सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

कर्मकांडावर त्यांनी कडाडून असा प्रखर शब्दांत हल्ला केला आहे लोक संसार-संसार, पैसा-पैसा, बायको-
बायको करीत असताना कसे बेभान होतात व विठ्ठलाला कसे विसरतात, याचे वर्णन त्यांनी अनेक उदा-
हरणे देऊन केले आहे. निरनिराळ्या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांनी संसारी लोकांना सावध करून भक्ति-
मार्गास लाविले नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग जो भागवत संप्रदायात रूढ होऊ पाहात होता, त्यास त्यांनी
चालना दिली ज्या जिजाबाईंचे किंवा आवलीचे नाव तुकोबांच्या चरित्रात वारंवार कडवटपणे उच्चा-
रिले जाते, तिच्याही बाजूने पुष्कळच सहानुभूतीने बोलण्यासारखे आहे तुकारामबुवानी तिलाही उपदेश
करून पूर्ण बोधाचे बारा अभंग लिहिले आहेत

याप्रमाणे तुकोबानी स्वतःचा उद्धार करून घेतलाच पण त्यांचे कुटुंबीय व त्याच्या भोवतीचा
परिवार यांनाही विठ्ठलभक्तीचे सुख समजू लागले. तुकारामबुवांची कीर्ती अवघ्या महाराष्ट्रात पसरून
राहिली त्याच्या भोवती शिष्यसमुदाय मोठ्या प्रमाणावर जमू लागला तुकारामबुवाना जिंजाबाईपासून
काशी, भागीरथी व गंगा अशा तीन कन्या व महादेव, विठ्ठल व नारायण असे तीन मुलगे, अशी अपत्ये
झाली या लहानशा कुटुंबाबाहेर अवघे विश्व तुकोबाना जवळचे झाले होते 'देवांसाठीं झालें ब्रह्मांड
सोयरें' असे त्यांनी म्हटले आहे निळोबाराय पिंपळनेरकर, रामेश्वरभट्ट वाघोलीकर, गंगाराम मवाळ
कडूस्कर, महादाजीपंत कुलकर्णी देहूकर, कोंडोपंत लोहोकरे, मालजी गाडे येळवाडीकर, गवरशेट
सुदुंब्रेकर, संताजी जगनाडे, लोहगावकर इत्यादी अनेक शिष्य मंडळी बुवांच्या भोवती जमा झाली
निळोबाराय पिंपळनेरकर यांच्या परमार्थांमधील अधिकारासंबंधी जितके लिहावे तितके थोडेच आहे.
'येऊनियां कृपावंतें । तुकया स्वामी सद्गुरू नाथें । हात ठेविला मस्तकीं । देऊनि प्रसाद केलें सुखीं'
असा आपला व तुकोबांचा संबंध निळोबानी वर्णन केलेला आहे असेच नाव या भक्तीच्या व
परमार्थवृत्तीच्या प्रांतात तुकोबांच्या कृपेने कमाविले आहे ते बहिणाबाई या थोर व अधिकारसंपन्न अशा
स्त्रीने 'मत्स्य जैसा जळावांचूनी चरफडी । तैसी ते आवडी तुकोबाची' अशा प्रकारची तगमग तिची
तुकोबांसाठी असे हिला तुकोबानी स्वप्नात मंत्रोपदेश दिला 'स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली' अशी साक्ष
बहिणाबाईंची आहे

याप्रमाणे तुकारामबुवा आपल्या जीवनात ईश्वरी प्रसादाने तृप्त झाले 'तुका प्रेमें माजे
गाये । गाणियांत विरोनि जाये' अशी त्याची अवस्था झाली 'सर्व सुखें पायीं वोळंगिती,' 'खुटलीया
धाव तृष्णेचिया,' 'वेध थोरगें लावियेला' अशा तृप्तीच्या आनंदात तुकोबानी स्वतःचा व लोकांचा
उद्धार केला व आपल्या नंतरही अखंडपणे लोकांना प्रेरक व मार्गदर्शक ठरेल असे अभंगवाङ्मय निर्माण
केले अणुरेणूएवढे असलेले तुकारामबुवा आभाळाएवढे बनून राहिले 'तुझी माझी एक ज्योती' अशी
अनुभूती त्यांना येत राहिली जिवंतपणीच ते नारायणाच्या स्वरूपात जाऊन जणू मिळाले होते 'निरजनीं
आम्हीं बांधियेलें घर', 'झाला प्रेतरूप शरीराचा भाव' 'बीज भाजुनी केली लाही । आम्हा जन्ममरण
नाहीं' यासारख्या अनुभवातून तुकारामबुवा जात शेते भक्तिमार्गाच्या पथावर ते कळसरूपाने स्थिर
झाले शके १५७१ च्या फाल्गुन व १ रोजी त्यांनी देहूस गोपाळपुरा येथे नांदुरगीच्या वृक्षाखाली कीर्तन
केले आणि फाल्गुन व २ या दिवशी तुकोबानी या लोकांची यात्रा संपविली ते सदेह वैकुंठाला
गेले असा समज पुष्कळांचा आहे 'घरा आलें वैकुंठपीठ' अशी ज्यांची अनुभूती ती मात्र त्यांच्या
अभंगवाणीत आजही ताजी टवटवीत अशी आहे

तुकाराम महाराजांची अभंगवाणी
अलौकिक तेजाचा उगम कसा, कुठे व केव्हा होतो, याचे गणित अजून कुणासही समाधान-
कारक रीतीने सुटलेले नाही. 'शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते-योगभ्रष्ट झालेला पुरुष
शुचिर्भूत व श्रीमान् लोकांच्या घरी जन्म घेतो' असा निर्वाळा भगवद्गीतेने दिलेला आहे. पूर्वपुण्याई,
घराण्याचे संस्कार, शिक्षण, परिस्थिती, संगती इत्यादी अनेक कारणांचे चिंतन विचारवंतानी या
बाबतीत केलेले आहे. पुढील अनंत काळावर तीव्रपणे ठसा उमटविण्याचे सामर्थ्य असणारी दिव्य
प्रतिभा किंवा अलौकिक शक्ती कोणत्या अवस्थेत जन्मास येते? कशी विकसित होते? या प्रश्नाच्या
उत्तराविषयी काही तर्क करिता येतात, काही अनुमाने बांधता येतात, पण शास्त्रीय दृष्टीने उत्तर देणे
अजून कुणासही जमलेले नाही!
'अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची'
सन १६०८ मध्ये देहूसारख्या खेडेगावच्या मातीच्या कणात व तेथल्याच इंद्रायणीच्या पाण्यात
असे कोणते गुणधर्म निर्माण झाले की, ज्यातून एक अलौकिक तेज मुसावले जाऊन तुकाराम या नावाने
नावारूपास आले? वृत्तीने वाणी, जन्माने कुणबी, लौकिक शिक्षणाचा म्हणावा असा संस्कार नाही,
उच्च वर्णीयाना मिळणारी परंपरागत अशी अनुकूल पार्श्वभूमी नाही, व्यावसायिक व सांसारिक जीवन
तसे म्हटले तर प्रतिकूलच पण अशाही परिस्थितीत तुकोबांच्या मनाने जी आकाशास भिडणारी झेप
घेतली, ती कशाच्या बळावर? अनेक विद्यांचे संस्कार झाले असले तरी, चार ओळी लिहिताना
अडखळणारे, अडणारे आपणास माहीत आहेत. तुकाराम महाराजांना असे काय प्राप्त झाले की, ज्याच्या
योगाने त्यांच्या मुखातून अशी अभंगवाणी बाहेर पडली की, तिच्यापासून ते स्वतः तर तृप्त झालेच,
पण त्यांच्या भोवतीचे लोकही संतुष्ट होऊन गेले. त्यांच्या नंतरही त्यांच्या अभंगवाणीने साऱ्या मराठी
माणसांना मुग्ध केले. 'अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची' असाच रिवाज सर्वांच्या बोलण्यातून निर्माण
झाला. स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध, व्यावसायिक, पारमार्थिक, उच्चवर्णीय, मध्यमवर्णीय, सर्वांनाच या
तुकाराम महाराजांच्या अभंगाचे एवढे वेड लागलेले दिसते की, प्रत्येकाला तो आपल्या अंतरंगातील
जिव्हाळ्याचा ठेवा वाटावा. संसारताप, व्यावसायिक अपयश, परमार्थमार्गातील हुरहूर, असे कोणतेही
कारण असो, प्रत्येकास आधार मिळाला आहे तो तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा. तुकाराम-
बुवांच्या अभंगातील दहापाच ओळी तरी माहीत नाहीत, असा मराठी मनुष्य सहसा मिळणार नाही.
शिक्षणाचा प्रसार नव्हता, तेव्हाही सबंध गाथा पाठ म्हणून दाखविण्याचे चमत्कार करणारे काही थोर
भक्त होते. प्रसिद्ध भक्तवर वै. बाबुराव हरि देवडीकर यांचे साडेचार हजार अभंग पाठ होते !

