सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 504, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४६२
सार्थ तुकारामगाथा
अर्थ - श्रीहरीची कथा आपण स्वतः वाचली किंवा दुसऱ्याकडून ऐकली, तर ती काही वाया जाणार नाही १
देवळात जाऊन देवाचे दर्शन जर घेतले तर, ते काही वाया नाही जायचे देवाची पूजा केली तर, ती वाया जाणार
नाही २ एखाद्या तीर्थयात्रेस जाता आले अथवा एखाद्या व्रताचे आचरण करता आले तर, ते काही वाया जाणार
नाही ३ साधुसंतांचे दर्शन झाल्यास काही वाया जाणार नाही आचरण जर शुद्ध असेल तर तेही वाया जाणार
नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, मनात श्रेष्ठ प्रकारचा भाव असो नसो, चांगल्या कामाचे श्रम कधी वाया
जाणारे नसतात झालाच तर त्याच्यापासून फायदाच होत असतो ५
१०२९ चित्तीं धरीन मी पाऊले सुकुमार । सकळ बिढार संपत्तीचे ॥ १ ॥
कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ २ ॥
पाहेन श्रीमुख साजिरे सुंदर । सकळा अगर लावण्याचा ॥ ३ ॥
करिन अगलग बाळकाचे परी । बैसेन तो वरी नुतरों कडिये ॥ ४ ॥
तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मने सोय विठोबाची ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - बिढार-बिऱ्हाड आश्रयाचे स्थान, वल्ली-वेल तनु-शरीर अगर-खाण, नुतरी-
उतरणार नाही, कटिये-कडेवरून
अर्थ - या देवाची ही सुकुमार पावले मी माझ्या हृदयाशी धारण करीन कारण सर्व प्रकारच्या संपत्तीचे
हेच एक आश्रयस्थान आहे १ अमृताची वेल असणारे या श्रीहरीचे नाम हेच मी माझ्या मुखात सतत धारण
करीन त्यामुळे त्रिविध तापानी संतप्त झालेला माझा देह हा अतिशय शीतल होईल २ सर्व प्रकारच्या सौंदर्याची
खाणच असलेले असे हे या श्रीहरीचे सुंदर व शोभिवंत मुख मी पाहात राहीन ३ या देवाच्या अंगाशी लडिवाळ
पणा एखाद्या बालकाप्रमाणे मी धरीन मी कौतुकाने त्याच्या कडेवर जाऊन बसेन तो परत खाली उतरणारच
नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीहरी आपण ज्या भावाने जो भजतो, त्या भावाने तो आश्रयास येतो
म्हणून तर याची सवय माझ्या मनाने धरलेली आहे ५
१०३० बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचे दुःख काय जाणे ॥ १ ॥
तयापरी करीं पाळण हे माझें । घेउनिया ओझें सकळ भार ॥ २ ॥
कासया गुणदोष आणिसिल मना । सर्व नारायणा अपराधी ॥ ३ ॥
सेवाहीन दीन पातकाची राशी । आता विचारिसी काय ऐसें ॥ ४ ॥
जेणे काळें पायीं अनुसरले चित्त । निर्धार हे हित जाले ऐसे ॥ ५ ॥
तुका म्हणे तुम्ही तारिले बहुता । माझी काहीं चिंता असो दे वो ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कासया-काय म्हणून
अर्थ - देवा एखादे बालक आपल्या मातेस आपली तहानभूक सांगत असते त्यावर उपाय काय करायचा
हे काही ते कधी जाणत नाही त्याचे काम फक्त आईस भूक, गरज सांगणे हेच होय १ त्याप्रमाणे देवा, तुम्ही
माझे पालनपोषण करावे माझा सर्व भार आता देवा तुम्हीच घ्यावा २ नारायणा, माझे गुणदोष आता तू मनात
तरी का आणतोस रे? मी अपराधाची रासच आहे असे समज ना रे ३ मला तुझी सेवा नीट घडलेली नाही मी
दीन आहे, पातकी आहे आता काय काय माझ्यात दोष नाहीत म्हणून विचारतोस? सर्व काही आहेत असेच
समज ४ ज्या काळात माझे चित्त तुझ्या पायाशी स्थिर झाले, त्याच वेळी मी मानले की, माझे हितच होणार ५
तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही पुष्कळजणांचे रक्षण केले आहे त्यात माझी थोडी तरी चिंता
तुम्हास असावी ६