दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
९ वा. ] ब्रह्म. २१९
काय । अतर्क्य म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २३ ॥ अपार म्हणिजे
पाराचि नाहीं । अढळ म्हणिजे ढळचि नाहीं । अतर्क्य म्हणिजे तर्क्याचि
नाहीं । परब्रह्म तें ॥ २४ ॥ अद्वैत म्हणिजे काय । अदृश्य म्हणिजे काय ।
अच्युत म्हणिजे काय । मज निरूपावें ॥ २५ ॥ अद्वैत म्हणिजे द्वैतचि नाहीं ।
अदृश्य म्हणिजे दृश्यचि नाहीं । अच्युत म्हणिजे च्युतें नाहीं । परब्रह्म तें
॥ २६ ॥ अच्छेद्य म्हणिजे काय । अदाह्य म्हणिजे काय । अक्लेद्य म्हणिजे
काय । मज निरूपावें ॥ २७ ॥ अच्छेद्य म्हणिजे छेदेना । अदाह्य म्हणिजे
जळेना । अक्लेद्य म्हणिजे कौलवेना । परब्रह्म तें ॥ २८ ॥ परब्रह्म म्हणिजे
सकळां परतें । तयास पाहतां आपणचि तें । हें कळे अनुभवमतें । सद्गुरु
केलिया ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके आशंका-
निरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ जें जें कांहीं साकार दिसे । तें तें कल्पांतीं नासे ।
स्वरूप तें असतचि असे । सर्वकाळ ॥ १ ॥ जें सकळांमध्यें सार । मिथ्या
नव्हे तें साचार । जें कां नित्य निरंतर । संचलेंचि असे ॥ २ ॥ तें भग-
वंताचें निजरूप । त्यासि बोलिजे स्वरूप । याहि वेगळीं अमूप । नामें
तयाचीं ॥ ३ ॥ त्यास नामाचा संकेत । कळावया हा दृष्टांत । परी तें स्व-
रूप नामातीत । असतचि असे ॥ ४ ॥ दृश्यांसेंबाह्य संचलें । परी तें विश्वास
चोरलें । जवळींच नाहींसें झालें । असतचि कैसें ॥ ५ ॥ ऐसा ऐकोनियां
देव । उठे दृष्टीचा भावें । पाहों जातां दिसे सर्व । दृश्यचि अवघें ॥ ६ ॥
दृष्टीचा विषय दृश्य । तोचि झालिया सादृश्यें । तेणें दृष्टी पावे संतोष ।
परी तें देखणें नव्हे ॥ ७ ॥ दृष्टीस दिसे तें नासे । एतद्विषयीं श्रुति असे ।
म्हणोनि जें दृष्टीस दिसे । तें स्वरूप नव्हे ॥ ८ ॥ स्वरूप तें निराभास ।
आणि दृश्य भासलें साभास । भासास बोलिला नाश । वेदांतशास्त्रीं ॥
९ ॥ आणि पाहतां दृश्यचि भासे । वस्तु दृश्यावेगळी असे । स्वानुभवें
१. तर्काने जाण्याजोगें. २ चळणारें. ३. भिजेना. ४. पुष्कळ. ५. जगताच्या
आंतबाहेर. ६. पाहण्याची इच्छा. ७. प्रत्यक्ष. ८. आभासयुक्त.
२२० श्रीदासबोध. [ दशक
पाहतां दिसे । दृश्यासबाह्य ॥ १० ॥ जें निराभास निर्गुण । त्याची काय
सांगावी खुण । परी तें स्वरूप जाण । सन्निधचि असे ॥ ११ ॥ जैसा
आकाशीं भासला भास । आणि सकळांमध्यें आकाश । तैसा जाणिजे जग-
दीश । सबाह्य अभ्यंतरीं ॥ १२ ॥ उदकामध्ये परी भिजेना । पृथ्वीमध्ये
परी शिरेना । वन्हीमध्यें परी जळेना । स्वरूप देवाचें ॥ १३ ॥ तें ओघा-
मध्यें परी बुडेना । तें वायूमध्ये परी उडेना । सुवर्णी असे परी घडेना । सुवर्णा-
सारिखें ॥ १४ ॥ ऐसें जें संचलें सर्वदा । परी तें आकळेना कदा । अमे-
दामाजी वाढवी भेदा । ते हे अहंता ॥ १५ ॥ तिच्या स्वरूपाची खूण । सांगों
कांहीं वोळखण । अहंतेचें निरूपण । सावध ऐका ॥ १६ ॥ जे स्वरूपाकडे
पावे । अनुभवासवें झेंपावे । अनुभवाचे शब्द आघवे । बोलोन दावी
॥ १७ ॥ म्हणे आतां मीच स्वरूप । तेंचि अहंतेचें रूप । निराकारीं आपे-
आप । वेगळी पडे ॥१८॥ स्वयें मीच आहें ब्रह्म । ऐसा अहंतेचा भ्रम । ऐ-
सिये सूक्ष्मीं सूक्ष्म । पाहतां दिसे ॥ १९ ॥ कल्पना आकळी हेत । वस्तु
कल्पनातीत । म्हणोन नाकळे अंत । अनंताचा ॥ २० ॥ अन्वय आणि
व्यतिरेक । हा शब्दभेद कोणीएक । निःशब्दाचा अंतर्विवेक । शोधिला पा-
हिजे ॥ २१ ॥ आधीं घेइजे वाच्यांश । मग वोळखिजे लक्ष्यांश । लक्ष्यांशीं
पाहतां वाच्यांश । असेल कैंचा ॥ २२ ॥ सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म । हा
वाच्यांशाचा अनुक्रम । शोधितां लक्ष्यांशाचें वर्म । वाच्यांश नासे ॥२३॥
सर्व विमळ दोन्ही पक्ष । वाच्यांशीं आटती प्रत्यक्ष । लक्ष्यांशीं लावितां
लक्ष । पक्षपात घडे ॥ २४ ॥ हें लक्ष्यांशें अनुभवणें । तेथें नाहीं वाच्यांश
बोलणें । मुख्य अनुभवाचे खुणे । वाचारंभ कैंचा ॥ २५ ॥ परा पश्यंती
मध्यमा वैखरी । जेथें वोसरती चारी । तेथें शब्द कळाकुसरी । कोण काज
॥ २६ ॥ शब्द बोलतां सर्वचि नासे । तेथें शाश्वतता कोठें असे । प्रत्यक्षास
प्रमाण नसे । बरें पाहा ॥ २७ ॥ शब्द प्रत्यक्ष नाशवंत । म्हणोन घडे पक्ष-
पात । सर्व विमळ ऐसा हेत । अनुभवीं नाहीं ॥ २८ ॥ ऐक अनुभवाचें
लक्षण । अनुभव म्हणिजे अनन्यपण । ऐक अनन्याचें लक्षण । ऐसें असे
॥ २९ ॥ अनन्य झणिजे अन्य नसे । आत्मनिवेदन जैसें । संगभंगें असत-
१. लय पावतात. २. एकपक्षो बोलणें. ३. शब्दप्रवृत्ति. ४. आसक्ति तुटल्यानें.
