सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

सार्थ तुकारामगाथा ४४५
शब्दार्थ व टीपा :- रया-रुईची झाडे, कामधेनु-इच्छिलेली वस्तू देणाऱ्या गाई
अर्थ :- रुईची झाडे, बाभळींची झाडे हे काही कल्पतरु नव्हेत. त्यांच्यापासून इच्छिलेले फळ कधी प्राप्त
होणार नाही. १ सर्वसामान्य अशा गाई, म्हशी व शेळ्या पुष्कळच आहेत. परंतु मनात इच्छिलेली वस्तू देणाऱ्या
कामधेनू मात्र यांच्याहून वेगळ्याच आहेत. २ तुकाराम महाराज म्हणतात, देव आपणांस ज्या ज्या गोष्टी दाखवील
त्यांची भेट डोळघांनी घेणे, यातच फार मोठे पुण्य आहे असे समजावे. ३
९९१ जळो प्रेमा तैसा रंग । जाय उडोनि' पतंग ॥ १ ॥
सासूसार्टी रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ २ ॥
मंद मुखाँचा फोवळा । भाव अंतरीं निराळा ॥ ३ ॥
जैसीं वृंदावनकांती । उत्तम धरूं नये हातीं ॥ ४ ॥
बक ध्यान धरी । सोंग करुनि² मासे मारी ॥ ५ ॥
तुका म्हणे सर्प डोले । तैसा कयेमाजी खुले ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- पतंग-फुलपाखराची एक जात, मंद-लबाड, कपटी, वृंदावनकांती-कडू वृंदावनाचे
फळ, बक-बगळा.
अर्थ :- फुलपाखरांच्या एका जातीस, पतंगास दिव्याविषयी मोठेच प्रेम असते. या प्रेमापोटी तो दिव्यावर
झडप घालून जळून जातो. अशा प्रेमाच्या रंगास आग लागो. १ सासू मरण पावली म्हणजे सून रडत असते, पण
तिच्या अंतरंगातील भाव मात्र निराळाच असतो. २ कपटी मनुष्य हा चेहऱ्यावरून फार चांगला दिसतो, कोमलतेने
बोलतो, पण त्याच्या मनातील भाव मात्र निराळाच असतो. ३ कडू वृंदावनाच्या फळाची वरवरची कांती किती
शोभिवंत असते. पण आतून ते कडूच असल्यामुळे हातातही धरू नये ते. ४ बगळा नदीच्या काठी डोळे मिटून
ध्यान केल्यासारखा उभा राहतो; पण ते सर्व सोंग असते. संधी सापडताच मासे पकडण्यासाठी तो टपलेला असतो. ५
तुकाराम महाराज म्हणतात, गारुड्याच्या पुंगीच्या नादाने सर्प जसा डोलतो, तसाच हा वरवर भाविकपणा दाखविणारा
मनुष्य कथेमध्ये डुलत असतो; पण त्याचे हे करणे खरे नसते. ६
९९२ वेशा नाहीं बोल अवगुण दूपीले । ऐशा बोला भले ह्मणें क्षोभा ॥ १ ॥
कोण नेणे अन्न जीयाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ २ ॥
सोने शुध्द नेणे कोण हा विचार । डांकें हीनयर केलें त्यासी ॥ ३ ॥
याती शुध्द परि अधम लक्षण । वायां गेलें तेणें सोंगें ही तें ॥ ४ ॥
तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भार याहो ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- वेशा-वेषास, पोषाखास, ह्मणे क्षोभा-राग मानू नका, डांके-सराफानी, सोनारांनी,
हीनवर-हिणकस, मंडण-वरवरची शोभा.
अर्थ :- साधू लोकांनी घेतलेल्या वेषास मी बोल देत नसून त्यांच्या अंगच्या अवगुणांना मात्र दोष देत
आहे. माझ्या या बोलण्यामुळे भल्या माणसांनो, तुम्ही रागावू नये. १ सर्व वस्तुमात्रांचे व प्राण्यांचे जीवन अन्न
हेच आहे, असे कोण जाणीत नाही? पण त्यात विष कालविले गेले असेल तर सर्वच अन्न विषमय होऊन सर्वांनाच
घातककारक होईल ना. २ सोने हे शुद्ध व चांगलेच असते, असे कोण जाणीत नाही? पण सोनारानी मात्र त्यात हीन
धातूंचे मिश्रण करून ते हीन केलेले असते. ३ एखाद्याची जात जरी शुद्ध असली, तरी तो अधमाच्या लक्षणांनी
वायाच गेल्यासारखी असते. शुद्धत्वाचेही सोंग मग वायाच जाते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, शत्रूचा नाश
करून विजय संपादन करणारा तोच शूर होय. तोच मानसन्मानास योग्य होय. पण इतरांनी अंगावर सैनिकाची
वस्त्रे पांघरून शोभा वाढविण्याचा प्रयत्न केला तरी, ते केवळ ओझेच आहे असे मानणे भाग आहे. ५
१ भुलोनि, २ धरूनि.

४४६ सार्थ तुकारामगाथा
१९३ अणुरणीया' थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ १ ॥
गिळुनि सांडिले कळिवर । भव भ्रमाचा आकार ॥ २ ॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥ ३ ॥
तुका म्हणे आता । उरलों उपकारापुरता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अणुरणीया-अणुरेणूपेक्षाही, थोकडा-सूक्ष्म, त्रिपुटी-ज्ञेय ज्ञाता, ज्ञान इत्यादी तिहीचा
समुदाय
अर्थ - मी तुकाराम तसे पाहिले तर अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असूनही आकाशाएवढा विस्तारलेलो आहे १
मी देहादी व प्रपंचादिकाचा अभिमान गिळून शरीर सोडून दिल्यासारखेच आहे प्रपंचरूपी भ्रमाचा आकारही मी
सोडलेला आहे २ ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान अशासारख्यांची त्रिपुटी सोडून मी आत्मज्ञानाचा दीप माझ्या देहामध्ये
प्रज्वलित केला आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी आता केवळ दुसऱ्यावर उपकार करण्यासाठींच
उरलेलो आहे ४
विवरण - या अतिशय प्रसिद्ध अशा अभंगात तुकाराम महाराजांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म व
आकाशापेक्षाही विशाल असे आहोत, याचे त्यांच्या श्रेष्ठ अनुभूतीवरून वर्णन केले आहे एवच सूक्ष्म तत्त्व सर्व जगतात
भरून राहिलेले आहे, याचा सुंदर अविष्कार जो 'अणोरणीयान्महतो महीयान' या कठोपनिषदातील सूत्रात झालेला
आहे, त्याचा अनुवाद तुकोबांनी सहजमहनी या अभंगात मार्मिकपणे केलेला आहे 'अणु अणोरणीया आगळें' या
शब्दांनी मागेही अभंग क्र ४५१ मध्ये बुवानी असेच वर्णन केलेले आपण पाहिले आहे अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असलेल्या
तत्त्वाचाच सर्व विश्वात भरून राहिलेला अविष्कार असल्याने त्याला सोडून दुसरे काहीच नाही याची जाणीव श्रेष्ठ
साधकास नेहमीच होत असते जळीस्थळी ईश्वरतत्त्व पाहाणे व एकाच आत्मतत्त्वाच्या धाग्याने सर्व सृष्टी गुंफिली
गेली आहे, असे अनुभवास येणे, हाच ईश्वरी साक्षात्काराचे मर्म होय तुकोबांना ही अनुभूती तीव्रतेने आलेली होती
'आत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें', 'नभोमय जाले जळ । एकीं सकळ हरपले', 'तुका म्हणे कल्प
झाला । अस्त गेला उदयो', 'काहींच मी नव्हे कोणिये गांवींचा । एकटा ठांयींच्या ठायीं एक', 'आमुचा स्वदेश
भुवनत्रयामध्यें वास' इत्यादी वचनातून तुकारावाच्या अनुभूतीची विशालता ध्यानात येण्यासारखी आहे
अनुभूतीची एवढी विशालता व तीव्रता ज्यांना लाभली आहे, ते देह धारण करून जगतात तरी कशासाठी ?
याही प्रश्नाचे उत्तर तुकारामबुवांनी या अभंगात दिले आहे इतर लोकांच्यावर उपकार करण्यासाठी आपण आता
उरलेलो आहोत, असे त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे स्वतःस साक्षात्कार झाल्यावर 'आपण जेऊन जेववी
लोकां । सतर्पण करो तुका' अशी भूमिका तुकोबांसारख्या सत्पुरुषांना घ्यावी लागते लोकांनी सन्मार्गावर राहावे,
केवळ प्रपंच व पैसापैगा न करिता ईश्वराची आठवण ठेवावी, अनाचारात व व्यसनात रमू नये, दुष्टाच्या संगतीत
राहू नये, म्हणून साधुसंतांच्या एकसारख्या उपदेशाची फार मोठी जरूरी असते 'उपदेशी तुका । मेघवृष्टीने जाइरा'
असा निर्वाळा दुसऱ्या एका अभंगात त्यांनी दिलेला आहे मेघाचा स्वभावच सहज वृष्टीचा असून त्याचा फायदा
ज्याचा त्यान घ्यावयाचा असतो
१९४ धन्य आजि दिन । जाले संताचे दर्शन ॥ १ ॥
झाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥ २ ॥
झाले समाधान । पायीं विसावले मन ॥ ३ ॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दिन-दिवस, तुटी-नाश, उठाउठी-ताबडतोब, त्वरित
१ अणुरेणुया

सार्थ तुकारामगाथा ४४७
अर्थ :- आजचा दिवस केवढा धन्यतेचा आहे ! कारण आज मला संतांचे दर्शन झाले १ यांच्या दर्शनाने
माझे पाप ताप नष्ट झाले माझे आजवरचे दैन्य त्वरित नाहीसे झाले २ माझ्या मनाचे पूर्ण समाधान झाले व या
संताच्या पायाशी माझे मन पूर्णपणे विसावले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे साधुसंत आमच्या घरी
आलेले असल्यामुळे आम्हाला दिवाळीदसर्‍याच्या सणाचाच आनंद झालेला आहे ४
९९५ हेचि माझें धन । तुमचे वदावे चरण ॥ १ ॥
येणे भाग्यें असो जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ २ ॥
सांभाळिले देवा । मज अनाथा जी जीवा ॥ ३ ॥
जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - जीत-जगण्याचे
अर्थ - देवा, तुमचे चरण वदावेत हेच खरे म्हणजे माझे धन आहे १ तुमच्या पायावर चित्त समर्पून
टाकावे यातच खरे म्हणजे जगण्याचे सार्थक आहे २ देवा, मजसारख्या अनाथाचा तुम्ही नीटपणे सांभाळ केलात ३
हा तुकाराम दास देवा, तुम्हास हात जोडून विनंती करीत आहे ४
९९६ फजितखोरा मना किती तुज सांगो । नको कोणा लागो मागे मागें ॥ १ ॥
स्नेहभावें दुःख जडलेसे अंगीं । निष्ठुर हे जगीं प्रेमसुख ॥ २ ॥
निंदास्तुति कोणी करो दयामाया । न धरीं चाड या सुखदुःखे ॥ ३ ॥
योगिराज का रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं याचि गुणे ॥ ४ ॥
तुका म्हणे मना पाहें विचारून । होईं रे कठिण वज्राऐसें ॥ ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - चाड-पर्वा
अर्थ - माझ्या फजितखोरा मना, तुला आता किती सांगावे ? किती शिकवावे ? तू आता कुणाच्याही
मागे जाऊ नकोस कधी १ कुणाच्या विषयी प्रेम धरले की, आपल्या अंगी दुःख मात्र निर्माण होते. त्यामुळे जे
निष्ठुर राहतात, त्यांनाच श्रीहरीचे प्रेमसुख प्राप्त होते २ कुणी निंदा करील, कुणी स्तुती करील, कुणी दयामाया
करील, पण मी या सुखदुःखाची अथवा दयामाया करणाराची पर्वा करणार नाही कधी ३ मना, याचसाठी योगि-
राज एकाच स्थानावर, एकाच आसनावर स्वस्थपणे बसून नाही का राहात ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, तू
या सर्व गोष्टींचा विचार कर व इंद्राच्या वज्राप्रमाणे कठिण होऊन राहा ५
९९७ जळो माझी ऐसी बुध्दी । मज घाली तुजमध्यीं ।
आवडे हे विधि । नियेंधींचि चांगली ॥ १ ॥
तू स्वामी मी सेवक । उच्च पद निघ एक ।
ऐसे करावें कौतुक । नको करु खडणा ॥ २ ॥
जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा ।
भोक्ता निराळा । तेणें गोडी निवडिली ॥ ३ ॥
हिरा शोभला कोदणें । अळकारी मिरवे सोनें ।
एक असता तेणे । काय दुजें जाणावें ॥ ४ ॥
उष्णे छाये सुख वाटे । बाळें माते पान्हा फुटे ।
एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥ ५ ॥
तुका म्हणे हित । हेचि मानी माझें चित्त ।
नव्हे आता मुक्त । ऐसा जाला भरवसा ॥ ६ ॥

