दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१९ वा.] सदैवलक्षण. ४०३
अक्षर लिहों जाणे । चपळ शुद्ध वाचों जाणे । अर्थांतर सांगों जाणे । सकळ
कांहीं ॥ ३ ॥ कोणाचें मनोगत तोडीना । भल्याची संगति सोडीना ।
सदैवलक्षणें अनुमाना । आणूनि ठेवी ॥ ४ ॥ तो सकळ जनांसि व्हावा ।
जेथें तेथें नित्य नवा । मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं ॥ ५ ॥ नाना
उत्तमगुण सत्पात्र । तोचि मनुष्य जगमित्र । प्रगटकीर्ति स्वतंत्र । पराधीन
नाहीं ॥ ६ ॥ राखे सकळांचें अंतर । उदंड करी पाठांतर । नेमस्तपणाचा
विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥ नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों
जाणे । बोला ऐसें वर्तों जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥ जो मानला बहुतांसी ।
कोणी बोलों न शके त्यासी । धगधगीत पुण्यराशी । महापुरुष ॥ ९ ॥ तो
परोपकार करीतचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला । मग काय उणें
त्याला । भूमंडळीं ॥ १० ॥ बहुत जन वासे पाहे । वेळेसि तात्काळ उभा
राहे । उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥ चौदा विद्या चौसष्ट
कळा । जाणे संगीत गायनकळा । आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें
॥ १२ ॥ सकळांसि नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें । अखंड कोणी
एकाचें उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥ न्याय नीति भजन मर्यादा । काळ-
सार्थक करी सदा । दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥ उत्तम गुणें
शृंगारिला । तो बहुतांमध्ये शोभला । प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा
॥ १५ ॥ जाणता पुरुष असेल जेथें । कलह कैंचा उठेल तेथें । उत्तम गुणा-
विषयीं रिते । ते प्राणी करंटे ॥ १६ ॥ प्रपंचीं जाणे राजकारण । परमार्थीं
साकल्यविवरण । सर्वांमध्ये उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥ मागें एक
पुढें एक । ऐसा कदापि नाहीं दंफेक । सर्वत्रांसि अलोकिक । तया पुरु-
षाची ॥ १८ ॥ अंतरासि लागेल ढका । ऐशी वर्तणुक करूं नका । जेथें
तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥ कर्मविधि उपासनाविधी । ज्ञानविधि वै-
राग्यविधी । विशालशवक्तृत्वाची बुद्धी । चलेल कैसी ॥ २० ॥ पाहतां अवघे
उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण । जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं
॥ २१ ॥ आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लहान थोर । तैसाचि
करी परोपकार । मनापासूनी ॥ २२ ॥ दुसऱ्याच्या दुःखें दुखावे । दुस-
१. वाट पाहे. २. सूर्य. ३. परब्रम्हाचा विचार ४. वागणूक.
४०४ श्रीदासबोध. [ दशक
प्याच्या सुखें सुखावे । अवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥ उ-
दंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी । तैशी अवघ्यांची चिंता
करी । महापुरुष ॥ २४ ॥ जयास कोणाचें सोसेना । तयाची निष्किंचन
वासना । धिक्कारितां धिकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥ मिथ्या श-
रीर निंदिलें । तरी याचें काय गेलें । झाल्यास आणि जिंकिलेँ । देहबुद्धीनें
॥ २६ ॥ हैं तों अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण । कांहीं तरी उ-
त्तमगुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥ उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गु-
णास प्राणी खेदे । तीक्ष्णबुद्धि लोक साधे । काय जाणती ॥ २८ ॥ लोकीं
अत्यंत क्षमा करिती । आलिया लोकांचे प्रचीती । मग ते लोक पाठी रा-
खिती । नाना प्रकार्री ॥ २९॥ बहुतांसि वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे
विचार । धीर उदार गंभीर । महापुरुष ॥ ३० ॥ जितुके कांहीं उत्तम गुण ।
तैं समर्थांचें लक्षण । अवगुण तें करंटलक्षण । सहजचि झालें ॥ ३१ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके सदैवलक्षणनिरूपणं नाम
चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. देहमान्य.
श्रीगणेशाय नमः ॥ मातीचा देव धोंड्याचा देव । सोन्याचा देव रु-
प्याचा देव । कांस्याचा देव पितळेचा देव । तांब्याचा देव चित्रलेप ॥ १ ॥
रुईच्या लांकडाचे पाँवळाचे देव । बाण तांदळे नर्मदेचे देव । शालग्राम
काश्मीरदेव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥ ताम्रनाणीं हेमेंनाणीं । कोणी पू-
जिती देवतार्चनीं । चक्रांकित चक्रतीर्थांहूनी । घेऊनि येती ॥ ३ ॥ उदंड
उपासनेचे भेद । किती करावे विशद । आपलाले आवडीचा वेध । लागला
जनीं ॥ ४ ॥ परी त्या सकळांचेंहि कारण । मुळीं पाहावें स्मरणं । तया
स्मरणाचे अंश जाण । नाना दैवतें ॥ ५ ॥ मुळीं द्रष्टा देव तो एक । त्याचे
झाले अनेक । समजोन पाहतां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥ देहावेगळी
भक्ति फावेना । देहावेगळा देव पावेना । या कारणें मूळ भजना । देहचि
आहे ॥ ७ ॥ देह मुळींच केला वाव । तरी भजनास कैचा ठाव । म्हणोनि
भजनाचा उपाव । देहात्मयोगें ॥ ८ ॥ देहाविण देव कैसा भजावा । देहा-
१. दरिद्री. २. निराळा. ३. सोन्याचीं नाणीं. ४. स्फूर्ति.
