सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 62, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 62

३६ सार्थ तुकारामगाथा
अथ - पुत्रप्राप्तीस हपापलेल्या एका स्त्रीस बऱ्याच दिवसांनी पुत्र झाला, पण तो दुराचारी निघाला काय
त्याचा उपयोग ? या पाश्र्वभूमीवर तुकाराम महाराज म्हणत आहेत, वांझत झाल्यावर मोठ्या उत्सुकतेने कोण्या एका
स्त्रीने आपणास मुलगा झाला हे पाहताच मोठा आनंद व्यक्त केला, पण पुढे हा पोरगा तर मोठाच माडशोर व चोर
निघाला चहाडखोरी करू लागला वाईट चालीचा निघाला काय त्याचा उपयोग ? १ त्याने जिकडे पाहिले तिकडे
लोकांना पीडाच निर्माण झाली त्यामुळे लोक तिरस्काराने त्याच्यावर थुंकले, हेच त्याचे एकमेव भाडवल जमा झाले
या आईच्या हातून मोठीच चूक झाली जन्मतःच तिने यास नष्ट का नाही केले ? २ या दुष्ट मुलाच्या भाराने
भूमी थरथरा कापायाला लागते याचे शरीर म्हणजे कुंभपाक नरकाचे ठिकाणच होय हा नेहमी निष्ठुर उत्तरांनी
बोलत असतो, याची दृष्टी पापी असून चित्तही नेहमी मलीन असते ३ हा धाडाळ दुराचारी असतो, याच्या
बरोबर पापाचा विटाळ असतो तुकाराम महाराज म्हणतात, हा दुष्टच असतो याचा सदैव निषेधच करावा ४
७८ नेंणें गाणे कठ नाहीं हा सुस्वर । घालू तुज भार पांडुरंगा ॥ १ ॥
नेंणे राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥ २ ॥
तुका म्हणे मज चाड नाहीं जना ॥ तुज नारायणा वौंचूनिया ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - कठ-गळा चाड-पर्वा, मात मात-ताल, लय वगैरे
अर्थ - देवा, मला गायनाचे शास्त्र माहित नाही, मला चांगला गळा नाही, मला नीट गाता येत नाही,
माझा आवाज गोड नाही पण पांडुरंगा, माझा सब भार तुझ्यावर आहे १ मला संगोतामधील राग माहित नाहीत,
निरनिराळ्या वेळांच्या घात-मात्राच्या रीतीही मला माहित नाहीत, पण देवा, तुझ्या पायांवर मात्र माझे चित्त
सदोदित असते २ तुकाराम महाराज म्हणतात की मला लोकांची काही पर्वा नाही नारायणा, तुझ्यावाचून या
लोकाचा काय उपयोग आहे ? ३
७९ माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥ १ ॥
तब तया पारखी सिव । लाजे ठाव सांडिता ॥ २ ॥
उष्टावळी करूनि जमा । थुथुनि प्रेमा आणितसे ॥ ३ ॥
तुका म्हणे बाहेरमुदी । आहाच गोविंदों न सरती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उट-कटकट पारखा-परीक्षा करते, सिव-सीमा ठाव-मूळचे ठिकाण बाहेरमुदी-
बाह्यमुद्रा वरवरचे ढोंग आहाच-व्यर्थ न सरती-पोचती होत नाही
अर्थ - सर्व सामान्य कवी असतात ते 'माझी कविता वाचा, पाठ करा' अशी एकसारखी कटकट लोकांच्या
पाठीमाग लावतात १ पण ज्यांची परीक्षा स्वतःच्या गावच्या सीमेवर जाताच होते, व मग आपले स्थान सोडताच
त्यानाच लाजल्यासारखे होते २ कारण मागच्या काही कवींच्या काव्यातील शब्द उसने आणून वृथा कष्टाने प्रेम
व्यक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, याचे बाहेरचेच ढोंग तेवढे पाहून घ्यावे ते
व्यर्थ असते कारण ईश्वराच्या ठिकाणी ते कवित्व कधीच पोचत नसते ४
८० उपाधीच्या नावे घेतला सितोडा । नेदू आता पीडा आतळो ते ॥ १ ॥
पाशासाठीं हात भरूनि धुवावे । । चालतिया गोवे मारगासि ॥ २ ॥
काय नाहीं देवे करूनि ठेविले । असे तें आपुले ते ते ठायीं ॥ ३ ॥
तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार । तेव्हा आपपर बोळविले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उपाधी-बाह्य बंधने, शितोडा घेणे-शुद्ध होण, नदू-न येऊ, आतळणे-शिवू देणे, गोवे-
अडथळे आपपर-मी-तू असा भाव बोळविले-निरोप दिला घालविले