दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 249, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२१४ श्रीदासबोध. [ दशक
करावें पूजन । मायबाप नारायण । विश्वजनाचा ॥ ११ ॥ एक म्हणती
शास्त्र पाहावें । तेथें निरूपिलें देवें । तेणें प्रमाणेंचि जावें । परलोकासी
॥ १२ ॥ एक म्हणती अहो जना । शास्त्र पाहतां पुरवेना । या कारणें साधु-
जना । शरण जावें ॥ १३ ॥ एक म्हणती सांडा गोष्टी । वायांचि करितां
चौवटी । सर्वांस कारण पोटीं । भूतदया असावी ॥ १४ ॥ एक म्हणती
एकचि बरवें । आपुले आचारें असावें । अंतकाळीं नाम घ्यावें । देवाचें ॥१५॥
एक म्हणती पुण्य असेल । तरीच वाचे नाम येईल । नाहीं तरी भुली पडेल ।
अंतकाळीं ॥ १६ ॥ एक म्हणती जींत असावें । तंवचि सार्थक करावें ।
एक म्हणती फिरावें । तीर्थाटन ॥ १७ ॥ एक म्हणती हे अटाटी । पाणी-
पाषाणाची भेटी । बुचकळ्या मारितां हिंपुटी । कासया व्हावें ॥ १८ ॥
एक म्हणती सांडा वाचाळी¹ । अगाध महिमा भूमंडळीं । दर्शनमात्रें होय
होळी । महापातकांची ॥१९॥ एक म्हणती तीर्थ² स्वभावें । कारण मनचि
असावें । एक म्हणती कीर्तन करावें । सावकाश ॥ २० ॥ एक म्हणती योग
बरवा । मुख्य तोचि आधीं साधावा । देह अमरचि करावा । अकस्मात⁴
॥ २१ ॥ एक म्हणती ऐसें काय । काळवंचना³ करूं नये । एक म्हणती
धरावी सोय । भक्तिमार्गाची ॥२२॥ एक म्हणती ज्ञान बरवें । एक म्हणती
साधन करावें । एक म्हणती मुक्त असावें । निरंतर ॥ २३ ॥ एक म्हणती
अनर्गळा । धरीं पापाचा कंटाळा । एक म्हणती रे मोकळा । मार्ग आमुचा
॥ २४ ॥ एक म्हणती हें विशेष । करूं नये निंदा द्वेष । एक म्हणती साव-
काश । दुष्टसंग त्यागावा ॥२५॥ एक म्हणती ज्याचें खावें । त्या सन्मुखचि
मरावें । तेणें तत्काळचि पावावें । मोक्षपद ॥ २६ ॥ एक म्हणती सांडा
गोष्टी । आधीं पाहिजे ते रोटी । मग करावी चावटी । सावकाश ॥ २७ ॥
एक म्हणती पाउस असावा । मग सकळ योग बरवा । कारण दुष्काळ न
पडावा । म्हणिजे बरें ॥ २८ ॥ एक म्हणती तपोनिधी⁵ । होतां वोळती
सकळ सिद्धी । एक म्हणती रे आधीं । इंद्रपद साधावें ॥२९॥ एक म्हणती
आर्गम⁶ पाहावा । वेताळ प्रसन्न करून घ्यावा । तेणें पाविजे देवा । स्वयं-
१. बडबड. २. तीर्थासारखें शुद्ध. ३. मृत्यूस फसविणें, देह अमर करणें. ४.
अतिशय. ५. महा तपस्वी. ६. मंत्रशास्त्र.