४४८ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा :- खडणा-भेदास
अर्थ - देवा, तुझ्यामध्ये मी सर्व भावांनी मुरून जावे, विलीन व्हावे, अशी जर माझी क्षुद्र बुद्धी असेल तर
तिला आग लागो. ऐक्यभावाच्या या विधीचा निषेध करण्याचीच आवड मला मोठीच आहे १ खरे म्हणजे देवा,
तू आमचा स्वामी व्हावेस, मी तुझा सेवक व्हावे तुमचे स्थान उच्चावर असावे, माझे खाली असावे, असे कौतुक
देवा, तू करावेस यामध्ये कधी भेदास वा तुटीस समय प्राप्त न व्हावा २ कारण, मग एकच सर्व झाल्यावर काय
उपयोग ? पाणी कधी पाण्यास पीत असते काय ? वृक्षच कधी आपल्या फळाचा उपभोग घेतात काय ? या ठिकाणी
भोग घेणारा निराळाच असल्याने सेवनातील गोडी कायम टिकलेली आहे ३ हिरा नेहमी त्याच्या कोंदणातच
शोभून दिसतो सुवर्णाची शोभा दागिन्याच्या रूपानेच ध्यानात येते जर सर्व एकच असते, तर एकाने दुसऱ्यास कसे
जाणावे ? एकाने दुसऱ्याची शोभा कशी पाहावी ? ४ उन्हात तापल्यानंतरच थंडगार सावलीचे सुख वाटते,
बालकाच्यामुळेच आईला पान्हा फुटतो ना ? एक दुसऱ्यास वेगळेपणाने भेटतो म्हणूनच सुख आहे ५ तुकाराम
महाराज म्हणतात, असे वेगळे राहण्यातच माझे मोठे हित असून मी आता मुक्त होणारच नाही, असा मला विश्वास
वाटू लागला आहे ६
विवरण -या एका सुंदर अभंगात तुकारामबुवांनी आपण स्वस्वरूपात न मिळावे, मोक्षपदी न बसावे,
ईश्वरस्वरूपात विलीन न व्हावे, ब्रह्मपदाची प्राप्ती न व्हावी म्हणून परमेश्वरास आग्रहाने विनविले आहे खर म्हणजे
यांचसाठी सर्व खटाटोप असतो जीवदशा सपावी, देहात्मबुद्धीचा नाश व्हावा, द्वैतपणा सपावा, ईश्वर व आपण
एकच अशी अनुभूती येऊन आपले सर्वस्व त्याच्याच स्वरूपात समर्पित व्हावे, यापेक्षा श्रेष्ठ अवस्था कोणती ? पण
थोर भक्तास अशी विलीनस्थिती, अशी समर्पित स्थिती, अशी ब्रह्मस्थिती अथवा मुक्तीची स्थिती अडचणीची वाटते
एकत्वाची अनुभूती आल्यानंतर कोण कुणाचे स्तवन करणार ? कोण कुणास डोळे भरून पाहणार ? कोण कुणापुढे
लडिवाळ हट्ट करणार ? कोण कुणावर लटक्या प्रीतीने रुसणार ? दूर असलेल्या स्थितीमधील हुरहूर, मनाची
तळमळ, उल्ठा यातील सुख मग कुणास मिळणार ? नामसंकीर्तन कोण कुणाचे गाणार ? आणि मग सतसगतीच
काय ? या सतांच्या संगतीत असणारा आनंद आत्मस्थितीपेक्षाही, मोक्षस्थितीपेक्षाही फार मोठा असल्यामुळेच
पुष्कळदा नामदेवतुकारासारखे साधुसत म्हणतात, 'झनी मुक्तिपद देशी पाडुरगा । मग या सत संगा पाहू कोठें ?'
हे सुख अखंड टिकावे म्हणूनच विलीन होण्याची कल्पना संतांना सहन होत नाही प्रेमसुखासाठी आपण सेवक अथवा
भक्त व ईश्वर धनी अथवा स्वामी या दोनपणाच्या भूमिकेवरच असणे यात खरी बहार आहे पुन एव उच्च स्थानी,
एक खालच्या पायरीवर उभा असलेला असे असेल तरच अधिक सुख या सुखास सोडून मुक्तीची अथवा स्वस्वरूपी
विलीन होण्याची आशा धरील तो करटा, असे तुकारामबुवांनीच दुसऱ्या एका अभंगात म्हटले आहे, 'सांडुनि सुखाचा
वाटा । मुक्ति मागे तो करटा' या साधुसंतांना 'या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी' हीच इच्छा नेहमी असते
'जन्मोन्ममीं तुझा दास पुरूत्तमा । हेचि गोडी माझ्या देई जींवा' अशी मागणी या संतांची असते 'देवभक्त कोड
तेथें नाहीं' अशा मुक्तीची फिकीर संत कधीच करीत नाहीत यासाठीच 'तुका म्हणे आम्ही मृत्युलोकीं येरे । तुझेचि
अकिले पाडुरंगा' अशी इच्छा त्यांच्या मनात सतत असते
१९८ मनीं वसे त्याचे आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥ १ ॥
जातीचे तें झुरे येर येरासाठीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ २ ॥
भेटीची अपेक्षा वारता आदर । पुसे नव्हे धीर बापुताले ॥ ३ ॥
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - येरयेरासाठी-एक दुसऱ्यासाठी, वारता-धाडविले
अर्थ - आपल्या मनात ज्याच्याविषयी प्रेम आहे त्याचे बोलणे आपणास पसंत असते त्याचाच समाचार
घ्यावा असे आपणास पुन पुन वाटते १ जे एका जातीचे, एका आवडीचे असतात तेच एकमेकांसाठी झुरत

सार्थ तुकारामगाथा ४४९
असतात यामुळे वियोगातही कधी त्याच्यात तुटी पडत नाही २ एकमेक एकमेकांच्या भेटीची इच्छा धरीत
असतात, कुणी त्यांना थांबविले, तर ते धीर धरून पुनः पुनः त्याच्याविषयीच विचारतात ३ तुकाराम महाराज
म्हणतात, हे हरिभक्त माझ्या जीवाचे जीवन असून माझे केवळ प्राणसखेच आहेत ४
९९९ नव्हे आराणूक परि मनीं वाहे। होईल त्या साहे पांडुरंग ॥ १ ॥
पंढरीसि जावे उद्वेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥२ ॥
नसो बळ देह असो पराधीन । परि हे चिंतन टाको नको ॥ ३ ॥
तुका म्हणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणे याजसाठीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - आराणूक-शांती, सुख, उद्वेग-तळमळ
अर्थ - मनात कसलेही सुख नसतानाही जो निरंतर पांडुरंगासच मनात वागवितो, त्याचेच नित्य स्मरण
करितो, त्यासच तो विठ्ठल मदत करीत असतो १ पंढरपुरास जावे, पंढरपुरास जावे, अशी एकसारखी मनात
तळमळ धरशील, तरच तू निःसंशय त्या ठिकाणी पावशील २ मग तुझा देह पराधीन असो, अथवा त्यात बळ
नसो, पण पांडुरंगाचे चिंतन कधी सोडू नये ३ तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलचिंतनात देह पडला तरी
त्याची पर्वा करू नये कारण पुढे याच चिंतनासाठी देह धारण करावा लागला तरी त्याची चिंता नसावी ४
१००० कोठें देवा आले अगा थोरपण । बरें होतें १ दीन होतो तरीं ॥ १ ॥
साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाईन तें ॥ २ ॥
न पुसते कोणी कोठें ही असता । समाधान चित्ताचिया सुखें ॥ ३ ॥
तुका म्हणे जन अव्हेरिलें मज । तरी केशवराज सांभाळिता ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - कोठें-कशासाठी, अव्हेरिलें-दूर लोटतात
अर्थ - देवा, माझ्या अंगाला असा हा मोठेपणा व्यर्थ कशासाठी आला आहे ? मी आपला दीन वृत्तीने
होतो तेच बरे नव्हते का ? १ संतांची सेवा करीत असणे हेच एक उत्तम साधन आहे मी मोठ्या प्रीतीने श्रीहरीचे
नाम घेत राहीन २ मी कुठेही मनमोकळेपणाने गेलो असता कुणी विचारीत नाही, माझ्या चित्तात एक प्रकारचे
समाधान पूर्णपणे भरून राहिलेले असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोक मला दूर लोटतात, माझा अव्हेर
करतात, अशा वेळी देवा, तूच माझा सांभाळ करितोस ४
१००१ चतुर मी झालो आपुल्या भोवता । भावैविण रिता २फुज अगो ॥ १ ॥
आता पुढें वाया जावे हे ते काई । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ २ ॥
गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुध्दि ॥ ३ ॥
तुका म्हणे करूं उपदेश लोका । नाहीं जालो एका परता दोषा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीका - फुज-अभिमान, गव, जगाचे अंतरा-लोकांच्या अंतःकरणातील
अर्थ - मी माझ्या भोवतीच केवढा चतुर होऊन राहिलो आहे पाहा श्रीहरीच्या भावभक्तीशिवाय मी
रिकामाच आहे उगाच पोकळ अभिमान मात्र अंगात वाढला आहे १ आता माझे आयुष्य यापुढे वाया जाईल
यात नवल काय ? माझ्यात कामक्रोधांनीही वास्तव्य केलेले आहे २ लोकाच्या अंतरकरणातील गुणदोष एकत्र
होऊन माझ्याही मनात ते निर्माण झाले आहेत सर्व प्राणिमात्रचा मत्सर करावा अशीच बुद्धी मजमध्ये निर्माण
झाली ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी लोकांना उपदेश करतो, पण मी स्वतः मात्र एकाही दोषापासून
मुक्त झालेलो नाही ४
१ होतो, २ स्फुद
तु गाथा ५७

