सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

१६० श्रीदासबोध. [ दशक
र्ची ॥ ५१ ॥ ऐसीं नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत । त्याचा क-
रावया निश्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२ ॥ तो विश्रांतीचा विश्राम । आदि-
पुरुष आत्माराम । तें एकचि परब्रम्ह । दुसरें नाहीं ॥ ५३ ॥ तेंचि कळा-
याकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें श्रवणें । निश्चय बाणे
॥ ५४ ॥ खोटें निवडितां एकसरें । उरलें तें जाणिजे खरें । चौदा ब्रह्मों शा-
स्त्राधारें । बोलिजेती ॥ ५५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमद-
शके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. चतुर्दश ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान ।
जेणें होय समाधान । साधकांचें ॥ १ ॥ रत्नें साधायाकारणें । मृत्तिका
लागे एकवटणें । चौदा ब्रम्हांचीं लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २ ॥ पदार्थाविण
संकेत । द्वैतावगळा दृष्टांत । पूर्वपक्षांविण सिद्धांत । बोलतांचि नये ॥ ३ ॥
आधीं मिथ्या उभारावें । मग तें वोळखोन सांडावें । पुढें सत्य तें स्वभावें ।
अंतरीं बाणे ॥ ४ ॥ म्हणोन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळावया सि-
द्धांत । येथें श्रोतीं सावचित्त । क्षण एक असावें ॥ ५ ॥ पहिलें तें शब्द-
ब्रह्म । दुजें ओमित्येकाक्षरें ब्रह्म । तिसरें खंब्रह्म² । बोलिली श्रुती ॥ ६ ॥
चौथें जाण सर्व³ ब्रह्म । पांचवें चैतन्य⁴ ब्रह्म । साहावें सत्ता⁵ ब्रह्म । साक्षि
ब्रह्म सातवें ॥ ७ ॥ आठवें सगुण ब्रह्म । नववें निर्गुण ब्रह्म । दाहावें वाच्य⁶
ब्रह्म । जाणावें पै ॥ ८ ॥ अनुभव तें अकरावें । आनंदब्रह्म तें बारावें । तदा-
कार तें तेरावें । चौदावें अनिर्वाच्यं⁷ ॥ ९ ॥ ऐसीं हीं चौदा ब्रम्हें । यांचीं
निरूपिलीं नामें । आतां स्वरूपाचीं वर्में । संकेतें दावूं ॥ १० ॥ अनुभवांविण
भ्रम । या नांव शब्दब्रम्ह । आतां ओमित्येकाक्षरें ब्रम्ह । तें एकाक्षर ॥ ११॥
खं शब्दे आकाशब्रम्ह । महदाकाश व्यापक ब्रम्ह । आतां बोलिजेल सूक्ष्मब्रम्ह ।
सर्व ब्रम्ह ॥ १२ ॥ पंचभूतांचें कोडें । जें जें तत्व दृष्टीस पडे । तें तें ब्रम्ह-
चि रोकडें । बोलिजत आहे ॥ १३ ॥ या नांव सर्व ब्रम्ह । श्रुतिआश्रयाचें
१. ॐ असें एक अक्षर. २. आकाशरूप. ३. सर्व दृश्य हेंच ब्रह्म. ४. ज्ञानरूप.
५. अस्तित्वमात्र. ६. वाणीरूप. ७. शब्दानें सांगण्यास अशक्य.

७ वा.] चतुर्दश ब्रह्म. १६१

वर्म । आतां चैतन्यब्रम्ह । बोलिजेल ॥ १४ ॥ पंचभूतादि मायेतें । चैतन्य-
चि चेतवितें । म्हणोनियां चैतन्यातें । चैतन्य ब्रम्ह बोलिजे ॥ १५ ॥ चैत-
न्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रम्ह तत्वतां । तये सत्तेस जाणतां । या नांव
साक्षिब्रम्ह ॥ १६ ॥ साक्षित्व जयापासूनी । तेंहि आकळिलें गुणीं । सगुण
ब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १७ ॥ जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुण ब्रह्म
तत्वतां । वाच्यब्रम्ह तेंहि आतां । बोलिजेल ॥ १८ ॥ जें वाचे बोलतां
आलें । तें वाच्य ब्रम्ह बोलिलें । अनुभवासि कथिलें । न वचे सर्वथा ॥१९॥
या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म । परंतु याचेंहि वर्म । बोलवेना
॥ २० ॥ ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद । अनिर्वाच्य संवाद । तु-
टोनि गेला ॥ २१ ॥ ऐसीं हीं चौदा ब्रह्में । निरूपिलीं अनुक्रमें । साधकें
पाहतां भ्रमें । बाधिजेना ॥ २२ ॥ ब्रम्ह जाणावें शाश्वत । माया तेचि अ-
शाश्वत । चौदा ब्रम्हांचा सिद्धांत । होईल आतां ॥२३॥ शब्दब्रम्ह तें शाब्दि-
क । अनुभवैविण मायिक । शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥२४॥ जेथें क्षर
ना अक्षर । तेथें कैंच ओमित्येकाक्षर । शाश्वताचा विचार । तेथें न दिसे
॥ २५ ॥ खंब्रम्ह ऐसें वचन । तरी शून्यातें नाशी ज्ञान । शाश्वताचें अधि-
ष्ठान । तेथें न दिसे ॥ २६ ॥ सर्वत्रांस होतो अंत । हें तों प्रगटचि दिसत ।
प्रलय बोलिला निश्चित । वेदांतशास्त्रीं ॥२७॥ ब्रम्हप्रलय मांडेल जेथें । भूता-
न्वय कैचा तेथें । म्हणोनियां सर्वब्रम्हांतें । नाश आहे ॥२८॥ अचलासि आणी
चळण । निर्गुणास लावितां गुण । आकारास विचक्षण । मानतिना ॥ २९॥ जें
निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नाशवंत । सर्वब्रम्ह हे मात । घडे कैंवी ॥३०॥
असो आतां हें बहुत । सर्व ब्रह्म नाशवंत । वेगळेपणास अंत । पाहणें कैंचें ॥
३१ ॥ आतां जयास चेतवावें । तेंचि मायिक स्वभावें । तेथें चैतन्याच्या नांवें ।
नाश आला ॥ ३२ ॥ परिवारांविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्वतां । पदार्थांविण
साक्षता । तेहि मिथ्या ॥ ३३ ॥ सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण
काये । सगुण ब्रह्म निश्चयें । नाशवंत ॥ ३४ ॥ निर्गुण ऐसें जें नांव । त्या
नांवास कैंचा ठाव । गुणेंविण गौरव । येईल कैंचें ॥ ३५ ॥ माया जैसें
मृगजळ । ऐसें बोलती सकळ । कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंचि ॥


१. विनाशी. २. अविनाशी. ३. पंचभूतांचा संबंध.

