सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 114, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 114

८६ सार्थ तुकारामगाथा
खेळिया तो हाल साभाळी । घुम घाली तो पडे पाताळीं ॥ ३ ॥
वळिया गाढ्या तोचि ग्येळे । दम पुरे तो वेळोवेळा खेळे ॥ ४ ॥
हाता पडे तो चि डाग । दम पुरे तो खेळिया चांग ॥ ५ ॥
मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तोचि आधार फिके ॥ ६ ॥
आपल्या बळें खळे रे भाई । गडियाची साडोनि सोई ॥ ७ ॥
तुका म्हणे मी खेळिया नव्हे । जिकडे पडें त्याचि सवे ॥ ८ ॥
शब्दार्थ व टीका - युतुतू-एक प्रकारचा खेळ, हाल्ला-डावात, भेडती-खेळातील भिडू
अर्थ - जीवाशिवाच्या या डावात माडून अह सोहम या भिडूची चागली गाठ पडली आहे आता १ हे
दोन गडी आता सुतुतूचा खेळ करून आपणाकडे फिरून फिरून पाहू लागले आहेत एखादा बलवान गडी मागील
गड्याची कमतरता पुढल्यासाठी भरून काढीत असतो २ एखादा गडी डाव साभाळतो व दुसरा एकदा पळून जातो
तो धरणीवर पडून राहतो ३ जो गडी चांगला दणकट तोच शेवटपर्यंत खेळतो त्याचा दम जसा पुरेल तसा तो खूप
वेळपर्यंत खेळत राहील ४ गडी हातात सापडला असे वाटते, टाग मारून निसटून जातो कारण त्याचा दम भरपूर
असल्यामुळे त्याचा खेळ चांगला होतो ५ मागेपुढे पाहून अवधान राखून जो खेळतो तोच जिंकतो जो गडी हाती
आलेला असतो तोच आधार वाटतो ६ इतर गड्याची सोय सोडून आपल्या बळाने एखादा गडी खेळ करीत
असतो ७ तुकाराम महाराज म्हणतात असा मी खेळिया गडी नाही मी ज्याच्या बाजूस राहीन त्याचीच
बाजू राखीन ८
१७२ अनत ब्रह्मांडें उदरीं । हरि हा बाळक नदा घरीं ॥ १ ॥
नवल केव्हडें केव्हडें । न कले कान्होबाचे कोडें ॥ २ ॥
पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥ ३ ॥
विश्वव्यापक कमळापती । त्यासि गौळणी कडिये घेती ॥ ४ ॥
तुका म्हणे नटधारी । भोग भोगून ब्रम्हचारी ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीका - नटधारी-नाट्य धारण करणारा
अर्थ - ज्याच्या उदरात अनत ब्रह्मांड समावतात तो हा बालक श्रीकृष्ण या नदाच्या घरी रागत आहे १
केवढे नवल आहे पाहा हे या कान्होबाचे कोडे काही केल्या उलगडतच नाही २ ज्या कृष्णाने सर्व पृथ्वीवरील
लोकांना तृप्त केले त्यास माता यशोदा मोठ्या प्रेमाने घास भरवीत आहे ३ सर्व विश्वाला व्यापून राहणारा हा
कमलापती श्रीकृष्ण, पण गोळणी यास कडेवर घेऊन मिरवितात ४ तुकाराम महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण
म्हणजे अनेक प्रकारची नाटकी रूपे धारण करणारा आहे अनेक प्रकारचे विविध भोग भोगून हा श्रीकृष्ण