९ वा.] नि:संदेह. २२१
चि असे । आत्मा आत्मपणें ॥ ३० ॥ आत्म्यास नाहीं आत्मपण । हेंचि
निःसंगाचें लक्षण । हें वाच्यांशें बोलिलें जाण । कळावयाकारणें ॥ ३१ ॥
येन्हवीं लक्ष्यांश तो वाच्यांशें । सांगिजेल हें घडेल कैसें । वाक्यविवरणें
आपैसें । कळों लागे ॥ ३२ ॥ करावें तत्त्वविवरण । शोधावें ब्रह्म निर्गुण ।
पाहावें आपणास आपण । म्हणजे कळे ॥ ३३ ॥ हें न बोलतांचि विवरिजे ।
विवरोन विवरोन राहिजे । मग अबोलणेंचि साजे । महापुरुषां ॥ ३४ ॥
शब्दांचि निःशब्द होती । श्रुति नेति नेति¹ म्हणती । हें तों आलें आत्म-
प्रचीती । प्रत्यक्ष आतां ॥ ३५ ॥ प्रचीत आणि अनुमान । हा तों प्रत्यक्ष
दुरभिमान । तरी आतां मी अज्ञान । मज कांहींच न कळे ॥ ३६ ॥ मी
लटिका माझें बोलणें लटिकें । मी लटिका माझें चालणें लटिकें । मी माझें
अवघेंचि लटिकें । काल्पनिक ॥ ३७ ॥ मज मुळींच नाहीं ठाव । माझें बो-
लणें अवघेंचि वाव । हा प्रकृतीचा स्वभाव । प्रकृति लटिकी ॥ ३८ ॥ प्रकृति
आणि पुरुष । या दोहींस जेथें निरास । तेथें मीपण विशेष । हें केवीं घडे
॥ ३९ ॥ जेथें सर्वहि अशेष² झालें । तेथें विशेष कैचें आलें । मी मौनी
म्हणतां भंगलें । मौन जैसें ॥ ४० ॥ आतां मौन न भंगावें । करून कांहींच
न करावें । असोन निःशेष नसावें । विवेकबळें ॥ ४१ ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे नवमदशके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. निःसंदेह.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं केलें अनुमान । ऐसें कैसें ब्रम्हज्ञान । कांहींच
नाहीं असोन । हें केवीं घडे ॥ १ ॥ सकळ करूनि अकर्ता । सकळ भोगून
अभोक्ता । सकळांमध्ये अलिप्तता । येईल कैंची ॥ २ ॥ तथापि तुम्ही म्ह-
णतां । योगी भोगून अभोक्ता । तरी स्वर्ग नरकही आतां । येणेंचि न्यायें
॥ ३ ॥ जन्ममृत्यु भोगिलेच भोगी । परी तो भोगून अभोक्ता योगी । पा-
तक नाहीं तयालागीं । येणेंचि पाँडें³ ॥ ४ ॥ कुटून नाहीं कुटिला । रडोन
नाहीं रडला । कुंथोन नाहीं कुंथिला । योगीश्वर ॥ ५ ॥ जन्म नसोन घात-
ला । पतित नसोन झाला । यातना नसोन पावला । नानापरी ॥ ६ ॥
१. हें ब्रह्म नव्हे, तें ब्रह्म नव्हे, इत्यादि. २. शून्य. ३. तुलनेनें.
२२२ श्रीदासबोध. [ दशक
ऐसें श्रोत्यांचें अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान । आतां याचें समाधान ।
केलें पाहिजे ॥ ७ ॥ वक्ता म्हणे सावध व्हावें । तुम्ही बोलतां बरवें । परी
हें तुमच्या अनुभवें । तुम्हांस घडे ॥ ८ ॥ ज्याचा अनुभव जैसा । तो तो
बोलतो तैसा । संपदेविण जो धिंवैसा । तो निरर्थक ॥ ९ ॥ नाहीं ज्ञानाची
संपदा । अज्ञानदरिद्रें आपदा । भोगिल्याच भोगी सदा । शब्दज्ञानें ॥ १० ॥
ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरें । योगी ओळखावा योगीश्वरें । महा चतुर तो
चतुरें । वोळखावा ॥ ११ ॥ अनुभवी अनुभवियासि कळे । अलिप्त अलिप्त-
पणें निवळे । विदेहाचा देहभाव गळे । विदेही देखतां ॥ १२ ॥ बद्धा-
सारिखा सिद्ध । आणि सिद्धासारिखा बद्ध । एक भावील तो अबद्ध । म्ह-
णावा नलगे ॥ १३ ॥ झडपला तो देहधारी । आणि देहधारक पंचाक्षरी । परंतु
दोघां एक सैरी । कैसी द्यावी ॥ १४ ॥ तैसा अज्ञान पतित । आणि ज्ञानी
जीवन्मुक्त । दोघां समान मानी तो युक्त । कैसा म्हणावा ॥ १५ ॥ आतां
असो हे दृष्टांत । प्रचीत बोलों कांहीं हेत । येथें श्रोतीं सावचित्त । क्षणएक
व्हावें ॥ १६ ॥ जो ज्ञानें मुक्त झाला । जो विवेकें विराला । जो अनन्यपणें उर-
ला । नाहींच कांहीं ॥ १७ ॥ तयास कैसें गवसावें । शोधूं जातां तोचि
व्हावें । तोचि होतां म्हणावें । नलगे कांहीं ॥ १८ ॥ देहीं पाहतां दिसेना ।
तत्त्वें शोधितां भासेना । ब्रह्म आहे निवडेना । कांहीं केल्या ॥ १९ ॥ दि-
सतो तरी देहधारी । परी कांहींच नाहीं अंतरीं । तयास पाहतां वरीवरी ।
कळेल कैसा ॥ २० ॥ कळाया शोधावें अंतर । तंव तो नित्य निरंतर । ज-
यास धुंडितां विकार । निर्विकार होती ॥ २१ ॥ तो परमात्मा केवळ ।
तयास नाहीं मायाजाळ । अखंड हेतूचा विटाळ । झालाच नाहीं ॥ २२ ॥
ऐसा जो कां योगिराज । तो आत्मा सहजीं सहज । पूर्णब्रह्म वेदबीज । दे-
हाकारें कळेना ॥ २३ ॥ देहें भावितां देहचि दिसे । अंतर अनारिसें असे ।
तयास शोधितां नसे । जन्ममरण ॥ २४ ॥ जयास जन्ममरण व्हावें । तें
तो नव्हेचि स्वभावें । नाहींच तें आणावें । कोठून कैंचें ॥ २५ ॥ निर्गुणास
जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला । तरी उडाला आणि जन्मला ।
आपला आपण ॥ २६ ॥ माध्यान्हीं थुंकितां सूर्यावरी । तो थुंका पडे आप-
१. सामर्थ्यावांचून. २. धैर्य. ३. योग्यता. ४. कल्पना केली असतां. ५. वेगळें.
णावरी । दुसऱ्यास चिंतित i अंतरीं । आपणास घडे ॥ २७ ॥ समर्थ रा-
याचें महिमान । जाणतां होतें समाधान । परंतु भुंकों लागलें श्वान । तरी
तें श्वानचि असे ॥ २८ ॥ ज्ञानी तो १सत्यस्वरूप । अज्ञान देखे मनुष्यरूप ।
भावासारिखा फळद्रूप । देव तैसा ॥ २९ ॥ देव निराकार निर्गुण । लोक
२भाविती पाषाण । पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैंचा ॥ ३० ॥ देव स-
दोदित संचला । लोकीं बहुविध केला । परंतु बहुविध झाला । हें तों घडे-
ना ॥ ३१ ॥ तैसा साधु आत्मज्ञानी । बोधें पूर्ण समाधानीं । विवेकें आ-
त्मनिवेदनीं । आत्मरूपी ॥ ३२ ॥ जळोन काष्ठाचा आकार । अग्नि दिसे
काष्ठाकार । परी काष्ठ होईल हा विचार । बोलोंचि नये ॥ ३३ ॥ कापूर
असे तो जळतां दिसे । तैसा ज्ञानी देहीं भासे । तयासि जन्मवितां कैसे ।
कदलीउदरीं ॥ ३४ ॥ बीज भाजलें उगवेना । वस्त्र जळालें उकलेना । वोघ
निवडितां निवडेना । गंगेमध्यें ॥ ३५ ॥ वोघ गंगेमागें दिसे । गंगा एक-
देशी असे । साधु कांहींच न भासे । आत्मा सर्वगत ॥ ३६ ॥ सुवर्ण नव्हे
लोखंड । साधूस जन्म थोतांड । अज्ञान प्राणी जड मूढ । तयांसि हें उम-
जेना ॥ ३७ ॥ अंधास कांहींच न दिसे । तरी ते लोक आंधळे कैसे । स-
न्निपातें बरळतसें । सन्निपाती ॥ ३८ ॥ जो स्वप्नामध्यें भ्याला । तो स्वप्न-
भयें वोसणला । तें भय जागत्याला । केवीं लागे ॥ ३९ ॥ मुळीं सर्पा-
कार देखिली । एक भ्याला एकें वोळखिली । दोघांची अवस्था लेखिली ।
सारिखीच कैसी ॥ ४० ॥ हातीं धरितां डसेना । हें एकास भासेना । तरी
ते त्याची कल्पना । तयासीच बाधी ॥ ४१ ॥ विंचू सर्प डसला । तेणें
तोचि ३जाकळला । तयाचेनि लोक झाला । कासावीस कैसा ॥ ४२ ॥ आतां
तुटलें अनुमान । ज्ञानियास कळे ज्ञान । अज्ञान्यास जन्ममरण । चुकेना
कीं ॥ ४३ ॥ एका जाणण्यासाठीं । लोक पडिले ४आटॉआटीं । नेणतपणें हिं-
पुटी ५ । होती जन्ममृत्यु ॥ ४४ ॥ तेंचि कथानुसंधान । पुढें केलें परीच्छिन्न ।
सावधान सावधान । म्हणे वक्ता ॥ ४५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसं-
वादे नवमदशके निःसंदेहनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
१. ब्रह्मस्वरूप. २. मानतात. ३. घाबरला. ४. खटपटींत. ५. कष्टी.
