुकूल बोलणाराच रणांगणावरील शूराप्रमाणे असतो भित्रा मनुष्य मात्र मनात उगाच पुटपुटत राहतो ४
३२० बरा देवा कुणबी केलो । नाहीं तरी दंभेंचि असतो मेलो ॥ १ ॥
भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया ॥ २ ॥
विद्या असती कांहीं । तरी पडतो अपायीं ॥ ३ ॥
सेवा चुकतो संतांची । नागवण हे फुकाची ॥ ४ ॥
गर्व होता ताठा । जातो यमपंथें वाटा ॥ ५ ॥
तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमानें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - दंभेंचि-अहंकारानेच, अपार्थी-संकटात
अर्थ - देवा, मला कुणबी केलेस हे फार चांगले झाले नाही तर ब्राह्मणजन्माच्या अभिमानाखालीच मी
गेलो असतो १ देवराया, ही चांगलीच गोष्ट झाली म्हणूनच तुमच्या पायाशी राहून तल्लीनतेने मी नाचू शकतो २
दुसरी काही थोडी बहुत जरी विद्या मजजवळ असती तर मी मोठ्या संकटातच पडलो असतो ३ मग संतांची
सेवाही माझ्या हातून झाली नसती विनाकारण माझी फसवणूक मात्र झाली असती ४ मला मग गर्व झाला
असता व उगाच मी ताठून गेलो असतो यमाच्या म्हणजे मृत्यूच्याच वाटेने मग मला जावे लागले असते ५
तुकाराम महाराज म्हणतात थोरपणाच्या अभिमानाने नरकवास मात्र मिळतो ६
विवरण — या अभंगात महत्त्वाचे असे दोन विचार आहेत ब्राह्मणकुळात आल्याने नुसता दंभ, अहंकार
निर्माण होऊन खरी ज्ञानलालसा वा भक्तिभावना याचा लवलेशही उरत नाही असे दृश्य तुकोबाना त्यांच्या सभोवती
स्पष्टपणे दिसत असावे म्हणूनच ते आपण कुणबी झालो हे फार चांगल असे कृतज्ञतेने म्हणत आहेत आपण कुणबी
आहोत असे तुकोबानी अनेक ठिकाणी म्हटले आहे 'आळस न करी या लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा', 'तुका
कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना' - इत्यादी ओळींतून आपण कुणबी आहोत असा उल्लेख तुकोबा
स्वतःचा करितात तुकोबांचे बंधू कान्होबा यांनीही 'आता निदसुरू नसावे । गाठ पडली कुणब्यासवें' असेच म्हटले आहे
तुकोबांची शिष्या बहिणाबाई हिनेही आपल्या गुरूचे वर्णन करताना 'स्वप्नींचा अनुग्रह गृह केला शूद्र । तोही बळी
भद्र ज्ञानहीन', असा उल्लेख केला आहे तेव्हा तुकाराम हे जुणदवाणी कुणबीवाणी किंवा मराठावाणी होते कुणबी-
वाणी, आडनाव आंबोले, कुळी मोरे' असा उल्लेख तुकोबांच्या वंशातही आहे तुकोबा कुणबी असले तरी त्यांचे घराणे
मराठा जातीचे होते त्यांनी स्वतःस शूद्र यातीचे आपण म्हणून उल्लेख केला आहे तुकोबाची शूद्र याती, त्यांचे
कुणबीपण, त्यांचा वैश्य व्यवसाय, त्यांचे आंबीले हे आडनाव, मोरे हे कुळ इत्यादींसंबंधीचे सविस्तर विवेचन पुढे
'याती शूद्र वंक्ष केला वेवसाय' या त्यांच्या प्रसिद्ध अशा या ग्रंथातील अभंग क्रमांक १३३३ मध्ये केले आहे
३२१ दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥ १ ॥
आता काय उरलें वाचें । पुढे शब्द बोलावयाचे ॥ २ ॥

सार्थ तुकारामगाथा १५५
देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥ ३ ॥
तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दाता-देणारा, नाद-ध्वनी.
