सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

७ वा.] बद्धमुक्त. १६९
ष्टीवरी । ऐसें बोलतां उरी १ । कोणास आहे ॥ २२ ॥ बहु ऋषी बहु मुनी ।
सिद्ध योगी आत्मज्ञानी । झाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३ ॥
श्लोक ॥ प्रह्लादनारदपराशरपुंडरीकव्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ॥
रुक्मांगदार्जुनवसिष्ठबिभीषणादीन्पुण्यानिमान्परमभागवतान्स्मरामि ॥ १ ॥
कविर्हरिरंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः ॥ आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभा-
जनः ॥ २ ॥ यांहीं वेगळे थोर थोर । ब्रम्हा विष्णु महेश्वर । आदिकरून
दिगंबर २ । विदेहादिकें ३ ॥ २४ ॥ शुक वामदेव मुक्त झाले । येर हे अवघेच
बुडाले । या वचनें विश्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५ ॥ तरी वेद कैसा बो-
लिला । तो काय तुम्हीं मिथ्या केला । ऐकोन वक्ता देता झाला । प्रत्युत्तर
॥ २६ ॥ वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष । साधु आणि
व्युत्पन्न दक्ष । त्यास हें न माने ॥ २७ ॥ तथापि हें जरी मानलें । तरी
वेदसामर्थ्य बुडालें । वेदाचोनि उद्धारिलें । न वचे कोणा ॥ २८ ॥ वेदांअंगीं
सामर्थ्य नसे । जरी या वेदासि कोण पुसे । म्हणोनि वेदीं सामर्थ्य असे ।
जन उद्धरावया ॥ २९ ॥ वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यराशी ।
म्हणोनि वेदीं सामर्थ्यांसी । काय उणें ॥ ३० ॥ वेद शास्त्र पुराण । भाग्यें
झालिया श्रवण । तेणें होइजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१ ॥ श्लोक अ-
थवा श्लोकार्ध । नाहीं तरी श्लोकपादें ४ । श्रवण होतां एक शब्द । नाना दोष
जाती ॥ ३२ ॥ वेदशास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्यांच्या अर्थीं ५ । अगाध म-
हिमा व्यासवाणी । वदोनि गेली ॥ ३३ ॥ एकाक्षर होतां श्रवण । तात्काळां
चि होइजे पावन । ऐसें ग्रंथाचें महिमान । ठायीं ठायीं बोलिलें ॥ ३४ ॥ दोहीं-
वेगळा तिजा नुद्धरे । तरी महिमा कैंचा उरे । असें हें जाणिजे चतुरें । येर-
गाथागोवी ॥ ३५ ॥ वेदशास्त्रें पुराणें । कैसीं होती अप्रमाणें । दोघांवांचूनि
तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६ ॥ म्हणसी काष्ठ होऊनि पडिला । तोचि एक
मुक्त झाला । शुक तोहि अनुवादला । नाना निरूपणें ॥ ३७ ॥ शुक मुक्त
ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण । परी तो नव्हता अचेतन ६ । ब्रम्हाकार
॥ ३८ ॥ अचेतन ब्रम्हाकार । असता शुक योगीश्वर । तरी सारासार विचार ।


१. बाकी कोण उरलें ? मुक्त कोणीच नाहीं असें झालें. २. संन्यासी. ३. जन-
कादिक. ४. श्लोकाचा एक चरण. ५. ठिकाणीं ६. जड, सुस्त.

१७० श्रीदासबोध. [ दशक
बोलणें न घडे ॥ ३९॥ जो ब्रम्हाकार झाला । तो काष्ठ होऊन पडिला । शुक
भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४० ॥ निरुपण हें सारासार । बोलिला
पाहिजे विचार । धांडोळावें चराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१ ॥ क्षणएक ब्रम्ह-
चि व्हावें । क्षणएक दृश्य धांडोळावें । नाना दृष्टांतीं संपादावें । वक्तृत्वांसी
॥ ४२ ॥ असो भागवतनिरूपण । शुक बोलिला आपण । तया अंगीं बद्धपण ।
लावूं नये कीं ॥ ४३ ॥ म्हणोनि बोलतां चालतां । निश्चेष्टित पडिलें नसतां ।
मुक्ति लाभे सायुज्यता । सद्गुरुबोधें ॥ ४४ ॥ एक मुक्त एक नित्यमुक्त ।
एक जाणावे जीवन्मुक्त । एक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५ ॥
सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेह²मुक्त । दोहीं वेगळे नित्यमुक्त ।
योगीश्वर जाणावे ॥ ४६ ॥ स्वरूपबोधें स्तब्ध³ता । ते जाणावी तटस्थता ।
तटस्थता आणि स्तब्धता । हा देहसंबंध ॥ ४७ ॥ येथें अनुभवासीच कारण ।
येर सर्व निष्कारण । तृप्ति पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८ ॥
कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला । तेणें शब्दें जाजावला । हें तों
घडेना ॥ ४९ ॥ स्वरूपीं नाहीं देह । तेथें कायसा संदेह । बद्ध मुक्त ऐसा
भाव । देहाचकडे ॥ ५० ॥ देहबुद्धी धरून चित्तीं । मुक्त ब्रम्हादिक
नव्हती । तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१ ॥ मुक्तपणें येणेंचि
बद्ध । मुक्त बद्ध ह अबद्ध⁴ । स्वस्वरूप स्वतःसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२ ॥
मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाइजे पाताळा । देहबुद्धीची अर्गळा⁵ ।
स्वरूपीं न संटे⁶ ॥ ५३ ॥ मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला ।
मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४ ॥ जयास बांधावें तें वावें ।
तेथें कैंचा मुक्तभाव । पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५ ॥
श्लोक ॥ बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ॥ गुणस्य मायामूल-
त्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १ ॥ टीका ॥ तत्वज्ञाता परम शुद्ध । तया-
सि नाहीं मुक्त बद्ध । मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६ ॥ जेथें नाम-
रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे । मुक्तबद्ध हें विसरे । विसरपणेंसीं
१. देहभानावर असणारे; व्यवहार करणारे. २. देहभानरहित, समाधिनिमग्न.
३. इंद्रियगति थांबणें. ४. गैरशिस्त. ५. अडथळा. ६. टिकत नाहीं. ७. भ्रामक.
८. त्रिगुणांचा विचार.

७ वा. ] साधनप्रतिष्ठा. १७१
॥ ५७ ॥ बद्ध मुक्त झाला कोण । ऐसा श्रोता करी प्रश्न । बाधक जाणावें
मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८ ॥ एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम ।
मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९ ॥ असो बद्धता आणि मुक्तता ।
आली कल्पनेच्या माथां । ते कल्पना तरी तत्वतां । साच १ आहे ॥ ६० ॥
म्हणोनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ । स्वप्न मिथ्या तात्काळ ।
जागृतीस होय ॥ ६१ ॥ स्वप्नीं बद्ध मुक्त झाला । तो जागृतीस नाहीं
आला । कैंचा कोण काय झाला । कांहीं कळेना ॥ ६२ ॥ म्हणोन मुक्त
विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान । शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३ ॥
बद्ध मुक्त हा संदेह । धरी कल्पनेचा देह । साधु सदा निःसंदेह । देहा-
तीत वस्तु ॥ ६४ ॥ आतां असो हें पुढती । पुढें कळावें कोणे रीतीं । तेंचि
निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे सप्तमदशके बद्धमुक्तनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. साधनप्रतिष्ठा.
श्रीगणेशाय नमः ॥ वस्तूसि जरी कल्पावें । तरी तें निर्विकल्प स्वभा-
वें । तेथें कल्पनेच्या नांवें । शून्याकार ॥ १ ॥ तथापि कल्पूं जातां । न ये
कल्पनेच्या हातां । वोळखी ठावीं २ नै पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २ ॥ कांहीं
दृष्टिस न दिसे । मनास तेंहि न भासे । न भासे न दिसे कैसें । वोळखावें
॥ ३ ॥ पाहों जातां निराकार । मनासि पडे शून्याकार । कल्पूं जातां अं-
धकार । भरला वाटे ॥ ४ ॥ कल्पूं जातां वाटे काळें । परी तें काळें ना
पिवळें । आरक्त निळें ना ढवळें ३ । वर्णरहित ॥ ५ ॥ जयास वर्ण व्यक्ती ४
नसे । आसाहूनि अनारीसें । रूपचि नाहीं कैसें । वोळखावें ॥ ६ ॥ न दि-
सतां वोळखण । किती धरावी आपण । हें तों श्रमासीच कारण । होत
असे ॥ ७ ॥ जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अव्यक्त ५ । जो अचिंत्य चिं-
तनातीत । परमपुरुष ॥ ८ ॥ श्लोक ॥ अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गु-
णात्मने । समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ॥ १ ॥ अचिंत्य तें चिंतावें ।
अव्यक्तास आठवावें । निर्गुणास ओळखावें । कोणेपरी ॥ ९ ॥ जें दृष्टिसचि
१. खरी आहे? नाहीं. २. सांपडत नाहीं. ३. पांढरें. ४. आकार. ५. गुप्त.

