सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

९८ श्रीदासबोध. [ दशक
क्षिती १ । तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ती कैंच्या तेथें ॥ २८ ॥ तेव्हां
निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ । सायुज्यमुक्ति ते केवळ ।
जाणिजे ऐसी ॥ २९ ॥ निर्गुणीं अनन्य २ असतां । तेणें होय सायुज्यता ।
सायुज्यता म्हणजे स्वरूपता । निर्गुण भक्ती ॥ ३० ॥ सगुण भक्ति ते चळे ।
निर्गुण भक्ती ते न चळे । हें अवघें प्रांजळ कळे । सद्गुरु केलिया ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके मुक्तिचतुष्टयनिरूपणं नाम
दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २९६.
दशक पांचवा.
१. गुरुनिश्चय.
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मया-
रामा । अनिर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १ ॥ जें वेदांसि
सांकडें ३ । जें शब्दासि कोंडडें ४ । तें सच्छिष्यासि रोकडें । अलभ्य लाभे ॥
२ ॥ जें योगियांचें निज वर्म ५ । जें शंकराचें निजधाम । जें विश्रांतीचें निज-
विश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३ ॥ तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणाचि
होइजे अंगें । दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेना ६ सर्वथा ॥ ४ ॥ आतां
स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें । सांगिजती तेणेंप्रमाणें ।
मुमुक्षें शरण जावें ॥ ५ ॥ गुरु तो सकळांसि ब्राह्मण । जरी तो जाहला
क्रियाहीन ७ । तरी तयासि शरण । अनन्यभावें असावें ॥ ६ ॥ अहो या
ब्राह्मणांकारणें । अवतार घेतला नारायणें । विष्णूनें श्रीवत्स मिरवणे । तेथें
इतर ते किती ॥ ७ ॥ ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्राचे ब्राह्मण । धातु-
पाषाणीं देवपण । ब्राह्मणाचेनि मंत्रें ॥ ८ ॥ मुंजीबंधनाविरहित । तो
शूद्रचि निर्भ्रांत । द्विजन्मा म्हणोनि सतत । द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९ ॥
सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण । वेदविरहित तें अप्र-
माण ८ । अप्रिय भगवंता ॥ १० ॥ ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं
१. पृथ्वी. २. एकनिष्ठ. ३. जाणण्यास कठीण. ४. अवघड. ५. गुह्य गोष्ट.
६. मळानें मळत नाहीं. ७. आचारभ्रष्ट. ८. प्रमाण नव्हे.

सकळ तीर्थाटणें । कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११ ॥ ब्राह्मण
वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत । पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्यें-
करोनि ॥ १२ ॥ ब्राह्मणपूजनें शुद्धवृत्ति । होऊनि जडे भगवंतीं । ब्राह्मण-
तीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३ ॥ लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण ।
अन्य यातीस पुसे कोण । परी भगवंतासि भाव प्रमाण । येरां चाड नाहीं
॥ १४ ॥ असो ब्राह्मणास सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती । जरी
ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५ ॥ अंत्यज शब्दज्ञाता बरवा । परी
तो नेऊनि काय करावा । ब्राह्मणासन्निध पू जावा । हैं तौं घडेना कीं ॥ १६ ॥ जें
जें जनावेगळें केलें । तें तें वेदें अव्हेरिलें । म्हणोनि तयास नाम ठेविलें । पांखाड
मत ॥ १७ ॥ असो जो हरिहरदास । तयास ब्राह्मणीं विश्वास । ब्राह्मणभजनें
बहुतांस । पावन केलें ॥ १८ ॥ ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ
सद्गुरु करावा । ऐसें म्हणाल तर निजठेवा । सद्गुरूविण नाहीं ॥ १९ ॥ स्व-
धर्मकर्मीं पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्गुरूविण । ब्रह्मज्ञान नसतां क्षीण ।
जन्ममृत्यु चुकेना ॥ २० ॥ सद्गुरूविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
अज्ञान प्राणी प्रवाही । वाहातचि गेले ॥ २१ ॥ ज्ञानविरहित जें जें केलें ।
तें तें जन्मासि मूळ झालें । म्हणोनि सद्गुरूचीं पाउलें । सदृढ धरावीं ॥ २२॥
जयास वाटे देव व्हावा । तेणें सत्संग धरावा । सत्संगेंवीण देवाधिदेवा ।
पाविजेत नाहीं ॥ २३ ॥ नाना साधनें बापुडीं । सद्गुरूविण करिती वेडीं ।
गुरुकृपेविण कुडकुर्डीं । व्यर्थचि होती ॥ २४ ॥ कार्तिकस्नानें माघस्नानें ।
व्रतें उद्यापनें दानें । गोरांजनें धूम्रपानें । साधीती पंचाग्नी ॥ २५ ॥ हरि-
कथा पुराणश्रवण । आदरें करिती निरूपण । सर्व तीर्थे परम कठिण । क-
रिती प्राणी ॥ २६ ॥ झळफळीत देवतार्चनें । स्नान संध्या दर्भासनें । टिळे
माळा गोपीचंदनें । ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७ ॥ अर्घ्यपात्रें संपुट गोकर्णे । मंत्र-
यंत्रांचीं ताम्रपर्णै । नानाप्रकारीं उपकरणें । साहित्यशोभा ॥ २८ ॥ घंटा
१. इतरांची गरज. २. महारमांग. ३. स्वरूपाची प्राप्ति. ४. निरुपयोगी.
५. ईश्वरप्राप्तीसाठीं स्वतःला जाळून घेणें. ६. झाडाला टांगून घेऊन खालीं केलेला
धूर पिणें. ७. सभोवार चार अग्नी पेटवून मस्तकावर सूर्याचें ऊन घेणें. ८. तांब्याचे
पत्र्यावर कांहीं रेखाकृति काढून मंत्र साधणें. ९. पूजेच्या सामुग्रीचा थाट.

१०० श्रीदासबोध. [ दशक
घणघणा वाजती । स्तोत्रें स्तवनें आणि स्तुती । आसनें मुद्रा ध्यानें करिती ।
प्रदक्षिणा नमस्कार ॥ २९ ॥ पंचायतनपूजा केली । मृत्तिकेचीं लिंगें ला-
खोली । फळें नारिकेलें भरलीं । संपूर्ण सांग पूजा ॥ ३० ॥ उपोषणें निष्ठा
नेम । परम सायासीं केलें कर्म । फळचि पावती वर्म १ । चुकले प्राणी ॥३१॥
यज्ञादिक कर्मे केलीं । हृदयीं फळाशा कल्पिली । आपुले इच्छेनें घेतली ।
सूति जन्माची ॥ ३२ ॥ करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा
अभ्यास । ऋद्धिसिद्धी सावकाश । वोळल्या जरी ॥ ३३ ॥ तरी सद्गुरु-
कृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित । यमपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥
॥ ३४ ॥ जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती २ । गुरुकृपेविण
अधोगती । गर्भवास चुकेना ॥ ३५ ॥ ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्ति-
भाव आणि भजन । सकळही फोल ब्रह्मज्ञान । जंव तें प्राप्त नाहीं ॥३६॥
सद्गुरुकृपा न जोडे । आणि भलतीकडे वावँडे ३ । जैसें आंधळें चांचरूनि पडे ।
गौरीं ४ आणि गडदरीं ५ ॥ ३७ ॥ जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस नि-
र्धान ६ । तैसें सद्गुरुवचनें ज्ञान-। प्रकाश होय ॥ ३८ ॥ सद्गुरुविण जन्म
निष्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ । सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥
॥ ३९ सद्गुरूचेनि अभयकरें । प्रकट होईजे ईश्वरें । जन्मदुःखें अपारें । ना-
सोनि जाती ॥ ४० ॥ मागां झाले थोर थोर । संत महंत मुनीश्वर । तयां
सहि ज्ञानविचार । सद्गुरूचेनि ॥ ४१ ॥ श्रीराम कृष्णादि करूनी । अति-
तत्पर गुरुभजनीं । सिद्धसाधु आणि सज्जनीं । गुरुदास्य केलें ॥ ४२ ॥
सकळ सृष्टीचे चालक । हरिहरब्रह्मादिक । तेहि

