दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 214, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७ वा. ] श्रवण. १७९
संन्यासास वोवेसा । उच्छिष्ट चांडोळीचा ॥ २३ ॥ कर्मनिष्ठा वशीकरण ।
पंचाक्षरिया निरूपण । तेथें भंगे अंतःकरण । सहजचि त्याचें ॥ २४ ॥ तैसे
पारमार्थिक जन । तयांस नसतां आत्मज्ञान । ग्रंथैं वाचितां समा-
धान । होणार नाहीं ॥ २५ ॥ आतां असो हें बोलणें । जयास स्वहित
करणें । तेणें सदा विवरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६ ॥ आत्मज्ञानीं एकचित्त ।
तेणें पाहणें अद्वैत । एकांतस्थळीं निवांत । समाधान ॥ २७ ॥ बहुत प्रकारें
पाहतां । ग्रंथ नाहीं अद्वैतापरता । परमार्थास तत्वतां । तारूंच कीं ॥ २८ ॥
इतर जें प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । पर-
मार्थांसीं ॥ २९ ॥ जेणें परमार्थ वाढे । अंगीं अनुताप चढे । भक्तिसाधन
आवडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३० ॥ जो ऐकतांच गर्व गळे । कां ते आंतींच
मावळे । नातरी एकसरें वोळे । मन भगवंतीं ॥ ३१ ॥ जेणें होय उपरती ।
अवगुण अवघे पालटती । जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ॥ ३२ ॥
जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे । जेणें विषयवासना मोडे । त्या नांव
ग्रंथ ॥ ३३ ॥ जेणें परत्रसाधन । जेणें ग्रंथें होय ज्ञान । जेणें होइजे पावन ।
त्या नांव ग्रंथ ॥ ३४ ॥ ग्रंथ बहुत असती । नानाविधानें फळश्रुती । जेथें
नुपजे विरक्ती । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५ ॥ मोक्षाविण फळश्रुती । ते दुरा-
शेची पोथी । ऐकतां ऐकतां पुढती । दुराशा वाढे ॥ ३६ ॥ श्रवणीं लोभ
उपजेल जेथें । विवेक कैंचा असेल तेथें । बैसलीं दुराशेचीं भुतें । तयां
अधोगती ॥ ३७ ॥ ऐकोनीच फळश्रुती । पुढें तरी पावों म्हणती । तयां
जन्म अधोगती । सहजचि जाहली ॥ ३८ ॥ नाना फळें पक्षी खाती ।
तेणेंचि तयां होय तृप्ती । परी त्या चकोराचे चित्तीं । अमृत वसे ॥ ३९ ॥
तैसे संसारी मनुष्य । पाहे संसाराची वास । परी जे भगवंताचे अंश । ते
भगवंत इच्छिती ॥ ४० ॥ ज्ञानियांस पाहिजे ज्ञान । भजकास पाहिजे
भजन । साधकास पाहिजे साधन । इच्छेसारिखें ॥ ४१ ॥ परमार्थास
पाहिजे परमार्थ । स्वार्थास पाहिजे स्वार्थ । कृपणास पाहिजे अर्थ । मना-
पासूनी ॥ ४२ ॥ योगियास पाहिजे योग । भोगियास पाहिजे भोग ।
१. व्रत. २. एक क्षुद्र देवता, तिचा. ३. ज्यांत आत्मज्ञान नाहीं तो ग्रंथ. ४.
संसाराचा कंटाळा. ५. वैराग्य. ६. एक पक्षी, त्या ते. ७. द्रव्य. ८. विषयी पुरुषास.