अर्थ:- प्राणिमात्रास हवे ते देणारा तो नारायण असून त्या सर्व वस्तूंचा भोग घेणाराही तोच एक आहे १
मग मी भोगले, मी भोगले असे शब्द बोलण्यात तरी अर्थ कसला आहे ? २ जेथे दृष्टी टाकावी तेथे स्वतःचे रूप
दिसावे अशी आत्मीयता अंगीं बाणली आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, जेवढा म्हणून ध्वनी अथवा नाद आहे
तेवढा गोविंदरूपी ईश्वरच सर्वत्र भरून राहिला आहे खास. ४
३२२ कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥ १ ॥
तुम्हीं दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी यसे¹ ॥ २ ॥
पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । माझा करावा कुडावा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपाः- साच-खरे, कुडावा-कुंपण घालून रक्षण
अर्थः- देवा, माझ्यावर कृपा करा व जे खरे असेल तेंच मला दाखवा; तेच माझ्या प्रचीतीस आणून द्या. १
तुम्ही दयावंत कसे आहात यासंबंधीची कीर्ती सर्व जगात पसरून राहिलेली आहे. २ तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी
मजकडे पाहात असूनही मला काळ ओढीत आहे हे ठीक नव्हे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही तुमच्या
कृपेचे कुंपण घालून माझे रक्षण करावे. ४
३२३ ठायींची ओळखी । येईल टाकूं टाका सुखीं ॥ १ ॥
तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ २ ॥
ठेविला तो ठेवा । अभिलाषें बुडवावा ॥ ३ ॥
मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- ईमान-प्रामाणिकपणा, पतन-नरकात जाणे, अभिलाषें-लोभाने.
अर्थ :- देवा, तुमची व आमची मूळची ओळख एका ठिकाणचीच आहे. ती काय तुम्हांला सुखासुखी टाकता
येईल ? सहजासहजी टाकता येत असेल तर टाका ना. १ पण यामध्ये मग तुमचाच प्रामाणिकपणा जाईल ना आणि
माझ्या नशिबात मात्र कायमचे पतन अथवा नरकवास येईल. २ आणि मग मला असे होईल की तुमच्यावरील
विश्वासाचा जो ठेवा मी ठेविला होता, तो लोभाने बुडवावा असे होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा,
दातारा, असला विचार सुद्धा मनात आणू नका. ४
विवरण :- देवाची आपली ओळख मूळच्या स्थानापासूनच आहे असा एक महत्त्वाचा विचार तुकोबांनी या
अभंगात मांडला आहे. सर्व चराचर जगत व्यक्त होण्याआधी एकच तत्त्व स्फुरणरूपात होते.त्या परब्रह्मास अपार प्रेम हेत
म्हणून ते अनेकत्वाने साकार झाले 'बीजचि झालें तरु । अथवा भांगाराचे अलंकार' अशा भाषेत संतानी या
व्यक्ताचे वर्णन केले आहे. तुकोबांची शिष्या बहिणाबाई हिने तर 'तुम्ही आम्ही एक एकाचि गांविचे । विसरल्ये
त्याचें फळ मागें' म्हणून आपली 'ठायींची ओळखी' स्पष्ट केली आहे. दुसऱ्या एका अभंगात 'तुम्ही आम्ही दोघे
होतों एके ठावों' अशी जाणीव देऊन तिने म्हटले आहे, 'तुह्मचि हितानें वाढला संसार । आम्ही का रे दूर अंतरलों?'
३२४ तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥ १ ॥
रूप कासवाचे परी । धरुनि राहे न अंतरीं ॥ २ ॥
१ असे

१५६ सार्थ तुकारामगाथा
नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वर्म-रहस्य, भावें-तुजविषयीच्या भक्तिभावामुळे, कासवाचे परी-आपले सर्व अवयव
पोटाशी धरून कासव ज्याप्रमाणे असते तसे.
