सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 116, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें८८ सार्थ तुकारामगाथा
१७५ धन्य त्या गोळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥ १ ॥
अरे कृष्णा इंद्र अमर इच्छिती । कोण तयाप्रति येईल आता ॥ २ ॥
तुका म्हणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासो लागें ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - हिरोनी-हिरावून घेऊन, विंदान-कौशल्य
अर्थ - या गोकुळच्या गोळणी धन्य आहेत या इंद्राच्या पूजनात मग्न असताना श्रीकृष्ण हळूच येतो व
त्यांच्या पूजेतील नैवेद्य हिरावून नेऊन खातो १ अरे श्रीकृष्णा, त्या गोळणी इंद्रादी देवाची इच्छा करतात, आता
तूच नैवेद्य खाल्ल्यावर त्यांच्यावर कोण कृपा करणार ? २ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु श्रीकृष्ण मोठे कौशल्य
दाखवून त्यांच्यावर कृपा करतो, स्वतः नैवेद्य खाऊन हसू लागतो ३
विवरण - कृष्णावतारानंतर श्रीकृष्णाचे माहात्म्य हळूहळू वाढीस लागले याच्यापूर्वी इंद्रादिक देवांना
महत्त्व होते इंद्र हा देवांचा राजा मानलेला असून त्याच्या कृपेने पाऊस पडतो अशी कल्पना आहे श्रावण महिन्यातील
सूर्य हाच अमोही उल्लेख आहे वैदिक वाङ्मयात व महाभारतादी ग्रंथात याच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत
कृष्णाचे वडील नंद याच्या घरी इंद्राची पूजा करण्यासाठी दर वर्षी इंद्रयाग होत असे नव्या काळात इंद्राच्या
ऐवजी पावसासाठी गोवर्धन पर्वताची पूजा करावी, त्याची उपासना वाढवावी असा नवा विचार श्रीकृष्णाने काढला.
इंद्रयाग बंद झाल्यानंतर सर्व गोकुळावर रात्रंदिवस अखंडपणे पर्जन्यवृष्टी इंद्रदेवाने केली तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन
पर्वताच्या आश्रयाने सर्व गोकुळवासियांचे रक्षण केले असल्याची कथा आपणास माहित आहेच इंद्राचे माहात्म्य
त्याच्या नैवेद्य चोरून खाण्यातूनही कमी करण्याचा प्रयत्न या अभंगात दिसतो
१७६ तुम्ही गोपी बाळा मज कँशा नेणा । इंद्र अमरराणा म्याचि केला ॥ १ ॥
इंद्र चंद्र सूर्य ग्रहा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ २ ॥
मजपासुनिया जाले जीव शिव । देवाचा ही देव मीच कृष्ण ॥ ३ ॥
तुका म्हणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलो ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अमरराणा-अमर राजा
अर्थ - गोपिकांनो, तुम्ही मला कशा जाणीत नाहींत ? तुमच्या ध्यानात कसे येत नाही की इंद्रालासुद्धा
मीच अमर राजाचे पद प्राप्त करून दिले आहे १ इंद्र, चंद्र, सूर्य, ग्रह हे सर्व लोक मीच निर्माण केले असून
यम व धर्म यांचीही निर्मिती माझ्यापासूनच आहे २ इतकेच काय पण सर्व जीव व त्यांच्यातील शिवतत्त्वही मीच
आहे सर्व देवांचा देव तो मीच श्रीकृष्ण आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, त्या गोळणींना श्रीकृष्ण हे सर्व
समजावून सांगत आहे मी मात्र व्यर्थ पाषाण होऊनच जन्माला आलो आहे ४
१७७ का रे गमाविल्या गाई । आली वळती तुझी जाई ।
मार्गे जाले काई । एका तें का नेणसी ॥ १ ॥
केलास फजित । मार्ग पुढें ही बहुत ।
लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावता ॥ २ ॥
बोला खोडा खिल्ल गाढी । ऐसा फोण तये काढी ।
धावेल का पाडी । तुझी आधीं बोदाळा ॥ ३ ॥
चाल धाये । मीही येतों तुजसवे ।
तुका म्हणे जब । तेथें नाहीं पावली ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वळती-गाई वळून आणण्याची पाळी, खोडा-गापळा, खिल्ल-वदिस्त, पाडी-शालवड