अठरा
काढावासा वाटतो, कुणाला त्याच्या भाषासरणीचा अभ्यास करावासा वाटतो, कुणी त्याच्या चरित्रातील
ऐतिहासिक प्रसंगांची सत्यता पडताळून पाहात असतात, कुणी त्याच्या अभंगाचा क्रमविकास
बसविण्याच्या नादात असतात, कुणाला त्याच्या सगुणभक्तीने चटवा लाविला असतो, तर कुणास
त्याच्या निर्गुणनिराकाराच्या उपासनेची बौद्धिक उंची प्रिय वाटते कुणी त्याच्या द्वैत अथवा अद्वैत
तत्त्वज्ञानाचा शोध घेतात, तर कुणी त्यांना आलेल्या गूढ अशा आध्यात्मिक अनुभूतीची मानसशास्त्रीय
चिकित्सा करतात कुणी त्याच्या आयुष्यातील चमत्कारिक गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात,
तर कुणी त्याच्या परंपरेचा शोध घेतात कुणी त्याच्या नावाविषयी, गावाविषयी, जन्मशकाविषयी,
जातीविषयी, व्यवसायाविषयी, शिक्षणाविषयी, गुरुपरंपरेविषयी त्याच्या नामदेवाच्या प्रेरणेविषयी,
त्याच्या सदेह वैकुंठगमनाविषयी उत्सुकतेने चर्चा करीत असतात कोणत्या का होईना, पण एकाद्या
बलवत्तर अशा कारणाने देहूच्या या भगवद्भक्ताने सर्वांचे लक्ष आपणाकडे वधून घेतले आहे खास
'धन्य देहू गाव'
तुकोबाच्या या लोकप्रियतेचे व त्याच्या अभंगवाणीच्या यशाचे नेमके गमक कोणते ? त्याच्या
आयुष्यातील मुख्य प्रेरणा कोणत्या ? त्याच्या जीविताचा क्रमविकास व त्याच्या मानसिक अवस्थांची
श्रेणी याचा काही संबंध जुळविता येतो का ? प्रथम आपण तुकोबाच्या घरच्या किंवा घराण्याच्या
काही प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न करू तुकारामबुवानी आपल्या गावाचे वर्णन धन्य देहू गाव पुण्यभूमी
ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग' या अभंगात विस्ताराने केले आहे तेथील श्रीविठ्ठल, रखुमाई इंद्रायणी-
तीर, हरेश्वर, गरुड, हनुमंत, लक्ष्मीनारायणाचे मंदिर, इत्यादी खुणा तुकाराम महाराजांनी या अभंगात
दिलेल्या आहेत 'पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास जन्म घेती' असे दुसऱ्या एका
अभंगात त्यांनी हरिदासाच्या, भक्ताच्या जन्मभूमीचे व कुळाचे माहात्म्य वर्णन केले आहे
'माझ्या वडिलांची मिरासी'
या पवित्र भूमीत एका प्रतिष्ठित व विठ्ठलभक्तिसंपन्न अशा कुळात तुकोबांचा जन्म झाला
तुकोबांनी आपल्या कुळाची थोरवी अनेकदा वर्णन केलेली आहे 'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं'
असे त्यांनीच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे अतिशय शुद्ध अशा कुळात हे भक्तीचे रसाळ व गोमटे असे
फळ निर्माण झाले यांच्या घराण्यातील आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे मोठेच विठ्ठलभक्त होते त्यांच्याच
वेळेपासून या गावास क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले असावे याच विश्वंभरबाबांनी देहूस विठ्ठलाचे मंदिर
बांधले त्यात विठ्ठलमूर्तींची स्थापना केली अशी ही विठ्ठलपरंपरा तुकोबांच्या वंशाची मिरासदारी
आहे 'विठ्ठल कुळींचे दैवत', 'आदि तो हा देव कुळपूज्य', 'सहज वडिलां होती सेवा । म्हणोनि पूजितों
या देवा' असे तुकोबांनी आपल्या कुळाच्या दैवताचे वर्णन केले आहे 'पंढरीची वारी आहे माझ्या
घरीं' म्हणून त्यांनी साद्य अभिमानाने उल्लेख केलेला आहे 'तुका म्हणे संत सेवा । मान्या पूर्वजाचा
ठेवा' अशा आपल्या आनुवंशिक ठेवण्याचे वारंवार वर्णन तुकारामबुवांनी केले आहे 'व्रत एकादशी
करीन उपवासी । गाईन अहोर्निशी मुखीं नाम अशा भाषेत तुकोबांनी आपल्या घराण्याच्या पवित्र
परंपरेचा उल्लेख केलेला आहे या पावन कुळातील भक्तिपरंपरेचा संस्कार तुकोबांच्या मनावर
झालेला असावा
सुस्थितीचा संसार
तुकाराम महाराजांच्या घरी महाजनकी होती थोडी सावकारकी असावी त्यांच्या घराण्याचा
व्यवसाय वैश्याचा, वाण्याचा तेव्हा घरी दुकानदारी व व्यापार या गोष्टी ओघाने आल्याच तुकाराम-
बुवांचे लक्ष प्रथमपासूनच या व्यवसायात बऱ्यापैकी असावे आईवडिलांच्या सुखद छायेत बाळपणही
सुखाचे गेले असावे टिप्पऱ्या, चेंडू, मुदमपाट्या, हुतूतू हुंबरी, विटीदांडू, कुरमोडी इत्यादी खेळांची त्यांनी

एकोणीस
पुढं जी वहारीची वर्णनं केली आहेत, ती बहुधा त्याच्या स्वानुभवाचीच असावीत तुकोबांचे जनक
बोल्होबा व आई कनकाई यांचीही विठ्ठलाचरणी असीम भक्ती होती आषाढी-कार्तिकीची वारी घरी
चालू होती दानधर्म, वैष्णवाचा सत्कार, भजनपूजन याच्या परिसरातच तुकोबा लहानाचे मोठे होत
होते. पहिली पत्नी रखुमाई दीर्घकाळ आजारी असल्याने तुकोबांचे दुसरे लग्न त्याच्या आईबापानी
करून दिले या दुसऱ्या बायकोने, जिजाबाई उर्फ आवलीने तुकोबाच्या चरित्रात बरेच नाव कमाविले
आहे तुकोबाचा संसार प्रारंभी तरी आनंदी होता 'मातापिता बंधु सज्जन । घरीं उदड धनधान्य ।
शरीर आरोग्य लोकात मान्य । एकही उणे असेना' अशा सुस्थितीच्या संसाराच चित्र आकर्षक नव्हत
असे कोण म्हणेल ?
सांसारिक आपत्ती
परंतु देवाला या भक्तास केवळ संसार करू द्यावयाचा नव्हता असे दिसते त्याच्यावर एका-
मागून एक असे घाव प्रथम घरून बसण्यास प्रारंभ झाला. 'बाप मेला न कळतां' ही पहिली मोठी
आपत्ती थोड्याच दिवसात आई मरण पावली थोरला बंधू सावजी याची पत्नी मरण पावली व तो
वैराग्याच्या भरात घर सोडून निघून गेला त्याची पहिली बायको अन्नअन्न करून मरण पावली पहिला
मुलगा संताजी मरण पावला या घरच्या आघाताने बघून येणारे सासारिक तुकारामबुवा गांगरून
गेले असल्यास नवल नाही मूळची वृत्ती अतिशय सात्त्विक, विठ्ठलावर भरवसा मोठा, पण एकामागून
एक अशा कोसळणाऱ्या संकटांनी तुकोबांचे मन व्यथित झाले असावे अशा वेळी मनास जपणारी,
हळुवारपणे फुंकर घालून दुख हलवे करणारी पत्नी असावी ना ? पण त्यांना हे सुख म्हणावेसे नव्हते
सांवलीच्या बाजूने पुष्कळच म्हणण्यासारखे असले तरी, तुकोबानी 'बाईल कर्कशा' म्हणूनच तिचा
उल्लेख केलेला आहे 'कर्कश संगती । दुःख उदड फजीती' असाच अनुभव त्यांनी सांगितला आहे
बाहेरच्या संकटाचा वर्षाव
घरात झालेल्या या पडझडीत भर पडली, ती बाहेरच्या विलक्षण आपत्तीची मग मोठा
दुष्काळ पडला, व्यापार बसला, दुकानदारी बुडाली, देणे वाढले, शेतीतील पिके नष्ट झाली व शेवटी
दुकानाचे दिवाळे निघाले बऱ्या पुरुषाच्या मनावर अशा आघातानी जा परिणाम होतो, त्याचेही वर्णन
तुकारामबुवानी मधून मधून केले आहे आपल्या संसाराच्या व व्यवसायाच्या वाताहतीचे मोठे विदारक
चित्र त्यांनी एकदोन ठिकाणी काढलं आहे. 'संसारें जालों अति दुखें दुःखी' येथपासून प्रारंभ करून
त्यांनी आपल्यावरील संकटाची मालिकाच निवेदन केलेली आहे 'दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान ।
स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली । लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखें । वेवसाय देखें तुटी येता'
किंवा 'बहु पीडिलों संसारें' या शब्दात त्यानी आपल्या फजितीचे वर्णन केले आहे, आणि मग स्वतःचे
समाधानही करून घेतलं आहे 'बाईल मेली मुक्त झाली । देवें माया तोडविली', 'बरें झालें देवा
निघालें दिवाळें । बरे या दुष्काळें पीडा केली' 'बरे झाले देवा बाईक कर्कशा । बरी हे दुर्दशा
जनामध्ये' 'देव भक्तालागीं करूं नेदी संसार' 'स्त्री बाळी गुणवती तीथें गुते आशा । यालागीं
कर्कशा पाठी लायी' यासारख्या वचनात क्षणिक उद्वेग किती ? तात्त्विक सिद्धान्ताच भ्रम किती ? हा
विचारही एका अभ्यासास उपयुक्त पडण्यासारखा आहे
'येथें सारं भगवंत'
संसाराच्या, व्यवसायाच्या या वाताहतीनंतर बुवांच मन लौकिक जीवनातून उठले 'जाला हा
वमन संसार', 'फटकळ हा संसार । येथें सार भगवंत' या निश्चयाने तुकोबांच्या आयुष्यास एक
नवीन वाट मिळाली सुप्त असलेल्या विठ्ठलभक्तीस जोराची जाग प्राप्त होण्याचा समय प्राप्त झाला.