१९ वा.] देहमान्य. ४०५
विण देव कैसा पूजावा । देहाविण महोत्सव कैसा करावा । कोणत्या प्रकारें
॥ ९ ॥ अत्र गंध पत्र पुष्प । फल तांबूल धूप दीप । नाना भजनाचा सा-
क्षेप । कोठें करावा ॥ १० ॥ देवाचें तीर्थ कैसें घ्यावें । देवासि गंध कोठें
लावावें । मंत्रपुष्प तरी वाहावें । कोणे ठायीं ॥ ११ ॥ म्हणोनि देहाविण
अडतें । अवघें सांकडेंचि पडतें । देहाकरितां घडतें । भजन कांहीं ॥ १२ ॥
देव देवता भूतें दैवतें । मुळींचें सामर्थ्य आहे तेथें । अधिकारें नाना दैवतें ।
भजत जावीं ॥ १३ ॥ नाना देवीं भजन केलें । तें मूळ पुरुषास पावलें ।
या कारणें सन्मानिलें । पाहिजे सकळ कांहीं ॥ १४ ॥ मायावल्ली फांपा-
वली । नाना देहफळीं लगडली । मुळींची जाणीव कलों आली । फळामध्यें
॥ १५ ॥ म्हणोनि येकील न करावें । पाहावें तें येथेंचि पाहावें । ताळा प-
डतां राहावें । समाधानें ॥ १६ ॥ प्राणी संसार टाकिती । देवास धुंडीत
फिरती । नाना अनुमानीं पडती । जेथें तेथें ॥ १७ ॥ लोकांची पाहतां
रीती । लोक देवतार्चनें करिती । अथवा क्षेत्रदेव पाहती । ठायीं ठायीं ॥
१८ ॥ अथवा नाना अवतार । ऐकोनि धरिती निर्धार । परी तें अवघें स-
विस्तर । होऊनि गेलें ॥ १९ ॥ एक ब्रह्मा विष्णु महेश । ऐकोनि म्हणती
हे विशेष । गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २० ॥ देवास
नाहीं स्थान मान । कोठें करावें भजन । हा विचार पाहतां अनुमान । होत
जातो ॥ २१ ॥ नसतां देवाचें दर्शन । कैसेनि होइजे पावन । धन्य धन्य
ते साधुजन । सकळ जाणती ॥ २२ ॥ भूमंडळीं देव नाना । त्यांची भीड
उल्लंघेना । मुख्य देव तो कळेना । कांहीं केल्या ॥ २३ ॥ कर्तृत्व वेगळें
करावें । मग त्या देवासि पाहावें । तरी कांहींएक पडे ठावें । गौप्य गुह्य ॥
२४ ॥ तें दिसेना ना भासेना । कल्पांतींहि नासेना । सुकृतावेगळें विश्वा-
सेना । तेथें मन ॥ २५ ॥ उदंड कल्पिती कल्पना । उदंड इच्छिते वासना ।
अभ्यंतरींचे तरंग नाना । उदयार्ते पावती ॥ २६ ॥ म्हणोनि कल्पनार-
हित । तेंचि वस्तु शाश्वत । अंत नाहीं म्हणोनि अनंत । बोलिजे तया ॥
२७ ॥ हें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोनि तेथेंचि राहावें । निजध्यासें तद्रूप
व्हावें । संगत्यागें ॥ २८ ॥ नाना लीला नाना लाघवें । तें काय जाणिजे
बापुड्या जीवें । संतसंगें स्वानुभवें । स्थिति बाणे ॥ २९ ॥ ऐसी सूक्ष्म
४०६ श्रीदासबोध. [ दशक
स्थिति गती । कळतां चुके अधोगती । सद्गुरुवचनें सद्गती । तत्काळ होते
॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके देहमान्य-
निरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. बुद्धिवाद.
श्रीगणेशाय नमः ॥ परमार्था आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं ।
कां जे विवराविवरों चुकी । पडोंच नेदी ॥ १ ॥ जो जो संदेह वाटे मना ।
तो तो कदापि करीना । आदि अंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥ स्वतां
निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना । कठिण आहे जनार्दनां १ । राजी
राखणें ॥ ३ ॥ कोणी दाटून उपदेश देती । कोणी मध्यवर्ती घालिती । ते
सहजचि हळु पडती । लालुचीनें ॥ ४ ॥ जयास सांगावा विवेक । तो जा-
णावा प्रतिकुंचकें २ । पुढें पुढें नाशक । कारभार होतो ॥ ५ ॥ भावास भाऊ
उपदेश देती । पुढें पुढें होते फजिती । वोळखीच्या लोकांत महंती । मां-
डूंचि नये ॥ ६ ॥ पहिले दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे ।
अविवेकी ते जैसे तैसे । मिळती तेथें ॥ ७ ॥ भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हा हि
फटकळ विचारु । नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥ प्रगट
विवेक बोलेना । झांका तापा करी जना । मुख्य निश्चय अनुमाना । आ-
णूंच नेदी ॥ ९ ॥ हुकीसारिसा भरीं भरे । विवेक सांगतां न धरे । दूर दृष्टीनें
पुरे । साधु नव्हती ॥ १० ॥ कोणास कांहींच न मागावें । भगवद्भजन
वाढवावें । विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११ ॥ परांतर रक्षायाचीं
कामें । बहुत कठिण विवेकवर्मे । स्वइच्छेनें स्वधर्मे । लोकराहाटी ॥ १२ ॥
आपण तुरुक गुरु केला । शिष्यांचा भार मेळविला । नीच यातीनें नासला ।
समुदाय ॥ १३ ॥ ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या ।
संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥ उत्कृष्ट भव्य तेंचि घ्यावें । म-
ळमळीत अवघेंचि टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥
अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें । गाणें नाचणें अवघेंचि बरें ।
पाठांतर ॥ १६ ॥ दीक्षा बरी मैत्री बरी । तीक्ष्ण बुद्धि राजकारणीं बरी ।
१. सर्व जनांच्या अंतरात्म्यास. २. प्रतिकूळ,
१९ वा. ] यत्न. ४०७
आपणास राखे नाना परी । अलिप्तपणें ॥ १७ ॥ अखंड हरिकथेचा छंद ।
सकळांस लागे नामवेध । प्रगट जयाचा प्रबोध । सूर्य जैसा ॥ १८ ॥ दु-
र्जनासि राखो जाणे । सज्जनासि निववूं जाणे । सकळांचे मनींचें जाणे ।
ज्याचें त्यापरी ॥ १९ ॥ संगतींचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तात्काळ उठे ।
अखंड अभ्यासीं लगते । समुदाय ॥ २० ॥ जेथें तेथें नित्य नवा ।
जनासि वाटे हा असावा । परंतु लालुचेचा गोवा । पडोंच नेदी ॥ २१ ॥
उत्कृष्ट भक्ति उत्कृष्ट ज्ञान । उत्कृष्ट चातुर्य उत्कृष्ट भजन । उत्कृष्ट योग अ-
नुष्ठान । ठायीं ठायीं ॥ २२ ॥ उत्कृष्ट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति
दिगंतीं फांकली । उत्कृष्ट भक्तीनें निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥ कांहीं-
एक उत्कृष्टेविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन ।
काय होतें ॥ २४ ॥ नाहीं देहाचा भरंवसा । केव्हां सरेल वयसा । प्रसंग
पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥ या कारणें सावधान असावें । जितुकें
होईल तितुकें करावें । भगवत्कीर्तीनें भरावें । भूमंडळ ॥ २६ ॥ आप-
णास जें जें अनुकूल । तें तें करावें तात्काळ । होइना त्यांस निवळ । वि-
वेक उमजवावा ॥ २७ ॥ विवेकामध्यें सांपडेना । ऐसें तों कांहींच असे-
ना । एकांतीं विवेक अनुमाना । आणून सोडी ॥ २८ ॥ अखंड तजविजा
चाळणा जेथें । पाहतां काय उणें तेथें । एकांताविणें प्राणियांतें । बुद्धि
कैंची ॥ २९ ॥ एकांतीं विवेक करावा । आत्माराम ओळखावा । येथून
तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
एकोनविंशतिदशके बुद्धिवादनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. यत्न.