१७२ श्रीदासबोध. [ दशक
न पडे । जें मनासहि नातुं१डे । तया कैसें पाहणें घडे । निर्गुणासी ॥ १०
असंगाचा संग धरणें । निरा२लंबिं वास करणें । निःशब्दासि अनुवादणें ।
कोणे परी ॥ ११ ॥ अचिंत्यासि चिंतूं जातां । निर्विकल्पासि कल्पितां ।
अद्वैताचें ध्यान करितां । द्वैतचि उठे ॥ १२ ॥ आतां ध्यानचि सांडावें ।
अनुसंधान मोडावें । तरी मागुतें पडावें । महासंशयीं ॥ १३ ॥ द्वैताच्या
भेणें अंतरीं । वस्तु न पाहिजे तरी । तेणें समाधाना डै३री । कदा असेचि
ना ॥ १४ ॥ सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे । नित्या-
नित्य विचारें घडे । समाधान ॥ १५ ॥ वस्तु चिंतितां द्वैत उपजे । सोडी
करितां कांहीं नुमजे । शून्यत्वें संदेहीं पडिजे । विवेकेंविण ॥ १६ ॥ ह्म-
णोनि विवेक धरावा । ज्ञानें प्रपंच सांडावा । अहंभाव वोसरावा । परी
तो वोसरेना ॥ १७ ॥ परब्रह्म तें अद्वैत । कल्पितांच उठे द्वैत । तेथें हेतु
आणि दृष्टांत । कांहींच न चले ॥ १८ ॥ तें आठवितां विसरिजे । कां तें
विसरोन आठविजे । जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ॥ १९ ॥ त्यास न भे-
टतां होय भेटी । भेटों जातां पडे तुटी । ऐशी हे नवल गोष्टी । मुकेपणाची
॥ २० ॥ तें साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना । लागला सं-
बंध तुटेना । निरंतर ॥ २१ ॥ तें असतचि सदा असे । नातरी पाहतां दु-
४रावे । न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२ ॥ जेथें अपाय तोचि उपाय ।
आणि उपाय तोचि अपाय । हें अनुभवेंविण काय । उमजों जाणे ॥ २३ ॥
तें नुमजतांचि उमजे । उमजोन कांहींच नुमजे । तें वृत्तीविण पाविजे । नि-
वृत्तिपद ॥ २४ ॥ तें ध्यानीं धरितां न ये । चिंतनीं चिंतावें तें काय । म-
नामध्यें न ५समाये । परब्रह्म तें ॥ २५ ॥ त्यास उपमे द्यावें जळ । तरी तें नि-
र्मळ निश्चळ । विश्व बुडालें सकळ । परी तें कोरडेंच असे ॥ २६ ॥ नव्हे प्र-
काशासारिखें । अथवा नव्हे काळोखें । आतां तें कासयासारिखें । सांगावें
हो ॥ २७ ॥ ऐसें ब्रह्म निरं६जन । कदा नव्हे दृश्य७मान । लावावें तें अनुसं-
धान । कोणे परी ॥ २८ ॥ अनुसंधान लावूं जातां । कांहीं नाहीं वाटे आतां ।
तेथे मनाचिये माथां । संदेह वाजे ॥ २९ ॥ लटिकेंचि काय पाहावें । कोठें


१. न कळे. २. अधांतरीं. ३. ठावठिकाण. ४. दुरावतें. ५. मावत नाहीं.
६. उपाधिरहित. ७. पाहण्याजोगें.

जाऊन राहावें । अभाव घेतला जीवें । सत्यस्वरूपाचा ॥ ३० ॥ अभावाचे
म्हणों सत्य । तरी वेदशास्त्र कैसें मिथ्य । आणि व्यासादिकांचें कृत्य १ ।
वाउगें नव्हे ॥ ३१ ॥ ह्मणोनि मिथ्या म्हणतां न ये । बहुत ज्ञानाचे उ-
पाय । बहुतीं निर्मिलें तें काय । मिथ्या ह्मणावें ॥ ३२ ॥ अद्वैत ज्ञानाचा
उपदेश । गुरुगीता तो महेश । सांगता होय पार्वतीस । महाज्ञान ॥ ३३ ॥
अवधूतें गीता केली । गोरक्षास निरूपिली । ते अवधूतगीता बोलिली । ज्ञा-
नमार्गें ॥ ३४ ॥ विष्णु होऊन राजहंस । विधीस २ केला उपदेश । ते हंस-
गीता जगदीश । बोलिला स्वमुखें ॥ ३५ ॥ ब्रम्हा नारदातें उपदेशित ।
चतुःश्लोकी भागवत । पुढें व्यासमुखें बहुत । विस्तारलें ॥ ३६ ॥ वासि-
ष्ठसार वसिष्ठ ऋषी । सांगता झाला रघुनाथासी । कृष्ण सांगे अर्जुनासी ।
सप्तश्लोकी ३ गीता ॥ ३७ ॥ ऐसें सांगावें तें किती । बहुत ऋषि बोलिले ब-
हुतीं । अद्वैतज्ञान आदि अंतीं । सत्यचि असे ॥ ३८ ॥ म्हणोन मिथ्या
आत्मज्ञान । म्हणतां पाविजे पतन । प्रज्ञारहित जे जन । तयांस हें कळेना
॥ ३९ ॥ जेथें शेषाची प्रज्ञा ४ मंदली । श्रुतीस मौनमुद्रा पडिली । जाणपणें
न वचे वदली । स्वरूपस्थिति ॥ ४० ॥ आपणास नुमजे बरवें । ह्मणोनि मि-
थ्या कैसें करावें । नातरी सुदृढ धरावें । सद्गुरुमुखें ॥ ४१ ॥ मिथ्या तेंचि
सत्य झालें । सत्य असोनि मिथ्या केलें । संदेहसागरीं बुडालें । अकस्मात
मन ॥ ४२ ॥ मनास कल्पायाची सवे । मनें कल्पिलें तें नव्हे । तेणें गुणें
संदेह धांवे । मीपणाचेनि पंथें ॥ ४३ ॥ तरी तो पंथचि मोडावा । मग पर-
मात्मा जोडावा । समूळ संदेह तोडावा । साधूचेनि संगतीं ॥ ४४ ॥ मीपण
शस्त्रें तुटेना । मीपण फोडितां फुटेना । मीपण सोडितां सुटेना । कांहीं
केल्या ॥ ४५ ॥ मीपणें वस्तु नाकळे । मीपणें भक्ति मावळे । मीपणें शक्ति
गळे । वैराग्याची ॥ ४६ ॥ मीपणें प्रपंच न घडे । मीपणें परमार्थ बुडे ।
मीपणें सकळहि उडे । यश कीर्ती प्रताप ॥ ४७ ॥ मीपणें मैत्री तुटे ।
मीपणें प्रीति आटे । मीपणें लिगटे । अभिमान आंगीं ॥ ४८ ॥ मीपणें
विकल्प उठे । मीपणें कलह सुटे । मीपणें संमोह फुटे । ऐक्यतेचा ॥ ४९ ॥
मीपण कोणासीच न साहे । तें भगवंतीं कैसेनि साहे । म्हणून


१. ग्रंथरूप कृति. २. ब्रम्हदेवास. ३. सप्तशतश्लोकी, सातशें श्लोकांची. ४. बुद्धि.