अठरा
काढावासा वाटतो, कुणाला त्याच्या भाषासरणीचा अभ्यास करावासा वाटतो, कोणी त्याच्या चरित्रातील
ऐतिहासिक प्रसंगांची सत्यता पडताळून पाहात असतात, कोणी त्याच्या अभंगांचा क्रमविकास
बसविण्याच्या नादात असतात, कुणाला त्याच्या सगुणभक्तीने चटका लावला असतो, तर कुणास
त्याच्या निर्गुणनिराकाराच्या उपासनेची बौद्धिक उंची प्रिय वाटते. कोणी त्याच्या द्वैत अथवा अद्वैत
तत्त्वज्ञानाचा शोध घेतात, तर कोणी त्यांना आलेल्या गूढ अशा आध्यात्मिक अनुभूतीची मानसशास्त्रीय
चिकित्सा करतात. कोणी त्याच्या आयुष्यातील चमत्कारिक गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात,
तर कोणी त्याच्या परंपरेचा शोध घेतात. कोणी त्याच्या नावाविषयी, गावाविषयी, जन्मशकाविषयी,
जातिविषयी, व्यवसायाविषयी, शिक्षणाविषयी, गुरुपरंपरेविषयी, त्याच्या नामदेवाच्या प्रेरणेविषयी,
त्याच्या सदेह वैकुंठगमनाविषयी उत्सुकतेने चर्चा करीत असतात. कोणत्या का होईना, पण एखाद्या
बलवत्तर अशा कारणाने देहूच्या या भगवद्भक्ताने सर्वांच लक्ष आपणाकडे वेधून घेतलं आहे खास.
'धन्य देहू गाव'
तुकोबांच्या या लोकप्रियतेचे व त्याच्या अभंगवाणीच्या यशाचे नेमके गमक कोणते ? त्याच्या
आयुष्यातील मुख्य प्रेरणा कोणत्या ? त्याच्या जीविताचा क्रमविकास व त्याच्या मानसिक अवस्थांची
श्रेणी याचा काही संबंध जुळविता येतो का ? प्रथम आपण तुकोबांच्या घरच्या किंवा घराण्याच्या
काही प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न करू. तुकारामबुवांनी आपल्या गावाचे वर्णन 'धन्य देहू गाव पुण्यभूमी
ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग' या अभंगात विस्ताराने केले आहे. तेथील श्रीविठ्ठल, रखुमाई, इंद्रायणी-
तीर, हरेश्वर, गरुड, हनुमंत, लक्ष्मीनारायणाचे मंदिर, इत्यादी खुणा तुकाराम महाराजांनी या अभंगात
दिलेल्या आहेत. 'पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास जन्म घेती' असे दुसऱ्या एका
अभंगात त्यांनी हरिदासाच्या, भक्ताच्या जन्मभूमीचे व कुळाचे माहात्म्य वर्णन केले आहे.
'माझ्या वडिलांची मिरासी'
या पवित्र भूमीत एका प्रतिष्ठित व विठ्ठलभक्तिसंपन्न अशा कुळात तुकोबांचा जन्म झाला.
तुकोबांनी आपल्या कुळाची थोरवी अनेकदा वर्णन केलेली आहे 'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं'
असे त्यांनीच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे अतिशय शुद्ध अशा कुळात हे भक्तीचे रसाळ व गोमटे असे
फळ निर्माण झाले. यांच्या घराण्यातील आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे मोठेच विठ्ठलभक्त होते. त्यांच्याच
वेळेपासून या गावास क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले असावे. याच विश्वंभरबाबांनी देहूस विठ्ठलाचे मंदिर
बांधले. त्यात विठ्ठलमूर्तीची स्थापना केली. अशी ही विठ्ठलपरंपरा तुकोबांच्या वंशाची मिरासदारी
आहे. 'विठ्ठल कुळींचे दैवत', 'आदि तो हा देव कुळपूज्य', 'सहज वडिला होती सेवा । म्हणोनि पूजितों
या देवा' असे तुकोबांनी आपल्या कुळाच्या दैवताचे वर्णन केले आहे. 'पंढरीची वारी आहे माझ्या
घरीं' म्हणून त्यांनी सर्व अभिमानानं उल्लेख केलेला आहे. 'तुका म्हणे संत सेवा । माझ्या पूर्वजांचा
ठेवा' अशा आपल्या आनुवंशिक ठेव्याचे वारंवार वर्णन तुकारामबुवांनी केले आहे. 'व्रत एकादशी
करोन उपवासी । गाईन अहर्निशीं मुखीं नाम' अशा भाषेत तुकोबांनी आपल्या घराण्याच्या पवित्र
परंपरेचा उल्लेख केलेला आहे. या पावन कुळातील भक्तिपरंपरेचा संस्कार तुकोबांच्या मनावर
झालेला असावा.
सुस्थितीचा संसार
तुकाराम महाराजांच्या घरी महाजनकी होती. थोडी सावकारकी असावी. त्यांच्या घराण्याचा
व्यवसाय वैश्याचा, वाण्याचा. तेव्हा घरी दुकानदारी व व्यापार या गोष्टी ओघाने आल्याच. तुकाराम-
बुवांचे लक्ष प्रथमपासूनच या व्यवसायात बऱ्यापैकी असावे. आईवडिलांच्या सुखद छायेत बाळपणही
सुखाचे गेले असावे. टिपऱ्या, चेंडू, मृदंगपाटचा, हुतूतू, हुबरी, विटीदांडू, कुरघोडी इत्यादी खेळांची त्यांनी

. एकोणीस
पुढ जी बहारीची वर्णने केली आहेत, ती बहुधा त्याच्या स्वानुभवाचीच असावीत तुकोबांचे जनक
बोल्होबा व आई कनकबाई यांचीही विठ्ठलाचरणी असीम भक्ती होती आषाढी-कार्तिकीची वारी घरी
चालू होतो दानधर्म, वैष्णवांचा सत्कार, भजनपूजन याच्या परिसरातच तुकोबा लहानाचे मोठे होत
होते पहिली पत्नी रखुमाई दीर्घकाळ आजारी असल्याने तुकोबांचे दुसरे लग्न त्याच्या आईबापानी
करुन दिले या दुसऱ्या बायकोने, जिजाबाई उर्फ आवलीने तुकोबाच्या चरित्रात बरेच नाव कमाविले
आहे तुकोबाचा संसार प्रारंभी तरी आनंदी होता 'मातापिता बंधु सज्जन । घरीं उदड धनधान्य ।
शरीर आरोग्य लोकांत मान्य । एकही उणे असेना' अशा सुस्थितीच्या संसाराचे चित्र आवर्षक नव्हते
असे कोण म्हणेल ?
सांसारिक आपत्ती
परतु देवाला या भक्तास केवळ समार करू द्यावयाचा नव्हता असे दिसते त्याच्यावर एका-
मागून एक असे घाव प्रथम घरून बसण्यास प्रारंभ झाला. 'बाप मेला न कळतां' ही पहिली मोठी
आपत्ती थोड्याच दिवसात आई मरण पावली थोरला बंधू सावजी याची पत्नी मरण पावली व तो
वैराग्याच्या भरात घर सोडून निघून गेला त्याची पहिली बायको अन्नअन्न करून मरण पावली पहिला
मुलगा संताजी मरण पावला या घरच्या आघाताने, वयात येणारे सांसारिक तुकारामबुवा गांगरून
गेले असल्यास नवल नाही मूळची वृत्ती अतिशय सात्विक, विठ्ठलावर भरवसा मोठा, पण एकामागून
एक अशा कोसळणाऱ्या संकटांनी तुकोबांचे मन व्यथित झाले असावे अशा वेळी मनास जपणारी,
हळुवारपणे फुंकर घालून दुःख हलके करणारी पत्नी असावी ना ? पण त्यांना हे सुख म्हणावेसे नव्हते.
सावलीच्या बाजूने पुष्कळच म्हणण्यासारखे असले तरी, तुकोबानी 'बाईल कर्कशा' म्हणूनच तिचा
उल्लेख केलेला आहे 'कर्कश संगती । दुःए उदड फजीती' असाच अनुभव त्यांनी सांगितला आहे
बाहेरच्या संकटाचा वर्षाव
घरात झालेल्या या पडझडीत भर पडली, ती बाहेरच्या विलक्षण आपत्तीची भला मोठा
दुष्काळ पडला, व्यापार बसला, दुकानदारी बुडाली, देणे वाढले, शेतीतील पिके नष्ट झाली व शेवटी
दुकानाचे दिवाळे निघाले कर्त्या पुरुषाच्या मनावर अशा आघातांनी जो परिणाम होतो, त्याचेही वर्णन
तुकारामबुवानी मधून मधून केले आहे आपल्या संसाराच्या व व्यवसायाच्या वाताहतीचे मोठे विदारक
चित्र त्यांनी एकदोन ठिकाणी काढले आहे. 'संसारें जालों अति दुखें दुखी' येथपासून प्रारंभ करून
त्यांनी आपल्यावरील संकटाची मालिकाच निवेदन केलेली आहे 'दुष्काळें आटिलें द्रव्य मेला मान ।
स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली । लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखें । वेवसाय देखों तुटी येता'
किंवा 'बहु पीडिलो संसारें' या शब्दात त्यांनी आपल्या फजितीचे वर्णन केले आहे, आणि मग स्वतःचे
समाधानही करून घेतले आहे 'बाईल मेली मुक्त झालो । देवे माया सोडविली', 'बरें झालें देवा
निघाले दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली', 'बरे झालें देवा बाईल कर्कशा । बरो हे दुर्दशा
जनामध्ये', 'देव भक्तालागीं करु नेदी संसार', 'स्त्री व्हावी गुणवती तोपें गुंत आशा । यालागीं
कर्कशा पाठो लावी' यासारख्या वचनात क्षणिक उद्वेग किती ? तात्त्विक सिद्धांताचे मर्म किती ? हा
विचारही एका अभ्यासास उपयुक्त पडण्यासारखा आहे
'येथे सारं भगवंत'
संसाराच्या, व्यवसायाच्या या वाताहतीनंतर बुवांचे मन लौकिक जीवनातून उठले 'जाला हा
वमन सवसार', 'फटकळ हा संसार । येथें सार भगवंत' या निश्चयाने तुकोबांच्या आयुष्यास एक
नवीन वाट मिळाली सुप्त असलेल्या विठ्ठलभक्तीस जोराची जाग प्राप्त होण्याचा समय प्राप्त झाला.

