सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 153, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १२५
शब्दार्थ व टीपा :- गंधर्व-देवाचा गवई, सोम-चंद्र, गायत्री-गाय, मळ-विष्ठा, कायाविये-कावळ्याच्या,
शकुंतला-विश्वामित्रमेनका याची मुलगी, सूत-हीन जातीचा, कर्ण-कुंतीस सूर्यापासून आलेला मुलगा, शुंगी-विभांडक
ऋषीस दासीपासून झालेला मुलगा, व्यास-पराशर-सत्यवतीपुत्र, गणिका-वेश्या पिंगला, अजामेळ-कान्यकुब्ज देशा-
तील एक दुराचारी ब्राह्मण, कुब्जा-कंसाची अष्टवक्रा दासी, विदुर-व्यास व दासी याचा पुत्र, वाल्हा-वाल्या कोळी,
विश्वामित्र-एक ऋषी, वसिष्ठ-एक ऋषी, नारद-दासीपुत्र, अनुतापें-पश्चात्तापाने, नाठवी-आठवत नाही.
अर्थ :- कुमारीचे पुरुषाशी लग्न व्हावयाच्या आधी गंधर्व, अग्नी, सोम यांच्याशी तिचा विवाह झालेला असतो
असे शास्त्र सांगते; म्हणून ती भ्रष्ट झाली असे समजून या जगात कुणी तरी तिचा त्याग केला आहे काय? १
पवित्र गाय स्वतःच्या मुखाने नाना प्रकारची विष्ठा खाते म्हणून का ती अपवित्र मानायची ? गंगेच्या ओघात
गावातील घाणेरड्या पाण्याचे ओहोळ मिळतात म्हणून का ती अपवित्र मानायची ? २ पिंपळ फार पवित्र मानला
जातो, पण त्याचा जन्म कावळ्याच्या विष्ठेत असतो मग तो का कधी अपवित्र मानला जातो ? आणि पांडव केवढे थोर!
पण त्यांचे जन्मवृत्त पाहू नये हेच खरें. ३ शकुंतला, कर्ण, शुंगी, व्यास, यांची नावे पातकाच्या राशी नष्ट करतात,
पण यांचे जन्मवृत्त काही चांगले नाही ४ गणिका, पिंगला, अजामीळ, कुब्जा, विदुर, वाल्या कोळी, विश्वामित्र, वसिष्ठ,
नारद यांची नावे फार थोर; पण यांचे पूर्वापुण्य काय चांगले आहे? ५-६ यांच्या हातून मागे जी नव्हती ती कर्मे
झाली, पण श्रीहरिस्मरणाने पश्चात्ताप होताच ती मुक्त झाली. ७ तुकाराम महाराज म्हणतात, एकदा ईश्वराचे
स्मरण झाले की मग तो श्रीहरी त्यांचे पूर्व कर्म आठवीत नाही. पूर्वचरित्राचा किंवा मूळाचा जो उच्चार करील तो
नरकास जाईल. ८
विवरण :- श्रीविठ्ठलाची उपासना करणाऱ्या भागवत संप्रदायाने ईश्वरप्राप्तीचा मार्ग सर्वांना खुला
केला बुद्धीने, कुलाने, कर्माने, संपत्तीने, विद्वत्तेने श्रेष्ठ असतील तर त्यांची नावे ज्याच्या त्याच्या स्मरणात राहावी
असा एकंदर जगाचा रिवाज पण भागवत संप्रदायाने हे भेद दूर करून परमेश्वरी कृपेस कुणासही पात्र होता येईल
अशी ग्वाही दिली एखाद्याचा हीन कुळात जन्म झाला असेल, एखाद्याने पूर्वायुष्यात काही पापकर्म केले असेल तर
त्याला कधी सुधारण्याला संधीच नाही की काय ? दुराचारी चोराची आयुष्ये अशीच बरबाद व्हायची की काय ?
भागवत संप्रदायाने या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली आहेत.
या उत्तराचे मूळ अर्थातच भगवद्गीतेत आहे 'अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् । साधुरेव स
मन्तव्य सम्यग्व्यवसितो हि स. ' या गीतांतील नवव्या अध्यायातील तिसाव्या श्लोकात भगवंतांनी 'दुराचारी मनुष्य
जर मला भजत असेल तर तो साधूच मानावा' असा निर्णय दिला आहे. भगवद्भक्त दुराचारी असला तरी चालेल
असा याचा अर्थ नाही तर पूर्वी कधी काळी आयुष्यात दुराचार घडला असेल व आता जर निश्चयाने परमेश्वराकडे
त्याचे चित्त जडले असेल तर त्याचे पाप उरत नाही ज्ञानेश्वरांनी या बाबतीत स्पष्टपणे सांगितले आहे, 'या लागीं
दुष्कृति जही जाहला । तरि अनुतापतीर्थी न्हाला । न्हाऊनि मजआतु आला । सर्वभावें ॥ तरि आता पवित्र तयाचेचि
कुळ । अभिजात तैचि निर्मळ । जन्मलेयाचे फळ । तयासचि जोडलें ॥ '
पुढल्या बत्तीसाव्या श्लोकात आणखी स्पष्टीकरण देताना गीतेने म्हटले आहे, 'मां हि पार्थ व्यपाश्रित्य
येऽपि स्युः पापयोनयः । स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ।' माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य, शूद्र
किंवा अंत्यजादी पापयोनींतील लोकही परम गतीस पावतात असा भगवंताचा आदेश आहे. गीतेतील ही सवलत पूर्वीच्या
शास्त्रात नव्हती असे दिसते. स्त्रिया, शूद्र किंवा कलियुगातील नामधारी ब्राह्मण यांच्या कानी वेद पडत नसल्याने
ते मूढ राहू नयेत म्हणून व्यासमुनीने कृपाळू होऊन महाभारतातील गीता त्यांच्या कल्याणासाठी गाविली आहे असे
स्पष्टीकरण भागवत पुराणात आले आहे. भागवत धर्माचे हे क्रांतिकारक पाऊल महत्त्वाचे मानावयास हवे. वेदादी
कर्मे, मोक्षासाठी असणारे वेदोपनिषदाचे अध्ययन याचा अधिकार पहिल्या तीन वर्णांनाच यापूर्वी होता. पण पुढे महा-
भारत, भगवद्गीता यातून ही अट बरीच शिथिल झाली. महाभारताच्या कर्णपर्वात ब्राह्मणव्याधसंवादात मांस
विकणाऱ्या व्याधाने ब्राह्मणास आणि शांतिपर्वात तुलाधाराने म्हणजे वैश्याने जाजलि नावाच्या ब्राह्मण तपस्व्यास
असाच उपदेश केलेला आहे.