१६२ श्रीदासबोध. [ दशक
३६ ॥ ग्रामो नास्ति कुतः सीमां । जन्मैविण जीवात्मा । अद्वैतासि उपमा ।
द्वैताची ॥ ३७ ॥ मायेविरहित सत्ता । पदार्थाविण जाणता । अविद्येविण
चैतन्यता । कोणास आली ॥ ३८ ॥ सत्ता चैतन्यता साक्षी । सर्वहि गुणां-
चियेपाशीं । ठायींचे निर्गुण त्यासी । गुण कैंचे ॥ ३९ ॥ ऐसें जें गुणरहित ।
तेथें नामाचा संकेत । तोचि जाणावा अशाश्वत । निश्चयेंसी ॥ ४० ॥ निर्गुण-
ब्रह्मासि संकेतें । नामें ठेविलीं बहुतें । तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥
४१ ॥ आनंदाचा अनुभव । हाहि वृत्तीचाच भाव । तदाकारीं ठाव । वृत्तीस
नाहीं ॥ ४२ ॥ अनिर्वाच्य याकारणें । संकेतवृत्तीच्या गुणें । तया संकेतास
उणें । वृत्तीनें आणिले ॥ ४३ ॥ अनिर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची
स्थिती । निरूपाधी विश्रांती । योगियांची ॥ ४४ ॥ वस्तु जे कां निरूपाधी ।
तेचि सहजसमाधी । जेणें तुटे आधिब्याधी । भवदुःखाची ॥ ४५ ॥ जो
उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत । सिद्धांत आणि वेदांत । धादांत
आत्मा ॥ ४६ ॥ असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम । अनु-
भवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७ ॥ आपुलेनि अनुभवें । कल्पनेसी मोडावें ।
मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८ ॥ निर्विकल्पासि कल्पावें । कल्पना
मोडे स्वभावें । मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९ ॥ कल्पनेचें एक
बरें । मोहरितांचें मोहेरें । स्वरूपीं घालितां भरे । निर्विकल्पीं ॥ ५० ॥
निर्विकल्पास कल्पितां । कल्पनेची नुरे वार्ता । निःसंगास भेटों जातां ।
निःसंग होइजे ॥ ५१ ॥ पदार्थाऐसें ब्रम्ह नव्हे । म्हा तें हातीं धरुनि द्यावें ।
असो हें अनुभवावें । सद्गुरुमुखें ॥ ५२ ॥ पुढें कथेचा अन्वये । केलाचि
करूं निश्चये । जेणें अनुभवास ये । केवळ ब्रम्ह ॥ ५३ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके चतुर्दशब्रह्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥३॥
४. विमल ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रम्ह नभाहूनी निर्मळ । पाहतां तैसेंचि पोकळ ।
१. गांवच नाहीं तर शीव कशाची ? तद्वत् द्वैतच नाहीं, तर अद्वैत म्हणून
तरी काय सांगावें ? २. एकरूपतेंत. ३. मनाच्या लयाची. ४. अंतर्बाह्य पीडा.
५. फिरवितांच फिरते. ६. मग. ७. संबंध. ८. आकाशाहून.

७ वा.] विमल ब्रह्म. १६३
अरूप १ आणि विशाल । मर्यादावेगळें ॥ १ ॥ एकवीस स्वर्ग सप्त पाताळ ।
मिळोन एक ब्रह्माण्डगोळ । ऐसें अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २ ॥ अनंत
ब्रम्हांडाखालतें । अनंत ब्रम्हांडावरतें । तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र
नाहीं ॥ ३ ॥ जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐसी वदे लोकवाणी । तेणेंविण
रिता प्राणी । एकहि नाहीं ॥ ४ ॥ जलचरांस जैसें जळ । बाह्य अभ्यंतरीं निखळ ।
तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रांसी ॥ ५ ॥ जळावेगळा ठाव आहे । ब्रह्मा-
बाहेरि जातां न ये । म्हणोनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६ ॥ आका-
शाबाहेरि पळों जातां । पुढें आकाशाचि तत्वतां । तैसा तया अनंता । अंतचि
नाहीं ॥ ७ ॥ परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगाडिलें । अतिनिकट-
पणीं चोरलें । सकळांसि जें ॥ ८ ॥ तयामध्येंचि असिजे । परी तयासि
नेणिजे । उमजे भासे नुमजे । परब्रह्म तें ॥ ९ ॥ आकाशामध्यें आभाळ २ ।
तेणें आकाश वाटे डहुळ । परी तें मिथ्या निवळ । आकाशाचि असे ॥
१० ॥ न्याहाळ ३ देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांशीं । तैसें दृश्य ज्ञानि-
यांशीं । मिथ्यारूप ॥ ११ ॥ मिथ्याचि परी आभासे । निद्रितासी स्वप्न
जैसें । जागा झालिया आपैसें । बुझों लागे ॥ १२ ॥ तैसें आपुलेनि अनु-
भवॆं । ज्ञानें जागृतीस यावें । मग मायिक स्वभावें । कळों लागे ॥ १३ ॥
आतां असो हें कुवाडें ४ । जें ब्रह्मांडा पैलीकडे । तेंचि आतां निवाडें । उमजोनि
दावूं ॥ १४ ॥ ब्रह्म ब्रह्मांडों कालवलें । पदार्थमात्रासि व्यापूनि ठेलें । सर्वां-
मध्यें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५ ॥ ब्रह्मामध्यें सृष्टि भासे । सृष्टीमध्यें ब्रह्म
असे । अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६ ॥ अंशमात्रें सृष्टीभीतरीं ।
बाहेरि मर्यादा कोण करी । सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । मायील कैसें ॥ १७ ॥
अमृतीं ५ मध्यें आकाश । सगळें सांठवतां प्रयास । म्हणोन तयाचा अंश ।
बोलिजे तो ॥ १८ ॥ ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें । सर्वांत
परी संचलें । संचलेपणें ॥ १९ ॥ पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंच-
भूतातीत । पंकीं ६ आकाश अलिप्त । असोनि जैसें ॥ २० ॥ ब्रह्मास दृष्टांत
न घडे । बुझावया देणें घडे । परी दृष्टांतीं साहित्य ७ पेंडे ८ । विचारितां आ-

१. रूपरहित. २. परब्रह्मावरील भास, जग. ३. नजर. ४. कोडें. ५. तीर्थ
ठेवण्याचें भांडें, त्यांत. ६. चिखलांत. ७. अलंकारशास्त्र. ८. अपुरतें होतें.

१६४ श्रीदासबोध. [ दशक
काश ॥ २१ ॥ खंब्रह्म ऐसी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती । म्हणोन ब्रह्मास
दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥ कालिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि
केवळ । शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३ ॥ म्हणोन ब्रह्म जैसें
गगन । आणि माया जैसा पवन । आढळ परी दर्शन । नव्हे त्याचें ॥
२४ ॥ शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा । परंतु ते स्थिरावेना ।
वायूऐसी ॥ २५ ॥ असो ऐसी माया मायिक । शाश्वत तें ब्रम्ह एक । पाहों
जातां अनेक । व्यापून असे ॥ २६ ॥ पृथ्वीसि भेदूनि राहे । परी तें ब्रम्ह
कठीण नव्हे । दुजी उपमा न साहे । तया मृदुत्वासी ॥ २७ ॥ पृथ्वीहूनि
मृदु जळ । जळाहूनि तो अनळ¹ । अनळाहूनि कोमल । वायु जाणावा ॥ २८ ॥
वायूहूनि तें गगन । अत्यंतचि मृदु जाण । गगनाहूनि मृदु पूर्ण । ब्रम्ह
जाणावें ॥ २९ ॥ वज्रास असे भेदिलें । परी मृदुत्व नाहीं गेलें । उपमेरहित
संचिलें । कठीण ना मृदु ॥ ३० ॥ पृथ्वीमध्यें व्यापूनि असे । पृथ्वी नासे तें
न नासे । जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१ ॥ तेजीं असे परी
जळेना । पवनें² असे परी चलेना । गगनीं असे परी ढळेना । परब्रम्ह तें
॥ ३२ ॥ शरीरीं अवघें व्यापिलें । परी तें नाहीं आढळलें । जवळींच दुरा-
वलें । नवल कैसें ॥ ३३ ॥ सन्मुखचि चहूंकडे । तयामध्यें राहणें घडे ।
बाह्याभ्यंतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४ ॥ तयामध्येंच आपण । सै-
बाह्य³ तें जाण । दृश्यावेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५ ॥ कांहीं नाहींसें
वाटलें । तेथेंच तें कोंदाटलें । जैसें न दिसे आपुलें । आपणासि धन ॥ ३६ ॥
जो जो पदार्थ दृष्टीस पडे । तें त्या पदार्था पैलीकडे । अनुभवें हें कुवांडें⁴ ।
उकलावें ॥ ३७ ॥ मागें पुढें आकाश । पदार्थैविण जो पैस⁵ । पृथ्वीविण
भकांस⁶ । एकरूप ॥ ३८ ॥ जें जें रूप आणि नाम । तो तो नौथि-
लाचि⁷ भ्रम । नामरूपातीत वर्म । अनुभवी जाणती ॥ ३९ ॥ नभीं धू-
म्राचे डोंगर । उचलती थोर थोर । तैसें दावी वोडंबरें⁸ । माया देवी ॥ ४० ॥
ऐशी माया अशाश्वत । ब्रम्ह जाणावें शाश्वत । सर्वांठायीं सदोदित । भ-
रलें असे ॥ ४१ ॥ पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमध्यें९ भरलें आहे ।
: १. अग्नि. २. वायूमध्यें. ३. आंत बाहेर. ४. कोंडें ५. अवकाश. ६. ओसाड.
७. नसलेला. ८. गारुड. ९ अक्षरांमध्ये.

