सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 192, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 192

७ वा. ] ब्रह्मनिरूपण. १५७
माया सर्व विकार । माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥ ५५ ॥ माया
दृश्य दृष्टीस दिसे । माया भास मनास भासे । माया क्षणभंगुर नासे । वि-
वेकें पाहतां ॥ ५६ ॥ माया अनेक विश्वरूप । माया विष्णूचें स्वरूप ।
मायेची सीमा अमूप । बोलिजे तितुकी थोडी ॥ ५७ ॥ माया बहुरूप बहु-
रंग । माया ईश्वराचा संग । माया पाहतां अभंग । अखिल वाटे ॥ ५८ ॥
माया सृष्टीची रचना । माया आपली कल्पना । माया तोडितां तुटेना ।
ज्ञानेंविण ॥ ५९ ॥ ऐसी माया निरूपिली । स्वल्प संकेतें बोलिली । पुढें
वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ६० ॥ पुढें ब्रह्मनिरूपण । निरूपिलें
ब्रह्मज्ञान । जेणें तुटे मायाभान । एकसरें ॥ ६१ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे सप्तमदशके मंगलाचरणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. ब्रह्मनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निर्विकार ।
ब्रह्मास नाहीं पारावार । बोलती साधु ॥ १ ॥ ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म
अनेकीं एक । ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं १ ॥२॥ ब्रह्म अच्युत
अनंत । ब्रह्म सदोदित संत २ । ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३ ॥ ब्रह्म
दृश्यावेगळें । ब्रह्म शून्यत्वा निराळें । ब्रह्म इंद्रियांच्या मेळें । चोजवेना ३
॥ ४ ॥ ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खास असेना । ब्रह्म गुरूविण येईना ।
अनुभवासी ॥ ५ ॥ ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्माऐसें नाहीं सार । ब्रह्म
सूक्ष्म अगोचर ४ । ब्रह्मादिकांसी ॥ ६ ॥ ब्रह्म शब्दें ऐसें तैसें । बोलिजे त्या-
हूनि आनारिसें ५ । परी तें श्रवणअभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७ ॥ ब्रह्मास नामें
अनंत । परी तें ब्रह्म नामातीत । ब्रह्मास हे दृष्टांत । देतां न शोभती ॥८॥
ब्रह्मासारिखें दुसरें । पाहतां काय आहे खरें । ब्रह्मीं दृष्टांतउत्तरें ६ । कदा न
साहे ॥९॥ जेथें वाचा निवर्तेती ७ । मनास नाहीं ब्रह्मप्राप्ती । ऐसी बोलिली
श्रुती । सिद्धांतवचनीं ॥ १० ॥ कल्पनारूप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि
नाहीं । म्हणोनि हें वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११ ॥ आतां मनासि
१. चळत नाहीं असें. २. असणारें. ३. जाणवेना. ४. अदृश्य. ५. निराळें.
६. दृष्टांतांनीं युक्त भाषणें. ७. परत वळते.