५ वा. ] सद्गुरुलक्षण. १०१
२. सद्गुरुलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ जे करामती दाखविती । तेहि गुरु म्हणजेती ।
परंतु सद्गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १ ॥ सैभामोहन भुरके चेटके । सौवरी
मंत्रकौटाळे अनेके । नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २ ॥
सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग ५ । दृष्टिबंधन ६ लाँगवेग ।
अभिलाषाचा ॥ ३ ॥ ८ साहित्य संगीत रागज्ञान । गीत नृत्य तानमान ।
नाना वाद्यें शिकविती जन । तेहि एक गुरु ॥ ४ ॥ विद्या शिकविती पंचा-
क्षरी । तोडे ९ तोटगे १० नानापरी । कां पोट भरे जयावरी । ते विद्या शिक-
विती ॥ ५ ॥ जे यातीचा जो व्यापार । शिकविती भरावया उदर । तेहि
गुरु परी साचार । सद्गुरु नव्हेती ॥ ६ ॥ आपुली माता आणि पिता । तेहि
गुरुचि तत्वतां । परी पैलदार पावविता । तो सद्गुरु वेगळाची ॥ ७ ॥ गा-
यत्री

१०२ श्रीदासबोध. [ दशक
भरी । उदारवचनें ॥ १७ ॥ वेदशास्त्र महानुभाव । पहातां एकचि अनुभव ।
तोचि एक गुरुराव । ऐक्यरूपें ॥ १८ ॥ संदेह निःशेष जाळी । स्वधर्म आ-
दरें प्रतिपाळी । वेदविरहित टवाळी । करूं चि नेणे ॥ १९ ॥ जें जें मन अं-
गीकारी । तें तें स्वयें मुक्त करी । तो गुरु नव्हे भिकारी । झेंडे आला
॥ २० ॥ शिष्यांसि न लाविती साधन । न करविती इंद्रियदमन । ऐसे गुरु
अडक्याचे तीन । मिळाले तरी टाकावे ॥ २१॥ जो कोणी ज्ञान बोधी । समूळ
३अविद्या छेदी । इंद्रियदमन प्रतिपादी । तोचि सद्गुरु जाणावा ॥ २२॥ एक
द्रव्याचे विकिले । एक शिष्याचे आँखिले । ऐसे दुराशेनें केले । दीनरूप ॥ २३॥
जें जें रुचे शिष्याचे मनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी ।
पडिली गळां ॥ २४ ॥ जो गुरु भीडसारू । तो अधमाहूनि अधम थोरू ।
चोरटा मैंद पामरु । द्रव्यभोंदू ॥ २५ ॥ जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें
बोहरी । आणि शेखीं भीड करी । घात घेणार ॥ २६ ॥ तैसा सद्गुरु नसावा ।
जेणें अंतर पडे देवा । भीड करूनियां गोंवी । घाली बंधनाचा ॥ २७ ॥
जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणि स्थूळ क्रियेचें साधन । तोचि सद्गुरु निधान ।
दाखवी डोळां ॥ २८ ॥ देखणीं दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें ।
इतुकेंच ज्ञान तीं पामरें । अंतरलीं भगवंता ॥ २९ ॥ बाणे तिहींची खूण ।
तोचि गुरु सुलक्षण । तेथेंच रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षीं ॥ ३० ॥
अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता । परी विषयीं लोलंगतां । ऐसिया गुरूचेनि
सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१ ॥ जैसा निरूपणसमय । तैसेंचि मनहि
करी वायें । कृतबुद्धीचा निश्चय । जाहलाचि नाहीं ॥ ३२ ॥ निरूपणीं
सामर्थ्यसिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी । नाना चमत्कारें बुद्धी ।
डळमळूं लागे ॥ ३३ ॥ पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त । जयांस साह्य भगवंत ।
आणि सामर्थ्यहि अद्भुत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४ ॥ ऐसें तयांचें सामर्थ्य ।
आमुचें ज्ञान नुसतें व्यर्थ । ऐसा सामर्थ्यांचा स्वार्थ । हृदयीं वसे ॥ ३५ ॥
निःशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते खोटे । शब्द-
१. सत्पुरुष. २. काकुळतीस. ३. अज्ञान. ४. अंकित. ५. घातका. ६. राख-
रांगोळी. ७. फांस. ८. शास्त्र, सद्गुरु व आपण स्वतः यांची. ९. अनुभव. १०.
आसक्ति. ११. व्यर्थ. १२. बरोबरी. १३. हांव.

५ वा. ] सद्गुरुलक्षण. १०३
ज्ञाते कामिक ॥ ३६ ॥ बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं ।
कामना इच्छितांच मेलीं । यापुढीं मूर्ख ॥ ३७ ॥ निःशेष कामनारहित ।
ऐसा तो विरळा संत । अवघियांवेगळें मत । अक्षय ज्याचें ॥ ३८ ॥
अक्षय ठेवा सकळांचा । तरी पांगि फिटेना शरीराचा । तेणें मार्ग ईश्वराचा ।
चुकोनि जातो ॥ ३९ ॥ सिद्धि आणि सामर्थ्य जाहलें । सामर्थ्यं देहास
महत्व आलें । पुढें बेचोंड बळकाविलें । देहबुद्धीचें ॥ ४० ॥ सांडूनि अक्षय
सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख । कामनेसारिखें दुःख । आणिक नाहीं
॥ ४१ ॥ ईश्वराविण जे कामना । तेणें गुणें नाना यातना । पावती ³होती
पतना । वरपंडे प्राणी ॥ ४२ ॥ होतां शरीराचा अंत । सामर्थ्यहि निघोन
जात । शेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३ ॥ म्हणोनि निष्कामना-
विचारु । दृढबुद्धीचा निर्धारु । तोचि सद्गुरु पैलपारु । पाववी भवाचा
॥ ४४ ॥ मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचें
समाधान । स्वरूपस्थिती ॥ ४५ ॥ याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदा-
सीन केवळ । विशेष आचारें निर्मळ । स्वधर्माविषयीं ॥ ४६ ॥ याहिवरी
अध्यात्मश्रवण । हरिकथानिरूपण । जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७॥
जेथें सारासार विचार । तेथें होय जगदुद्धार । नवविध भक्तीचा आधार ।
बहुत जनांसी ॥ ४८ ॥ म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठिलें साधन ।
हें सद्गुरूचें लक्षण । श्रोतीं ओळखावें ॥ ४९ ॥ अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य
निष्ठेचें भजन । तेथें बहुत भक्तजन । विश्रांति पावती ॥ ५० ॥ नाहीं
उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार । कर्माविणें अनाचार । भ्रष्ट
होती ॥ ५१ ॥ म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्म कर्म आणि
साधन । कथानिरूपण श्रवण मनन । नीति न्याय मर्यादा ॥ ५२ ॥ यां-
मध्यें एक उणें असे । तेणें तें विलक्षण दिसे । म्हणोनि सर्वहि विलसे ।
सद्गुरूपार्सी ॥ ५३ ॥ जो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता ।
नाना साधनें समर्था । सद्गुरूपार्सी ॥५४॥ साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे६ । तो
मागुता सर्वैचि भ्रष्टे । या कारणें दूरदृष्टे । महानुभाव ॥५५॥ आचार उपा-
१. क्षोभ. २. जुंबाड. ३. प्राप्त होतात. ४. स्वरूपाची जागृति राहणें. ५.
चित्तशुद्धि करणारीं कर्मे सोडल्यांवर. ६. स्थापितो. ७. दूरवर नजर पोचविणारे.

