दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 143, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१०८ श्रीदासबोध. [ दशक
कुटुंबाचा । काबाडी जाहला ॥ ५६ ॥ मानिला प्रपंचीं आनंद । केला
परमार्थीं विनोद । आंत मूढ मतिमंद । लोधला¹ कर्मीं ॥ ५७ ॥ सूकर
पूजिलें विलेपनें । जैसा मर्दिला चंदनें । तैसा विषयी ब्रह्मज्ञानें । विवेकें
बोधिला ॥ ५८ ॥ रासभें² उकरडां लोळे । तयास परिमळसोहळे । उलूक³
अंधारीं पळे । तया केवीं हंसपंगती ॥ ५९ ॥ तैसा विषयदरीचा बरांडी⁴ ।
घाली अधःपैतनीं उडी । तयास भगवंतीं आवडी । सत्संग कैंचा ॥ ६० ॥
वरती करून दांताळी । श्वानपुत्र हाडें चघळी । तैसा विषयी तळमळी ।
विषयसुखाकारणें ॥ ६१ ॥ तया श्वानमुखीं परमान्नं । मर्कटासि सिंहासन ।
तैसें विषयासक्तास ज्ञान । जिरेल कैचें ॥ ६२ ॥ रासभें राखतां जन्म गेला ।
तो पंडितांमध्यें प्रतिष्ठािला । न वचे तैसा अभक्ताला । परमार्थ नाहीं ॥ ६३ ॥
मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षूनियां विष्टेचा
गोळा । हंस म्हणवी ॥ ६४ ॥ तेसे सज्जनाचे संगतीं । विषयी सजन म्हण-
विती । विषय अमेध्य चित्तीं । गोळा लक्षिला ॥ ६५ ॥ कांखे घेऊनियां
दारा । म्हणे मज संन्यासी करा । तैसा विषयी सैरावैरा । ज्ञान बडबडी
॥ ६६ ॥ असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैतसुख । नरकीं प्राणी
बरक । भोगिती स्वइच्छेनें ॥ ६७ ॥ वेश्येची करील सेवा । तो कैसा भली
म्हणावा । तैसा विषयदास मानावा । भक्तराज केवीं ॥ ६८ ॥ तैसे वि-
षयी बापुडे । तयांस ज्ञान कोणीकडे । वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपडे
जाहले ॥ ६९ ॥ ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्ठांमध्यें कनिष्ठ । हीन अवि-
वेकी आणि दुष्ट । खळ खोटे दुर्जन ॥ ७० ॥ ऐसे जे कां पापरूप । दीर्घ-
दोषी पापी वज्रलेप । तयांस प्रायश्चित्त अनुताप । उद्भवतां आहे ॥ ७१ ॥
तिहीं पुनः शरण जावें । सद्गुरूंसि संतोषावें । कृपादृष्टि जाहलिया
व्हावें । पुन्हा शुद्ध ॥ ७२ ॥ स्वामिद्रोह जयास घडे । तो यावच्चंद्रसूर्य
नरकीं पडे । तपास उपावचि न घडे । स्वामी तुष्टल्यावांचूनी ॥ ७३ ॥
स्मशानवैराग्य आलें । म्हणोन लोटांगण घातलें । तेणें गुणें उपतिष्ठिलें ।
नाहींच ज्ञान ॥ ७४ ॥ भाव आणिला जायाचाँ । मंत्र घेतला गुरूचा ।
१. लुब्ध झाला. २ गाढव. ३. बुबड. ४. आशाळभूत. ५. नरकांत. ६. दूध.
७. अपवित्र. ८. ब्रह्मानंद. ९. प्राप्त झालें. १०. उसना.