दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 191, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें'१५६ श्रीदासबोध. [ दशक
सप्रचीत । अध्यात्म लाभे अकस्मात । तरी अवश्य घ्यावें ॥ ३७ ॥ न क-
रितां व्युत्पत्तीचा श्रम । सकळ शास्त्रार्थ होय सुगम । सत्समागमाचें वर्म ।
तें हें ऐसें असे ॥ ३८ ॥ जें व्युत्पत्तीनें न कळे । तें सत्समागमें कळे । स-
कळ शास्त्रार्थ आकळे । स्वानुभवासी ॥ ३९ ॥ म्हणोनि कारण सत्समागम ।
तेथें नलगे व्युत्पत्तिश्रम । जन्मसार्थकाचें वर्म । वेगळेंच असे ॥ ४० ॥
श्लोक ॥ भाषाभेदाश्च वर्तंते ह्यर्थ एको न संशयः । पात्रद्वये यथा खाद्यं
स्वादभेदो न विद्यते ॥ १ ॥ टीका ॥ भाषापालटे कांहीं । अर्थ वायां जात
नाहीं । कार्यसिद्धि ते सर्वही । अर्थाचपाशीं ॥ ४१ ॥ तथापि प्राकृताकरि-
तां । संस्कृताची सार्थकता । येह्रवीं त्या गुप्तार्था । कोण जाणे ॥ ४२ ॥
आतां असो हें बोलणें । भाषा त्यागून अर्थ घेणें । उत्तम घेऊन त्याग करणें ।
साली तरफलांच्या ॥ ४३ ॥ अर्थ सार भाषा पोंचट । अभिमानें करावी
खटपट । नाना अहंतैनें वाट । रोधिली मोक्षाची ॥ ४४ ॥ शोध घेतां
लक्ष्यांशाचा । तेथें आधीं वाच्यांश कैंचा । अगाध महिमा भगवंताचा ।
कळला पाहिजे ॥ ४५ ॥ मुकेपणाचें बोलणें । हें जयाचें तोचि जाणे । स्वा-
नुभवाचिये खुणे । स्वानुभवी पाहिजे ॥ ४६ ॥ अर्थ जाणे अध्यात्माचा ।
ऐसा श्रोता मिळेल कैंचा । जयास बोलतां वाचेचा । हव्यासचि पुरे ॥४७॥
परीक्षावंतापुढें रत्न । ठेवितां होय समाधान । तैसें ज्ञानियापुढें ज्ञान ।
बोलावें वाटे ॥ ४८ ॥ मायाजालें दुश्चित होय । तें निरूपणीं कामा न ये ।
संसारिकां कळे काय । अर्थ येथीलचा ॥ ४९ ॥ श्लोक ॥ व्यवसायात्मिका
बुद्धिरेकेह कुरुनंदन । बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ १ ॥
टीका ॥ व्यवसायीं जो मलिन । त्यासि न कळे निरूपण । येथें पाहिजे
सावधपण । अतिशयेंसी ॥ ५० ॥ नाना रत्ने नाना नाणीं । दुश्चितपणें
घेतां हाणी । परीक्षा नेणता प्राणी । ठकला तेथें ॥ ५१ ॥ तैसें निरूपणीं
जाणा । आहाच पाहतां कळेना । मराठींचि उमजेना । कांहीं केल्या ॥५२॥
जेथें निरूपणाचे बोल । आणि अनुभवाची वोल । तें संस्कृतापरीस खोल ।
अध्यात्मश्रवण ॥ ५३ ॥ मायाब्रम्ह वोळखावें । तयास अध्यात्म म्हणावें ।
तरी तें मायेचें जाणावें । स्वरूप आधीं ॥ ५४ ॥ माया सगुण साकार ।
१. शास्त्रें पढण्याचा. २. निश्चितपणामध्यें. ३. वरवर.