अर्थ :- देवा, तुझे रहस्य मला माझा जो तुजविषयी भक्तिभाव आहे त्यामुळे सापडले आहे. १ कासवाप्रमाणे
मी सर्व अवयव आत धरून तुझे रूप मनात साठवून ठेवीन. २ तुझ्या रूपाची व माझी तुटातूट होऊ देणार नाही. अगदी
दृष्टीस दृष्टी मिळवून राहीन. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुमचे चिंतन हीच खरी तुमची सेवा आहे. ४
३२५ गहूं एक जाती । परी ह्या पाधाणी नासिती ॥ १ ॥
वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ २ ॥
कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥ ३ ॥
तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-पाधाणी-आडाणी बायका, कमाई-मेहनत
अर्थ :-एकाच गव्हाचे पुष्कळ प्रकार होऊ शकतात; पण अडाणी बायकांना त्याचे मर्म न समजल्यामुळे
त्या त्यांचा नाश करतात. १ यासाठी जे काही थोडेफार वर्म असेल ते जाणून घेणे हेच मुख्य आहे. २ जितकी
मेहनत चांगली होईल तितके ते प्रकार चांगले होतील हे खरेच आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, खरे मोल
गुणाचे आहे, इतर सर्व बोल व्यर्थ होत. ४
३२६ पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांचीं नावें ॥ १ ॥
नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठीं । २ ॥
विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥ ३ ॥
तुका म्हणे पापें । जाती संतांचिया जपें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- ठाव-ठिकाण
अर्थ :-संतसज्जनाची नावे घेऊन आपण पुण्यवंत व्हावे. १ यासाठीच माझी वाणी त्याची नावे घेण्यास
टाळाटाळ करीत नाही. फुकट असा हा महालाभ होतो. २ या साधुसंतांच्या पायांवरील भक्तिभाव हेच एक विश्रांतीचे
ठिकाण मला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या संतांच्या दर्शनाने सर्व पापे नाहीशी होतात. ४
३२७ देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया १ ॥ १ ॥
दोहींकडे दोन्ही घाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ २ ॥
दाखविले परी नाहीं वर्जिजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥ ३ ॥
तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-सांटा-संग्रह.
अर्थ :- देवाची संगत असेल तर आपणास देव होता येईल. आणि जगांतील सामान्य लोकांच्या सहवासाने
आपले पतन होईल. १ या दोन वाटा दोन निरनिराळ्या दिशांनी जाणाऱ्या आहेत; व त्या आपापल्या कर्माचा
संग्रह करणाऱ्या आहेत. २ वरील दोन वाटा मी दाखविल्या, पण आता जो भाग टाळता न येण्यासारखा आहे तो
भाग चित्तात धरून आपले हित साधा. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या मार्गाची प्रीती मूळची अंगातच हवी;
उपदेशाचे निमित्त केवळ मूळ बीजाप्रमाणे समजावे. ४
१ देवांचिया.

सार्थ तुकारामगाथा १५७
३२८ शोधिसील मूळें । त्याचें करोसी वाटोळें ॥ १ ॥
ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ २ ॥
लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया घरीं१ ॥ ३ ॥
तुका म्हणें गुण । तुझा लागलिया शून्य ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- बोभाट-गवगवा, तट-तन्हा, शून्य-मुक्तता.
अर्थ :- देवा, ज्यांची मुळे तुम्ही शोधता त्याचे वाटोळे करता. १ असा तुमच्या विषयीचा गवगवा सर्व
साधुसंतांनी केलेला आहे. तुमच्या अशा तऱ्हा किती सांगाव्यात ? २ तुम्ही ज्याच्यावर रोखून धरता त्यास तुम्ही सर्व
लौकिकाच्या बाहेर घालून देता. ३ तुकाराम महाराज म्हणतात, तुझा एकदा गुण लागला की त्या माणसांस
लौकिकापासून मुक्तता मिळते. त्याचे लौकिक जीवन शून्य होते. ४
३२९ वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यांतें देवा ॥ १ ॥
काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ २ ॥
अंगीं दैवत संचरे । मग तेथें काय उरे ॥ ३ ॥
नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥ ४ ॥
जाणे हा विचार । स्वामी तुक्याचा दातार ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- परी-प्रकार, उरी-शिल्लक.