१७४ श्रीदासबोध. [ दशक
मीपण सांडून राहे । तोचि समाधानी ॥ ५० ॥ मीपण कैसें त्यागावें । ब्रम्ह
कैसें अनुभवावें । समाधान कैसें पावावें । कोणत्या प्रकारें ॥ ५१ ॥ मीपण
जाणोन त्यागावें । ब्रम्ह होऊन अनुभवावें । समाधान तें पावावें । निः-
संगपणें ॥ ५२ ॥ आणिक एक समाधान । मीपणेंविण साधन । करूं जाणे
तोचि धन्य । समाधानी ॥ ५३ ॥ मी ब्रम्हचि झालों स्वतां । साधन कोण
करील आतां । ऐसें मनीं कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५४ ॥ ब्रम्हीं
कल्पना न साहे । तेचि तेथें उभी राहे । तयेसि शोधूनि पाहे । तोचि साधु
॥ ५५ ॥ निर्विकल्पासि कल्पावें । परी कल्पिलें तें आपण न व्हावें । मीप-
णास त्यागावें । येणें रीती ॥ ५६ ॥ ब्रम्हविद्येच्या लपनीं¹ । कांहींच न
व्हावें असोनी । दक्ष आणि समाधानी । तोचि हें जाणे ॥ ५७ ॥ जयास
आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें । येथें कल्पनेच्या नांवें । शून्य आलें
॥ ५८ ॥ पैदींहून² चलों नये । करावें साधन उपाय । तरीच सांपडे सोय ।
अलिप्तपणाची ॥ ५९ ॥ राजा राज्यपदीं असतां । उगीच चाले सर्वसत्ता ।
साध्यचि होऊन तत्वतां । साधन करावें ॥ ६० ॥ साधन आलें देहाच्या
माथां । आपण देह नव्हे सर्वथा । ऐसा करून अकर्ता । सहजचि आहे
॥ ६१ ॥ देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें । देहातीत असतां
स्वभावें । देह कैंचा ॥ ६२ ॥ ना तें साधन ना तें देह । आपण आपला
निःसंदेह । देहींच असोन विदेह³-। स्थिती ऐसी ॥ ६३ ॥ साधनेंविण ब्रम्ह
होतां । लागों पाहे देहममता । आळस प्रबळे तत्वतां । ब्रम्हज्ञानमिसें
॥ ६४ ॥ परमार्थमिसें आळस जागे । ध्यानमिसें निद्रा लागे । मुक्तिमिसें
दोष भोगे । अनर्गळता⁵ ॥ ६५ ॥ निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें विवाद
पडे । उपाधिमिसें येऊन जडे । अभिमान अंगीं ॥ ६६ ॥ तैसा ब्रम्हज्ञान-
मिसें । आळस अंतरीं प्रवेशे । म्हणे साधनाचें पिसें । काय करावें ॥ ६७ ॥
श्लोक ॥ किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् । आत्मना पूरितं
सर्वं महाकल्पांबुना यथा ॥ १ ॥ वचन आधारीं लाविलें । जैसें शस्त्र फिर-
विलें । स्वतां हाणोनि घेतलें । जयापरी ॥ ६८ ॥ तैसा उपायाचा अपाय ।
विपरीतपणें स्वहित जाय । साधन सोडितां होय । मुक्तपणें बद्ध ॥ ६९ ॥
१. पोटांत. २. स्वरूपांतून. ३. देहसंबंधी अलिप्तपणा. ४. लागतो. ५. स्वैरपणा.

७ वा. ] श्रवण. १७५
साधन करितां सिद्धपण । हातींचें जाईल निघोन । तेणें गुणें साधन ।
करूंच नावडे ॥ ७० ॥ लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे एक ।
साधन करिती ब्रम्हादिक । हें ठाउकें नाहीं ॥ ७१ ॥ आतां असो हे अवि-
द्या । अभ्याससारिणी विद्या । अभ्यासें पाविजे आद्या । पूर्ण ब्रम्हा ॥ ७२ ॥
अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न । परमार्थाचें साधन ।
बोलिलें पाहिजे ॥ ७३ ॥ याचें उत्तर श्रोत्यांसी । दीधलें पुढिलिये समासीं ।
निरूपिलें साधनासी । परमार्थाच्या ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे सप्तमदशके साधनप्रतिष्ठानिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. श्रवण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान ।
तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥ १ ॥ श्रवणें आतुडे भक्ती । श्रवणें
उद्भवे विरक्ती । श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥ २ ॥ श्रवणें घडे चित्त-
शुद्धी । श्रवणें होय दृढबुद्धी । श्रवणें तुटे उपाधी । अभिमानाची ॥ ३ ॥
श्रवणें निश्चय घडे । श्रवणें ममता मोडे । श्रवणें अंतरीं जडे । समाधान
॥ ४ ॥ श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशय तुटे । श्रवण होतां पालटे । पूर्व-
गुण आपुला ॥ ५ ॥ श्रवणें आवरे मन । श्रवणें घडे समाधान । श्रवणें तुटे
बंधन । देहबुद्धीचें ॥ ६ ॥ श्रवणें मीपण जाय । श्रवणें धोका न ये । श्रवणें
नाना अपाय । भस्म होती ॥ ७ ॥ श्रवणें होय कार्यसिद्धी । श्रवणें लागे
समाधी । श्रवणें घडे सर्वसिद्धी । समाधानाची ॥ ८ ॥ सत्संगावरी श्रवण ।
तेणें कळे निरूपण । श्रवणें होईजे आपण । तदाकार ॥ ९ ॥ श्रवणें प्रबोधें
वाढे । श्रवणें प्रज्ञा चढे । श्रवणें विषयांचे वोढे । तुटोनि जाती ॥ १० ॥
श्रवणें विचार कळे । श्रवणें ज्ञान हें प्रबळे । श्रवणें वस्तु निवळे । साध-
कासी ॥ ११ ॥ श्रवणें सद्बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे । श्रवणें मन हें
माँगे । भगवंतासी ॥ १२ ॥ श्रवणें कुसंग तुटे । श्रवणें काम वोहटे । श्रवणें
धोका आटे । एकसरां ॥ १३ ॥ श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे । श्र-
वणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४ ॥ श्रवणें होय उत्तम गती । श्रवणें
१. अभ्यासानें लाभणारी. २. निश्चय. ३. विवेक. ४. बुद्धि. ५. इच्छितें.

१७६ श्रीदासबोध. [ दशक
आतुडे शांति । श्रवणें पाविजे निवृत्ती । अचळ पद ॥ १५ ॥ श्रवणाऐसें
सार नाहीं । श्रवणें घडें सर्व कांहीं । भवनदीच्या प्रवाहीँ । तरणोपाय श्र-
वणें ॥ १६ ॥ श्रवण भजनाचा आरंभ । श्रवण सर्वां सर्वारंभ । श्रवणें होय
स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७ ॥ प्रवृत्ती अथवा निवृत्ती । श्रवणेंविण न घडे
प्राप्ती । हे तों सकळांस प्रचीती । प्रत्यक्ष आहे ॥ १८ ॥ ऐकिल्याविण कळे-
ना । हैं ठाउकें आहे जना । या कारणें मूळ प्रयत्ना । श्रवण आधीं ॥ १९ ॥
जें जन्मीं ऐकिलेंचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं । म्हणोनिया दुजें कांहीं ।
साम्यता न घडे ॥ २० ॥ बहुत साधनें पाहतां । श्रवणास न घडे साम्यता ।
श्रवणेंविण तत्वतां । कार्य न चले ॥ २१ ॥ न देखतां दिनकर । पडे अव-
घा अंधकार । श्रवणेंविण प्रकार । तैसा होय ॥ २२ ॥ कैसी नवविधा
भक्ती । कैसी चतुर्विधा मुक्ती । कैसी आहे सहजस्थिती । हें श्रवणेंविण न
कळे ॥ २३ ॥ न कळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण । न कळे कैसें
उपासन । विधियुक्त ॥ २४ ॥ नाना व्रतें नाना दानें । नाना तपें नाना
साधनें । नाना योग तीर्थाटणें । श्रवणेंविण न कळती ॥ २५ ॥ नाना वि-
द्या पिंडज्ञान । नाना तत्त्वांचें शोधन । नाना कळा ब्रह्मज्ञान । श्रवणेंविण
न कळे ॥ २६ ॥ अठराभार वनस्पती । एक्या जळें प्रबळती । एक्या जळें
उत्पत्ती । सकळ जीवांची ॥ २७ ॥ सकळ जीवां एक पृथ्वी । सकळ जीवां
एक रवी । सकळ जीवां वर्तवी । एक वायु ॥ २८ ॥ सकळ जीवां एक
पैस । जयास बोलिजे आकाश । सकळ जीवांचा वास । एक परब्रह्मीं॥२९॥
तैसें सकळ जीवांस मिळोन । सारें एकचि साधन । तें हें जाण श्रवण ।
प्राणिमात्रांसी ॥ ३० ॥ नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । स-
वांस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥ ३१ ॥ श्रवणें घडे उपेरती । बद्धाचे
मुमुक्षु होती । मुमुक्षूचे साधक अंतीं । नेमंसि चालती ॥ ३२ ॥ साधकां-
चे होती सिद्ध । अंगीं बाणतां प्रबोधें । हें तों आहे प्रसिद्ध । सकळांस
ठाउकें ॥ ३३ ॥ ठायींचे खळ चांडाल । तेचि होती पुण्यशील । ऐसा हा
१. प्राप्त होते. २. अंतर्मुख होणें. ३. संसार. ४. परमार्थ. ५. अध्ययन, अ-
ध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह, यांचें आचरण. ६. मंत्राचा विधिपूर्वक
जप. ७. सर्व प्रकारच्या. ८. श्रेष्ठ. ९. वैराग्य. १०. विवेक.