७ वा. ] द्वैतकल्पनानिरसन. १६५
नेत्रीं रिघोनियां राहे । मृदुपणें ॥ ४२ ॥ श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार
पाहतां । मना सबाह्य तत्वतां । परब्रम्ह तें ॥ ४३ ॥ चरणें चालतां मार्गीं ।
जें आढळेल सर्वांगीं । करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रम्ह ॥ ४४ ॥ असो इं-
द्रियसमुदाय । तयामध्यें वर्तें सर्व । जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची
॥ ४५ ॥ जें जवळींच असे । पाहों जातां न दिसे । न दिसोन बैसे । कांहीं
एक ॥ ४६ ॥ जें अनुभवेंच जाणावें । सृष्टीचेनि अभावें । आपुलेनि
स्वानुभवें । पाविजे ब्रम्ह ॥ ४७ ॥ ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे ।
अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ति साक्ष ॥ ४८ ॥ जाणे ब्रम्ह जाणे माया ।
जाणे अनुभवाच्या ठाया । ते एक जाणावी तुर्या । सर्वसाक्षणी ॥ ४९ ॥
साक्षित्व वृत्तीचें कारण । उन्मनीं ते निवृत्ती जाण । तेथें विरे जाणपण ।
विज्ञान तें ॥ ५० ॥ जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे । विज्ञानवृत्ति मुरे ।
परब्रम्हीं ॥ ५१ ॥ ऐसें ब्रम्ह शाश्वत । जेथें कल्पनेसि अंत । योगिजनांचा
एकांत । अनुभवें जाणावें ॥ ५२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तम-
दशके विमलब्रम्हनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. द्वैतकल्पनानिरसन.
श्रीगणेशाय नमः ॥ केवळ ब्रह्म जें बोलिलें । तें अनुभवास आलें ।
आणि मायेचें लागलें । अनुसंधान ॥ १ ॥ ब्रह्म अंतरीं प्रकाशे । आणि मा-
याही प्रत्यक्ष दिसे । आतां हें द्वैत निरसे । कवणेपरी ॥ २ ॥ तरी आतां
सावधान । एकाग्र करूनियां मन । माया ब्रह्म हें कवण । जाणताहे ॥ ३ ॥
सत्य ब्रम्हाचा संकल्प । मिथ्या मायेचा विकल्प । ऐशिया द्वैताचा जल्प ।
मनचि करी ॥ ४ ॥ जाणे ब्रम्ह जाणे माया । ते एक जाणावी तुर्या । सर्व
जाणे म्हणोनियां । सर्वसाक्षिणी ॥ ५ ॥ ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाण-
पण । सर्वचि नाहीं कवण । जाणेल गा ॥ ६ ॥ संकल्पविकल्पांची सृष्टी । झाली
मनाचिये पोटीं । तें मनचि मिथ्या शेवटीं । साक्षी कवण ॥ ७ ॥ साक्षित्व
चतन्य सत्ता । हे गुण ब्रम्हाचिया माथां । आरोपिले जाण वृथा । मायागुणें
१. दिसत नाहीं पण आहे. २. डोळ्यानें. ३. मनाच्या लयाची अवस्था.
४. तर्क. ५. सविकल्प समाधि.

१६६ श्रीदासबोध. [ दशक

॥ ८ ॥ घटमठाचेनि गुणें । त्रिविध¹ आकाश हें बोलणें । मायेचेनि खरेपणें ।
गुण ब्रम्हीं ॥ ९ ॥ जंव खरेपण मायेसी । तंवचि साक्षित्व ब्रम्हासी । माया-
अविद्येचे निरासीं² । द्वैत कैंचें ॥ १० ॥ म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि झा-
लिया उन्मन³ । मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ॥ ११ ॥ जयास
द्वैत भासलें । तें मन उन्मन झालें । द्वैताद्वैताचें तुटलें । अनुसंधान ॥१२॥
एवं द्वैत आणि अद्वैत । होय वृत्तीचा संकेत । वृत्ति झालिया निवृत्त । द्वैत
कैंचें ॥ १३ ॥ वृत्तिरहित जें ज्ञान । तेंचि पूर्ण समाधान । जेथें तुटे अनुसं-
धान । मायाब्रम्हाचें ॥ १४ ॥ मायाब्रम्ह ऐसा हेत । मनें कल्पिला संकेत ।
ब्रम्ह कल्पनेरहित । जाणती ज्ञानी ॥ १५ ॥ जें मनबुद्धि अगोचर । जें क-
ल्पनेहूनि पर । तें अनुभवितों साचार । द्वैत कैंचें ॥ १६ ॥ द्वैत पाहतां
ब्रम्ह नसे । ब्रम्ह पहातां द्वैत नासे । द्वैताद्वैत भासे । कल्पनेसी ॥१७॥ क-
ल्पना माया निवारी । कल्पना ब्रम्ह थाव⁴री । संशय धरी आणि वारी ।
तेहि कल्पना ॥ १८ ॥ कल्पना करी बंधन । कल्पना दे समाधान । ब्रम्हीं
लावी अनुसंधान । तेहि कल्पना ॥ १९ ॥ कल्पना द्वैताची माता । कल्पना
ज्ञा⁵सि तत्वता । बद्धता आणि मुक्तता । कल्पनागुणें ॥ २० ॥ कल्पना अं-
तरीं सबळ । नसते दावी ब्रह्मगोळ । क्षणएकांत निर्मळ । स्वरूप कल्पी
॥ २१ ॥ क्षणएक धोका वाहे । क्षणएक स्थिर राहे । क्षणएक पाहे । वि-
क्षित होउनी ॥ २२ ॥ क्षणएकांत उमजे । क्षणएक निर्बु⁶जे । नाना विकार
करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३ ॥ कल्पना जन्माचें मूळ । कल्पना
भक्तीचें फळ । कल्पना तेचि केवळ । मोक्षदात्री ॥ २४ ॥ असो ऐसी हे
कल्पना । साधनें दे समाधाना । येन्हवीं हे पतना⁷ । मूळंचि कीं ॥ २५ ॥
म्हणोनि सर्वांचें मूळ । ते हे कल्पनाचि केवळ । इचें केलिया निर्मूळ ।
ब्रह्मप्राप्ती ॥ २६ ॥ श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान । मिथ्या
कल्पनेचें भान । उडोनि जाय ॥ २७ ॥ शुद्धब्रह्माचा निश्चय । करी कल्प-
नेचा जय । निश्चिताथें संशय । तुटोनि जाय ॥२८॥ मिथ्या कल्पनेचें कोडें ।

१. घटानें मर्यादित, मठानें मर्यादित, व अमर्याद असें त्रिविध. २. निरसन
झाल्यावर. ३. संकल्पविकल्परहित. ४. स्थापित करी. ५. ज्ञान. ६. समजत नाहींसें
होतें. ७. नाशास कारण.