श्रीगणेशाय नमः ॥ कथेंचें घमंडे भरून द्यावें । आपण निरूपणीं विव-
रावें । उणें पडोंच न द्यावें । कोणीएक विषयीं ॥ १ ॥ भैंजणार खालीं प-
डला । तो भजनारीं जाणिला । नेणतां लोक उगाच राहिला । टकमकां
पाहात ॥ २ ॥ उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें । म्हणिजे
महत्व उडालें । वक्त्याचें ॥ ३ ॥ थोडें बोलोन समाधान करणें । रागेजोन
१. गर्दी उसळून द्यावी. २. उपदेश करणारा.
४०८ श्रीदासबोध. [ दशक
तरी मन धरणें । मनुष्य वेधों लावणें । कोणी एक ॥ ४ ॥ सोसवेना चिण-
चिण केली । तेथें तामस वृत्ति दिसोन आली । अवघी आवडीच उडाली ।
श्रोत्यांची ॥ ५ ॥ कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनीं भंगले ।
क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजेत लोक ॥ ६ ॥ शिष्य विकल्पें रान घेतो । गुरु
मागें मागें धांवतो । विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥
आशाबद्ध क्रियाहीन । नाहीं चातुर्यांचे लक्षण । ते महंतीची भणभण ।
बंदे नाहीं ॥ ८ ॥ ऐसे गोसांवी हळु पडती । ठायीं ठायीं कष्टी होती ।
तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैंचें ॥ ९ ॥ जिकडे तिकडे कीर्ति माजे ।
सकळ लोकांस हव्यास उपजे । लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं
॥ १० ॥ परलोकीं वास करावा । समुदाय उगाच पहावा । मागण्याचा
तगादा न लावावा । कांहींएक ॥ ११ ॥ जिकडे जग तिकडे जगन्नायक ।
कळला पाहिजे विवेक । रात्रंदिवस विवेकी लोक । संभाळीत जाती
॥ १२ ॥ जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला । अवघे
नष्ट एकला भला । कशावरूनी ॥ १३ ॥ वोस मुलखीं काय पाहावें ।
लोकांवेगळें कोठें राहावें । तैंन्हे खोटी सोंडतें घ्यावें । कांहींएक ॥ १४ ॥
तस्मात लोकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये । परत्रसाधनाचा उ-
पाय । श्रवण करून असावें ॥ १५ ॥ आपणांस बरें पाहतां न ये । लोक
बुडवायाचें कोण कार्य । गोडी आवडी वायां जाय । विकल्पचि अवघा
॥ १६ ॥ अभ्यासेँ प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकौन असावें । प्रगट होऊन
नासावें । हैं बरें नव्हे ॥ १७ ॥ मंद हळूहळु चालतो । चपळ कैसा आटो-
पतो । आरबी फिरवणारे तो । कैसा असावा ॥ १८ ॥ हीं धकाधकीचीं
कामें । तीक्ष्णबुद्धीचीं वर्में । भोळ्या भावार्थे संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥ शेत
केलें परी वाहेनाँ । जवारें केलें परी फिरेना । जन मेळविले परी धरीना ।
अंतर्यामीं । २० ॥ जरी चढती वाढती आवडी उठे । तरीच परमार्थ प्र-
गटे । घसवस करितां विटे । सगट लोक ॥ २१ ॥ आपलें लोकांस मानेना ।
लोकांचें आपणास मानेना । अवघा विकल्पचि मना । समाधान कैंचें
१. शिस्त. २. वरच्या स्थानी, एकांतीं. ३. दृष्टीषणा. ४. पड. ५. आरबी घोडा. ६. घोटाळ्यानें. ७. निगा करीना. ८. व्यापार.
॥ २२ ॥ नाशक दीक्षा सिंतेरू लोक । तेथें कैंचा असेल विवेक । जेथें
बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥ बहुत दिवस श्रम केला ।
शेवटीं अवघाचि वायां गेला । आपणास ठाकेना<sup>१</sup> गलवला । कोणें करावा
॥ २४ ॥ संगीते चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप ।
क्षणक्षणां विक्षेप कोप । किती म्हणोन सांगावा ॥ २५ ॥ मूर्खपणें भरंग-
ळती । ज्ञातेपणें कलह करिती । होते दोहींकडे फजिती । लोकांमध्ये ॥ २६ ॥
कारभार आटोपेना करवेना । आणि उगेंहि रहेना<sup>२</sup> । या कारणें सकळ जनां ।
काय म्हणावें ॥ २७ ॥ नाशक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें ।
परिभ्रमणें कंठावें । कोठें तरी ॥ २८ ॥ परिभ्रमण करवेना । दुसऱ्याचें
कांहींच सोसेना । तरी मग उदंड यातना । विकल्पाची ॥ २९ ॥ आतां
हें आपणाचपाशीं । बरें विचारावें आपणासी । अनुकूल पडेल तैशी । वर्त-
णूक करावी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशति-
दशके यत्ननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. उपाधिलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ सृष्टीमध्यें बहुत लोक । परिभ्रमणें कळे कौतुक ।
नाना प्रकारांचे विवेक । आढळों लागती ॥ १ ॥ किती प्रापंचिक जन ।
अखंड वृत्ती उदासीन । सुखदुःखें समाधान । डंडळेना ॥ २ ॥ स्वभावेंचि
नेमक बोलती । सहजचि नेमक चालती । अपूर्व बोलण्याची स्थिती । सक-
ळांसि माने ॥ ३ ॥ सहजचि तालज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उम-
टतें । सहजचि कळत जातें । न्यायनीतिलक्षण ॥ ४ ॥ एखादा आढळे
गाजी । सकळ लोक अखंड राजी । सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणि-
मात्रांची ॥ ५ ॥ चुकोन उदंड आढळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें । महं-
ताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥ ऐसे आढळतां लोक । चमत्कारें
गुणग्राहक । क्रिया बोलणें नेमक<sup>३</sup> । प्रत्ययाचें ॥ ७ ॥ सकळ अवगुणा-
मध्यें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण । मोठें पाप करंटपण । चुके-
ना कीं ॥ ८ ॥ डौलेंचि<sup>४</sup> काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्व-
१. ठक. २. होईना. ३. सुरळीत. ४. सहजासहजीं.