२२४ श्रीदासबोध. [ दशक
४. जाणपण.
श्रीगणेशाय नमः ॥ पृथ्वीमध्यें लोक सकळ । एक संपन्न एक दुर्बळ ।
एक निर्मळ एक वोंगळ । काय निमित्तें ॥ १ ॥ कित्येक राजे नांदती । कि-
त्येक दरिद्र भोगिती । कित्येकांची उत्तम स्थिती । कित्येक अधमाधम ॥
२ ॥ ऐसें काय निमित्त झालें । हें मज पाहिजे निरूपिलें । याचें उत्तर
ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ ३ ॥ हे सकळ गुणापासी गती । १सगुण भाग्य-
श्रो भोगिती । अवगुणास दरिद्रप्राप्ती । यदर्थीं संदेह नाहीं ॥ ४ ॥ जो
जेथें उपजला । तो तेथें व्यवसायीं उमजला । तयास लोक म्हणती भला ।
कार्यकर्ता ॥ ५ ॥ जाणता तो कार्य करी । नेणता कांहींच न करी । जाण-
ता तो पोट भरी । नेणता भीक मागे ॥ ६ ॥ हें तों प्रगटचि असे । जनीं
पाहतां प्रत्यक्ष दिसे । विद्येविण करंटा वसे । विद्या तो भाग्यवंत ॥ ७ ॥
आपुली विद्या न शिकसी । तरी काय भीक मागसी । जेथें जेथें बुद्धि ऐसी ।
वडील सांगती ॥ ८ ॥ वडील आहे करंटा । आणि समर्थ होय धाकुटा ।
कां जो विद्येनें मोठा । म्हणोनियां ॥ ९ ॥ विद्या नाहीं बुद्धि नाहीं । वि-
वेक नाहीं साक्षेप नाहीं । कुशलता नाहीं व्याप नाहीं । म्हणोन प्राणी
करंटा ॥ १० ॥ इतुकेंहि जेथें वसे । तेथें वैभवास उणें नसे । वैभव सोडि-
तां आपैसें । पाठी लागे ॥ ११ ॥ वडील समर्थ धाकुटा भिकारी । ऐका
याची कैसी परी । वडिलांऐसा व्याप न करी । म्हणोनियां ॥ १२ ॥ जैसी
विद्या तैसी हांव । जैसा व्याप तैसें वैभव । तोलसारिखा हावभाव । लोक
करिती ॥ १३ ॥ विद्या नसे वैभव नसे । तेथें निर्मळ कैंचा असे । करंटपणें
चोखटा दिसे । वोंगळ आणि विकारी ॥ १४ ॥ पशु पक्षी गुणवंत । त्यांस
ग्रहण करिती समर्थ । गुण नसतां जिणें व्यर्थ । प्राणिमात्रांचें ॥ १५ ॥
गुण नाहीं गौरव नाहीं । सामर्थ्य नाहीं महत्व नाहीं । कुशलता नाहीं
तर्क नाहीं । प्राणिमात्रांसी ॥ १६ ॥ या कारणें उत्तम गुण । तेंचि
भाग्याचें लक्षण । लक्षणेंविण अवलक्षण । सहजचि झालें ॥ १७ ॥ जना-
मध्यें जो जाणता । त्यास आहे मान्यता । कोणी एक विद्या असतां ।
महत्व पावे ॥ १८ ॥ प्रपंच अथवा परमार्थ । जाणता तोचि
१. गुणी पुरुष. २. उद्योग. ३. प्रतिष्ठा.
समर्थ । नेणतां जाणिजे व्यर्थ । निष्कारण ॥१९॥ नेणतां विंचू सर्प डसे ।
नेणतां जीवघात असे । नेणतां कार्य नासे । कांहींएक ॥ २० ॥ नेणतां
प्राणी सिंतरे १ । नेणतपणें तन्हे भरे । नेणतपणें ठके विसरे । पदार्थ कांहीं
॥ २१ ॥ नेणतां वैरी जिंकिती । नेणतां अपायीं पडती । नेणतां संहारिती
घडती । जीवनाश ॥ २२ ॥ आपुलें स्वहित न कळे जनां । तेणें भोगिती
यातना । ज्ञान नेणतां अज्ञाना । अधोगती ॥२३॥ माया ब्रह्म जीव शिव ।
सारासार भावाभाव २ । जाणिल्यासाठीं होतें वाव । जन्ममरण ॥ २४ ॥
कोण कर्ता निश्चयेंसी । बद्ध मोक्ष तो कोणासी । ऐसें जाणतां प्राणियासी ।
सुटका घडे ॥२५॥ जाणिजे देव निर्गुण । जाणिजे मी तो कोण । जाणिजे
अनन्यैलक्षण ३ । म्हणिजे मुक्त ॥२६॥ जितुकें जाणोन सांडिलें । तितुकें दृश्य
वोलांडिलें । जाणत्यास जाणतां तुटलें । मूळ मीपणाचें ॥२७॥ न जाणतां
कोटिवरी । साधनें केलीं परोपरी । तरी मोक्षास अधिकारी । होणार
नाहीं ॥ २८ ॥ माया ब्रह्म वोळखावें । आपणास आपण जाणावें । इतु-
क्यासाठीं स्वभावें । चुके जन्म ॥ २९ ॥ जाणतां समर्थांचें अंतर । प्रसंगे
वर्ते तदनुसार । भाग्यवैभव अपार । तेणेंचि पावे ॥ ३० ॥ म्हणोन जाणणें
नव्हे सामान्य । जाणतां होईजे सर्वमान्य । कांहींच नेणे तो अमान्य ।
सर्वत्र करिती ॥ ३१ ॥ पदार्थ देखोन भूतें ४ भावी । नेणतां झेंडपोन प्राण
ठेवी । मिथ्या आहे उठाठेवी । जाणते जाणती ॥ ३२ ॥ जाणत्यास कळे
वर्म । नेणत्याचें खोटें कर्म । सकळ कांहीं धर्माधर्म । जाणतां कळे ॥३३॥
नेणे त्यास यमयातना । जाणत्यास कांहींच लागेना । सकळ जाणोन विवे-
चना । करी तो मुक्त ॥ ३४ ॥ नेणतां कांहीं राजकारण । अपमान करून
घेती प्राण । नेणतां कठिण वर्तमान । समस्तांस होय ॥ ३५॥ म्हणोनियां
नेणणें खोटें । नेणते प्राणी ते करंटे । जाणतां विवरतां तुटे । जन्ममरण ॥३६॥
म्हणोन अलक्ष करूं नये । जाणणें हाचि उपाय । जाणतां सांपडे सोय । पर-
लोकाची ॥ ३७ ॥ जाणणें सकळांस प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण । प-
रंतु अलिप्तपणाची खूण । जाणतां कळे ॥ ३८ ॥ एक जाणणें करून पर-
तें । कोण सोडवील प्राणियातें । कोणी एक कार्य जें तें । जाणिल्याविण न
१. फसतो. २. असणें-नसणें. ३. एकनिष्ठेचें स्वरूप. ४. पिशाच्च समजतो.