१०४ श्रीदासबोध. [ दशक
सना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती । जळो तयांची महंती । कोणं पुसे
॥ ५६ ॥ कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाभैसे¹ झाला ठाव । तो कानकों-
डा समुदाय । प्रपंचीं हासती ॥ ५७ ॥ नीच यातीचा गुरु । तोही कानकोंडा²
विचारु । ब्रह्मसभेसि जैसा चोरु । तैसा दडे ॥ ५८ ॥ ब्रह्मसभे देखतां । तया-
चें तीर्थ न ये घेतां । अथवा प्रसाद सेवूं जातां । प्रायश्चित्त पडे ॥ ५९ ॥
तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली । गुरुभक्ति ते सट-
वैली³ । एकाएकीं ॥ ६० गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्त्वतां ।
येथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१ ॥ ऐसीं सांकडीं दोहींकडे ।
तेथें प्रस्तावों⁴ घडे । नीच यातीस सद्गुरुत्व न घडे । या कारणें ॥ ६२ ॥ त-
थापि आवडी घेतलीं जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें । बहुत जनांस भ्रष्ट-
वावें । हें दूषणचि कीं ॥ ६३ ॥ आतां असो हा विचारु । स्वयातीचा पा-
हिजे गुरु । नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्तें⁵ घडे ॥ ६४ ॥ जे जे कांहीं उत्तम
गुण । तें तें सद्गुरूचें लक्षण । तथापि सांगों वोळखण । होय जेणें ॥ ६५ ॥
एक गुरु एक मंत्रगुरु । एक यंत्रगुरु एक तंत्रगुरु । एक दस्तादगुरु एक
राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६ ॥ एक कुळगुरु एक मानिला गुरु । एक वि-
द्यागुरु एक कुविद्यागुरु । एक असद्गुरु एक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७ ॥
एक मातागुरु एक पितागुरु । एक राजगुरु एक देवगुरु । एक बोलिजे
जगद्गुरु । सकळ कळा ॥ ६८ ॥ ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणिक
गुरु । ऐक तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९ ॥ एक स्वप्नगुरु⁶ एक दीक्षागुरु ।
एक म्हणती प्रतिमागुरु । एक म्हणती स्वयें गुरु । आपुला आपण ॥ ७० ॥
जे जे यातींचा जो व्यापार । ते ते यातीचे तितुके गुरु । याचा पाहतां
विचारु । उदंड आहे ॥ ७१ ॥ असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु ।
परि मोक्षदाता सद्गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२ ॥ नाना सद्धिचे गुण ।
त्याहिवरी कृपाळूपण । सद्गुरूचें हें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके सद्गुरुलक्षणनिरूपणं नाम द्वितीयः
समासः ॥ २ ॥


१. बहकण्यास. २. तोंड लपविणारा. ३. सटवाईची बाधा होऊन झिजूं
लागली. ४. पश्चात्ताप. ५. खचित. ६. स्वप्नांत येऊन उपदेश देणारा.

१ वा.] सच्छिष्यलक्षण. १०५
३. सच्छिष्यलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां सद्गुरूचें लक्षण । विशद केलें निरूपण ।
आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १ ॥ सद्गुरूविण सच्छिष्य ।
तो वायां जाय निःशेष । कां सच्छिष्येंविण विशेष । सद्गुरू शिणे ॥ २ ॥ उत्तम
भूमि शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें किडेंखाद । कां तें उत्तम बीज परी
संबंध । खडकेसि पडिला ॥ ३ ॥ तैसा सच्छिष्य तो सत्पात्र । परी गुरु सांगे
मंत्रतंत्र । तेथें अरैल ना परैल । कांहींच नाहीं ॥ ४ ॥ अथवा गुरु पूर्ण कृपा
करी । परी शिष्य अनधिकारी । भाग्यपुरुषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ ५ ॥
तैसें एकाविण एक । होतसे निरर्थक । परलोकींचें जें सार्थक । तें दूरि
दुरावे ॥ ६ ॥ म्हणोनि सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथें न लागती सायास । त्या
उभयतांचा हव्यास । पुरे एकसरां ॥ ७ ॥ सुभूमि आणि उत्तम कण ।
उगवेना पर्जन्येंविण । तैसें अध्यात्मनिरूपण । नसतां होय ॥ ८ ॥ शेत
पेरिलें आणि उगवलें । परंतु निगेविण गेलें । साधनेंविण तैसें झालें ।
साधकासी ॥ ९ ॥ जोंवरी पीक आपणासि भोगे । तोंवरी अवघेंचि करणें
लागे । पीक आलियाहि उगें । राहूंच नये ॥ १० ॥ तैसें आत्मज्ञान झालें ।
तरी साधन पाहिजे केलें । एक वेळ उदंड जेविलें । तरी सामुग्री पाहिजे
॥ ११ ॥ म्हणोनि साधन अभ्यास आणि सद्गुरु । सच्छिष्य आणि सच्छास्त्र-
विचारु । सत्कर्म आणि सद्वासना पारु । पाववी भवाचा ॥ १२ ॥ सद्गुपा-
सना आणि सत्कर्म । सच्छिष्य सत्क्रिया आणि स्वधर्म । सत्संग आणि
नित्यनेम । निरंतर ॥ १३ ॥ ऐसें हें अवघेंचि मिळे । तरीच विमळ ज्ञान
निवेळें । नाहीं तरी पाषांड संचरे बळें । समुदायीं ॥ १४ ॥ येथें शर्ब्द
नाहीं शिष्यासी । हें अवघें सद्गुरूपार्शी । सद्गुरु पालटी अवगुणांसी ।
नाना यत्नेंकरूनी ॥ १५ ॥ सद्गुरूचेनि असच्छिष्य पालटे । परंतु सच्छिष्यें
असद्गुरु न पालटे । कां जे थोरपण तुटे । म्हणोनियां ॥ १६ ॥ या कारणें
सद्गुरु पाहिजे । तरीच सन्मार्ग लाहिजे । नाहीं तरी होइजे । पाषांडीं वर-
पेंडे ॥ १७ ॥ येथें सद्गुरूचें कारण । येर सर्व निष्कारण । तथापि सांगतों
१. किड्यांनीं खाल्लेलें. २. इहलोक. ३. परलोक. ४. पाहिजे. ५. परिपक्व
होतें. ६. बोल, दोष. ७. लाभतो. ८. स्वैराचारास. ९. प्राप्त.