४१० श्रीदासबोध. [ दशक
दा । तेथें पीळ पेंचाची आपदा । आढळेलिचिला ॥ ९ ॥ एकासि अभ्या-
सितां न ये । एकासि स्वभावेंचि ये । ऐसा भगवंताचा महिमा काय ।
कैसा कळेना ॥ १० ॥ मोठीं राजकारणें चुकती । राजकारणीं वेढों¹ लागती ।
नाना चुकीची फजीती । चहूंकडे ॥ ११ ॥ या कारणें चुकों नये । म्हणिजे
उदंड उपाय । उपायांचा अपाय । चुकतां होय ॥ १२ ॥ काय चुकलें तें
कळेना । मनुष्याचें मनचि वळेना । खवळला अभिमान गळेना । दोहींकडे
॥ १३ ॥ अवघे फडचि नासती । लोकांचीं मनें भंगिती । कोठें चुके ते
युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥ ह्यापोविण² आटोप केला । तो अवघा सर-
तचि गेला । अकलेचा बंद नाहीं घातला । दूरदृष्टीनें ॥ १५ ॥ एखादें
मनुष्य तें शिळें । त्याचें करणेंचि बावळें । नाना विकल्पांचें जाळें । करून
टाकी ॥ १६ ॥ तें आपणासि उकलेना । दुसऱ्यास कांहींच कळेना । नाचे
विकल्पें कल्पना । ठायीं ठायीं ॥१७॥ ह्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या ।
कोणें येऊन आटोपाव्या । ज्याच्या त्याणें कराव्या । बळकट बुद्धी ॥ १८ ॥
ज्यासि उपाधि आवरेना । तेणें उपाधि वाढवावी ना । सावचित्त करूनियां
मना । समाधानें असावें ॥ १९ ॥ धांवधांवोनि उपाधि वेष्टी । आपण
कष्टी लोक कष्टी । हे कामा न ये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥ लोक बहुत
कष्टी झाला । आपणहि अत्यंत त्रासला । व्यर्थचि केला गलबला । कास-
यासी ॥ २१ ॥ असो उपाधीचें काम ऐसें । कांहीं बरें कांहींएक नासे ।
सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥ लोकांपाशीं भावार्थ कैंचा ।
आपण जगवावा तयांचा । शेवट उपढरै³ कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥
अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लागे । नाना प्रकारीं
दगे । चंचळामध्यें ॥ २४॥ शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ ।
तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥ उद्वेग अवघे तुटोन
जाती । मनास वाटे विश्रांती । ऐशी दुर्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभा-
ळावी ॥२६॥ आपणास मुळीं उपाधि नाहीं । ऋणानुबंधें मिळाले सर्वही
आल्या गेल्याची क्षिति⁴ नाहीं । ऐसें झालें पाहिजे ॥ २७ ॥ जो उपाधीस
कंटाळला । तो निवांत होऊनि बैसला । आटोपेना तो गलबला । कासयासी
१. अडचणींत पडतात. २. आटोक्यावांचून. ३. उणें, हानि. ४. पर्वा.
१९ वा.] राजकारण. ४११
॥ २८ ॥ कांहीं गलबला कांहीं निवळ । ऐसा कंठित जावा काळ । तेणें-
करितां विश्रांति वेळ । आपणासी फावे ॥२९॥ उपाधि कांहीं राहत नाहीं ।
समाधानायेवढें थोर नाहीं । नरदेह प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणां ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिदशके उपाधिलक्षणनिरूपणं
नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. राजकारण.
श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानी आणि उदास । समुदायाचा हव्यास । तेणें
अखंड सावकाश । एकांत सेवावा ॥ १ ॥ तेथें तजविजा कळती । अखंड
चाळणा निघती । प्राणिमात्रांची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥ जरी
हा चाळणाच करीना । तरी कांहींच उमजेना । हिशेबझाडाच पाहेना ।
दिवाळखोर ॥३॥ एक मिराशी साधिती । एक सध्यां गमाविती । व्यापक-
पणाची स्थिती । ऐशी आहे ॥४॥ जेणें जें जें मनीं धारिलें । तें तें आधींच
समजलें । कृत्रिम अवघेंच खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥ अखंड राहतां
सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते । या कारणें विश्रांतीतें । घेतां न ये
॥ ६ ॥ आळसें आळस केला । तरी मग कारभारचि बुडाला । अंतरहेत
चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥ उदंड उपासनेचीं कामें । लावित जावीं
नित्यनेमें । अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥८॥ चोर भांडारी करावा ।
घसरतांच सांभाळावा । गोवा मूर्खपणाचा काढावा । हळू हळू ॥ ९ ॥ ह्या
अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी । राजकारणें मंडळ
वेष्टी । चहूकडे ॥१०॥ नष्टासि नष्ट योजावे । वाचाळासि वाचाळ आणावे ।
आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंचि नेदी ॥११॥ कांटीनें कांटी झाडावी ।
झाडावी परी ते कळों न द्यावी । कळकटपणाची पदवी । असों न द्यावी
॥१२॥ न कळतां करी कार्य जें तें । तें काम तात्काळाचि होतें । गिचड्यांत
पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥ ऐकोनि आवडी लागावी । देखोनि
बळकटांच व्हावी । सलगीनें आपली पदवी । सेवकांमध्यें ॥ १४ ॥ कोणी-
एक काम करितां होतें । न करितां मार्गे पडतें । या कारणें ढिलेपण तें ।
असोंचि नये ॥१५॥ जो दुसऱ्यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।
जो आपणाचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६॥ अवघ्यांस अवघेंच कळलें ।
तेव्हां तें रितें पडलें । या कारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ १७॥ मुख्य
सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें । कित्येक खल्लक उगवावे ।
राजकारणामध्यें ॥ १८॥ बोलके पहिलवान कळकटे । तयांसीच घ्यावे
झटे । दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९॥ ग्रामण्य वर्मीं सांप-
डावें । रगडून पीठचि करावें । करून मागुती सांवरावें । बुडवूं नये
॥ २०॥ खळ दुर्जनांसि भ्याले । राजकारण नाहीं राखिलें । तेणें अवघें
प्रगट झालें । बरें वाईट ॥ २१ ॥ समुदाय पाहिजे मोठा । तरी तणावा
असाव्या बळकटा । मठ करून ताठा । धरूं नये ॥ २२॥ दुर्जन प्राणी
समजावे । परी ते प्रगट न करावे । सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी
॥ २३ ॥ जनांमध्यें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट । या कारणें ते
वाट । बुझोनि टाकावी ॥ २४ ॥ गलिमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या
फुरफुरती भुजा । ऐसा पाहिजे कीं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५॥ तयास
देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचीतीचे तडाखे । बंड पाषांडाचे वाँखे । सह-
जाचि होती ॥ २६ ॥ हीं धूर्तपणाचीं कामें । राजकारण करावें नेमें । ढिले-
पणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७॥ कोठेंच पडेना दृष्टी । ठायीं ठायीं
त्याच्या गोष्टी । वाग्विलासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥ हुंब्यासि
हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा । लोंदापुढें करावा ।
दुसरा लोंदें ॥ २९ ॥ घट्टाास आणावा घट्ट । उद्धटास पाहिजे उद्धट । खट-
नटासि खटनट । अगत्यें करी ॥ ३० ॥ जैसास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां
मजार्संसी थाटे । इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनाविंशतिदशके राजकारणनिरूपणं नाम-
नवमः समासः ॥ ९ ॥
१०. विवेकलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धा-
रणा । जेथें अखंड राजकारणा । मनासि आणिती ॥ १ ॥ सृष्टीमध्यें उत्तम
१. कारस्थानी लोक. २. योजावे. ३. ताणदोर. ४. कैवारी. ५. प्राणांत अवस्था-
६. मार्गानें. ७. दांडगा. ८. दुष्ट. ९. स्नेहसंबंध. १०. समुदाय.