२२६ श्रीदासबोध. [ दशक
कळे ॥ ३९ ॥ जाणणें म्हणिजे स्मरण । नेणणें म्हणिजे विस्मरण । दोहीं-
मध्यें कोण प्रमाण । शाहणे जाणती ॥ ४० ॥ जाणते लोक शाहाणे । नेणते
वेडे दैन्यवाणे । विज्ञान तेंहि जाणतपणें । कळों आलें ॥ ४१ ॥ जेथें
जाणतेपण खुंटलें । तेथें बोलणेंहि तुटलें । हेतुरहित जाहलें । समाधान
॥ ४२ ॥ श्रोते म्हणती हें प्रमाण । झालें परम समाधान । परी पिंडब्रह्मांड-
ऐक्यलक्षण । आम्हां निरूपावें ॥ ४३ ॥ ब्रह्मांडीं तेंचि पिंडीं असे । बहुत
बोलती ऐसें । परंतु याचा प्रत्यय विलसे । ऐसें केलें पाहिजे ॥ ४४ ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके जाणपणनिरूपणं नाम चतुर्थः
समासः ॥ ४ ॥
५. अनुमाननिरसन.
श्रीगणेशाय नमः ॥ पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । न ये आमुच्या अनु-
माना । प्रचीत पाहतां नाना । मतें भांबावती ॥ १ ॥ जें पिंडीं तेंचि
ब्रह्मांडीं । ऐसी बोलावयाची प्रौढी । हें वचन घडीनें घडी । तत्त्वज्ञ बोलती
॥ २ ॥ पिंडब्रह्मांड एक राहाटी । ऐसी लोकांची धाटी । परी प्रत्ययाचे
परिपाठीं । तगों न शके ॥ ३ ॥ स्थूल सूक्ष्म कारण महाकारण । हे पिंडींचे
चार देह जाण । विराट हिरण्यगर्भ अव्याकृत मूळप्रकृति हे खूणें । ब्रम्हां-
डाची ॥ ४ ॥ हे शास्त्रधाटी जाणावी । परी प्रचीती कैसी आणावी ।
प्रचीत पाहतां गाथागोवी । होत आहे ॥ ५ ॥ पिंडीं आहे अंतःकरण ।
तरी ब्रह्मांडीं विष्णु जाण । पिंडीं बोलिजे तें मन । ब्रह्मांडीं चंद्रमा ॥ ६ ॥
पिंडीं बुद्धि ऐसें बोलिजे । तरी ब्रह्मांडीं ब्रम्हा ऐसें जाणिजे । पिंडीं चित्त
ब्रह्मांडीं वोळखिजे । नारायण ॥ ७ ॥ पिंडीं बोलिजे अहंकार । ब्रह्मांडीं
रुद्र हा निर्धार । ऐसा बोलिला विचार । शास्त्रांतरीं ॥ ८ ॥ तरी कोण
विष्णूचें अंतःकरण । चंद्राचें कैसें मन । ब्रम्हाचें बुद्धिलक्षण । मज निरू-
पावें ॥ ९ ॥ नारायणाचें कैसें चित्त । रुद्र अहंकाराचा हेत । हा विचार
पाहोन नेमस्त । मज निरूपावें ॥ १० ॥ प्रचीत निश्चयापुढें अनुमान ।
जैसें सिंहापुढें आलें श्वान । खऱ्यापुढें खोटें प्रमाण । होईल कैसें ॥ ११ ॥
परी यासि पारखी पाहिजे । पारखीनें निश्चय लाहिजे । परीक्षा नसतां
१. साक्षात्कार. २. मार्गामध्यें. ३. नांवें; चार देहांचीं चार.
? No, the third word is कोट्यानकोटी. Wait, before कोट्यानकोटी, the word has how many letters? Two letters! Letter 1: अ Letter 2:चि? वि? जि? Wait, is there a dot over अ? Look at अinअंधकार(L8):अं. There is a distinct dot above अ. In L27, above अ, there is NO dot! Wait, is there a dot above the second letter? The second letter has a िmatra. Above the loop of the matra, there is NO dot. Wait, what is the letter under the matra? It isवि? चि? Wait, look at अवि: is that a word? Wait, could it be आणिmisprinted asअविorअचि? Wait, look at the letter: it has a loop on the left, horizontal stroke, vertical stroke: that is च! Wait, does it say अचि? Wait, what about अभि? Wait, what about आदि`?
Let's look really closely at the letter:
It has a top bar.
Left part: round shape.
Wait,
२२८ श्रीदासबोध. [ दशक
चौऱ्यायशीं लक्ष योनींची दाटी । पिंडीं कोठें ॥ ३२ ॥ ब्रह्मांडीं पदार्थ
निर्माण झाले । पृथगाकारें वेगळाले । तेहि तितुके निरूपिले । पाहिजेत
पिंडीं ॥ ३३ ॥ जितुक्या औषधी तितुकीं फळें । नानाप्रकारचीं रसाळें ।
नाना बीजें धान्यें सकळें । पिंडीं निरूपावीं ॥ ३४ ॥ हें सांगतां पुरवेना ।
तरी उगेंच बोलवेना । बोलिलें न येतां अनुमाना । लाजिरवाणें ॥ ३५ ॥
तरी हें निरूपिलें न वचे । फुकट बोलतां काय वेंचे । या कारणें अनुमानाचें ।
कार्य नाहीं ॥ ३६ ॥ पांच भूतें तीं ब्रह्मांडीं । आणि पांचचि वर्तती पिंडीं ।
यांची पाहावी रोकडी । प्रतीत आतां ॥ ३७ ॥ पांचीं भूतांचें ब्रह्मांड ।
आणि पांचभौतिक हें पिंड । या वेगळें तें उदंड । अनुमानज्ञान ॥ ३८ ॥
जितुकें अनुमानाचें बोलणें । तितुकें वमनप्राय त्यागणेँ । निश्चयात्मक तेंचि
बोलणें । प्रत्ययाचें ॥ ३९ ॥ जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । प्रतीत नाहीं कीं
रोकडी । पंचभूतांची तांतडी । दोहींकडे ॥ ४० ॥ म्हणोनि दोहींचें स्थान-
मान । हें तों अवघेंचि अनुमान । आतां एक समाधान । मुख्य तें कैसें ॥
४१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके अनुमाननिरसननिरू-
पणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. गुणरूप.
श्रीगणेशाय नमः ॥ आकाश जैसें निराकार । तैसा ब्रह्माचा विचार ।
तेथें वायूचा विकार । तैसी मूळमाया ॥ १ ॥ हें दासबोधीं असे बोलिलें ।
ज्ञानदशकीं प्रांजळ केलें । मूळमायेतें दाखविलें । पांचभौतिक ॥ २ ॥ तेथें
जाणीव तो सत्वगुण । मध्य तो रजोगुण । नेणिव तो तमोगुण । जाणिजे
श्रोतीं ॥ ३ ॥ म्हणाल तेथें कैंची जाणीव । तरी ऐका याचा अभिप्राय ।
पिंडीं महाकारण देहीं सर्व- । साक्षिणी अवस्था ॥ ४ ॥ तैसी मूळप्रकृति
ब्रह्मांडींचें । देह महाकारण साचें । म्हणोनि तेथें जाणीवेचें । अधिष्ठान
आलें ॥ ५ ॥ असो मूळमायेभीतरीं । गुप्त त्रिगुण वास करी । स्पष्ट होती
संधी चतुरीं । जाणावी गुणक्षोभिणी ॥ ६ ॥ जैसा तृणाचा पोटरा कळा ।
१. वमनाप्रमाणें. २. विस्तार. ३. मूळमायाच पांचभौतिक आहे असें दाखविलें.