अर्थ :- वैद्याच्या औषधाने जर माणसाचे रोग नष्ट होत असतील तर मग देवाच्या ध्यानाची गरज काय ? १
प्रारब्धाने जे शिल्लक ठेविले असेल तसे होईल असे असले, तरी खरोखर काय घडेल ते समजत नाही २ एकदा
अंगात दैवत संचारले म्हणजे काही तेथे उरत नाही ३ जर नवसासायासाने मुलगे-मुलगी होणार असतील तर
मग नवरा करण्याची गरजच काय आहे ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व बाबींचा विचार तुक्याचा स्वामी
जाणतो; तुकोबाच्या काही नीट ध्यानात येत नाही ५
३३० मार्गीं बहुत । याचि गेले साधुसंत ॥ १ ॥
नका जाऊं आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ २ ॥
चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥ ३ ॥
झळकती पताका । गरुड टके म्हणे तुका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- धोपटा-सरळ, टके-टोंकास
अर्थ :- ईश्वराचे भजनपूजन, नामस्मरण याच मार्गाने पुष्कळ साधुसंत गेले आहेत आजपर्यंत. १ उगाच
भलत्यासलत्या आडमार्गाने जाऊ नका अशी गर्जना सर्व पुराणे करीत आहेत. २ हा भक्तिमार्ग अनेकांनी चोखाळून
स्वच्छ केलेला असल्याने याच्या वाटा कुणास विचाराव्या लागत नाहीत. धोपट मार्गाने जाता येते. ३ तुकाराम
महाराज म्हणतात, या मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्याच्या पताका झळकत असून त्यांच्या अग्रभागावर गरुडाचें वास्तव्य
आहे. ४
३३१ पातिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां ।
आले वैकुंठ जवळां । सन्निध२ पंढरीये ॥ १ ॥
पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं ।
अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ २ ॥
१ घरीं. २ पंढरीये सन्निध.

१५८ सार्थ तुकारामगाथा
चालती स्थिर स्थिर । गरुड टक्याचे भार ।
गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥ ३ ॥
मिळालिया भद्रजाती । कैसा आनंदें डुलती ।
शूर उठावती । एका एक आगळे ॥ ४ ॥
नामामृत कल्लोळ । वृंदें फोडली सकळ ।
आले वैष्णवदळ । कलिकाल कांपती ॥ ५ ॥
आस करिती ब्रह्मादिक । देखुनि वाळवंटींचे सुख ।
धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे फँसे ॥ ६ ॥
मरण मुक्ति वाराणसी । पितृऋण गया नासी ।
उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोवाच्या ॥ ७ ॥
तुका म्हणे आतां । काय करणे आम्हा चिंता ।
सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :- घुमरी-विपुल, पुष्कळ, गरुड टक्याचे-गरुड अग्रभागी असणाऱ्या निशाणाचे, श्रुति-वीणा,
भद्रजाती-सुलक्षणी हत्ती, वृंदें-समुदाय, नासी-नाश करते, नुपेक्षी-उपेक्षा करीत नाही
अर्थ. - चला, कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपुरात जाऊन दोन्ही डोळ्यांनी पाहू या पंढरीचे वैकुंठ
अगदी जवळच आले आहे १ येथे हरिनामाचे पीक विपुल प्रमाणात आले असून प्रभुप्रेम आकाशात मावेनासे झाले
आहे प्रभुप्रेमाने सर्व पंढरी सामावून गेली आहे घरोघरी प्रेमाचा सुकाळच झाला आहे २ वैष्णवाचे गट जागजागी
स्थिर होऊन चालत आहेत. त्यांच्या निशाणावर गरुडाची खूण आहे नामघोषाचा गजर त्यानी चालविला आहे
टाळ, वीणा, मृदंग यांची साथ त्याला मिळत आहे ३ सुलक्षणी हत्ती जसे डुलत डुलत चालतात तसे हे वैष्णववीर
आनंदाने डुलत डुलत नामघोषाच्या नादात चालले आहेत एकापेक्षा एक शूर असे हे वैष्णववीर भगवद्भक्तीचा
उठाव करीत आहेत ४ हरीच्या नामामृताचा कल्लोळ चालला असून सर्वत्र वैष्णवांचे समुदाय वाटून आले आहेत
या वैष्णववीरांच्या समुदायापुढे प्रत्यक्ष यमही थरथर कापत उभा राहतो. ५ पंढरपूरच्या या वाळवंटाचे सुख पाहून
त्याची इच्छा प्रत्यक्ष ब्रह्मदेवही करीत आहेत या मृत्युलोकाचे भाग्य केवढे थोर ! धन्य धन्य या मृत्युलोकाची !