... वीस ...
दुकानदारी व प्रपंच करण्यांतच गुंतण्यापेक्षां अवघ्या विश्वाची उठाठेव करण्याची शक्ती जेथे मिळते,
तेथेच त्याचे चित्त गिळून राहिले. त्यांनी आपल्या नव्या साधनमार्गाचीही नोंद तपशीलाने दिलेली
आहे तुकाराम महाराजांच्या साधनक्रमाचे एका अभंगात संक्षेपाने पण स्पष्ट असे वर्णन आले आहे.
'याती शूद्र वैश्य केला वेवसाय' या प्रसिद्ध अशा आत्मनिवेदनपर अभंगांत ने या साधनमार्गाचा
खुलासा करताना म्हणतात,
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावें तें ॥
आरंभीं कीर्तन करो एकादशी । बहुतें अभ्यासों चित्त आधीं ॥
कांही पाठ केलीं संतांचीं उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥
संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥
ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥
वचन मानिलें नाहीं सुहृदांचें । समूळ प्रपंचों वीट आला ॥
सत्य असत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमत ॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥
यावरि या झाली कवित्त्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥
'आपुलाचि वाद आपणांसी'
याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या साधनेस प्रारंभ झाला पारमार्थिक जीवनयात्रेचा प्रवास
सुरू झाला गावातील विठोबाचे देऊळ त्यांनी प्रथम दुरुस्त केले संतांची काही उत्तरे पाठ केली. कुणी
कीर्तन करू लागले तर, त्याच्या पाठीमागे उभे राहून धृपद धरण्याचे काम त्यांनी पत्करले. संताच्या
चरणसेवेची लाज मनात वाटू दिली नाही शेजारच्या भामनाथाच्या डोंगरावर जाऊन तुकारामबुवांनी
ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता या ग्रंथाची पारायणे केली. अखंड विठ्ठलनामाचा जयघोष केला.
'सरें नानपट निक्षेपीचें जुनें ठेवणें' होते ते शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकान्ताच्या निवासाने व
ज्ञानेश्वर-नामदेवांच्या कृपेने त्याचे चित्त शांत झाले डोंगरावरील वृक्षवल्लींचा व वनचरांचा सहवास
त्यांना किती सुखाचा वाटत होता, याचे मोठे बहारदार वर्णन त्यांनी एका अभंगात केले आहे.-
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥
येणे सुखें रुचे एकान्ताचा वास । नाहीं गुणदोष अंगा येत ॥
आकाश मंडप पृथ्वो आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥
कंथा कमंडलु देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥
'मज विश्वंभर बोलवितो'
बशा या विशाल पार्श्वभूमीवर तुकोबांचे मन रमून गेले पृथ्वीचे आसन झाले. आकाशाची
छाया झाली हरिकथेच्या भजनाचे नाना प्रकार झाले. आपल्या मनाशी आपले सुलसवाद सुरू झाले.
याच वेळी आणखी एकदोन महत्त्वाच्या घटना बुवांच्या आयुष्यात घडल्या. बाबाजी चैतन्य या थोर
सत्पुरुषाने त्यांना उपदेश दिला 'राम कृष्ण हरि' हा मंत्र प्राप्त झाला आणि थोड्याच दिवसांत
नामदेवरायांच्या कडून त्यांना कवित्त्वाची प्रेरणा झाली 'नामदेवें केले स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगें
येवोनिया । सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नये' अशा आज्ञेवरून तुकाराम
महाराजांच्या कवित्वास प्रारंभ झाला.

एकवीस
घरी असलेली विठ्ठलभक्तीची परंपरा व ज्ञानेश्वर, नामदेव यांची प्रेरणा यातून तुकाराम
महाराजांच्या मुखातून अभंगवाणी स्रवू लागली. साक्षात्काराच्या आधी, नामदेवाच्या प्रेरणेच्या आधी,
सद्गुरूच्या उपदेशाआधी, त्यांनी थोडेफार कवित्व केले असावे. पण आता जे परतत्त्वाच्या स्पर्शाने
पुनीत झालेले 'वाङ्मय' त्यांच्या मुखातून बाहेर येऊ लागले, त्याच्या तेजाने, त्याच्या रसकत्तेने,
त्याच्या मार्मिकतेने, सर्वजण त्यावेळीही दिपून गेले. तुकोबांच्या कवित्वाचा एक महत्त्वाचा विशेष असा की,
त्यांचा आत्मविश्वास मोठा असला तरी, आपले कवित्व ही ईश्वराची देणगी आहे, अशी यथार्थ जाणीव
त्यांना होती. इतकेच नव्हे तर, तो देवच आपल्या मुखातून बोलतो, अशी त्यांची खात्री होती. आपण
केवळ भारवाही आहोत, धन्याचा माल वाटणारे आहोत, निरोप आहोत, प्रत्यक्ष बोलणारा अथवा
बोलविणारा तो भगवंत आहे, असे त्यांनी वारंवार म्हटले आहे.
'माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो । काय मी पामर जाणे अर्थभेद ।
वदवी गोविंद तैंचि वदे ।', 'नव्हती माझे बोल बोले पांडुरंग', 'आपुलिया बळें नाहीं मी बोलत ।
सखा कृपावंत वाचा त्याची । साळुंकी मजुल बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची', 'तुका म्हणे
मज बोलवितो देव', इत्यादी ओळींतून तुकाराम बुवांनी आपल्या वाणीच्या प्रसादाचे व तेजाचे मर्म
विशद केले आहे.
पारमार्थिक अनुभवांचे सार
तुकाराम महाराजांनी एकूण अभंग किती लिहिले ? म्हणजे त्यांच्या मुखातून किती स्रवले ?
त्यांचे लेखन कुणी केले, कोणत्या प्रसंगी कोणते अभंग तयार झाले, विशेष प्रसंगाचे अभंग कोणते ?
इतर तुकारामांचे 'तुका म्हणे' या मुद्रेने देहूच्या तुकारामाच्या गाथेत शिरलेले कोणते ? त्यांच्या
अभंगातील क्रमविकास कोणता ? स्फुट अभंगांचे गट किंवा समूह प्रथमपासूनच होते काय ? पुढे ज्या
ओळींना किंवा वर्गीकरणांना महत्त्व आले, त्यांना तुकोबांच्या हयातीत कितपत आधार होता ? इत्यादी
अनेक प्रश्नांची चर्चा संशोधकांनी व अभ्यासकांनी आजपर्यंत केलेली आहे.
सर्वसाधारणपणे साडेचार ते पाचहजार पर्यंत अभंग तुकाराम महाराजांचे म्हणून उपलब्ध
आहेत असे मानले, तर त्यांचे सक्षेपारने दर्शन घेता येण्यासारखे आहे. स्थूल मानाने तुकारामबुवांच्या
अभंगांचे दोन प्रकार पडतात. पहिल्या विभागात त्यांना आलेले वैराग्य, त्यांची साधना, त्यांच्या
मनाची तळमळ, त्यांच्या जीवाची झालेली लटपट, त्यांनी केलेली ईश्वराची, विठ्ठलाची करुण शब्दांतील
प्रार्थना, त्यांचे देवावरचे रुसणे, त्यांचा प्रेमकलह, त्यांचा देवापाशी लडिवाळ हट्ट, त्यांचे एरयेरीवर येणे,
इत्यादी साधनेच्या किंवा साक्षात्काराच्या पूर्वावस्थेतील विविध अनुभवांचे चित्तवेधक व करुणेने ओतप्रोत
भरलेले अभंग सर्वांनाच मोलाचे वाटतील असे आहेत. यानंतर तुकारामांना ईश्वर भेटला, त्यांचा अभंगसंग
जडला, जीवाशिवांचे आलिंगन झाले, शरीरसंबंधाची मिठी जडली, सगुण विठ्ठलाचे हृदयंगम दर्शन
झाले, त्यांच्या प्रेमाने व जवळकीने आयुष्य धन्य झाले. मनातील सर्व संशय फिटले, मन शांत झाले,
तन्मयता व तल्लीनतेचा उल्हास निर्माण झाला, ईश्वराच्या सहवासात निरनिराळ्या प्रकारचे अनुभव येत
राहिले, यासंबंधीचीही वर्णने अतिशय सखोल, भावपूर्ण व वाचकाचे चित्त उल्हसित करणारी आहेत.
तुकोबांच्या या आत्मानुभूतीपर अभंगांतच त्यांच्या पारमार्थिक अनुभवांचे सारसर्वस्व साठविले आहे.
सामाजिक उद्बोधन
अभंगाच्या दुसऱ्या विभागात तुकाराम महाराज ज्या संसारापासून दूर झाले, त्या संसार-
इतरांचा अधिक उन्नत स्वरूपाचा व्हावा म्हणून, समाजाकडे वळून त्यांनी अतिशय करून पथात
दोषांवर बोट ठेवून टीका करण्यास प्रारंभ केला. भोळ्याभाबड्या लोकांना दंभाच्या, धर्माच्या नावा-
खाली फसवणारे साधुसंत व ढोगी बुवा निर्माण झाले होते. नाना दैवते निर्माण करून वेड्यापायाडया

बावीस

मार्गांनी लोक अनाचारास प्रवृत्त झाले होते. टिळाटोपी करून, डोळे मिटून, समाधीचे नाटक करून
लोकांना फसवण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता. तुकाराम महाराजांनी या सर्व गैर-
प्रकारावर अतिशय कडक शब्दांत प्रहार केले आहेत.
तुकोबांच्या उपदेशाचे दुसरे अंग असे की, या भोंदू गुरूंच्या नादाने लोकही बिघडत चालले
होते. जे परमार्थाच्या मार्गात होते, त्यांचा मार्गच चुकला होता. भलत्याच फंदात ते अडकले होते, आणि
जे संसारात रमले होते, त्यांना एका संसाराशिवाय, पैशाशिवाय, बायकोशिवाय दुसरे समजेनासे झाले होते.
परद्रव्य व परनारी यांचा अभिलाष मोठ्या प्रमाणावर वाढला होता. लोक आपल्याच नादात, आपल्याच
गर्वाने, अभिमानाने केवळ विषयसुखात रमून गेले होते. नाना प्रकारची इंद्रियसुखे भोगण्यात त्यांना सारा
जन्म घालवावा असे वाटे. देवधर्माची, कुलधर्माची, संतांची, पवित्र स्थानांची मर्यादा सुटत चालली
होती. अशा बिघडलेल्या संसाराची विदारक शब्दचित्रे तुकाराम महाराजांनी काढलेली आहेत.
केवळ पैसा, इंद्रियसुख हेच एक ध्येय झाले, म्हणजे मग मनाचा तोल सुटतो. तृष्णेला व लोभाला
सीमा उरत नाही. मग कोणतेही पातक करण्यास लोक कचरत नाहीत, कोणत्याही अनाचाराचे त्यांना
वावडे उरत नाही. संसारात सदा सर्वकाळ आसक्त राहून लोकांनी ईश्वराचे नावच सोडून दिल्यामुळे
या एका आधारावर जे परस्परांचे नाते उभे असते, तेही मग विस्कटून जाते. दुसऱ्यांना त्रास देऊनच
स्वतःच्या सुखाची वृद्धी करण्याकडे व सर्व काही मलाच पाहिजे, या लोभाकडे माणसे लक्ष देतात.
तुकारामबुवांनी आपल्या उपदेशपर अभंगांतून या सांसारिक पतनाचेही बोलके चित्र उभे करून लोकांना
सावध केले आहे.