४. तीन गुण स्पष्ट होण्याची जी संधि तीच गुणक्षोभिणी माया.
९ वा.] गुणरूप. २२९
पुढें उकलोन होय मोकळा । तैसी मूळमाया अवलीळां । गुणा प्रसवली ॥
७ ॥ मूळमाया वायुस्वरूप । ऐका गुणक्षोभिणीचें रूप । गुणविकार होतां
अल्प । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥ पुढें जाणीव मध्यस्थ नेणीव । मिश्रित
चालिला स्वभाव । तेथें मातृकांस ठाव । शब्द जाहला ॥ ९ ॥ तो शब्द-
गुण आकाशींचा । ऐसा अभिप्राय येर्थींचा । शब्देंचि वेदशाखांचा । आकार
झाला ॥ १० ॥ पंचभूतें त्रिगुणाकार । अवघा वायूचा विकार । जाणीवनेणीवेचा
विचार । वायूचकरितां ॥ ११ ॥ वायु नसतां कैंची जाणीव । जाणीव नसतां कैंची
नेणीव । जाणीवनेणीवेसि ठाव । वायुगुणें ॥ १२ ॥ जेथें मुळींच नाहीं चळण । तेथें
कैंचें जाणीवलक्षण । म्हणोन वायूचा गुण । नेमस्त जाणावा ॥ १३ ॥ ए-
कापासून एक झालें । हें एक उगेंच दिसोन आलें । स्वरूप मुळींच भासलें ।
त्रिगुण भूतांचें ॥ १४ ॥ ऐसा हा मुळींचा कर्दर्म । पुढें स्पष्टतेचा अनुक्रम ।
सांगतां एकापासून एक उगम । हेंहि खरें ॥ १५ ॥ वायूचा कर्दम बोलिला ।
तयापासून अग्नि झाला । तोहि पाहतां देखिला । कर्दमचि ॥ १६ ॥
अग्नीपासून झालें आप । तेंचि कर्दमस्वरूप । आपापासून पृथ्वीचें रूप । तेंहि
कर्दमरूपी ॥ १७ ॥ येथें आशंका उठली । भूतांतें जाणीव कोठें देखिली ।
तरी भूतांत जाणीव ऐकिली । नाहीं वार्ता ॥ १८ ॥ जाणीव म्हणजे जाणतें
चळण । तेचि वायूचें लक्षण । वायुअंगीं सकळ गुण । मागां निरूपिले ॥
१९ ॥ म्हणोन जाणीव नेणीव मिश्रित । अवघें चालिलें पंचभूत । म्हणो-
निया भूतांत । जाणीव असे ॥ २० ॥ कोठें दिसे कोठें न दिसे । परी ते
भूतीं व्यापून असे । तीक्ष्णबुद्धि करितां भासे । स्थूल सूक्ष्म ॥ २१ ॥ पंच-
भूतें आकारलीं । भूतीं भूतें कालवलीं । परी पाहतां भासलीं । एक स्थूळ
एक सूक्ष्म ॥ २२ ॥ निरोधें वायु न भासे । तैसी जाणीव न दिसे । न दिसे
परी ते असे । भूतरूपें ॥ २३ ॥ काष्ठीं अग्नि दिसेना । निरोधीं वायु भासे-
ना । जाणीव तैसी लक्षेना । एकाएकीं ॥ २४ ॥ भूतें वेगळालीं दिसती ।
पाहतां एकचि भासती । बहुत धूर्तपणें प्रचीती । वोळखावी ॥ २५ ॥ ब्रह्मा-
पासून मूळमाया । मूळमायेपासून गुणमाया । गुणमायेपासून तयां । गुणांस
जन्म ॥ २६ ॥ गुणापासूंनियां भूतें । पावलीं स्पष्टदशेर्तें । ऐसीं यांचीं रूपें
१. अकस्मात. २. अक्षरांस. ३. मिश्रण. ४. पंचभूतांत. ५. आकारास.
२३० श्रीदासबोध. [ दशक
समस्तें । निरूपिलीं ॥ २७ ॥ आकाश गुणापासून जाहलें । हें कदापि नाहीं
घडलें । शब्दगुणास कल्पिलें । आकाश वायां ॥ २८ ॥ एक सांगतां एक-
चि भावी । उगीच करी गाथागोवी । तया वेड्याची डेंगवी । कोणें
करावी ॥ २९ ॥ शिकविल्याहि कळेना । उमजविल्याहि उमजेना । दृष्टांतें-
हि तर्केना । मंदरूप ॥ ३०॥ भूतांहून भूत थोर । हााहि दाखविला विचार ।
परी भूतां वडील स्वतंत्र । कोण आहे ॥ ३१॥ जेथें मूळमाया पांचभौतिक ।
तेथें काय राहिला विवेक । मूळमायेपरतें एक । निर्गुण ब्रह्म ॥ ३२ ॥ ब्रह्मीं
मूळमाया झाली । तिची लीला परीक्षिली । तंव ते निखळ वोतिली । भूतें
त्रिगुणांचीं ॥ ३३ ॥ भूतें विकारवंत चार । आकाश पाहतां निर्विकार ।
आकाश भूत हा विचार । उपाधीकरितां ॥ ३४ ॥ पिंडीं व्यापक म्हणोन
जीव । ब्रह्मांडीं व्यापक म्हणोन शिव । तैसाचि हााहि अभिप्राय । आकाशा-
चा ॥ ३५ ॥ उपाधीमध्यें सांपडलें । सूक्ष्म पाहतां भासलें । इतुक्त्यासाठीं
आकाश झालें । भूतरूप ॥ ३६ ॥ आकाश अवकाश तो भकास । परंतु ब्रह्म
तें निराभास । उपाधि नसतां जें आकाश । तेंचि ब्रह्म ॥ ३७ ॥ जाणीव
नेणीव मध्यमान । हेंचि गुणांचें प्रमाण । येथें निरूपिले त्रिगुण । रूपांसहि-
त ॥ ३८ ॥ प्रकृति पावली विस्तारातें । पुढें एकाचें एकचि होतें । वि-
कारवंताचि तयातें । नेम कैंचा ॥ ३९ ॥ काळें पांढरें मेळवितां । पारवें होतें
तत्वतां । काळें पिवळें मेळवितां । हिरवें होय ॥ ४० ॥ ऐसे रंग नानापरी ।
मेळवितां पालट धरी । तैसें दृश्य हें विकारी । विकारवंत ॥ ४१ ॥ एका
जीवेंने नाना रंग । उमटों लागती तरंग । पालटाचा लागेवेग । किती
म्हणोन पाहावा ॥ ४२ ॥ एका उदकाचे विकार । पाहतां दिसती अपार ।
पंचभूतांचा विस्तार । चौऱ्यांशीं लक्ष योनी ॥ ४३ ॥ नाना देहांचें बीज
उदक । उदकापासून सकळ लोक । किडा मुंगी श्वापदादिक । उदकेंचि हो-
य ॥ ४४ ॥ शुक्रें शोणितें म्हणिजे नीरें । त्या नीराचें हें शरीर । नखें दंत
अस्थिमात्रें । उदकाच्या होती ॥ ४५ ॥ मुळाचे बारीक पागोरे । तेणें
पंथें उदक भरे । त्या उदकेंचि विस्तारे । वृक्षमात्र ॥ ४६ ॥ आम्रवृक्ष मो-
हरा आले । अवघे उदकाकरितां झाले । फळीं फुलीं लगडले । सावकाश
१. उलगडा. २. उदकानें. ३. प्रकार. ४. रेत. ५. रक्त. ६. पाणी. ७. हाडें.
, then स has a vertical line above?
Wait! Could it be कोसले?
Let's look at the letter:
Is it को सें ले? Or को सै ले?