७ वा.] बद्धमुक्त. १६७
कैसें राहे साचापुढें । जैसें सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९ ॥ तैसें
ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे । मग हें तुटे आपसें । द्वैतानु-
संधान ॥ ३० ॥ कल्पनेनें कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे । कां शरें
शर आंतुडे । आकाशमार्गीं ॥ ३१ ॥ शुद्ध कल्पनेचें बळ । झालिया नासे
सबळें । हेंचि वचन प्रांजळ । सावध ऐका ॥ ३२ ॥ शुद्ध कल्पनेची खूण ।
स्वयें कल्पिजे निर्गुण । स्वस्वरूपीं विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३ ॥ सदा
स्वरूपानुसंधान । करी द्वैताचें निरसन । अद्वैत निश्चयाचें ज्ञान । तेंचि
शुद्ध कल्पना ॥ ३४ ॥ अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध । अ-
शुद्ध तेचि प्रसिद्ध । सबळ जाणावी ॥ ३५ ॥ शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वै-
ताचा निश्चितार्थ । आणि सबळ ते व्यर्थ । द्वैत कल्पी ॥ ३६ ॥ अद्वैत क-
ल्पना प्रकाशे । तेच क्षणीं द्वैत नासे । द्वैतासरसी निरसे । सबळ कल्पना
॥ ३७ ॥ कल्पनेनें कल्पना सरे । ऐसें जाणावें चतुरें । सबळ गेलियानंतरें ।
शुद्ध उरली ॥ ३८ ॥ शुद्ध कल्पनेचें रूप । तेंचि कल्पी स्वरूप । कल्पितां
तद्रूप । होय आपण ॥ ३९ ॥ कल्पनेस मिथ्यात्व आलें । सहजचि तद्रूप
झालें । आत्मनिश्चयें नाशिलें । कल्पनेसी ॥ ४० ॥ जेचि क्षणीं निश्चय चले ।
तेचि क्षणीं द्वैत उँफाळे । जैसा अस्तमानीं प्रबळे । अंधकार ॥ ४१ ॥ तैसें
ज्ञान होतां मलिन । अज्ञान प्रबळे जाण । याकारणें श्रवण । अखंड असावें
॥ ४२ ॥ आतां असो हें बोलणें झालें । आशंका फेहूँ एका बोलें । जयास
अद्वैत भासलें । तें तूं नव्हेंसी सर्वथॉ ॥ ४३ ॥ मार्गील आशंका फिटली ।
इतुकेन हे कथा संपली । पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ४४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके द्वैतकल्पनानिरसननिरूपणं
नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. बद्धमुक्त.
श्रीगणेशाय नमः ॥ अद्वैत ब्रह्म निरूपिलें । जें कल्पनारहित संचलें ।
क्षणएक तदाकार केलें । मज या निरूपणें ॥ १ ॥ परी म्यां तदाकार व्हावें ।
१. जगताचा भास. २. तुटून पडता. ३. शबल, औपाधिक. ४. उसळतें. ५.
कल्पनेला अद्वैत भासतें, ती कल्पना कांहीं स्वरूप नव्हें.

१६८ श्रीदासबोध. [ दशक
ब्रम्हचि होऊन असावें । पुनः संसारास न यावें । चंचळपणें सर्वथा ॥ २ ॥
कल्पनेरहित जें सुख । तेथें नाहीं संसारदुःख । म्हणोनि तेंचिएक । होऊन
असावें ॥ ३ ॥ बम्हचि होईजे श्रवणें । पुन्हा वृत्तीवरी लागे येणें । ऐसें
सदा येणें । चुकेना कीं ॥ ४ ॥ मनें अंतरीं जावें । क्षणएक ब्रम्हचि व्हावें ।
पुन्हा तेथून कोसळावें । वृत्तींवरी¹ मागुती ॥ ५ ॥ ²ऐत्यावृत्ति सैरावैरा ।
किती करूं येरझारा । पायीं लावूनियां दोरा । कीटक जैसा ॥ ६ ॥ उपदेश-
काळीं तदाकार । होतां पडे हें शरीर । अथवा नेणे आपपर । ऐसें झालें
पाहिजे ॥ ७ ॥ ऐसें नसतां जें बोलणें । तेंचि वाटे लाजिरवाणें । ब्रम्ह हो-
ऊन संसार करणें । हेंहि विपरीत दिसे ॥ ८ ॥ जो स्वयें ब्रम्हचि झाला ।
तो मागुता कैसा आला । ऐसें ज्ञान माझें मजला । प्रशस्त न वाटे ॥ ९ ॥
ब्रम्ह होऊन जावें । कां ते संसारींच असावें । दोहींकडे भरंगळावें । किती
म्हणोनी ॥ १० ॥ निरूपणीं ज्ञान प्रबळे । उठोन जातां तें मावळे । मागुता
कामक्रोध खवळे । ब्रम्हरूपासैं³ ॥ ११ ॥ ऐसा कैसा ब्रम्ह झाला । दोहींकडे
अंतरला । वोडगस्तपणींच गेला । संसार त्याचा ॥ १२ ॥ घेतां ब्रम्हसुखाची
गोडी । संसारिक मागें वोढी । संसार करितां आवडी । ब्रम्हीं उपजे ॥ १३ ॥
ब्रम्हसुख नेलें संसारें । संसार नेला ज्ञानद्वारें । दोन्ही अपुरीं पुरें । एकहि
नाहीं ॥ १४ ॥ याकारणें माझें चित्त । चंचळ झालें दुश्चित । याकारणें
निश्चितार्थ । एकहि नाहीं ॥ १५ ॥ ऐसा श्रोता करी विनंती । आतां राहावें
कोणे रीती । म्हणे अखंड माझी मती । ब्रह्माकार नाहीं ॥ १६ ॥ आतां
याचें प्रत्युत्तर । वक्ता देईल सुंदर । श्रोतीं व्हावें निरुत्तर । क्षणएक आतां
॥ १७ ॥ ब्रह्मचि होऊन जे पडिले । तेचि मुक्तिपदास गेले । येर ते काय
बुडाले । व्यासादिक ॥ १८ ॥ श्रोता विनंती करी पुढती । शुको मुक्तो
वामदेवो वा⁴ हे श्रुती । दोघेचि मुक्त आदि अंतीं । बोलत असे ॥ १९ ॥
वेदें बद्ध केले सर्व । मुक्त शुक वामदेव । वेदवचनीं अभावैं५ । कैसा धरा-
वा ॥ २० ॥ ऐसा श्रोता वेदाधारें । देता झाला प्रत्युत्तरें । दोघेचि मुक्त
अत्यादरें । प्रतिपाद्य केले ॥ २१ ॥ वक्ता बोले याउपरी । दोघेचि मुक्त सृ-
१. देहभानावर. २. पुन्हा पुन्हा. ३. ब्रम्हरूप झालेल्या मला. ४. 'शुक मुक्त
किंवा वामदेव मुक्त.' ५. अविश्वास.

७ वा.] बद्धमुक्त. १६९
ष्टीवरी । ऐसें बोलतां उरी १ । कोणास आहे ॥ २२ ॥ बहु ऋषी बहु मुनी ।
सिद्ध योगी आत्मज्ञानी । झाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३ ॥
श्लोक ॥ प्रह्लादनारदपराशरपुंडरीकव्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ॥
रुक्मांगदार्जुनवसिष्ठबिभीषणादीन्पुण्यानिमान्परमभागवतान्स्मरामि ॥ १ ॥
कविर्हरिरंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः ॥ आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभा-
जनः ॥ २ ॥ यांहीं वेगळे थोर थोर । ब्रम्हा विष्णु महेश्वर । आदिकरून
दिगंबर २ । विदेहादिकें ३ ॥ २४ ॥ शुक वामदेव मुक्त झाले । येर हे अवघेच
बुडाले । या वचनें विश्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५ ॥ तरी वेद कैसा बो-
लिला । तो काय तुम्हीं मिथ्या केला । ऐकोन वक्ता देता झाला । प्रत्युत्तर
॥ २६ ॥ वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष । साधु आणि
व्युत्पन्न दक्ष । त्यास हें न माने ॥ २७ ॥ तथापि हें जरी मानलें । तरी
वेदसामर्थ्य बुडालें । वेदाचोनि उद्धारिलें । न वचे कोणा ॥ २८ ॥ वेदांअंगीं
सामर्थ्य नसे । जरी या वेदासि कोण पुसे । म्हणोनि वेदीं सामर्थ्य असे ।
जन उद्धरावया ॥ २९ ॥ वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यराशी ।
म्हणोनि वेदीं सामर्थ्यांसी । काय उणें ॥ ३० ॥ वेद शास्त्र पुराण । भाग्यें
झालिया श्रवण । तेणें होइजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१ ॥ श्लोक अ-
थवा श्लोकार्ध । नाहीं तरी श्लोकपादें ४ । श्रवण होतां एक शब्द । नाना दोष
जाती ॥ ३२ ॥ वेदशास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्यांच्या अर्थीं ५ । अगाध म-
हिमा व्यासवाणी । वदोनि गेली ॥ ३३ ॥ एकाक्षर होतां श्रवण । तात्काळां
चि होइजे पावन । ऐसें ग्रंथाचें महिमान । ठायीं ठायीं बोलिलें ॥ ३४ ॥ दोहीं-
वेगळा तिजा नुद्धरे । तरी महिमा कैंचा उरे । असें हें जाणिजे चतुरें । येर-
गाथागोवी ॥ ३५ ॥ वेदशास्त्रें पुराणें । कैसीं होती अप्रमाणें । दोघांवांचूनि
तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६ ॥ म्हणसी काष्ठ होऊनि पडिला । तोचि एक
मुक्त झाला । शुक तोहि अनुवादला । नाना निरूपणें ॥ ३७ ॥ शुक मुक्त
ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण । परी तो नव्हता अचेतन ६ । ब्रम्हाकार
॥ ३८ ॥ अचेतन ब्रम्हाकार । असता शुक योगीश्वर । तरी सारासार विचार ।


१. बाकी कोण उरलें ? मुक्त कोणीच नाहीं असें झालें. २. संन्यासी. ३. जन-
कादिक. ४. श्लोकाचा एक चरण. ५. ठिकाणीं ६. जड, सुस्त.