१९ वा. ] विवेकलक्षण. ४१३
गुण । तितुकें चाले निरूपण । निरूपणाविण क्षण । रिकामा नाहीं ॥ २ ॥
चर्चा आशंका प्रत्युत्तरें । कोण खोटें कोण खरें । नाना वक्तृत्वें शास्त्राधारें ।
नाना चर्चा ॥ ३ ॥ भक्तिमार्ग विशद कळे । उपासनमार्ग आकळे । ज्ञा-
नविचार निवळे । अंतर्यामीं ॥ ४ ॥ वैराग्याची बहुत आवडी । उदास-
वृत्तीची गोडी । उदंड उपाधि तरी सोडी । लागोंच नेदी ॥ ५ ॥ प्रबंधांचीं
पाठांतरें । उत्तरास संगीतें उत्तरें । नेमक बोलतां अंतरें । निवती सक-
ळांचीं ॥ ६ ॥ आवडी लागली बहुत जना । तेथें कोणाचें कांहीं चालेना ।
दळवंट पडिला अनुमाना । येईल कैसा ॥ ७ ॥ उपासना करूनियां पुढें ।
पुरवलें पाहिजे चहूंकडे । भूमंडळीं जिकडे तिकडे । जाणती तया ॥ ८ ॥
जाणती परी आठवेना । काय करितो तें कळेना । नाना देशींचे लोक
नाना । येऊन जाती ॥ ९ ॥ तितुक्यांचीं अंतरें धरावीं । विवेकें विचारें
भरावीं । कडोविकर्डीं³ विवरावीं । अंतःकरणें ॥ १० ॥ किती लोक तें क-
ळेना । किती समुदाय आकळेना । सकळ लोक श्रवणमनना । मध्यें घाली
॥ ११ ॥ फड समजावीस करणें । गद्य पद्य सांगणें । परांतरासि राखणें ।
सर्वकाळ ॥ १२ ॥ ऐसा ज्याचा दंडक⁴ । अखंड पाहणें विवेक । सावधापुढें
अविवेक । येईल कैंचा ॥ १३ ॥ जितुकें कांहीं आपणास ठावें । तितुकें ह-
ळूहळू शिकवावें । शाहणे करूनि सोडावे । बहुत जन ॥१४॥ परोपरी शि-
कवणें । आडणुका सांगत जाणें । निवळ¹ करून सोडणें । निस्पृहासी ॥१५॥
होईल तें आपण करावें । न होतां जनांकरवीं करवावें । भगवद्भजनें-
विण राहावें । हा धर्म नव्हे ॥ १६ ॥ आपण करावें करवावें । आपण वि-
वरावें विवरवावें । आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥ जुन्या
लोकांचा कंटाळा आला । तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला । जितुकें होईल
तितुक्या।ला । आळस करूं नये ॥ १८ ॥ देहाचा अभ्यास बुडाला । आणिजे
महंत बुडाला । लागवेगें² नूतन लोकांना । शाहाणें करावें ॥ १९ ॥ उपाधींत
सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये । निःसंगपण कामा न ये । कोणी एका
विषयीं ॥२०॥ काम नासणार नासतें । आपण वेडें उगेंच पाहतें । आळसी
हृदयशून्य तें । काय करूं जाणे ॥ २१॥ धकाधकीचा मामला⁵ । कैसा घडे
१. सरळ. २. पुष्कळांशीं संबंध. ३. युक्तिप्रयुक्तीनें. ४. रीत. ५. प्रसंग.
४१४ श्रीदासबोध. [ दशक
अशक्ताला । नाना बुद्धि शक्ताला । म्हणोनि शिकवाव्या ॥२२॥ व्याप हो-
ईल तों राहावें । व्याप राहतां उठोन जावें । आनंदरूप फिरावें । कोठें तरी
॥ २३॥ उपाधीपासून सुटला । तो निस्पृहपणें बळावला । जिकडे अनुकूल
तिकडे चालिला । सावकाश ॥२४॥ कीर्ति पाहतां सुख नाहीं । सुख पाह-
तां कीर्ति नाहीं । केल्याविण कांहींच नाहीं । कोठें तरी ॥ २५॥ येरवीं काय
राहतें । होणार तितुकें होऊन जातें । प्राणिमात्र अशक्त तें । पुढें आहे
॥ २६ ॥ आधींच तकवा सोडिला । मध्येंच धिंवेंसा सांडिला । तरी सं-
सार हा शेवटाला । कैसा पावे ॥२७॥ संसार मुळींच नासका । विवेकें क-
रावा नेटका । नेटका करितां फिका । होत जातो ॥२८॥ ऐसा याचा जिन-
साना । पाहतां काळों येतें मना । परंतु धीर सांडावा ना । कोणी एकें ॥२९॥
धीर सांडितां काय होतें । अवघें सोसावें लागतें । नाना बुद्धि नाना मतें ।
शाहणा जाणे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे एकोनविंशतिद-
शके विवेकलक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी २८५.
दशक विसावा.
१. पूर्णापूर्ण.
श्रीगणेशाय नमः ॥ प्राण व्यापक मन व्यापक । पृथ्वी आप तेज व्या-
पक । वायु आकाश त्रिगुण व्यापक । अंतरात्मा मूळमाया ॥ १ ॥ निर्गुण
ब्रह्म तें व्यापक । ऐसें अवघेंच व्यापक । तरी हें सगट कीं काय एक ।
भेद आहे ॥ २ ॥ आत्मा आणि निरंजन । येणें वाढतें अनुमान । आत्मा
सगुण कीं निर्गुण । आणि निरंजन ॥ ३ ॥ श्रोता संदेहीं पडला । तेणें
संदेह वाढला । अनुमान धरून बैसला । कोण तो कैसा ॥ ४ ॥ ऐका पाहि-
ली आशंका । अवघा गलबला करूं नका । प्रगट करून विवेका । प्रत्यय
पाहावा ॥ ५ ॥ शरीरेंपाडें सामर्थ्यंपाडें । प्राणी व्यापक तरी निवाडे ।
परी पाहतां मनाएवढें । चपळ नाहीं ॥ ६ ॥ चपळपण एकदेशी । पूर्ण व्या-
पकता नव्हे त्यासी । पाहतां पृथ्विच्या व्यापासी । सीमा आहे ॥ ७॥ तै-
१. धैर्य. २. शरीराच्या व बळाच्या मानानें. ३. विस्तारास.