असे उद्गारही ते काढतात ६ काशीला मुक्ती मिळते पण तेथे मरण यावे लागते गयेस गेल्यानंतर पितृऋणातून
मुक्त होता येते पंढरपुरात मात्र या गोष्टी उधारीवर नसतात विठ्ठलाच्या पायाशी याचा लाभ त्वरित होत असतो ७
तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता चिंता कशासाठी करावी ? सर्व सिद्धीस देणारा तो दाता पांडुरंग समर्थ
असा असून तो आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही ८
विवरण - भागवत संप्रदायात आषाढी व कार्तिकी एकादशीचे माहात्म्य फार सांगितले गेले आहे या
दोन्ही प्रसंगी पंढरपूर येथे यात्रा भरत असून विठ्ठलाच्या गजराने अवघे वाळवंट दुमदुमून जाते उभ्या महाराष्ट्रा-
तील भक्तगण खांद्यावर गरुडपताका घेऊन यात्रेस येत असतात निरनिराळ्या ठिकाणाहून संतांच्या पालख्याही येतात
टाळ, मृदुंग, वीणा, हरिभजन यांनी सारे वातावरण पवित्र होऊन जाते या एका अभंगात तुकारामबुवा मुख्यत
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याचे वर्णन करीत आहेत आषाढी एकादशीएवढेच कार्तिकी एकादशीचेही महत्व वार-
करी संप्रदायात असते ही एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून प्रसिद्ध असून चातुर्मासात भगवान शेषशय्येवर शयन
करीत असतात पण या एकादशीस त्यांना जागे करण्यासाठी स्तोत्रपाठ, भजन, पूजन, काकडआरती, गायन, वादन
इत्यादींच्या साहाय्याने स्तवन केले जाते ‘उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रा जगत्पते। त्वयि सुप्ते जगन्नाथ जगत् सुप्तं
भवेदिदम्’ यासारख्या मंत्राने परमेश्वराची प्रार्थनाही केली जाते पंढरपूर येथील सोहळा याही एकादशीला
अवर्णनीय असतो

सार्थ तुकारामगाथा १५९
३३२ जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र ।
ते हरती अपार । पंढरपूर देखिलिया ॥ १ ॥
धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर ।
पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ २ ॥
सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार ।
होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥ ३ ॥
नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया ।
धन्य भाग्य जया । जे पंढरपूर देखती ॥ ४ ॥
उपजोनि संसारों । एक वेळ पाहें पा पंढरी ।
महा दोषां कैंची उरी । देवभक्त देखिलिया ॥ ५ ॥
ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी ।
सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे कळिकाळा ॥ ६ ॥
तें सुख वर्णावया गति । एवढी कैंची मज मति ।
जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥ ७ ॥
तुका म्हणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा ।
अधम जन्मांतरिचा । तया पंढरी नावडे ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा :-परीहार-निरसन, आणिका-दुसऱ्या, उपजोनि-जन्मास येऊन.
अर्थ :-हातून इतके दोष घडले आहेत कीं त्यांचे निरसन व्हावे म्हणून, ते दूर व्हावेत म्हणून सर्व शास्त्रे
तपासून पाहिली; तरी उपाय सापडत नाही पण हे पंढरपूर क्षेत्र पाहिल्यानंतर मात्र सारे दोष निघून जातात. १
हे भीमातीर धन्य होय. चंद्रभागा सरोवरही धन्य होय. या ठिकाणी पद्मतीर्थावर हे विठ्ठलवीर म्हणजे विष्णुभक्त
जमलेले आहेत. त्याचे क्रीडेचे स्थान वेणुनाद हेच आहे. २ सर्व तीर्थस्थानांचे माहेर म्हणजे हे पंढरपूर असून या
भूमीवरचे निर्विकार असे हे प्रत्यक्ष वैकुंठच आहे. येथे विठ्ठलनामाचा गजर सतत होत असून त्यामुळे प्रत्यक्ष यमाचाही
थरकाप उडालेला आहे. ३ या पंढरपूर क्षेत्राचा महिमा वर्णन करण्यास दुसरी साजेेल अशी उपमा द्यावयास वस्तूच
नाही. जे लोक हे पंढरपूर पाहतात त्यांचे भाग्य केवढे थोर मानावयास हवे ४ या जगात जन्मास येऊन एक वेळ
तरी पंढरपूरचे दर्शन घ्यावे तेथील दैवत श्रीविठ्ठल व त्याचा महाभक्त पुंडलीक याचे दर्शन घेतल्यावर महापापांचाही
दोष उरणार नाही. ५ अशी ही श्रीविष्णूची नगरी आहे. येथील स्त्री-पुरुष चतुर्भुज असून त्यांच्या रक्षणासाठी
सुदर्शन चक्र एकसारख्या फेऱ्या घालीत असते. यमाच्या शिरकावाला थोडीही संधि मिळत नाही. ६ पंढरपूरचे हे
सौख्य वर्णन करण्याएवढी बुद्धी मला कुठे आहे ? जे स्वतःच पंढरपूरला जातात त्यांनाच या वैकुंठाची प्राप्ती होते. ७
तुकाराम महाराज म्हणतात, या शब्दाचा ज्यांना विश्वास वाटत नाही व ज्यांना पंढरपूर आवडत नाही तो
जन्मोजन्मींचा अधमच म्हणावयास हवा. ८
३३३ एक नेणतां नाडलीं । एकां जाणिवेची भुली ॥ १ ॥
बोलो नेणें मुकें । येहें वाचाल काय निकें ॥ २ ॥
दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥ ३ ॥
तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी धर्म ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-नाडलीं-फसली. भुली-भूल, निकें-चांगले, सवा-दाटून.