४५० सार्थ तुकारामगाथा
१००२ धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥ १ ॥
येथे उपकारासाठीं । आले घर ज्या वैकुंठीं ॥ २ ॥
लटके वचन । नाहीं देहीं उदासीन ॥ ३ ॥
मधुरा वाणी ओठीं । तुका म्हणे भाव पोटीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अंतरीं-मनात, लटके-खोटे, ओठीं-ओठात, भाव-माया
अर्थ - जे अंत करणात दयावंत असतात, तेच या संसारात धन्यवान म्हणून गणले जातात १ खरे म्हणजे
या साधुसंतांचे घर वैकुंठातच असते पण ते इतरावर उपकार करण्यासाठीच या जगतात वावरत असतात २
यांना खोटे भाषण माहीत नसते हे स्वतःच्या देहाविषयी नेहमीच उदासीन झालेले असतात ३ तुकाराम महाराज
म्हणतात, यांच्या ओठात मधुर अशी वाणी असून पोटात पुष्कळच थोर माया असते ४
१००३ कुटल्याविण' नव्हे माडा । आळसे धोंडा पडतसे ॥ १ ॥
राग नको धरू मनीं । गाडगणी सांगतों ॥ २ ॥
तरटापुढें खरें नाचे । सुते काचे मुसळ ॥ ३ ॥
तुका म्हणे काठी सार । करी फार शहाणे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गाडगणी-गुह्य गोष्ट, तरटापुढे-चावकापुढे
अर्थ - कणीक चांगली कुटून घेतल्याखेरीज चांगला मांडा कधी तयार होत नाही या कामी आळस केला
तर मात्र पदरात धोंडा पडतो १ या आमच्या स्पष्टपणे सांगण्याचा राग तुम्ही मनात धारण करू नये आम्ही ही
एक गुह्य गोष्टच तुम्हास सांगितली आहे २ चाबकापुढे घोडा बरोबर नाचतो सुतानी मुसळही काचले जाते ३
तुकाराम महाराज म्हणतात, कुणाला शहाणे करायचे असेल तर, समजावून सांगायचे तर, हातामधील काठी हेच
प्रमुख साधन आहे ४
१००४ कळों येतें तरि का नव्हे । पडती गोवे भ्रमाचे ॥ १ ॥
जाणतांचि होतो घात । परिसा मत देवा हे ॥ २ ॥
आमिसासाठीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥ ३ ॥
तुका म्हणे होणार खोटें । कर्म मोठें बळिवंत ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गोवे-गुंते, परिसा-ऐका मत-मात, हकीकत, मान-गळा
अर्थ - खरी स्थिती काय आहे, हे समजत असूनही लोक भ्रमाच्या गुंत्यात का सापडतात ? १ देवा, खरे
काय आहे याची जाणीव असतानाही याचा घात कसा होतो हे ऐका २ आमिष पाहून मासा फासात अडकतो, त्या
प्रमाणे धनाच्या इच्छेने लोक त्यात गुरफटून जातात ३ तुकाराम महाराज म्हणतात, कर्म मोठे बलवान असते
त्यामुळे जर खोटे व्हायचे असेल तर होईलच ४
१००५ मोकळें मन रसाळ वाणी । याचि गुणीं संपन्न ॥ १ ॥
लक्ष्मी ते ऐसा नावे । भाग्यें ज्यावे तरि त्यानी ॥ २ ॥
नमन नम्रता अंगीं । मेघ रंगीं पालटे ॥ ३ ॥
तुका म्हणे त्याच्या नावे । घेता व्हावे संतोपी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - ज्यावे-जगावे
अर्थ - ज्याची वाणी रसाळ असून मन मोकळे आहे, तोच सर्वगुणसंपन्न असतो १ त्यालाच लक्ष्मी प्रसन्न
आहे, असे समजावे त्यानेच भाग्यवंत होऊन जगावे २ त्याच्या अंगी नमन करण्याची वृत्ती व नम्रता, या दोन
१ कांडल्या कुटिल्या हावा माडा

गुणांचा वास असावा मग त्याच्या स्थितीत कधीही पालट होणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्याचे
नाव एवढे मोठे असते की, त्याच्या नावानेही सर्वानी संतोषित व्हावे ४
१००६ शेवटोची विनवणी । सतजनों परिसावी ॥ १ ॥
विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हासी ॥ २ ॥
पुढे फार बोलो काई । अवघे पायीं विदित ॥ ३ ॥
तुका म्हणे पडिलों पाया । करा छाया कृपेची ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - परिसावी-ऐकावा, विदित-माहीत
अर्थ - माझी एक शेवटची विनंती आहे ती साधुसंतानी ऐकावी १ ती अशी की तुम्हास व देवास कधी
माझा विसर पडू नये २ यापुढे आम्ही अधिक काय बोलावे ? तुमच्या पायाजवळ सर्व सांगितले असल्यामुळे माहीत
आहेच ३ तुकाराम महाराज म्हणतात, मी तुमच्या पाया पडलो आहे, तुम्ही मजवर कृपेची छाया करावी ४
१००७ करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥ १ ॥
माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ २ ॥
काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तेंचि वदें ॥ ३ ॥
निमित्त मापासी बैसविले आहे । मी तो काही नव्हे स्वामिसत्ता ॥ ४ ॥
तुका म्हणे आहे पाईकचि खरा । वागवितो मुद्रा नामाची हे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - पाईक-प्रामाणिक सेवक शिपाई गडी
अर्थ - मी तुकाराम कवित्व करीत आहे, असे जर कोणी म्हणत असले, तर खरी स्थिती अशी आहे की
कवित्वाची वाणी ही काही माझ्या पदरची नाही १ कवित्वाचा हा सर्व प्रकार केवळ माझ्याच युक्तीचा नसून मला
तो विश्वंभर बोलवितो त्याच्याकडून मला बोलाविले जाते २ त्याशिवाय मी पामर निरनिराळ्या शब्दांचे अर्थ-
भेद जाणणार तरी कसे ? हा गोविंद जे मला वदवितो, तेच मी बोलतो ३ मी फक्त माप टाकण्याच्या निमित्तात
मात्र बसलो आहे या कामी मी खरे म्हणजे कोणीच नव्हे त्या स्वामीची सर्व सत्ता आहे ४ तुकाराम महाराज
म्हणतात, मी या देवाचा खराखुरा असा प्रामाणिक सेवक आहे त्याच्याच नामाची चिन्हे मी माझ्या अंगावर बाग-
वीत आहे नामदेवाच्या मुद्रेन मी अंकित झालेलो आहे ५
विवरण - तुकोबांना कवित्वाची स्फूर्ती कधी व कव्हां झाली यासंबंधी स्वतंत्र विवरण पुढे 'नामदेवें
केलें स्वप्नामाजीं जागें (अभंग क्र १,२०) व सत्य अमृत्वाशी मन केलें ग्वाही (अभंग क्र १३३३) च्या वेळी
स्वतंत्रपणे येईलच येथे फक्त एवढ्याच बाबीचाच खुलासा करावयाचा आहे पहिली गोष्ट अशी का, आपण कवित्व
करिता याविषयी तुकोबांची भूमिका अत्यंत नम्रतेची पण निश्चयाची होती तुकोबासारख्या भक्तान वेदवाणीचा
अर्थ मराठी भाषेत सांगण्याचा धाडा कवित्वातून कराव हे अलौकिक होतच पण याही दिव्य वाणीस प्रारंभ प्रथम
विरोध झाला तुकोबा हे काही जन्मान वरिष्ट वर्णातील नसून वेदानात परमाथनान सस्कृताखेरीज इतर को
भाषेत येत होत, हीही काहीजणाना पसंत नसून या सर्वोना उत्तर म्हणून या कधी वस्तुस्थित्यान निवेदन म्हणून
तुकोबा आपल्या कवित्वाच वैशिष्टय मधून मधून सागाताना दिसतात
त्याच्या कवित्वाचे एक वैशिष्टय या अभंगात असे आले आहे की, आपल्या कवित्वाची वाणी ही आपली
स्वतःची नसून ती त्या विश्वभरान, ईश्वरान वदविली आहे आपण केवळ निमित्तमात्र आहात केवळ धान्याच्या
मागाच माप टाकणारे आहात आपण फाल असून त्याचीच सत्ता खरा आहे, असा भाव इतरही सवत्र प्रकटपण
दिसून येतो 'मजुराच्या हातें मापाचा उबल । मी तों येथें फोल सत्ता ह्याची' 'नव्हे अप शांहीं राहतो माझे बोल ।
महती माझ योजू बोले पांडुरंग', 'माझी वदवितों वाणी । ज्याणें घरिली धरणी', 'आपुलिया बळें नाहीं मी बोलत ।

४५२ सार्थ तुकारामगाथा
सल्ला कृपावंत याचा त्याची', ' शिकविता धनी वेगळाचि', ' परि त्या विश्वभरें बोलवितें', ' तुका म्हणे मज बोल-
वितो देव', ' वदें साक्षत्देशीं वाणी । नारायणीं मिश्रित ' अशा अनेक वचनांतून तुकोबांनी आपली वाणी ही आपली
नसून प्रत्यक्ष विठ्ठलाची, विश्वंभराची आहे असे पुनःपुनः सांगितले आहे म्हणूनच तुकोबांच्या वाणीचे व कवित्वाचे
तंग दिव्य, अलौकिक व जिव्हाळभाये असे आहे कवित्वाचे शब्द हे काही टांकसाळींतील नाणे नव्हे, असेही त्यांनी
एका अभंगात म्हटल आहे केवळ देवानेच प्रेरणा दिली म्हणूनच आपली वाणी एवढी दिव्य व रसाळ झाली, असा
ययाचा अभिप्राय आहे याच अभंगात त्यांनी या तीर्थाचे वर्णन करताना म्हटल आहे ' तुका म्हणे देवें केला
बलात्कार '
सारांश, आपण पामर आहोत साध्या साध्या शब्दांचेही अय आपणास समजणारे नाहीत, पण तो गोविंद
बदविणारा असल्यामुळे आपल्याकडून हा कवित्वाचा प्रकार होतो आपण खरे म्हणजे ईश्वराचे केवळ एकनिष्ठ
सेवक आहोत, व त्याच्या नामाची मुद्रा आपल्या कृतीवर असल्याने ती प्रासादिक व प्रसादपूर्ण झाली आहे या
अभगांतील 'मुद्रा नामाची' यावरी इत्येही ध्यानात घेण्यासारखा आहे तुकोबांना कवित्वाच देणे नामदेवाच्या
परंपरेपासून लाभलेले आहे नामदेवांनी त्यांना अभंगरचनेची स्फूर्ती दिली अशी त्याचीच साक्ष आहे 'मुद्रा नामाची'
म्हणजे नामदेवरायाची मान्यता असाही अर्थ शोधून दिसणारा आहे
१००८ आम्हो गावे तुम्ही कोणीं कांहीं न म्हणावे । ऐसे तब आम्हा सागितले नाहीं देवे ॥ १ ॥
म्हणा रामराम टाळी वाजवा हातें । नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ २ ॥
सहज घडे तया आळस करणे ते काई । अग्नीचे भातुके हात पाळितां' कां पायीं ॥ ३ ॥
येथे नाहीं लाज भक्तिभाव लौकिक । हासे तया घडे ब्रह्महत्यापातक ॥ ४ ॥
जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥ ५ ॥
सदैव ज्या कथा काळ घडे श्रवण । तुका म्हणे येर जन्मा आले पाषाण ॥ ६ ॥
शब्दार्थ य टीपा - भातुके-साद्य, साळविताळ-ताल, बेताल येर-दुसरे
अर्थ - आम्ही मात्र देवाचे नाम घ्यावे व तुम्ही मान कुणी काहीही म्हणू नये, हा प्रकार काही आम्हास
आमच्या देवानी सांगितलेला नाही १ यासाठी तुम्ही मुखाने रामराम म्हणावे, हातानी टाळी वाजवावी आणि
स्वहितासाठी प्रेमाने प्रभूसाठी नाचा, डोलत राहा २ प्रभुमाप्ती जो अशी सहज होणारी आहे, तिच्याविषयी
आळस काय कामाचा ? आपल्या हातापायाना जपून का ठविता ? शेवटी त्याचे भाग्य अग्नीसच होणार आहे ना ?
मग त्याचा उपयोग आधीच हरिभजनाकडे का नाही करीत ? ३ भक्तिभावाच्या ठिकाणी लाज कसली आली आहे?
लौकिकाची पर्वा तरी कशास हवी ? या ठिकाणी जो कुणी हसेल, त्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल ४ ज्याचा जसा
भाव असेल, तसे त्याने भक्तींचे प्रतिपादन करावे या ठिकाणी देवास भजनातील तालाची किंवा बेतालाची पर्वा
मुळीच नसते ५ हरिकथेच्या वेळेस ज्याला श्रवण घडते, तो सुदैवीच म्हणावयास हवा तुकाराम महाराज
म्हणतात, 'हरिभजन न करणारे दुसरे जे कुणी लोक असतील ते मनुष्याच्या जन्माला येऊन दगडच आहेत
असे समजावे ६
१००९ देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥ १ ॥
देव न लगे देव न लगे । साटवणेचे रघले जाये ॥ २ ॥
देव मदला देव मदला । भाव बुडाला काय करू ॥ ३ ॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥ ४ ॥
दुबळा तुका भावेविणे । उधारा देव घेतला गुणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - रघले-अडून गेले, फुका-फुकट, रुका-पैसा
१ पोळिता

