दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 250, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंलोकीं ॥ ३० ॥ एक म्हणती अघोरमंत्र । तेणें होइजे स्वतंत्र । श्रीहरी-
चें कलत्र¹ । तेंचि वोले ॥ ३१ ॥ तिज लागले सर्व अधर्म । तेथें कैंचें
क्रियाकर्म । एक म्हणती कुकर्म । तिच्या मदें ॥ ३२ ॥ एक म्हणती एक
साक्षेप । करावा मृत्युंजयाचा जप । तेणें गुणें सर्व संकल्प² । सिद्धीतें पावती
॥ ३३॥ एक म्हणती बटु भैरव । तेणें पाविजे वैभव । एक म्हणती झोटिंग
सर्व । पुरवितसे ॥ ३४ ॥ एक म्हणती काळी³ । एक म्हणती भद्रकाळी ।
एक म्हणती उच्छिष्ट चांडाळी⁴ । साद्य करावी ॥ ३५ ॥ एक म्हणती विघ्न-
हर । एक म्हणती भोळा शंकर । एक म्हणती सत्वर । पावे भगवती ॥३६॥
एक म्हणती मल्हारी । सत्वरचि सभाग्य करी । एक म्हणती महा बरी ।
भक्ति व्यंकटेशाची ॥ ३७ ॥ एक म्हणती पूर्वठेवा⁵ । एक म्हणती प्रयत्न
करावा । एक म्हणती भार घालावा । देवावरी ॥३८॥ एक म्हणती देव
कैंचा । अंतचि पाहतो भल्यांचा । एक म्हणती हा युगाचा । युगधर्म ॥३९॥
एक आश्चर्य मानिती । एक विस्मय करिती । एक कंटाळोन म्हणती । काय
होईल तें पाहावें ॥ ४० ॥ ऐसे प्रापंचिक जन । लक्षणें सांगतां गहन ! प-
परंतु कांहींएक चिन्ह । अल्पमात्र बोलिलें ॥ ४१ ॥ आतां असो हा स्वभाव ।
ज्ञात्याचा कैसा अनुभव । तोहि सांगिजेल सर्व । सावध ऐका ॥ ४२ ॥
एक म्हणती करावी भक्ती । श्रीहरि देईल सद्गती । एक म्हणती ब्रह्मप्राप्ती ।
कर्मेचि होय ॥ ४३ ॥ एक म्हणती भोग सुटेना । जन्ममरण हें तुटेना ।
एक म्हणती ऊर्मी⁶ नाना । अज्ञानाच्या ॥ ४४ ॥ एक म्हणती सर्व ब्रह्म ।
तेथें कैंचें क्रियाकर्म । एक म्हणती हा अधर्म । बोलोंच नये ॥४५॥ एक म्ह-
णती सर्व नासे । उरलें तेंचि ब्रह्म असे । एक म्हणती ऐसें नसे । समाधान
॥४६॥ सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म । दोन्ही पूर्वपक्षांचे⁷ भ्रम । अनुभवाचें वेगळें
वर्म । म्हणती एक ॥ ४७ ॥ एक म्हणती हें न घडे । अनिर्वाच्य⁸ वस्तु न
जोडे । जे बोलतां मौन पडे । वेदशास्त्रांसी ॥ ४८ ॥ तंव श्रोता अनुवादला ।
ह्याणे निश्चय कोण केला । सिद्धांतमतें अनुभवाला । उरी कैंची ॥ ४९ ॥
अनुभव देहीं वेगळाले । हें पूर्वीच बोलिलें । आतां कांहींएक केलें । न
१. स्त्री, लक्ष्मी. २. मनोरथ. ३. महाकाळी. ४. एक देवी. ५. नशीब.
६. कल्पनां. ७. खोट्या विचाराचे. ८. बोलून दाखवितां येत नाहीं अशी.