सैंचि आप आणि तेज । अपूर्ण दिसती सहज । वायु चपळ समज । एक-
देशीं ॥ ८ ॥ गगन आणि निरंजन । तें पूर्ण व्यापक सघन । कोणी एक
अनुमान । तेथें असेचिना ॥ ९ ॥ त्रिगुण गुणक्षोभिणी माया । मायिक
जाईल विलया । अपूर्ण एकदेशी तया । पूर्ण व्यापकता न घडे ॥ १० ॥
आत्मा आणि निरंजन । हें दोहींकडे नामाभिधान । अर्थान्वय समजोन ।
बोलणें करावें ॥ ११ ॥ आत्मा मन अत्यंत चपळ । तरी हें व्यापक नव्हेंचि
केवळ । सुचित्त अंतःकरण निवळ । करून पाहावें ॥ १२ ॥ अंतराळीं पा-
हतां पाताळीं नाहीं । पाताळीं पाहतां अंतराळीं नाहीं । पूर्णपणें वसत
नाहीं । चहूंकडे ॥ १३ ॥ पुढें पाहतां मागें नाहीं । मागें पाहतां पुढें नाहीं ।
वाम सव्य व्यापक नाहीं । दश दिशा ॥ १४ ॥ चहूंकडे निशाणें मांडा-
वीं । एकसरी कैसीं शिर्वावीं । या कारणें समजोन उगवी । प्रत्यय आप-
णासी ॥ १५ ॥ सूर्य जळीं प्रतिबिंबितला । हाहि दृष्टांत न घडे वस्तूला ।
वस्तुरूप निर्गुणाला । म्हणिजत आहे ॥ १६ ॥ घटाकाश मठाकाश । हाहि
दृष्टांत विशेष । तोलूं जातां निर्गुणास । साम्यता येते ॥ १७ ॥ ब्रह्माचा
अंश आकाश । आणि आत्म्याचा अंश मानस । दोहींचा अनुभव प्रत्ययास ।
येथें घ्यावा ॥ १८ ॥ गगन आणि हें मन । कैसीं होती समान । मनन-
शीळ महाजन । सकळही जाणती ॥ १९ ॥ मन हें पुढें वावडे । मागें
अवघेंचि रितें पडे । पूर्ण गगनास साम्यता घडे । कोण्या प्रकारें ॥ २० ॥
परब्रह्माहि अचळ । आणि पर्वतासहि म्हणती अचळ । दोन्हीं एक केवळ ।
कैसें म्हणावें ॥ २१ ॥ ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान । तिन्ही कैसीं होती
समान । याचा प्रत्यय मनन । करून पहावा ॥ २२ ॥ ज्ञान म्हणिजे जा-
णणें । अज्ञान म्हणिजे नेणणें । विपरीत ज्ञान म्हणिजे देखणें । एकाचें एक
॥ २३ ॥ जाणणें नेणणें वेगळें केलें । डोबळें पांचभौतिक उरलें । विपरीत
ज्ञान समजलें । पाहिजे जीवीं ॥ २४ ॥ द्रष्टा साक्षी अंतरात्मा । जीवा-
त्माचि होय शिवात्मा । पुढें शिवात्मा तोचि होय जीवात्मा । जन्म घेतो
॥ २५ ॥ आत्मत्वीं जन्ममरण न लागे । आत्मत्वीं जन्ममरण न भंगे ।
संभवामि युगे युगे । ऐसें वचनं ॥ २६ ॥ जीव एकदेशी नर । विचारें
१. प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. २. गीता, अध्याय ४ था पहा.
दुसरें । कांहींच
नाहीं खरें । निंदा आणि स्तुति उत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥ ऐसें पर-
ब्रह्म एकजिनसी । कांहींच तुळेना तयासी । महानुभाव पुण्यराशी । तेथें
पहुडती ॥ १२ ॥ चंचलें होते दुःखरासी । निश्चळायेवढी नाहीं विश्रांती ।
निश्चळ प्रत्ययें पाहाती । महानुभाव ॥ १३ ॥ मुळापासून शेवटवरी । विचा-
१. मुंगीच्या चालीनें; म्हणजे प्रथम कर्म, नंतर उपासना व शेवटीं ज्ञान होणें.
२. पक्ष्याच्या भरारीप्रमाणें; म्हणजे एकदम विचार सुचून ज्ञान होणें.
Wait, let's re-check line 15 (our L15):
Is it अधोर्ध्व or अधोध्वं?
Let's zoom into L15:
Word: अधोर्ध्व vs अधोध्वं vs अधोर्ध्वे
Characters:
अ
धो
third character: look at the top. There is a horizontal headline.
Below headline, there is ध connected to व? Wait, look at `
२० वा.] सूक्ष्म नामाभिधान. ४१७
रणा केलीच करी । प्रत्ययाचा निश्चय अंतरीं । तयासचि फावे ॥ १४ ॥ क-
ल्पनेची सृष्टि जाहली । त्रिविध प्रकारें भासली । तीक्ष्ण बुद्धीनें आणिली ।
पाहिजे मना ॥ १५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । अवघें एकदेशी लक्षण ।
पांचां भूतांचा ढोबळा गुण । दिसतचि आहे ॥ १६ ॥ पृथ्वीपासून चारी
खाणी । चारी वेगळाली करणी । सकळ सृष्टीची चालणी येथूनी । पुढें नाहीं
॥ १७ ॥ सृष्टीचें त्रिविध लक्षण । विशद करूं निरूपण । श्रोतीं सुचित्त
अंतःकरण । केलें पाहिजे ॥ १८ ॥ मूळमाया जाणिवेची । मुळीं सूक्ष्म
कल्पनेची । जैसी स्थिती परा वाचेची । तद्रूपचि ते ॥ १९ ॥ अष्टधा प्रकृ-
तीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ । सूक्ष्मरूप बीज सकळ । मुळींच आहे
॥ २० ॥ जड पदार्थ चेतवितें । म्हणोनि चैतन्य बोलिजेतें । सूक्ष्मरूपें संकेतें ।
समजोन घ्यावें ॥ २१ ॥ प्रकृतिपुरुषांचा विचार । अर्धनारी नटेश्वर । अष्ट-
धा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥ गुप्त त्रिगुणांचें गूढत्व । म्हणोन
संकेत महत्तत्व । गुप्तरूपें शुद्ध सत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥ जेथून गुण
प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती । त्रिगुणांचीं रूपें समजती । धन्य
ते साधु ॥ २४ ॥ गुप्तरूपें गुण सौम्य । म्हणोन बोलिजे गुणसाम्य । सूक्ष्म-
संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ
एकदेशी लक्षण । प्रत्यय पाहतां खुण । अंतरीं येते ॥ २६ ॥ पुढें पंचभूतां-
चीं बंडे । वाढलीं विशालें उदंडें । सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥
त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसऱ्या जिनसा अनेक परी । दोन्ही जिनसा या
उपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥ पृथ्वी नाना जिनसांचें बीज । अंडज जारज
स्वेदज उद्भिज । चारी खाणी चारी वाणी सहज । निर्माण जाहल्या ॥ २९ ॥
खाणी वाणी होती जाती । परंतु तैशीच आहे जगती । ऐसे होती आणि
जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशति-
दशके त्रिविधसृष्टिलक्षणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. सूक्ष्म नामाभिधान.
