सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 132, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 132

४ था. ] मुक्तिचतुष्टय. ९७
॥ ९ ॥ तया ऐलीकडे बद्रीकेदार । पाहून येती लहान थोर । ऐसा हा
अवघा विस्तार । मेरु पर्वताचा ॥ १० ॥ तया मेरु पर्वता पाठारीं । तीन
शृंगें विषेम¹ थोरी । परिवारें राहिले तयावरी । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ११ ॥
ब्रह्मशृंग तो पर्वताचा । विष्णुशृंग तो मार्गैजांचा² । शिवशृंग तो स्फटिकाचा।
कैलास नाम त्याचें ॥ १२ ॥ वैकुंठ नाम विष्णुशृंगाचें । सत्यलोक नाम
ब्रह्मशृंगाचें । अमरावती इंद्राचें । स्थळ खालतें ॥ १३ ॥ तेथें गण गंधर्व
लोकपाळ । तेहेतीस कोटी देव सकळ । चौदा लोक सुवर्णाचळ³ । वेष्टित
राहिले ॥ १४ ॥ तेथें कामधेनूंचीं खिल्लारें । कल्पतरूंचीं वनें अपारें । अमृ-
ताचीं सरोवरें । ठायीं ठायीं उचंबळती ॥ १५ ॥ तेथें उदंड चिंतामणी⁴ ।
हिरे परिसांचिया खाणी । तेथें सुवर्णमय धरणी । लखलखायमान ॥ १६ ॥
परम रमणीय फांकती कळा⁵ । नवरत्नांचिया पाषाणशिळा । तेथें अखंड हर्ष-
वेळा । आनंदमय ॥ १७ ॥ तेथें अमृताचीं भोजनें । दिव्य गंधें दिव्य
सुमनें । अष्टनायका गंधर्व गायनें । निरंतर ॥ १८ ॥ तेथें तारुण्य वोस-
रेंना । रोग व्याधीहि असेना । वृद्धपण आणि मरण येईना । कदाकाळीं ॥
१९ ॥ तेथें एकाहूनि एक सुंदर । एकाहूनि एक चतुर । धीर उदार आणि
शूर । मर्यादेवेगळे⁶ ॥ २० ॥ तेथें दिव्यदेह ज्योतिरूपें । विद्युल्लतेसारिखीं
स्वरूपें । तेथें यश कीर्ति प्रतापें । सीमा सारिली ॥ २१ ॥ ऐसें तें स्वर्गभुवन ।
सकळ देवांचें वसतिस्थान । तया स्थळाचें महिमान । बोलिजे तितुकें थोडें
॥ २२ ॥ येथें ज्या देवाचें भजन करावें । तेथें त्या देवलोकीं राहावें । सलो-
कता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३ ॥ लोकीं राहावें ते सलोकता ।
समीप असावें ते समीपता । स्वरूपींच व्हावें सरूपता । तिसरी मुक्ती ॥
२४ ॥ देवस्वरूप जाहला देही⁷ । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं । स्वरूप-
तेंचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५ ॥ सुकृत⁸ आहे तें भोगिती । सुकृत
सरतां लोटून देती । आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६ ॥ म्हणोनि
तिन्ही मुक्ती नाशवंत । सायुज्यमुक्ती ते शाश्वत । तीही निरूपिली साव-
चित्त । ऐक आतां ॥ २७ ॥ ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतांसहित जळेल
१. ओळीनें नव्हेंत अशीं. २. पाच्येचा. ३. मेरु. ४. चिंतितलेलें देणारा मणी.
५. तेज. ६. अमर्याद. ७. मनुष्य. ८. पुण्य.