७ वा. ] श्रवण. १७७
गुण तात्काळ । श्रवणाचा ॥ ३४ ॥ जो दुर्बुद्धि दुरात्मा । तोचि होय पु-
ण्यात्मा । अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे ॥ ३५ ॥ तीर्थ-
व्रतांची फळश्रुती । पुढें होणार सांगती । तैसें नव्हे हातींच्या हातीं । सप्र-
चीत श्रवणें ॥ ३६ ॥ नाना रोग नाना व्याधी । तत्काळ तोडिजे औषधीं ।
तैसी आहे श्रवणसिद्धि । अनुभवी जाणती ॥ ३७ ॥ श्रवणाचा विचार
कळे । तरीच भाग्यश्री प्रबळे । मुख्य परमात्मा आकळे । स्वानुभवासी ॥
३८ ॥ या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान । निदिध्यासें समा-
धान । होत असे ॥ ३९ ॥ बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान नि-
वळे । अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेह ॥ ४० ॥ संदेह जन्माचें मूळ ।
तें श्रवणें होय निर्मूळ । पुढें सहजचि प्रांजळ । समाधान ॥ ४१ ॥ जेथें
नाहीं श्रवण मनन । तेथें कैंचें समाधान । मुक्तपणाचें बंधन । जडलें पायीं
॥ ४२ ॥ मुमुक्षु साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो बद्ध । श्रवणमननें
शुद्ध । चित्तवृत्ति होय ॥ ४३ ॥ जेथें नाहीं नित्य श्रवण । तें जाणावें विल-
क्षण । तेथें साधकें एक क्षण । क्रमूं नये सर्वथा ॥ ४४ ॥ जेथें नाहीं श्रवण-
स्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ । मागें केलें तितुकें व्यर्थ । श्रवणेंविण होय
॥ ४५ ॥ तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें । नित्यनेमें तरावें ।
संसारसागरीं ॥ ४६ ॥ सेविलेंच सेवावें अन्न । घेतलेंच घ्यावें जीवन ।
तैसें श्रवणमनन । केलेंच करावें ॥ ४७ ॥ श्रवणाचा अनादर । आळसें
करी जो नर । त्याचा होय अपहार । स्वहिताविषयीं ॥ ४८ ॥ आळसाचें
संरक्षण । परमार्थाची बुडवण । या कारणें नित्य श्रवण । केलेंचि पाहिजे
॥ ४९ ॥ आतां श्रवण कैसें करावें । कोणत्या पंथास पावावें । पुढीलिये स-
मासीं आघवें । सांगिजेल ॥ ५० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स-
प्तमदशके श्रवणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. श्रवण.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां श्रवण कैसें करावें । तेंहि सांगिजेल स्वभावें ।
श्रोतीं अवधान द्यावें । एकचित्तें ॥ १ ॥ एक वक्तृत्व श्रवणीं पडे । तेणें
झालें समाधान मोडे । केला निश्चय विघडे । अकस्मात ॥ २ ॥ तें वक्तृ-

स्व त्यागावें । जें मायिक स्वभावें । जेथें निश्चयाच्या नांवें । शून्याकार ॥ ३ ॥
एक्या ग्रंथें निश्चय केला । तो दुजयानें उडविला । तेणें संशयाचि वाढला ।
जन्मवरी ॥ ४ ॥ जेथें संशय तुटती । होय आशंकानिवृत्ती । अद्वैतग्रंथ प-
रमार्थीं । श्रवण करावे ॥ ५ ॥ जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ
धरी । प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६ ॥ जेणें सांडिला इहलोक ।
जो परलोकींचा साधक । तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७ ॥ जयास
पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेवितां द्वैत । तेणें क्षोभलें उठे चित्त । श्रोत्यांचें
॥ ८ ॥ आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे । नाहीं तरी कंटाळे ।
मानस ऐकतां ॥ ९ ॥ ज्याची उपासना जैसी । त्यासि प्रीति वाढे तैसी ।
तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वाटे ॥ १० ॥ प्रीतींचें लक्षण ऐसें ।
अंतरीं उठे अनायासें । पाणी पाणवाटे जैसें । आपणचि धांवे ॥ ११ ॥ तैसा
जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर । तेथें पाहिजे सारासार । विचा-
रणा ते ॥ १२ ॥ जेथें कुलदेवी भगवती । तेथें पाहिजे सप्तशती । इतर
देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३ ॥ घेतां अनंताच्या व्रता । तेथें
नलगे भगवद्गीता । साधुजनांसि वार्त्ता । फळाशेची नाहीं ॥ १४ ॥ वीर-
कंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं । जेथील तेथें आणिकीं ।
कामा न ये सर्वथा ॥ १५ ॥ नाना माहात्म्यें बोलिलीं । जेथील तेथें वंद्य
झालीं । विपरीत करून वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६ ॥ मल्हारि-
माहात्म्य द्वारकेसी । द्वारकामाहात्म्य नेलें काशीसी । काशीमाहात्म्य व्यंक-
टेशीं । शोभा न पावे ॥ १७ ॥ ऐसें सांगतां असे वाढ । परी जेथील तेथेंच
गोड । तैशी ज्ञानियांस चाड । अद्वैतग्रंथाची ॥ १८ ॥ योगियापुढें राहाणे ।
परीक्षावंतापुढें पाषाण । पंडितापुढें डफगाण । शोभा न पावे ॥ १९ ॥
वेदज्ञापुढें जंती । निस्पृहापुढें फलश्रुती । ज्ञानियापुढें पोथी । कोकशास्त्राची
॥ २० ॥ ब्रह्मचाऱ्यापुढें नाचैंणी । रासक्रीडा निरूपणीं । राजहंसापुढें पाणी ।
ठेविलें जैसें ॥ २१ ॥ तैसें अंतर्निष्ठापुढें । ठेविलें शृंगारिक टिपडें । तेणें त्याचें
कैसें घडे । समाधान ॥ २२ ॥ रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयूषा ।
१. जादूटोणा. २. जैनांचा स्वामी. ३. कामशास्त्राची. ४. नायकीण. ५. ब्रह्म-
निष्ठापुढें. ६. अमृताला.