अर्थ :- कोणी तरी या देवास घ्याहो. देवास घ्याहो. आयता तुमच्या घरास चालून आला आहे हा देव. १
आणि लोक म्हणतात, देव नको, देव नको, घरी साठवण करून सर्व जागा अडून गेली आहे. आता आणखी जागा
देयाला नाहींच. २ अशा प्रकारे देवाचा भाव मंदावला आहे. देवाचा भाव घसरला. आता काय करु हो? ३
मग हा देव अगदी फुकटचाच आहे. हा तरी आता घ्या ना. याला काही पैसे द्यावे लागत नाहीत. याला काही किंमत
पडत नाहीं. ४ हा तुकाराम अतिशय दुबळा आहे. त्याच्या मनात पुरता भावसुद्धा नाही. पण त्याने देवास उधार
घेऊनच ऋण करुन ठेविले आहे. ५
१०१० विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥ १ ॥
साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ २ ॥
भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥ ३ ॥
तुका म्हणे वर्म भजनेंचि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- येरांनीं-इतरांनी, अहंमान-अभिमान, ओस-रिकाम्या
अर्थ :- सर्व जग विष्णूने भरलेले आहे, याची जाणीव फक्त विष्णुभक्तांनाच असते. इतरांनी मात्र वृथा
ज्ञानाचे ओझे डोक्यावर धरावे. १ नाना प्रकारांच्या साधनाच्या संकटांचा शीण मात्र सहन करावा लागतो. तेव्हा
मुख्यत अभिमान गळून जाणे हे महत्त्वाचे आहे २ पण अहंकाराचा भाव हा अतिशय कठिन आहे. एखाद्या वेळेस
इंद्राच्या वज्राचा भंग करता येईल, पण मायाजाळाचा भंग करणे जमणार नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या
देवाचे वर्म केवळ भजनामुळे हाताशी येईल. इतरांना मात्र सर्व दिशा शून्य होऊन जातील. त्याच्या हाती काहीही
सापडणार नाही. ४
१०११ कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥ १ ॥
कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देईल ॥ २ ॥
वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥ ३ ॥
उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- सहा-कामक्रोधादी सहा शत्रू, खळ-शत्रू, दुष्ट, जिणावें-जिंकावेत.
अर्थ :- या देवास कीर्तनसुखाची गोडी स्वतः होऊन निवडायोगी वाटते; त्याला ती फार आवडते. १ या
कीर्तनसुखासाठी जर कोणी अधिकारी असतील, तर त्यांस श्रीहरी हे सुख प्राप्त करून देईल. २ तीव्र वैराग्याच्या
बळावर कामक्रोधादी सहा शत्रू जिंकावेत. ३ एवढे झाल्यावर मग काही करायचे साहे, असे उरणार नाही; असा
बोभाटा, अशी गर्जना मी तुकाराम करीत आहे. ४
१०१२ कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥ १ ॥
अवघें आलें आंत पोटा पडलें थीतें । सारूनि निश्चित' जालों देवा ॥ २ ॥
द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मयेशा तुज ठायी ॥ ३ ॥
तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥ ४ ॥
तुका म्हणे तुझे खतों जें गुंतलें । करूनि आपुलें घेई देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- जोडीलागीं-प्राप्तीसाठी, थीतें-पुरे, मयेशा-प्रिय स्वामी, खतों-कर्जरोख्यात
अर्थ :- देवा, माझे, शरीर, माझी वाणी, माझे मन; या सर्व गोष्टी मी तुमच्यापाशी गहाण ठेविल्या आहेत.
तुझ्या प्राप्तीसाठी मी कर्ज घेतले आहे. १ आता माझ्या पोटात सर्व काही सामावून पुरे झाले आहे. मी यामुळे
आता अगदी निश्चित आहे. २ आता देवा, यापुढे तुला देण्यासाठी म्हणून मजजवळ अगदी तोळामासा एवढेसुद्धा
१ निश्चित.

४५४ सार्थ तुकारामगाथा

सोने उरले नाही, आणि प्रिय स्वामी, या पूर्वीची हकीकत तर तुम्हास माहीत आहेच ३ देवा, तुझ्या या प्रपंचाच्या
ऋणाने किती तरी लोक बद्ध झाले आहेत, ते सर्व माझ्यापेक्षा किती तरी थोर थोर आहेत ४ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा तुझ्या कर्जरोख्यासारख्या कागदपत्रात जे गुंतून गेले आहेत, त्याना तू आपलेसे करून घे ना ५

ध्रुवंक—अभंग २८.

१०१३ करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥ १ ॥
देसी कीं न देसी पायाचे दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ २ ॥
बोलसी कीं न बोलसी मजसवे देवा । म्हणोनिया जीवा भय वाटे ॥ ३ ॥
होईल कीं न होय तुज माझा आठव । पडिला संवेह हाचि मज ॥ ४ ॥
तुका म्हणे मी तो कमाईचे हीण । म्हणऊनि सीण करों देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा — अंगीकार—स्वीकार, संवेह—संशय
अर्थ — देवा, तू माझा स्वीकार करशील, न करशील असा मला विचार पडलेला आहे १ तू मला तुझ्या
पायाचे दर्शन देशील न देशील, अशा शंकेने माझे मन अस्थिर बनलेले आहे २ देवा, तू माझ्याशी बोलशील न
बोलशील, या संशयाने माझ्या मनास भीती वाटत आहे ३ देवा, तुला माझी आठवण होईल न होईल, या शंकेने
मी व्यथित झालो आहे रे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझी कमाई कमी, माझ्याकडून मेहनतही फार
होत नाही म्हणून मनाला फार शीण वाटतो ५

१०१४ ऐसा माझा कोण आहे मोडभार । नावाचा मी फार वाया गेलो ॥ १ ॥
काय सेवा रुजु आहे सत्तावळ । तें मज राउळ कृपा करी ॥ २ ॥
काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणे पडे वर्म तुझे ठायीं ॥ ३ ॥
कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥ ४ ॥
तुका म्हणे वाया जातो भूमी भार । होईल विचार काय नेणो ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा — भीडभार—भीडेचे ओझे, राउळ—देव
अर्थ — असा मी कोण एवढा थोर आहे की, माझी भीड ध्यानात ठेवून माझे काम व्हावे ? उलट मी तर
एक वाया गेलेला मनुष्य आहे १ माझी काय ईश्वराच्या चरणी सेवा रुजू झालेली आहे ? का त्याच्यावर सत्ता
करीन असे बळ तरी माझ्याजवळ आहे ? २ माझी काय जात शुद्ध आहे ? की कूळ पवित्र आहे ? काय म्हणून
देवा, तुझे रहस्य माझ्या ध्यानी यावे ? ३ मी काय असा मोठा तपस्वी आहे ? की दानधर्म मनोभावे करणारा
आहे ? माझ्या अंगी काही सत्ता आहे ? बळ आहे काय ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, या जगात जन्मास
येऊन मी भूमीला भारच झालो आहे या सर्व आयुष्याची अखेर काय होणार आहे कुणास माहित ? ५

१०१५ साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काय नव्हे ॥ १ ॥
करावें तें बरें जेणे समाधान । सेवावें हैं वन न बोलावें ॥ २ ॥
शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरिच हे वेई निवडूनि ॥ ३ ॥
उचित अनुचित कळो आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥ ४ ॥
तुका म्हणे मज पायांसवें चाड । सागरी ते गोड आहे मज ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा — साच—खरी, चाड—इच्छा
अर्थ — देवा, खरी स्थिती काय आहे, हेसुद्धा मला कळू नये ना ? तुझी सेवा मी कधीच करीत नसतो
काय ? १ जेणेकरून माझे समाधान होईल, ते देवा, तुम्ही करा ना नाही तर न बोलता वनात जाऊन एकांत-

सार्थ तुकारामगाथा ४५५
वासात मी राहावे हेच उत्तम नाही का ? २ जेणेकरून माझा भाव देवा, तुझ्या पायांवर शुद्धपणे समर्पित होईल,
असे काही निवडून मजजवळ दे. ३ पांडुरंगा, तुझ्या कृपादृष्टीमुळे योग्य काय, अयोग्य काय, हे मला चांगलेच
समजून आले आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला तुमच्या पायांचीच एक इच्छा आहे. जे तू मला
सांगशील ते गोडच वाटेल मला. ५
१०१६ नाहीं कांटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥ १ ॥
जन वन आम्हां समानचि जालें । कामक्रोध गेले¹ पायटणी ॥ २ ॥
षडऊर्मी शत्रु जितिले² अनंता । नामाचिया सत्तावळें तुझ्या ॥ ३ ॥
मुख्य धर्म आम्हां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥ ४ ॥
म्हणऊनि तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- पायटणी-पायऱ्या, अवलोकुनी-पाहून, वास-वाट.
अर्थ :- देवा, मी आयुष्यास काही कंटाळलो नाही; पण काय करावे, न करावे या संभ्रमात मी असल्या-
मुळे भयभीत झालो आहे. १ वनवास व जनवास हे आम्हास सारखेच झाले असून कामक्रोधांना आम्ही
आमच्या घराच्या पायऱ्या केल्या आहेत. २ अनंता, तुझ्या नामाच्या सत्तेमुळे आम्ही कामक्रोधादी मनाच्या सहा
ऊर्मी जिंकल्या आहेत. ३ स्वामीची आज्ञा शिरसावंद्य मानून ती पाळावी हाच आम्हा सेवकाचा धर्म आहे. ४
तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच देवा, मी तुमची पवित्र पावले पाहून, त्यावर लक्ष ठेवून, तुमच्या कृपेच्या
वचनाची वाट पाहात आहे. ५
१०१७ वांयाविण वाढविला हा लौकिक । आणिका लटिक वाद दोघां ॥ १ ॥
नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ २ ॥
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं विंबेचि ना ॥ ३ ॥
जालों परदेशी गेलें दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥ ४ ॥
तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- वैखरी-वाणी, साच-खरे,
अर्थ :- देवा, मी हा परमार्थाचा लौकिक व्यर्थच वाढविला, असे मला वाटते. धड प्रपंच नाही, धड परमार्थ
नाही. असे होऊन गेल्यामुळे या दोघांचा वाद लटफाच ठरलेला आहे. १ आता माझ्या मनास असे वाटत आहे की,
या जगात देवच नाही, मग तो भुकेलेल्याचे जेविणे जाणणार तरी कसे ? २ उगाच मी आपली वाणी शब्दरूपाने
गौरवून पाहिली. पण ईश्वराच्या रूपाचे खरे बिंब काही तीमध्ये उमटलेले मला दिसले नाही. ३ असा मी देवा,
परदेशी बनलो आहे. दोन्ही मार्ग हुकले धड परमार्थही नाही, धड संसारही नाही तुझ्या पायांपासून असा मी अंतरलो
आहे. ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, असे मागेच मला समजून येते, तर मी हे तुझे वेड माझ्या मनास लावूनच
घेतले नसते. ५
१०१८ न कळे तत्त्वज्ञान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥ १ ॥
आगमाचे भेद मी तों काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ २ ॥
कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होईल त्याचा त्यास अभिमान ॥ ३ ॥
संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥ ४ ॥
मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥ ५ ॥
तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥ ६ ॥
१ केले, २ जिविले.