१०६ 'श्रीदासबोध. [ दशक

वोळखण । सच्छिष्याची ॥ १८ ॥ मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं
विश्वास पूर्ण । अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९ ॥ शिष्य
पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशीळ । शिष्य पाहिजे केवळ ।
विरक्त अनुतापी ॥ २० ॥ शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे शुचि-
ष्मंत । शिष्य पाहिजे नेमस्त¹ । सर्व प्रकार्रीं ॥ २१ ॥ शिष्य पाहिजे साक्षे-
पी² विशेष । शिष्य पाहिजे परमदक्ष । शिष्य पाहिजे अलक्ष्य³ । लक्षी⁴ ऐसा
॥ २२ ॥ शिष्य पाहिजे अतिधीर । शिष्य पाहिजे अति उदार । शिष्य
पाहिजे अतितत्पर । परमार्थविषयीं ॥ २३ ॥ शिष्य पाहिजे परोपकारी ।
शिष्य पाहिजे निर्मत्सरी । शिष्य पाहिजे अर्थांतरीं । प्रवेशकर्ता ॥ २४ ॥
शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध । शिष्य पाहिजे
अगाध । उत्तम गुणांचा ॥ २५ ॥ शिष्य पाहिजे प्रज्ञावंत⁵ । शिष्य पाहिजे
प्रेमळ भक्त । शिष्य पाहिजे नीतिमंत । मर्यादांचा ॥ २६ ॥ शिष्य पाहिजे
युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत । शिष्य पाहिजे सतत । विचार घेता
॥ २७ ॥ शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढव्रताचा⁶ । शिष्य
पाहिजे उत्तम कुळींचा । पुण्यशीळ ॥ २८ ॥ शिष्य असावा सात्विक ।
शिष्य असावा भजक । शिष्य असावा साधक । साधनकर्ता ॥ २९ ॥
शिष्य असावा विश्वासी । शिष्य असावा कार्याक्लेशी⁷ । शिष्य असावा पर-
मार्थासी । वाढवूं जाणे ॥ ३० ॥ शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा
जगन्मित्र । शिष्य असावा सत्पात्र । सर्व गुणें ॥ ३१ ॥ शिष्य असावा
सद्दिद्येचा । शिष्य असावा सद्भावाचा । शिष्य असावा अंतरींचा । परम
शुद्ध ॥ ३२ ॥ शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी । शिष्य
असावा संसारदुःखी । संतसंदेहीं ॥ ३३ ॥ जो संसारदुःखें दुखवला । जो
त्रिविधतापें पोळला । तोचि अधिकारी झाला । परमार्थासी ॥ ३४ ॥ बहुत
दुःख भोगिलें जेणें । तयासीच परमार्थ बाणे । संसारदुःखाचेनि गुणें ।
वैराग्य उपजे ॥ ३५ ॥ जयास संसाराचा त्रास । तयासीच उपजे विश्वास ।
विश्वासबळें दृढ कांस । धरिली सद्गुरुची ॥३६॥ अविश्वासें कांस सोडिली ।


१. नियमितपणें वागणारा. २. उद्योगी. ३. लक्षांत घेण्यास कठीण, ब्रह्म. ४.
लक्षांत घेई. ५. बुद्धिमान्. ६. निश्चयी. ७. देहकष्ट सहन करणारा.

ऐसीं बहुतेक भवीं बुडालीं । नाना जलचरीं तोडिलीं । मध्येंच सुखदुःखें
॥ ३७ ॥ या कारणें दृढ विश्वास । तोचि जाणावा सच्छिष्य । मोक्षाधिकारी
विशेष । अग्रगण्य ॥ ३८ ॥ जो सद्गुरुवचनें निवाला । तो सायुज्यतेचा आं-
खिला । संसारपांगें पांगिला । न वचे कदा ॥ ३९ ॥ सद्गुरूहुनि देव मोठा ।
जयास वाटे तो शिष्य करंटा । सुटला वैभवाचा फांटा । सामर्थ्यपिसें
॥ ४० ॥ सद्गुरुस्वरूप तें संतें । आणि देवास मांडे कल्पांत । तेथें कैचें उ-
रेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥ ४१ ॥ म्हणोनि सद्गुरुसामर्थ्य अधिक । जेथें
अर्टती ब्रह्मादिक । अल्पबुद्धि मानव रंक । तयास हें कळेना ॥ ४२ ॥
गुरुदेवां बराबरी । करी तो शिष्य दुराचारी । भ्रांति बैसली अभ्यंतरीं ।
सिद्धांत नेणवे ॥ ४३ ॥ देव मनुष्यीं भाविला । मंत्रीं देवपणासि आणिला ।
सद्गुरु तो नवचे कलिपला । ईश्वराचेनी ॥ ४४ ॥ म्हणोनि सद्गुरु पूर्णपणें ।
देवाहूनि अधिक कोटिगुणें । जयास वर्णितां भांडणें । वेदशास्त्रां लागलीं
॥ ४५ ॥ असो सद्गुरुपदापुढें । दुजें कांहींच न चढे । देवसामर्थ्य तें केवढें ।
मायाजनित ॥ ४६ ॥ असो सद्गुरुकृपा जयासी । सामर्थ्य न चले तया-
पाशीं । ज्ञानबळें वैभवासी । तृणतुल्य केलें ॥ ४७ ॥ सद्गुरुकृपेचेनि बळें ।
अपरोक्ष ज्ञानाचेनि उसाळें । मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न ये ॥४८॥
ऐसें सच्छिष्याचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढ भाव । तेणें गुणें देवराव । स्व-
येंच होती ॥ ४९ ॥ अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध झालें । पुढें
सद्गुरुवचनें निवाले । सच्छिष्य ऐसे ॥ ५० ॥ लागतां सद्गुरुवचनपंथें ।
झालें ब्रह्मांड पालथें । तरी जयांच्या शुद्ध भावार्थे । पालट न धरिजे ॥५१॥
शरण सद्गुरुसि गेले । ते सच्छिष्य ऐसे निवडले । क्रियापालटें झाले ।
पावन ईश्वरीं ॥५२॥ ऐसा सद्भाव अंतरीं । तेचि मुक्तीचे वांटेकरी । येर मायिक
वेषधारी । असच्छिष्य ॥ ५३ ॥ वाटे विषयाचें सुख । परमार्थ संपादनें
लौकिक । देखोदेखीं पढतमूर्ख । शरण गेले ॥ ५४ ॥ झाली विषयीं वृत्ति
अनावर । दृढ धरिला संसार । परमार्थचर्चेचा विचार । मलिन जाहला
॥ ५५ ॥ मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा । भारवाही


१. सुखदुःखरूपी जलचरांनीं. २. सेवक. ३. संसारांतील दैन्यानें. ४. दीन
केला. ५. नित्य. ६. मंदावतात. ७. कल्पिला. ८. अनुभवाचें.

