सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 115, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ८७
१७३ कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टा चळकाप सुटला ॥ १ ॥
होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ २ ॥
प्रेम॑ नाम वाचे गाती । सदा आनंदें नाचती ॥ ३ ॥
तुका म्हणे हरती दोष । आनंदाने करिती घोष ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - चळकाप-चळचळा कापावया लावणारा थरकाप
अर्थ - आज श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाला केवढी आनंदाची गोष्ट दुष्ट लोकांच्या अंगाचा थरकाप
उडालेला दिसतो १ या श्रीकृष्णाचा अवतार होताच सर्वत्र घरोघरी आनंद निर्माण झाला २ लोक त्याचे नाव
मोठ्या प्रेमाने तोंडातून काढू लागले, आनंदाने नाचू लागले ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीकृष्णाचे
नाव घेताना, त्याचा घोष करताना आपले सर्व दोष दूर होतील ४
विवरण - या एका लहानशा पण सुंदर अभंगात श्रीकृष्णजन्माने सर्वत्र जो आनंदी आनंद झाला त्याच
मोठे रेखीव जिवंत वर्णन बुवानी केले आहे श्रीकृष्णजन्माच्या आधी कंसांदिकाची दुष्ट कृत्ये ध्यानात धरली तर
लोक किती कष्टी व दुःखी झाले होत याची कल्पना येईल अशा प्रसंगी साधूंचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचे
निर्दाळण करण्यासाठी आपण अवतार घेता हे 'पुढचे वचन श्रीकृष्णाने जन्म घेऊन जणु आधीच सार्थ केले कृष्ण
जन्माचा आनंद या संदर्भात पाहण्यासारखा आहे
१७४ मेळउनि सकळ गोपाळ । काहीं करिती विचार ॥ १ ॥
चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ।
वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ २ ॥
वाट काढिली गोविंद्रीं । मागें गोपाळांची मांदी ॥ ३ ॥
अवघाचि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥ ४ ॥
घर पाहोनि एकांताचे । नवविधा नवनीताचे ॥ ५ ॥
रिघे आपण भीतरी । पुरवी मायुलियांच्या हरी ॥ ६ ॥
बोलो नेदी म्हणे स्थीर । खुणा बाबी खा रे क्षीर ॥ ७ ॥
जोगावल्यावरी । तुका करितो चाकरी ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीपा - चंद्रधणी-मनाची तृप्ती, मांदी-समुदाय, मायुलियांच्या-दहादुधाच्या डेऱ्याच्या, हरी-
ओळी, जोगावल्यावरी-संतुष्ट झाल्यावर
अर्थ - सर्व गोपाळ एके ठिकाणी जमा करून श्रीकृष्णाने काही एक विचार केला १ तो म्हणाला, चला
रे मित्रहो, आज आपण गौळणींच्या घरी जाऊन लोणी चोरून खाऊ व मनाची तृप्ती होईपर्यंत आज दहीदूध खाऊ
चला, वेळ लावू नका एखाद्यासाठी उशीर करू नका २ श्रीकृष्णाने पुढे होऊन सर्वांना वाट दाखविली व त्याच्या
पाठीमागे सर्व गोपाळांचा थवा निघाला ३ हा श्रीकृष्ण परमात्मा सर्वत्र वावरत असूनही कुणास एकदम समजत
नाही ४ आणि जिथे नवविधा भक्तीचे स्थान आहे, जिथे एकान्तात ईश्वरचिंतन चालते ५ अशा ठिकाणी हा
देव मोठ्या आनंदाने प्रवेश करतो व आपल्या सोबत्यांना दह्यादुधानी भरलेल्या भाड्याची किंवा डेऱ्याची रगच्या
राग दाखवितो, त्यांना ते दहीदूध वाटतो ६ आणि दह्यादुधाचे सेवन मुकाटघाने करावे, बोलू नये, कुणी आवाज
करू नये म्हणून हा खुणा करतो व सुचवितो की दूधदही भरपूर घ्या ७ तुकाराम महाराज म्हणतात अशा रीतीने
तृप्त झाल्यानंतर मी त्या प्रभूची मनोभावे चाकरी करीन संतुष्ट झाल्यावर त्याच्याच सेवेत राहीन ८
१ सदा नाम वाच गाती । प्रेमें आनंदे नाचती ॥