सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 193, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 193

१५८ श्रीदासबोध. [ दशक
जें अप्राप्त । तें कैसेनि होईल प्राप्त । ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण
नाहीं ॥ १२ ॥ भांडारगृहें भरलीं । परी असती अडकलीं । हातास न येतां
किल्ली । सर्वही अप्राप्त ॥ १३ ॥ तरी ते किल्ली ते कवण । मज करावी
निरूपण । ऐसा श्रोता पुसे खूण । वक्तयासी ॥ १४ ॥ सद्गुरुकृपा तेचि
किल्ली । जेणें बुद्धि प्रकाशली । द्वैतकपाटें¹ उघडलीं । एकसरां ॥ १५ ॥ ते
सुख असे बाड² । नाहीं मनासि पवाड³ । मनेंविण कैवाड⁴ । साधनाचा
॥ १६ ॥ त्याची मनाविण प्राप्ती । कीं वासनेविण तृप्ती । तेथें न चले
व्युत्पत्ती । कल्पनेची ॥ १७ ॥ तें परेहूनि⁵ पैल । मन बुद्धि अगोचर । संग⁶
सोडितां सत्वर । पाविजे तें ॥ १८ ॥ संग सोडावा आपुला । मग पाहावें
तयाला । अनुभवितां या बोला । सुखावेल गा ॥ १९ ॥ आपण म्हणजे
मीपण । मीपण म्हणजे जीवपण । जीवपण म्हणजे अज्ञान । संग जडला
॥ २० ॥ सोडितां तया संगासी । ऐक्य होय निःसंगासी । कल्पनेविण
प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ २१ ॥ मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव
अज्ञान बोलिजे । अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ॥ २२ ॥ देहबुद्धीचें⁷
थोरपण । परब्रह्मीं न चले जाण । तेथें होतसे निर्वाण⁸ । अहंभावासी ॥ २३ ॥
उंच नीच नाहीं परी । राया रंका एकच तरी । झाला पुरुष अथवा नारी ।
एकाचि पद ॥ २४ ॥ ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचि ना ॥ २५ ॥ उंच ब्रह्म तें रायासी । नीच
ब्रह्म तें परिवारासी । ऐसा भेद तयापासीं । मुळींच नाहीं ॥ २६ ॥ सक-
ळांस मिळोन ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक । रंक अथवा ब्रम्हादिक । तेथेंचि
जाती ॥ २७ ॥ स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिही लोकींचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोनि एकचि स्थळ । विश्रांतीचें ॥ २८ ॥ गुरु शिष्यां एकचि
पद । तेथें नाहीं भेदाभेद । परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे
॥ २९ ॥ देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती । एकं ब्रम्ह द्वितीयं⁹
नास्ति । हें श्रुतीचें वचन ॥ ३० ॥ साधु दिसती वेगळाले । परी ते
१. ब्रम्हास झांकून ठेवणारे द्वैतमय जग हीच कपाटें. २. पुष्कळ. ३. शिर-
काव. ४. नाना प्रकार. ५. परा वाणीच्या पलीकडील. ६. विषयांची आसक्ति.
७. मी म्हणजे देह ही समजूत तिच्यासंबंधीं. ८. लय. ९. दुसरें नाहीं.