अभंगवाणीचे स्थूल स्वरूप
तुकाराम महाराजांच्या अभंगांचे आत्मपर किंवा अनुभूतीपर आणि उपदेशपर असे दोन प्रमुख
विभाग असले तरी, या प्रत्येकाचे आणखी उपविभाग होण्यासारखे आहेत. शिवाय शिव, राम, हनुमंत,
गजेंद्र, एकादशी, बाळक्रीडा, गौळणी, विराण्या अशा विविध विषयांवर त्यांची अभंगरचना आहेच.
संतमाहात्म्य, पंढरपूरवर्णन, कीर्तनमाहात्म्य, नामाची महती, याही विषयांवर तुकोबांचे पुष्कळच अभंग
उपलब्ध आहेत. सद्गुरूंची कृपा, स्वतःच्या दंभित्वाचा निषेध, मंबाजीबुवाकडून विरोध, लोहगावचा
वेढा, चिंचवड येथील चिंतामणी देव यांच्याशी संभाषण, स्वतःच्या वैराग्यप्राप्तीचा क्षण, कवित्वाची
प्रेरणा इत्यादी विविध अशा प्रासंगिक विषयांवरही बुवांनी रचना करून स्वतःच्या आयुष्यातील अनेक
महत्त्वाच्या घटनांचे उल्लेख केलेले आहेत. याशिवाय वासुदेव, आंधळा, पांगळा, डाका, गाधळ, लळिता,
फुगडी इत्यादीसारखी भारुडात्मक अभंगरचनाही तुकाराम महाराजांची आहे.
तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचे हे असे स्थूल व बाह्य स्वरूप विविधतेने नटलेले दिसते.
प्रत्येक अभंग सुटा खरा, स्फुट खरा, पण काही अभंगांचे गटही काही गाथांत एकत्र आलेले दिसतात.
विचारांचे, भावनांचे, तत्त्वांचे एखादे सूत्र त्या त्या गटात दिसतेही. परंतु यासंबंधी निश्चित असा शोध
अजून झालेला नाही. तुकारामांच्या अभंगांचे पुढे संपादन करणाऱ्यांनी नामपर, संतपर, करुणापर,
प्रेमळकलहपर, सलगीपर अशी वर्गवारी करून काही व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यावरून
तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंग स्रवले, ते कोणत्या क्रमाने व कोणत्या प्रसंगांनी याचा बोध होणे
दुरापास्त होते.

'तुका झाला पांडुरंग'
तुकोबांच्या अभंगवाणीचा एवढा बाह्य परिचय करून घेतल्यानंतर तिच्या अंतरंगाचे तेजस्वी
दर्शन जवळ जाऊन घेण्यासारखे आहे. मानवी मन किती आतुर, किती कोमल, किती भावप्रवण होऊ
शकते, याची उत्तम उदाहरणे तुकारामबुवांच्या आत्मपर अभंगांतून आपणास मिळतील. वैराग्यामुळे,

तेत्रीस .

संसाराच्या उदासीनतेमुळे तुकोबांचे लक्ष विठ्ठलाकडे वळले हे खरेच आहे. संसारातील व व्यवसायातील
आपत्तीमुळे तुकोबांना एकान्ताचा वास रुचला, हेही खरे. घरी दारी त्याची विटंबना होत राहिली
म्हणून त्यांचे चित्त विठ्ठलपायी दृढ झाले हे खरेच. पण या बाबतीत आणखी सूक्ष्म विचार व्हावयास
हवा. प्रसंगी तुकारामबुवांनी वैतागाचे, दुःखाचे उद्गार काढले आहेत. कर्कशा असणाऱ्या बाईलीचे त्यांनी
आभार मानले आहेत; दुकानाचे दिवाळे निघाले, बरे झाले, असेही त्यांनी म्हटले आहे. पण केवळ या
सांसारिक व व्यावसायिक आपत्तीमुळेच तुकोबा श्रेष्ठ पदवीस चढले, असे मानणे बरोबर होणार नाही.
संसारातील आपत्ती सर्वांनाच असतात; व्यवसायातील चढउतारही सर्वांनाच भोगावे लागतात. वांझाड
बायको पुष्कळांच्या नशिबी असते. पण या अवस्थेत प्रत्येक ठिकाणी तुकोबा निर्माण होत नाहीत.
'संसाराच्या तापें तापलों मी देवा' येथपासून 'तुका झाला पाडुरंग' येथपर्यंतचा त्याचा जो प्रवास
आहे, त्याचा अधिक बारकाईने विचार व्हावयास हवा. तुकोबांच्या मनाची वृत्ती, त्यांची घरची परंपरा,
घराण्यातील विठ्ठलाचे अनुसंधान, त्यांची साधना, त्यांचे नामसंकीर्तन, त्यांचा एकान्तवास, त्यांची पूर्व-
पुण्याई, ज्ञानेश्वरनामदेवांशी त्यांचे जडलेले नाते, या सर्वांचा परिपाक म्हणजे तुकाराम महाराजांचे
दिव्य असे पारमार्थिक जीवन होय. सांसारिक दुःखे व व्यावसायिक अपयश हे वरवरचे एक निमित्त होय.

अभंगवाणीचे अंतरंग

यान पार्श्वभूमीवरून महाराजांच्या अभंगवाणीचे अंतरंग पाहावयास हवे. त्यांच्या दिव्य
अभंगवाणीच्या गाभाऱ्याचे दर्शन, हा आजही एक अलौकिक व चैतन्याने रसरसलेला अनुभव आहे.
त्याच्या सजीव दर्शनाने आजही माणसाचे डोळे पाणावतात, हृदय भरून येतं, सात्त्विकतेने चित्त प्रका-
शित होते, भगवंताच्या रूपसौंदर्याने डोळे दिपून जातात; त्याच्या वत्सलतेने व भक्ताच्या आर्ततेने
अभंग वाचणाऱ्याच्या चित्तावरही तेच संस्कार उमटतात. तुकोबांनी जे पाहिले, जे भोगले, त्याचा जसाच्या
तसा ठसा त्यांच्या अभंगवाणीवर उमटलेला असल्यामुळे वाचकासही ती अनुभूती सहजासहजी ध्यानात
येऊ शकते. सोपे सोपे शब्द व प्रसादपूर्ण अशी रचना या गुणांमुळे बुवांचे कित्येक अभंग आजही हृद-
याचा ठाव घेऊन जातात. तुकारामबुवांच्या भावविश्वाचे या मनोगभाऱ्याचे अलौकिक दर्शन आजही
अनेकांच्या चित्तवृत्ती उल्हसित करील असेच आहे.

लालचावलेले होते याच दर्शनसुखाची गोडी त्यांना अवीट वाटत होती हेच 'सकळ मंगळाचे सार ।
मूळ सिद्धीचे भांडार' त्यांना वाटत होते याच्या दर्शनाने मनाची अवस्था कशी होऊन जाई ?
तुकाराम महाराजांनी वर्णन केले आहे '
रूपीं गुंतले लोचन । पायीं स्थिरावले मन । देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ।
फळो नेदि सुख दुःख । सान हरपली भूक । तुका म्हणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥
विठ्ठलाशी लडिवाळपणा
या विठ्ठलाच्या रूपाचा वेध त्यांना निरंतर असे त्याच्या दर्शनसुखासाठी ते उत्सुक असत.
त्याच्या अंगाखांद्यावर खेळावया मिळावे म्हणून त्यांची तळमळ असे कधी कळवळून ते या विठाई
माउलीला हाक मारतात कधी तिला प्रश्न विचारतात, कधी तिच्यावर रुसतात, कधी प्रेमाने तिच्याशी
भांडतात, कधी लडिवाळपणे ते आवतीभोवती वावरतात. कधी तिने आपणाकडे लक्ष द्यावे म्हणून
इतरांचे दाखले ते देतात आपल्या मुलाचा सांभाळ कसा करावा, हे काही आईला शिकवावे लागत
नाही ती त्याला गोड गोड पदार्थ न मागता देते, त्यास लागलेली भूक तिलाच अगोदर समजते आणि
मग ती 'खेळाया गुंतले उमगूनी आणी । बैसोनिया स्तनीं लावी वळें' त्याच्या दुःखाने ती कष्टी होत
असते या मातेप्रमाणेच ही विठाई माउली तुकोबांना वाटत होती ते पुन पुन कळवळ्याने म्हणतात,
'पांडुरंगे ये यो पांडुरंगे । जिवाचे जीवलगे ये यो पांडुरंगे । भक्ताच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आवरणूपी
कारणे जन्म दाहा घेतले' आणि मग आता माझ्यासाठी तू का येत नाहीस असा त्यांचा प्रश्न असे.
'मायें मोकलिले कोठें जावे बाळें?'