३५६ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा :- मूढ--मूर्ख, मद, आगमाचे-वेदशास्त्राचे, घायें-घावाने,
अर्थ :- देवा, मी अतिशय मंद बुद्धीचा असल्यामुळे, मला तुझे ते गूढ तत्त्वज्ञान काही समजत नाही. पण
मी माझ्या चित्तात तुझ्याच चरणकमलांचे ध्यान करतो. १ वेदशास्त्रांतील भेद मी कसे जाणणार ? १ पण मी
तुझ्याच चिंतनात काल कसा तरी संपवीत आहे. २ मी तसे काहीही जाणीत नसलो तरी, मी तुझा दास म्हणून घेत
आहे. याचा अभिमान ज्याचा त्याने धरायला हवा. ३ मी संसाराची सर्व इच्छा सोडून देऊन तो मार्गही ढाणून
दिला आहे. अशा प्रकाराने एका घावाने मी या जगाचा संबंध दूर केला आहे ४ मी मागच्या जन्मीच्या धर्माच्या
लाभाचेही खंडण केले असून, मी माझे एकाएकी मन रक्षण केले आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, अगा,
रखुमाईच्या वरा, भक्तांवर करुणा करणाऱ्या देवा, मला तुम्ही सांभाळायचे ६
१०१९ इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥ १ ॥
इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ २ ॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥ ३ ॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥ ४ ॥
भलतिया मायें तारीं पंढरीनांथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - इतुले-इतकेसे तरी, भलतिया-कोणत्याही
अर्थ :- देवा, माझे बोलणे नीट ऐकून एवढीशी लहान गोष्ट तरी कर ना, माझा देहाभिमान समूळ जाळून
टाक ना. १ देवा, तू नीट ऐक; मी सर्वत्र समदृष्टीने तुला पाहावे अशी तरी माझ्यावर कृपा कर. २ देवा, निदान
एवढे तरी कर की, संतांच्या चरणावरची धूळ माझ्या माथ्यास लागेल असे तू करावेस, अशी माझी तुला विनवणी
.आहे. ३ देवा, पंढरीनाथा, नाही तर एवढेच कर की, माझ्या हृदयात रात्रंदिवस निवास कर ना. ४ पंढरीनाथा,
मी आता तुला पूर्णपणे शरण आलो आहे. तू कोणत्याही का मार्गाने असो, पण माझ्यावर कृपा कर. मला तार. ५
१०२० तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनि सांभाळ करीं माझा ॥ १ ॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ २ ॥
माझे गुण दोष पाहतां न लगे' अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥ ३ ॥
नेणें तुझी कैसी करावी हे' सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥ ४ ॥
तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- लोकपाळ-राजा, प्रमुख लोक
अर्थ :- देवा, मी तुझाच दास आहे, असे आता सर्व प्रमुख लोक बोलत राहिले आहेत, म्हणून तरी तू माझा
सांभाळ करावांस. १ देवा, तू अनाथांच्यावर कृपा करणारा अनाथनाथ आहेस ना ? पापी लोकांचा उद्धार करणारा
तू पतितपावन आहेस ना ? मग आता तुझी ही नावे तुलाच सांभाळली पाहिजेत. २ माझ्या गुणदोषांकडे देवा,
पाहशील तर त्यांचा अंतच लागणार नाही. माझे चित्तच याविषयी मला ग्वाही देत आहे. ३ देवा, तुझी सेवा
कशी करावी, हेही मी नीटपणे जाणीत नाही. परंतु तू माझ्या मनातील भाव जाणून आहेस. ४ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, तू कृपेचा सागर असून माझे हे भवसागराचे बंधन तोडून टाक ना. ५
१०२१ जाणवें तें काय नेणावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेचि सार ॥ १ ॥
करावें तें काय न करावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ २ ॥
बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥ ३ ॥
जायें तें फोडें न जावें तें आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥ ४ ॥
तुका म्हणे तूं करिसी तें सोपें । पुण्यें होतो पापें आमुच्या मतें ॥ ५ ॥
१ फळे, २ तें.

शब्दार्थ व टीपा :- ध्यावे-वंदन करावे
अर्थ - देवा, काय जाणावे, न जाणावे, ते काही समजत नसल्यामुळे तुझ्या पायावर मस्तक ठेवावे, हेच
एक तात्पर्य आहे १ काय करावे, काय न करावे, या संभ्रमात तुझ्या पायाचे चिंतन करावे हे एकच सार आहे. २
काय बोलावे, काय बोलू नये, या संशयाच्या अवस्थेत देवा, तुझ्या पायावर मस्तक नमवावे, हेच एक सार वाटते. ३
कुठे जावे, कुठे जाऊ नये, या संभ्रमात, तुझे नाव आठवावे हेच चांगले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा,
तू जे जे करशील ते ते सोपेच वाटेल पुण्यमय वाटणारी पापेच आमच्या हातून होतात; पण तू आहेस म्हणून
सर्व निभावते ५
१०२२ नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीभाव । मी भक्त तूं देव ऐसे करीं ॥ १ ॥
दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन १ चरणावरी माथा ॥ २ ॥
पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निवलोण उतरीन ॥ ३ ॥
पुसता सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत गुजगोष्टी ॥ ४ ॥
तुका म्हणे यासी न लावी उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - आत्मस्थितिभाव-आत्मा ब्रह्मरूपच आहे अशी भावना, अभ्यंतर-अतरंग, अत करण
अर्थ:-देवा, मला तुमचे ते ब्रह्मज्ञान नको आहे आत्मस्थितीची किंवा मोक्षाची अथवा मुक्तीची भावनाही
मला नको. अशा प्रकारे एकच होऊन मुक्त होण्यापेक्षा देवा, मी भक्त व तू देव असेच नाते असड असावे १
गोपिकारमणा, तू तुझे सुदर सगुण असे रूप मला दाखोव मी तुझ्या चरणावर माझे मस्तक ठेवीन २ तुझे
शोभिवत मुख पाहून मी तुला आलिंगन देईन, माझा जीव तुझ्यावरून उतरून टाकीन ३ काही प्रेमाने विचारशील
तर तुला काही गोष्टी प्रेमातील व एकान्तामधील सांगेन काही गुजगोष्टी करीन देवा ४ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, या गोष्टीस मात्र उशीर लावू नकोस माझे अंत करण जाणून तू माझ्यावर कृपा कर. ५
विवरण - तुकाराम महाराजाच्या या एका अभगात पुनः एकदा निर्गुणाऐवजी सगुणाचे महत्त्व स्पष्ट
करण्यात आले आहे मुक्तीऐवजी, मोक्षाऐवजी 'मी भक्त तूं देव ' ही द्वैतावरची भावना या ठिकाणी स्पष्ट आहे
या द्वैताच्या बुडाशी अविनाशी असे अद्वैततत्त्व असले तरी, निर्गुण निराकाराशी सुखसवाद दावय नाही, मुक्त स्थितीत
प्रेमाचे हितगुज नाही, पायावर डोके ठेवणे नाही, आलिंगन नाही, जीव ओवाळून टाकणे नाही आणि भक्तीमध्ये
तर याच भावनेचे सुख अवीट मानले गेले आहे ईश्वर निर्गुण, निराकार आहे व आपण त्याच्यापैकी एक किंवा दोन
व्यक्त झाला ते आपण, असे नुसते ज्ञान उपयोगी पडत नाही त्याचा भोग अनुभूतीत हवा किंवा त्याची प्रतीती
सवादसुखातून यावयास हवी यासाठी एकच तत्त्व दोन या अवस्थेस येते एक होते देव, दुसरे भक्त, एक होतो
परमात्मा, दुसरा बनतो आत्मा पण ही भाषा अधुरी ठरते भक्तास सुदर रूपाची, देखण्या मुखसौंदर्याची, कोवळ्या
चरणकमलाची, गोपिकारमणाची अपेक्षा वाटू लागते भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात भगवंताने आपले विराट
रूप अर्जुनास दाखविले सर्व ब्रह्माण्डांस सामावून घेणारे ते अनंताचे रूप पाहून अर्जुन थकित झाला पण त्याचे मन
भयाने व्याकुळ झाले आणि त्याने व्याकुळतेने श्रीकृष्णाय प्रार्थना केली की, 'तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश
जगन्निवास, हे जगन्निवासा, देवदेवा, प्रसन्न व्हा, आणि देवा, आपले ते पूर्वीचेच स्वरूप मला दाखवा ' अर्जुनाला
श्रीकृष्णाच्या पूर्वीच्याच स्वरूपाचा लोभ जडला कारण ते सुदर होते, सगुण होते भक्ताच्या डोळ्यांना तृप्त कर-
णारे होते अनेक सहस्र हात असलेल्या रूपापेक्षा चारच हात असलेले ईश्वराचे सुदर व परिचयाचे रूप अर्जुनाला
पुन पुन पाहावेसे वाटते हे रूप कसे होते ? 'किरीटिन गदिन चक्रहस्तमिच्छामि त्वा द्रष्टुमह तथैव । तेनैव रूपेण
चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते, किरीट व गदा धारण करणारे, हातात चक्र घेतलेले, पूर्वीसारखेच मी तुम्हास
पाहू इच्छितो म्हणून हे सहस्रबाहो, विश्वमूर्ते, त्याच चतुर्भुज रूपाने तुम्ही प्रकट व्हावे' या अर्जुनाच्या मनातील
१ ठेवू दें
तु गाथा. .५८

४५८ सार्थ तुकारामगाथा
इच्छेचे रहस्य समजावून घेण्यासारखे आहे ईश्वराचे हे मानवी रूपच सौम्य व तृप्ती देणारे असते त्याच रूपाच्या
सहवासात भक्ताचे मन विसावते