Wait, in line 17:
क + ो = को
Then स with two matras? No, one matra and a rafar?
Wait, why are we guessing when we can just transcribe what is printed visually?
Let's look at the printed characters:
क - ो - र् - स - ले?
Wait, look at the letter after को: it is र् (rafar) on स?
Wait, does rafar sit on the following consonant? Yes! A rafar on स means र्स.
With matra: र्से.
So कोर्सेले? No, the ले has a matra: ले.
Wait, what about कोसले?
Let's search Dasbodh 9.7.4:
"कोसले अथवा कांटेघरें । नाना पृष्ठभागीं चालतीं घरें ।"
In almost ALL editions of Dasbodh, the text of 9.7.4 is:
"कोसले अथवा कांटेघरें । नाना पृष्ठभागीं
२३२ श्रीदासबोध. [ दशक
हें प्रवृत्तींचें बोलणें । प्रत्ययास आणि उणें । प्रत्यय पाहतां श्लाघ्यवाणें ।
होणार नाहीं ॥ ११ ॥ ब्रम्हास कोणें जन्मास घातलें । विष्णूस कोणें प्रति-
पाळिलें । रुद्रास कोणें संहारिलें । महाप्रळयीं ॥ १२॥ म्हणोनि हा सृष्टिभाव ।
अवघा मायेचा स्वभाव । कर्ता म्हणों निर्गुण देव । तरी तो निर्विकारी
॥ १३ ॥ म्हणावें माया जन्मास घाली । तरी हे आपणाचि विस्तारली ।
आणि विचारितां थारैली । हेंहि घडेना ॥ १४ ॥ आतां जन्मतो कोण ।
कैसी त्याची वोळखण । आणि संचिंताचें लक्षण । तेंहि निरूपावें ॥ १५ ॥
पुण्याचे कैसें रूप । आणि पापाचें कैसें स्वरूप । याहि शब्दाचा ऑक्षेप ।
कोण कर्ता ॥ १६ ॥ हें कांहींच न ये अनुमाना । म्हणती जन्म घेते वा-
सना । तरी ते पाहतां दिसेना । ना धरितां न ये ॥ १७॥ वासना कामना
आणि कल्पना । हेतु भावना मति नाना । ऐशा अनंत वृत्ति जाणा । अं-
तःकरणपंचकाच्या ॥ १८ ॥ असो हें अवघें जाणीवयंत्र । जाणीव म्हणजे
स्मरणमात्र । त्या स्मरणास जन्मसूत्र । कैसें लागे ॥ १९ ॥ देह निर्माण
पांचभूतांचा । वायु चाळक तयाचा । जाणणें हा मनाचा । मनोभाव ॥२०॥
ऐसें हें सहजचि घडलें । तत्त्वांचें गुंथाडें झालें । कोणास कोणें जन्मविलें ।
कोणत्या प्रकारें ॥ २१ ॥ तरी हें पाहतां दिसेना । म्हणोनि जन्मचि अ-
सेना । उपजला प्राणी येईना । मागुती जन्मा ॥ २२ ॥ कोणासीच जन्म
नाहीं । तरी संतसंगें केलें कार्यी । ऐसा अभिप्राय सर्वेही । श्रोत्यांचा
॥ २३ ॥ पूर्वी स्मरण ना विस्मरण । मध्येंचि हें झालें स्मरण । अंतर्यामी
अंतःकरण । जाणती कळा ॥ २४ ॥ सावर्धान आहे तों स्मरण । विकळ
होतां विस्मरण । विस्मरण पडतां मरण । पावती प्राणी ॥ २५ ॥ स्मर-
ण विस्मरण राहिलें । मग देहास मरण आलें । पुढें जन्मास घातलें ।
कोणास कोणें ॥ २६ ॥ म्हणोनि जन्मचि असेना । आणि यातनाहि दि-
सेना । अवघी व्यर्थचि कल्पना । बळावली ॥ २७ ॥ म्हणोनि जन्मचि
नाहीं कोणासी । श्रोत्यांची आशंका ऐसी । मरोन गेलें तें जन्मासी । मा-
गुर्ती न ये ॥ २८ ॥ वाळलें काष्ठ हिरवळेना । पडिलें फळ पुन्हा लागेना ।
तैसें पडिलें शरीर येइना । जन्मास मागुतें ॥ २९ ॥ मडकें अवाचितें फु-
१. लोकरीतीचें. २. बरें. ३. टिकली. ४. पूर्वकर्माचें. ५. विचार. ६. सावध.
९ वा. ] विकल्पनिरसन. २३३
टलें । फुटलें तें फुटोनीच गेलें । तैसेंचि पुन्हा जन्मलें । नाहीं मनुष्य ॥३०॥
येथें अज्ञान आणि सज्ञान । सारिखेंचि झालें समान । ऐसें बळावलें अनु-
मान । श्रोत्यांसी ॥ ३१ ॥ वक्ता म्हणे हो ऐका । अवघें थोतांड करूं
नका । सावध होऊन विवेका । अवलोकावें ॥३२॥ प्रयत्नेंविण कार्य झालें ।
जेविल्याविण पोट भरलें । ज्ञानेंविण मुक्त झालें । हें तों घडेना ॥ ३३ ॥
स्वयें आपण जेविला । त्यास वाटे लोक धाला । परंतु हें समस्तांला । घ-
डलें पाहिजे ॥ ३४ ॥ पोहणें शिकला तो तरेल । पोहणें नेणे तो बुडेल ।
येथेंहि अनुमान करील । ऐसा कवण ॥ ३५ ॥ तैसें जयांस ज्ञान झालें ।
ते ते तितुकेच तरले । ज्याचें बंधन तुटलें । तोचि मुक्त ॥ ३६ ॥ मोकळा
ह्याणे नाहीं बंधन । आणि प्रत्यक्ष बंदीं पडिले जन । त्यांचें कैचें समाधान ।
तें तुम्ही पाहा ॥ ३७ ॥ नेणे दुसऱ्याची तळमळ । तें मनुष्य परदुःखशी-
तळ । तैसाचि हाही केवळ । अनुभव जाणावा ॥ ३८ ॥ जयास आत्मज्ञान
झालें । तत्त्वें तत्व विवंचिलें । खुणेसि पावतां बाणलें । समाधान ॥ ३९ ॥
ज्ञानें चुके जन्ममरण । सगट बोलणें अप्रमाण । वेद शास्त्र आणि पुराण ।
मग कासयासी ॥ ४० ॥ वेदशास्त्र विचारखोली । महानुभावांची मंडळी ।
भूमंडळीं लोक सकळी । हें तों मानीतना ॥ ४१ ॥ अवघें होतां अप्रमाण ।
मग आपुलेंच काय प्रमाण । म्हणोनि जेथें आत्मज्ञान । तोचि मुक्त ॥४२॥
अवघेच मुक्त पाहतां नर । हा हि ज्ञानाचा उद्धार । ज्ञानेंविण तो उद्धार ।
होणार नाहीं ॥ ४३ ॥ आत्मज्ञान कळों आलें । म्हणोनि दृश्य मिथ्या
झालें । परंतु वेढा लाविलें । सकळांस येणें ॥ ४४ ॥ आतां प्रश्न फिटला ।
ज्ञानी ज्ञानें मुक्त झाला । अज्ञान तो बांधला । आपुले कल्पनेनें ॥ ४५ ॥
विज्ञानासारिखें अज्ञान । आणि मुक्तासारिखें बंधन । निश्चयासारिखें अ-
नुमान । मानूंचि नये ॥ ४६ ॥ बंधन ह्मणिजे कांहींच नाहीं । परी वेढां
लाविलें सर्वही । यासि उपायचि नाहीं । कळल्यावांचूनी ॥ ४७ ॥ कांहींच
नाहीं आणि बांधी । हेंचि नवल पाहतां आधीं । मिथ्या जाणिजेना बंधीं ।
म्हणोनि बद्ध ॥ ४८ ॥ भोळा भाव सिद्धीस जाव । हा उधाराचा उपाव ।
रोकडा मोक्षाचा अभिप्राय । विवेकें जाणावा ॥ ४९ ॥ प्राणी व्हावया मो-
कळा । आधीं पाहिजे जाणीवकळा । सकळ जाणतां निराळा । सहजचि
होय ॥ ५० ॥ कांहींच नेणिजे तें अज्ञान । सकळ जाणिजे तें ज्ञान । जा-
णीव राहतां विज्ञान । स्वयेंचि आत्मा ॥ ५१ ॥ अमृत सेवून अमर झाला ।
तो म्हणे मृत्यु कैसा येतो जनाला । ऐसा विवेकी म्हणे बद्धाला । जन्म तो
कैसा ॥ ५२ ॥ जाणता म्हणे जनांतें । तुम्हांस भूत कैसें झडपितें । तुम्हांस
विष कैसें चढतें । निर्विष म्हणे ॥ ५३ ॥ आधीं बद्धासारिखें व्हावें । मग
हें नलगेचि पुसावें । विवेक दूरी ठेवून पाहावें । लक्षण बद्धाचें ॥ ५४ ॥
निजल्यास चेइला तो । म्हणे हा कांरे वोसणैतो । अनुभव पाहणोंचि आहे
तो । तरी मग निजोन पाहावा ॥ ५५ ॥ ज्ञात्याची उठावली वृत्ती । बद्धा-
ऐसी न पडे गुंती । भुकेल्याची अनुभवप्राप्ती । धाल्यास न ये ॥ ५६ ॥
इतुकेन आशंका तुटली । ज्ञानें मोक्षप्राप्ति झाली । विवेक पाहतां बाणली ।
अंतरस्थिती ॥ ५७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नवमदशके विक-
ल्पनिरसननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. देहातीत.