[Header] पंचवीस

पांडुरंगाने मनात न आणता आपण पातकांची रास असलो तरी, त्याने आपल्यावर कृपा करावी, असे
त्यांना वाटते या परमेश्वराने जर आपणास सांभाळिले नाही, तर मग आपले पालन तरी कोण कर-
णार ? आम्ही मग आमचे सुखदुःख कुणास सांगावे ? आमच्या तापाचा परिहार कोण करणार ?
आमची तहानभूक कोण निवारण करणार ? आम्ही सत्ता तरी मग कुणावर करावी ? कोण आम्हांला
साह्य करणारे होईल ? अशा प्रकारचा आक्रोश करुन बुवांचा कंठ क्षुब्ध होऊन जातो 'तुजलागी माझा
जीव झाला पिसा । अवलोकितो दिशा पांडुरंगा । प्राण हा विकल होय कासाविस । जीवनावेग मत्स्य
तयापरी ' अशी त्यांची अवस्था करुणास्पद होऊन गेलेली असते

आपण परदेशी झालो आहांत, अन्यायी आहोत, अवगुणी आहात, पातकी आहात, पण या
विठाईमाउलीने हे सर्व विसरून आपला अंगीकार करावा, असा त्याचा आग्रह असे या विठोबाने
आपणावर कृपा कशी करावी ? नुसते दर्शन देऊन नव्ह, नुसता मस्तकावर हात ठेवून नव्ह, तर
महाराजांच्या मुखातून त्याची ही भूक ऐकण्यासारखी आहे
भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥
देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें ही दातारें निववावीं ॥
अमृताची दृष्टी घालूनीया वरी । शीतल हा करी जीव माझा ॥
धई उचलौनि पुसे तानभूक । पुसो माझें मुख पीतांबरें ॥
मुखावनी माझेधरी हनुवटी । ओवाळुनी दिठी करुनी सांडी ॥
तुका म्हणे जे बाप्पा अहो विश्वभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥

... सदवीस ...
केली नाहीस तर मी काय करीन ? तुकारामबुवानी एक गोड धमकी विठ्ठलालाच दिलेली आहे. त्यानी
स्पष्टपणे सागितले की, 'संतासी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यासी सांगीन ॥, घेईन डांगोरा
तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा । तुका म्हणे आम्ही राहिलों मरोनि । तूं का होसी धनी
निमित्ताचा ।' कारण देवा, आमच्यामुळे तुला मोठेपणा आला आहे, हेही तू विसरला आहेस. अनाथाचा
नाथ तू आहेस, हेही तुझ्या ध्यानात नाही. कारण तू माझ्यावर कृपाच करीत नाहीस. खरे म्हणजे देवा,
आम्हीच तुझे दैवत आहोत.
जेणे तुज झालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्हीं ॥ १ ॥
नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ २ ॥
अंधारें दीपातें आणिली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥ ३ ॥
धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखी काय चाडा जाणार्यें तें ॥ ४ ॥
अमृतासी मोल विषाचिये गुणें । पितळें तरी सोनें उंचावेच ॥ ५ ॥
तुका म्हणे आम्ही असोनियां जाण । तुज देवपण आणिर्येले ॥ ६ ॥
'दिवाळीच्या मूळा लेकी आसायली'
अशा प्रेमाचे भाडण तुकोबासारख्या श्रेष्ठ भक्तालाच शोभून दिसते तेच मोठ्या धिटाईने
पाडुरंगाचा पदर धरून विचारू शकतात, 'धरुनि पालव असुडीन फरें । मग काय बरे दिसें लोकीं ।'
एकदा परमेश्वराची शोभा करायची ठरविले तर, मग कुणाची अब्रू बाहेर येईल? कुणाचा लौकिक
बिघडून जाईल ? समर्थांचे बालक जर केविलवाणे दिसले तर लोक कुणाला हसतील ? म्हणून देवा, तू
मला भेट द्यावीस 'कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावीं हरी । ठेविले चरण दोन्ही
विटेवरी । ऐसें रूप हरी दार्वी डोळा । कटीं पीतांबर फास मिरवली । दाखवीं वाहिली ऐसी मूर्ती।'
कारण देवा, याच भेटीसाठी आता प्राण कंठाशी आले आहेत रे. किती दिवस वाट पाहावयाची ? तुझ्या-
शिवाय मला दुसरे सोयरे कोण आहेत ? तुझ्या भेटीशिवाय आता मला दुसरे काहीच सुचत नाही देवा,
'कन्या सासुऱ्यासी जाये । मागे परतोनि पाहे । तैसे जालें माझ्या जीवा । केव्हां भेटसी केशवा ?' देवा,
मला भेट देशील तर तुझे काय नुकसान होने रे ? 'काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक
दोन । काय तुझें रूप घेतों मी चोरूनि । त्या भेणे रूपोनि राहिलासी । काय तुझें आम्हां करावें
वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ।' असा दिलासा तुकोबानीच विठ्ठलला दिला आहे ! कसेही करा
आणि मला एवढा येऊन देवा, भेट ना, असा सारखा टाहो तुकाराम महाराज फोडताना दिसतात.
तळमळून एका अभंगात ते म्हणतात-
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥
पूर्णिमेचा चद्रमा चकोरा जीवन । तैसे माझें मन वाट पाहे ॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहातसे वाटुली पंढरीची ॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परी माउलीची ॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवुनि श्रीमुख दावी देवा ॥

सत्तावीस
पाणी आणून विनवितात, 'घाव घाली आई । आता पाहातेस काई ॥ धीर नाहीं माझे पोटीं । झालो
वियोगें शिपुटी ॥ करावें शीतल । बहु झाली हळहळ ॥ तुका म्हणे डोई । कई ठेवीन हे पायीं ?' या
मळमळयाने तुकोबाचा जीव फुटून निघत असे कधी त 'पढरीची वाट पाहे निरंतर । निढळावरी कर
ठेवूनिया' असे म्हणतात, तर बधी 'तुका म्हणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवा पाडुरंगा ?'
म्हणून अधीरता दाखवितात 'डोळिया पाझर कठ माझा दाटी । येई वो येई भेटी पाडुरंगे । बहु दिस
टाकिले निरास का केले । कोठे वो गुंतले चित्त तुझें ? । बहु घडा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव
माझा कंठीं ।' अशी अवस्था त्याच्या मनाची होऊन जात असे त्याचा जीव तृषाक्रान्त हात असे 'करावा
वर्षाव । तृषाक्रान्त झाला जीव' असे त्यांनी म्हटले आहे
प्रकाशाचा दिवस
अशा तळमळीतून एखादा दिवस मग प्रकाशाचा उगव शुभ शकुनाची खूण पटे संताचा
समागम होई श्रीविठ्ठलाचे चरण दिसताच सारी व्यथा दूर होऊन जाई 'शुभ झाल्या दिशा अवघाचि
काळ । अशुभ मंगळ मंगळाचे अशी स्थिती होत असे 'ढवळले तदाकार । अंधार जो निरसला । रूपो
जातां नाहीं ठाव । प्रकट आहे पसारा ।' असा अनुभव त्याना मध्येच येत असे. श्रीहरीच्या भेटीन
मन तृप्त होऊन जाई सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे, अशी जाणीव दाटून येई 'आत हरि बाहेर
हरि । हरिनें घरीं कोष्टिले' अशी सर्वात्मकता अनुभवास येत असे 'जेथें जातों तेथें तू माझा सागाती ।
चालविसी हातीं धरूनिया । चालीं वाटे आम्हीं तुझाचि आधार । चालविसी भार सर्व माझा' अशी
जवळीव पांडुरंगाची पटत असे 'सुखाचें ओतले । दिसे श्रीमुल चांगलें ।', 'मनें धरिला अभिलाष । मिठी
घातली पायांस । होता दृष्टा-दृष्टी । ताप गेला उठाउठी ॥ तुका म्हणे झाला । लाभैं लाभ दुनावला'
अशा भाषेत मग विठ्ठलभेंटीचा लाभ झाल्यावरची तृप्ती वर्णन केली जात असे 'देहभान पालटली काया ।
पडली छाया ब्रह्मची ॥ जोडिले हे न सरें धन । अविनाश आनंदघन ॥ अमूर्त मूर्ति मधुसूदन । सम-
चरण देखियेले ॥'
'हिरा शोभला कोदणीं'
या भेटीच्या आनंदात व संतसहवासात तुकोबाना आकाश ठेंगणे हाने त्याची दैन्याची अवस्था
संपते सर्व संशय फिटतान शंका निवारल्या जातात 'दैन्य गेले हरली चिंता । सदैव आता यावरी'
चिंतामुक्त अवस्थेचे वर्णनही तुकोबानी पुष्कळ अभंगात केलें आहे या आनंदाच व स्वसुखाचे चित्तवेधव
वर्णन तुकाराम महाराजानी एका अभगात केले आहे