७ वा. ] श्रवण. १७९
संन्यासास वोवेसा । उच्छिष्ट चांडोळीचा ॥ २३ ॥ कर्मनिष्ठा वशीकरण ।
पंचाक्षरिया निरूपण । तेथें भंगे अंतःकरण । सहजचि त्याचें ॥ २४ ॥ तैसे
पारमार्थिक जन । तयांस नसतां आत्मज्ञान । ग्रंथैं वाचितां समा-
धान । होणार नाहीं ॥ २५ ॥ आतां असो हें बोलणें । जयास स्वहित
करणें । तेणें सदा विवरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६ ॥ आत्मज्ञानीं एकचित्त ।
तेणें पाहणें अद्वैत । एकांतस्थळीं निवांत । समाधान ॥ २७ ॥ बहुत प्रकारें
पाहतां । ग्रंथ नाहीं अद्वैतापरता । परमार्थास तत्वतां । तारूंच कीं ॥ २८ ॥
इतर जें प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । पर-
मार्थांसीं ॥ २९ ॥ जेणें परमार्थ वाढे । अंगीं अनुताप चढे । भक्तिसाधन
आवडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३० ॥ जो ऐकतांच गर्व गळे । कां ते आंतींच
मावळे । नातरी एकसरें वोळे । मन भगवंतीं ॥ ३१ ॥ जेणें होय उपरती ।
अवगुण अवघे पालटती । जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ॥ ३२ ॥
जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे । जेणें विषयवासना मोडे । त्या नांव
ग्रंथ ॥ ३३ ॥ जेणें परत्रसाधन । जेणें ग्रंथें होय ज्ञान । जेणें होइजे पावन ।
त्या नांव ग्रंथ ॥ ३४ ॥ ग्रंथ बहुत असती । नानाविधानें फळश्रुती । जेथें
नुपजे विरक्ती । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५ ॥ मोक्षाविण फळश्रुती । ते दुरा-
शेची पोथी । ऐकतां ऐकतां पुढती । दुराशा वाढे ॥ ३६ ॥ श्रवणीं लोभ
उपजेल जेथें । विवेक कैंचा असेल तेथें । बैसलीं दुराशेचीं भुतें । तयां
अधोगती ॥ ३७ ॥ ऐकोनीच फळश्रुती । पुढें तरी पावों म्हणती । तयां
जन्म अधोगती । सहजचि जाहली ॥ ३८ ॥ नाना फळें पक्षी खाती ।
तेणेंचि तयां होय तृप्ती । परी त्या चकोराचे चित्तीं । अमृत वसे ॥ ३९ ॥
तैसे संसारी मनुष्य । पाहे संसाराची वास । परी जे भगवंताचे अंश । ते
भगवंत इच्छिती ॥ ४० ॥ ज्ञानियांस पाहिजे ज्ञान । भजकास पाहिजे
भजन । साधकास पाहिजे साधन । इच्छेसारिखें ॥ ४१ ॥ परमार्थास
पाहिजे परमार्थ । स्वार्थास पाहिजे स्वार्थ । कृपणास पाहिजे अर्थ । मना-
पासूनी ॥ ४२ ॥ योगियास पाहिजे योग । भोगियास पाहिजे भोग ।
१. व्रत. २. एक क्षुद्र देवता, तिचा. ३. ज्यांत आत्मज्ञान नाहीं तो ग्रंथ. ४.
संसाराचा कंटाळा. ५. वैराग्य. ६. एक पक्षी, त्या ते. ७. द्रव्य. ८. विषयी पुरुषास.

१८० श्रीदासबोध. [ दशक
रोगियास पाहिजे रोग-। हरती मात्रा ॥ ४३ ॥ कवीस पाहिजे प्रबंध १ ।
तार्किकास पाहिजे तर्कवाद । भाविकास संवाद २ । गोड वाटे ॥ ४४ ॥ पंडि-
तास पाहिजे व्युत्पत्ती । विद्वानास अध्ययनप्रीती । कलावंता आवडती ।
नाना कळा ॥ ४५ ॥ हरदासां आवडे कीर्तन । शुचिर्भूतास संध्यास्नान ।
कर्मनिष्ठा विधिविधान । पाहिजे तें ॥ ४६ ॥ प्रेमळास पाहिजे करुणा ।
दक्षता पाहिजे विचक्षणा । चातुर्य पाहे शाहाणा । आदरेंसी ॥ ४७ ॥
भक्त पाहे मूर्तिध्यान । संगीते ३ पाहे तालज्ञान । रागज्ञानी तानमान । मू-
र्च्छना पाहे ॥ ४८ ॥ योगाभ्यासी पिंडज्ञानें ४ । तत्वज्ञानी तत्वज्ञान । नाडी-
ज्ञानी मात्राज्ञान । पाहतसे ॥ ४९ ॥ कामिक पाहे कोकशास्त्र ५ । चेटकी
पाहे चेटकमंत्र । यंत्री पाहे नानायंत्र । आदरेंसी ॥ ५० ॥ टवाळासि आवडे
विनोद । उन्मत्तास नानाछंद । तामसास प्रमाद ६ । गोड वाटे ॥ ५१ ॥
मूर्ख होय नादलुब्धी । निंदक पाहे उणी संधी । पापी पाहे पापबुद्धी ।
लावून अंगीं ॥ ५२ ॥ एका पाहिजे रसाळ । एका पाहिजे पाल्हाळ । एका
पाहिजे केवळ । साबडी भक्ती ॥ ५३ ॥ आगमी ७ पाहे आगम । शूर पाहे
संग्राम । एक पाहती नानाधर्म । इच्छेसारिखे ॥ ५४ ॥ मुक्त पाहे मुक्त-
लीला । सर्वज्ञ पाहे सर्वज्ञकळा । ज्योतिषी भविष्य पिंगळा । वर्णू पाहे ॥
५५ ॥ ऐसे सांगावे ते किती । आवडीसारिखें ऐकती । नाना पुस्तकें वाचिती ।
सर्वकाळ ॥ ५६ ॥ परी परत्र ८ साधनेंविण । म्हणों नये तें श्रवण । जेथें
नाहीं आत्मज्ञान । तया नांव कर्मणुक ॥ ५७ ॥ गोडीविणें ९ गोडपण । नाकें-
विण सुलक्षण । ज्ञानाविण निरूपण । बोलोंचि नये ॥ ५८ ॥ आतां असो
हें बहुत । ऐकावा परमार्थग्रंथ । परमार्थग्रंथेंविण व्यर्थ । गाथागोवी ॥
५९ ॥ म्हणोनि नित्यानित्य विचार । जेथें बोलिला सारासार । तोचि ग्रंथ
पैलपार । पाववी विवेकें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सप्तम-
दशके श्रवणनिरूपण नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१. कविता. २. सरळ, उपदेशपर भाषण. ३. गाणारा. ४. शरीराचें ज्ञान.
५. कामशास्त्र. ६. आळस. ७. वेदाभ्यासी. ८. परलोकींचें. ९. प्रेमावांचून.

७ वा. ] देहातीत. १८१
१०. देहातीत.
श्रीगणेशाय नमः ॥ मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें अ-
सत्य । मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पहातां ॥ १ ॥ सत्य कळावया-
कारणें । बोलिलों नाना निरूपणें । तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २ ॥
असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें । सत्य असोन हरपलें ।
जेथील तेथें ॥ ३ ॥ वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चय करिती ।
तरी न ये आत्मप्रचीती । सत्यस्वरूप ॥ ४ ॥ सत्य असोन आच्छादलें ।
मिथ्या असोन सत्य झालें । ऐसें विपरीत वर्तलें । देखत देखतां ॥ ५ ॥
ऐशी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं । संतसंगें निरूपणीं । विचार
घेतां ॥ ६ ॥ मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि १ आपण । तेणें बा-
णली खूण । परमार्थाची ॥ ७ ॥ तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं
मिळालें । निजरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८ ॥ प्रारब्धीं टाकिला देहो ।
बोधें फिटला संदेहो । आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवरें २ ॥ ९ ॥
ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यात्वें निर्विकार । जेथें पडे तेचि सार । पुण्य-
भूमी ॥ १० ॥ साधुदर्शनें पावन तीर्थे । पुरती त्यांचे मनोरथ । साधु न
येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्राचें ॥ ११ ॥ ३ पुण्य नदीचें जें तीर । तेथें
पडावें हें शरीर । हा इतर जनांचा विचार । साधु तो नित्यमुक्त ॥ १२ ॥
उत्तरायण हें उत्तम । दक्षिणायन तें अधम । हा संदेहीं वसे भ्रम । साधु
तो निःसंदेही ॥ १३ ॥ शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवाँ ४ मरण ।
अंतीं राहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४ ॥ इतुकें नलगे योगियासि । तो
जितांचि मुक्त पुण्यराशी । तिलांजली पापपुण्यांसी । दीधली तेणें ॥ १५ ॥
देहाचा अंत बरा आला । देह सुखरूप गेला । त्यास म्हणती धन्य झाला ।
अज्ञान जन ॥ १६ ॥ जनाचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत । ऐसें
कल्पून घात । करिती स्वयें ॥ १७ ॥ जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ
आयुष्य निघोन गेलें । मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें
॥ १८ ॥ जरी केलें ईश्वरभजन । तरी होइजे पावन । जैसें ५ व्हेव्हारितां धान्य ।
राशी माथां लाभे ॥ १९ ॥ दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उग-
१. आत्म्यास. २. शरीर. ३. पुण्यकर. ४. दिवसां. ५. व्यापार केला असतां.