श्रीगणेशाय नमः ॥ ज्ञानी सुटला ज्ञानमतें । परंतु जन्म कैसा बद्धांतें ।
बद्धाचें काय जन्मतें । अंतकाळीं ॥ १ ॥ बद्ध प्राणी मरोन गेले । तेथें
कांहींच नाहीं उरलें । जाणिवेचें विस्मरण झालें । मरणापूर्वी ॥ २ ॥
ऐसी घेतली आशंका । याचें उत्तर ऐका । आतां दुश्चित होऊं नका । म्हणे
वक्ता ॥ ३ ॥ पंचप्राण स्थळें सोडिती । प्राणरूप वासनावृत्ती । वासना-
मिश्रित प्राण जाती । देह सोडुनियां ॥ ४ ॥ वायूसरिसी वासना गेली ।
ते वायुरूपेंचि राहिली । पुन्हा जन्म घेऊनि आली । हेतुपरत्वें ॥ ५ ॥
कित्येक प्राणी निःशेष मरती । पुन्हा मागुते जीव येती । टाकून दिल्हे तेणें
दुखवती । हस्तपादादिक ॥ ६ ॥ सर्पदंश झालियावरी । तीन दिवसां
उठवी धन्वंतरी । तेव्हां ते माघारीं । वासना येते कीं ॥ ७ ॥ कित्येक
शवें होऊन पडती । कित्येक तयांस उठविती । यमलोकींहून आणिती ।
माघारे प्राणी ॥ ८ ॥ कित्येक पूर्वी शापिले । ते शापदेह पावले । उःशाप-
काळीं पुन्हा आले । पूर्वदेहीं ॥ ९ ॥ कित्येकीं बहु जन्म घेतले । कित्येक
१. ब्रह्मानुभवाचें ज्ञान. २. भितों.
९ वा. ] देहातीत. २३५
परकाया प्रवेशले । ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ १० ॥ फुंकिल्या-
सरिसा वायु गेला । तेथें वायुसुत निर्माण झाला । म्हणोन वायुरूप वास-
नेला । जन्म आहे ॥ ११ ॥ मनाच्या वृत्ति नाना । त्यांत जन्म घेते वासना ।
वासना पाहतां दिसेना । परंतु आहे ॥ १२ ॥ वासना जाणिजे जाणीवहेतु ।
जाणीव मूळींचा मूळतंतु । मूळमायेंत असे मिश्रित । कारणरूपें ॥ १३ ॥
कारणरूपें आहे ब्रह्मांडीं । कार्यरूपें वर्ते पिंडीं । अनुमानीतां तांतडी ।
अनुमानेना ॥ १४ ॥ परंतु आहे सूक्ष्मरूप । जैसें वायूचें स्वरूप । सकळ
देव वायुरूप । आणि भूतसृष्टी ॥ १५ ॥ वायूमध्यें विकार नाना । वायु तरी
पाहतां दिसेना । तैसी जाणीव वासना । अति सूक्ष्म ॥ १६ ॥ त्रिगुण आणि
पंचभूतें । हीं वायूमध्यें मिश्रितें । अनुमानेना म्हणोनि त्यांतें । मिथ्या
म्हणों नये ॥ १७ ॥ सहज वायु चाले । तरी सुगंध दुर्गंध कळां आले । उष्ण
शीतळ तप्त निवाले । प्रत्यक्ष प्राणी ॥ १८ ॥ वायूचेनि मेघ वोळती ।
वायूचेनि नक्षत्रें चालती । सकळ सृष्टीची वर्तती गती । सकळ तो वायु
॥ १९ ॥ वायुरूपें दैवतें भूतें । अंगीं भरती अकस्मातें । वध केलिया प्रेतें ।
सावध होती ॥ २० ॥ राहणें ब्राह्मणसंबंध जाती । राहणें ठेवणीं सांपडती ।
नाना गुंतले उसवती । प्रत्यक्ष राहणें ॥ २१ ॥ वारें निराळें न बोले ।
देहामध्यें भरोन डोले । आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी ॥ २२ ॥
ऐसा वायूचा विकार । एवंच कळेना विस्तार । सकळ कांहीं चराचर ।
वायुमुळें ॥ २३ ॥ वायु स्तब्धरूपें सृष्टिधर्ता । वायु चंचलरूपें सृष्टिकर्ता ।
न कळे तरी विचारो प्रवर्ता । म्हणिजे कळे ॥ २४ ॥ मुळापासून शेवट-
वरी । वायुचि सकळ कांहीं करी । वायुवेगळें कर्तृत्व चतुरीं । मज निरूपावें
॥ २५ ॥ जाणीवरूप मूळमाया । जाणीव जाते आपुल्या ठाया । गुप्त प्रगट
होऊनियां । विश्वीं वर्ते ॥ २६ ॥ कोठें गुप्त कोठें प्रगटे । जैसें जीवन उफों-
ळे आँटे । पुढें मागुतां ओघ लोटे । भूमंडळीं ॥ २७ ॥ तैसाच वायूमध्यें
जाणीवप्रकार । उमटे आटे निरंतर । कोठें विकारे कोठें समीरें । उगाच
वाजे ॥ २८ ॥ वारीं अंगावरून जाती । तेणें हात पाय वाळती । वारा
१. वायूपासून झालेला, अग्नि. २. अंगांत दैवत आणवून बोलविणें, त्यायोगें.
३. वासना. ४. चढतें-उतरतें. ५. विकार पावतो. ६. वायु.
