दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 148, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें५ वा.] बहुधाज्ञान. ११३
॥ श्लोक ॥ पृथिव्यां यानि तीर्थानि ज्ञानदानेषु यत्फलम् । तत्फलं कोटिगुणितं
ब्रह्मज्ञानसमं हि न ॥ ४ ॥ टीका ॥ म्हणोन जें आत्मज्ञान । तें गहनाहून
गहन । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे पंचमदशके उपदेशलक्षणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. बहुधाज्ञान.
श्रीगणेशाय नमः ॥ जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ । तंव सर्व कांहीं नि-
ष्फळ । ज्ञानरहित तळमळ । जाणार नाहीं ॥ १ ॥ ज्ञान म्हणतां वाटे
भ्रम । काय रे बा असेल वर्म । म्हणोनि हा अनुक्रम । सांगिजेल ॥ २ ॥
भूत भविष्य वर्तमान । ठाउकें आहे परिच्छिन्न १ । त्यासिच म्हाणिजेलें ज्ञान ।
परी तें ज्ञान नव्हे ॥ ३ ॥ बहुत केलें विद्यापठण । संगीतशास्त्र रागज्ञान ।
वैदिक शास्त्र वेदाध्ययन । हेंहि ज्ञान नव्हे ॥ ४ ॥ नाना व्यवसायांचें २ ज्ञान ।
नाना दीक्षेचें ज्ञान । नाना परीक्षेचें ज्ञान । हें ज्ञान नव्हे ॥ ५ ॥ नाना
वनितांची ३ परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा । नाना व्यवहारांची परीक्षा ।
हें ज्ञान नव्हे ॥ ६ ॥ नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा । नाना
श्वापदांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ७ ॥ नाना पशूंची परीक्षा । नाना
पक्ष्यांची परीक्षा । नाना भूतांची ४ परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ८ ॥ नाना
यानांची ५ परीक्षा । नाना वस्त्रांची परीक्षा । नाना शस्त्रांची परीक्षा । हें
ज्ञान नव्हे ॥ ९ ॥ नाना धातूंची परीक्षा । नाना नाण्यांची परीक्षा । ना-
ना रत्नांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १० ॥ नाना पाषाणपरीक्षा । नाना
काष्ठांची परीक्षा । नाना वाद्यांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ११ ॥ नाना
भूमींची परीक्षा । नाना जळांची परीक्षा । नाना सतेज ६ परीक्षा । हें ज्ञान
नव्हे ॥ १२ ॥ नाना रसांची परीक्षा । नाना बीजांची परीक्षा । नाना
अंकुरपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १३ ॥ नाना पुष्पांची परीक्षा । नाना
फळांची परीक्षा । नाना वल्लींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १४ ॥ नाना
दुःखांची परीक्षा । नाना रोगांची परीक्षा । नाना चिन्हांची परीक्षा । हें
१. संपूर्ण. २. धंद्यांचें. ३. स्त्रियांची. ४. सृष्ट पदार्थांची. ५. वाहनांची.
६. तेजस्वी पदार्थ.