सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 64, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 64

३८ सार्थ तुकारामगाथा
करणी आहे २ तू तुझ्या आयुष्याची अखेर व्यर्थपणे विषयाच्या भोगातच केली आहेस ३ तुकाराम महाराज
म्हणतात, अशा धर्मभ्रष्टाला कसलीही दयामाया उरत नाही या अधमाला देव आणि धोंडा सारखाच वाटतो ४
८४ दानें कापे हात । नावडे तेविशीं मात ॥ १ ॥
कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ २ ॥
न वजती पाय । तीर्था म्हणे वेचू काय ॥ ३ ॥
तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नावडे-आवडत नाही, ते विशीं-त्याबद्दल मात-गोष्ट चावटीचे-उगाच बडबडीचे
मिथ्या-व्यर्थ, नवजतां-वळत नाही वेचू-खर्च करू
अर्थ - दान देताना त्याचा हात थरथर कापतो, मनातून त्याला दान द्यायला नकोच असते, दानाविषयी
कुणी गोष्ट काढली तरी ती त्याला आवडत नाही १ दुधात हिंगाचा खडा टाकल्यावर जशी स्थिती होते तसेच
याच्या व्यर्थ बडबडीमुळे होते याचे सर्व बोल फुकट असतात २ तीर्थयात्रेसाठी याची पावले वळत नाहीत तो
म्हणतो तेथे जाऊन खर्च कसा करू ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच्या मनातच नाही तर ते आचरणात कसे
दिसणार ? ४
८५ वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥ १ ॥
निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके घणी वरी ॥ २ ॥
न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥ ३ ॥
सांडी थोरपणा । तुका म्हणे सवे दीना ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - निवे-संतुष्ट होते घणी-समाधान सांडी-सांडून देवा
अर्थ - केवळ गाई वळण्याच्या रूपाने प्रकट झालेल्या श्रीकृष्णस संतुष्ट करण्यास फार लागत नाही
१ केवळ भक्तिप्रेमाचा मनापासूनचा एखादा उद्गारही त्याला पुरा होतो त्यावर तो संतुष्ट होतो कुणाच्याही
या प्रेमाने तो तृप्त होतो, समाधान पावतो २ त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी जपजाप्य, यज्ञयाग वगैरे प्रकट काही
करावे लागत नाही, काही मानाचे, आदर दर्शविण्याचे इतर उद्योगही करण्याची जरूरी नाही ३ तुकाराम महाराज
म्हणतात, प्रेमभावाने भजन्या या दीनासाठी आपले मोठेपण सोडून देवही त्याच्याशी सख्यत्व पत्करतात, त्याच्यावर
कृपा करतात ४
८६ मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥ १ ॥
आधीं घे रे रामनाम । सामा भरी हा उत्तम ॥ २ ॥
नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥ ३ ॥
धन मेळविले कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥ ४ ॥
कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥ ५ ॥
तववरि मिरविसी बळ । जव आला नाहीं काळ ॥ ६ ॥
तुका म्हणे बापा । चुकवीं चौऱ्यांशींच्या फेपा ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा - मैत्र-मित्र, सामा-सामान कोडी-कोटीच
अर्थ - आयुष्याचे कल्याण व्हावे म्हणून प्रापंचिकास उपदेश करताना बुवा म्हणतात, अनेक मोठेमोठे
मित्र जरी तू जमविलेस तरी शेवटी अंतकाळी त्याचा काही उपयोग होत नाही १ म्हणून तू आधी रामनाम घे
परमेश्वराच्या नामस्मरणाच्या सामानाने भांडवल जपून ठेवावेस हे उत्तम २ नाहीतर यम तुझ्यावर क्रुद्ध होऊन
कराकरा दात खाईलच ३ कोट्यावधी रुपयांचे धन जरी तू मिळविलेस तरी ते यम घेतल्याखेरीज सोडणार