[Header]
१८२ श्रीदासबोध. [ दशक


वेना । ऐसें हें वाक्य जना । ठाडकेंचि आहे ॥ २० ॥ न करितां सेवेच्या
व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा । तैसें अंतीं अभक्त नरा । स्वहित
न घडे ॥ २१ ॥ जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती ।
असो जे जे जैसें करिती । ते ते पावती तैसें ॥ २२ ॥ एवं न करितां भग-
वद्भजन । अंतीं न होइजे पावन । जरी आलें बरवें मरण । तरी भक्तीविण
अधोगती ॥ २३ ॥ म्हणोन साधूनें आपुलें । जीत असतां सार्थक केलें ।
शरीर कारणीं लाविलें । धन्य त्याचें ॥ २४ ॥ जे कां जीववन्मुक्त प्राणी ।
त्यांचें शरीर पडो रानीं । अथवा पडो स्मशानीं । तरी धन्य झालें ॥ २५ ॥
साधूचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला । हें प्रशस्त न
वाटे जनाला । मंदबुद्धीस्तव ॥ २६ ॥ अंत बरा नव्हे म्हणोन । कष्टी होतीं
इतर जन । परी ते बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७ ॥ जो जन्मलाचि
नाहीं ठायींचा । त्यास मृत्यु येईल कैंचा । विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोंट
भरिला जेणें ॥ २८ ॥ १स्वरूपानुसंधानबळें । सगळी माया नाडले । तया-
चा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९ ॥ तो जितचि असतां मेला । मर-
णास मारून ज्याला । जन्ममृत्यु न स्मरे त्याला । विवेकबळें ॥ ३० ॥ तो
जनीं दिसतो परी वेगळा । २वर्ततां भासे निराळा । दृश्य पदार्थ त्या निर्म-
ळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१ ॥ असो ऐसे साधुजन । त्यांचें घडल्या
भजन । तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२ ॥ सद्गुरूचा तो अंकित
साधक । तेणें केलाच करावा विवेक । विवेक केलिया तर्क । पुढें निरूपणीं
॥३३॥ हेंच साधकासि ३निरैवणें । अद्वैत प्रांजळ निरूपणें । तुमचेंहि समा-
धान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४ ॥ जो संतांस शरण गेला । तो संतचि होऊन
ठेला । इतर जनां उपयोगा आला । कृपाळूपणें ॥ ३५ ॥ ऐसें संतांचें महिमान ।
संतसंगें होतें ज्ञान । सत्संगापरतें साधन । आणिक नाहीं ॥३६॥ गुरुभजनाचे-
नि आधारें । निरूपणाचेनि विचारें । क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७ ॥
परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्गुरूचें भजन । सद्गुरुभजनें समाधान । अ-
कस्मात बाणे ॥ ३८ ॥ देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करा-
वें । भजनभावें तोषवावें । चित्त सद्गुरूचें ॥ ३९ ॥ शरणागतांची वाहे


[Footnotes]
१. स्वरूपचिंतनाच्या सामर्थ्यानें. २. व्यवहार करतांना. ३. सांगणें.

चिंता । तो एक सद्गुरु दाता । जैसें बाळक वाढवी माता । नानायत्नेंकरूनी
॥४०॥ श्लोक ॥ यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ ॥ म्हणोन सद्गुरूचें
भजन । जयास घडे तोचि धन्य । सद्गुरुविण समाधान । आणिक नाहीं ॥
४१ ॥ सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट । तेथें सांगितलें
स्पष्ट । सद्गुरुभजन ॥ ४२ ॥ सद्गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायक दुसरें
नाहीं । जयांस न माने¹ तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३ ॥ तेथें निरू-
पिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें । याकरितां सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे
॥ ४४ ॥ जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक । तयास सांपडे
एक । निश्चय ज्ञानाचा ॥ ४५ ॥ ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये
प्राकृत । सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ॥ ४६ ॥ प्राकृतें वेदांत कळे ।
सकळ शास्त्रीं पाहतां मिळे । आणि समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७ ॥
तें प्राकृत म्हणों नये । तेथें ज्ञानाचा उपाय । मूर्खासि हें कळे काय । मर्क-
टा नारिकेळ जैसें ॥ ४८ ॥ आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें ।
शिंपीमधील मुक्त² उणें । म्हणों नये ॥४९॥ जेथें नेतिनेति³ श्रुती । तेथें न चले
भाषाव्युत्पत्ती । परब्रह्म आदिअंतीं । अनिर्वाच्य ॥ ५० ॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे सप्तमदशके देहातीतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥


दशक आठवा.

⸻:*:⸻

१. देवदर्शन.

श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावध । विमल ज्ञान बाळबोध । गु-
रुशिष्यांचा संवाद । अतिसुगम परियेसा ॥ १ ॥ नाना शास्त्रें धांडोळितां ।
आयुष्य पुरेना सर्वथा । अंतरीं संशयाची व्यथा । वाढोंचि लागे ॥ २ ॥
नाना तीर्थे थोरथोरें । सृष्टीमध्यें अपारें । सुगमें दुर्गमें दुष्करें । पुण्यदायकें
॥ ३ ॥ ऐशीं तीर्थे सर्वहि करी । ऐसा कोण रे संसारीं । फिरों जातां जन्म-


१. मान्य होत नाहीं. २. मोतीं. ३. 'अमुक ब्रह्म नव्हे' असें सांगतात;
पण 'अमुक आहे' म्हणून दाखवूं शकत नाहींत.

