सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 152, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 152

१२४ सार्थ तुकारामगाथा
२५५ पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥ १ ॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तेंसी पडे मिठी गोडपणें ॥ २ ॥
जागोनियां लाभ घेईं हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥ ३ ॥
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥ ४ ॥
नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सार चंदनाची ॥ ५ ॥
जेविल्याविण शून्य ते शृंगार । तेंसी गोडी हरिकथेविण ॥ ६ ॥
ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तेंचि विठ्ठलनाणे तिष्ठे कथ्ये ॥ ७ ॥
तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आघव्वे मूळ तेथें ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा:- जाणिवेची-अहंपणाची, उपडोनी-मुडून.
अर्थ:- मनुष्य जरी मोठा वाचक व पंडित झाला तरी त्याला भक्तीने कृष्णकथा ऐकावीच लागते. १ याचे
हे करणे म्हणजे दूध, तूप, साखर याच्या भेटीमधील गोडीप्रमाणेच होय. २ हे समजून तू ज्ञानाचा व भक्तीचा हा
लाभ पदरात घे. गोडावर गोड पदार्थांचे सेवन कर ३ तुला जर कांही चाड असेल तर तू अहंमन्यतेची जाणीव
खूडून टाक. ४ नानाप्रकारची सुवासिक द्रव्ये जरी अंगाला लावली किंवा चंदनाची उटी प्रामुख्याने अंगाला फासली
तरी ती हरिकथेेशिवाय व्यर्थच मानावी लागेल ५ वरवरचा शृंगार जरी झाला असला तरी जेवणाने पोट
भरल्याशिवाय जसे व्यर्थ, तसेच हरिकथेशिवाय सर्व फुकट आहे. ६ ज्याच्या नावाने ही सर्व पुराणे खरी आहेत,
श्रुती म्हणजे वेद खरे आहेत तेच विठ्ठलरूपी नाणे कथाकीर्तनात स्थिर उभे असते. ७ तुकाराम महाराज म्हणतात,
इतर सर्व मग नुसती दगडाचीच पेंवे असतात. नुसतीच खळखळ वरवरची तेथे असते. पण सर्व मूळ एका त्या
विठ्ठलात असते. ८
२५६ आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाहीं ॥ १ ॥
करिती खेंटें उसणवारी । यमपुरी भोगाव्या ॥ २ ॥
सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥ ३ ॥
तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा:- पार-सीमा, खोडिता-दोष दाखविल्यास
अर्थ:- काही दुष्ट लोक इतराच्या माना कापतात. त्याच्या निष्ठुरपणास सीमाच असत नाही. १ हे दुष्ट
लोक नरकवास भोगण्यासाठीच जणु ही उसनवारी करीत असतात असे वाटते २ शेंदूर फासून दगडाचा देव
बनवितात व त्याला ही माणसे नवस बोलतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही माणसे उगाच देवाच्या नावाने
नाचतात; याचा दोष दाखविण्याचा प्रयत्न केल्यास स्याना पटत नाही. यांचे अंग दुखल्याइतके दुःख याना होते. ४
२५७ गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥ १ ॥
गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ २ ॥
कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥ ३ ॥
शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांस ॥ ४ ॥
गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥ ५ ॥
वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचें पूर्व शुद्ध काय आहे ॥ ६ ॥
न व्हावी तों जालीं कर्मे नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥ ७ ॥
तुका म्हणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥ ८ ॥