वाजतां करपती । आलीं पिकें ॥ २९ ॥ नाना रोगांचीं नाना वारीं । पडिा
करिती पृथ्वीवरी । वीज कडाडी अंबरीं १ । वायूसुळें ॥ ३० ॥ वायूकारितां
रागोद्गार २ । कळे वोळखीचा निर्धार । दीप लागे मेव पडे हा चमत्कार ।
रागोद्वारीं ॥ ३१ ॥ वायु फुंकितां धुली पडती । वायु फुंकितां खोडकें
करपती । वायूकारितां चालती । नाना मंत्र ॥ ३२ ॥ मंत्रीं देव
प्रगटती । मंत्रीं भूतें आवरती । बैजागिरी वोडंबरै करिती । मंत्रसामर्थ्यें
॥ ३३ ॥ राक्षसांची मावरचना । ते हे देवादिकां कळेना । विचित्र सामर्थ्यें
नाना । स्तंभनमोहनादिकें ॥३४॥ धडचि पिसें करावें । पिसेंच उमजवावें ।
नाना विकार सांगावे । किती म्हणोनी ॥ ३५ ॥ मंत्रीं संग्राम देवाचा ।
मंत्रीं साभिमान ऋषींचा । महिमा मंत्रसामर्थ्याचा । कोण जाणे ॥ ३६ ॥
मंत्रीं पक्षी आटोपिती । मूषकें श्वापदें बांधिती । मंत्रीं महासर्प खिलोती ।
आणि धनलाभ ॥३७॥ आतां असो हा प्रश्न झाला । बद्धाचा जन्म प्रत्यया
आला । मागील प्रश्न फिटला । श्रोतयांचा ॥ ३८ ॥ इति
९ वा. ] संदेहवारण. २३७
कैसें झालें । विचारून पाहिजे बोलिलें । ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । आक्षेप-
वचनें १ ॥ ९ ॥ आतां याचें प्रत्युत्तर । सावध ऐका निरुत्तर । येथें पडिले
कीं विचार । संदेहाचे ॥ १० ॥ ब्रह्मांड नाहीं म्हणौं तरी दिसे । आणि
दिसे म्हणों तरी नासे । आतां हें समजती कैसे । श्रोतेजन ॥ ११ ॥ तंव
श्रोते झाले उदितें २ । आह्नों म्हणती सावचित्त । प्रसंगें बोलों उचित । प्रत्युत्तर
॥ १२ ॥ आकाशीं दीपास लाविलें । दीपें आकाश परतें केलें । हैं तौं घ-
डेना पाहिलें । पाहिजे श्रोतीं ॥ १३ ॥ आप तेज अथवा पवन । सारूं न
शकती गगन । गगन पाहतां सघन । चळेल कैसें ॥ १४ ॥ अथवा कठिन
झाली मेदिनी ३ । तरी गगनें केली चाळणी । पृथ्विचें सर्वांग भेदूनी । राहिलें
गगन ॥ १५ ॥ याची प्रचीत ऐसी असे । जें जडत्वा आलें तितुकें नासे ।
आकाश जैसें तैसें असे । चळणार नाहीं ॥ १६ ॥ वेगळेपणें पाहावें । तयास
आकाश म्हणावें । अभिन्न होतां स्वभावें । आकाश ब्रह्म ४ ॥ १७ ॥ तस्मात्
आकाश कळेना । भेद गगनाचा कळेना । भासलें ब्रह्म यास जाणा । आ-
काश म्हणावें ॥ १८ ॥ निर्गुण ब्रह्मसें भासलें । कल्पूं जातां अनुमानलें ।
म्हणोन आकाश बोलिलें । कल्पनेसाठीं ॥ १९॥ कल्पनेसी भासे भास । ति-
तुकें जाणावें आकाश । परब्रह्म निराभास । निर्विकल्प ॥ २० ॥ पंचभूतां-
मध्यें वास । म्हणोनि बोलिजे आकाश । भूतांतरीं ५ जो ब्रह्मांश । तेंचि गगन
॥ २१ ॥ प्रत्यक्ष होतें आणि जातें । अचळ कैसें म्हणावें त्यातें । म्हणोनियां
गगनातें । भेदिलेंच नाहीं ॥ २२ ॥ पृथ्वि विरोन उरे जीवन । जीवन
नसतां उरे अग्न । अग्नि विझतां उरे पवन । तोहि नासे ॥ २३ ॥ मिथ्या
आलें आणि गेलें । तेणें खरें तें भंगले । ऐसें हें प्रतीतीस आलें । कोणे परी
॥ २४ ॥ भ्रमें प्रत्यक्ष दिसतॆं । विचार पाहतां काय तेथें । भ्रममूळ या
जगांतें । खरें कैसें म्हणावें ॥ २५ ॥ भ्रम शोधितां कांहींच नाहीं । तेथें भे-
दिलें कोणे ठाईं । भ्रमें भेदिलें म्हणतां ठायीं । भ्रमचि मिथ्या ॥ २६ ॥
भ्रमाचें रूप मिथ्या झालें । मग सुखें म्हणावें भेदिलें । मुळीं लटिकें त्याणें ६
केलें । तेंहि तैसें ॥ २७ ॥ लटिक्यानें उदंड केलें । तरी आमुचें काय गेलें ।
१. शंकावचनानें. २. तयार. ३. पृथ्वी. ४. वेगळें होऊन पाहिल्यास आकाश,
व एकरूपतेनें अनुभव घेतल्यास तेंच ब्रह्म होय. ५. पंचभूतांमध्ये. ६. जो नाहीं त्यानें.
केलें म्हणतांच ना॑थिलें । शाहणे जाणती ॥ २८ ॥ सागरामध्ये खसखस ।
तैसें परब्रह्म दृश्य । मतीसारिखा मतिप्रकाश । अंतरीं वाटे ॥ २९ ॥ मति
करितां विशाल । कवळों लागे अंतराळ । पाहतां भासे ब्रह्मगोल । कविंठ
जैसें ॥ ३० ॥ वृत्ति त्याहूनि विशाल । करितां ब्रह्मांड बदरिफळ । ब्रह्मा-
कार होतां केवळ । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥ आपण विवेकें विशाळला ।
मर्यादे वेगळा झाला । मग ब्रह्मगोल देखिला । वटबीजैन्यायें ॥३२॥ होतां
त्याहून विस्तीर्ण । वटबीज कोटिप्रमाण । आपण होतां परिपूर्ण । कांहींच
नाहीं ॥ ३३ ॥ आपण भ्रमें लाहानला । केवळ देहधारी झाला । तरी मग
ब्रह्मांड त्याला । कवळेळ कैसें ॥ ३४ ॥ वृत्ति ऐसी वाढवावी । पसरून
नाहींच करावी । पूर्णब्रह्मास पुरवावी । चहूंकडे ॥ ३५ ॥ जवें एक सुवर्ण
आणितां । तेणें ब्रह्मांड मढवितां । कैसें होईल तत्वतां । बरें पाहा ॥ ३६ ॥
वस्तु वृत्तीस कँवळे । तेणें वृत्ति फाटोन वितुळे । निर्गुण आत्मा निवळे ।
जैसा तैसा ॥ ३७ ॥ येथें फिटली आशंका । श्रोते हो संदेह धरूं नका ।
अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३८ ॥ विवेकें तुटे अनुमान ।
विवेकें होतें समाधान । विवेकें आत्मनिवेदन । मोक्ष लाभे ॥ ३९ ॥ केली
मोक्षाची अपेक्षा । विवेकें सारिलें पूर्वपक्षां । सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा । प्र-
माण नलगे ॥ ४० ॥ हीं प्रचितीचीं उत्तरें । कळती सारासार विचारें । म-
ननध्यासें साक्षात्कारें । पावन होइजे ॥४१॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे नवमदशके संदेहवारणनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. अलिप्त स्थिति.
श्रीगणेशाय नमः ॥ देउळामध्यें जगन्नाथ । आणि देउळावरी बैसला
काकें । तरी तो देवाहून अधिक । म्हणों नये ॥ १ ॥ सभा बैसली राज-
द्वारीं । आणि मर्कट बैसलें स्तंभावरी । परी तें सभेहून श्रेष्ठ चतुर्रीं ।
कैसें मानावें ॥ २ ॥ ब्राह्मण स्नान संध्या करून गेले । आणि बर्क तसेचि
१. नाहीं. २. बोराएवढें. ३. वटवृक्षाचे तुलनेनें त्यांचें बीज फारच लहान
असते, या विचारसरणीनें. ४. जवभार. ५. वृत्तीला ब्रह्माचें आकलन झाल्यावर
वृत्ति लय पावते. ६. भ्रामक विचारास. ७. कावळा. ८. बगळा.