१०८ श्रीदासबोध. [ दशक
कुटुंबाचा । काबाडी जाहला ॥ ५६ ॥ मानिला प्रपंचीं आनंद । केला
परमार्थीं विनोद । आंत मूढ मतिमंद । लोधला¹ कर्मीं ॥ ५७ ॥ सूकर
पूजिलें विलेपनें । जैसा मर्दिला चंदनें । तैसा विषयी ब्रह्मज्ञानें । विवेकें
बोधिला ॥ ५८ ॥ रासभें² उकरडां लोळे । तयास परिमळसोहळे । उलूक³
अंधारीं पळे । तया केवीं हंसपंगती ॥ ५९ ॥ तैसा विषयदरीचा बरांडी⁴ ।
घाली अधःपैतनीं उडी । तयास भगवंतीं आवडी । सत्संग कैंचा ॥ ६० ॥
वरती करून दांताळी । श्वानपुत्र हाडें चघळी । तैसा विषयी तळमळी ।
विषयसुखाकारणें ॥ ६१ ॥ तया श्वानमुखीं परमान्नं । मर्कटासि सिंहासन ।
तैसें विषयासक्तास ज्ञान । जिरेल कैचें ॥ ६२ ॥ रासभें राखतां जन्म गेला ।
तो पंडितांमध्यें प्रतिष्ठािला । न वचे तैसा अभक्ताला । परमार्थ नाहीं ॥ ६३ ॥
मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षूनियां विष्टेचा
गोळा । हंस म्हणवी ॥ ६४ ॥ तेसे सज्जनाचे संगतीं । विषयी सजन म्हण-
विती । विषय अमेध्य चित्तीं । गोळा लक्षिला ॥ ६५ ॥ कांखे घेऊनियां
दारा । म्हणे मज संन्यासी करा । तैसा विषयी सैरावैरा । ज्ञान बडबडी
॥ ६६ ॥ असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैतसुख । नरकीं प्राणी
बरक । भोगिती स्वइच्छेनें ॥ ६७ ॥ वेश्येची करील सेवा । तो कैसा भली
म्हणावा । तैसा विषयदास मानावा । भक्तराज केवीं ॥ ६८ ॥ तैसे वि-
षयी बापुडे । तयांस ज्ञान कोणीकडे । वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपडे
जाहले ॥ ६९ ॥ ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्ठांमध्यें कनिष्ठ । हीन अवि-
वेकी आणि दुष्ट । खळ खोटे दुर्जन ॥ ७० ॥ ऐसे जे कां पापरूप । दीर्घ-
दोषी पापी वज्रलेप । तयांस प्रायश्चित्त अनुताप । उद्भवतां आहे ॥ ७१ ॥
तिहीं पुनः शरण जावें । सद्गुरूंसि संतोषावें । कृपादृष्टि जाहलिया
व्हावें । पुन्हा शुद्ध ॥ ७२ ॥ स्वामिद्रोह जयास घडे । तो यावच्चंद्रसूर्य
नरकीं पडे । तपास उपावचि न घडे । स्वामी तुष्टल्यावांचूनी ॥ ७३ ॥
स्मशानवैराग्य आलें । म्हणोन लोटांगण घातलें । तेणें गुणें उपतिष्ठिलें ।
नाहींच ज्ञान ॥ ७४ ॥ भाव आणिला जायाचाँ । मंत्र घेतला गुरूचा ।
१. लुब्ध झाला. २ गाढव. ३. बुबड. ४. आशाळभूत. ५. नरकांत. ६. दूध.
७. अपवित्र. ८. ब्रह्मानंद. ९. प्राप्त झालें. १०. उसना.

५ वा.] सच्छिष्यलक्षण. १०५
शिष्य झाला दों दिवसांचा । मंत्राकारणें ॥ ७५ ॥ ऐसे केले गुरु उदंड ।
शब्द शिकला पाषांड । झाला तोंडाळ तेंरमुंड । महा पाषांडी ॥ ७६ ॥
घडी एक रडे आणि पडे । घडी एक वैराग्य चढे । घडी एक अहं-
भाव जडे । ज्ञातेपणाचा ॥ ७७ ॥ घडी एक विश्वास धरी । सर्वैचि घडी एक
गुरगुरी । ऐसे नाना छंद करी । पिसाट जैसा ॥ ७८ ॥ काम क्रोध मद मत्सर ।
लोभ मोह नाना विकार । अभिमान कापट्य विकार । हृदयीं नांदती
॥ ७९ ॥ अहंकार आणि देहपांगें² । अनाचार आणि विषयसंग । संसार
प्रपंच उद्वेग । अंतरीं वसे ॥ ८० ॥ दीर्घदोषी कृतघ्न पापी । कृत्रिम कु-
तर्की विकल्पी । भक्त अभावी शीघ्रकोपी । निष्ठुरपणें घातकी ॥ ८१ ॥
हृदयशून्य³ आणि आळसी । अविवेकी आणि अविश्वासी । अधीर अ-
विचार संदेहासी । दृढ धर्त्ता⁴ ॥ ८२ ॥ आशा ममता कल्पना । कुबुद्धि
दुर्बुद्धि दुर्वासना । अल्पबुद्धि विषयकामना । हृदयीं वसे ॥ ८३ ॥ ई-
षणे⁵ असूया⁶ तिरस्कारें । निंदेसि प्रवर्ते आदरें । देहाभिमानी हुंबरे⁷ । जा-
णतपणें ॥ ८४ ॥ क्षुधा तृषा आवरेना । निद्रा सहसा धरवेना । कुटुंब-
चिंता वोसरेना । भ्रांति पडिली ॥ ८५ ॥ शाब्दिक बोले उदंड वाचा ।
लेश नाहीं वैराग्याचा । अनुताप धारिष्ट साधनांचा । मार्ग न धरी ॥ ८६ ॥
भक्ति विरक्ति ना शांती । सद्वृत्ति लीनता न नांदती । कृपा दया ना तृप्ती ।
सद्बुद्धि असेचि ना ॥ ८७ ॥ काया क्लेशी शरीरहानि । धर्माविषयीं परम-
कृपण । क्रिया पालटेना कठिन । हृदय जयाचें ॥ ८८ ॥ आर्जव⁸ नाहीं ज-
नांसी । जो अप्रिय सज्जनांसी । जयाचे जीवीं अहर्निशीं । परन्यूंन⁹ वसे
॥ ८९ ॥ सदा सर्वकाळ लटिका । बोले मायिकें लांपणिका¹⁰ । क्रिया विचार
पाहतां एका । वचनीं सत्य नाहीं ॥ ९० ॥ परपीडेविषयीं तत्पर । जैसा
विंचू आणि विखार । तैसा कुशब्दें जिव्हार¹² । भेदी सकळांचें ॥ ९१ ॥
आपुले झांकी अवगुण । पुढिलांसि बोले कठिन । मिथ्या गुण दोषांविण ।
दोष लावी ॥ ९२ ॥ स्वयें पापात्मा अंतरीं । पुढिलांची कणेव¹³ न करीं ।
१. मधेंच तोंड घालणारा. २. देहाचा लोभ. ३. प्रेमशून्य. ४. धारण कर-
णारा. ५. वासना. ६. मत्सर. ७. चढून जातो. ८. सरळपणा. ९. दुसऱ्याचें उणें.
१०. कपटाची. ११. वाणी. १२. अंतःकरण. १३. दया.

जैसा हिंसक दुराचारी । परदुःखें शिणेना ॥ ९३ ॥ दुःख पराचें नेणती ।
दुर्जन गांजिलेचि गांजिती । श्रम पावतां आनंदती । आपले मनीं ॥ ९४ ॥
स्वदुःखें झुरे अंतरीं । आणि परदुःखें हास्य करी । तयास प्राप्त यमपुरी ।
यमदूत झोडिती ॥ ९५ ॥ असो ऐसे मदांध बापुडे । तयांस भगवंत कैंचा
जोडे । जयांस सुबुद्धि नावडे । पूर्वपातकेकरूनी ॥ ९६ ॥ तयांस देहाच्या
अंतीं । गात्रें क्षीणता पावती । जिवलगें वोसांडिती । जाणवेल तेव्हां
॥ ९७ ॥ असो ऐसे गुणा वेगळे । ते सच्छिष्य आगळे । दृढभावार्थे सो-
हळे । भोगिती स्वानंदाचे ॥ ९८ ॥ जये स्थळीं विकल्प जागे । कुळाभि-
मान पाठी लागे । ते प्राणी प्रपंचसंगें । हिंपुटी होती ॥ ९९ ॥ जेणेंकरितां
दुःख जाहलें । तेंचि मनीं सद्दढ धरीलें । तैणें गुणें प्राप्त झालें । दुःख
विशेष ॥ १०० ॥ संसारसंगें दुःख न जाहलें । ऐसें देखिलें ना ऐकिलें ।
ऐसें जाणोनि अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ॥ १ ॥ संसारीं सुख
मानिती । ते प्राणी मूढमती । जाणोनि डोळे झांकिती । ते पढतमूर्ख
॥ २ ॥ प्रपंच सुखें करावा । परी कांहीं परमार्थ वाढवावा । परमार्थ अ-
वघाच बुडवावा । हें विहितें नव्हे ॥ ३ ॥ मागां झालें निरूपण । गुरुशि-
ष्यांची ओळखण । आतां उपदेशाचें लक्षण । सांगिजेल ॥ १०४ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके शिष्यलक्षणनिरूपणं नाम तृ-
तीयः समासः ॥ ३ ॥

४. उपदेशलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका उपदेशाचीं लक्षणें । बहुविधा कोणकोणें ।
सांगतां तें असाधारणें । परी कांहींएक सांगों ॥ १ ॥ बहुत मंत्र उपदे-
शिती । कोणी नाममंत्र सांगती । एक ते जप करविती । ओंकाराचा ॥ २ ॥
शिवमंत्र भवानीमंत्र । विष्णुमंत्र महालक्ष्मीमंत्र । अवधूतमंत्र गणेशमंत्र ।
मार्तंडमंत्र सांगती ॥ ३ ॥ मत्स्य कूर्म वराहमंत्र । नृसिंहमंत्र वामनमंत्र ।
भार्गवमंत्र रघुनाथमंत्र । कृष्णमंत्र सांगती ॥ ४ ॥ भैरवमंत्र मल्हारिमंत्र ।
हनुमंतमंत्र यक्षिणीमंत्र । नारायणमंत्र पांडुरंगमंत्र । अघोरमंत्र सांगती


१. कसाई. २. सोडून जातात. ३. कष्टी. ४. योग्य. ५. पुष्कळ.

॥ ५ ॥ शेषमंत्र गरुडमंत्र । वायुमंत्र वेताळमंत्र । झोटिंगमंत्र बहुधा मंत्र ।
किती म्हणोनि सांगावे ॥ ६ ॥ बाळामंत्र बगळामंत्र । काळीमंत्र कंका-
ळीमंत्र । बेडूकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७ ॥ पृथगोकारें स्वतंत्र ।
जितुके देव तितुके मंत्र । सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजांचे
॥ ८ ॥ पाहूं जातां पृथ्वीवरी । देवांची गणना करी । तितुके मंत्र वैखरी ।
किती ह्मणोनि वदावे ॥ ९ ॥ असंख्यात मंत्रमाळा । एकाहूनि एक आ-
गळा । विचित्र मायेची कळा । कोण जाणे ॥ १० ॥ कित्येक मंत्रीं सुतें जाती ।
कित्येक मंत्रीं व्यथा नासती । कित्येक मंत्रीं उतरती । सितें³ विंचू विखार
॥ ११ ॥ ऐसे नानापरीचे मंत्रीं । उपदेशिती कर्णपात्रीं । जप ध्यान पूजा यंत्रीं ।
विधानयुक्त सांगती ॥ १२ ॥ एक शिव शिव सांगती । एक हरिहर म्हणविती ।
एक उपदेशिती । विठ्ठल विठ्ठल ह्मणोनि ॥ १३ ॥ एक सांगती कृष्ण कृष्ण । एक
सांगती विष्णु विष्णु । एक नारायण नारायण । ह्मणोनि उपदेशिती ॥ १४ ॥ एक
म्हणती अच्युत अच्युत । एक म्हणती अनंत अनंत । एक सांगती दत्त दत्त ।
म्हणत जावें ॥ १५ ॥ एक सांगती राम राम । एक सांगती ओम् ओम् ।
एक म्हणती मेघश्याम । बहुतां नामीं स्मरावा ॥ १६ ॥ एक सांगती गुरु गुरु ।
एक सांगती परमेश्वरु । एक म्हणती विघ्नहरु । चिंतीत आवा ॥ १७ ॥ एक सां-
गती सोमराज । एक सांगती गरुडध्वज । एक सांगती अधोक्षज । म्हणत जावें
॥ १८ ॥ एक सांगती देव देव । एक म्हणती केशव केशव । एक म्हणती भार्गव
भार्गव । म्हणत जावें ॥ १९ ॥ एक विश्वनाथ म्हणविती । एक मल्हारी सां-
गती । एक ते जप करविती । तुकाई तुकाई म्हणोनि ॥ २० ॥ हें किती
म्हणोनि सांगावें । शिवशक्तीचीं अनंत नांवें । इच्छेसारिखें स्वभावें । उप-
देशिती ॥ २१ ॥ एक सांगती मुद्रा चारी । खेचरी भूचरी चाचरी अगो-
चरी । एक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२ ॥ एक दाखविती देखणीं ।
एक अनुहतध्वनी । एक गुरु पिंडज्ञानी । पिंडज्ञान सांगती ॥ २३ ॥ एक

१. अनेक प्रकारचे. २. वाणीनें. ३. हिंव. ४. रीतीसुद्धां. ५. शिव. ६. दृष्टि
एकाग्र करण्याचें हठयोगांतील एक साधन. ७. हे मुद्रांचे चार प्रकार. ८. योग-
मार्गांतील चौऱ्यायशीं आसनें. ९. चमत्कारिक देखावे. १०. शरीरांत स्वभावतः
होत असलेला एक ध्वनि; अनाहतध्वनि. ११. देहासंबंधीं तात्त्विक ज्ञान.

११२ श्रीदासबोध. [ दशक
सांगती कर्ममार्ग । एक सांगती उपासनामार्ग । एक सांगती अष्टांग योग ।
नाना चक्रें ॥ २४ ॥ एक तपें सांगतीं । एक अजपाजप निरूपिती । एक
तत्वें विस्तारिती । तत्वज्ञान ॥ २५ ॥ एक सांगती सगुण । एक निरूपिती
निर्गुण । एक उपदेशिती तीर्थाटन । फिरत जावें ॥ २६ ॥ एक महावाक्य
सांगती । त्याचा जप करावा म्हणती । एक उपदेश करिती । सर्व ब्रह्म
म्हणोनि ॥ २७ ॥ एक शाक्तमार्ग सांगती । एक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती ।
एक इंद्रियें६ पूजन करविती । एक भावें ॥ २८ ॥ एक सांगती वशीकरण ।
स्तंभन मोहन उच्चाटन । नाना चेटकें आपण । स्वयें निरूपिती ॥ २९ ॥
ऐशी उपदेशाची स्थिती । पुरे जातां सांगों किती । ऐसे हे उपदेश असती ।
असंख्यात ॥ ३० ॥ ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेंविण निरर्थक । ये विषयीं
असे एक । भगवद्वचन ॥ ३१ ॥ श्लोक ॥ नानाशास्त्रं पठँल्लोको नाना-
दैवतपूजनम् । आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ १ ॥ शैवशाक्ता-
गमाद्या ये अन्ये च बहवो मताः । अपभ्रंशसमास्तेऽपि जीवानां भ्रांतिचेतसाम्
॥ २ ॥ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम् ॥ ३ ॥ टीका ॥ या कारणें
ज्ञानासमान । पवित्र उत्तम न दिसे आनं । यास्तव आधीं आत्मज्ञान ।
साधिले पाहिजे ॥ ३२ ॥ सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश ।
एतद्विषयीं जगदीश । बहुतां ठायीं बोलिला ॥ ३३ ॥ श्लोक ॥ यस्य कस्य
च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् । तस्य दासस्य दासोऽहं भवे जन्मनि ज-
न्मनि ॥ १ ॥ आत्मज्ञानाचा महिमा । नेणें चतुर्मुख ब्रह्मा । प्राणी
बापुडा जीवात्मा । काय जाणे ॥ ३४ ॥ सकळ तीर्थांची संगती । ज्ञानदा-
नांची फळश्रुती । त्याहूनि ज्ञानाची स्थिती । विशेष कोटिगुणें ॥ ३५ ॥
१. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि या
अष्ट अंगांनीं युक्त. २. शरीरांत सात चक्राकार रचना मानतात त्या. ३. श्वासो-
च्छ्वासाबरोबर उमटणाऱ्या सोहं या ध्वनीचा जप. ४. तत्वमसि, अयमात्मा ब्रह्म,
प्रज्ञानं ब्रह्म, अहं ब्रह्मास्मि, हीं चार वेदांतील चार सारवाक्यें. ५. मनःपूत वर्तन.
६. इंद्रियांच्या देवता. ७. लोकांस वश करण्याचे मंत्र. ८. इंद्रियांचे व्यापार
बंद पाडण्याचा मंत्र. ९. गांव वगैरे सोडून जाण्याची बुद्धि होईल असा मंत्र.
१०. अन्य. ११. पुण्य.