सर्वत्र त्याचीच पावले दिसू लागली 'देव झाले अवघे जन । दोषगुण हरपले ।' अशी अवस्था होऊन
गेली 'आमुचा स्वदेश । भुवनत्रयामध्ये वास' अशी विशाल दृष्टी होत राहिली 'जेथे देखे तेथे तुझांच
पाऊलें । विश्व अवघें कोंदाटलें ।' ईश्वराच्या भेटीची, साक्षात्काराची, आत्मानुभूतीची बोलकी व
सजीव चित्रे, तुकाराम महाराजांच्या अभंगांतून स्पष्टपणे जाणवतात एकदा त्यांनी म्हटले आहे, 'माझे
माथा तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥ ऐसी पडियेली गाठीं । शरीरसंबधाची मिठी ॥'
अशा प्रकारे स्वानंदाचा लाभ तुकारामांना झाला ईश्वराची भेट झाली सर्वोत्तम सुखाचे
साधन हाताशी आले ते त्याच्या स्वरूपाशी जाऊन भिडले तो व आपण एकच, ही अनुभूती आली
आत्मा-परमात्मा, जीवशिव, याच्यातील भेद संपला पुढे काय ? ज्या अद्वैताच्या अनुभूतीसाठी तुकाराम
महाराजांचा जीव तळमळत होता, ती प्राप्त झाली ईश्वर अगदी जवळून भेटला दूरत्व संपले दुजाभाव
नाहीसा झाला अणुरेणूहूनही लहान असणारा तुका आकाशाएवढा झाला परंतु पुढे काय ? जीविताची
हीच सार्थकता असल्यावर पुढे काय ? हा प्रश्नच निरर्थक म्हणावयाचा की काय ?
'मग या सतसंगा पाहूं कोठें ?'
परंतु संतांच्या पारमार्थिक जीवनात याही प्रश्नास महत्त्व आहे आत्मस्थितीचे ज्ञान झाले,
ब्रह्माची अनुभूती आली, मोक्षसुखाची चव सापडली म्हणजे मग सर्व संपले की काय ? वैकुंठास
किंवा मोक्षास पोचल्यावर मग काय उरणार ? मुक्ती मिळाल्यावर मग आणखी काय हवे ? अद्वैताच्या
अनुभूतीपेक्षा आणखी श्रेष्ठ काय आहे ? तुकारामबुवांनी उत्तर दिले आहे, या ब्रह्मज्ञानापेक्षाही
भक्तीची आर्तता श्रेष्ठ आहे तू व मी एकच या भावापेक्षा, तू देव, मी भक्त, हे ऐक्यभावावरचे दुजेपण
अधिक गोड व रमणीय वाटते त्यांना ऐक्यभावाचे ज्ञान झाल्यावर, विठ्ठलाशी मीलन झाल्यावर, वेगळे
होता त्यावेळच्या सुखाची आठवण त्यांना होते सर्व एकच आहे अशा अनुभूतीत स्तवन कुणी कुणाचे
करायचे ? कुणी कुणाच्या पायावर डोके ठेवायचे ? आर्त वाणीने पुकार कुणी करायचा ? कुणी कुणास
दुःख सांगायचे ? कुणी कुणाची सेवा करायची ? कुणी कुणाचे रक्षण करायचे ? कुणी कुणावर
रुसायचे ? कुणी कुणाशी भांडायचे, लटक्या भावाने रागवायचे ? या मी-तूंपणाच्या भावातील
गोडीचे सुख मग संपलेच की काय? मुक्तीच्या स्थितीत, ऐक्यभावात, मोक्षसुखात तळमळ नाही, विरह
नाही, आर्त वाणी नाही, स्मरण नाही, उत्कंठा नाही, हुरहुर नाही, आणि म्हणून या अवस्थेतील सुखही
नाही संताची संगत नाही, की डोळे भरून सुंदर रूप पाहणे नाही म्हणूनच एकदम नामदेवतुकरामा-
सारखे संत बोलून जातात, 'झणी मुक्तीपद देशी पांडुरंगा । मग या सतसंगा पाहू कोठें ?'

एकोणतीस
अभंग ईश्वराच्या साक्षात्काराच्या आधीचे असतील, अस निश्चयान म्हणता येत नाही कारण भक्तीच्या
सुखासाठी, प्रेमाच्या भोगासाठी, नाना प्रकारचे भाव थोर भक्त पुन पुन व्यक्त करीत असतात
'मी भक्त तू देव ऐसे करी'
आणि याचसाठी पुष्कळ ठिकाणी त्यानी मुक्तीची किंवा ब्रह्मज्ञानाची अथवा आत्मस्थितीची
पर्वा केलेली नाही ' नसो ब्रह्मज्ञान आत्मस्थिति भाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥ दावी रूप मज
गोपिकारमणा । ठेवू दे चरणावरी माथा । पाहीन श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंवलोण उतरेन ।
पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकान्त सुखगोष्टी' अशा प्रकारे सगुणाशी प्रेम वाढवावे, सगुणरूप
डोळे भरून पाहावे, चरणावर माथा ठेवावा, आलिंगन द्यावे, जीव ओवाळून टाकावा, काही मनातील
हितगुज करावे, एकान्तातील सुखगोष्टी कराव्यात व त्या प्रभूच्या नामस्मरणात आणि सत्सगात दग
होऊन जावे, पण हे सुख आत्मस्थितीच्या भावात, ब्रह्मपदात अथवा मोक्षस्थितीत नसले म्हणूनच
तुकाराम महाराज म्हणतात, 'सांडुनि सुखाचा वाटा । मुक्ति मागे तो करटा।' भक्तिरसाच्या गोष्टीत
मोक्षसुखास तुच्छ लेखिलेले असून 'अवघाचि ससार केला ब्रह्मरुप । विठ्ठल स्वरूप म्हणोनिया' हा
अनुभव अधिक श्रेष्ठत्वाचा त्यानी मानला आहे मुक्त तरी कुणास म्हणायचे ? ज्याला बंधनच नाही
त्याला कोण मुक्त करणार ? यासाठीच तुकाराम महाराज म्हणतात, 'देवा ऐक हे विनती । मज नको
रे हे मुक्ती' मग काय हवे ? त्याचेही उत्तर असे की, 'आत्मस्थिती मज नसो हा विचार । देई निरंतर
चरणसेवा' दया, तुझ्या पायाची सेवा, तुझ्या मुखाचे दर्शन, तुझ्या नामाचे भजन, मताचा सहवास,
अखंड तुझे अनुसंधान, याखेरीज मुग दुसरे कुठले रे ? म्हणूनच तुकोबानी विनविले आहे, 'मोक्ष तुमचा
देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा । मज भक्तीची आवडी । नाहीं अत्तरी ते गोडी' मोक्ष, वैकुंठ, मुक्ती,
ब्रह्मस्थिती याची थोरवी कोठवर आहे ? जोपर्यंत पंढरपूरचे वैभव पाहिले नाही तोपर्यंत, जोपर्यंत
पांडुरंगाचे दर्शन झाले नाही तोपर्यंत या सत्ताचे सर्वसुख म्हणजे परपूराच्या विठ्ठलाचे पाय हेच होय.
तुकाराम महाराजांनी म्हटले आहे,
जववरी नाहीं देखिली पंढरी । तववरी थोरी वैकुंठांची ॥
मोक्षसिद्धी तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीन रूप ॥
वृंदावन सडे चोक रगमाळा । अभिनव सोहळा घरोघरीं ॥
नामघोष कथा पुराण कीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंगा ॥
सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्मा तें केवळ नांदतसे ॥
तुका म्हणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरी ॥

तीस
भाऊ पुंडलिक मुनि । चंद्रभागा आमुची वहिणी ॥ तुका जुनाट मिरासी । ठाय दिला पायापाशीं ' या
पंढरपुरास केवढे सुख आहे ! हे भूवैकुंठच आहे येथे पाऊल ठेविले की, 'सोनियाचा दीन' उगवतो
आनंदाचा गजर होतो संतसज्जनाची संगत मिळने. विठ्ठलास क्षेम, आलिंगन देता येते. सखा मायबाप
प्रत्यक्ष भेटतो 'माउली वोळली प्रेमपान्हा' असा अनुभव येतो
जे दोष इतर कोणत्याही तीर्थास गेल्याने जात नाहीत, ते पंढरपूर येथील वास्तव्याने दूर
होतात, असे तुकाराम महाराजांनी सांगितले आहे कारण पंढरपूर हे 'सकळ तीर्थांचे माहेर । भूवैकुंठ
निर्विकार । होतो नामाचा गजर । असुर काळ कापतो । नाहीं उपमा द्यावया । समतुल्य आणिक ठाया ।
धन्य धन्य जया । जे पंढरपूर देखती ' या क्षेत्राचे माहात्म्य मराठी संतांनी परोपरीने गाइले आहे
' ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे' असा या स्थानाचा महिमा आहे म्हणूनच तुकाराम महाराज
म्हणतात, 'तीर्थे केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥ जळो त्याचे जालेपण । न देखेचि समचरण ।'
या पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाचे समचरण पाहून मन तृप्त होते 'शीतळ हा पंथ माहेरची वाट । जयळीच
नीट सुखरूप ॥' हा पंढरपूरचा देव 'कृपावंत होय नामें एका' अशा थाटात तुकाराम महाराजांनी या
क्षेत्राचे, विठ्ठलाचे, साधुसंताच्या संगतीचे, नामस्मरणाचे महत्त्व परोपरीने सांगितले आहे
'ते हे जोडी संतपाय'
संतांची संगत तर तुकोबांना देवापेक्षाही प्रिय वाटते कारण संत हे देवाचेच रूप त्यांनी
मानले आहे या संतांचे उपकार किती सांगावेत ? नित्य मनास जागृती देण्याचे कार्य ते करीत
असतात त्यांच्यापायी जीव ठेविला तरी तो थोडा होईल धेनूच्या चित्तात जसे वत्स असते, तसे हे
संत माझी काळजी घेतात, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे संत हे त्यांना खरे सगेसोयरे
वाटतात 'दसरा दिवाळी तोचि सण आम्हा । सखे संतजन भेटतील' असा आनंद संतभेटीमुळे त्यांना
होत असतो या संतांच्या पादुका घेऊन मी नृत्य करीन, असे त्यांनी म्हटले आहे 'संत मार्गी चालती ।
त्याची लागे मज माती' अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे 'संताच्या घरांचा दास मी कामारी ।
दारीं परवरीं लोळतसे' अशी त्यांची भूमिका होती 'सर्व सुखें आजी एथेंचि वोळलीं । संतांची देखिलीं
चरणार्वुजें' अशी त्यांची निष्ठा होती त्यांची संतांना नेहमी प्रार्थना असे की, 'तुमचिये दासीचा
दास करुनी ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज । आता तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥ गोमटें
तें करा माझें । भार ओझें तुम्हासी,' कारण आपले फार मोठे भाग्य म्हणून संतांचे हे पाय आपणास
पाहावयास मिळाले, असे त्यांना वाटे 'भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय । येथूनिया तुटो माया ।
मरणापासुनि सर्वथा ॥ होई बळकट । माझ्या मना रे तू धीट ।' अशा शब्दात संतकृपेने आपल्या
भाग्याचा उदय झाल्याचे तुकोबांनी सांगितले आहे
कीर्तनातील ब्रह्मारस
संतसहवासाप्रमाणेच नामस्मरणाची व कीर्तनाची, भजनाची महती तुकोबांनी वारंवार वर्णन
केलेली आहे 'नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींचीं' म्हणून त्यांनी या साधन-
मार्गांची सुलभता स्पष्ट केली आहे कारण या मार्गात 'न लगती सायास जाये धनान्तरा । सुखें
येतो घरा नारायण ॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥ राम कृष्ण हरी
विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ ॥ याविण असता आणिक साधन । वाहत्से आण विठोबाची ॥'
याप्रमाणे तुकोबांनी सर्व लोकांना नामसंकीर्तनाचे एक सुलभ साधन उपलब्ध करून दिले 'नाम गोड
नाम गोड । पुरे कोड सगळही' अशी या नामाची महती आहे या नामामुळे व भजनकीर्तनाच्यामुळे