या अभंगात ईश्वराचे निर्गुणनिराकार रूपाचे ज्ञान नको, आत्मस्थितीभाव नको, ब्रह्मज्ञान नको, असे म्हटले
आहे याचा अर्थच असा की, त्या परमेश्वरास आपल्या सर्व इंद्रियांनी भोगता यावे, अशी इच्छा भक्ताची असते
चरणावर डोके ठेवण्यापासून एकान्तात हितगुज करण्यापर्यंतच्या विविध बाबतीत भक्तांना मोठे सुख वाटते सर्व
काही एकच आहे, हे ज्ञानाने समजते बुद्धीस त्याचे आकलन होते, पण प्रेमाशिवाय त्यात मग उणीव निर्माण होते
म्हणून भक्त सगुण प्रेमावर येऊन ज्ञानाचाच भाग मागतात परमेश्वराचे विश्वरूप पाहून अर्जुन त्यास म्हणाला,
'ते हें विश्वरूप आपुले । तुम्हां मज डोळां दाविले । तरि माझं मन झाले । तृप्त देवा' अवाढव्य असे हे डोळ्यात न
मावणारे रूप जरी अर्जुनास आनंद देणारे होते, तरी त्यात एक प्रकारची भीती होती या हजार बाहूच्या रूपास
दोन हातांनी कवळावे कसे ? हाही प्रश्न त्याच्या समोर होता त्याच्याशी प्रेमातल्या गोष्टी कशा बोलाव्यात ?
म्हणूनच त्याने जी विनंती ईश्वरास केली, तिचा आविष्कार ज्ञानेश्वरांच्या शब्दात सहजसुंदर अशा स्वरूपात असा
आहे 'परि आता ऐसी चाड जीवीं । जे तुजसी गोडी करावी । जवळीक हे भोगावी । आलिंगूनि तूतें' पण हे सर्व या
विश्वरूपाशी कसे घडणे शक्य आहे ? 'ते येचि स्वरूपीं करू म्हणिजें । तरि कोणे एके मुखेंसीं चावळिजे । आणि
कवण्हा खेंव देइजे । तुझ लेक नाहीं ।' अशी अवस्था असल्याने त्या सगुण रूपाशिवाय भक्तांस कधीच समाधान होत
नाही अर्जुनाला कसे रूप हवे होते ? ज्ञानेश्वरांनी आपल्या सुकुमार शब्दात वर्णन केले आहे 'मस्तकीं मुगुटांतें
ठंचिले । कीं मुकुटा मुकुट मस्तक झाले । शृंगारा लेणें लाधले । अंगाचेनि जया ॥ इंद्रधनुष्याचिये आडणी । मानो
मेघ गगनधरणीं । तैसे आथरिले शारंगपाणी । वैजयंतिया ।' अशा या सुंदर सगुणरूपाची आवड भक्तांच्या मनात
नेहमीच असते अर्जुनाने अगदी बाळुबोलीस येऊन व भगवंतास विनंती केली आहे की, 'हे विश्वरूपाचे सोहळे ।
भोगूनि निवाले जी डोळे । आता होतात आधले । कृष्णमूर्तीलागी ॥ ते साकार कृष्णरूपडे । वाचूनि पाहो नावडे ।
तें न देखतां थोडें । मानिताती हे ॥ आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवाचूनि मान नाहीं । म्हणोनि तैसाचि
साकारू होई । हे सावरो आता ।'

याही ठिकाणी ज्ञानेश्वरांनी या सगुण व साकार मूर्तीपुढे आम्हास मोक्षाचीही काही किंमत नाही, असे
सांगितले आहे सगुणभक्तीपुढे, ईश्वरस्मरणापुढे, भजनापुढे, संतसंगतीपुढे संतांना मोक्ष तुच्छ वाटतो ज्ञानेश्वर,
नामदेव, एकनाथ, तुकाराम या थोर संतांनी मुक्तीची अथवा मोक्षाची कधीही चिंता केलेली नाही उलट भक्ति-
सुखावाचून मोक्ष असला तर तो कटाक्षाने दूर सारला आहे 'सांडुनि पंढरीची वारी । मोक्ष मागती ते भिकारी ।'
'मुक्ति मुक्ति मागो तुज । तरी मज हासती पूर्वज ।', 'मुक्तिपद मी या अभिलाषीन चित्तीं । क्षणी अंतरेतो बाप
तुम्हे ', 'कर जोडूनि दोन्ही मोक्ष पाहे वाट । म्हणे होईन दास हरिदासाचा ।' यासारख्या नामदेवांच्या वचनातून
मुक्तीऐवजी थोर भक्त भक्तीतच कसा सुखावलेला असतो, हे ध्यानात येईल सर्व संतांची साक्ष याच पद्धतीची आहे
'सांडोनि भजनाचा प्रेमा । मुक्ती मागसी अधमा ।', 'न मांगो मुक्ति आणि 'मुक्ति । ती फजीती कोण सोसी'
'मुक्तिपद देता न घे फुकासाठीं । तैं हिंडे पाळुवटीं दोन रूप' 'मोक्ष मुक्तिंतें देवा । नव्हे गोड तया ठावा'
यासारख्या वचनामधून एकनाथांनी मुक्तीपेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केलेले आहे तुकारामबुवांनी तर मोक्षाच्या
तुच्छतेचा आपल्या अभंगातून वर्षावच केला आहे 'मोक्षपदें तुच्छ केलीं या कारणे । आम्हा जन्म घेणें युगायुगीं ।',
'देवा ऐक हे विनंति । मज नको रे हे मुक्ती', 'मोक्ष तुमचा देवा । तुम्ही दुर्लभ तो ठेवा ।', 'नलगे वैकुंठ मोक्ष
सायुज्यता । सुख वाटे घेता जन्म ऐसे ', 'नाहीं चाड मोक्षपदीं, भजनौ आवडीं ।' यासारख्या अनेक चरणातून
मोक्षसुखाऐवजी सगुण रूपाच्या भक्तीचे व संतसंगाचे महिमान तुकोबांनी वर्णन केले आहे

१०२३ मागें शरणागत तारिले बहुत । म्हणती दीनानाथ तुज देवा ॥ १ ॥
पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ २ ॥
अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागर उपमन्या ॥ ३ ॥

सार्थ तुकारामगाथा ४५९
गजेंद्रपशु नाडियें¹ जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥ ४ ॥
प्रल्हाद अग्नीत राखिला जळात² । विषाचे अमृत तुझ्या नामें ॥ ५ ॥
पाडवा सकट पडता जडभारी । त्याचा तूं कैवारी नारायणा ॥ ६ ॥
तुका म्हणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनिया मात शरण आलो ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - दीनानाथ-गरिबाचा नाथ, अजामेळ-कान्यकुब्ज देशातील दुराचारी ब्राह्मण, गणिका-
वेश्या, पिंगला, भिल्ली-शबरी, धुरु-ध्रुव, उपमन्यू-व्याघ्रपादाचा मुलगा, गजेंद्रपशु-गजेन्द्र हत्ती, नाडियें-दस्त
केले, जळचरें-मगरीने, जडभारी-मोठे संकट, मात-कीर्ती
अर्थ - देवा, यापूर्वी तुम्ही पुष्कळ पातकी लोकांचा उद्धार केलेला आहे म्हणूनच तू दीनाचा, गरिबाचा
नाथ आहेस ना ? १ त्यावेळी तुम्ही कुणाचाही अपराध पाहिले नाहीत, की कुणाची जात कोणती आहे ? कूळ
कोणते आहे ? हेही पाहिले नाही अजामेळ, गणिका, भिल्लीण यासारखे हीन व पातकीही तू तारलेस २ त्या
ध्रुव बालकास तू ध्रुवस्थानाच्या अढळ पदावर बसविलेस त्या उपमन्यू बालकास दुधाचा समुद्र मिळवून दिलास. ३
गजेन्द्र नावाच्या हत्तीस पाण्यातील एका मकराने पकडले तेव्हा, त्याला या संकटातून तूच ना राखलेस ? त्याचे
तूच ना रक्षण केलेस ? ४ प्रल्हादासारख्या विष्णुभक्तास त्याच्या पित्याने अग्निकुंडात टाकले, तेव्हा त्याचे रक्षण
तूच देवा केलेस त्याचे पाण्यापासूनही रक्षण केलेस त्याच्या मुखात जाणाऱ्या विषाचे अमृत देवा, केवळ तुझ्याच
नामामुळे झाले, हे खरे ना ? ५ त्या पांडवाना त्याच्या आयुष्यात मोठमोठी संकटे थोडी का आली ? पण नारायणा,
त्याचा कैवार घेऊन तूच त्यांना वाचवीत होतास तूच त्याचे अनेक प्रसंगी रक्षण केलेस ६ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, तू अशा प्रकारे अनाथाचा नाथ आहेस अशी ही तुझी कीर्ती ऐकून मी तुला शरण आलो आहे ७
विवरण -आपणास ईश्वराने तारावे, आपणावर कृपा करावी, म्हणून थोर भक्त मागचे दाखले देत असतात
याही अभंगात तुकोबांनी अजामेळ, गणिका, ध्रुव, उपमन्यू गजेन्द्र प्रल्हाद, पांडव इत्यादीची उदाहरणे नेहमीप्रमाणे
दिलेली आहेत मागे अभंग क्र २५७, ३७२, ४२७ इत्यादीमधून वरील अभंगातील काही कथांचे संदर्भ आलेले
असल्यामुळे त्या त्या ठिकाणचे अर्थ व विवरण पाहावे येथे फक्त ध्रुवाची कथा व गजेन्द्रमोक्षाची कथा याचा संदर्भ
थोडक्यात पाहू ध्रुव हा उत्तानपाद राजाचा सुनीती नावाच्या पत्नीपासून झालेला मुलगा, हा मोठा भगवद्भक्त
होऊन गेला एकदा याच्या सावत्र आईने, सुरुचीने, सवतीमत्सराने ध्रुवास उत्तानपादाच्या मांडीवरून खाली ओढले,
कठोर शब्दांचे भाषणही तिने केले विषण्ण ध्रुव रडत रडत आपल्या आईजवळ गेला आपल्यावर ईश्वराची कृपा
नाही म्हणूनच आपणास हे दुःख भोगावे लागले, असे त्यास आईने सांगितल्यावर ध्रुव ईश्वरप्राप्तीसाठी तपश्चर्या
करण्यासाठी रानावनात निघून गेला तेथे नारदानी त्याला 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र दिला या मंत्राच्या
शास्त्राने बालध्रुवाने तपश्चर्या केल्यावर ईश्वर प्रसन्न झाले व त्यांनी त्याची भक्ती पाहून त्याला अढळपद दिले, अशी
पुराणातून कथा आहे तुकाराम महाराजांनी मोठ्या कौशल्याने 'अढळपदीं बाळ बैसविला धुरु' असा सार्थ उल्लेख
केला आहे
भगवंताने गजेंद्राचे रक्षण कसे केले, याविषयीही कथा पुराणातून सापडते अगस्त्य मुनीच्या शापाने इंद्रद्युम्न
नावाचा एक राजा हत्तीच्या जन्मास जाऊन त्रिकूट गिरीवर निवास करीत होता तहानेने व्याकूळ झालेला असताना
एकदा हा सरोवरात पाणी पिण्यासाठी व जलक्रीडेसाठी गेला असताना, त्याचा पाय पाण्यातील एका मगरीने धरला
हा मगर अथवा नक्र हा पूर्वजन्मीचा गंधर्व असून देवलमुनीच्या शापाने या नक्राच्या जन्मास आला होता गजेन्द्र
संकटात सापडताच त्याचे आप्तस्वकीय सर्व त्यास सोडून गेले मकराची मिठी तीव्र होत होती अशा संकटप्रसंगी
गजेंद्राने भगवंताची स्तुती केली व त्यानंतर श्रीहरीने येऊन स्वतःच्या सुदर्शन चक्राने नक्रास मारून गजेन्द्राचे रक्षण
केले ईश्वराच्या कृपेने पुढे गजेन्द्र व नक्र असे दोघेही वैकुंठाला गेले असल्याची कथा आहे तुकाराम महाराजांनीसुद्धा
या गजेन्द्रकथेचे अनेक उल्लेख आपल्या अभंगातून केलेले आहेत 'गजेन्द्र तो हस्ती सहस्रन वरुपें । पल्लवामाजि नक्रें
१ नाडिला, २ जळात