५ वा.] बहुधाज्ञान. ११३
॥ श्लोक ॥ पृथिव्यां यानि तीर्थानि ज्ञानदानेषु यत्फलम् । तत्फलं कोटिगुणितं
ब्रह्मज्ञानसमं हि न ॥ ४ ॥ टीका ॥ म्हणोन जें आत्मज्ञान । तें गहनाहून
गहन । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे पंचमदशके उपदेशलक्षणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. बहुधाज्ञान.
श्रीगणेशाय नमः ॥ जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ । तंव सर्व कांहीं नि-
ष्फळ । ज्ञानरहित तळमळ । जाणार नाहीं ॥ १ ॥ ज्ञान म्हणतां वाटे
भ्रम । काय रे बा असेल वर्म । म्हणोनि हा अनुक्रम । सांगिजेल ॥ २ ॥
भूत भविष्य वर्तमान । ठाउकें आहे परिच्छिन्न १ । त्यासिच म्हाणिजेलें ज्ञान ।
परी तें ज्ञान नव्हे ॥ ३ ॥ बहुत केलें विद्यापठण । संगीतशास्त्र रागज्ञान ।
वैदिक शास्त्र वेदाध्ययन । हेंहि ज्ञान नव्हे ॥ ४ ॥ नाना व्यवसायांचें २ ज्ञान ।
नाना दीक्षेचें ज्ञान । नाना परीक्षेचें ज्ञान । हें ज्ञान नव्हे ॥ ५ ॥ नाना
वनितांची ३ परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा । नाना व्यवहारांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ६ ॥ नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा । नाना
श्वापदांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ७ ॥ नाना पशूंची परीक्षा । नाना
पक्ष्यांची परीक्षा । नाना भूतांची ४ परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ८ ॥ नाना
यानांची ५ परीक्षा । नाना वस्त्रांची परीक्षा । नाना शस्त्रांची परीक्षा । हें
ज्ञान नव्हे ॥ ९ ॥ नाना धातूंची परीक्षा । नाना नाण्यांची परीक्षा । ना-
ना रत्नांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १० ॥ नाना पाषाणपरीक्षा । नाना
काष्ठांची परीक्षा । नाना वाद्यांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ११ ॥ नाना
भूमींची परीक्षा । नाना जळांची परीक्षा । नाना सतेज ६ परीक्षा । हें ज्ञान
नव्हे ॥ १२ ॥ नाना रसांची परीक्षा । नाना बीजांची परीक्षा । नाना
अंकुरपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १३ ॥ नाना पुष्पांची परीक्षा । नाना
फळांची परीक्षा । नाना वल्लींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १४ ॥ नाना
दुःखांची परीक्षा । नाना रोगांची परीक्षा । नाना चिन्हांची परीक्षा । हें
१. संपूर्ण. २. धंद्यांचें. ३. स्त्रियांची. ४. सृष्ट पदार्थांची. ५. वाहनांची.
६. तेजस्वी पदार्थ.

पाहुण्यांच्या: wait, does "पावणे" mean signs of guests? Wait, "नेत्रपल्लवी" means "पाहुण्यांच्या खुणांची भाषा"? No! Wait, what is "नेत्रपल्लवी"? Eye gestures! Wait, why would it be "पाहुण्यांच्या खुणांची भाषा"? Could it be "पाहाण्यांच्या"??? LOOK AT THE WORD: प - ा - ह - ण्यां - च्याorप - ा - ह - णां - च्या->पाहाण्यांच्या! "पाहाण्याच्या खुणांची भाषा" = language of eye gestures/looking! YES! "पाहाण्याच्या" or "पाहण्याच्या"! Look at the letters: प ा ह(orव?) ण्यां च्या Wait, is itपाहाण्याच्या? Look at: प+ा+वorह? Wait, पाहाणे->पाहाण्याच्या/पाहण्याच्या! Wait, what is पावण्याच्या? In Marathi, "पाहाणे" is sometimes written "पावणे"? No, "पाहाणे" -> "पाहाण्यांच्या". But here: प ा व ण्यां च्या? Wait, look at हin

५ वा. ] शुद्धज्ञानलक्षण. ११५
जाणावें दुसऱ्याचे जीवींचें । हें ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें ।
लक्षण नव्हे ॥ ३४ ॥ महानुभाव महा भला । मानसपूजा करितां चुकला ।
कोणी एकें पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५ ॥ ऐसी जाणे अंतरस्थि-
ती । तयास परम ज्ञाता म्हणती । परंतु जेणें मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे
॥ ३६ ॥ बहुत प्रकारांचीं ज्ञानें । सांगों जातां असाधारणें । सायुज्यप्राप्ती
होय जेणें । तें ज्ञान वेगळें ॥ ३७ ॥ तरी तें कैसें आहे ज्ञान । कैसें समा-
धानाचें लक्षण । ऐसें हें विशेद करून । मज निरूपावें ॥ ३८ ॥ ऐसें शुद्ध
ज्ञान पुसिलें । तें पुढिलिये समासीं निरूपिलें । श्रोतीं अवधान दीधलें ।
पाहिजे पुढें ॥ ३९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचमदशके बहुधा-
ज्ञाननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. शुद्धज्ञानलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ।
पाहावें आपणास आपण । या नांव ज्ञान ॥ १ ॥ मुख्य देवास जाणावें ।
सत्य स्वरूप ओळखावें । नित्यानित्य विचारावें । या नांव ज्ञान ॥ २ ॥ जेथें
दृश्यप्रकृति सरे । पांचभौतिकें हें वोसरे । समूळ द्वैत निवारे । या नांव ज्ञान
॥ ३ ॥ मनोबुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार । उल्लेखें परहून पर । या
नांव ज्ञान ॥ ४ ॥ जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हें अज्ञान ।
विमळ शुद्ध स्वरूपज्ञान । यासि बोलिजे ॥ ५ ॥ सर्वसाक्षिणी अवस्था
तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥
६ ॥ दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे । शुद्ध स्वरूप जा-
णिजे । या नांव स्वरूपज्ञान ॥ ७ ॥ जेथें सर्वचि नाहीं ठायींचें । तेथें सर्व-
साक्षित्व कैंचें । म्हणोनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८ ॥ ज्ञान म्हणजे
अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत । म्हणोनि शुद्ध ज्ञान तें सतत । वेगळेंचि असे ॥
१. पुष्कळ. २. स्पष्ट. ३. दिसणारें मायामय जग. ४. पंचभूतांचा विस्तार.
५. भेदबुद्धि. ६. मनास व बुद्धीस अगम्य. ७. जाणीव. ८. परा वाणीच्याही पली-
कडील, शब्दातीत. ९. जगाचा भास. १०. एक समाधीचा प्रकार; यांत, मी जड
नव्हे जडाचा साक्षी आहे, हा मनाचा निश्चय असतो. ११. अखंड एकरूपता.