... एकतीस ...
तुकाराम महाराजांनी ईश्वराची जवळीक सर्वांच्या घरीच आणून उभी केली. कारण 'कथा देवाचें हें
ध्यान । कथा साधन मंडण ॥ कथे ऐसें पुण्य । आणिक नाहीं सर्वथा ॥ ऐसा साच खरा भाव । कथे-
माजी उभा देव ।।' एवढी महती कथाकीर्तनाची त्यांनी सांगितली आहे. या हरिरूपेत देव, भक्त
आणि नाम असा त्रिवेणीसंगम असतो. 'तीर्थे तया ठायां । येती पुनीत व्हावया' इतका या कथेचा
महिमा तुकारामांच्या मते मोठा आहे. या कीर्तनातील सुख किती मोठे आहे ?
सोपें धर्म आम्हां सांगितलें संतों । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा ॥
समाधीचें सुख सांडा ओवाळून । ऐसा या कीर्तनीं ब्रह्मरस ॥
कथा ज्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी आपल्या दूतांनी जाऊ नये, अशी यमाची त्यांना
आज्ञा असल्याचे तुकोबांनी सांगितले आहे. कीर्तन ही खरीखुरी व थोर दर्जाची समाधी असून सर्व
प्रकारची सुखे या कीर्तनात प्राप्त होतात
जप तप ध्यान नलगे धारणा । विठ्ठल कीर्तनामाजी उभा ॥
राहे माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥
कीर्तनीं समाधि, साधन तें मूळ । राहतील धारा धरोनियां ॥
तुका म्हणे मुक्ति हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी रिद्धीसिद्धी ॥
'उरलों उपकारापुरतां'
अशा प्रकारे तुकोबांची अभंगवाणी विठ्ठलप्रीतीने रंगलेली आहे. तीच स्वानुभूतीचे तेज आहे.
भक्तीचा जिव्हाळा आहे नामसंकीर्तनाचा, संतमाहात्म्याचा, विठ्ठलरूपाचा, व भक्तितत्त्वाचा जयजयकार
आहे या अतिशय पावन व परम मंगल अशा वाणीने समकालीन नव्हे, तर पुढेही अनेक शतके उपयुक्त
होईल, अशा उपदेशामृताचा वर्षाव केला आहे. आपली वाणी ही ईश्वराची वाणी असून आपण त्याचेच
कार्य करावयास आलो आहोत, असा सार्थ अभिमान व विश्वास त्यांना वाटत असे. त्यांच्या उपदेशात
ईश्वरी शक्तीचे तेज व स्वजनाविषयी तळमळ असल्यामुळेच त्याचा प्रभाव आजही पडण्यासारखा आहे.
'धर्मचें पाळण । करणे पाषांड खंडण ॥ हेंच आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥' या एका
कार्यासाठी आपला अवतार आहे असे त्यांनी म्हटले आहे 'आम्ही वैकुंठनवासी । आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ॥ झाडूं संतांचे मारग । आदरानीं भरले जग । उच्छिष्टाचा भाग ।
शेष उरला तो सेवूं ॥ अर्थ लोपलीं पुराणे । नाश केला शब्द ज्ञानें ॥ विषयलोभी मनें । साधनें बुडविलीं ॥
पिटूं भक्तीचा डांगोरा । कळी काळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ॥' या एकाच
कार्यासाठी तुकारामबुवा स्वतःस साक्षात्कार झाल्यानंतरही उरले होते 'तुका म्हणे आतां उरलों उप-
कारापुरता ॥' असे त्यांनीच म्हटले आहे. 'आपण जेवुनी जेववी लोकां । संतर्पण करी तुका' ही
त्यांची भूमिका होती. लोकांना सन्मार्गास लावून त्याचे सर्वतोपरी कल्याण साधणे, एवढेच कार्य त्यांना
आता उरले होते. या साठी 'तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे । नाहीं भीड भार । तुका म्हणे
सांगा थोर' अशी आपली भूमिका निर्माण करावी, या साठी ते 'कांस घालोनि बळकट । आलो कळि-
काळाशीं नीट' अशा भूमिकेवरून लोकांना म्हणत आहेत; 'या रे या रे लहान थोर । याती भलते
नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी' कुणासही चिंता उरू नये, या भूमिकेवरून त्यांनी
लोकांना उपदेश केला. तो आजही कितीतरी अधिक अर्थाने उपयुक्त आहे. पराकोटीची निवृत्ती कोण-
त्याही संताने शिकविली नाही. पण केवळ धनदौलत व स्वतःची बायकामुळे, यातच रमणाऱ्या माणसाची
गयही त्यांनी केलेली नाही. माणसाच्या जन्मास येऊन काय मिळवायचे, हे फक्त तुकाराम महाराजांसारखे
सद्गुरुच सांगू शकतात.

.. बत्तीस .
शाश्वतचा विसावा
अशी ही पावन व मगंलकारी तुकोबाची वाणी ही नारायणाच्या कृपेने रगलेली आहे ती
देवाचा निरोप सागणारो आहे खऱ्याखोट्याचा निवाडा करणारी आहे वेदाचा व पूर्वपरंपरेचा अर्थ
यथार्थत्वाने सागणारो आहे तिला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आहे परतत्त्वाच्या स्पर्शाने ती सतेज बन-
लेली आहे ईश्वरी प्रेमाने ती लडिवाळ व कमालीची रसाळ झाली आहे तिला अमृताचे माधुर्य आहे,
चंद्रिकेची शीतलता आहे. तिला चंदनाचा सुगध आहे, तिला विठ्ठलरूपाचा स्वाद आहे 'तुका म्हणे चवी
आले । जें कां मिश्रित विठ्ठले,' तुकोबाचे सर्व जीवनच विठ्ठलस्पर्शाने पावन झालेले होते त्याची शाश्वत
टिकणारी अशी ही अभंगवाणी, आजच्या पडत्या काळात, घाईगर्दीच्या काळात, तीव्र जीवनकलहाच्या
काळात, अशांततेच्या काळात, धामधुमीच्या व क्वचित प्रसंगी अराजकाच्या काळात, माणसाच्या मनास
सावरणारी आहे, धीर देणारी आहे तिच्या सावलीतच माणसाचे तप्त मन आजही विसावा घेऊ शकेल,
आजही त्यास अलौकिक सुखाचे व आंतरिक समाधानाचे मार्ग स्पष्टपणे दिसतील ते तुकाराम महारा-
जाच्या या वाणीच्या सौम्य व शीतल प्रकाशातच

॥ श्रीविठ्ठलाय नमः ॥
॥ श्रीनिवृत्तिनाथाय नमः ॥ श्रीज्ञानेश्वराय नमः ॥
॥ श्रीराघवचैतन्यश्रीकेशवचैतन्य ॥
॥ श्रीबाबाचैतन्यसद्गुरुभ्यो नमः ॥
मंगलाचरण-अभंग ६.
१ समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥ १ ॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ २ ॥
ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित' क्षणीं जडो देसी ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हा वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - समचरण- एकसारखी पावले, साजिरी-शोभिवंत, वृत्ति-अंतःकरणाची प्रवृत्ती,
चित्ताचे लक्ष, न लगे-लागत नाहीत, मायिक-डोळ्यांना दिसणारे, भासमान होणारे, परंतु वस्तुत नाशवंत वा
अशाश्वत असणारे, आर्त्त-इच्छा, आसुसलेली वृत्ती, ब्रह्मादिक-ब्रह्मलोक वगैरे, पदे-स्थाने, ठिकाणे, शिराणी-कळस,
शेवट, परिणाम क्षणीं-नको ( नयापारांत अप ) वर्म-मुख्य रहस्य, कर्मधर्म-कर्म आणि धर्म किंवा कर्ममूलक
धर्म, नाशवंत-नाश पावणारे
अर्थ - विटेवरील एकसारख्या पावलाकडे ज्याची दृष्टी लागली आहे, अशा सुशोभित मूर्तीकडे हे हरी,
माझ्या अंतःकरणाची प्रवृत्ती दृढ होवो १ याखेरीज दुसरे काही मायिक म्हणजे दृष्टीस मात्र दिसणारे पण वास्तविक-
पणे नसणारे असे पदार्थ मला नकोत; देवा, या पदार्थांवर माझी इच्छा कधीही जडू नये २ ब्रह्मलोक, विष्णूलोक,
इत्यादी ठिकाणे आहेत ती सर्व परिणामी दुःख देणारी असल्यामुळे त्या ठिकाणी माझ्या चित्तास लोभू देऊ नकोस ३
तुकाराम महाराज म्हणतात की कर्ममूलक असे जे जे नाना धर्म आहेत त्यांचे रहस्य आम्हास समजले आहे ते
सर्व नाशवंत असून तुझे रूप तेवढे शाश्वतवे आहे ४
विवरण -श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेतील पहिले सहा अभंग मंगलाचरणात्मक आहेत कोणत्याही
ग्रंथाचा आरंभ मंगलाचरणात्मक असावा असा रिवाज भारतीय कविमप्रदायात पुरातन काळापासूनचा आहे संस्कृत
साहित्यशास्त्रकारांनी मंगलाचरणाचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत आशीरूप, नमस्क्रियारूप, व वस्तुनिर्देशरूप
१ तेथें चित्त क्षणी