४६० सार्थ तुकारामगाथा
पीडिलासे' (अभंग क्र ३०८७) व 'राजेंद्र पशू आर्ते मोकलीला । तो तुज स्मरला पाडुरंग (अभंग क्र २४५५)
असे दोन स्वतंत्र अभंगच बुवानी गजेन्द्राच्या चरित्रकथेवर लिहिलेले आहेत
१०२४ तुझा शरणागत जालो मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥ १ ॥
पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आता साभाळी मायबापा ॥ २ ॥
अनाथाचा नाथ बोलतील सत । ऐकोनिया मात विश्वासलो ॥ ३ ॥
न करावी निरास न धरावें उदास । देईं याचकास कृपादान ॥ ४ ॥
तुका म्हणे मी तो पातकाची रासी । देईं पायापाशीं ठाव देवा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - अंकित-स्वाधीन, मात-गोष्ट, निरास-निराशा
अर्थ - देवा, मी तुझ्या स्वाधीन झालेलो असून तुलाच शरण आलेलो आहे पांडुरंगा, माझे काही तरी
हित तुम्ही करावे असे वाटते १ दया, तुझी पतिताना पावन करण्याची जी कीर्ती आहे, ती तू आता मोठेपणे
सांभाळावीस २ हे सर्व संत तुला तू अनाथाचा नाथ आहेस असे बोलतात, त्याची ही गोष्ट मोठ्या विश्वासाने मी
हृदयाशी धारण केली आहे ३ देवा, माझी निराशा तुम्ही कधी करू नये माझ्यासबंधी तुम्ही उदासही राहू नये
या याचकास तू कृपेचे दान द्यावेस देवा ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी तर पातकाची रास आहे परंतु
तू तुझे ब्रीद ध्यानात घेऊन मला आपल्या पायापाशी आश्रय द्यावास ५
१०२५ सर्वस्वाचा त्याग तो सदा सोवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥ १ ॥
सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसे ॥ २ ॥
घडे ज्या उपकार भूतांची ते दया । आत्मस्थिति तया अंगीं वसे ॥ ३ ॥
नो' बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनि तो जनीं जनार्दन ॥ ४ ॥
तुका म्हणे वर्म जानितल्याविण । पावे करिता सीण सांडीमाडी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - सत्यवादी-खर बोलणारा, सांडीमाडी-सोडणे, धरण
अर्थ - ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे, तो नेहमीच सोवळा असतो अग्नी ज्याप्रमाणे कोणत्याही विटा-
ळाने दूषित होत नाही, तसा तो असतो १ खरे बोलणारा संसार करीत असला तरी, तो पाण्यातील कमळाप्रमाणे
पाण्यात राहूनही, संसारात राहूनही आसक्त असत नाही २ ज्यांना भूतमात्राची दया येते व ज्याच्या हातून
त्याच्यावर उपकार होतो, त्याच्या अंगी आत्मस्थितीचा भाव निर्माण झालेला असतो असे समजावे ३ जो दुसऱ्याचे
गुणदोष बोलत नाही कानानेही ऐकत नाही, तो जगात वावरत असूनही जनार्दनाप्रमाणेच असतो ४ तुकाराम
महाराज म्हणतात, परमार्थाचे नीट वर्म जाणून घेतले नाही तर, उगाचच काही धारण करणे, काहीचा त्याग करणे
याचा शीण मात्र व्यर्थ होतो ५
१०२६ कुळधर्म ज्ञान कुळकर्म साधन । कुळधर्मे निधान हातीं चढे ॥ १ ॥
कुळधर्मे भक्ति कुळधर्मे गति । कुळधर्मे विश्रांति पाविजेल ॥ २ ॥
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्मे सार साधनाचे ॥ ३ ॥
कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान । कुळधर्मे पावन परलोकींचि ॥ ४ ॥
तुका म्हणे कुळधर्म दावी देवीं देव । ययाविध भाव जरीं होय ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - निधान-ठेवा
अर्थ - आपण ज्या कुळात जन्मास आलो आहोत, त्याच कुळधर्माचे ज्ञान करुन घ्यावे व ह्याचेच साधन
करावे. त्यामुळेच आपल्या हातात श्रीहरीच्या कृपेचा ठेवा प्राप्त होईल १ कुळधर्माप्रमाणे वागणे हीच भक्ती व
१ ना

सार्थ तुकारामगाथा ४६१
हीच गती होय. कुळधर्माच्या योगानेच उत्तम प्रकारची विश्रांती आपल्या मनास मिळत राहील. २ दुसऱ्यावर दया
करण्याचाच आपला कुळधर्म आपण पाळावा. उपकार करणे, हाही एक कुळधर्मच आहे. सर्व साधनांचे सार म्हणजे
आपल्या कुळाचा धर्म होय. ३ कुळधर्म चांगल्या रीतीने पाळल्यामुळेच मानसन्मान होतो, महत्त्व प्राप्त होते. कुळ-
धर्मामुळेच आचरण पवित्र होऊन परलोकाची उत्तम गती प्राप्त होते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा जसा
भाव असेल, तशा प्रकारच्या कुळधर्माची प्राप्ती आपणास आपला देव अथवा देवी करून देतील. ५
१०२७ पुण्य परउपकार पाप ते परपोडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥ १ ॥
सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणीक हैं वर्म नाहीं दुजें ॥ २ ॥
गति तेचि मुखीं नामाचे स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥ ३ ॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥ ४ ॥
तुका म्हणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - परउपकार-दुसऱ्यावर उपकार, परपोडा-दुसऱ्यास दुख, जोडा-तुलना, अनर्गळा-
स्वच्छंदी
अर्थ - दुसऱ्यावर उपकार करणे हेच श्रेष्ठ प्रकारचे पुण्य होय व दुसऱ्यास त्रास देणे हे खरे पाप आहे.
याशिवाय दुसरे पापपुण्य कोणतेही नाही १ सत्याने वागणे, हाच खरा धर्म असून असत्याने वागण्याने पापफर्म मात्र
वाढते याखेरोज धर्माचे वर्म दुसरे नाही. २ मुखामध्ये एकसारखे प्रभूचे नाम असणे, हीच एक गती होय पण
यापासून विन्मुख असणे हीच अधोगती होय. ३ साधुसंतांची संगत हा एक प्रकारचा स्वर्गवास असून सत्सगती-
विषयी उदास असणे, यास स्वच्छंदी व उदासवाणा नर्क समजावा. ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे हित
आणि अहित कशात आहे, यासंबंधी स्पष्टता आहे. जे जसे उचित असेल तसे तुम्ही करा. ५
विवरण.-पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय,
अधर्म म्हणजे काय, याचा मार्मिक निवाडा तुकाराम महाराजांनी या अभंगात दिलेला आहे दुसऱ्याचे दुख जाणून त्यावर
उपकार करणे, हे पुण्य व दुसऱ्यास विनाकारण पीडा देणे, त्रास देणे, हे पाप अशी साधी, सोपी व सुटसुटीत व्याख्या
तुकारामबुवांनी येथे केली आहे ती भागवतधर्माच्या परंपरेस धरून अशीच आहे जे रंजले गांजले असतील, जे पीडित
आहेत, वचित आहेत, त्यांचे दुख दूर करणे, हा साधुसंतांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग आहे जगातील पापताप
दूर करावेत, खळांची बुद्धी वाईट असते ती चांगली व्हावी, सबंध विश्व धर्मप्रकाशाने धवलित व्हावे, हे खरे म्हणजे
संतांचे कार्य 'तंसी बाधिलीं सोडीत । बुडालीं काढीत । साकडीं फोडित । आर्तीचिया।' आर्तांची दुःखे फेडणे व
बुडणाऱ्यास वर काढणे हेच खरे म्हणजे संतांचे जोवितकार्य पाचसाठी परउपकार व परपीडा याचा उल्लेख संत
करीत असतात दुसऱ्यास पीडा न देण्याचे कारण केवळ त्यांच्या पोटी कळवळा असतो, किंवा सहानुभूती असते, हेच
नसून सर्वत्र पसरून राहिलेल्या आत्मतत्त्वाची जाणीव त्यांना फार मोठ्या प्रमाणावर असल्याने 'कोणाही जीवाचा
न घडो मत्सर ' असे त्यांना मनापासून वाटत असते
१०२८ न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां यांयां न वजे ॥ १ ॥
न वजे यायां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ २ ॥
न वजे वांयां कांहीं केल्या तीर्थ । अथवा का व्रत वायां न वजे ॥ ३ ॥
न वज वांयां जाले संतांचे दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥ ४ ॥
तुका म्हणे भाव असतां नसतां । सायास करिता वांयां न वजे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- न वजे-जाणार नाही.

४६२
सार्थ तुकारामगाथा
अर्थ - श्रीहरीची कथा आपण स्वतः वाचली किंवा दुसऱ्याकडून ऐकली, तर ती काही वाया जाणार नाही १
देवळात जाऊन देवाचे दर्शन जर घेतले तर, ते काही वाया नाही जायचे देवाची पूजा केली तर, ती वाया जाणार
नाही २ एखाद्या तीर्थयात्रेस जाता आले अथवा एखाद्या व्रताचे आचरण करता आले तर, ते काही वाया जाणार
नाही ३ साधुसंतांचे दर्शन झाल्यास काही वाया जाणार नाही आचरण जर शुद्ध असेल तर तेही वाया जाणार
नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, मनात श्रेष्ठ प्रकारचा भाव असो नसो, चांगल्या कामाचे श्रम कधी वाया
जाणारे नसतात झालाच तर त्याच्यापासून फायदाच होत असतो ५
१०२९ चित्तीं धरीन मी पाऊले सुकुमार । सकळ बिढार संपत्तीचे ॥ १ ॥
कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ २ ॥
पाहेन श्रीमुख साजिरे सुंदर । सकळा अगर लावण्याचा ॥ ३ ॥
करिन अगलग बाळकाचे परी । बैसेन तो वरी नुतरों कडिये ॥ ४ ॥
तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मने सोय विठोबाची ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - बिढार-बिऱ्हाड आश्रयाचे स्थान, वल्ली-वेल तनु-शरीर अगर-खाण, नुतरी-
उतरणार नाही, कटिये-कडेवरून
अर्थ - या देवाची ही सुकुमार पावले मी माझ्या हृदयाशी धारण करीन कारण सर्व प्रकारच्या संपत्तीचे
हेच एक आश्रयस्थान आहे १ अमृताची वेल असणारे या श्रीहरीचे नाम हेच मी माझ्या मुखात सतत धारण
करीन त्यामुळे त्रिविध तापानी संतप्त झालेला माझा देह हा अतिशय शीतल होईल २ सर्व प्रकारच्या सौंदर्याची
खाणच असलेले असे हे या श्रीहरीचे सुंदर व शोभिवंत मुख मी पाहात राहीन ३ या देवाच्या अंगाशी लडिवाळ
पणा एखाद्या बालकाप्रमाणे मी धरीन मी कौतुकाने त्याच्या कडेवर जाऊन बसेन तो परत खाली उतरणारच
नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी आपण ज्या भावाने जो भजतो, त्या भावाने तो आश्रयास येतो
म्हणून तर याची सवय माझ्या मनाने धरलेली आहे ५
१०३० बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचे दुःख काय जाणे ॥ १ ॥
तयापरी करीं पाळण हे माझें । घेउनिया ओझें सकळ भार ॥ २ ॥
कासया गुणदोष आणिसिल मना । सर्व नारायणा अपराधी ॥ ३ ॥
सेवाहीन दीन पातकाची राशी । आता विचारिसी काय ऐसें ॥ ४ ॥
जेणे काळें पायीं अनुसरले चित्त । निर्धार हे हित जाले ऐसे ॥ ५ ॥
तुका म्हणे तुम्ही तारिले बहुता । माझी काहीं चिंता असो दे वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कासया-काय म्हणून
अर्थ - देवा एखादे बालक आपल्या मातेस आपली तहानभूक सांगत असते त्यावर उपाय काय करायचा
हे काही ते कधी जाणत नाही त्याचे काम फक्त आईस भूक, गरज सांगणे हेच होय १ त्याप्रमाणे देवा, तुम्ही
माझे पालनपोषण करावे माझा सर्व भार आता देवा तुम्हीच घ्यावा २ नारायणा, माझे गुणदोष आता तू मनात
तरी का आणतोस रे? मी अपराधाची रासच आहे असे समज ना रे ३ मला तुझी सेवा नीट घडलेली नाही मी
दीन आहे, पातकी आहे आता काय काय माझ्यात दोष नाहीत म्हणून विचारतोस? सर्व काही आहेत असेच
समज ४ ज्या काळात माझे चित्त तुझ्या पायाशी स्थिर झाले, त्याच वेळी मी मानले की, माझे हितच होणार ५
तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही पुष्कळजणांचे रक्षण केले आहे त्यात माझी थोडी तरी चिंता
तुम्हास असावी ६