अर्थ :- कित्येक लोकांना काही कळतच नाही म्हणून ते फसतात; तर दुसऱ्या कित्येकांना आपणांस फार
कळते या ज्ञानाच्या अहंकाराने ते पछाडलेले असते भूल पडलेली असते १ मुक्याला बोलता येत नाही म्हणून त्याचा
उपयोग होत नाही, ज्याला बोलता येते तो तर वाचाळ- होतो, तेही काही चांगले नव्हे २ दोन्ही बाजूनी अड
चणच असते एकाकडे आड व दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झालेली असते ३ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, आमचे कर्मच आम्हांस तुझे रहस्य समज देत नाही असे दिसते ४

३३४ म्हणवितो दास । मज' एवढीं च आस ॥ १ ॥
परी तें अगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ २ ॥
बडबडितो तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥ ३ ॥
तुका म्हणे खरा । दावू जाणतो पसारा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टोपा - आस-इच्छा, धेंडे-अर्धवट मनुष्य
अर्थ - देवा, मी तुमचा दास आहे असे मी सारखे म्हणत असतो, आणि मलासुद्धा ही एवढी एकच
आशा आहे १ पण देवा, दास्य भक्तीचे जे मर्म आहे ते मला माहीत आहे असे नाही तरी तू तुला तुझ्या धर्मा-
प्रमाणे जे पतितपावनाचे कार्य करायला हवेस ते मात्र कर २ मी आपल्या तोंडाने नुसतीच बडबड करीत असतो,
पण हे माझे बोलणे अर्धवट माणसाच्या प्रमाणे भावाशिवाय रिकामेच असते ३ तुकाराम महाराज म्हणतात खरंघर
साधुत्वाचा पसारा मात्र मी चांगलाच दाखवू शकतो ४

३३५ पूजा समाधाने । अतिशय वाढें' सोंग ॥ १ ॥
हे तो जाणा तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ २ ॥
पाहिजे ते केले । सहज प्रसंगीं घडले ॥ ३ ॥
तुका म्हणे माथा । पायीं ठेवीं तुम्हा संता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अतिशय-हव्यास, नीत-नीती
अर्थ - मनाचे समाधान हीच खरी परमेश्वराची पूजा होय, किंवा समाधानाने परमेश्वराची पूजा करावी
उगाच बाह्य फापटपसाऱ्याची हौस मात्र नसावी त्यामुळे त्रास मात्र वाढतो १ सत लोकांहो, हे तुम्ही जाणताच
अशी ही सांगली नीती मी तुम्हास सांगितली आहे २ जे सहजासहजी घडण्यासारखे आहे ते तुम्ही केले पाहिजे ३
तुकाराम महाराज म्हणतात तुम्हां संतांच्या पायावर मी माझा माथा ठेविला आहे ४

३३६ स्वप्नींचिया गोष्टी । मज धरिले होतें वेठी ।
जालियां सेवटीं । जाले लटिकें सकळ ॥ १ ॥
वाया भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा ।
राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ २ ॥
सोसिले ते अंगे । खरे होते नव्हता जागें ।
अनुभव ही सांगें । दुखें डोळे उघडीले ॥ ३ ॥
तुका म्हणे संतीं । सावचित केले अतो ।
नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वेठी-बळजबरीने कामास लावण सिणा-त्रास, राव-श्रीमंत रंक-दरिद्री, सावचित-
सावधान चित्त टाळी बसणे-तोंड बंद होणे
१ एवढीच मज आस २ वाट

सार्थ तुकारामगाथा १६१
अर्थ - एखाद्या स्वप्नामधील गोष्टींप्रमाणे या कामक्रोधांनी मला वेडीस धरले होते, जन्ममृत्यूने मला
बळजबरीने कामास जुंपले होते १ मग या आपत्तींतून सुटावे म्हणून स्वप्नात मी व्यर्थच ईश्वराची प्रार्थना केली
पण त्यापासून मला त्रासच झाला जागे होऊन पाहतो ते स्वप्नातील श्रीमंत, राजा, दरिद्री, भिकारी हे काही त्याच्या