१७० श्रीदासबोध. [ दशक
बोलणें न घडे ॥ ३९॥ जो ब्रम्हाकार झाला । तो काष्ठ होऊन पडिला । शुक
भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४० ॥ निरुपण हें सारासार । बोलिला
पाहिजे विचार । धांडोळावें चराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१ ॥ क्षणएक ब्रम्ह-
चि व्हावें । क्षणएक दृश्य धांडोळावें । नाना दृष्टांतीं संपादावें । वक्तृत्वांसी
॥ ४२ ॥ असो भागवतनिरूपण । शुक बोलिला आपण । तया अंगीं बद्धपण ।
लावूं नये कीं ॥ ४३ ॥ म्हणोनि बोलतां चालतां । निश्चेष्टित पडिलें नसतां ।
मुक्ति लाभे सायुज्यता । सद्गुरुबोधें ॥ ४४ ॥ एक मुक्त एक नित्यमुक्त ।
एक जाणावे जीवन्मुक्त । एक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५ ॥
सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेह²मुक्त । दोहीं वेगळे नित्यमुक्त ।
योगीश्वर जाणावे ॥ ४६ ॥ स्वरूपबोधें स्तब्ध³ता । ते जाणावी तटस्थता ।
तटस्थता आणि स्तब्धता । हा देहसंबंध ॥ ४७ ॥ येथें अनुभवासीच कारण ।
येर सर्व निष्कारण । तृप्ति पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८ ॥
कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला । तेणें शब्दें जाजावला । हें तों
घडेना ॥ ४९ ॥ स्वरूपीं नाहीं देह । तेथें कायसा संदेह । बद्ध मुक्त ऐसा
भाव । देहाचकडे ॥ ५० ॥ देहबुद्धी धरून चित्तीं । मुक्त ब्रम्हादिक
नव्हती । तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१ ॥ मुक्तपणें येणेंचि
बद्ध । मुक्त बद्ध ह अबद्ध⁴ । स्वस्वरूप स्वतःसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२ ॥
मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाइजे पाताळा । देहबुद्धीची अर्गळा⁵ ।
स्वरूपीं न संटे⁶ ॥ ५३ ॥ मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला ।
मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४ ॥ जयास बांधावें तें वावें ।
तेथें कैंचा मुक्तभाव । पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५ ॥
श्लोक ॥ बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ॥ गुणस्य मायामूल-
त्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १ ॥ टीका ॥ तत्वज्ञाता परम शुद्ध । तया-
सि नाहीं मुक्त बद्ध । मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६ ॥ जेथें नाम-
रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे । मुक्तबद्ध हें विसरे । विसरपणेंसीं
१. देहभानावर असणारे; व्यवहार करणारे. २. देहभानरहित, समाधिनिमग्न.
३. इंद्रियगति थांबणें. ४. गैरशिस्त. ५. अडथळा. ६. टिकत नाहीं. ७. भ्रामक.
८. त्रिगुणांचा विचार.

७ वा. ] साधनप्रतिष्ठा. १७१
॥ ५७ ॥ बद्ध मुक्त झाला कोण । ऐसा श्रोता करी प्रश्न । बाधक जाणावें
मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८ ॥ एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम ।
मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९ ॥ असो बद्धता आणि मुक्तता ।
आली कल्पनेच्या माथां । ते कल्पना तरी तत्वतां । साच १ आहे ॥ ६० ॥
म्हणोनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ । स्वप्न मिथ्या तात्काळ ।
जागृतीस होय ॥ ६१ ॥ स्वप्नीं बद्ध मुक्त झाला । तो जागृतीस नाहीं
आला । कैंचा कोण काय झाला । कांहीं कळेना ॥ ६२ ॥ म्हणोन मुक्त
विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान । शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३ ॥
बद्ध मुक्त हा संदेह । धरी कल्पनेचा देह । साधु सदा निःसंदेह । देहा-
तीत वस्तु ॥ ६४ ॥ आतां असो हें पुढती । पुढें कळावें कोणे रीतीं । तेंचि
निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे सप्तमदशके बद्धमुक्तनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. साधनप्रतिष्ठा.
श्रीगणेशाय नमः ॥ वस्तूसि जरी कल्पावें । तरी तें निर्विकल्प स्वभा-
वें । तेथें कल्पनेच्या नांवें । शून्याकार ॥ १ ॥ तथापि कल्पूं जातां । न ये
कल्पनेच्या हातां । वोळखी ठावीं २ नै पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २ ॥ कांहीं
दृष्टिस न दिसे । मनास तेंहि न भासे । न भासे न दिसे कैसें । वोळखावें
॥ ३ ॥ पाहों जातां निराकार । मनासि पडे शून्याकार । कल्पूं जातां अं-
धकार । भरला वाटे ॥ ४ ॥ कल्पूं जातां वाटे काळें । परी तें काळें ना
पिवळें । आरक्त निळें ना ढवळें ३ । वर्णरहित ॥ ५ ॥ जयास वर्ण व्यक्ती ४
नसे । आसाहूनि अनारीसें । रूपचि नाहीं कैसें । वोळखावें ॥ ६ ॥ न दि-
सतां वोळखण । किती धरावी आपण । हें तों श्रमासीच कारण । होत
असे ॥ ७ ॥ जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अव्यक्त ५ । जो अचिंत्य चिं-
तनातीत । परमपुरुष ॥ ८ ॥ श्लोक ॥ अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गु-
णात्मने । समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ॥ १ ॥ अचिंत्य तें चिंतावें ।
अव्यक्तास आठवावें । निर्गुणास ओळखावें । कोणेपरी ॥ ९ ॥ जें दृष्टिसचि
१. खरी आहे? नाहीं. २. सांपडत नाहीं. ३. पांढरें. ४. आकार. ५. गुप्त.

१७२ श्रीदासबोध. [ दशक
न पडे । जें मनासहि नातुं१डे । तया कैसें पाहणें घडे । निर्गुणासी ॥ १०
असंगाचा संग धरणें । निरा२लंबिं वास करणें । निःशब्दासि अनुवादणें ।
कोणे परी ॥ ११ ॥ अचिंत्यासि चिंतूं जातां । निर्विकल्पासि कल्पितां ।
अद्वैताचें ध्यान करितां । द्वैतचि उठे ॥ १२ ॥ आतां ध्यानचि सांडावें ।
अनुसंधान मोडावें । तरी मागुतें पडावें । महासंशयीं ॥ १३ ॥ द्वैताच्या
भेणें अंतरीं । वस्तु न पाहिजे तरी । तेणें समाधाना डै३री । कदा असेचि
ना ॥ १४ ॥ सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे । नित्या-
नित्य विचारें घडे । समाधान ॥ १५ ॥ वस्तु चिंतितां द्वैत उपजे । सोडी
करितां कांहीं नुमजे । शून्यत्वें संदेहीं पडिजे । विवेकेंविण ॥ १६ ॥ ह्म-
णोनि विवेक धरावा । ज्ञानें प्रपंच सांडावा । अहंभाव वोसरावा । परी
तो वोसरेना ॥ १७ ॥ परब्रह्म तें अद्वैत । कल्पितांच उठे द्वैत । तेथें हेतु
आणि दृष्टांत । कांहींच न चले ॥ १८ ॥ तें आठवितां विसरिजे । कां तें
विसरोन आठविजे । जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ॥ १९ ॥ त्यास न भे-
टतां होय भेटी । भेटों जातां पडे तुटी । ऐशी हे नवल गोष्टी । मुकेपणाची
॥ २० ॥ तें साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना । लागला सं-
बंध तुटेना । निरंतर ॥ २१ ॥ तें असतचि सदा असे । नातरी पाहतां दु-
४रावे । न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२ ॥ जेथें अपाय तोचि उपाय ।
आणि उपाय तोचि अपाय । हें अनुभवेंविण काय । उमजों जाणे ॥ २३ ॥
तें नुमजतांचि उमजे । उमजोन कांहींच नुमजे । तें वृत्तीविण पाविजे । नि-
वृत्तिपद ॥ २४ ॥ तें ध्यानीं धरितां न ये । चिंतनीं चिंतावें तें काय । म-
नामध्यें न ५समाये । परब्रह्म तें ॥ २५ ॥ त्यास उपमे द्यावें जळ । तरी तें नि-
र्मळ निश्चळ । विश्व बुडालें सकळ । परी तें कोरडेंच असे ॥ २६ ॥ नव्हे प्र-
काशासारिखें । अथवा नव्हे काळोखें । आतां तें कासयासारिखें । सांगावें
हो ॥ २७ ॥ ऐसें ब्रह्म निरं६जन । कदा नव्हे दृश्य७मान । लावावें तें अनुसं-
धान । कोणे परी ॥ २८ ॥ अनुसंधान लावूं जातां । कांहीं नाहीं वाटे आतां ।
तेथे मनाचिये माथां । संदेह वाजे ॥ २९ ॥ लटिकेंचि काय पाहावें । कोठें


