सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 167, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १३९
विवरण - तुकारामबुवांचे आराध्य दैवत पंढरपूरचे श्रीविठ्ठल हेच असले तरी याच श्रीविठ्ठलाच्या म्हणजे
श्रीकृष्णच्या पूर्वावतारी रामचंद्राचा एकनिष्ठ भक्त हनुमंत याची महती भागवत सांप्रदायी साधुसंतांनी विशेष
मानली आहे शक्ती, बुद्धी व स्वामीच्या कार्याविषयी तत्परता याबद्दल हनुमंताचे नाव प्रसिद्ध आहे विठ्ठलरखुमाईच्या
दोन्ही अंगास गरुड व हनुमंत यांचीच जोडी हात जोडून उभी असते 'गरुड हनुमंत पुढे उभे राहती' असे वर्णन
विठ्ठलाच्या प्रसिद्ध आरतीत आहे याच गरुडाचा अवतार मानतात नामदेवांनी याचे चरित्र अगदी थोडक्यात वर्णन
केले आहे 'पिंड धारीनें झडपिला । अंजनीनें तो सेविला ॥ अंजनीच्या तपासाठी । महारुद्र आले पोटीं ॥ चैत्र शुद्ध
पौणिमेसी । सूर्योदयसमयासी ॥ महारुद्र प्रगटले । नामा म्हणे भ्या वदिले-' ॥ भक्ती व शक्ती यांचे प्रतीक असलेल्या
या हनुमंताच्या श्रेष्ठतेचे वर्णन सर्वत्र मिळने एकनाथांनी याचे वर्णन, 'वानराचा वेष सुवर्ण पौवीन । दिसतों
शोभायमान कुंडले तर्णी । जन्मताची जेणे सूर्याते धरियेलें । इंद्रादिका दिले थोर मार' अशा शब्दांत केले आहे
खालील तीनचार अभंगातून तुकारामबुवांनी हनुमंताची स्तुती करून त्याच्या कार्याची ओळख करून दिली
आहे हनुमंत हा सुमेरुचा राजा केसरिन व गौतमकन्या अंजनी यांचा पुत्र होय वायुपुत्र म्हणूनही याचा लौकिक
आहे दशरथाच्या पुत्रकामेष्टी यज्ञातील पायसाचा भाग घारीच्या ताडून पडलेला अंजनीच्या ओंजळीत पडला व
त्याच्या सेवनाने तिला हा पुत्र झाला या मोठ्या बलवान, ज्ञानवान सेवकाचा महिमा रामायणात विशेषत्वाने दिसून
येतो रावणान सीतेचे हरण केल्यानंतर तिच्या शोधासाठी जे प्रयत्न झाले त्यात याच्या प्रयत्नाचे महत्व विशेष होत
हरप्रयत्नांनी याने समुद्र उल्लंघून लंकेत प्रवेश केला अशोकवनातील सीता याने शोधून काढली रामाची मुद्रा दाखवून
खूण पटविली नंतर याने अशोकवनाचा नाश केला रावणाकडून आलेल्या जंबुमालि विरूपाक्ष इत्यादी पाच
सेनापतींचा याने पराभव केला नंतर इंद्रजिताने यास ब्रह्मास्त्राने बांधून रावणासमोर आणले याचा मृत्यू शेपटीत
असल्याने शेपटीस आग लावण्याचे ठरले शेपटीस सर्व लंकेतील वस्त्र गुंडाळली तरी ती उघडीच राही, तेल
ओतल्यावर रावणाने फुंकर मारल्याबरोबर त्याची दाढी जळून गेली अशी कथा आनंद रामायणात दिलेली आहे
पुढे याने आपल्या पेटविलेल्या शेपटीने सारी लंका जाळून टाकली
प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी तर याने हजारो राक्षस मारिले वानरांना संजीव करण्यासाठी निरनिराळ्या
औषधी वनस्पती यानेच आणल्या याने रावणाचा पराभव केला लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर याने द्रोणागिरी माथावर
उचलून आणला युद्धसमाप्तीनंतर याने रामावरची निष्ठा सोडली नाही राज्याभिषेकाच्या वेळी हनुमंतानेच समुद्राचे
पाणी आणले रामचंद्राबराबर याचीही कीर्ती वाढली व एक आदर्श सेवकभक्त म्हणून याचे नाव प्रसिद्ध झाले
सप्त चिरंजीवांपैकी हा एक आहेच, अर्जुनाचे रथावर याचे स्थान असे रामावर एवढी निष्ठा होती की ज्यास राम
नाही त्या रत्नाचाही लोभ त्यास नसे रामभक्तीचा आदर्श म्हणजे हनुमंत होय
२८४ केली सीताशुद्धी । मूळ रामायणा अर्थीं ॥ १ ॥
ऐसा प्रतापी गहन । सुरा सकळां भक्तांचे भूषण ॥ २ ॥
जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥ ३ ॥
राम लक्ष्मण । नेले आणिले चोरून ॥ ४ ॥
जोडूनिया कर । उभा सन्मुख समोर ॥ ५ ॥
तुका म्हणे जपें । वायुसुता जाती पापें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- सीताशुद्धी-सीतेचा शोध, गहन-श्रेष्ठ
अर्थ :- या हनुमंतानेच सीतेचा शोध केला सर्व रामायणकथेस याच गोष्टीचे मूळ आहे १ असा हा
पराक्रमी हनुमंत श्रेष्ठ असून सर्व देवाना व भक्ताना भूषणभूत झालेला आहे २ यानेच पाताळात जाऊन देवांची
फजिती केली होती ३ अहिरावणमहिरावण यांनी रामलक्ष्मणास चोरून नेले होते, तेव्हा यानेच त्याचा वध करून
१ सुरा सवळा मोहन