श्रीगणेशाय नमः ॥ मुळींहूनि शेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी ।
पुन्हा विवरत विवरत माघारीं । वृत्ति न्यावी ॥ १ ॥ चारी खाणी चारी
४१८ श्रीदासबोध. [ दशक
वाणी । चौऱ्याशीं लक्ष जीवयोनी । नाना प्रकारचे प्राणी । जन्मास येती
॥२॥ अवघे होती पृथ्वीपासूनी । पृथ्वीमध्यें जाती नासोनी । अनेक येती
जाती परी अवनी¹ । तैशीच आहे ॥ ३ ॥ ऐसें हें शेंड्याकडील खंड । दुसरें
भूतांचें बंड । तिसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरूपें ॥ ४ ॥ स्थूल अवघें
सांडून द्यावें । सूक्ष्मरूपें वोळखावें । गुणांपासून पाहिलेंच पाहावें । सूक्ष्म-
दृष्टी ॥ ५ ॥ गुणांचीं रूपें जाणीव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राय ।
सूक्ष्म दृष्टीच लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥ शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध
जाणीव सत्वगुण । जाणीव नेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥
त्रिगुणांचीं रूपें ऐशीं । कळों लागलीं आपैसीं । गुणांपुढील कर्दमासी ।
गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥ रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व ।
तेंचि जाणिजे महत्तत्व । कर्द²भरूप ॥९॥ प्रकृतिपुरुष शिवशक्ती । अर्धनारी-
नटेश्वर म्हणती । परी याची स्वरूपस्थिती । कर्दमरूपें ॥ १० ॥ सूक्ष्मरूपें
गुण सौम्य । त्यासीच म्हणिजे गुणसाम्य । तैसेंच चैतन्य अगम्य । सूक्ष्म-
रूपी ॥ ११ ॥ बहुजिन्नसी मूळमाया । महाकारण ब्रह्मांडींची काया ।
ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥१२॥ चारी खाणी पांच भूतें ।
चौदा सूक्ष्म संकेतें । काय पाहाणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥ अहाचें⁴
पाहतां कळेना । गरज केल्यानें समजेना । नाना प्रकारें जनांच्या मना ।
संदेह पडती ॥ १४ ॥ चौदाँ³ पांच एकोणीस । एकोणीस चार तेवीस ।
यामध्यें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥ जो विवरोन समजला ।
तेथें संदेहचि नाहीं उरला । समजल्याविण जो गलबला । तो निरर्थक
॥ १६ ॥ सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज । अवघें समजतां
सज्जें⁵ । परमार्थ होतो ॥ १७ ॥ समजलें माणूस चावळेना । निश्चयी अनु-
मान धरीना । सांवाळागोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥ शब्दातीत
बोलतां आलें । त्यास वाच्यांश असें बोलिलें । शुद्ध लक्ष्यांशें लक्षिलें ।
पाहिजे विवेकें ॥ १९ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाय विलया ।
माया नसतां मग तया । काय म्हणावें ॥ २० ॥ अन्वय आणि व्यतिरेक ।
हा पूर्वपक्षाचा विवेक । सिद्धांत म्हणिजे शुद्ध एक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥
१. पृथ्वी. २. मिश्रिभाव, चेंदा. ३. मूळमायेचीं चौदा नांवें. ४. वरवर. ५. पूर्ण-
२० वा. ] शिवशक्ति. ४१९
अधोमुखें भेद वाढतो । ऊर्ध्वमुखें भेद तुटतो । निःसंगपणें निर्गुणी तो ।
महायोगी ॥२२॥ माया मिथ्या ऐशी कळली । तरी मग भीड कां लागली ।
मायेचे भिडेनें घसरली । स्वरूपस्थिती ॥ २३ ॥ लटकें मायेनें दपटावें ।
सत्य परब्रह्म सांडावें । मुख्य निश्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥ पृथ्वी-
मध्यें बहुत जन । त्यामध्यें असती सज्जन । परी साधूस वोळखतो कोण ।
साधूवेगळा ॥ २५ ॥ म्हणोन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा ।
फिरफिरों ठायीं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥ उदंड हुडकावे संत । सांपडे
प्रचीतीचा महंत । प्रचीतीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥ प्रपंच
अथवा परमार्थ । प्रचीतीविण अवघें व्यर्थ । प्रत्ययज्ञानी तो समर्थ ।
सकळांमध्यें ॥२८॥ रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ । पर-
लोकींचा निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥ म्हणोनि पाहिलेंचि पाहावें ।
आणि शोधिलेंचि शोधावें । अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्मनामाभिधाननिरूपणं
नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. शिवशक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ सकळ जनांस प्रार्थना । उगेंच उदास करावें ना ।
निरूपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥ प्रत्यय राहिला एकीकडे । आप-
ण धांवतो भलतीकडे । तरी मग सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥
उगीच पाहतां सृष्टी । गलबला दिसतो दृष्टी । परी राजसत्तेची गोष्टी । वेग-
ळीच ॥ ३ ॥ पृथ्वीमध्यें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । नाना
सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥ त्याचा महिमा कळेल कोणाला । माते-
वांचून कृपाळू झाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥ सत्ता
पृथ्वीमध्यें वाढली । जेथें तेथें विभागली । कळेनें सृष्टी चालली । भगवंता-
ची ॥ ६ ॥ मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वतां । सक-
ळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥ सकळ पुरुषांचा ईश । जगामध्यें जग-
दीश । नाना शरीरीं सावकाश । करूं लागे ॥ ८ ॥ पाहतां सृष्टीची रचना ।
१. प्रपंचदृष्टीनें. २. परमार्थदृष्टीनें. ३. ईशसत्ता. ४. व्यवहार करूं लागे.
ते एकाचेन चालेना । एकलाचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥ नाहीं
उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें । कार्य चालों ऐसें झालें ।
भगवंतासी ॥ १० ॥ किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासीं घातलें ।
हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥ जगदंतरीं अनुसंधान ।
बरें पाहणें हेंचि ध्यान । ध्यान आणि तें ज्ञान । एकरूप ॥ १२ ॥ प्राणी
संसारासि आला । कांहीं एक शाहाणा झाला । मग तो विवरों लागला ।
भूमंडळीं ॥ १३ ॥ प्रगट रामाचें निशान । आत्माराम ज्ञानघन । विश्वंभर
विद्यमान । भाग्यें कळे ॥ १४ ॥ उपासना धुंडीन वासना धरिली । तरी
ते लांबतचि गेली । महिमा न कळे हे बोली । यथार्थचि आहे ॥ १५ ॥
द्रष्टा म्हणिजे पाहता । साक्षी म्हणिजे जाणता । अनंतरूपी अनंता । वोळ-
खावें ॥ १६ ॥ संगती असावी भल्याची । धाटी कथानिरूपणाची । कांहीं
एक मनाची । विश्रांति आहे ॥ १७ ॥ त्याहिमध्यें प्रत्ययज्ञान । जाळून
टाकिलें अनुमान । प्रचीतीविण समाधान । पाविजेल कैंचें ॥ १८ ॥ मूळ-
संकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप । जगदंतरीं तेंचि रूप ।
देखिजेलें ॥ १९ ॥ उपासना ज्ञानस्वरूप । ज्ञानीं चौथा देहें आरोपें ।
या कारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥ पुढें परब्रह्म विशाल । गग-
नासारिखें पांकळ । घन पातळ कोमळ । काय म्हणावें ॥ २१ ॥ उपासना
म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन । योगियांचें समाधान । येणें रीती
॥ २२ ॥ विचारें नेहटूनसाँ पाहे । उपासना आपणचि आहे । एक जाय
एक राहे । वासना धरूनी ॥ २३ ॥ अखंड ऐशी घालमेली । पूर्वापार होत
गेली । आतांहि तैशीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥ बनावरी बर्ने-
करांची सत्ता । जलावरी जलचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळांची सत्ता ।
येणेंचि न्यायें ॥ २५ ॥ सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठानें पाहिजे ॥ २६॥ कर्ता जगदीश हें तों खरें ।
परी विभाग आला पृथगाकारें । येथें अहंतेंचे कॉविरें । बाधिजेना ॥ २७ ॥
हरिदाँताँ हरिभोँक्ता । ऐसें चालतें तत्वतां । ये गोष्टीचा आतां । विचार पा-
तळटीपा :
१. मूळमाया. २. कल्पना. ३. लक्ष देऊन. ४. वनरक्षकाची. ५. आश्रय.