१८४ श्रीदासबोध. [ दशक
वरी । आयुष्य पुरेना ॥४॥ नाना तपें नाना दानें । नाना योग नाना सा-
धनें । हीं सर्वहि देवाकारणें । करिजेत आहे ॥ ५॥ पावावया देवाधिदेवा ।
बहुविध श्रम करावा । तेणें देव ठायीं पाडावा । हैं सर्वमत ॥ ६ ॥ पावा-
वया भगवंतांतें । नाना पंथ नाना मतें । तया देवाचें स्वरूप तें । कैसें आहे
॥ ७ ॥ बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गणना कोण करी । एक देव कोणेपरी ।
ठायीं पडेना ॥ ८ ॥ बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना । तो
तेथेंचि राहिला मना । सद्ढ करूनी ॥ ९ ॥ बहु देव बहु भक्त । इच्छा
झाले आसक्त । बहु ऋषि बहु मत । वेगळाले ॥१०॥ बहु निवडितां निव-
डेना । एक निश्चय घडेना । शास्त्रें भांडती पडेना । निश्चय ठायीं ॥ ११ ॥
बहुत शास्त्रीं बहुत भेद । मतामतांसि विरोध । ऐसा करितां विवाद । बहुत
गेले ॥१२॥ सहस्रामध्यें कोणी एक । पाहे देवाचा विवेक । परी त्या देवाचें
कौतुक । ठायीं न पडे ॥ १३ ॥ ठायीं न पडे ऐसें म्हणतां । तेथेंचि ला-
गली अहंता । देव राहिला परता । अहंतागुणे ॥ १४ ॥ आतां असो हें
बोलणें । नाना योग ज्याकारणें । तो देव कोणत्या गुणें । ठायीं पडे ॥१५॥
देव कोणास म्हणावें । कैसें तयास जाणावें । तेंचि बोलणें स्वभावें । बो-
लिजेल ॥ १६ ॥ जेणें केलें चराचर । केले सृष्ट्यादि व्यापार । सकळकर्ता
निरंतर । नाम जयाचें ॥ १७ ॥ जेणें केल्या मेघमाळा । चंद्रबिंबीं अमृत-
कळा । तेज दिधलें रविमंडळा । जया देवें ॥ १८ ॥ ज्याची मर्यादा सा-
गरा । जेणें १स्थापिलें फणिवरा । जयाचेनि गुणें तारा । अंतरिक्ष ॥ १९ ॥
चौरी खाणी चारी वाणी । चौऱ्यायशीं लक्ष जीवयोनी । जेणें निर्मिले लोक
तिन्ही । तया नांव देव ॥२०॥ ब्रह्मा विष्णु आणि हर । हे जयाचे अवतार ।
तोचि देव हा निर्धार । निश्चयेंसी ॥ २१ ॥ देव्हारांचा उठोनि देव । करूं
नेणे सर्व जीव । तयाचेनि ब्रह्मकटा³व । निर्मिला न वचे ॥२२॥ ठायीं ठायीं
देव असती । तिहीं केली नाहीं क्षिती । चंद्र सूर्य तारा जीमूँ४ती । तयांचेनि
नव्हे ॥ २३ ॥ सर्वकर्ता तोचि देव । पाहूं जातां निरवयव । ज्याची कळा
लीलालाघव । नेणती ब्रह्मादिक ॥२४॥ येथें आशंका उठिली । ती पुढिलीये
१. शेषाला पृथ्वी धरण्यास लाविलें. २. उद्भिज, जारज, अंडज आणि
स्वेदज अशी चतुर्विध सृष्टि. ३. ब्रह्मांड. ४. मेघ.

८ वा.] देवदर्शन. १८५
समासीं फिटली । आतां वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २५ ॥ पैस
अवकाश आकाश । कांहींच नाहीं तें भकास । तया निर्मळीं वायूस । जन्म
जाहला ॥ २६ ॥ वायूपासोनि झाला वन्ही । वन्हीपासून झालें पाणी ।
ऐसी जयाची करणी । अघटित घडली ॥ २७ ॥ उदकापासून क्षिति² झा-
ली । स्तंभेंविण उभारिली । ऐशी विचित्र कळा केली । त्या नांव देव ॥ २८ ॥
देवें निर्मिली हे क्षिती । तिचे पोटीं पाषाण होती । तयांसीच देव म्हणती ।
विवेकहीन ॥ २९ ॥ जो सृष्टिनिर्माणकर्ता । तो ये सृष्टीपूर्वी होता । मग हे
तयाची सत्ता । निर्माण जाहली ॥ ३० ॥ ³कुलाल पात्रापूर्वी आहे । पात्र
कांहीं कुलाल नव्हे । तैसा देव पूर्वींच आहे । पाषाण नव्हे सर्वथा ॥ ३१ ॥
मृत्तिकेचें सैन्य केलें । कर्ते वेगळे राहिले । कार्य कारण एक केलें । तरी
होणार नाहीं ॥ ३२ ॥ तथापि होईल पांचभौतिक । निर्गुण नव्हे कांहींए-
क । कार्यकारणांचा विवेक । भूतांपरता नाहीं ॥ ३३ ॥ अवघी सृष्टि जो
कर्ता । तो ये सृष्टीहूनि परता । तेथें संशयाची वार्ता । काढूंच नये ॥ ३४ ॥
खांबसूत्रांची बाहुली । जेणें पुरुषें नाचविली । तोचि बाहुली हे बोली ।
घडे कैसी ॥ ३५ ॥ ४छांयामंडपांची सेना । सृष्टिसारिखी रचना । सूत्रें
चाळी परी तो नाना । व्यक्ति नव्हे ॥ ३६ ॥ तैसा सृष्टिकर्ता देव । परी तो
नव्हे सृष्टिभाव । जेणे केले नाना जीव । तो जीव कैसेनी ॥ ३७ ॥ जें ज्यास
करणें पडे । तो तें होणें कैसें घडे । म्हणोनि वायांचि बापुडे । संदेहीं पड-
ती ॥ ३८ ॥ सृष्टीऐसेंचि स्वभावें । ५गोपुरें निर्मिलें बरवें । परी तो गोपुरक-
र्ता नव्हे । निश्चयेंसी ॥ ३९ ॥ तैसें जग निर्मिलें जेणें । तो वेगळा पूर्णपणें ।
एक म्हणती मूर्खपणें । जग तोचि जगदीश ॥ ४० ॥ एवं जगदीश तो
वेगळा । जगनिर्माण ज्याची कळा । तो सर्वांमध्यें निराळा । असोन सर्वीं
॥ ४१ ॥ म्हणोनि भूतांचा कर्दम⁶ । त्यासि अलिप्त आत्माराम । अविद्या-
गुणें मायाभ्रम । सत्याचि वाटे ॥ ४२ ॥ मायोपाधि जगडंबर । आहे
सर्वही साचार । ऐसा विपरीत विचार । कोठेंच नाहीं ॥ ४३ ॥ म्हणोनि


१. अग्नि. २. पृथ्वी. ३. कुंभार. ४. पातळ पडदा लावून आंत दिवा ठेवतात
व मधून कागदाचीं चित्रे, आकृति फिरवितात, त्या प्रकारांतील. ५. देवळांत देवा-
च्या समोर कांहीं मजले बांधतात ते. ६. परस्परांचें मिश्रण.

१८४ श्रीदासबोध. [ दशक
जग मिथ्या साच आत्मा । सर्वां पर जो परमात्मा । अंतर्बाह्य अंतरात्मा ।
व्यापूनि असे ॥ ४४ ॥ तयास म्हणावें देव । येर हें अवघेंचि वाव । ऐसा
आहे अंतर्भावें । वेदांतींचा ॥ ४५ ॥ पदार्थ वस्तु नाशवंत । हें तों अनु-
भवास येत । या कारणें भगवंत । पदार्थां वेगळा ॥ ४६ ॥ देव निर्मळ आणि
अचळ । शास्त्रे बोलती सकळ । तया निश्चळास चंचळ । म्हणों नये सर्वथा
॥ ४७ ॥ देव आला देव गेला । देव उपजला देव मेला । ऐसें बोलतां दुरि-
ताला । काय उणें ॥ ४८ ॥ जन्ममरणाची वार्ता । देवास न लागे सर्वथा ।
देव अमर जयाची सत्ता । त्यास मृत्यु कैसेनी ॥ ४९ ॥ उपजणें आणि मरणें ।
येणें जाणें दुःख भोगणें । हें त्या देवाचें करणें । तो कारण वेगळा ॥ ५० ॥
अंतःकरण पंच प्राण । बहुतत्त्वीं पिंडज्ञान । या सर्वांस आहे चळण । म्हणो-
नि देव नव्हती ॥ ५१ ॥ एवं कल्पनेरहित । तया नांव भगवंत । तेथें देव-
पणाची मात । भासत नाहीं ॥ ५२ ॥ तंव शिष्यें आक्षे पिलें । तरी हें कैसें
ब्रह्मांड झालें । कर्तृपणें कारण पडलें । कार्यामध्यें ॥ ५३ ॥ द्रष्टेपणे द्रष्टा
दृश्यीं । जैसा पडे अनायासीं । कर्तृ पणें निर्गुणासी । गुण तैसे ॥ ५४ ॥
ब्रह्मांडकर्ता कवण । कैसी त्याची वोळखण । देव सगुण कीं निर्गुण । मज
निरूपावा ॥ ५५ ॥ एक म्हणती ब्रह्मातें । इच्छामात्रें सृष्टि करितें । सृष्टि
करितें त्यापरतें । कोण आहे ॥ ५६ ॥ आतां असो हे बहु बोली । सकळ
माया कोठूनि झाली । ते हे आतां निरूपिली । पाहिजे स्वामी ॥ ५७ ॥
ऐसें ऐकून वचन । वक्ता म्हणे सावधान । पुढीलिये समासीं निरूपण । सां-
गिजेक ॥ ५८ ॥ ब्रम्हां माया कैसी झाली । पुढें असे निरूपिली । श्रोतीं
वृत्ति सावध केली । पाहिजे आतां ॥ ५९ ॥ पुढें हेंचि निरूपण । विशद केलें
श्रवण । जेणें होय समाधान । साधकांचें ॥ ६० ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे अष्टमदशके देवदर्शननिरूपणं नामः प्रथमः समासः ॥ १ ॥
२. आशंका.
श्रीगणेशाय नमः ॥ मागां श्रोतीं आक्षेपिले । तें पाहिजे निरूपिलें ।
निरैवयवीं कैसें झालें । चराचर ॥ १ ॥ याचें ऐसें प्रतिवचन । ब्रम्ह जें कां
१. अभिप्राय. २. पापाला. ३. ज्यास अवयव नाहींत अशा ब्रम्हावर.