११६ श्रीदासबोध. [ दशक
९ ॥ ऐसें शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपींच आपण । या नांव स्वरूप-
ज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥ महावाक्य उपदेश भला । परी त्याचा जप
नाहीं बोलिला । तेथींचा तो विचार केला । पाहिजे साधकें ॥ ११ ॥ महा-
वाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें अंधकार ।
न फिटे भ्रांतीचा ॥ १२ ॥ महावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि
तत्वतां । त्याचा जप करितां । वृथा शिण होय ॥ १३ ॥ महावाक्याचें
विवरण । हें मुख्य ज्ञानाचें लक्षण । शुद्ध लक्ष्यांशें आपण । वस्तुचि आहे ॥
१४ ॥ आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुर्लभ । जें आदि अंतीं
स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ॥ १५ ॥ जेथूनि हें सर्वहि प्रगटे । आणि सक-
ळहि जेथें आँटे । तें ज्ञान झालिया फिटे । भ्रांतिबंधन ॥ १६ ॥ मतें आणि
मतांतरें । जेथें होतीं निर्विकारें । अति सूक्ष्म विचारें । पाहतां ऐक्य ॥
१७ ॥ जें या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ । या नांव ज्ञान केवळ ।
वेदांत मतें ॥ १८ ॥ शोधितां आपुलें मूळस्थान । सहजचि उडे अज्ञान ।
या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायक ॥ १९ ॥ आपणासि ओळखों
जातां । अंगीं बाणे सर्वज्ञता । तेणें एकदेशी वार्ता । निःशेष उडे ॥ २० ॥
मी कोण ऐसा हेत । धरूनि पाहतां देहाँतीत । अवलोकितां नेमस्त । स्वरू-
पचि होय ॥ २१ ॥ ऐसे पूर्वी थोर थोर । जेणें ज्ञानें पैलपार । पावले ते
साचार । ऐक आतां ॥ २२ ॥ व्यास वसिष्ठ महामुनी । शुक नारद समा-
धानी । जनकादिक महाज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३ ॥ वामदेवाद्यिकयोगी-
श्वर । वाल्मीक अत्रि ऋषीश्वर । शौनकादि अध्यात्मसार । वेदांत मतें ॥ २४ ॥
सनकादिक मुख्य करूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणिक बोलतां
वचनीं । अगाध असती ॥ २५ ॥ सिद्ध मुनि महानुभाव । सकळांचा जो
अंतर्भाव । जेणें सुखें महादेव । डुलतो सदा ॥ २६ ॥ जें वेदशास्त्राचें सार ।
सिद्धांत धादांत विचार । ज्याची प्राप्ती भावानुसार । भाविकांसि होय ॥
१. ब्रह्म. २. ज्या संबंधानें कांहीं बोलतां येतें तो पदार्थ वाच्यांश होय, व
जो त्या पदार्थासंबंधीं कांहीं बोलतो पण ज्याचेसंबंधीं कांहीं बोलण्याला त्याहून
अन्य कोणी नाहीं, तो लक्ष्यांश, -या विचाराच्या योगें. ३. स्वतःसिद्ध. ४. लय पावतें.
५. निर्द्वंद्व. ६. जीव व जड पदार्थ या दोहोंचें. ७. देहाहून भिन्न. ८. मत्स्येंद्रनाथ.

५ वा.] शुद्धज्ञानलक्षण. ११७
२७ ॥ साधु संत आणि सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचें गुह्य-
ज्ञान । सांगिजेल आतां ॥ २८ ॥ तीर्थे व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्र-
पानें । पंचाग्नि गोरांजनें १ । जें प्राप्त नव्हे ॥ २९ ॥ सकळ साधनांचें फळ ।
ज्ञानचि सांगें केवळ । जेणें संशयाचें मूळ । निःशेष तुटे ॥ ३० ॥ छप्पन्न
भाषा तितुके ग्रंथ । आदिकरुनि वेदांत । या इतुक्यांचा गहनार्थ । एकचि
असे ॥ ३१ ॥ जें नेणवे पुराणीं । जेथें शिणल्या वेदवाणी । तेंचि आतां
येच क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२ ॥ पाहिलें नसतां संस्कृतीं । रीग नाहीं
महाराष्ट्र ग्रंथीं । हृदयीं वसिल्या कृपामूर्ती । सद्गुरु स्वामी ॥ ३३ ॥ आतां
नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत । माझा स्वामी कृपेसहित । हृदयीं
वसे ॥ ३४ ॥ न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवणसायास । प्रयत्नेविण
सुरस । सद्गुरुकृपा ॥ ३५ ॥ ग्रंथमात्र महाराष्ट्र । त्याहून संस्कृत श्रेष्ठ । त्या
संस्कृतामध्यें श्रेष्ठ । थोर तो वेदान्त ॥ ३६ ॥ त्या वेदान्तापारतें कांहीं ।
सर्वथा श्रेष्ठ नाहीं । जेथें वेदगर्भ ३ सर्वही । प्रगट जाहला ॥ ३७ ॥ असो
ऐसा जो वेदान्त । त्याचाचि मथितार्थैं २ । अति गहन जो परमार्थ । तो तूं
ऐक आतां ॥ ३८ ॥ अरे गहनाचेंहि गहन । तें तूं जाण सद्गुरुवचन ।
सद्गुरुवचनें समाधान । नेमैस्त ५ आहे ॥ ३९ ॥ सद्गुरुवचन तोचि
वेदान्त । सद्गुरुवचन तोचि सिद्धांत । सद्गुरुवचन तोचि धादांत ४ ।
सप्रचीत आतां ॥ ४० ॥ जें अत्यंत गहन । माझे स्वामीचें वचन । जेणें
माझें समाधान । अत्यंत जाहलें ॥ ४१ ॥ तें हें माझे जीवींचें गुज । मीं
सांगेन म्हणतों तुज । जरी अवधान देशी मज । तरी आतां येच क्षणीं ॥
४२ ॥ तंव शिष्य म्लानवदनें बोले । धरिलीं सद्दढ पाऊलें । मग बोलों
आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३ ॥ अहंब्रह्मास्मि ६ महावाक्यें । तेथींचा अर्थ अतर्क्य ।
तोहि सांगतों ऐक्यें ७ । गुरुशिष्यें जेथें ॥ ४४ ॥ ऐक शिष्या येथींचें वर्म ।
स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म । येविषयीं संदेह भ्रम । धरूंच नको ॥ ४५ ॥
नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य आत्मनिवेदन । तें समग्र प्रकारें क-
थन । कीजेल आतां ॥ ४६ ॥ निर्माण पंचभूतें इंद्रियें । कल्पांतीं नासती
१. स्वतःला जाळून घेणें. २. सार. ३. वेदांचा सारांश. ४. निर्णय. ५.
खचित. ६. मी ब्रह्म आहें. (हें यजुर्वेदांत आहे.) ७. गुरुशिष्यांच्या मनांचें ऐक्य.