१. न कळे. २. अधांतरीं. ३. ठावठिकाण. ४. दुरावतें. ५. मावत नाहीं.
६. उपाधिरहित. ७. पाहण्याजोगें.

जाऊन राहावें । अभाव घेतला जीवें । सत्यस्वरूपाचा ॥ ३० ॥ अभावाचे
म्हणों सत्य । तरी वेदशास्त्र कैसें मिथ्य । आणि व्यासादिकांचें कृत्य १ ।
वाउगें नव्हे ॥ ३१ ॥ ह्मणोनि मिथ्या म्हणतां न ये । बहुत ज्ञानाचे उ-
पाय । बहुतीं निर्मिलें तें काय । मिथ्या ह्मणावें ॥ ३२ ॥ अद्वैत ज्ञानाचा
उपदेश । गुरुगीता तो महेश । सांगता होय पार्वतीस । महाज्ञान ॥ ३३ ॥
अवधूतें गीता केली । गोरक्षास निरूपिली । ते अवधूतगीता बोलिली । ज्ञा-
नमार्गें ॥ ३४ ॥ विष्णु होऊन राजहंस । विधीस २ केला उपदेश । ते हंस-
गीता जगदीश । बोलिला स्वमुखें ॥ ३५ ॥ ब्रम्हा नारदातें उपदेशित ।
चतुःश्लोकी भागवत । पुढें व्यासमुखें बहुत । विस्तारलें ॥ ३६ ॥ वासि-
ष्ठसार वसिष्ठ ऋषी । सांगता झाला रघुनाथासी । कृष्ण सांगे अर्जुनासी ।
सप्तश्लोकी ३ गीता ॥ ३७ ॥ ऐसें सांगावें तें किती । बहुत ऋषि बोलिले ब-
हुतीं । अद्वैतज्ञान आदि अंतीं । सत्यचि असे ॥ ३८ ॥ म्हणोन मिथ्या
आत्मज्ञान । म्हणतां पाविजे पतन । प्रज्ञारहित जे जन । तयांस हें कळेना
॥ ३९ ॥ जेथें शेषाची प्रज्ञा ४ मंदली । श्रुतीस मौनमुद्रा पडिली । जाणपणें
न वचे वदली । स्वरूपस्थिति ॥ ४० ॥ आपणास नुमजे बरवें । ह्मणोनि मि-
थ्या कैसें करावें । नातरी सुदृढ धरावें । सद्गुरुमुखें ॥ ४१ ॥ मिथ्या तेंचि
सत्य झालें । सत्य असोनि मिथ्या केलें । संदेहसागरीं बुडालें । अकस्मात
मन ॥ ४२ ॥ मनास कल्पायाची सवे । मनें कल्पिलें तें नव्हे । तेणें गुणें
संदेह धांवे । मीपणाचेनि पंथें ॥ ४३ ॥ तरी तो पंथचि मोडावा । मग पर-
मात्मा जोडावा । समूळ संदेह तोडावा । साधूचेनि संगतीं ॥ ४४ ॥ मीपण
शस्त्रें तुटेना । मीपण फोडितां फुटेना । मीपण सोडितां सुटेना । कांहीं
केल्या ॥ ४५ ॥ मीपणें वस्तु नाकळे । मीपणें भक्ति मावळे । मीपणें शक्ति
गळे । वैराग्याची ॥ ४६ ॥ मीपणें प्रपंच न घडे । मीपणें परमार्थ बुडे ।
मीपणें सकळहि उडे । यश कीर्ती प्रताप ॥ ४७ ॥ मीपणें मैत्री तुटे ।
मीपणें प्रीति आटे । मीपणें लिगटे । अभिमान आंगीं ॥ ४८ ॥ मीपणें
विकल्प उठे । मीपणें कलह सुटे । मीपणें संमोह फुटे । ऐक्यतेचा ॥ ४९ ॥
मीपण कोणासीच न साहे । तें भगवंतीं कैसेनि साहे । म्हणून


१. ग्रंथरूप कृति. २. ब्रम्हदेवास. ३. सप्तशतश्लोकी, सातशें श्लोकांची. ४. बुद्धि.

१७४ श्रीदासबोध. [ दशक
मीपण सांडून राहे । तोचि समाधानी ॥ ५० ॥ मीपण कैसें त्यागावें । ब्रम्ह
कैसें अनुभवावें । समाधान कैसें पावावें । कोणत्या प्रकारें ॥ ५१ ॥ मीपण
जाणोन त्यागावें । ब्रम्ह होऊन अनुभवावें । समाधान तें पावावें । निः-
संगपणें ॥ ५२ ॥ आणिक एक समाधान । मीपणेंविण साधन । करूं जाणे
तोचि धन्य । समाधानी ॥ ५३ ॥ मी ब्रम्हचि झालों स्वतां । साधन कोण
करील आतां । ऐसें मनीं कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४ ॥ ब्रम्हीं
कल्पना न साहे । तेचि तेथें उभी राहे । तयेसि शोधूनि पाहे । तोचि साधु
॥ ५५ ॥ निर्विकल्पासि कल्पावें । परी कल्पिलें तें आपण न व्हावें । मीप-
णास त्यागावें । येणें रीती ॥ ५६ ॥ ब्रम्हविद्येच्या लपनीं¹ । कांहींच न
व्हावें असोनी । दक्ष आणि समाधानी । तोचि हें जाणे ॥ ५७ ॥ जयास
आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें । येथें कल्पनेच्या नांवें । शून्य आलें
॥ ५८ ॥ पैदींहून² चलों नये । करावें साधन उपाय । तरीच सांपडे सोय ।
अलिप्तपणाची ॥ ५९ ॥ राजा राज्यपदीं असतां । उगीच चाले सर्वसत्ता ।
साध्यचि होऊन तत्वतां । साधन करावें ॥ ६० ॥ साधन आलें देहाच्या
माथां । आपण देह नव्हे सर्वथा । ऐसा करून अकर्ता । सहजचि आहे
॥ ६१ ॥ देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें । देहातीत असतां
स्वभावें । देह कैंचा ॥ ६२ ॥ ना तें साधन ना तें देह । आपण आपला
निःसंदेह । देहींच असोन विदेह³-। स्थिती ऐसी ॥ ६३ ॥ साधनेंविण ब्रम्ह
होतां । लागों पाहे देहममता । आळस प्रबळे तत्वतां । ब्रम्हज्ञानमिसें
॥ ६४ ॥ परमार्थमिसें आळस जागे । ध्यानमिसें निद्रा लागे । मुक्तिमिसें
दोष भोगे । अनर्गळता⁵ ॥ ६५ ॥ निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें विवाद
पडे । उपाधिमिसें येऊन जडे । अभिमान अंगीं ॥ ६६ ॥ तैसा ब्रम्हज्ञान-
मिसें । आळस अंतरीं प्रवेशे । म्हणे साधनाचें पिसें । काय करावें ॥ ६७ ॥
श्लोक ॥ किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् । आत्मना पूरितं
सर्वं महाकल्पांबुना यथा ॥ १ ॥ वचन आधारीं लाविलें । जैसें शस्त्र फिर-
विलें । स्वतां हाणोनि घेतलें । जयापरी ॥ ६८ ॥ तैसा उपायाचा अपाय ।
विपरीतपणें स्वहित जाय । साधन सोडितां होय । मुक्तपणें बद्ध ॥ ६९ ॥
१. पोटांत. २. स्वरूपांतून. ३. देहसंबंधी अलिप्तपणा. ४. लागतो. ५. स्वैरपणा.