८ वा.] आशंका. १८७
सनातन । तेथें माया मिथ्या भान । विवर्तरूप भासे ॥ २ ॥ श्लोक ॥
आद्यमेकं परं ब्रम्ह नित्यमुक्तमविक्रियम् । तस्य मायासमावेशो जीवमव्या-
कृतात्मकम् ॥१॥ टीका ॥ आदि एक परब्रह्म । नित्य मुक्त अक्रिये परम ।
तेथें अव्याकृत सूक्ष्म । जाहली मूळमाया ॥ ३ ॥ एक ब्रम्ह निराकार । मुक्त
अक्रिय निर्विकार । तेथें माया वोडंबर । कोठूनि जाहली ॥ ४ ॥ ब्रम्ह अ-
खंड निर्गुण । तेथें इच्छा धरी कोण । निर्गुणीं सगुणेविण । इच्छा नाहीं
॥ ५ ॥ मुळीं असेचिना सगुण । म्हणोनि नामें निर्गुण । तेथें झालें सगुण ।
कोणे परी ॥ ६ ॥ निर्गुणचि गुणा आलें । ऐसें जरी अनुवादलें । लागों पाहे
येणें बोलें । मूर्खपण ॥ ७ ॥ एक म्हणती निरवयव । करून अकर्ता तो
देव । त्याची लीला बापुडे जीव । काय जाणती ॥ ८ ॥ एक म्हणती तो
परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा । प्राणी बापुडा जीवात्मा । काय
जाणे ॥ ९ ॥ उगाच महिमा सांगती । शास्त्रार्थ अवघाच लोपिती । बळेंच
निर्गुणास म्हणती । करूनि अकर्ता ॥ १० ॥ मुळीं नाहीं कर्तव्यता । कोण
करूनि अकर्ता । कर्ता अकर्ता हे वार्ता । समूळ मिथ्या ॥ ११ ॥
जें ठायींचें निर्गुण । तेथें कैंचें कर्तेंपण । तरी हे इच्छा धरी कोण । सृष्टि
रचावयाची ॥ १२ ॥ इच्छा परमेश्वराची । ऐसी युक्ति बहुतेकांची ।
परी त्या निर्गुणास इच्छा कैंची । हें कळेना ॥ १३ ॥ तरी हें इतुकें कोणें
केलें । किंवा आपणाचि झालें । देवेंविण उभारलें । कोणेपरी ॥ १४ ॥ देवें-
विण झालें सर्व । मग देवास कैंचा ठाव । येथें देवाचा अभाव । दिसोन
आला ॥ १५ ॥ देव म्हणों सृष्टिकर्ता । तरी येऊं पाहे सगुणता । निर्गुण-
पणाची वार्ता । देवाची बुडाली ॥ १६ ॥ देव ठायींचा निर्गुण । तरी सृष्टि-
कर्ता कोण । कर्तेंपणाचें सगुण । नाशवंत ॥१७॥ येथें पडिला कीं विचार ।
कैसें झालें चराचर । माया म्हणों स्वैतंत्र । तरी हें विपरीत दिसे ॥ १८ ॥
माया कोणीं नाहीं केली । हे आपणचि विस्तारली । ऐसें बोलतां बुडाली ।
देवाची वार्ता ॥१९॥ देव निर्गुण स्वतःसिद्ध । त्यासि मायेसि काय संबंध ।
१. भलताच भास होणें म्हणजे विवर्त. २. कर्मरहित. ३. व्याकृत म्हणजे विकार
पावलेलीं नव्हे अशी. ४. गारुड. ५. विचार ६. कर्ता म्हटला म्हणजे तो सगुण
होतो अर्थात् नाशवंत होतो असा अर्थ. ७. स्वतःच सृष्टि उत्पन्न करणारी.

१८८ श्रीदासबोध. [ दशक
ऐसें बोलतां विरूद्ध । दिसोन आलें ॥ २० ॥ सकळ कांहीं कर्तव्यता ।
आली मायेच्या माथां । तरी भक्तांसि उद्धरिता । देव नाहीं कीं ॥ २१ ॥
देवेंविण नुसती माया । कोण नेईल विलया । आम्हां भक्तांस सांभाळाया ।
कोणच नाहीं ॥ २२ ॥ म्हणोनि माया स्वतंत्र । ऐसा न घडे कीं विचार ।
मायेसि निर्मिता सर्वेश्वर । तो एकचि आहे ॥ २३ ॥ तरी कैसा आहे
ईश्वर । मायेचा कैसा विचार । तरी हें आतां सविस्तर । बोलिलें पाहिजे
॥ २४ ॥ श्रोतीं व्हावें सावधान । एकाग्र करूनिया मन । आतां कथानु-
संधान । सावध एका ॥ २५ ॥ ऐके आशंकेचा भाव । जनीं वेगळाले अन-
भव । तेहि बोलिजती सर्व । यथानुक्रमें ॥ २६ ॥ एक म्हणती देवें केली ।
म्हणोनि हे विस्तारली । देवास इच्छा नसती झाली । तरी हे माया कैंची
॥ २७ ॥ एक म्हणती देव निर्गुण । तेथें इच्छा करी कोण । माया मिथ्या
हे आपण । जाहलीच नाहीं ॥ २८ ॥ एक म्हणती प्रत्यक्ष दिसे । तयेसि
नाहीं म्हणतां कैसें । माया हे अनादि असे । शक्ति ईश्वराची ॥ २९ ॥ एक
म्हणती साच असे । तरी हे ज्ञानें कैसी निरसे । साचासारिखीच दिसे । परी
हे मिथ्या ॥ ३० ॥ एक म्हणती मिथ्या स्वभावें । तरी साधन कासया
करावें । भक्तिसाधन बोलिलें देवें । मायात्यागाकारणें ॥ ३१ ॥ एक म्हणती
मिथ्या दिसतें । भय अज्ञानसन्निपातें । साधनऔषध घेइजेतें । परी तें दृश्य
मिथ्या ॥३२॥ अनंत साधनें बोललीं । नाना मतें भांबावलीं । तरी माय ा
न वचे त्यागिली । मिथ्या कैसी म्हणावी ॥३३॥ मिथ्या बोले योगवाणी ।
मिथ्या वेदशास्त्रीं पुराणीं । मिथ्या नाना निरूपणीं । बोलिली माया ॥३४॥
माया मिथ्या म्हणतां गेली । हे वार्ता नाहीं ऐकिली । मिथ्या म्हणतांच
लागली । समागमें ॥ ३५ ॥ जयाचे अंतरीं अज्ञान । नाहीं वोळखिले
सज्जन । तयास माया मिथ्या भान । सत्यचि वाटे ॥ ३६ ॥ जेणें जैसा
निश्चय केला । तपास तैसाच फावला । पाहे तोचि दिसे बिंबला । तैसी
माया ॥ ३७ ॥ एक म्हणती माया कैंची । आहे तें सर्व ब्रह्मची । थिजल्या
विधुरल्या घृताची । ऐक्यता न मोडे ॥ ३८ ॥ थिजलें आणि विधुरलें । हें
स्वरूपीं नाहीं बोलिलें । साहित्य भंगलें येणें बोलें । म्हणती एक ॥ ३९ ॥
१. अज्ञानरूप सन्निपात ज्वरानें. २. दृष्टांत.