सार्थ तुकारामगाथा ४६३
विवरण - भक्तिभावातील वात्सल्याच्या दृष्टीने तुकाराम महाराजांचा हा 'एक अतिशय प्रसिद्ध व थोर
अनुभूतीचा अभंग आह बाळाने आपणास लागलेली तहान भूक बाईस सांगावी फक्त त्याला पुढल्या उपायाचे चिंतन
करण्याचे काय कारण आहे ? आईच त सर्व पाहणार नाही का? खरे म्हणजे मुलास लागलेली भूक आईसच समजते
आधी कारण तिचे त्याकडेच सारखे लक्ष असते तुकाराम महाराज म्हणतात, या आईच्या वात्सल्याने परमेश्वराने
आपले पालन करावे ईश्वरास, विठ्ठलास आई म्हणून सबोधण्याची रीत फार पूर्वीपासून साधुसतांनी सुरू केलेली आहे
बाप, बधू, पत्नी इत्यादी नात्वात थोडासा दूरत्वाचा अश उरतो पण आईचे नाते असे आहे की, त्यात उभयताना
कसलाच सकोच धरणे आवश्यक नसते सहजसुलभ असा हा निर्व्याज प्रेमाचा आविष्कार असतो आईवर रागवावे, रुसावे,
तिच्याशी भाडावे, तिच्या मांडीवर बसावे, तिच्याजवळ हट्ट करावा, तिचा पदर धरावा, हे सब लडिवाळ प्रकार
फक्त आईच्याच नात्यात सभवतात, म्हणून तुकारामबुवासारख्या थोर भक्ताने विठ्ठलास आई म्हटले आहे माउली
म्हणूनच तिची आळवणी केली आहे पंढरपूरच्या सप्रदायात याच वात्सल्याच्या भावनेने सर्वत्र विठ्ठलाची उपासना
चालू आहे
विठ्ठल आपली आई व आपण त्याचे लाडके, हट्टी, चुवणारे एक मूल या वात्सल्यभादावरील तुकोबांचे
अनेक अभग आर्ततेने चित्त झालेले बाहूत भक्तीच्या सहजभाव्य अशा आविष्कारांत डोळ्यात अश्रू येणे, ऊर भरून
येणे, अष्टसात्त्विक भाव जागृत होणे व हृदय द्रवून जाणे, विरघळून जाणे, याचा अनुभव तुकाराम महाराजांच्या या
भावावरील निश्चयाने येतो ससारतापाने त्रस्त झालेल्या, रोजच्या व्यवसायातील चिंतांनी खगलेल्या, मानसिक
चिंतानी ग्रस्त झालेल्या माणसांस तुकाबांचे हे अभग म्हणजे एक प्रकारचे श्रेष्ठ वरदानच होय व्यावहारिक क्षेत्रातील
विविध तापाचा उन्हाळा तुकोबांच्या या प्रकारच्या अभगांच्या सान्निध्यात सहज सुखद असा वाटावा
तुकोबांच्या या अमृतमधुर व चद्रिवेप्रमाणे शीतल असणाऱ्या वचनांचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी
घ्यायासारखा आहे ज्या तुकोबांनी हा श्रेष्ठ अनुभव भोगला त फारच श्रेष्ठ, पण ज्याच्या कानावर तो अभंगहपांनी
पडला व ज्याचे चित्त शात झाले, तेही तितकेच धन्य मानावयास हवेत ससारग्रस्त व तापत्रयाने भयभीत झालेल्या
माणसाने डोळे मिटावत, श्रीविठ्ठलाचे रूप डोळ्यापुढे आणावे आणि मुखाने उच्चार करावा, 'माये मोकलिले कोठें
जाये बाळें ? ', 'मायबापापुढें लाडिके लेकरू । तैंसे बोल करू कवतिके ', 'घेई उचलोनि पुसे तानभूक । पुसी मार्ते
मुख पीतांबरें ', 'कोण आम्हा पुसे सिजलें भागले । तुजविण उगले पाडुरगा ?' 'वेडें वाकुडें बाळकाचे बोल । करिती
नवल मायबाप ', 'तू माउलीहून मायाळ । चद्राहूनी शीतल । पाण्याहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा, 'नलगे
मापेंसी बाळ निरवावे । आपल्या स्वभावे ओडे त्यासी ', 'विठ्ठल माझी माय । आम्हा सुखा उणे काय ' अशा सारख्या
शेकडो वचनाचा उच्चार मुखातून होत असताना अत करण द्रवून येईल शीतल होईल अपार अस प्रभुप्रेमाचे सुख
अनुभवास येईल तुकारामबुवांनी जे भोगले ते थोड्या अशान का होईना पण प्रतीतीस येईल
१०३१ जीवनावाचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥ १ ॥
न सपडे जाले भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ २ ॥
मातेचा वियोग जालिया हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥ ३ ॥
सागावे ते किती तुम्हासी प्रकार । सकळाचे सार पाप दार्बी ॥ ४ ॥
येचि चिंते माझा करपला भीतर । का नेणो विसर पडिला माझा ॥ ५ ॥
तुका म्हणे तू हे जाणसी सकळ । यावरि कृपाळ होई देवा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - जीवनावाचूनि-पाण्याशिवाय, न सापडे-सापडत नाही, भीतर-मनाचा गाभा
अर्थ - पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो तसा देवा, तुझ्यावाचून माझा जीव तळमळत आहे
हो १ भूमीमध्ये दडलेले धन सापडत नसले म्हणजे जसे लोभी माणसाचे मन तडफडते, तशीच अवस्था माझ्या
मनाची झालेली आहे २ आईचा वियोग झालेल्या मुलाचे भन जसे कासावीस होते, तोच कळवळा माझ्या पोटात

४६४ सार्थ तुकारामगाथा
देवा, तुमच्यासाठीं आहे हें नीट जाणावे तुम्ही. ३ देवा, आणखी माझ्या मनाची ही अवस्था तुम्हांस किती प्रका-
रांनी सांगावी हो ? सर्व प्रकारांचे सार हेच कीं, तुम्ही तुमच्या पायांचे दर्शन मला लौकर द्यावे. ४ तू मला भेट
देशील न देशील, याच चिंतेने माझ्या मनाचा गाभा करपून गेला आहे. देवा, माझा तुला एवढा विसर कां पडला
आहे हेंच मला समजत नाहीं. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, हे तू सर्व जाणीत कां नाहींस ? सर्व काही तू
जाणून आहेस. तरी देवा तू मजवर कृपा कर मा एकदा. ६
१०३२ शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥ १ ॥
आळविती त्यांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ २ ॥
गांजलियांचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥ ३ ॥
भागलियाचा होईं रे विसांवा । परिसावी केशवा १ विज्ञापना ॥ ४ ॥
अंकिताचा भार वागवावा मायां । परिसावी अनंता विज्ञापना ॥ ५ ॥
तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - विज्ञापना-विनंती, परिसा-ऐका, धांवणे-रक्षण, अंकिताचा-स्वाधीन असलेल्याचा.
अर्थ :- देवा, जे शरण आलेले तुझे भक्त आहेत, त्यांना तू पाठ न दाखविता, त्यांच्यावर कृपाच करावीस
अशी हे जगजेठी, तुला नम्र विनंती आहे. १ जे मनोभावे तुझी आळवणी करतात, त्यांना स्वीकृतीचे, कृपाप्रसादाचे
उत्तर झटकन देऊन तू त्यांना तृप्त करावेस अशी विनंती आहे देवा. २ देवा, जे रंजलेले, गांजलेले, त्रासलेले आहेत,
त्याचे तू रक्षण करावेस, नारायणा, ही माझी विनंती तुम्ही ऐकावी. ३ जे दमलेले आहेत, भागलेले आहेत,
त्यांचा देवा, तू विसावा व्हावास. त्यांच्या विश्रांतीचे स्थान व्हावेस, केशवा, ही माझी विनंती तू ऐक ना. ४ जे
तुझ्या स्वाधीन झाले आहेत, त्यांच्या रक्षणाचा भार देवा, तूच तुझ्या मस्तकावर घ्यावयास हवा. ही ही माझी विनंती
अनंता, तू ऐकावीस. ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता आम्हांस तुम्ही बिल्कुल विसरून जाऊ नये.
देवा, ही एक विनंती माझी तुम्ही ऐका ना. ६
१०३३ कोण आम्हां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥ १ ॥
कोणापाशीं आम्हीं सांगावें २ सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ २ ॥
कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार ३ कोण दुजा ॥ ३ ॥
कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥ ४ ॥
कोणावरी आम्हीं करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥ ५ ॥
तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - पुसे-विचारील, सिणले भागलें-दमलेले, त्रासलेले, उगलें-उगाच, आपोआप, पार-
(भार)-ओझे, भातुके-खाऊ.
अर्थ :- देवा, आम्ही दमलेले आहोत, शिणलेले आहोत, त्रासलेले आहोत; अशा वेळी पांडुरंगा, तुझ्या-
शिवाय उगाच आमची चौकशी प्रेमाने दुसरे कोण रे करणार आहे ? १ देवा, आम्ही आमच्या मनाचे सुखदुःख
कुणापाशी सांगावे रे ? कोण माझी तहानभूक निवारण करील ? २ मला हा जो त्रिविध ताप झालेला आहे, तो
तुझ्याशिवाय कोण रे दूर करील ? माझ्या मनावरचे हे ओझे कोण दूर करणार आहे ? ३ देवा, माझ्या इच्छेस
येईल तो खाऊ मी कुणाजवळ रे मागावा ? आणि असा हट्ट घेतल्यावर कौतुकाने, प्रीतीने माझी समजूत तरी देवा,
तुझ्याशिवाय दुसरे कोण काढणार आहे रे ? ४ आम्ही प्रेमाने, हक्काने कुणावर रे सत्ता करावी ? आमचा हा त्रास
सहन करणारा कोण दुसरा आहे ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, अरे देवा, तूच माझा स्वामी असल्यामुळे तूच
सर्व कांहीं जाणणार आहेस, असे मी मानतो. नारायणा, तुमच्या चरणांवर माझे दंडवत असो. ६
१ देो, २ सांगो, ३ भार.