दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 245, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२१० श्रीदासबोध. [ दशक
सि प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥ अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्ती-
चें घर । संयोगास निरंतर । योग केला ॥ ६४ ॥ निर्गुणास निर्गुण केलें ।
सार्थकाचें सार्थक झालें । बहुतां दिवसां भेटलें । आपणास आपण ॥ ६५ ॥
तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा । भूतपंचकाची बाधा । निर-
सोनि गेली ॥ ६६ ॥ झालें साधनांचें फळ । निश्चळास केलें निश्चळ । नि-
र्मळाचा गेला मळ । विवेकबळें ॥ ६७ ॥ होतें सन्निध चुकलें । ज्याचें त्यास
प्राप्त झालें । आपणा देखतां फिटलें । जन्मदुःख ॥ ६८ ॥ दुःस्वप्नें जाजा-
वला । ब्राह्मण नीचयाती झाला । आपणासि आपण सांपडला । जागेपणें
॥ ६९ ॥ ऐसें जयास झालें ज्ञान । तया पुरुषाचें लक्षण । पुढिले समासीं
निरूपण । बोलिलें असे ॥ ७० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अष्टम-
दशके आत्मनिदर्शननिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. सिद्धलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ अंतरीं गेलिया अमृत । बाहेरी काया लखलखित ।
अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसी ॥ १ ॥ झालें आत्मज्ञान बरवें ।
हें कैसेनि पां जाणावें । म्हणोनि बोलिलीं स्वभावें । साधुलक्षणें ॥ २ ॥
ऐका सिद्धाचें लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण । तेथें पाहतां वेगळेपण ।
मुळींच नाहीं ॥ ३ ॥ स्वरूप होऊनि राहिजे । तया नांव सिद्ध बोलिजे ।
सिद्धस्वरूपीं¹चें साजे । सिद्धपण ॥ ४ ॥ वेदशास्त्रीं जें प्रसिद्ध । स्वस्वरूप
स्वतःसिद्ध । तयासीच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥ ५ ॥ तथापि
बोलों कांहींएक । साधका कळावया विवेक । सिद्धलक्षणांचें कौतुक । तें हें
ऐसें असे ॥ ६ ॥ अंतर²स्थिति स्वरूप झाली । पुढें काया कैसी वर्तली ।
जैसी स्वर्मींची नाथिली । स्वप्नरचना ॥ ७ ॥ तथापि सिद्धाचें लक्षण ।
कांहीं करूं निरूपण । जेणें बाणे अंतरखूण । परमार्थाची ॥ ८ ॥ सदा
स्वरूपानु³संधान । हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोनि आपण । जनां-
वेगळा ॥ ९ ॥ स्वरूपीं दृष्टि पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लाग-
ली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ हें साधकाचें लक्षण । परी सिद्धाअंगीं
१. स्वतःसिद्ध ब्रह्मस्वरूपीं. २. अंतःकरणाची वृत्ति. ३. आत्मस्वरूपाचें चिंतन.