६. भ्रम. ७. हरिच देतो व हरिच सेवन करितो; (मी तूं हा भेद व्यर्थ आहे.)
२० वा.] चत्वार जिन्नस. ४२१
व्हावा ॥ २८ ॥ सकळ कर्ता परमेश्वरु । आपला मायिक विचारु । जैसें कळेल
तैसें करु । जगदंतरीं ॥ २९ ॥ देवायेंवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्चळ
नाहीं । पायरीनें पायरी चढोनि पाहीं । मूळपर्यंत ॥३०॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके शिवशक्तिनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥४॥
५. चत्वार जिन्नस.
श्रीगणेशाय नमः ॥ येथून पाहतां तेथवरी । चारी जिन्नस अवधारी । एक
चौदा पांच चारी । ऐसें आहे ॥ १ ॥ ब्रह्म सकळांहून वेगळें । ब्रह्म सकळां-
हून आगळें । नाना कल्पने निराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥ परब्रह्माचा विचार ।
नाना कल्पनेहून पर । निर्मळ निश्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥
परब्रह्मास कांहींच तुलेना । हा एक मुख्य जिन्नसाना । दुसरा जि-
न्नस नाना । कल्पना मूळमाया ॥ ४ ॥ नाना सूक्ष्मरूप । सूक्ष्मरूप आणि
कर्दंमरूप । मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥ हरिसंकल्प मु-
ळींचा । आत्माराम सकळांचा । संकेत नामाभिधानाचा । ऐसा आहे ॥ ६ ॥
निश्चळीं चंचळ चेतलें । म्हणोनि चैतन्य बोलिलें । गुणसमानत्वें झालें ।
गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥ अर्धनारी नटेश्वर । तोचि षड्गुणेश्वर । प्रकृति पुरु-
षाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥ शुद्ध सत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा
गुणक्षोभिणी । पुढें तिही गुणांची करणी । प्रगट झाली ॥ ९ ॥ मन माया
अंतरात्मा । चौदा जिन्नसांची सीमा । विद्यमान ज्ञानात्मा । इतके ठायीं
॥ १० ॥ ऐसा हा दुसरा जिन्नस । अभिधानें चतुर्दश । आतां तिसरा जिन्न-
स । पंचमहाभूतें ॥ ११ ॥ येथें पाहतां जाणीव थोडी । आदि अंत रोकडी ।
खाणी निरूपिल्या तांतडी । तो चौथा जिन्नस ॥ १२ ॥ चारी खाणी अनंत
प्राणी । जणिवेची झाली दाटणी । चारी जिन्नस येथुनी । संपूर्ण झाले
॥ १३ ॥ बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें । तैसें झालें आत्मया-
तें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥ ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेची
उदंड झाली । मनुष्यवेषें सृष्टि भोगिली । नाना प्रकारें ॥ १५ ॥ प्राणी मा-
१. एक ब्रह्म, चौदा नांवें असलेली मूळमाया, पंचमहाभूतें, व चारी खाणी
असे हे चार जिन्नस सर्व ब्रम्हांडांत आहेत.
४२२ | श्रीदासबोध. | [दशक
रून श्वापद पळे । वरकड यास काय कळे । नाना भोग तो निबेळे¹ । मनुष्यदे-
हीं ॥ १६ ॥ नाना शब्द नाना स्पर्श । नाना रूप नाना रस । नाना गंध ते
विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥ अमूल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें² नाना
शस्त्रें । नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥ पृथ्वी सत्तेनें व्यापली ।
स्थूलास्थूळीं आटोपली । नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥
दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सांभाळावें । सारासार विचारावें । नर-
देह जाहलिया ॥ २० ॥ इहलोक आणि परलोक । नाना प्रकारचा विवेक ।
विवेक आणि अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥ नाना पिंडब्रह्मांडरचना ।
नाना मुळींची कल्पना । नाना प्रकारची धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥ अष्ट
भोग³ नव रस । नाना प्रकारचा विलास । वाच्यांश लक्ष्यांश सारांश । म-
नुष्य जाणे ॥ २३ ॥ मनुष्यें सकळांसि आकळिलें⁴ । त्या मनुष्यास देवें पाळिलें ।
ऐसें हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥ नरदेह परम दुर्लभ । येणें घडे अ-
लभ्य लाभ । दुर्लभ तें सुलभ । होत जातें ॥ २५ ॥ वरकड देह काबाड ।
नरदेह मोठें घबाड । परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥ येथें ज्यानें
आळस केला । तो सर्वस्वें बुडाला । देव नाहीं ओळखिला । विवेकबळें
॥ २७ ॥ नर तोचि नारायण । जरी प्रत्ययें करी श्रवण । मननशील अंतःक-
रण । सर्वकाळ ॥ २८ ॥ जेणें स्वयेंचि पोहावें । त्यासि कासेस नलगे लागावें ।
स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥ सकळ शोधून राहिला । संदेह कैंचा
तयाला । पुढें विचार कैसा झाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके चत्वारजिन्नसनिरूपणं नाम
पंचमः समासः ॥ ५ ॥
६. आत्मगुण.
श्रीगणेशाय नमः ॥ पाहों जातां भूमंडळ । ठायीं ठायीं असे जळ । कि-
त्येक ते निर्मळ माळ । जळेंविण पृथ्वी ॥ १ ॥ तैसें दृश्य विस्तारलें । कांहीं
एक जाणीवेनें शोभलें । जाणीवरहित उरलें । कितीएक दृश्य ॥ २ ॥ चारी
१. प्रकटतो. २. वाहनें. ३. अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या
आणि अलंकार हे आठ भोग. ४. आकलन केलें.