७ वा. ] श्रवण. १७५
साधन करितां सिद्धपण । हातींचें जाईल निघोन । तेणें गुणें साधन ।
करूंच नावडे ॥ ७० ॥ लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे एक ।
साधन करिती ब्रम्हादिक । हें ठाउकें नाहीं ॥ ७१ ॥ आतां असो हे अवि-
द्या । अभ्याससारिणी विद्या । अभ्यासें पाविजे आद्या । पूर्ण ब्रम्हा ॥ ७२ ॥
अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । परमार्थाचें साधन ।
बोलिलें पाहिजे ॥ ७३ ॥ याचें उत्तर श्रोत्यांसी । दीधलें पुढिलिये समासीं ।
निरूपिलें साधनासी । परमार्थाच्या ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे सप्तमदशके साधनप्रतिष्ठानिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. श्रवण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान ।
तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥ १ ॥ श्रवणें आतुडे भक्ती । श्रवणें
उद्भवे विरक्ती । श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥ २ ॥ श्रवणें घडे चित्त-
शुद्धी । श्रवणें होय दृढबुद्धी । श्रवणें तुटे उपाधी । अभिमानाची ॥ ३ ॥
श्रवणें निश्चय घडे । श्रवणें ममता मोडे । श्रवणें अंतरीं जडे । समाधान
॥ ४ ॥ श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशय तुटे । श्रवण होतां पालटे । पूर्व-
गुण आपुला ॥ ५ ॥ श्रवणें आवरे मन । श्रवणें घडे समाधान । श्रवणें तुटे
बंधन । देहबुद्धीचें ॥ ६ ॥ श्रवणें मीपण जाय । श्रवणें धोका न ये । श्रवणें
नाना अपाय । भस्म होती ॥ ७ ॥ श्रवणें होय कार्यसिद्धी । श्रवणें लागे
समाधी । श्रवणें घडे सर्वसिद्धी । समाधानाची ॥ ८ ॥ सत्संगावरी श्रवण ।
तेणें कळे निरूपण । श्रवणें होईजे आपण । तदाकार ॥ ९ ॥ श्रवणें प्रबोधें
वाढे । श्रवणें प्रज्ञा चढे । श्रवणें विषयांचे वोढे । तुटोनि जाती ॥ १० ॥
श्रवणें विचार कळे । श्रवणें ज्ञान हें प्रबळे । श्रवणें वस्तु निवळे । साध-
कासी ॥ ११ ॥ श्रवणें सद्बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे । श्रवणें मन हें
माँगे । भगवंतासी ॥ १२ ॥ श्रवणें कुसंग तुटे । श्रवणें काम वोहटे । श्रवणें
धोका आटे । एकसरां ॥ १३ ॥ श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे । श्र-
वणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४ ॥ श्रवणें होय उत्तम गती । श्रवणें
१. अभ्यासानें लाभणारी. २. निश्चय. ३. विवेक. ४. बुद्धि. ५. इच्छितें.

१७६ श्रीदासबोध. [ दशक
आतुडे शांति । श्रवणें पाविजे निवृत्ती । अचळ पद ॥ १५ ॥ श्रवणाऐसें
सार नाहीं । श्रवणें घडें सर्व कांहीं । भवनदीच्या प्रवाहीँ । तरणोपाय श्र-
वणें ॥ १६ ॥ श्रवण भजनाचा आरंभ । श्रवण सर्वां सर्वारंभ । श्रवणें होय
स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७ ॥ प्रवृत्ती अथवा निवृत्ती । श्रवणेंविण न घडे
प्राप्ती । हे तों सकळांस प्रचीती । प्रत्यक्ष आहे ॥ १८ ॥ ऐकिल्याविण कळे-
ना । हैं ठाउकें आहे जना । या कारणें मूळ प्रयत्ना । श्रवण आधीं ॥ १९ ॥
जें जन्मीं ऐकिलेंचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं । म्हणोनिया दुजें कांहीं ।
साम्यता न घडे ॥ २० ॥ बहुत साधनें पाहतां । श्रवणास न घडे साम्यता ।
श्रवणेंविण तत्वतां । कार्य न चले ॥ २१ ॥ न देखतां दिनकर । पडे अव-
घा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होय ॥ २२ ॥ कैसी नवविधा
भक्ती । कैसी चतुर्विधा मुक्ती । कैसी आहे सहजस्थिती । हें श्रवणेंविण न
कळे ॥ २३ ॥ न कळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण । न कळे कैसें
उपासन । विधियुक्त ॥ २४ ॥ नाना व्रतें नाना दानें । नाना तपें नाना
साधनें । नाना योग तीर्थाटणें । श्रवणेंविण न कळती ॥ २५ ॥ नाना वि-
द्या पिंडज्ञान । नाना तत्त्वांचें शोधन । नाना कळा ब्रह्मज्ञान । श्रवणेंविण
न कळे ॥ २६ ॥ अठराभार वनस्पती । एक्या जळें प्रबळती । एक्या जळें
उत्पत्ती । सकळ जीवांची ॥ २७ ॥ सकळ जीवां एक पृथ्वी । सकळ जीवां
एक रवी । सकळ जीवां वर्तवी । एक वायु ॥ २८ ॥ सकळ जीवां एक
पैस । जयास बोलिजे आकाश । सकळ जीवांचा वास । एक परब्रह्मीं॥२९॥
तैसें सकळ जीवांस मिळोन । सारें एकचि साधन । तें हें जाण श्रवण ।
प्राणिमात्रांसी ॥ ३० ॥ नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । स-
वांस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥ ३१ ॥ श्रवणें घडे उपेरती । बद्धाचे
मुमुक्षु होती । मुमुक्षूचे साधक अंतीं । नेमंसि चालती ॥ ३२ ॥ साधकां-
चे होती सिद्ध । अंगीं बाणतां प्रबोधें । हें तों आहे प्रसिद्ध । सकळांस
ठाउकें ॥ ३३ ॥ ठायींचे खळ चांडाल । तेचि होती पुण्यशील । ऐसा हा
१. प्राप्त होते. २. अंतर्मुख होणें. ३. संसार. ४. परमार्थ. ५. अध्ययन, अ-
ध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह, यांचें आचरण. ६. मंत्राचा विधिपूर्वक
जप. ७. सर्व प्रकारच्या. ८. श्रेष्ठ. ९. वैराग्य. १०. विवेक.

