सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 154, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 154

१२६ / सार्थ तुकारामगाथा
भगवद्गीतेच्या या ग्वाहीमुळे भागवत संप्रदायात एक प्रकारचे नवे चैतन्य निर्माण होऊन सर्व समाजास नवे
स्फुरण चढले सर्व जातींना भगवद्भक्तीचा मार्ग खुला झाला पूर्वापुष्यात दुराचारी असणाऱ्यांना आत्मोद्धाराचा
मार्ग खुला झाला हीन यातीयाच्या आशाआकांक्षा पल्लवित झाल्या ज्ञानेश्वरांनी या क्रांतिकारक विचाराचे वैभव
वर्णन करताना मुक्त कंठाने लिहिले आहे
'अगा नावें घेता चोखटीं । जे अघाचिया अधमाचिये शेवटों । तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे ॥
ते पापयोनि मूढ । मूर्ख जैसे का दगड । परि माझियाठायीं दृढ । सर्वभावें ॥ ते पापयोनीही होतु का । ते श्रुता-
धिनही न होतु का । परि मजसीं तुकिता तुका । तुटी नाहीं ॥ म्हणोनी कुळ जाती वर्ण । हे आघवेचि गा अकारण ।
एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ तेंचि भलतेणें भावें । मन मज आतु येतें होआवे । आलें तरी आघवेंद । मागील
वावो ॥ जैसे तवचि वहाळ वोहळ । जथ न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥ तैसे क्षत्री वैश्य
स्त्रिया । कां शूद्र अंत्यज्यादि इया । जाति तवचि वेगळालिया । जथ न पवती मातें ॥ आणि भलतिया जाती जन्मावे ।
मग भजिजे का विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावे । माझियाची ॥ यालागी पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र
अंगना । मातें भजता सदना । माझिया येती ॥'
ज्ञानेश्वराच्या विचारसूत्राचाच अनुवाद पुढे साधुसंतांनी केला तुकारामबुवांनी अनेक अभंगातून या
विचारास पुष्टी दिली आहे 'ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र । चांडाळा आहे अधिकार । बाळे नारीनर । आदिकरोनि
वेश्याहि ॥ तुका म्हणे अनुभवे । आम्ही पाडियेले ठावे । आणिकहि देवे । सुख घेतो भाविके' असे त्यांनी दुसऱ्या
अभंगात म्हटले आहे ज्यांची याती हीन आहे अथवा ज्यांचे पूर्वाचरण दूषित आहे पण भक्तिप्रेमामुळे ईश्वरास
सर्वस्व अर्पण केल्याने जे आदर्श होऊन गेले त्यांची नामावलीच बुवा कधीकधी आपल्यापुढे उभी करतात
या अभंगात प्रथम तुकोबांनी हिंदू कुमारी आधीच गंधर्व, अग्नी, चंद्र यांच्या द्वारे रूपरूपाने कां होईना पण
भोगली गेलेली असते याचाच प्रथम उल्लेख केलेला आहे. सोम प्रथमो विविदे गंधर्वो विविदे परः । तृतीय. पग्निर-
ग्निस्ते तुरियस्ते मनुष्यज 'या कल्पनेप्रमाणे बुवांनी स्त्रीच्या गंधर्व, अग्नी, सोम याच्या सवंधाचे वर्णन केलेले दिसते
आपल्या शास्त्रामध्ये मुलगी आठ वर्षांची होईपर्यंत तिला दोन वर्षे गंधर्व, दोन वर्षे अग्नी, दोन वर्षे सूर्य व दोन वर्षे
चंद्र भोगीत असल्याची कल्पना आहे.
पांडवकुळाची सर्वच हकीगत प्रसिद्ध आहे पांडू हा विचित्रवीर्याचा मुलगा महर्षी व्यासांच्यापासून विचित्र-
वीर्यपत्नी अंबालिका हिच्या पोटी याचा जन्म झाला युधिष्ठिरादी याचे पुत्रही असेच निरनिराळ्या असांयापून
झाल्याची कथा आहे युधिष्ठिर हा पांडुपत्नी कुंतीस यमधर्मापासून झालेला मुलगा भीम हा वायुपुत्र, इंद्रमंत्राच्या
प्रभावाने झालेला अर्जुन, इत्यादीच्या जन्मकथा महाभारतात सांगितलेल्या आहेत
शकुंतला ही विश्वामित्र व मेनका याची मुलगी विश्वामित्र तप करीत असताना त्याचा भंग करण्यासाठी
मेनका येथे आली याची ही कन्या नवजात अशा या बालिकेस तेथेच सोडून मेनका स्वर्गालाही गेली व मुलीस शकुंत
पक्ष्यांनी सांभाळिले म्हणून ही शकुंतला पुढे हिचे पालन पोषण कण्वमुनींनी केले हीच राजा दुष्पन्त याची पत्नी होय
कर्ण हा सूतपुत्र म्हणन शेवटपर्यंत उपेक्षिला गेला हा कुंतीस सूर्यापासून झालेला मुलगा जन्मतःच कुंतीने याला
भडवनदीत सोडून दिले पेटीतील या बालकांचे रूप चमच्यनी नदीतून पुढे यमुना व भागीरथी नद्यात आले तेव्हा ते
धृतराष्ट्राचा सारथी अधिरथ याने पाहिले त्याने व त्याची पत्नी राधा हिने या बालकाचे पालन केले देवाने दिलेला
हा मुलगा म्हणून राधेने या कर्णाचे नाटपणे पोषण करुन त्याच नाव वसुषेण ठेविले राधेय म्हणूनही याचा उल्लेख
होतो सूतपुत्र म्हणून याचा अपमान वारंवार होत असे परतु याच शौर्य व याच दातृत्व याची कीर्ती आजही
सांगितली जाते
शृंगी याचे पूर्ण नाव ऋष्यशृंग असून हा विभांडक ऋषींचा मुलगा. एकदा विभांडक गंगेवर स्नानास गेला
असताना उर्वशी तेथे आलेली त्याला दिसली विभांडाकाचे रेत पाण्यात पडले, ते सापद्रप झालेल्या एका देवकन्येच्या
पोटात गेले तिला जो मुलगा झाला तो हा शृंगी याचा आचार माणसासारखा पण यारा डोक्यावर मृगासारखी शिंगे