दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 133, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें९८ श्रीदासबोध. [ दशक
क्षिती १ । तेव्हां अवघेचि देव जाती । मुक्ती कैंच्या तेथें ॥ २८ ॥ तेव्हां
निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ति ते अचळ । सायुज्यमुक्ति ते केवळ ।
जाणिजे ऐसी ॥ २९ ॥ निर्गुणीं अनन्य २ असतां । तेणें होय सायुज्यता ।
सायुज्यता म्हणजे स्वरूपता । निर्गुण भक्ती ॥ ३० ॥ सगुण भक्ति ते चळे ।
निर्गुण भक्ती ते न चळे । हें अवघें प्रांजळ कळे । सद्गुरु केलिया ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके मुक्तिचतुष्टयनिरूपणं नाम
दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी २९६.
दशक पांचवा.
१. गुरुनिश्चय.
श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी सद्गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मया-
रामा । अनिर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १ ॥ जें वेदांसि
सांकडें ३ । जें शब्दासि कोंडडें ४ । तें सच्छिष्यासि रोकडें । अलभ्य लाभे ॥
२ ॥ जें योगियांचें निज वर्म ५ । जें शंकराचें निजधाम । जें विश्रांतीचें निज-
विश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३ ॥ तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणाचि
होइजे अंगें । दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेना ६ सर्वथा ॥ ४ ॥ आतां
स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें । सांगिजती तेणेंप्रमाणें ।
मुमुक्षें शरण जावें ॥ ५ ॥ गुरु तो सकळांसि ब्राह्मण । जरी तो जाहला
क्रियाहीन ७ । तरी तयासि शरण । अनन्यभावें असावें ॥ ६ ॥ अहो या
ब्राह्मणांकारणें । अवतार घेतला नारायणें । विष्णूनें श्रीवत्स मिरवणे । तेथें
इतर ते किती ॥ ७ ॥ ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्राचे ब्राह्मण । धातु-
पाषाणीं देवपण । ब्राह्मणाचेनि मंत्रें ॥ ८ ॥ मुंजीबंधनाविरहित । तो
शूद्रचि निर्भ्रांत । द्विजन्मा म्हणोनि सतत । द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९ ॥
सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण । वेदविरहित तें अप्र-
माण ८ । अप्रिय भगवंता ॥ १० ॥ ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं
१. पृथ्वी. २. एकनिष्ठ. ३. जाणण्यास कठीण. ४. अवघड. ५. गुह्य गोष्ट.
६. मळानें मळत नाहीं. ७. आचारभ्रष्ट. ८. प्रमाण नव्हे.