७ वा. ] श्रवण. १७७
गुण तात्काळ । श्रवणाचा ॥ ३४ ॥ जो दुर्बुद्धि दुरात्मा । तोचि होय पु-
ण्यात्मा । अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे ॥ ३५ ॥ तीर्थ-
व्रतांची फळश्रुती । पुढें होणार सांगती । तैसें नव्हे हातींच्या हातीं । सप्र-
चीत श्रवणें ॥ ३६ ॥ नाना रोग नाना व्याधी । तत्काळ तोडिजे औषधीं ।
तैसी आहे श्रवणसिद्धि । अनुभवी जाणती ॥ ३७ ॥ श्रवणाचा विचार
कळे । तरीच भाग्यश्री प्रबळे । मुख्य परमात्मा आकळे । स्वानुभवासी ॥
३८ ॥ या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान । निदिध्यासें समा-
धान । होत असे ॥ ३९ ॥ बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान नि-
वळे । अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेह ॥ ४० ॥ संदेह जन्माचें मूळ ।
तें श्रवणें होय निर्मूळ । पुढें सहजचि प्रांजळ । समाधान ॥ ४१ ॥ जेथें
नाहीं श्रवण मनन । तेथें कैंचें समाधान । मुक्तपणाचें बंधन । जडलें पायीं
॥ ४२ ॥ मुमुक्षु साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो बद्ध । श्रवणमननें
शुद्ध । चित्तवृत्ति होय ॥ ४३ ॥ जेथें नाहीं नित्य श्रवण । तें जाणावें विल-
क्षण । तेथें साधकें एक क्षण । क्रमूं नये सर्वथा ॥ ४४ ॥ जेथें नाहीं श्रवण-
स्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ । मागें केलें तितुकें व्यर्थ । श्रवणेंविण होय
॥ ४५ ॥ तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें । नित्यनेमें तरावें ।
संसारसागरीं ॥ ४६ ॥ सेविलेंच सेवावें अन्न । घेतलेंच घ्यावें जीवन ।
तैसें श्रवणमनन । केलेंच करावें ॥ ४७ ॥ श्रवणाचा अनादर । आळसें
करी जो नर । त्याचा होय अपहार । स्वहिताविषयीं ॥ ४८ ॥ आळसाचें
संरक्षण । परमार्थाची बुडवण । या कारणें नित्य श्रवण । केलेंचि पाहिजे
॥ ४९ ॥ आतां श्रवण कैसें करावें । कोणत्या पंथास पावावें । पुढीलिये स-
मासीं आघवें । सांगिजेल ॥ ५० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स-
प्तमदशके श्रवणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. श्रवण.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां श्रवण कैसें करावें । तेंहि सांगिजेल स्वभावें ।
श्रोतीं अवधान द्यावें । एकचित्तें ॥ १ ॥ एक वक्तृत्व श्रवणीं पडे । तेणें
झालें समाधान मोडे । केला निश्चय विघडे । अकस्मात ॥ २ ॥ तें वक्तृ-

स्व त्यागावें । जें मायिक स्वभावें । जेथें निश्चयाच्या नांवें । शून्याकार ॥ ३ ॥
एक्या ग्रंथें निश्चय केला । तो दुजयानें उडविला । तेणें संशयाचि वाढला ।
जन्मवरी ॥ ४ ॥ जेथें संशय तुटती । होय आशंकानिवृत्ती । अद्वैतग्रंथ प-
रमार्थीं । श्रवण करावे ॥ ५ ॥ जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ
धरी । प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६ ॥ जेणें सांडिला इहलोक ।
जो परलोकींचा साधक । तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७ ॥ जयास
पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेवितां द्वैत । तेणें क्षोभलें उठे चित्त । श्रोत्यांचें
॥ ८ ॥ आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे । नाहीं तरी कंटाळे ।
मानस ऐकतां ॥ ९ ॥ ज्याची उपासना जैसी । त्यासि प्रीति वाढे तैसी ।
तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वाटे ॥ १० ॥ प्रीतींचें लक्षण ऐसें ।
अंतरीं उठे अनायासें । पाणी पाणवाटे जैसें । आपणचि धांवे ॥ ११ ॥ तैसा
जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर । तेथें पाहिजे सारासार । विचा-
रणा ते ॥ १२ ॥ जेथें कुलदेवी भगवती । तेथें पाहिजे सप्तशती । इतर
देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३ ॥ घेतां अनंताच्या व्रता । तेथें
नलगे भगवद्गीता । साधुजनांसि वार्त्ता । फळाशेची नाहीं ॥ १४ ॥ वीर-
कंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं । जेथील तेथें आणिकीं ।
कामा न ये सर्वथा ॥ १५ ॥ नाना माहात्म्यें बोलिलीं । जेथील तेथें वंद्य
झालीं । विपरीत करून वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६ ॥ मल्हारि-
माहात्म्य द्वारकेसी । द्वारकामाहात्म्य नेलें काशीसी । काशीमाहात्म्य व्यंक-
टेशीं । शोभा न पावे ॥ १७ ॥ ऐसें सांगतां असे वाढ । परी जेथील तेथेंच
गोड । तैशी ज्ञानियांस चाड । अद्वैतग्रंथाची ॥ १८ ॥ योगियापुढें राहाणे ।
परीक्षावंतापुढें पाषाण । पंडितापुढें डफगाण । शोभा न पावे ॥ १९ ॥
वेदज्ञापुढें जंती । निस्पृहापुढें फलश्रुती । ज्ञानियापुढें पोथी । कोकशास्त्राची
॥ २० ॥ ब्रह्मचाऱ्यापुढें नाचैंणी । रासक्रीडा निरूपणीं । राजहंसापुढें पाणी ।
ठेविलें जैसें ॥ २१ ॥ तैसें अंतर्निष्ठापुढें । ठेविलें शृंगारिक टिपडें । तेणें त्याचें
कैसें घडे । समाधान ॥ २२ ॥ रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयूषा ।
१. जादूटोणा. २. जैनांचा स्वामी. ३. कामशास्त्राची. ४. नायकीण. ५. ब्रह्म-
निष्ठापुढें. ६. अमृताला.

७ वा. ] श्रवण. १७९
संन्यासास वोवेसा । उच्छिष्ट चांडोळीचा ॥ २३ ॥ कर्मनिष्ठा वशीकरण ।
पंचाक्षरिया निरूपण । तेथें भंगे अंतःकरण । सहजचि त्याचें ॥ २४ ॥ तैसे
पारमार्थिक जन । तयांस नसतां आत्मज्ञान । ग्रंथैं वाचितां समा-
धान । होणार नाहीं ॥ २५ ॥ आतां असो हें बोलणें । जयास स्वहित
करणें । तेणें सदा विवरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६ ॥ आत्मज्ञानीं एकचित्त ।
तेणें पाहणें अद्वैत । एकांतस्थळीं निवांत । समाधान ॥ २७ ॥ बहुत प्रकारें
पाहतां । ग्रंथ नाहीं अद्वैतापरता । परमार्थास तत्वतां । तारूंच कीं ॥ २८ ॥
इतर जें प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । पर-
मार्थांसीं ॥ २९ ॥ जेणें परमार्थ वाढे । अंगीं अनुताप चढे । भक्तिसाधन
आवडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३० ॥ जो ऐकतांच गर्व गळे । कां ते आंतींच
मावळे । नातरी एकसरें वोळे । मन भगवंतीं ॥ ३१ ॥ जेणें होय उपरती ।
अवगुण अवघे पालटती । जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ॥ ३२ ॥
जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे । जेणें विषयवासना मोडे । त्या नांव
ग्रंथ ॥ ३३ ॥ जेणें परत्रसाधन । जेणें ग्रंथें होय ज्ञान । जेणें होइजे पावन ।
त्या नांव ग्रंथ ॥ ३४ ॥ ग्रंथ बहुत असती । नानाविधानें फळश्रुती । जेथें
नुपजे विरक्ती । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५ ॥ मोक्षाविण फळश्रुती । ते दुरा-
शेची पोथी । ऐकतां ऐकतां पुढती । दुराशा वाढे ॥ ३६ ॥ श्रवणीं लोभ
उपजेल जेथें । विवेक कैंचा असेल तेथें । बैसलीं दुराशेचीं भुतें । तयां
अधोगती ॥ ३७ ॥ ऐकोनीच फळश्रुती । पुढें तरी पावों म्हणती । तयां
जन्म अधोगती । सहजचि जाहली ॥ ३८ ॥ नाना फळें पक्षी खाती ।
तेणेंचि तयां होय तृप्ती । परी त्या चकोराचे चित्तीं । अमृत वसे ॥ ३९ ॥
तैसे संसारी मनुष्य । पाहे संसाराची वास । परी जे भगवंताचे अंश । ते
भगवंत इच्छिती ॥ ४० ॥ ज्ञानियांस पाहिजे ज्ञान । भजकास पाहिजे
भजन । साधकास पाहिजे साधन । इच्छेसारिखें ॥ ४१ ॥ परमार्थास
पाहिजे परमार्थ । स्वार्थास पाहिजे स्वार्थ । कृपणास पाहिजे अर्थ । मना-
पासूनी ॥ ४२ ॥ योगियास पाहिजे योग । भोगियास पाहिजे भोग ।
१. व्रत. २. एक क्षुद्र देवता, तिचा. ३. ज्यांत आत्मज्ञान नाहीं तो ग्रंथ. ४.
संसाराचा कंटाळा. ५. वैराग्य. ६. एक पक्षी, त्या ते. ७. द्रव्य. ८. विषयी पुरुषास.