सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 63, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३७
अर्थ - दरोराचे विषय, प्रपंचातील सुखदुःखे इत्यादि बाह्य बंधनातून मी गोमूत्राचा शितोडा घेऊन शुद्ध
झालो आहे. आता पुनः तो पीडा मला शिवणार देखील नाही. १ एखाद्या घाणेरड्या बाबतीत हात भरला व मग तो
धुवा हे कशाला हवे ? चालत्या मार्गात अडथळे कशासाठी ? २ परमेश्वराने आपल्यासाठी काय करायचे बाकी
ठेविले आहे ? त्याने जे जे निर्माण केले ते आपल्यासाठीच नाही का ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य
उपाधींचा अहंकार एकदा गेला म्हणजे मग मी-तू असा द्वैतावरचा भाव नाहीसा होतो. दुजेपणा उरत नाही. ४
८१ योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥ १ ॥
अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ २ ॥
मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥ ३ ॥
तुका म्हणे उचित जाना । उगीं सिणा काशाला ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- दमा-दमन करा, ताब्यात ठेवा, सोयरा-आप्त, मिरासी-परंपरागत हक्क, सेत-शेत,
सिणा-श्रम करा
अर्थ - क्षमा हे योगाचे खरे सौभाग्य असून आधी इंद्रियांचे दमन करावे, त्यांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न
करावा १ एकदा देवाशी सख्यत्व जडले, तो सोयरा झाला म्हणजे मग सर्व भाग्याच्या गोष्टी आपल्या घरात येतील
२ शेत आपल्या वंशपरंपरागत हक्काचे असले तरी काही श्रम न करता काही पीक हाती येत नाही. ३ हे तुम्ही
उचित असे जाणून परमेश्वरासाठी इंद्रियदमनाचे तप करा; उगाच इतर व्यर्थ असे प्रयत्न मात्र करून शिणू नका
असे तुकाराम महाराज म्हणतात ४
८२ न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥ १ ॥
तो हे चावटीचे बोल । जन रंजनणें फोल ॥ २ ॥
न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥ ३ ॥
तुका म्हणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- चावटी-उगाच बडबड, फोल-फुकट, सादर-प्रसन्न, स्वाधीन
अर्थ - डोळ्यात पाण्याचा एक थेंबही नाही आणि मनात ईश्वराविषयी प्रेम नाही १ तोपर्यंत त्याचे बोल
उगाच व्यर्थच आहेत. केवळ लोकांना रंजविण्यासाठी केलेली ती वायफळ बडबडच म्हणावी लागेल २ जोपर्यंत
आपला स्वामी, परमेश्वर आपल्या स्वाधीन झाला नाही, त्याची कृपा झाली नाही तोपर्यंत आपल्या बोलाना अपेक्षित
असे फळ मिळत नाही ३ दृष्टादृष्ट होऊन एकमेकाकडे पाहणे होऊन जोपर्यंत भेट झाली नाही तोपर्यंत तुमच्या
वचनात कोणतेच इष्ट असे फळ येणार नाही ४
८३ बाईल सवासिण आई ॥ आपण पितराचे ठायीं ॥ १ ॥
थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ २ ॥
विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥ ३ ॥
तुका म्हणे लंडा । नाहीं दया देव थोडा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वेच-खर्च, अपसव्य-उलटी क्रिया, चरवणीं-भोगान, गाळणी करणे-व्यर्थ घालविणे,
सरविणे, लंडा-धर्मभ्रष्टास
अर्थ - धर्मशास्त्रविरहित वागणाऱ्या एका बेताल माणसाचे वर्णन बुवा येथे करीत आहेत. आपल्या
आईबापाच्या श्राद्धाच्या दिवशी याने ब्राम्हण सुवासिनी जेवण्यास बोलावण्याऐवजी आपली बायकोच सवाष्ण आईच्या
जागी व आपण ब्राह्मण वडिलांच्या जागी असा व्यवहार केला १ अरे दुष्ट माणसा, या धर्मबाह्य कृत्यामुळे तुझे
फारच नुकसान झाले आहे, कारण या सर्व गोष्टी धर्माच्या उलट झाल्या आहेत धर्मशास्त्राच्या विपरीत ही तुझी
१ चरणी