स्थानावर नव्हते २ जोपर्यंत मी आत्मबोधाने जागाच झालो नव्हतो तेव्हा स्वप्नातील तो त्रास मी स्वतः भरपूर
सोसला आता जागृत असताना तोच अनुभव हे सांगत आहे या युक्ताने मात्र माझे डोळे पुरते उघडले. मी सावध
झालो ३ तुकाराम महाराज म्हणतात, या साधुसंतानींच मला या स्वप्नातील दुःखातून सावध केले नाही तर
पहिल्याने या हरिनामाविषयी माझे तोंड बद्ध होते. ४
३३७ आसुरी स्वभाव निर्दय अंतर । मानसीं निष्ठुर अतिवादी ॥ १ ॥
याति कुळ येथे असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ २ ॥
काळकुट पितळ सोने शुद्ध रंग । अंगाचेच अंग साक्षी देतें ॥ ३ ॥
तुका म्हणे बरी जातीसवे भेटी । नवनीत पोटीं सांटविले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - मानसीं-मनात, अतिवादी-वृथा वाद करणारा
अर्थ - काही लोकांचा स्वभावच आसुरी असून अंतःकरण निर्दय असते अशी माणसे मनाची निष्ठुर असून
वृथा वाद करणारी असतात १ अशा वेळी अमुक एक चांगल्या कुळातील, अमुक वाईट कुळातील असा विचारच
अयोग्य असतो अंगच्या गुणाचे महत्त्व या ठिकाणी प्रमुख असते २ पितळ व सोने दोन्ही पिवळचा रंगाची असली
तरी पितळ कालांतराने काळेकुट्ट पडते व सोने आपल्या शुद्ध व तेजस्वी रंगाने नेहमी चमकून राहते. दोघांची
अंगेच त्याच्या गुणावगुणांची साक्ष देतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, चांगल्या जातीच्या माणसाची मला भेट
व्हावी. मी त्याचा सहवास नवनीताप्रमाणे पोटात साठवीन किंवा प्रभुप्रतीचे नवनीत ज्याने आपल्या पोटी साठविले
आहे अशा चांगल्या जातीच्या माणसाशी माझी भेट व्हावी ४
विवरण - या अभंगातील 'याति कुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगीं' हा विचार भागवत-
धर्मीय परंपरेस शोभून दिसणारा असाच आहे बगच्या गुणावरून पारख व्हावी. वरवरच्या जन्मजात जातीवरून
होऊ नये आणि भक्तीच्या क्षेत्रात तर ह् जातीभेदाचे थड असू नये असा एक आग्रहाचा विचार सर्व
संतानी सांगितलेला आहे एकदा ईश्वराकडे मोहरा वळला म्हणजे हा अमुक एक जातीचा अशी स्थिती
उरतच नाही तुकारामबुवांनीच एका ठिकाणी म्हटले आहे, 'भावता भेदाची जाव उठाउठी । तुका म्हणे भेटीं गोंविदाचे'
जे ईश्वराचे भक्त झाले, ज्यांना सो ध्यास लागला त्याच्या बाबतीत यातिकुळाचा विचार हा बरोबर नसतो 'याति-
कूळ माझें गेलें हारपोनि' असे स्वतः ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे तुकारामबोवांनी तर स्पष्टच निर्वाळा दिला आहे की,
'जिहीं म्हणविले हरीचे भक्ति । जातीचे ते होत कोणी तरी ॥ जातीकुळ नाहीं तयासी प्रमाण । अनन्या अनन्य तुका
म्हणे' एकदा परमेश्वरास शरण गेल्यावर मग वर्ण व जाती हा भेद उरत नाही हे ज्ञानदेवांनीही नवव्या अध्यायात
ज्ञानेश्वरीत स्पष्ट मेल्याचे आपण पाहिलेच आहे तुकारामबुवानी त्यानेच मत पुढे आणखी स्पष्ट केले आहे 'वर्णा-
भिमान विसरलीं याती । एकमेकां लोटांगणीं जाती रे' हरिभक्ताची एवढा पदवी मिळाली की मग हरिभक्त हीच एक
जात इतरांच्याही दृष्टीस ठरने चोखोबांची जात मग कुणामच दिसली नाही या यातिहीन भक्ताची महती गाताना
जनाबाईने म्हटले आहे 'चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥ परब्रह्म त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥'
एकनाथांनीही 'चोखियाची भक्ती कैसी । प्रेमें आवड देवासी ॥' म्हणून चोखोबाचा गौरव केला आहे कारण या
अभंगात सांगितल्याप्रमाणे गुणांचे कारणच माणसाची पारख करीत असते
३३८ बाळपणीं हरि । खेळे मयुरेमाझारी ।
पायीं घागरिया सरी । कडदोरा पाकी ।
तु गाथा २१

१६२ सार्थ तुकारामगाथा
मुख पाहे माता । सुख न माये चित्ता ।
धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥ १ ॥
बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो ।
म्हणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें ।
जीवापरीत.तें वाल्हें । मज आवडतें ॥ २ ॥
मिळोनियां याति । येती नारी कुमारी बहुती ।
नाहीं आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं ।
विसरल्या घरें । तान्हीं पाठीं लेकुरें ।
धाक सांडोनियां पेरें । तान भूक नाहीं ॥ ३ ॥
एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी ।
वेगों करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे ।
लाज सांडियेली बोज । नाहीं फजितीचें काज ।
सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥ ४ ॥
वेधियेल्‍या बाळा । नर नारी या सकळा ।
बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या ।
कुमार कुमारी । नाभाव हा शरीरीं ।
दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥ ५ ॥
वैरभाव नाहीं । आप पर कोर्णी कांहीं ।
शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं ।
तुका म्हणे सुखी । केलीं आपणांसारिखीं ।
स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥ ६ ॥

शब्दार्थ व टीपा :-मधुरेनघारी-मथुरेमध्ये, कडदोरा-करदोता, वोडवले-प्राप्त झाले, वाल्हे-प्रिय,
वोसरी-कमी करून, योज-चिंता, काळजी.

अर्थ :-हा श्रीकृष्ण लहानपणी मथुरेमध्ये खेळत होता. या बालकृष्णाच्या पायांत घागऱ्या व गळ्यात सरी,
कमरेस करदोता व दंडांत वाक्या असे अनेक दागिने शोभून दिसतात. या शोभिवंत मुलाचे मुख पाहताच आईचा
आनंद तिच्या मनात मावत नाही. माझे भाग्य व पूर्वसंचित चांगले असल्यामुळे मी हे सुख प्राप्त करून धन्य होत आहे
असे ती म्हणाली. १ हे माझे मूल फार चांगले आहे हो. इतके चांगले की ते चांगले म्हणण्यासही वेळ पुरत नाही
हे बाळ मला माझ्या जिवापेक्षाही आवडते. २ या माझ्या लाडक्या मुलास पाहण्यासाठी गावातील सर्व जातींच्या
बायका व मुली पुष्कळ येतात. त्यांना देहभावाचीही स्मृती नसते. श्रीकृष्णाच्या प्रेमापुढे त्या आपली घरे व तान्ही
मुले यांनाही विसरल्या. त्यांना घरांतील वडील माणसांचा धाकच उरला नाही. त्यांची तहानभूकही हरपून गेली. ३
काही गोपी आपापल्या घरी असल्या तरी त्यांचे चित्त मात्र या बालकृष्णाकडेच असते. त्याला पाहण्यासाठी घरची
कामे लगबगीने करून त्या त्याच्याकडे जाण्याची इच्छा करतात. त्यांना आता लौकिक जीवनाची लाज नाही की
शरीराचीहि चिंता उरलेली दिसत नाही. घरची सुखशय्या सोडून त्या श्रीकृष्णास पाहण्यासाठी धावतात. ४ या
माझ्या बाळास पाहण्यासाठी गोकुळातील सर्व स्त्री-पुरुष नादावलेले आहेत. त्या सर्व स्त्रिया याच मुलास खेळवू
लागल्या. आपण कुमार की कुमारी हा भावही त्यांच्या मनांत उरला नाही. या श्रीकृष्णास पाहताच त्यांची दृष्टी